ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
==============
पपई गरम असते, अजून चार गोष्टी थंड असतात आणि पाच गोष्टी गरम असतात असे आयुर्वेद सांगते. आता कोणत्या अन्नाची किती रासायनिक उर्जा आहे हे पाहून त्या अन्नाचे गरमीचे पोटेंशियल सांगता येईल. आयुर्वेदात अभिप्रेत असलेल्या गरमी आणि थंडी या संकल्पनांचा अर्थ भौतिकशास्त्रातल्या संज्ञांशी जुळता आहे कि वेगळा? आयुर्वेद ज्यांना थंड आणि गरम पदार्थ म्हणतो त्यांच्या रासायनिक उर्जांत काही कोरिलेशन नाही असे प्राथमिक दृष्ट्या जाणवते.