ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
==============
पपई गरम असते, अजून चार गोष्टी थंड असतात आणि पाच गोष्टी गरम असतात असे आयुर्वेद सांगते. आता कोणत्या अन्नाची किती रासायनिक उर्जा आहे हे पाहून त्या अन्नाचे गरमीचे पोटेंशियल सांगता येईल. आयुर्वेदात अभिप्रेत असलेल्या गरमी आणि थंडी या संकल्पनांचा अर्थ भौतिकशास्त्रातल्या संज्ञांशी जुळता आहे कि वेगळा? आयुर्वेद ज्यांना थंड आणि गरम पदार्थ म्हणतो त्यांच्या रासायनिक उर्जांत काही कोरिलेशन नाही असे प्राथमिक दृष्ट्या जाणवते.
वेगळा अर्थ असावा. कांदा थंड
वेगळा अर्थ असावा. कांदा थंड असतो म्हणतात. गूळ उष्ण असतो असं म्हणतात.
दही उष्ण असतं पण ताक थंड असतं
दही उष्ण असतं पण ताक थंड असतं म्हणतात. हे तर खंप्लीट डोक्यावरून गेलंय.
परिणाम
तुम्ही ग्रहण केलेल्या अन्नावर शरीराची प्रतिक्रिया काय असते त्या प्रतिक्रियेचे लेबल त्या अन्नाला देतात.
म्हनजे पपई खाउन जर तोंड येत असेल, किम्वा भग्म्दर्/फिशर सदृश त्रास होत असेल; पित्ताच्या उष्ण ढेकरा येत असतील तर तो पदार्थ उष्ण.
बर्फ हा सुद्धा उष्ण म्हणून गणला जातो असे ऐकले आहे.
आहरशास्त्र वा आयुर्वेदातील अधिकारी व्यक्ती हे नेमके सांगू शकतील. माझी माह्तिई ऐकिव आहे.
मिपावरील प्रास हा आय डी बहुतेक आयुर्वेदिक डॉ आहे.
प्रश्न मिपावर टाकला, व त्यांच्या नजरेस पडला तर ते उत्तर देणे शक्य आहे.
(त्यांनी एक धागाही काढला होता; आता नाव विसरलो)
काही सदस्य/आयडी हे
काही सदस्य/आयडी हे धूमकेतूसारखे उगवतात आणि गायब होतात. म्हणजे ते ऐसीवर येत असतीलही पण लेखन/प्रतिसाद सहभाग काहीच नसतो. याचे कारण काय असावे?
दोन उदाहरणे देतो. वैयक्तिक वाटू शकेल पण तरीही कुतुहल आहे......
१. चंद्रशेखर(?) यांच्या इमामवाडी - मेल्टिंग पॉट या धाग्यावर नीरा या आयडीने अत्यंत माहितीपूर्ण आणि आधिकारिक* प्रतिसाद दिले. त्यानंतर पुन्हा त्या कधीही दिसल्या नाहीत.
२. उत्पल यांनी "गृहिणींना/च्या कामाचा मोबदला" याबद्दल एक सर्व्हे इथे टाकला आणि तेही पुन्हा क्वचितच दिसले. त्या सर्व्हेला आलेल्या प्रतिसादांतून पुढे काय निष्कर्ष निघाले वगैरेसुद्धा काही कळले नाही.
उत्पल
उत्पल क्वचित का अवतरतात ह्याबद्दल त्यांनी http://www.aisiakshare.com/node/2214 ह्या धाग्यात लिहिलं आहे.
चंद्रशेखर ह्यांचं ठाउक नाही.
मला व्यक्तिशः दोघांचंही लिखाण वाचायला आवडतं.
तक्रार चंद्रशेखर यांच्याविषयी
तक्रार चंद्रशेखर यांच्याविषयी नाही...... त्यांच्या धाग्यावर उत्तम दर्जेदार प्रतिसाद देणार्या नीरा यांच्याबद्दल* आहे.
*त्यांच्याबद्दलसुद्धा तक्रार नाही चौकशी आहे.
चांगलं लेखन करणारे अनेक लोक
चांगलं लेखन करणारे अनेक लोक लिहितात, त्यांना चांगला प्रतिसादही मिळतो, पण नंतर ते नाहीसे होतात. तुम्ही नीरा यांचा उल्लेख केलात - मला खवचट खानांचं नाव सुचलं. त्यांनी तर बराच काळ, आणि वेगवेगळ्या लेखांतून लेखन केलं. ऐसीवरच किंवा या माध्यमावरच काय, लेखन करणं हाच एक बराच वेळखाऊ प्रकार आहे. त्यामुळे लोकांच्या इतर प्राथमिकतांच्या मागे पडू शकतं. त्याला काही इलाज आहे असं वाटत नाही. संस्थळांवरचा सहभागही वेगवेगळ्या फेजेसमधून जातो. अनेक लोकं काही लेखन करण्याआधी बराच काळ वाचनमात्र असतात. भीड चेपली किंवा, संस्थळांवर जी काही मजा चालते त्याच्यात सहभागी व्हावंसं वाटलं की सक्रिय होतात. बऱ्याच जणांसाठी काही काळ घालवल्यानंतर यातली नवलाई संपल्यामुळे म्हणा, किंवा इतर गोष्टी पुढे आल्यामुळे म्हणा, हळूहळू रिटायर होतात. गेल्या काही वर्षांत फेसबुक आणि व्हॉट्सअॅप आल्यापासून तिथले छोटे ग्रुप अधिक सोयीचे किंवा हवेहवेसे वाटतात, हेही कारण असेल.
उत्पल यांनी जो सर्व्हे घेतला होता त्यातले काही निवडक प्रतिसाद 'मिळून साऱ्याजणी'च्या गेल्या दोन अंकांत प्रसिद्ध झालेले आहेत. सर्व प्रतिसादांचा सारांश ते काढून प्रसिद्ध करणार आहेत की नाही याची कल्पना नाही.
नविन आयडींना प्रोत्साहन देणे,
नविन आयडींना प्रोत्साहन देणे, किमान त्यांनी ऑड मते मांडलेली असली तरी त्यांच्यावर धावून न जाणे हे सहसा मराठी संस्थळावर होत नाही. म्हणून बुजरे आयडी दंगा, व्यक्तिगतपणा पाहून नंतर येत नसू शकतात.
आआप = केजरीवाल असे समीकरण
आआप = केजरीवाल असे समीकरण आआपला घातकही ठरू शकते. चांगल्या विचारांचे कित्येक नेते आआपकडून निवडणूकीला उभे आहेत. त्यांच्याकडे केजरीवाल यांच्या काही वादग्रस्त चाळ्यांमुळे दुर्लक्ष होऊ नये असे राहून-राहून मनात येते.
उष्ण
स्निग्ध पदार्थ आणि जास्त साखर ज्यात असते ते उष्ण असा अंदाज आहे.
पपई, आंबा सदृश फळे उष्ण तर मोसंबी, कलिंगड वगैरे थंड. दही ताक याचे सुद्धा तसेच असावे. ताकात (लोणी काढलेल्या) स्निग्ध पदार्थ कमी म्हणून ते दह्यापेक्षा कमी उष्ण/ थंड.
एकच पदार्थ(भाज्या वगैरे) वेगवेगळ्या प्रकारे बनवून कमी जास्त उष्ण करता येतो- त्यातील साखर आणि/किंवा स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमीजास्त करून.
तसे नाहिये
तसे नाहिये.
साय -साखर, लोणी-साखर हे शीत म्हणून गणले गेले आहेत.
मला तसे वाटत नाही. कोणत्या
मला तसे वाटत नाही. कोणत्या प्रमाणात खाल्ले जातात त्यावर अवलंबून असावं. जास्त(प्रमाणाबाहेर) खाल्ले तर उष्णता जाणवेल असे मला वाट्ते.
सहमत
दूध थंड. त्याचेच दही लागले की ते दही उष्ण. त्याच दह्याचे ताक पुन्हा थंड. लोणी थंड.
गूळ उष्ण पण खडीसाखर, साधी साखर थंड. मध गुळाहून थंड आणि साखरेहून उष्ण. असेच काहीसे आहे. त्यातून उष्णतेची उर्जा किती मिळते यावर ते अवलंबून नाही. आयुर्वेदात शरीरावर त्याचा होणारा विशिष्ट परिणाम उष्ण- थंड नावाने गणला जातो.
हे नक्की कसे काय हे त्यातील तज्ञच सांगू शकतील.
+१
+१
हेच आणि असेच.
आयुर्वेदाची पक्की माहिती
आयुर्वेदाची पक्की माहिती नसताना स्निग्ध पदार्थाचे प्रमाण आणि साखरेचे प्रमाण हे थंबरूल म्हणून कोणती गोष्ट कमी जास्त खाल्ली तर चालेल हे ठरविण्यास उपयोगी आहे असे वाटते.
लोणी थंड असे जिथे कुठे म्हटले असेल तेही विशिष्ट प्रमाणात थंड मानावे वगैरे तपशील अध्यहृत धरून लिहिले असावे. तसेच कशाच्या तरी तुलनेत म्हटले असावे.परत त्याचे लेपन केल्यास किंवा ते खाल्ल्यास, तेही कोणत्या आजारात किंवा कसे असेही तपशील असण्याची शक्यता.
लोणी उष्ण पडूच शकत नाही असे नसावे...हा माझा अंदाज.
अर्थात नेमके काय ते अयुर्वेदाचे अभ्यासकच सांगू शकतील.
मला वाटतं शीत आणि उष्ण या
मला वाटतं शीत आणि उष्ण या आयुर्वेदातल्या तांत्रिक संज्ञा म्हणून आहेत. त्यामुळे पदार्थातला कॅलोरिक कंटेंटशी त्यांचा संबंध लावता येईलच असं नसावं. त्या संज्ञा सेल्फ कंसिस्टंट आहेत का हा प्रश्न वेगळा आहे. तो मात्र रास्त आहे. म्हणजे युक्लिडिय जॉमेट्रीचं मराठीत भाषांतर करताना काही कारणाने जर रेषा या शब्दाला ओळ म्हटलं तरी ती जॉमेट्री म्हणून परिपूर्ण असेल मात्र 'ओळीत किती शब्द मावतील?' हा प्रश्न निरर्थक असू शकतो.
ही विधानं फारच पेडागॉजिकल आहेत. आयुर्वेदाविषयी किंवा वैद्यकाविषयी मला फारशी माहिती नाही.
तापमान आणि उर्जा
Just a point, पदार्थाचे स्वतःचे तापमान आणि त्याची रासायनिक उर्जा यांचा अर्थाअर्थी संबंध नाही. कितीही उर्जेचा पदार्थ कितीही तापमानाला (conditions apply) ठेवता येतो. अर्थात इथे असे म्हणायचे होते असे नाही. पण तरीही.
' :
अर्धविराम (,) आणि स्वल्पविराम (;) यांचे मराठी आणि इंग्रजीतले अर्थ/उपयोजन समान आहे का? म्हणजे मोठे डिवीजन , करतो आणि छोटे डिवीजन ; करतो.
My brother's family has three members, e.g. A; B; C;(,?)my sister's family has three members, e.g. P; Q; R(;?)(,?) and my family has 2 members e.g. X; Y.
भावाच्या घरी अ; ब; क हे तीन, बहीणीच्या घरी प; क्व; र हे तीन आणि माझ्या घरी क्ष; य हे दोन सदस्य आहेत.
ही वाक्ये अशीच लिहायची असतील तर वरची विरामांची योजना योग्य आहे काय?
केवळ ' च्या जागी ; (वा उलटे) झाल्याने एक कंपनी केस हारली होती. ते वाक्य कोणास माहीत आहे का?
जिथे स्माइली आली आहे तिथे मला
जिथे स्माइली आली आहे तिथे मला ( ; ) टायपाचे होते.
विरामचिन्हे ही मराठीतली नाहीत
विरामचिन्हे ही मराठीतली नाहीत असा संशय आहे. ती इंग्रजी भाषेवरून उचललेली आहेत.
म्हणजे आयडिअली त्या विरामचिन्हांचा तोच अर्थ असायला हवा.
भावाच्या घरी अ; ब; क हे तीन, बहीणीच्या घरी....
हे चूक आहे असे वाटते. अ,ब,क हे तीन; बहीणीच्या घरी.... असे (इंग्रजीतसुद्धा) हवे.
; च्या आधी आणि नंतर पूर्ण वाक्ये (क्लॉजेस) असतात असे वाटते.
+१
विरामचिन्हे मराठीतली नव्हेतच. पूर्णविरामसदृश | हे चिन्ह ओळ संपली म्हणून दाखवीत, पण तेवढेच. बाकी स्वल्पविराम, अर्धविराम, इ. काहीच नव्हते. अन मोडी कागदपत्रांत तेही दाखवीत नसत. हे सर्व ब्रिटिशांनी घुसडलेले आहे.
(श्रेणी देऊ शकत नाही.
(श्रेणी देऊ शकत नाही. माहितीपूर्ण प्रतिसाद)
बहुतेक तर, म्हणून हे शब्द कॉमाचे काम करतात.
If you beseech, I shall pardom him.
अगदी शब्दशः म्हणायला गेलो तर -
जर तू विनंती केलीस तर मी त्याला माफ करेन.
Because your are my pal, I shall take you to party.
कारण तू माझा मित्र आहेस म्हणून मी तुला पार्टी देईन.
बहुतेक तर, म्हणून हे शब्द
सहमत.
उचलेगिरी आणि उपयोजन
मला या उचलेगिरीबद्दल माहीती नाही परंतु विरामांचे उपयोजन दोन्ही भाषांत समान प्रकारे होते असे म्हणता येणार नाही.
१. मी तिच्याकडून सारी कागदपत्रे, पुरवण्या, आणि पत्रके घेतली.
नि
२. मी तिच्याकडून सारी कागदपत्रे, पुरवण्या आणि पत्रके घेतली.
ही वाक्ये इंग्रजीत असती तर त्यांचा अर्थ
१. कागदपत्रे, पुरवण्या व पत्रके हे तीन भिन्न आयटम आहेत.
२. पुरवण्या व पत्रके ही दोन कागदपत्रे आहेत
असा अर्थ होतो.
मराठीत असा फरक नाही. म्हणून उपयोजन भिन्न असावे.
मी तिच्याकडून सारी कागदपत्रे,
मी तिच्याकडून सारी कागदपत्रे, पुरवण्या आणि पत्रके घेतली.
हे मी तिच्याकडून कागदपत्रे i.e. पुरवण्या आणि पत्रके घेतली अशा अर्थी म्हणायचे असेल तर कागदपत्रे- पुरवण्या आणि पत्रके घेतली असे लिहायला लागेल.
इंग्रजीत हे विधान हायफन न
इंग्रजीत हे विधान हायफन न वापरता (सुद्धा) लिहितात.
तिच्याकडून कागदपत्रे i.e. पुरवण्या आणि पत्रके घेतली असे म्हणायला इंग्रजीत I took kagadapatre, purvanya and patrake from her असे म्हणतात. इथे पुरवण्या या शब्दानंतर कॉमा नाही हे फार महत्त्वाचे आहे.
राँयल पुनरागमन
मी आल्यामुळे आता वेगळे काही करणेची गरज आहे अस वाटत नाही.
ऐसी वर लेखकाने फोटो कंपल्सरी दिला पाहिजे ही एक गोष्ट मी सुचवू शकतो.
ऐसी वर लेखकाने फोटो कंपल्सरी
कशाला ते? पण एनीवे, तुमच्या इणंतीला माण देऊण आम्ही आमचा फटू अपलोडवीत आहोत. तेव्हा बेनच्या पाठलागावर जायचे असल्याने कॅमेर्याला जास्त वेळ मिळाला नाही, सबब फटू अंमळ ब्लर झालाय.
ऐसीला डेटिंग साईट बनवा असच
ऐसीला डेटिंग साईट बनवा असच सांगायच होत.
सगळ्या सो काँल्ड मराठी लेफ्ट विंग,सोशालिस्ट मुले- मुलींना एक व्यासपीठ तयार करून द्याव. जेणेकरून ऐसीच्या मोकळ्या पुरोगामी वातावरणात एक प्रकारचा उत्साह नांदू लागेल.
यामध्ये बंगाली उपविभाग सुरू करावा ही विनंती जेणेकज्रून दोन राज्यात रोटी बेटी व्यवहार होइल.
आणि नवीन मंगोली संस्कृती उदयास येइल. मराठी प्लस बेंगाली=मंगोली.
घंटा कै होणार नै
घंटा कै होणार नै त्यानं.
मराठी संस्थळावर अगोदरच बायका कमी(कमी असूनही जड आहेत हा भाग वेगळा ;) ), त्यात परत तिशीच्या आतल्या 'मुली' अजूनच कमी. त्यामुळे डेटिंगचा चान्सच नाय. पुर्षांबद्दलही तेच यद्यपि त्यांची संख्या बायकांपेक्षा जास्त आहे.
त्यामुळे ते होणं अशक्य.
ऐसी काही पायोनियर बदल घडवू
ऐसी काही पायोनियर बदल घडवू शकते.
१.मराठी २०-३० मधल्या बुर्झ्वा मुलींना आकर्षित करण्यासाठी काही उपक्रम जसे कि बुधवार काही बार्स मध्ये कपल इंट्री फ्री असते. काहीवेळेस मुलींसोबत जायला कोणी नसत त्यामुळे त्त्यांना मन मारून पबिंगच्या जीवनावश्यक गरजेला मुकाव लागत्त अशा मुलींसाठी ऐसी कडून स्वयंसेवक म्हणून जायचे.
२.बेंगाली मुली मराठी मुलींपेक्षा पोलीटिकली अँक्टिव असतात याचा ऐसीची सदस्यसंख्या वाढणेसाठी उपयोग होइल+ एक नवीन भाषा शिकायला मिळेल.
या धाग्यावर हे अवांतर पुरे
या धाग्यावर हे अवांतर पुरे असे सुचवतो!
सदस्य संपादक रहस्यभेद
तुम्ही जे काही म्हणता ते सदस्य म्हणून म्हणता कि संपादक म्हणून म्हणता हे कळणं महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही संपादक म्हणून म्हणत असाल तर मी लगेच ऐकेन आणि सदस्य म्हणून म्हणत असाल तर मला वाटते तसे करेन.
एक सदस्य म्हणून निव्वळ
एक सदस्य म्हणून निव्वळ 'सुचवले' होते.
संपादक म्हणून अवांतर योग्य त्या जागी हलवले आहे.
संपादकांनी सुचवले, सांगीतले,
संपादकांनी सुचवले, सांगीतले, पुटपुटले, इ इ काहीही केले तरी त्याचे माहाम्य कमी नाही.
सुचवले कि आज्ञिले हे महत्त्वाचे नाही, तसे करताना आपण सदस्य होतात कि संपादक हा मुद्दा आहे.
"आम सदस्य पार्टी" ची स्थापना
"आम सदस्य पार्टी" ची स्थापना करून तुम्ही आम्ही संपादक बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो का ?
बेंगाली मुली मराठी
ना, थाक. ऋषिदा शोत्तिइ बोलेछेन जे एइ धागाय एइ ऑबान्तोर ऑनेक होयेछे. एइ पॉइंटेर उपोर चॉर्चा सेपारेट धागाय कोरबो-जोदि शोम्पादोक-रा राजी हॉन.
तिशी
तिशीच्या आतल्याच कशाला पाहिजे म्हणे ?
तिशी नंतरच्या मुली छानच असतात की.
३८ व्या वर्षी स्त्री सर्वात
३८ व्या वर्षी स्त्री सर्वात सुंदर दिसते.
आँ?
हे कोण म्हणे आता ?
षोडशवर्षीयवगैरे पेक्षा भारी असते का ती ?
एक दुरुस्ती सुचवतो. तिशीनंतर
एक दुरुस्ती सुचवतो. तिशीनंतर त्या मुली रहात नाहीत. (गर्ल @ हार्ट इ. असलेच तर ते समजून येत नाही, सबब ढोबळ व्याख्याच करू.), म्हैला होतात.
(अर्थातच आमच्या लेखी. कुणाला हे फाट्यावर कोलावेसे वाटत असेल तर अवश्य कोलावे, पण आमचे मत सांगितले.)
त्यांच्या छानपणाबद्दल नंतर कधीतरी. ;)
अर्भका, बालिका, कन्या,
अर्भका, बालिका, कन्या, कुमारिका, तरुणी, महिला, बाई, प्रौढा, वृद्धा, म्हातारी, मॅडम, मिस, इ इ शब्दांची प्रत्येकाची रेंज वेगळी असेल. काहींची प्रत्यक्ष वयाला असेल तर काहींची दिसण्याला, मग वय काही का असेना.
अर्थातच.
अर्थातच.
काय की
आम्हाला तिशीनंतरच्या भेटल्या तरी मुलीच वाटल्या.
तुम्ही म्हणत असाल तर आपण त्यांना "महिला" म्हणू.
पण छे.
जमतच नै राव...
"महिला किती छान असतात" हे विचित्र वाटतं ऐकायला.
"मुळी किती छान असतात" हाच उत्स्फूर्त व प्रामाणिक ,नॉर्मल उद्गार वाटतो.
नेमकं काय विचित्र आहे , माहित नाही.
"महिला किती छान असतात" हे
महिलाच्या ठिकाणी कोणकोणते शब्द टाकले तर ते विधान ऐकायला विचित्र वाटणार नाही?
लाडू
लाडू किती छान असतात!
ऐसीवरचे लेख किती छान असतात!
फेसबुकवरचे फोटो किती छान असतात!
फुलांचे गंध किती छान असतात.
हरिण किती छान असते.
अॅपलचे मोबाइल किती छान असतात.
मासळीची चाल किती छान असते.
फुरसत असती तर अधिक लिहिलं असतं.
चान चान
चान चान ;)
हा मनोबाचा सिक्सर
हा मनोबाचा सिक्सर
गल्ली चुकलं काय?
वधुवर सुचक मंडळाची ती साईट ही नव्हे!
+१
किंवा डेटिंग साईटही नव्हे.
मुली
आताच मनात आलेला विचार :-
मुली किती छान असतात.
सह्या
प्रत्येक प्रतिसादाखाली सह्यांची पद्धत बंद करावी का?
त्यामुळे तेच तेच नजरेसमोर येते. सह्या ह्या व्हॉट्सअॅप स्टेटससारख्या असतात. त्या फक्त प्रोफाईल वर असाव्यात.
(मोबाईलवर ऐसीवरचे प्रतिसाद पाहताना ते ठळक जाणवते. त्यांना रुंदी खूप कमी असते. त्यामुळे मोठ्या स्क्रीन वर लहान असणारे प्रतिसाद मोबाईलवर लांब वाटतात. सह्यांमुळे प्रतिसादांची लांबी वाढते आणि उपप्रतिसाद वाढले की सगळा धागा बेढब दिसु लागतो. बर्याचदा प्रतिसाद असतो +१ आणि सही-नाव मात्र लांब. बरं ती सही एकदाच माहित झालेली पुरेशी असते. सारखी सारखी ती दिसावी हा आग्रह का. हा प्रकार इतर, इतर-भाषिक फोरम्सवर देखील आहेच. विशेषतः एखादी गोष्ट सर्चल्या गेल्यावर उत्तरादाखल येणार्या टेक्निकल फोरम्स वर अशा प्रकारची रचना असते. खूपदा ती आयडी काय म्हणतीय हेच दिसत नाही. मधलंच सगळं भपक्कन दिसते.)
किमान सहीची लांबी लिमिट करावी..
वरील प्रतिसाद सेन्सिबल आहे असे मला वाटते.
श्रेणी माहितीपूर्ण अशी देऊनही टोटलत विनोदी लागतेय, ती का ते कुणास ठाऊक.
एक विचारप्रयोग
(नाही म्हणजे, आयुर्वेदातली उष्ण-थंडची संकल्पना नेमकी काय आहे, ते ठाऊक नाही, ती संकल्पना/एकंदरीत आयुर्वेद बरोबर की चूक, या वादातही पडायचे नाही, आयुर्वेदातले काही कळतही नाही आणि आयुर्वेदाचे समर्थन किंवा विरोध यांपैकी काहीही करण्याचा इरादाही नाही. पण तरीही...)
एक विचारप्रयोग करून पहा. (प्रत्यक्षात करणे महागात लागू शकेल, आणि परिणामांची जबाबदारी मी घेणार नाही; सबब, प्रत्यक्षात करून पाहू नका, विचारप्रयोगच करा.)
एका काचेच्या भांड्यात संहत गंधकाम्ल [मराठीत: कॉन्सण्ट्रेटेड सल्फ्यूरिक अॅसिड.] भरून घ्या. हे काचेचे भांडे आता एखाद्या शीतकपाटात [मराठीत: रेफ्रिजरेटर.] ठेवा, आणि चांगले गार होऊ द्या. (गोठणबिंदूच्या [मराठीत: मेल्टिंग पॉइंट. किंवा तुम्ही फ्रीझिंग पॉइंटही म्हणू शकता हवे तर.] जेमतेम वर राहील, जेमतेम द्रवावस्थेत राहील इतके गार करता आले तर उत्तमच. नाही जमले, तरी बर्यापैकी गार होऊ द्या.)
आता, या थंडगार संहत गंधकाम्लाने आंघोळ केल्यास नेमके काय होईल, याचा केवळ विचार करा. या विचारप्रयोगातून बाकी काही नाही, तरी संहत गंधकाम्ल थंड की उष्ण, याचा सोक्षमोक्ष एकदाचा लावून टाकता यावा. एवढे यश आम्हाला रगड.
=====================================================================================================================
"इसे लिक्विड आक्सीजन में डुबो दो| लिक्विड इसे जीने नहीं देगा, और आक्सीजन इसे मरने नहीं देगा!"
----/\----
----/\----
करण्यासारखा दुसरा प्रयोग आहे
करण्यासारखा दुसरा प्रयोग आहे -
व्होडकाची बाटली घ्या. ती फ्रीजरमधे काही काळ (निदान तासभर ठेवा. आणि तासाभरात जेवून घ्या.) मग कपाटातून शॉट ग्लासेस काढा. त्यात ही व्होडका पटापट ओता आणि चटचट ग्लास तोंडात रिकामे करा. व्होडका घशाच्या खाली गेली की थंड लागते का गरम हे सांगा.
माझा अनुभव - घशाच्या खाली गरम लागते. पण या हिशोबात ताक थंड आणि दही उष्ण हे कसं ते कोणी समजावून सांगिलं तर बरं होईल.
(अवांतर)
शंका: नंतरचा भाग हा जर 'उत्तरार्ध' असेल, तर त्या उत्तरार्धाकडे नेणारा अगोदरचा भाग हा 'प्रश्नार्ध' का नसावा?
(तसेही, वरील प्रतिसादात अगोदरच्या भागात प्रश्न विचारलेला आहे. नंतरच्या भागात त्याचे उत्तर दिलेले नसले, तरीही.)
हम्म.... याला तूर्त
हम्म....
याला तूर्त पूर्वप्रश्नार्ध म्हणावे काय?
पश्चिम
पश्चिमप्रश्नार्ध कशास म्हणावे ?
प्रश्नातच दडलेय उत्तर!
प्रश्नातच दडलेय उत्तर!
उत्तरोत्तर
तुम्हा लोकांची प्रतिभा उत्तरोत्तर घटत चालली आहे की काय असा प्रश्न पडला.१
---------------
१. मी तो उचलला नाही. त्याचे काय झाले मला विचारू नये.
+१
म्हणून तर प्रतिभादाक्षिण्य दाखवतो आहोत.
मला तरी या कोट्या दिशाहिन
मला तरी या कोट्या दिशाहिन वाटताहेत.
ही कोटी म्ह.
साधा व्हेक्टर नसून टेन्सर आहे.
मँगोस्टीन ज्युस्बद्दल कोणाला
मँगोस्टीन ज्युस्बद्दल कोणाला स्वानुभव (फर्स्ट हँड अनुभव) आहे का? त्यात बरेच अँटायऑक्सीडंट्स असतात असे ऐकून आहे. इथे खूप महाग आहे ज्युस. म्हणजे ब्लूबेरी जर $५ ला असेल तर मँगोस्तीन ज्युस $१५ ला आहे.
नुसत फॅड आहे की खरच औषधी आहे?
जाहीरात
भारतात अंदाजे १५०,००० सरकारी बसेस आहेत. प्रत्येक बसच्या 'आतल्या भागात' जाहिरात करण्यासाठी तिथल्या सरकारला सरासरी १५०० रु प्रतिमाह मिळतात. हे झाले दर महिन्याला २२.५ कोटी रु प्रतिमाह. आता खाजगी बसेस सरकारी बसांच्या पाचपट आहेत. म्हणजे ११० कोटी प्रतिमाह. म्हणजे प्रतिवर्ष १३२०० कोटी. बसच्या आतील भागातील जाहीराती या एकूण जाहीरातींच्या मार्केटमधे किती टक्के असाव्यात?
जेव्हा सारेच उत्पादक जाहीराती करू लागतात, तेव्हा असे करण्याचा परिणाम उत्पादाच्या किमतीत होते. इथे आवश्यक जाहीरात आणि अनावश्यक जाहिरात अशा संकल्पना अस्तित्वात येतात. समजा मी आज वॉशिंग मशीन घेतली नि अजून ८ वर्षे घेणार नाही तरी मला ते क्षेत्रातले अपडेट रोज ऐकवणे ही अनावश्यक जाहीरात मानता येईल. जाहीरातींची पहुंच इतकी वाढली आहे कि अनावश्यक जाहीरातीचा हिस्सा प्रचंड वाढला असावा. आणि या इंडस्ट्रीच्या सुखासिन जीवनशैलीसाठी आपण खूप पैसे मोजत असावेत.
जाहिरात देणार्याच्या
जाहिरात देणार्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा "अनावश्यक जाहिरात" अनावश्यकच असते. बसमधून जाणारे शंभर लोक आहेत - त्यातल्या साठांना वॉशिंग मशीन परवडत नाही, तिसांना या ना त्या कारणाने घ्यायचं नाही, आणि दहांना घ्यायचं आहे. म्हणजे ९०% जाहिरात खर्च अनावश्यक आणि १०% आवश्यक. पण त्या दहा टक्क्यांपर्यंतच जाहिरात पोचेल अशी युक्ती अस्तित्त्वात नव्हती, म्हणून ९०% अनावश्यक खर्च सुद्धा आवश्यक ठरत होता.
मग चेपु, गूगलचं जाहिरात-आधारित बिझनेस मॉडेल आलं. ते बिग डेटा वापरून टार्गेटेड जाहिरातीच देतात. उदा. अरुणजोशींनी वॉम घेतलं आहे, तर त्यांना आता डिटर्जंट पावडरींच्या जाहिराती येतील.
bentley
पुण्यातल्या फ्लॅटच्या किमती गुगलून पाहिल्यापासून मला bentley का कशाच्या तरी जाहिराती येतात ब्वा गूगल, चेपु आणि ऐसीवरसुद्धा !
झैरात, झैरात
झैरात, झैरात ;)
nopes
" फ्लॅट घेतल्यापासून " अशी शब्दरचना असती तर झैरात ठरली असती.
आम्ही निव्वळ गुगलून पाहिलं हो.
(व्हाइट हाउस किंवा विंडसर क्यासल कुठंशिक येतं ते गुगललं तर लागलिच कै आम्ही ते घ्यायला जात नै)
किंमती गुगलणे अन स्थान गुगलणे
किंमती गुगलणे अन स्थान गुगलणे यांत बरीक फरक आहे, कांय संमंजंलेंत!
!
बरं झालं विषय निघाला
मला ही जाहीरात सजेस्ट केली होती गूगल ने
http://www.amazon.com/How-Not-Be-Dick-Etiquette/dp/1936976021
कसंकाय बरं?!
डेटा सायंटीष्ट काय झोपा काढत आहेत का :) (काही मित्रांच्या म्हणण्यानुसार ते अगदी योग्य वाटेवर आहेत)
उत्तर द्या बॅट्मॅन उत्तर द्या
इंडीया वॉन्ट्स टू नो
lol
lol डेटा सायंटिस्ट झोपा काढत नैत.
ऐसीवर टवाळक्या करत हिंडतात.
ह्यांना एका लायनीत उभं करुन केजरिंच्या मागण्या, मोदिंचे दावे आणि राहुलची स्वप्न ऐकवली पायजेल.
ह्यांना एका लायनीत उभं करुन
त्यांनी तुमचा कोणता सर्व्हर बंद पाडला म्हणून त्यांना अशी शिक्षा??? हर हर....
आमचेही मत तुमच्या
आमचेही मत तुमच्या मित्रांप्रमाणेच आहे ;)
http://www.independent.co.uk/
http://www.independent.co.uk/news/world/europe/why-are-women-not-allowe…
हेग मधल्या आण्विक सुरक्षा परिषदेत स्त्रीयांना वाढपी (?) बनू दिले नाही. कारणे फार लंगडी वाटली.
बिल्डींगच्या भिंतींतून,
बिल्डींगच्या भिंतींतून, छतातून , फ्लोरमधून प्लास्टिक कंडूइटसमधून इलेक्ट्रिक वायर्स जातात. इमारतीचे आयुष्य खूप जास्त असते. केबलचे त्यामानाने कमी असते, तिप्पट /पाचपट कमी म्हणता येईल. पण मी कधी कुठे अक्क्खे वायर काढून दुसरे घालताना पाहिले नाही.
मी राहत असलेल्या एका घरात आम्ही येण्यापूर्वी इनवर्टर वापरत नसत. आम्ही आलो तेव्हा हेवी मशिनरी (ए सी, वॉशिंग मशिन) इनवर्टच्या सप्प्लायपासून आयसोलेट करायची होती. ते करण्यासाठी इलेक्ट्र्र्शिअनने कोणतेच सिविल स्ट्र्क्चर तोडले नाही. काही तासात ते केले.
मेन्स पासून प्रत्येक उपकरणाला /पॉइंटला वेगळी केबल जाते असे मानले तरी सप्प्लाय इन्वर्टर ते मेन्स असा नव्हता. इनव्हर्टर असाच एका पॉइंटला जोडला होता. मी त्याला विचारले - तू हे केले कसे? त्याने आपल्या मस्त स्टाइलने सांगीतले - तन्ने के करणा?
त्याने आपल्या मस्त स्टाइलने
हाच हाच तो मनातल्या छोट्या विचारांच्या धाग्याचा जनक! :P
त्याने उत्तर दिले असते तर आम्ही या धाग्याला मुकलो असतो काय?
मत
असे असल्यास हेवी मशिनरी (ए सी, वॉशिंग मशिन) इनवर्टच्या सप्प्लायपासून आयसोलेट झाली का? कारण सप्लाय इन्वर्टर ते एमसीबीबोर्ड असा जोडावा लागतो असे मत आहे, बोर्डावरील एमसीबी घरातील विविध उपकरणांना जोडले असतात, हव्या त्या उपकरणांप्रमाणे एमसीबीला इन्वर्टर सप्लाय जोड देणे गरजेचे आहे असे माझे मत आहे. तज्ञांनी अधिक माहिती द्यावी. वायरींग जुने असल्यास कल्पना नाही.
एक दुवा -
माहीतीसाठी धन्यवाद. पण एमसीबी
माहीतीसाठी धन्यवाद. पण एमसीबी घराच्या स्टेअरकेस्मधे आहे नि इन्व्हर्टर घराच्या मागच्या बाजूच्या (धुणे, भांडी, कपडे वाळवणे) एरियात आहे, तो ही तिथल्या एका साध्या पाइंटला कनेक्ट केला आहे.
असे कनेक्शन शक्य आहे. याचा
असे कनेक्शन शक्य आहे.
याचा दुसारा अर्थ हा की इन्व्हर्टरला जोडलेल्या उपकरणांना एमसीबी संरक्षण नाही.
आयसोलेशन?
असे असल्यास हेवी मशिनरी (ए सी, वॉशिंग मशिन) इनवर्टच्या सप्प्लायपासून आयसोलेट झाली का? म्हणजे लाईट गेल्यावर एसी वगैरे चालू होतो का?
आयसोलेट झाली असेलही/नसेलही.
आयसोलेट झाली असेलही/नसेलही. ते घरातले वायरिंग कसे केले आहे त्यावर अवलंबून आहे. एसीला मेन कनेक्शन कुठल्यातरी खोलीतूनच दिले असेल तर आयसोलेट झाले नसण्याचीही शक्यता आहे.
(झाले असावे कारण ते तर अरुणजोशींनी टेस्ट करून पाहिलेच असेल).
करामात
All the heavy equipement (हा शब्द फक्त सिंगूलर असतो म्हणे.) was properly isolated. म्हणजे लाइट गेली ते आपोआप बंद व्हायचे. उदा. चारही फॅन इनवरटरवर होते, ते सगळे एकदाच चालू केले (लाइट गेल्यावर) ते इनवरटर बोंबलायचा. पण लाइट जाण्यापूर्वी एसी, गिझर, पाण्याची मोतर, सगळे चालू असले तरी ते आरामात खटकन बंद व्हायचे. That is what surprized me.
त्याबाबाने कोणतीही भिंत न तोडता, आतली वायरे न काड्गता / घालता, घराच्या मागच्या बाजूला एका पोइंटला इनवरटर लावून ही करामात केली कशी असावी?
अंहं. अनेकवचनही equipment
अंहं.
अनेकवचनही equipment असंच होतं.
Software आणि hardwareचं पण असंच. (राजाच्या इंग्रजी नियमांप्रमाणे.)
एकवचन अनेकवचन
The equipment were good. The equipment was good. असे एम एस वर्ड मधे टंकल्यास व्याकरण चुकले आहे असे दाखवणारी हिरवी रेघ were च्या खाली येते. राइट क्लिक करून योग्य पर्याय पाहिला तर was येतो. म्हणून मी याला एकवचनी शब्द म्हणालो.
"अनेकवचनही equipment असंच होतं." असं तुम्हाला अभिप्रेत असलेल्या अर्थाने बरोबरच आहे.
ओह असंय काय. वर्डचं स्पेलिंग
ओह असंय काय.
वर्डचं स्पेलिंग / ग्रामर चेक तितकं विश्वासपात्र नाहीये. सेमीकोलन असलेली वाक्यं आली की ते गटांगळ्या खायला लागतं...
सेमीकोलन असलेली वाक्यं आली की
वाक्ये जर अतिच लांब (म्हणजे एका, अर्ध्या पानाचे एक वाक्य) तर हे खरे आहे. पण अन्यथा असं होत नाही.
मिक्रोसॉफ्ट ही अमेरिकन कंपनी
मिक्रोसॉफ्ट ही अमेरिकन कंपनी आहे. त्यात colour, odour, polarisation या शब्दांचं स्पेलिंग चुकलेलं दाखवतात का नाही?
वापरकर्त्यास त्याची डीफॉल्ट
वापरकर्त्यास त्याची डीफॉल्ट भाषा English (US) वा English (UK) अशी निवडावी लागते. If user does not change settings, it is English (US). So the words you have spelt here will be shown to be incorrect.
At any momemt you can change the document language and the error notifications will vanish.
(अवांतर)
मिक्रोसॉफ्ट??????
pun लक्षात कोण घेतो?
pun लक्षात कोण घेतो?
पन... पन...
...कळली नाही.
'डबक्यापलीकडे' मायक्रोसॉफ्टला मिक्रोसॉफ्ट म्हणतात काय?
खाडीच्या पलिकडे बऱ्याच
खाडीच्या पलिकडे बऱ्याच ठिकाणी.
क्या बात! क्या बात!! क्या
क्या बात! क्या बात!! क्या बात!!!
आदूबाळ, तुस्सी ग्रेट हो _/\_
(टेन्शन नका घेऊ, तोहफा कुबूल करवत नाही)
नित्य एकवचनी नाम
एकगठ्ठावाचक (non-countable mass noun) नाम असल्यामुळे equipment नित्य एकवचनी वापरतात. त्याचप्रमाणे traffic. समूहवाचक नामापेक्षा हे थोडे वेगळे आहे. ठीक एक वस्तू असली, तरी एकगठ्ठा नामे वापरात येतात, पण समूहवाचक नामे वापरत नाहीत. एका यंत्राला equipment म्हणता येते, पण एका मेंढीला समूहवाचक flock म्हणता येत नाही.*
मराठीतले समांतर उदाहरण द्यावे, तर "ऐवज", "माल", "मालमत्ता" वगैरे. "माल" म्हणजे त्याच्या अंतर्गत ठीक एक पोते असू शकते, किंवा अनेक प्रकारची अनेक पोती सुद्धा असू शकतात. तरी "माल" एकवचनीच वापरतात : "माल रेल्वेने धाडला" ("धाडले" असे वापरले, तर खटकते.)
----------------------------------
*Cattle हे समूहवाचक/एकगठ्ठावाचक नाम ऐतिहासिक गोंधळामुळे/वैचित्र्यामुळे नित्य अनेकवचनी आहे! परंतु असे अपवाद थोडेच आहेत - मला अन्य कुठला अपवाद पटकन आठवत नाही.
एकगठ्ठावाचक नामांसारखे त्यातील नगांची गणना करण्यासाठी वेगळा नग-वाचक शब्द जोडावा लागतो : piece of equipment सारखे head of cattle. परंतु समूहवाचक नामासारखे वागते, कारण एकच गाय/बैल असेल तर त्याला "cattle" म्हणता येत नाही. आणि नित्य अनेकवचनी असल्यामुळे त्या दोहोंच्या नियमित वापरापेक्षा वेगळे!
रोचक प्रतिसाद. *Cattle हे
रोचक प्रतिसाद.
Cattle वर एक रोचक वाचन.
माझ्या घरीही
इन्व्हर्टर हॉलमधल्या एका साध्या थ्री पिन सॉकेटला जोडला आहे. त्यातून निघालेली वीज कंट्रोल बॉक्समध्ये जाते आणि तिथून घरातल्या इतर ५ अँपियर पॉइंट्सकडे जाते. हेवी ड्यूटी इक्विपमेंट्सचा वीजपुरवठा त्त्यांच्या निराळ्या १५ अँप्स सर्किटब्रेकर्समधून होत असतो. ती मुख्य इनकमिंग वायरीला जोडलेली आहेत. त्यांना त्यांचे संपूर्ण संरक्षण मिळत असतेच.
काही उत्तरे
कोंड्यूटमधून गेलेली एकादी जुनी वायर बदलणे किंवा त्याच काँड्यूटमध्ये आणखी एक वायर घालणे हे उपद्व्याप मी करून घेतलेले आहेत. त्यासाठी आधी एक जाड पोलादी वायर घुसवतात आणि तिला दुसर्या टोकापर्यंत ढकलत नेतात, नंतर तिला जोडून तांब्याची तार कोंड्यूटमधून ओढतात.
इन्व्हर्टर काय करतो? वीजपुरवठा सुरू असतांना एसी सप्लायपासून डीसी वीज तयार करून बॅटरी चार्ज करतो आणि वीजपुरवठा नसतांना बॅटरीमधून येणार्या डीसी विजेचे एसीत रूपांतर करून ती वीज घरामधील उपकरणांना पुरवतो. यासाठी घरामधील वीज इन्व्हर्टरला आणि इन्व्हर्टरमधील वीज घरामधील उपकरणांना देणे आवश्यक असते. घरगुती इन्व्हर्टरची क्षमता मर्यादित असल्यामुळे त्याचा उपयोग फक्त दिवे पंखे वगैरेसाठी केला जातो. हेवी मशिनरीसाठी १५ अँपियर्सची आणि इतर पॉ़ईंट्ससाठी ५ अँप लाइन टाकली जाते. त्यासाठी कंट्रोलबॉक्समध्ये निरनिराळे खाचे असतात. इन्व्हर्टरमधून आलेली वीज १५ अँपच्या कुठल्याही तारेमध्ये जाणार नाही असे वायरिंग कंट्रोलबॉक्समध्ये करून घेता येते. इन्व्हर्टरला द्यायची वीज घरातल्या कुठल्याही रिकाम्या पॉईंटमधून देता येईल. या कामासाठी तोडफोड करण्याची गरज नसते. आमच्या घरी मी हेच करून घेतले आहे.
इन्व्हर्टरमधून आलेली वीज १५
चला. मनामधली एक शंका निराकृत झाली. धन्यवाद.
सील
पाश्चिमात्य देशांतही लाख वापरून निविदा सील करत असतील का?
नसतील (अर्थात असे फक्त सरकारी आणि जुन्या कंपन्याच करत असतात) तर तिथे कागदपत्रे (वा इमारती) सील करण्यासाठी काय वापरतात?
मानवाधिकार
http://news.iafrica.com/worldnews/910899.html
तिसरे/तत्सम जेंडर recognize करायला जगातल्या शासनांना/कोर्टांना २०१३/२०१४ उजडावे लागावे? कोण बोलत होतं रे एकविसाव्या शतकातल्या मानवाधिकारांबद्दल मिशा पिळून ?
१. सी ए आर मधे १०% मुस्लिम
This comment has been moved here.