ही बातमी समजली का? - १७
भाग १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७| ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.
तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
===
मुंबईत, कलाकार आणि संशोधिका विद्या कामत यांचे व्याख्यान. शीर्षक - Beyond the Circle: A Study of Roadside Shrines. on Saturday,
वेळ ५ एप्रिल २०१४. संध्याकाळी ५ वाजता.
स्थळ - Education Centre, डॉ भाऊ दाजी लाड, मुंबई शहर संग्रहालय
The practice of erecting wayside shrines which dates back to ancient India still proliferates in contemporary times, and in metropolitan cities such as Mumbai. Not only do these ubiquitous sanctums persist in the midst of drastic modern changes that often seem to be at odds with traditional locations, aesthetics and purposes; some of them even surpass established temples, churches and mosques in their popularity. Their persistence could be attributed to the fact that these shrines allow a culturally diversified, socially and linguistically multi-tiered, and fluctuating migrant population to engage with the city. Vidya’s extensive study, conducted over a period of two years, delves into some of the issues related to the making of roadside shrines: their ownership, aesthetic deliberations, spatiality, as well as their economic and political ramifications. Through this study of roadside shrines, she attempts to document the conditions of modern city life and the shifting social, religious, and emotional boundary lines that define this city.
Vidya Kamat is an artist, an academic, and researcher scholar. She holds a degree in fine arts and a doctoral degree in Comparative Mythology. She is associated with the University of Mumbai as an adviser for the subject of comparative mythology. She has presented and published research papers at seminar and journals across India. She was awarded a national cultural fellowship for her project on A Study and Documentation of Roadside shrines in Mumbai by Majlis, through HIVOS in 2002-2003. As an artist, Kamat’s art practice articulates the concern and friction between traditional Indian beliefs while coming to terms with urban Indian life. She questions the role of myths and traditional tales and their role in contemporary modern Indian social reality, in instigating intolerance and violence. Kamat’s select shows include, Palimpsests curated by Niru Ratnam and Through Other Eyes: Contemporary Art from South Asia, curated by Gerard Mermoz. She is also the founder member and curator of Talking Myths Project, an online archive for traditional tales from the Indian sub-continent.
The lecture will be held on Saturday, 5th April 2014, in the Education Centre, at The Museum Plaza, Dr. Bhau Daji Lad Mumbai City Museum. Do join us for tea in the Plaza at 6:00 pm, followed by the lecture at 6:30 pm. Since the seating is limited, we request you to please RSVP with us by email (ccardoza@bdlmuseum.org).
अरभाट शॉर्ट फिल्म क्लब
अरभाट शॉर्ट फिल्म क्लब - यांचं दुसरं सत्र ३ एप्रिल २०१४ रोजी संध्याकाळी ६:३० ते ८:३० मधे होईल. स्थळ - राष्ट्रीय फिल्म आर्काईव्ह, पुणे.
ख्यातकीर्त चित्रपटनिर्माते ओनिर, गजेंद्र अहिरे, रंगभूमीवरचे कलाकार आणि दिग्दर्शक किरण यज्ञोपवित, तरुण फिल्ममेकर अविनाश अरुण आणि श्रीहरी साठे या ठिकाणी उपस्थित असतील. या वेळी तारकोवस्की, कीएस्वोव्स्की, हरजोग, नोलन आणि शाबो यांच्या शॉर्ट फिल्म्स दाखवण्यात येतील. त्यानंतर चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी उपस्थितांशी गप्पा मारतील.
उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी यांनी अरभाट शॉर्ट फिल्म क्लब सुरू केला आहे. अधिक माहिती त्यांच्या फेसबुक पानावर मिळेल - दुवा
For registrations contact : Arbhaat Films, ‘Swagat’ lane no 3, plot no 71, Natraj housing society, behind Pegasus gym, near Pratidnya hall, Karvenagar, Pune – 411052. Contact : 020 25433549 / 08007893571.
--
माहितगार
पहा पहा मंजुळा
हायडेगर कट्टर अन्टि-सेमिटिक असल्याचा ठणठणित पुरावा. आधि अनेकांना कल्पना होतिच पण हा पुरावा संशयाला जराहि जागा ठेवत नाहि.
__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद
जिमेल
दहाव्या वाढदिवशी जिमेलच्या जन्माची रोचक कहाणी.
The Florentine Renaissance: The City as the Crucible of Culture
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात ३० मार्च ते ३ जून २०१४ या कालावधीत The Florentine Renaissance: The City as the Crucible of Culture हे प्रदर्शन आलेलं आहे. संग्रहालय सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळात सुरू असतं. (बुधवार आणि काही सुट्यांच्या दिवशी बंद)
अधिक माहितीसाठी दुवा
--
माहितगार
Beyond the Circle: A Study of
Beyond the Circle: A Study of Roadside Shrines
माहीतगार - तुम्ही जाणार आहात का? वृत्तांत वाचायला आवडेल.
भररस्त्यातली देवळं हा जरा जिव्हाळ्याचा विषय आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
रिलिजन-इन्डस्ट्रियल कॉम्प्लेक्स?
अमेरिकेतली अनेक मेगा-चर्चेस कायद्यातून पळवाट काढून कर भरण्याचे टाळतात. एका चर्चच्या "मालकां"कडे खाजगी जेट्स, प्रायव्हेट एअरपोर्ट्स आणि लक्झरी गाड्या आहेत - प्रॉपर्टी टॅक्सचा छदामही न भरता. एकाने तर आपले ६३ लाख डॉलर्सचे राहते मॅन्शन 'पार्सनेज' डिक्लेअर करून त्यावरही प्रॉपर्टी टॅक्स टाळला आहे.
हे तसं, बर्यापैकी सर्वश्रुत आहे. मात्र अगदी धार्मिक टेलिव्हिजन नेटवर्कलाही केवळ कर चुकवण्यासाठी 'चर्च' म्हणून मान्यता मिळते आहे. त्यासंबंधातली बातमी इथे -
http://www.npr.org/2014/04/01/282496855/can-a-television-network-be-a-ch...
भारतभरात मुस्लिम मतदार एका
भारतभरात मुस्लिम मतदार एका (गुप्त वगैरे) योजने अंतर्गत योजनेनुसार (ठरवून) एका(च) पक्षाला एकगठ्ठा मतदान करतात हे खोडणारा हा वाचनीय लेख.
मुस्लिम आणि हिंदु मतदारांच्या निकषात फार मोठा फरक दिसत नाही हे अधिक रोचक!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
वाचलाय
आधीच वाचलाय.
पण मग हे राजकिय पक्षांच्या ध्यानात येत नाही का ?
सर्वसमावेशक म्हणवले जाणारे आणि इतरही पक्ष बर्यापैकी मुस्लिम एकगठ्ठा मतदान ह्या प्रकाराला जरा वचकूनच का असतात ?
किंवा दुसर्या टोकाचे पक्ष त्यांच्या अश्या वचकून असण्याची झैरात करत आपला स्वतःचा हिंदु मतांचा जुडगा बरोब्बर तस्साच पण १८० अंश विरुद्ध दिशेने का बांधू पाहतात ?
राजकिय पक्ष, ज्यांचे भवितव्य अशा जिंकण्या-हरण्यावर बर्यापैकी अवलंबून आहे; ते ह्या गोष्टीस महत्व देताहेत म्हणजे गठ्ठा मतदान ह्यात काहीतरी फ्याक्ट नक्कीच असावी.
मग त्यात तथ्य असेल तर ते तसं ह्या लेखांच्या आक्डेवारीतून का दिसत नाही ?
ते मला विचारु नका.
मनोबांनी मेल्यानंतर शतकभरानं सदर प्रतिसाद लिहिलेला आहे हेसुद्धा आकडेवारी वापरुन तुम्ही लोक सहज सिद्ध कराल.
तुमच्या त्या ताकतीबद्दल नितांत आदरच आहे.
(मिडियामध्ये लोक असे आकडे वापरुन फेकु कसा जिंकणार हे मांडतात. तेच आकडे वापरुन केजरि किंवा पप्पू कसा जिंकणार हे सांगतात. आकडेवारीचा विजय असो!
)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
कुमाऊँचे नरभक्षक
येत्या १२ एप्रिल २०१४ ला स्नॉवेल तर्फे "कुमाऊँचे नरभक्षक" चे ऑडियो बुक प्रकाशित होत आहे, त्यचा प्रकाशन सोहळा पुढिल पत्त्यावर होतोय, जो सर्वांसाठी खुला आहे:
तारीख : १२ एप्रिल २०१४ (शनिवार) वेळ : संध्याकाळी ४.०० ते ५:३०
स्थळ : राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, लॉ कॉलेज रोड, पुणे
प्रमुख पाहुणे: सुबोध भावे, किरण यज्ञोपवीत
ऑडियो बुकबद्दलः
लेखक: जिम कॉर्बेट अनुवाद: डॉ सुभाष भेंडे
दिग्दर्शक: शार्दूल सराफ संगीत: गंधार संगोराम ध्वनी संयोजन: केतकी चक्रदेव
आवाज: सचिन खेडेकर, किरण यज्ञोपवीत, केतकी सराफ
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
१. सी ए आर मधे १०% मुस्लिम
१. सी ए आर मधे १०% मुस्लिम लोकसंख्येला देशातून अक्षरशः बाहेर काढले जात आहे. किती जणांना मारले जात आहे याची गणना नाही. हे करणारे इसाई.
२. म्यानमार मधे Rakhine प्रांतात ३०० मुस्लिम मारले. दिड लाख निर्वासित. हे करणारे? गेस? बौद्ध!!! आणि चीन, जपान सारखे अर्धवट बौद्ध नाही, शुद्ध बौद्ध!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सी ए आर म्हणजे?
सी ए आर म्हणजे?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक
सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक (बहुधा).
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
यस. अल जजिरावर दोनदा हा विषय
यस. अल जजिरावर दोनदा हा विषय 'इन डेप्थ' मधे (एक तासाचे सेशन असते) ऐकला म्हणून शॉर्ट फॉर्म वापरला गेला. अल्पावधीत देशाचे १०% मायनॉरीटी पॉप्यूलेशन ० वर आणणे काय असते हे कळेल.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अहो अल्-जजिरा चॅनल चा उद्देश
अहो अल्-जजिरा चॅनल चा उद्देश च अश्या बातम्या वाढवुन सांगणे आहे. त्यावर फार विश्वास ठेवु नका. भारतात हिंदूंचे काय होतय त्याची काळजी करा.
गुजरात मॉडेल
गुजरात मॉडेलबाबत वाचनात आलेला हा एक रोचक लेख
http://www.thehindubusinessline.com/opinion/columns/c-p-chandrasekhar/ha...
I am not sure whether the
I am not sure whether the authors of this article, C P Chandrasekhar and Jayati Ghosh, like or dislike Modi. But I can vouch that so far as understanding/interpreting economics is considered, they are nothing more than dumblings.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
But I can vouch that so far
But I can vouch that so far as understanding/interpreting economics is considered, they are nothing more than dumblings.
अरुणभाऊंचा मुद्दा - या लेखाच्या लेखकांना (C P Chandrasekhar and Jayati Ghosh यांना) अर्थशास्त्र फारसे समजत नाही - असा आहे.
व मी अरुणभाऊंशी असहमत आहे.
खरंतर अरुणभाऊंनी (अ)प्रत्यक्षपणे इलिजिबिलिटी/क्रेडेन्शियल्स चा मुद्दा उपस्थित केलेला आहे. त्यात समस्या ही आहे की Anybody's eligibility can be questioned. चर्चेचा उद्देश - हा पॉलिसीज चा प्रतिवाद करणे हा असावा. इलिजिबिलिटी वर प्रश्नचिन्ह उभे करणे हा नसावा. (Look who is talking. Gabbar ... of all the creatures ????)
१) C P Chandrasekhar and Jayati Ghosh यांचे मुख्य आर्ग्युमेंट हे आहे की मोदी सरकार हे "सप्लाय साईड" पॉलीसीज राबवते. लेखातील खालील वाक्य याचे दर्शक आहे - This is a model that, even more than for India as a whole, relies on patronising and providing incentives to large business while suppressing wage incomes. C P Chandrasekhar and Jayati Ghosh यांनी फक्त "सप्लाय साईड" ही संज्ञा वापरायचे टाळले आहे.
२) लेखाच्या लेखकांनी प्रॉपर अर्थशास्त्रीय मेट्रिक्स चा वापर केलेला आहे (उदा. दरडोई उत्पन्न). लेबर वेजेस मधे शहरी व ग्रामीण वेजेस असा भाव केलेला आहे - जे काळजीपूर्वक विश्लेषण केलेले असल्याचे एक लक्षण आहे.
३) "bargaining position of workers in Gujarat" याबद्दल अनुमान काढणे हे अर्थशास्त्र समजत असल्याचे चांगले लक्षण आहे. bargaining position of workers ह्या मुद्द्याला धरून रघुराम राजन यांनी अमेरिकन फायनान्शियल क्रायसिस (२००७ - २००९) ची कारणमीमांसा शोधायचा यत्न - फॉल्टलाईन्स या पुस्तकात केला होता.
४) लेखकांनी पेरलेले खालील वाक्य - It could be argued that wages may be low but then so is the relative cost of living, so that people can survive better even with lower wages because of lower prices. सुद्धा त्यांच्या चांगल्या अर्थशास्त्रीय आकलनाचे एक द्योतक आहे.
५) लेखकांनी गुजरात ची तुलना करताना नॅशनल अॅव्हरेज तसेच इतर प्रगतीशील राज्ये (उदा. केरळ) यांच्या बरोबर सुद्धा केलेली आहे. केरळ शी तुलना करताना - but this reflects the effect of migration and remittances - असा काऊंटर पॉईंट उपस्थित करून - आपण काळजीपूर्वक विश्लेषण केल्याचा आणखी एक पुरावा दिलेला आहे.
ऑपएड कॉलम्स मधे शब्दमर्यादा असते. ते शोधपत्र नसते. त्यामुळे त्यांना सगळे मुद्दे व्यवस्थित मांडता आलेले नसतीलही.
वे क्रेडेन्शियल्स बद्दल बोलायचेच झाले तर - जयती घोष या केंब्रिज मधून अर्थशास्त्राची डॉक्टरेट केलेल्या आहेत. She is definitely NOT a dumpling. त्या डाव्या विचारसरणीच्या आहेत (बहुतेक) पण म्हणून त्यांचा युक्तिवाद ऑटोमॅटिकली "डपलिंग" होत नाही.
सुयोग्य प्रतिसाद
प्रतिसाद आवडला. अरुणभाउ असे न म्हणता अरुणबाबु संबोधावे अशि दुरुस्ति सुचवतो.
__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद
Dumblings
इथे या लेखाच्या लेखकांनी कोणतीही पॉलिसी रिकमेंड केली नाही वा कोण्या पॉलिसीचा विरोध केला नाही. त्यांना फक्त इतकेच म्हणायचे आहे कि मोदींची जी पॉलीसी आहे तिच्याने कामगारांचा फायदा झाला नाही. हे विधान करताना त्यांनी ते बुद्धी लावून, अभ्यासपूर्वक, सगळे समजून घेऊन करायला पाहिजे होते. तळागाळातल्या कामगारांचे कल्याण करावे असे लेखकांना म्हणायचे आहे हे स्पष्ट आहे आणि मला त्याचा विरोध करायचा नाही. मग मी पॉलीसीचा प्रतिवाद कसा करू? मग उरतो प्रश्न फक्त त्यांच्या गुजरातबाबत अर्थिक निष्कर्ष काढायच्या क्षमतेचा! आता त्यांनी जो निष्कर्ष काढला आहे तो त्यांनी इतक्या चूक पद्धतीने काढला आहे कि त्यांना मूर्ख म्हणण्याशिवाय दुसरी संज्ञा मला सुचत नाही. मी dumpling म्हणालो नाही, dumbling म्हणालो आहे. Dumbling असा कोणता शब्द इंग्रजीत नाही पण त्यावरून मला "क्षुद्र, मूर्ख मनुष्य" असे सुचवायचे होते.
काळजीपूर्वक असे म्हणण्यापूर्वी लेख कशाबद्दल आहे हे काळजीपूर्वक पाहू. त्यातील खालिल विधाने पहा -
Have workers in Gujarat benefited from “development”?
But has it benefited its people, particularly workers?
या लेखाला पोलिटिकल ओवरटोन आहे हे कोणी नाकारू नये. हा लेख पंजाब केसरीत आला असता तर लेखकांना मूर्ख म्हणले नसते पण हिंदू बिझनेस लाईन मधे, जिथे जाणकार पेपर वाचतात, तिथे असा लेख लिहिणे म्हणजे मूर्खपणा आहे.
लेखकांनी वापरलेल्या मेट्रिक्सची चिकित्सा करताना पहिला प्रश्न उद्भवतो तो हा आहे कि त्यांनी अक्षरक्षः तीच गोष्ट सर्व राज्यांत कंपॅरिजन केली आहे का? तर याचे उत्तर हो असे आहे.
लेखाच्या शेवटी खालील कंक्लूजन काढले आहे -
This is a model that, even more than for India as a whole, relies on patronising and providing incentives to large business while suppressing wage incomes. So the much-vaunted “growth” in Gujarat is not only overstated — its fruits are also very unequally distributed, so that workers in Gujarat are among the worst of anywhere in India. Surely, this is not a development model that deserves praise or emulation.
आता दुसरा प्रश्न उद्भवतो तो असा कि असे म्हणण्यासाठी वापरलेला लोकांचा संच नीटसा प्रातिनिधिक आहे का? सामान्य वाचकासाठी सांगतो. मी जे हे काही सारे रेशो सांगतो आहे ते एक्झॅक्ट नाहीत, पण ठीकठाक आहेत. देशात ३०० लोक असले तर त्यातले १०० लोक काम करतात (मुले, वृद्ध, रिटायर्ड, गृहीणी, इ सोडून). या '१०० मधे' २० लोक जे मॅनेजर, शिक्षक, अर्थशास्त्री (गब्बर), मॅनेजर (अरुण) इ इ असतात त्यांना surveyors कामगार म्हणून गृहित धरत नाहीत. उरलेल्या ८० पैकी काही लोक (५%-१५%, १०% म्हणू) बेरोजगार असतात. उरलेल्या ७० मधे ५०% स्वावलंबी (स्वतःचे छोटे दुकान्, शेत असणारे), २५% नियमित (म्हणजे दीर्घकाळ एकाच जागी काम करणारे) नि २५% कॅज्यूअल असतात. हे आकडे भारताची सरासरी म्हणता येईल. प्रत्येक राज्यात या मधे खूप fluctuations आढळतात.
या लेख केवळ ग्रामीण भागाबद्दल आहे. गुजरातमधे शहरी लोकसंख्या ४२% आहे. म्हणजे हा लेख १००%*७०%*२५%*४२% म्हणजे ७.५% लोकसंख्येबद्दल (वा कामगारांबद्दल) आहे. हे रूरल कॅज्यूअल लेबर म्हणजे सर्वात तळागाळातले लोक. Do these 7.5% people represent the wellbeing of all 100% people? म्हणजे या ७.५% लोकांचे काय झाले आहे हे कळल्याने १००% लोकांचे काय झाले आहे हे कळते का? या लोकांचे पैसे त्यांना मिळालेले नसले तरी ते थेट large businesses ना मिळाले आहेत असे म्हणता येते का? उरलेल्या ९२.५% लोकांपैकी कोणाला ते मिळाले असणार हे ठरवण्यासाठी कामगार इंडस्ट्री कशी आहे ते पाहायला हवे. कमित कमी हे तरी हे तरी पाहायला हवे कि Are casual laborers and larges businesses are related to each other any fashion at all? Who benefits from low casual laborer wages?
आता ही वाक्ये पहा -
तिसरा प्रश्न उद्भवतो असा कि -
आता तुम्ही म्हणाल कि प्रातिनिधित्व जाऊ द्या, पण एकाच निकषावर इतर राज्ये गुजरातपेक्षा पुढे आहेत. म्हणजे हे ७.५% तळागाळातले लोक अन्यत्र well off आहेत. तेव्हा प्रातिनिधित्वाच्या निकषावर नसले तर इतर राज्यांशी तुलनात्मकतेच्या निकषावर लेखात मांडलेले वरील तथ्य नक्कीच योग्य असावे. अगदी असाच विचार लेखकांनी केला आहे म्हणून मी त्यांना डंबलिंग म्हणालो आहे. The authors have misled a casual reader to believe that they have compared the same thing for states - the ratio of real wages per month and cost of living per person at poverty line. Assuming that the state has to act as a welfare state to measure how it has fared, what statistic should be used? Have they selected correct statistic? Yes! The ratio they have selected is good representation of richness(or poverty). Then what is so wrong in the comparison? It is about the sample they have selected to apply the formula. And note that this time I am not talking about representativeness of the sample. I am talking about the accuracy of mathematical calculations.
What sample we should select to apply the ratio across all the states? Since we are talking poor people, we should compare poorest people of all states. Does the rural casual labor farely represent such population? Well*(reason for pause), yes. But the distribution of laborer types is different in different states. What is happening in case of this analysis is that the rock-bottom 5% population of Gujarat (it has more than average urbanization and less casual laborers than national average) is being compared with bottom 20% of population of Bihar (or 50% of Arunachal) because both of them are called rural casual labor. Obviously the average for Bihar will be better. If you want to do apple to apple comparison, you should compare same bottom percentiles of populations. Let me cite an example - Class G with 60 students claims superior average height of 120cm. Class B with 80 students claims lower average height of 100cm. Logic says to compare the heights of "some shortest" students in the class, they must be selected in the ratio 6:8.
The authors do not have any regard for this methodology. This formula will always go against states like Punjab, Haryana, Gujarat having less rural casual labor. Now wonder, economically best performing states like Punjab and Haryana are appearing as also ran in the chart. And rightly, all the north-eastern ultra-poor states (except Manipur in case of which majority population is settled in Imphal and Assam where a lot of cities have developed), the chart shows are better off! Because it includes virtually all the population of these states. I could have been able to appreciate if the chart showing a Arunachal man being able to feed twice as many family members as a Marathi man was prepared by someone just alighted from UFO and novice in earthly affairs.
Now my objection is not on not rating Gujarat in the top few states, but on rating it second from bottom. गुजराती माणूस ३.१ लोकांना पोसतो. सरासरी भारतीय ४.६ लोकांना पोसतात. गुजरातचा PCI २०% भारताच्या सरासरीपेक्षा जास्त आहे म्हणजे खरे तर ५.५२ लोकांना पोसायला हवे. म्हणजे गरीबांकडून श्रीमंतांकडे किती diversion झाले? म्हणजे मोदींचे मॉडेल गरीबांचे ४५% जाडीपी लार्ज बिझनेसेसला देते. म्हणजे ५० हजार मिलियनर्स एका वर्षात गुजरातकडून देशाला गिफ्ट. म्हणजे आज शून्य millionaire आहेत मानून २०१८ मधे ३ लाख millionaire बनवायचे टार्गेट/अंदाज एकटा गुजरातच पुरा करेल!! बाकीच्या भारताची गरजच नाही!! असो. इतकी अतिरेकी विधाने लेखकांना करायची नसावीत.
But what do the authors mean by supressing wages? How does a state government supress wages? राज्य सरकार हे कसे करते? कोणत्याही राज्यात किती कामगार organized sector मधे आणि unorganized sector मधे असतात? Organized sector मधले किती पब्लिक सेक्टर मधे असतात? त्यातले किती केंद्रात, राज्य सरकारात आणि ULBs मिळून जी संख्या होते त्यापैकी राज्य सरकार मधे असतात? म्हणजे राज्यातल्या किती कामगारांचे वेतन राज्य सरकारच्या नियंत्रणात असते? कायद्याने सरकार असे सप्रेशन करू शकते का? राज्य सरकारला त्यांचे स्वतःचे, त्यांच्या कंत्राटदारांचे, उप, उपोप कंत्राटदारांचे वेजेस दर सहा महिन्याला महागाईनुसार वाढवावेच लागतात.
इथे आपण खालिल काही मुद्दे पाहू -
१. There is no regulation and database of rural/urban, male/female, regular/self-employed/casual at central or state level. The conclusions are based on sample survey by MOSPI. Internationally someone is said to be employed ( meaning underumployed) if one earns at least 2 USD a day. In India even if one earns INR 2 a day, MOSPI includes such person as a casual labor. Now, in computing average wage of for casual labor, states with high employment rate are at disadvantage.
2*. The worst off people are unemployed people. If the authors really wanted to compute the impact on the poorest, they should have taken weighted average income of unemployed (which is 0)and of casual labor. This way Gujarat would have fared much better because the unemployment rate of Gujarat is lowest in India.
3. Because of MOSPI method of defining casual labor, people with real casual approch for work (on which families are dependent, etc) get counted due to blur in unemployed and casual people in states with higher rates of employment. Probably the casual laborers are not the right people being compared.
४. Any real wage, if it less than minimum wages specified, for certain categories of employers, is breach of law. It is criminal and the top most executive of the organization himself is liable to go to jail. So what we are talking here about, a lot of it is crime surveyed by the government.
सरकारच्या नितीचे बाजारात अर्थातच रिपल इफेक्ट होतात, पण त्यांना किती महत्त्व आहे हे पाहणे गरजेचे आहे. Ability to support number of people at poverty line मधे गुजरात ३.१, सरासरी भारताला ४.६ इतके लोक असा आकडा लेखकांनी सांगीतला आहे. त्याचे खापर सरकारच्या वेतनधोरणावर फोडले आहे. ३.१ : ४.६ म्हणजे भारत गुजरातपेक्षा ४८% बरा वा गुजरात भारताच्या ३२% खाली (depending upon perspective).
There is regulation on which laborer is unskilled, semi-skilled and skilled and what should be their salary in India. But there is no reliable statistics on their number, even through a survey.
आता गुजरातचे वेतने सरासरी भारतापेक्षा किती कमी आहेत? आता सर्वच राज्यांत (अपवाद केरळ) किमान बेसिक वेतन ७000 ते ८००० रु प्रतिमाह इतके आहे. एकूण वेतन यांच्या दुप्पट असते, म्हणजे १४००० ते १६०००. म्हणजे अगदी टोकाची राज्ये निवडली तरी यात ४८% वा ३२ % चा फरक आहे का? मग लेखकांनी काढलेल्या ३२% फरकात काही तथ्य असावे का?
या विश्लेषणात कामगार केरळकडे मायग्रेट न करता गुजरातकडे का करतात याचे उत्तर मिळाले असते/ दिले असते तर मी त्याला काळजीपूर्वक म्हणालो असतो. केरळात "कायद्याने" वेतने इतर भारतापेक्षा तिप्पट आहेत. तिथल्या महान सरकारचे काम आहे ते. So the organized sector - tea gardens, tourism and all their sub-contractors must pay these salaries. Is there private investment in Kerala? No! They cannot afford it. Yet the state has decent pace of development. How? All investment is from public sector! Political advantage!!
दोन राज्यांची तुलना करताना, कोणते चांगले आहे नि कोणते वाईट हे सांगीताना केवळ वेतनाचा दर महत्त्वाचा नाही. तिथे व्हॉल्यूम पण महत्त्वाचा आहे. केरळमधे जितका विकास होतो त्याने केवळ स्थानिकांची गरज भागते. केरळने वेतन जास्त ठेवले आहे पण कामे नगण्य आहेत म्हणून त्या दराला अर्थ नाही. गुजरातमधे दर कमी आहे, गुजरात मधे परप्रांतीयांची गरज भागते. वास्तविक या कॅज्यूअल लेबर मधे कोनी गुजराती नाही, ते सगळे परप्रांतीय आहेत असे म्हणता येईल. There is enormous migration to Gujarat in last decade. These are attracted by work opportunities there and these are responsible for continuous fall of labor charges. गुजरातचा कोणी स्थानिक अन्यत्र जाऊन छोटीमोठी कामे करत नाही.
Credentials are of two types - ethical and intellectual. Commenting on ethical credentials is too harsh, I do not opt for it.
गब्बरजी, I repeat, I have nothing to say about fitness of Gujarat/Modi model for India. I have nothing to say about where Gujarat fares among other good states in other economic parameters. I do not want to say anything about which are richest states in India. I am just fighting for a small argument - Gujarat is not second from bottom if the poverty/richness levels of bottommost people are to be compared.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
In brief
The above response is lost in too many words. Basically the authors of article wanted to show Gujarati poor are the second worst off in India and the surplus GDP the state generates is passed on to big businesses due to state policies. In saying this -
1. Have they compared the same thing across the states? - Yes.
2. Have they seleted correct unit? Yes. (real income/income reqd to support one person at poverty level.)
3. Have they applied on correct sample of people? - No. (The poorest people are the rural unemployed workforces and rural unskilled regular* workers.) *Note that even such casual workers too are poor but they impossible to fairly survey.
4. Have they taken into account critical factor? No. Exclusion of rural unemployed workers everywhere has made results topsy-turvey. This has gone against Gujarat which has the highest employment rate among all Indian states.
5. Let's pardon the authors for not selecting right sample. But whatever sample they have selected, have they done logical computations? - No!NO!!NO!!! (They have compared bottom 5% population of Gujarat with bottom 50% population of Arunachal! They should compared bottom 5% of Gujarat with bottom 5% of Arunachal to see relative ranking)
5. The analysis ignores the fact that Gujarat is above national average in terms of people above BPL.
6. The study gives importance to only rates and not to the volumes of works happening under them. The economies where wages are high as per the authors do not attract any outside state labor nor reduce local unemployment. Phenomemnon of migration to Gujarat from Bihar is not explained though Bihar is doing much better as the per authors.
7. Is it important to compare only the wage rates and not the volumes? The volume of work in high wage state shows a peculiar trait. It is due to remittances, organized industries and lastly and more importantly through a vast amount of investment by the central government which is funded by the taxes the business houses of Gujarat are paying.
The details of this are in unorganized response above.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ब्रेव्हो
आजच जयती घोष बाईंचे, समाजातले अग्रगण्य बुद्धीजीवी म्हणून, भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे जाहीर आव्हान आले आहे.
त्याच पेपरात,जयतीजींनी या चर्चेत आघाडीवर दर्शवलेल्या ईशान्य भारतातल्या राज्यांत किती टक्के लोक द्ररिद्र रेषेखाली आहेत हे दाखवले आहे आणि राज्य शासनाच्या एकूण तिजोरीत स्थानिक कर आणि केंद्रीय अनुदान यांचे किती योगदान आहे हे ही लिहिले आहे.
ब्रेव्हो जयतीजी, तुम्ही फक्त खोटा ऑरा निर्माण करा. देशातली तथाकथित शहाणी जनता तुमचे बोलणे श्रद्धेने ऐकणार याची शाश्वती!!!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक अलॉं
फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक अलॉं रेझनें यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या सभागृहात त्याचे दोन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. -
A Tribute to Alain Resnais (1922-2014)
Alain Resnais was one of the truly great masters of modern cinema. To him film time was malleable and the telling of a story as important as the story itself. Thus his films came to have the reputation of being complicated and lacking in feeling.
In fact, however, his films are richly rewarding when one considers his narrative style in the light of how the mind and imagination work. Besides, they are always rooted in history and the lives we lead as creatures of the modern world facing vast historical forces and change. While his earlier films such asHiroshima Mon Amour, Last Year in Marienbad and Muriel changed the very language of cinema, his later films are admittedly more auteur- based , drawing their special flavor from his unique intelligence, wit and sense of irony. Among these late masterpieces are Mon Oncle d’Amerique, Melo andSame Old Song.
In this special tribute to Alain Resnais we shall screen two of his most famous films – Night and Fog and Last year in Marienbad. The former is among the greatest films ever made on the Holocaust and Nazi insanity; and the latter is an exhilarating and cerebral labyrinth of time, memory and unrequited love.
Film historian and teacher Prof Suresh Chabria will talk about Resnais’ influential career and introduce the films.
--
माहितगार
एक रोचक बातमी
यूपीए सरकारच्या कामगिरीसंदर्भातील हा लेख रोचक वाटला. लेखकद्वयी अर्थशास्त्रातील dumblings नसून जाणकार दिसत आहेत. http://www.hindustantimes.com/comment/analysis/growth-is-not-a-victim-of...
गब्बरसिंग व अरुणजोशी यांचे मत वाचायला आवडेल.
एनडीए च्या कामगिरीपेक्षा
एनडीए च्या कामगिरीपेक्षा युपीए ची कामगिरी सरस आहे हेच दिसते या तक्त्या/टेबलावरून. चलनवाढ हा एक मुद्दा सोडला तर युपीए ची कामगिरी सरसच आहे. खरंतर एनडीए कडून कमी फिस्कल डेफिसिट ची अपेक्षा होती. काँझर्व्हेटिव्ह पार्ट्या ह्या फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल किमान आरडाओरडा तरी करत असतात. व त्याविषयक बिल सुद्धा एनडीए च्या कालातच पारित करून घेण्यात आलेले होते. पण तिथे ही बोंब.
थेट परकीय गुंतवणूक या क्षेत्रात तर काय भाजपाचा आनंदीआनंदच असतो. रिटेल मधे एफडीआय च्या निर्णयाच्या वेळी सुषमा स्वराज यांनी संसदेत केलेला युक्तीवाद हा अतर्क्यपणाचा उच्च नमूना होता. एखाद्या धोरणास विरोध करताना जर ५ मुद्दे मांडले व त्यातला मुद्दा क्र. ४ हा मुद्दा क्र. २ चा थेट विरोध करत असेल तर त्यास काय म्हणावे ? जेटली व मु म जोशींचा युक्तीवाद ही तर्क कमी व अभिनिवेश जास्त या स्वरूपाचाच होता. जेटली व सुषमा हे दोघे ही वकील आहेत.... पण तरीही. व या सगळ्यास साजेसेच रिझल्ट्स वरील तक्त्यात/टेबलात दिसतात. खरंतर भारतास खूप गुंतवणूकीची गरज आहे. विशेषतः पायाभूत सोयी क्षेत्रात. रिटेल ही पायाभूत नाही. पण ...
राहता राहिला विषय - सेन्सेक्स चा. याबद्दल बोलायचे म्हंजे चोरी. कारण लगेच "तुम्ही दलालांचे हस्तक" असा शिक्का बसणार. पण लेखकांनी (घटक व घोष) धैर्य दाखवून तो मुद्दा मांडून .... तिथेही एनडीए ची बाजू कशी तोकडी पडत्ये ते दाखवलेले आहे.
----
चलनवाढीच्या मुद्द्याकडे परत वळतो. रिझर्व्ह ब्यांकेच्या अध्यक्षपदी रघुराम राजन यांची नेमणूक करून ममोसि यांनी आपल्या सरकारच्या चलनवाढीच्या बद्दल च्या अपयशाची कबूलीच नव्हे तर ... चूक सुधारायचा यत्न सुद्धा केलेला आहे. किंवा सोंग् केलेय असे म्हणा हवं तर. (मी ममोसिं चा फॅन असल्याने तो बायस गृहित धरा, दोस्तानु.). रघुराम राजन is ONE of the best thing that has happened to Indian economy in the last year.
----
खरंतर कॅपिटल फॉर्मेशन, व सरकारी कर्ज कमी करणे या दोन बाबतीत सुद्धा युपीए सरकारची कामगिरी सरस आहे.
----
अतिशहाणा, Did I answer your question?
<डोळे चोळत> अरेच्या! एकाही
<डोळे चोळत> अरेच्या! एकाही मुद्यावर असहमती नाही!
!बरेच दिवसांनी गब्बरशी शत प्रतिशत सहमत व्हायचा योग आला म्हणायचा
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
लोगोंको पागलपन का दौरा पडता
लोगोंको पागलपन का दौरा पडता है. मेरा थोडा उल्टा है. मेरा बर्ताव आम तौर पर / नॉर्मली पागलपन वाला होता है. लेकिन आप लोगोंके साथ कुछ दिन बिताने के बाद ... संगती संगदोषेण ... थोडासा सिख लिया हमने.....
भाजपाने काँग्रेसवर ९ आरोपांचा
भाजपाने काँग्रेसवर ९ आरोपांचा आरोपनामा घोषित केला आहे.
पैकी दुसरा आरोप आहे:
The second charge levelled by the BJP is 'destruction of the Indian economy across all sectors'.
आता खरं काय मानाव?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
The second charge levelled by
The second charge levelled by the BJP is 'destruction of the Indian economy across all sectors'.
आता खरं काय मानाव? (स्माईल)
हास्यास्पद दावा आहे भाजपा चा.
management of economy across all sectors is NOT the responsibility of Govt. EVER.
I am making an actual ad hominem argument ... BJP is a party of nutcases.
सॉरी टू से
सॉरी टू से, दोघांचेही प्रतिसाद अंतराळात दिल्यासारखेच वाटतात.
भाजप हा विरोधीपक्ष आहे; व त्याने निवडणुकीच्या काळात हे लिहीले आहे हे एकदा ध्यानात घेतले तर हे काय आहे त्याचा अंदाज येइल.
शिवाय "आर्थिक प्रगती वगैरे करणे सरकारची जिम्मेदारीच नाही. तसे मानणारे भाजप मूर्ख आहे " हे गब्बरचं आर्ग्युमेंट मान्य केलं तरी
कॉम्ग्रेसलाही आर्थिक प्रगती ही सरकारचीच जिम्मेदारी वाटते. त्याबद्दल त्यांनाही बोला की.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
कॉम्ग्रेसलाही आर्थिक प्रगती
कॉम्ग्रेसलाही आर्थिक प्रगती ही सरकारचीच जिम्मेदारी वाटते. त्याबद्दल त्यांनाही बोला की.
ओके. मनोबा, इथे माझा बायस दिसतो.
काँग्रेस ने जे काही केले ते अनेकदा मार्केट वर दादागिरी करून केले. प्लॅनिंग कमिशन चे सबलीकरण, उद्योजकांचे रेग्युलेशन (अनेकदा त्यांच्या अधिकारांची पायमल्ली), अनेक उद्योगांचे राष्ट्रीयीकरण हे गेली अनेक दशके काँग्रेस ने केलेले आहे. दुसर्या बाजूला -- काँग्रेसने अनेकदा उद्योजकांसाठी पोषक निर्णय ही इतर जनतेचे अधिकार डावलून घेतलेले आहेत. काँग्रेस ने च सरकार हा सर्वांचा तारणहार असावा (क्रेडल टू ग्रेव्ह) अशी भूमिका प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मांडलेली आहे.
असे म्हणतात की - भारत सरकारच्या मंत्रिमंडलाच्या प्रत्येक बैठकीत हेरॉल्ड लास्की चे भूत उपस्थित असते. नेहरूंवर लास्कींचा प्रचंड प्रभाव होता त्यामुळे हे भूत तिथे येऊ शकते.
---
हे सर्व असूनही - भाजपाच्या आरोपात फारसा दम नाही असेच दिसते.
येस यू डिड
उत्तर मिळाले. आता आज वाचलेली रोचक बातमी म्हणजे मोदींच्या तथाकथित विकासाभिमुख योजनांना जास्त व्याजदराने खीळ बसू नये म्हणून मोदी सरकार आल्यानंतर राजन यांच्या हकालपट्टीची दाट शक्यता आहे. एनी कमेंट्स?
http://www.business-standard.com/article/economy-policy/post-election-sh...
चलनवाढ विरुद्ध व्याजदर ह्या
चलनवाढ विरुद्ध व्याजदर ह्या द्वंद्वात राजन सापडलेले आहेत. खरंतर त्यांचे मूळ म्हणणे हेच आहे की रिझर्व्ह ब्यांकेची एकमेवाद्वितीय जबाबदारी - चलनवाढीवर नियंत्रण - हीच असावी. २००८ मधे फायनान्शियल सेक्टर च्या खुलेपणाचे जे प्रस्ताव राजन यांच्या अध्यक्षतेखालील समीतीने मांडलेले होते त्या अहवालात त्यांनी ते स्पष्ट्पणे लिहिलेले आहे. He is a proper inflation hawk.
व्याज दर वाढवला की रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न वाढतो. व परतावा कमी होतो - त्यामुळे उद्योजक/ भांडवलदार वैतागतीलच.
चलनवाढ कमी केली की त्याचा सर्वाधिक फायदा सामान्य व्यक्तीस होतो. मग आम आदमी च्या भल्यासाठी झटण्याचे दावे करणार्या काँग्रेस ने चलनवाढ का रोखली नाही ? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. राजन हे त्या प्रश्नाचे उत्तर असले तरी ते - बाद मरनेके मेरी कब्र पे आया वोह मीर - अशा स्वरूपाचेच आहे. (काल मी या मुद्द्यावर ममोसिंची भलामण केली होती ... व आज मी पलटी मारत आहे.)
तुम्ही दिलेल्या दुव्यात १ समस्या आहे - मोदी येणारच हे जे काही गृहित धरलेले आहे ते समस्याजनक आहे. २००९ च्या इलेक्शन पूर्वी डाव्यांनी अशीच गृहितके केलेली होती. व त्या गृहितकांच्या जोरावर इलेक्शन झाल्यावर आम्ही यंव करू अन त्यंव करू - अशी धमकीबाजी केली होती. इलेक्शन झाल्यावर काय झाले ते तुम्हास माहीती आहेच. (मतदारांना गृहित धरण्याची चूक अनेक मोदी विरोधक व समर्थक करीत आहेत.)
इन्फ्लेशन आणि ग्रोथ हे साधारण
इन्फ्लेशन आणि ग्रोथ हे साधारण हातात हात घालून जातात असे अर्थशास्त्र म्हणते. [Inflation without growth may be possible but growth without accompanying inflation is not possible].
एनडीएच्या कार्यकालाचा विचार केला तर शेवटच्या वर्षातली ग्रोथ सोडली तर ग्रोथ बरीच कमी होती. त्याच काळात Inflation सुद्धा कमीच होते. त्या काळात अनेक ठिकाणी रस्त्यालगतच्या मैदानांत न विकल्या गेलेल्या गाड्यांचे/ ट्रक्सचे दृष्य बर्याचदा पाहिले आहे. कारकीर्दीच्या उत्तरार्धात व्याजदर क्रमाने उतरवत नेऊन ग्रोथला चालना दिली गेली. एनडीएचे शेवटचे वर्ष आणि यूपीएचा बहुतांश काळ ग्रोथ उत्तम होती पण त्याचबरोबर इन्फ्लेशन सुद्धा वाढत गेले.
http://delhiplanning.nic.in/Economic%20Survey/ES2007-08/T6.PDF
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
शंका
१. गेली काही वर्षे यु पी ए कार्य काळात जीडीपी ग्रोथ रेट घटला आहे तर इन्फ्लेशन वाढले आहे. जर दोन्ही हातात हात घालून येतात तर हा विरोधाभास कसा?
एन डी ए काळात इन्फ्लेशन कमी होते, वस्तुंचे भाव कमी होते. आता महागाई मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे जे सर्वत्र दिसत आहे.
२००८ नंतरचे तेलाचे कडाडलेले भाव याला काही प्रमाणात कारणीभूत असले तरी या बाबतीत तर यू पी ए सरकारने काही चांगले काम केलेल दिसत नाही.
२. जीडीपी consumption basis मोजला जात आहे, production basis नाही. (जाणकारांनी क्न्फर्म करावे). प्रणवदा काळात इन्डायरेक्ट टॅक्सेस वाढवून, थेट टॅक्सेस कमी करुन - डिस्पोजेबल इन्कम च्या माध्यमातून विकासदर टिकवण्याचा प्रयत्न केला गेला.
मग हे वाढिव आकडे कितपत प्रत्यक्ष विकास दर्शवतात?
३. एन डी ए काळात २०००-२००२ मध्ये अचानक मोठा डिप आला होता. त्याचे काही आंतरराष्ट्रीय कारण होते का इतकी मोठी फक्त सिन्हा / जसवंतसिंग आणि वाजपेयी सरकारची घोडचूक होती? मग अचानक २००३ मध्ये आणि २००४ मध्ये सुधारणा कशामुळे झाली..
४. गेल्या वर्षात डेफिसिट कमी करणे / मॅनेज करणे यासाठी जी फर्फट झाली त्यामागे सरकारी धोरणे कितपत जबाबदार होती? सुमारे ५ % वर जाऊ नये असे अंगठा धोरण असते.. मग वरील तक्त्यात दाखवल्याप्रमाणे एन डी ए च्या ५.५ % डेफिसिट साठी आत्ताप्रमाणे hue and cry का नव्हता ?
या जेन्युइन अर्थशास्त्रीय शंका आहेत .. जर यूपीए पीसी काळात जास्त विकासदर असेल तर ते सत्य आहे .. fact चा प्रतिवाद करण्याचा हा प्रयत्न नाही..
>> गेली काही वर्षे यु पी ए
>> गेली काही वर्षे यु पी ए कार्य काळात जीडीपी ग्रोथ रेट घटला आहे तर इन्फ्लेशन वाढले आहे. जर दोन्ही हातात हात घालून येतात तर हा विरोधाभास कसा?
तसे नाही. ग्रोथ जशी कमी होत गेली आहे तसा इन्फ्लेशन रेटही कमी झाला आहे. [तूरडाळ १०० रु किलो झाली तेव्हा ती महागाई खूपच होती. पण हे २००९-१० मध्ये घडल्यानंतर गेली ३-४ वर्षे तूरडाळ रु ६५-७५ किलोच्या दरम्यान स्थिर आहे].
>>२००८ नंतरचे तेलाचे कडाडलेले भाव याला काही प्रमाणात कारणीभूत असले तरी या बाबतीत तर यू पी ए सरकारने काही चांगले काम केलेल दिसत नाही.
सहमत आहे. उलट ग्लोबल मेल्टडाऊन झाला असताना भारतात व्याजदर कमी करून आणि स्टिम्युलस देऊन ग्रोथ टिकवण्याचा प्रयत्न झाला.
>>एन डी ए काळात २०००-२००२ मध्ये अचानक मोठा डिप आला होता. त्याचे काही आंतरराष्ट्रीय कारण होते का इतकी मोठी फक्त सिन्हा / जसवंतसिंग आणि वाजपेयी सरकारची घोडचूक होती? मग अचानक २००३ मध्ये आणि २००४ मध्ये सुधारणा कशामुळे झाली..
व्याजदर प्रचंड कमी करून .... लोकांना लोन घेण्यास प्रवृत्त करून. गाड्यांसाठी ७% व्याजदराने, घरांसाठी ८% व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले गेले. [त्याचबरोबर एकूणात ठेवींवरचे व्याजदरही कमी करण्यात आले. व्याजावर जगणार्या वयोवृद्धांसाठी अर्धा टक्का जास्त व्याज देण्याची सिस्टिम चालू झाली]. प्रत्यक्षात बर्याच वृद्धांचे बजेट कोलमडून गेले. त्यावेळी महागाईदर कमी असल्याने हे करणे शक्य झाले. जे करण्यास आज रिझर्व बँक धजावत नाही.
>>गेल्या वर्षात डेफिसिट कमी करणे / मॅनेज करणे यासाठी जी फर्फट झाली त्यामागे सरकारी धोरणे कितपत जबाबदार होती? सुमारे ५ % वर जाऊ नये असे अंगठा धोरण असते.. मग वरील तक्त्यात दाखवल्याप्रमाणे एन डी ए च्या ५.५ % डेफिसिट साठी आत्ताप्रमाणे hue and cry का नव्हता ?
ते परकीय वित्तसंस्थांना/विदेशी गुंतवणूकदारांना काय हवे असते त्यावर ठरत असावे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आकडे थोडे वेगळे आहेत
तसे नाही. ग्रोथ जशी कमी होत गेली आहे तसा इन्फ्लेशन रेटही कमी झाला आहे. [तूरडाळ १०० रु किलो झाली तेव्हा ती महागाई खूपच होती. पण हे २००९-१० मध्ये घडल्यानंतर गेली ३-४ वर्षे तूरडाळ रु ६५-७५ किलोच्या दरम्यान स्थिर आहे]
गेली दोन तीन वर्षे ग्रोथ कमी होत आहे. ५ च्याही खाली जात आहे.
पण इन्फ्लेशन मात्र ९-१०% वर आहे. आणि त्याहून कमी झालेले नाही. असंख्य कमोडिटीजचे भाव गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत.
जीडीपी ग्रोथ आणि इन्फ्लेशन चे गेल्या तीन ते चार वर्षातले आकडे मॅच होत नाहीत.
कॉन्झर्व्हेटिव्ह आणि फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी
>>> काँझर्व्हेटिव्ह पार्ट्या ह्या फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल किमान आरडाओरडा तरी करत असतात.
--- विधानाच्या उत्तरार्धाशी सहमत आहे :). अमेरिकेचे उदाहरण घेतले तर रेगन आणि बुशने वित्तीय तूट कशी वाढवली - हे खालील तक्ता स्पष्ट करतो.
अहो NDA येण्याच्या अगोदर
अहो NDA येण्याच्या अगोदर स्थिती काय होती ? हा मुद्दा महत्वाचा आहे. तुम्ही सुरुवात कुठुन करता ह्यावर काय मिळवता ते अवलंबुन आहे. NDA २००४ साली पुन्हा सत्ते वर आली असती तर ५ वर्षात UPA-1 पेक्षा नक्की चांगली कामगीरी केली असती.
NDA सत्ते वर आली तेंव्हा अर्थेव्यवस्था वाईट स्थितीत होती. बँकांचे NPA १०% च्या वर गेले होते म्हणजे विचार करा.
FDI येण्याचा तो सुरुवातीचा काळ होता. त्यामुळे ती कमी असेल तर आश्चर्य नाही. ११/०९/२००१ घडले होते मधे, त्याचाही बराच परिणाम झाला होता.
>>NDA सत्ते वर आली तेंव्हा
>>NDA सत्ते वर आली तेंव्हा अर्थेव्यवस्था वाईट स्थितीत होती.
याला काही आधार आहे का?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
asian financial crisis
asian financial crisis 1997 - 1998 वाला नुकताच येउन गेला होता.
उदारीकरणाची प्रक्रिया पूर्ण सुरळीत झाली नव्हती. स्थित्यंतर अधिक प्रमाणात होत होते.
असे सर्व त्यांना म्हणायचे असावे.
परकीय गंगाजळी पहिल्यांदा दणदणीत वाधलेली दिसली ती २००४ च्या सुरुवातीस.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
इथे ९१ पासूनच्या काळातले
इथे ९१ पासूनच्या काळातले ग्रोथचे आकडे आहेत. त्यांना जे म्हणायचं आहे की एनडीए सरकार आलं तेव्हा इकॉनॉमी वाईट होती ते खरं नाही.
त्यात प्री-एनडीए काळात (देवेगौडा- गुजराल) ग्रोथ ७%+ च्या आसपास दिसते.
>>asian financial crisis 1997 - 1998 वाला नुकताच येउन गेला होता.
ग्लोबली सगळ्यांचीच- चीन ब्राझील वगैरे ग्रोथ कमी झाली आहे (स्लोडाउनचं कारण ग्लोबल-देशाबाहेर आहे) असं चिदंबरम म्हणाले तर मात्र चालत नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मी NDA च्य आधीच्या आर्थिक
मी NDA च्य आधीच्या आर्थिक स्थिती चा विषय काढला त्याला "निर्र्थक" श्रेणी, त्याच्या वरच्या प्रतिसादांना मात्र "माहीतीपुर्ण", "मार्मिक"
रोचक
बघा , मी याला रोचक श्रेणी दिली आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
धन्यवाद
धन्यवाद
एनडीए सत्तेवर येण्यापूर्वी,
एनडीए सत्तेवर येण्यापूर्वी, आल्यानंतर व सत्तेवरून गेल्यानंतर - स्थिती काय होती ते खालील तक्त्यावरून दिसते.
तक्त्यात एनडीए चा कालावधी "विशेष" रंगाने दर्शवलेला आहे.
--
http://tinypic.com/r/2qcmjrq/8
--
वाटल्यास एक्सेल पाठवतो. डेटा जागतिक ब्यांक.
डॉ भाऊ दाजी लाड संग्रहालयात
डॉ भाऊ दाजी लाड संग्रहालयात व्हीडीओ कला -
याच संग्रहालयात contemporary art या विषयावर चित्रपट -
--
माहितगार
मोदींचे शिक्षण Correspondence Course ने?
एक जुना लेख वाचनात आला. मोदींचे शिक्षण correspondence course माध्यमातून झाल्याचे दिसते. अशा स्वरुपाच्या शिक्षणावर माझा वैयक्तिक काही आक्षेप नाही मात्र लेख मुळातून वाचण्यासारखा आणि मनोरंजक वाटला.
http://www.livemint.com/Leisure/JJBNMeTBDxPN187zJVOcOJ/What-it-means-to-...
चालायचच
लेख अलिकडील काळात, मागील वर्षभरात प्रकाशित झालेला दिसतो.
आता सारेच जण प्रतिस्पर्ध्याची कमजोर बाजू वा काळी बाजू प्रकाशात आणण्याचा प्रयत्न होतच राहिल.
एक उदाहरण घेउ.
कोणत्या तरी केसमध्ये राहुल गांधी ह्यांना अमेरिकेत अटक झाली होती २००२ च्या आसपास.
त्याबद्दलची अधिक माहिती अमेरिकन सरकारकडून सुब्रमण्यम स्वामी मागवू इच्छित होते.
पण ती माहिती खाजगी स्वरुपाची असल्याने अमेरिकन सरकारने "ज्या व्यक्तेची माहितीए हवी आहे, त्याची परवानगी आणा" असे सांगितले.
राहुल गांधींकडे लपवण्यासारखे काहीही नसेल तर त्यांनी "खुशाल वाटेल ती माहिती गोळा करा" असे म्हणायला हवे.
प्रत्यक्षात राहुल गांधी शक्यतोवर ह्याबबतच्या प्रश्नावर सोयीस्कर दुर्लक्ष करतात. किंवा फारच झाले तर
"तसे काहीही घडलेले नाही" असे फक्त म्हणतात. प्रत्यक्षात तसे काहिच घडले नसेल तर त्यांनी परवानगी द्यायला हवी.
ते मात्र ती देत नाहित.(ह्यासंबंधीचा लिखित पत्रव्यवहार स्वामींकडे आहे.राहुल गांधी अब्रूनुकसानीचा दावा करीत नाहित, म्हणजे सुब्बुच्या म्हणण्यात तथ्यही असावे.)
राहुल गांधी त्यांच्या अमेरिकेतील प्रकरणाची माहिती घेउ देण्याचे नाकारतात असा आरोप सुब्रमण्यम स्वामी कधीचेच करताहेत.
यूट्यूबवर त्यांच्या जाहिर सभांत हे सर्व दिसते.
त्यांच्याकडे लिखित पुरावे, अमेरिकेतील अधिकृत तक्रार क्रमांक सारेच काही आहे असे ते म्हणतात.
शिवाय राहुल गांधी हे केम्ब्रिजला शिकलो असे सांगतात. प्रत्यक्षात पाच दिवस क्लासेस अटेंड म्करुन ते सोडून परत आलेत्;-- अभ्यासक्रम न झेपल्याने.
असाही दावा सुब्बुंनी केला. (सुब्बु स्वतः हार्वर्ड वाले आहेत; आंतरराष्त्रिय युनिव्हर्सिट्यांत त्यांचे कनेक्शन तगडे आहे असे ते म्हणतात.)
अर्थातच ह्याही दाव्याला कोर्टात खेचण्याचे काम राहुल गांधींनी केले नाही.
सुब्बुंच्या म्हणण्यात तथ्य असल्याचे त्यामुळे वाटू लागते.
मोदी हे स्वतः उच्चविद्याविभूषित वगैरे इमेज तशीही मिरवत नाहित. rags to riches अशी एखादी success story असते;
तसे ते स्वकष्टाने खालून वर आलेले असल्याचे सांगत असतात. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक क्रेडेन्शिअल्समुळे इतका फरक पडायला नको.
राहुल ह्यांचा मात्र तसा दावा आपण उच्चशिक्षित असल्याचा आहे.
.
.
बाकी, राहुल, नमो, AK आणि साडेपाचशे मतदारसंघात उभ्या राहिलेल्या समस्त उमेदवारांनाही
पंतप्रधानपदासाठी वगैरे फडतूस मतदार म्हणून आमच्या शुभेच्छा आहेतच.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
>>कोणत्या तरी केसमध्ये राहुल
>>कोणत्या तरी केसमध्ये राहुल गांधी ह्यांना अमेरिकेत अटक झाली होती २००२ च्या आसपास.
त्याबद्दलची अधिक माहिती अमेरिकन सरकारकडून सुब्रमण्यम स्वामी मागवू इच्छित होते.
या संबंधाने तत्कालीन भारत सरकारने त्यांना सोडवून आणले असेही ऐकले आहे. त्यावेळी बाजपेयींचे सरकार आणि बहुधा यशवंत सिन्हा परराष्ट्रमंत्री होते. सुब्रम्हण्यम स्वामी त्यांच्याकडून यासंबंधी माहिती का मागवू शकत नाहीत?
मनोबांचे कुठल्या बॅंकेत खाते आहे आणि त्यात किती रक्कम आहे अशी माहिती मी (कुठल्याश्या) सरकारकडे मागितली. तेव्हा ती माहिती गोपनीय आहे असे सांगून मनोबांची परवानगी आणा म्हटले. आता मनोबा ती परवानगी काही देत नाहीत (देऊही नये). याचा अर्थ मनोबांचे काळे धंदे आहेत असा घ्यावा का? [आपली खाजगी माहिती सोम्यागोम्या नितिन थत्तेला कळू नये अशी इच्छा मनोबांनी ठेवणे स्वाभाविक आहे].
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अटक आणि बँक?
अटकेची माहिती मागणे आणि बँकेतल्या खात्यातल्या रकमेची माहिती मागणे हे एकाच मापात येते का? राहुल गांधी अमेरिकेत कुठे कुठे फिरले ह्याची माहिती मागतली नाही आहे असे वाटते (ती खाजगी माहिती होईल).
+१
+१
राजकारणी वगैरे पब्लिक रिलेशन मध्ये अधिक मोडणार्या प्रकारात जास्त पारदर्शकतेची अपेक्षा असते.
मनोबांना कुठे भारतभरात एखाद्या गुन्ह्याखाली अटक वगैरे झाली आहे का, ह्याची चौकशी करण्याचा नैतिक हक्क प्रत्येक नागरिकास आहे;
--जर मनोबा पब्लिक रिलेशनयुक्त कामात म्हणजे राजकारणात वगैरे असतील तर.
तुम्ही खुबीनं ब्यांक अकाउंट आणि क्रिमिनल रेकॉर्डची चौकशी हे एकाच मापात तोललत.
राहुल शेठ पारदर्शतेचे पुतळे वगैरे आहेत; धुतल्या तांदलाचे आहेत; सार्वजनिक जीवनात आहेत; त्यामुळे
स्वतःची माहिती , निदान क्रिमिनल रेकॉर्ड त्यांनी लपवू नये इतकीच अपेक्षा आहे.
राहुल्याचे ब्यांक दिटेल्स इथे कुनी मागत नाहिये.
क्रिमिनल हिश्ट्रि शोधायचा प्रयत्न सुरु आहे.
बाकी, ह्या गैरकृत्यात मदत केली असेल तर गैरकृत्यात मदत करणारे तत्कालीन सरकारही भडवे ठरते; त्यांना झुकते माप द्यायचा प्रश्न नाहिच.
तुम्ही मनोबांचं नाव घेउन जsssरा वैयक्तिक वळण दिलत.
मी त्यास बायपास करु शकतो. पण तरी उत्तर देतोच.
तसाही किरकोळ उत्पन्न असणार्या अनेकानेक भारतीयांपैकीच मी एक आहे.
माझ्या मते माझ्यासकट इतर आख्ख्या भारतभरातील कुणाही नागरिकाचे सर्व व्यवहार पारदर्शक हवेत.
हवे त्याला हवे ते डिटेल्स वाचायला आक्षेप घेउ नये; इतकी पारदर्शकता असावी.
कसय साहेब, जो पलंगावर झोपतो त्याला झोपेत बुदकन् खाली पडू की काय अशी भीती वाटू शकते पण--
जमिनीवरच्--चटईवरच जो झोपतो तो ढाराढूर झोपायला मोकळा असतो.-- घोडे बेच के सो सकता हय वो.
सोडा हो. समर्थन करायचच तर संपूर्ण जग बेचिराख करु शकणार्या अणु विध्वंसाचंही करता येतं.
आणि कशाचं समर्थन करायचं हे आधीच ठरवलं गेलं असेल तर तथ्य, फ्याक्ट्स वा सूचक मौन अल्लाद नजरेआडही करता येतात.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
व्यक्तिगत वाटले असल्यास
व्यक्तिगत वाटले असल्यास क्षमस्व.
मनोबांच्या ऐवजी आणखी काही नाव धरू.
बाकी व्यक्तिगत माहिती उघड करण्याविषयी ऐसीवरच चार जुलैच्या अमेरिकन स्वातंत्र्यदिनी एडवर्ड स्नोडेनने अमेरिकन सरकार गोपनीय काढत असल्याविषयी चर्चा झाल्याचे स्मरते. तेव्हा 'माझ्या मते माझ्यासकट इतर आख्ख्या भारतभरातील कुणाही नागरिकाचे सर्व व्यवहार पारदर्शक हवेत.
हवे त्याला हवे ते डिटेल्स वाचायला आक्षेप घेउ नये; इतकी पारदर्शकता असावी.' असं सगळ्यांचं मत नसावं.
बाकी त्या आरोपाविषयी म्हणायचं तर राहुल गांधी आणि त्याला अॅलेजेडली सोडवणार्या सरकारचे प्रमुख वाजपेयी हे दोघेही सुब्रम्हण्यम स्वामींच्या द्वेषाचे विषय आहेत. तेव्हा बातमीचा दुसरा भागही स्वामींनीच प्रसृत केला असू शकतो. आणि खरेच तसे झाले असते तर भाजपने त्या घटनेचा प्रचारात नक्कीच वापर केला असता.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
साधा तर्क वापरता येतो
समजा सुब्रमणियन स्वामी म्हणतात तशी राहूल गांधींना खरोखरीच अटक झाली असेल असे मान्य केले तरी राहूल गांधींचा गुन्हा काय असावा याबाबत खोब्रागडे प्रकरणात अमेरिकी सरकारची प्रतिक्रिया पाहता थोडीशी अटकळ आपल्यालाही साध्या तर्काने बांधता येते.
अमेरिकी सरकारने हे प्रकरण फारसे न ताणता राहूल गांधींना भारतात परत जाऊ दिले, राहूल गांधींचा स्ट्रिप सर्च झाला त्यांना गांजेकस वा वेश्यांसोबत एकाच तुरुंगात ठेवले असावे की काय यासंबंधी फारसा गोंधळ झाल्याचे दिसले नाही. कदाचित त्यांना तुरुंगात ठेवले नसावे असे वाटते. यावरुन राहूल गांधींनी बलात्कार, खून, व्हिजा किंवा इमिग्रेशन कायद्याचा भंग वगैरे गुन्हा केला नसावा. अंमली पदार्थांची तस्करी किंवा तत्सम गुन्हाही त्यांनी केला नसावा.
फार तर एखाद्या ट्राफिक नियमाचा भंग (उजव्या ऐवजी डाव्या बाजूने चालवणे (इटलीत कोणत्या बाजूने गाडी चालवतात यासंदर्भात काही टिप्पणी केलेली आवडेल)) किंवा नो एंट्रीमध्ये प्रवेश किंवा स्पीडिंग वा तत्सम स्वरुपाचा गुन्हा असावा असे वाटते.
राहूल गांधींचा सोशल सिक्युरिटी नंबर नसावा. लेक्सिस नेक्सिस वा क्रेडिट रिपोर्ट मॉनिटरिंग करणाऱ्या कंपन्या नॉन-रेसिडेंट व्यक्तींचे रिपोर्ट गोळा करतात की नाही याबाबत कल्पना नाही. मात्र अशी माहिती उपलब्ध असल्यास स्वामींइतके रिसोर्सेस हाती असणाऱ्या माणसाला काय झाले हे नक्कीच माहिती असावे मात्र उगाच शंकाकुशंका काढण्यातच जास्त फायदा असल्याने हे प्रकरण त्यांनी तडीस नेले नसावे असे वाटते.
सोशल सेक्युरिटी नंबर, राहुल गांधी इ. (अवांतर)
राहुल गांधी ज्या काळात यूएसएत होते, तो काळ लक्षात घेता, त्यांचा सोशल सेक्युरिटी नंबर असण्याची शक्यता दाट वाटते. किमानपक्षी, नाकारता येत नाही. (यूएसएत अर्थार्जन-प्रतिबंधित बिगरनागरिकांना सोशल सेक्युरिटी नंबर न देण्याची प्रथा साधारणतः १९९०च्या दशकाच्या मध्याकडे किंवा उत्तरार्धात सुरू झाली. तत्पूर्वी यूएसएत वैधरीत्या उपस्थित असणार्या जवळपास कोणालाही सोशल सेक्युरिटी नंबर मिळू शकत असे. फक्त, (१) अमेरिकेत वैधरीत्या उपस्थित आहे, आणि (२) अमेरिकेत राहण्याच्या परवान्याची तारीख उलटून गेलेली नाही, एवढेच कागदोपत्री पुराव्याने दाखवून द्यावे लागत असे, आणि (३) अर्थार्जनाची शक्यता नसताना सोशल सेक्युरिटी नंबरची आवश्यकता काय, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर द्यावे लागत असे. 'ब्यांकेत खाते उघडण्यासाठी' किंवा 'ड्रायवर लायसेन्सकरिता' एवढे कारण सहसा वैध मानले जात असे. अशा प्रकारे यूएसएत अर्थार्जनाची परवानगी नसलेल्या बिगरनागरिकांना जारी केलेल्या सोशल सेक्युरिटी कार्डावर 'नॉट वॅलिड फॉर वर्क' असे लिहिलेले असे; अन्यथा इतर कोणत्याही सोशल सेक्युरिटी कार्डासारखेच ते दिसे. पुढे असा बिगरनागरिक अर्थार्जनपात्र व्हिसा-क्याटेगरीत बदलल्यास त्यास नव्या पुराव्यानिशी नव्याने सोशल सेक्युरिटी कार्डासाठी आवेदन करावे लागे, आणि 'वॅलिड फॉर वर्क विथ आयएनएस ऑथरायझेशन' अशा लिखितासह नवे कार्ड त्यास दिले जाई. (सोशल सेक्युरिटी नंबर मात्र जुनाच राही.)
(तसेही, श्री. राहुल गांधी हे यूएसएत विद्यार्थी म्हणून होते, असे वाटते; सबब, मर्यादित प्रमाणात अर्थार्जनार्हता त्यांना काही काळ तरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा, विद्यालयात नोंदणी करतानासुद्धा सोशल सेक्युरिटी नंबर पुरवावा लागला असण्याची शक्यता (विशेषतः, त्या काळी जवळपास कोणालाही मिळू शकत असे, म्हटल्यावर) नाकारता येत नाही. यूएसएत उच्चशिक्षण घेतलेले ऐसीकर याबद्दल अधिक माहिती पुरवू शकतील, असे वाटते. चूभूद्याघ्या.)
सोशल सेक्युरिटी नंबर आहे म्हटल्यावर रेसिडेंट किंवा नॉन-रेसिडेंट याने क्रेडिट मॉनिटरिंग कंपन्यांना काहीही फरक पडू नये. 'शिष्टिममध्ये आहे' शुड बी ऑल द्याट काउण्ट्स. (चूभूद्याघ्या.)
मान्य आहे
राहूल गांधींच्या काळात सोशल नंबरची काय व्यवस्था होती हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. सोशल सेक्युरिटी नंबर असल्यावर residency statusचा क्रेडिट किंवा क्रिमिनल हिस्टरी मॉनिटरिंग कंपन्यांना फरक पडू नये याच्याशीही सहमत आहे. माझ्या एका मित्राचा भारतीय परवान्यावर अमेरिकेत गाडी चालवताना अपघात झाला होता. त्यावेळी त्याच्याकडे सोशल नंबरही नव्हता. काही दिवसांनी सोशल नंबर आणि लोकल परवाना मिळाल्यावर विमा कंपनीकडे गाडीच्या विम्यासाठी अर्ज केला असता अॅक्सिडेंट हिस्टरी सापडल्याने त्याला अधिक प्रीमियम भरावा लागला. सोशल नंबर किंवा लोकल ड्रायविंग लायसन नसतानाही भारतीय परवान्यावरील अपघाताही माहिती विमा कंपन्यांना कशी असू शकते याचे आश्चर्य वाटते.
(या स्वरुपाची माहिती स्वामींइतकी पोच असणाऱ्या माणसाला नक्कीच काढता येईल याची खात्री आहे. ज्या विद्यापीठात राहूल गांधी शिकले होते त्या विद्यापीठाचे स्वामी हे मास्तर होते असे दिसते )
खरीखुरी माहिती पुढे आणल्याने सगळाच फुगा फुटेल.... त्यापेक्षा शंका उपस्थित केल्यास त्यावर जास्त परतावा मिळू शकतो असे स्वामींचे एकंदर धोरण असावे असे दिसते.
आभार
तर्क मांडल्याबद्दल थत्ते, अतिशहाणा दोघांचे आभार.
तरी माझी स्वामी व थत्ते ह्या दोघांबद्दलही शंका कायम आहे.
वरती कुणीतरी लिहिल्याप्रमाणे, स्वामींच्या दाव्यात तथ्य असेल तर स्वामी हे वैधानिकरित्या च्यालेंज करु शकतात.
त्यातून राहुलची उमेदवारीच रद्द करता येणे शक्य आहे. पण स्वामी ते करुन नाय र्हायला.
तो का करीत नसावा ?
त्याचप्रमाणे स्वामींनी इतकी बडबड वारंवार करुनही सोनिया व राहुल दोघेही मौन पाळतात.
त्याऐवजी स्वामीला कोर्टात खेचून त्याच्यावर अब्रूनुकसान वगैरे आरामात ठोकता येणार नाही का ?
"गांधीघराणेद्वेष्ट्याची एकदाची क्रेडिबिलिटीच सगळ्यांसमोर आणू " असा विचार ते का करत नसावेत ?
.
.
अशा तीन केसेस इतरत्र भारतातच पाहण्यात आहेत. त्याचे उदाहरण ही मंडळी का घेत नसावीत ?
गप्प बसणे स्वामींच्या फायद्याचे आहे की गांधींच्या की दोघांच्या ?
नेमके पाणी कुठे मुरते आहे ?
तीन केसेस :-
१.नुकतेच मनिष तिवारी ह्याने बिनबुडाचा भ्रष्टाचाराचा आरोप करत कुठल्याशा केसमध्ये (बहुतेक आदर्श स्कॅम)
गडकरींचे नाव घेतले. गडकरींनी त्याला कोर्टात खेचून केस जिंकली!
२.शाम मानव ह्यांनाही प वि वर्तक ह्यांच्याकडून केसपराभव स्वीकारावा लागला होता.
३.खुद्द लोकमान्य टिळक व आगरकर दोघेही एका संस्थानाच्या केसमध्ये हरुन थेट तुरुंगात पोचले होते.
(आय गेस डोंगरीच्या तुरुंगात १०१ दिवस त्यांना ह्याच केसमध्ये, कोल्हापूर संस्थानाच्या बदनामीबद्दल आत टाकले होते;
)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सुब्रमण्यम स्वामी कॉंग्रेसचे
सुब्रमण्यम स्वामी कॉंग्रेसचे डबल एजंट असतील काय?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कळ्ळं नै
काय म्हणतेस ते नेमकं कळ्ळं नै.
बादवे, तसा तो माणूस काँग्रेसी गटातही बराच काळ होता.
आधी इंदिरा गांधीच्या आणीबाणीदरम्यानच्या काळात विरोधी खासदारांवर सरकारची करडी नजर असताना आणीबाणीत आधी भूमिगत होउन, नंतर अचानक प्रगट होउन पुन्हा भूमिगत होउन हा माणूस फेमस झाला.
नंतर राजीव गांधींच्या जवळ म्हणता येइल इतपत होता. विविध समित्यांवर वगैरे त्याची नेमणूक होती.
राव सरकारनेही मोठ्या जिम्मेदार्या त्याला दिलेल्या दिसतात.
नंतर १९९८ मध्ये त्याने सुप्रसिद्ध टी पार्टी पराक्रम करत वाजपेयी सरकार पाडलं.
.
.
हल्ली तो सतत सोनिया -राहुल्ल किती छ्छी छ्छी आहेत, वैट वैट्ट आहेत ते सांगत असतो.
पुन्हा लागलिच पुढच्या परिच्छेदात स्वतःच सांगतो की १९९८ला वाजपेयी सरकार पाडलं तेव्हा सोनिया
मला (म्हणजे स्वाम्याला) पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा देणार होत्या. पण नंतर त्यांनी दिला नाही.
हा माणूस पुन्हा सांगतो की ही बाई किती नीच आहे आणि मला ते अगदि पूर्वीपासून माहिती कसं आहे वगैरे.
अरे पण मग तिचाच पाठिंबा मागायला कसाकाय गेलास ?
हे मात्र तो सांगत नाही.
फेसबुकवरील प्रचारकी फॉरवर्डस्पैकी ८०% फॉरवर्ड्सतरी तरी ह्याच्याच conspiracy theory मधून आलेले दिसतात.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
स्वामींच्या आरोपामुळे सोनिया,
स्वामींच्या आरोपामुळे सोनिया, राहुल, कॉंग्रेसला फायदा होतो असं जर या लोकांना वाटत असेल तर त्यांनी स्वामींना काहीबाही प्रकारे उत्तेजन देऊन आरोप ताजे ठेवायचे. सध्या फेसबुक कृपेने ही फित मिळाली. स्वामी म्हणतात, मुस्लिमांनी आपला हिंदू असण्याचा इतिहास मान्य करावा तरच त्यांना मतदानाचा हक्क दिला जावा. अशा प्रकारची फूट कोणी हिंदुत्त्वावादी माणूस पाडतो आहे आणि आम्ही कोणत्याही धर्माला उचलून धरणारे नाही असं म्हटल्याने कॉंग्रेसचा फायदा होत असेल तर?
या सगळ्या जर-तरच्याच गोष्टी. तथ्य काय आहे हे मला माहित नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
>>त्याचप्रमाणे स्वामींनी इतकी
>>त्याचप्रमाणे स्वामींनी इतकी बडबड वारंवार करुनही सोनिया व राहुल दोघेही मौन पाळतात.
त्याऐवजी स्वामीला कोर्टात खेचून त्याच्यावर अब्रूनुकसान वगैरे आरामात ठोकता येणार नाही का ?
"गांधीघराणेद्वेष्ट्याची एकदाची क्रेडिबिलिटीच सगळ्यांसमोर आणू " असा विचार ते का करत नसावेत ?
कोणाकोणावर अब्रू नुकसानीचे दावे लावत बसायचे? जोवर तसल्या आरोपांनी काही नुकसान* होत नाही तोवर कशाला डोकेफोड? शिवाय राजकारणात सुब्रम्हण्यम स्वामी केव्हा कामास येतील ते सांगता येत नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
समजले नाही
समजा मी आयकर चुकवल्याने मला इन्कमटॅक्स खात्याने अटक केली. आणि नंतर तोडपाणी करुन वा इतर कायदेशीर मार्गाने मी बाहेर आलो. काही वर्षांनी 'मिहिर' या खाजगी व्यक्तीने मला अटक का केली होती या माहितीची मागणी केल्यास मी त्याला ती का द्यावी? (मात्र निवडणूक आयोग, न्यायालये अशा समर्थ व सक्षम यंत्रणांना ही माहिती आवश्यक असल्यास देणे बंधनकारक असावे असे वाटते. )
शिवाय राहुल गांधी हे
किमान हे नक्कीच खरे नसावे. तसे असल्यास राहुलने निवडणूक आयोगाच्या अॅफिडेव्हिटमध्ये हे शिक्षण शपथेवर घोषित केले नसते. (जसे सॅफिडेव्हिटमध्ये सोनिया गांधी यांचे शिक्षण ग्रॅज्युएट वगैरे न दाखवता अदर असते. व अधिक तपशीलात काही इंग्रजीचे कोर्सेस आहेत (एक ३ वर्षांचा व एक एक वर्षाचा) )
जर सुब्बुंकडे पुरावा असेल तर राहुलच्या अॅफिडेव्हिटला निवडणूक आयोगात चॅलेंज करावे, राहुल गांधी यांची उमेदवारी रद्द होऊ शकेल.
पण झाकली मुठे सुब्बुंसाठी फायद्याची आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
गब्बर, थत्ते, अतिशहाणा -- मोदी --गुजरात -- UPA
धाग्यावमध्ये वरती गब्बर, थत्ते, अतिशहाणा ह्यांची गुजरात मॉडेल बद्दल चर्चा झालेली दिसते.
आजचे स्वामिनॉमिक्स त्यासंदर्भात (विशेषतः UPA च्या वर दिल्या गेलेल्या दहा वर्षाच्या सरासरीबद्द्ल लेख मस्त टिप्पणी करतो.)
छोटेखानी आहे, वाचण्यासारखा आहे.
ही लिंक :-
UPA’s 10-year averages are just statistical spin
http://blogs.timesofindia.indiatimes.com/Swaminomics/entry/upa-s-10-year...
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
स्वामीनाथन माझे आवडते आहेत
स्वामीनाथन माझे आवडते आहेत कारण ते लिबर्टेरियन आहेत. केटो मधे स्कॉलर आहेत.
आम्ही जो मुद्दा चर्चिला होता तो एनडीए वि. युपीए चा इकॉनॉमिक परफॉर्मन्स व कोण सरस आहे याचा. (अर्थात मनोबा याबद्दल प्रतिवाद करत आहे असे मला म्हणायचे नाही.). खरंतर स्वामीनाथन यांनी मांडलेल्या "is not the average depth but whether you can get through the deepest parts" - या मुद्द्याचा विचार केला तरीही युपीए सरस आहे. कारण २००७ - २००९ (जून) हे अमेरिकेत ऑफिशियल रिसेशन होते व त्यानंतर युरोपात अर्थनैतिक समस्या निर्माण झाल्या होत्या (पिग्स वगैरे). त्याचा परिपाक म्हणून जगभर मंदीचे सावट होतेच. मोठ्याप्रमाणावर. (मला स्वतःला त्याचा फटका बसला.). तरीही ७.१% सरासरी जीडीपी ग्रोथ रेट होता २००९ - २०१४ या कालात. कठिण कालातही भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीचा दर कायम राखणे हे कौशल्य आहे. (हा मुद्दा नमूद करण्याचे स्वामीजींनी टाळले आहे.). व हा रेट एनडीए च्या ५.९% पेक्षा बराच जास्त आहे.
अॅव्हरेजेस कडे मतदार लक्ष देत नाहीत - हे सत्य आहे असे जरी मानले तरी - आमच्या चर्चेचा मुद्दा मतदार कशाकडे लक्ष देईल - हा नसून आमच्या चर्चेचा मुद्दा - एनडीए वि. युपीए चा इकॉनॉमिक परफॉर्मन्स व कोण सरस आहे - हा होता. तीच गोष्ट गव्हर्नन्स बाबत. मोदी कुशल सुशासक असतीलही पण स्वामीजींनी मुद्दा स्पिन केलेला नाहिये असे म्हणता येत नाही.
खरंतर अॅव्हरेजेस कडे मतदार लक्ष देत नाहीत - हे मला विश्वसनीय विधान वाटते. बाऊंडेड रॅशनॅलिटी - ही टॉटॉलाजी आहे असे जरी म्हंटले तरी ती असत्य नाही.
नितीन थत्तेंच्या मुद्द्यास
--
http://tinypic.com/r/wj9n9e/8
--
नितीन थत्तेंच्या मुद्द्यास पुरवणी म्हणून - इन्फ्लेशन व जीडीपी ग्रोथ रेट चा तक्ता. माहीतीस्त्रोत - जागतिक ब्यांक. कालावधी - १९६१ - २०१२.
यात कंझ्युमर प्राईस इन्डेक्स व जीडीपी डिफ्लेटर हे इन्फ्लेशन चे प्रतिनिधी. व जोडीला जीडीपी ग्रोथ.
एक्सेल मधे ग्राफ सिलेक्ट केला की त्याचा डेटा ऑटोमॅटिकली हायलाईट होतो. म्हंजे गब्बर ने फॅब्रिकेट केलाय असे म्हणता येणार नाही. तसेच जर एक्सेल हवी असेल तर इमेल पाठवा व्यनी मधे ... मी एक्सेल पाठवून देईन.
डेटासोर्स - http://data.worldbank.org/indicator
भाजपाच्या डॉ. गावित आणि
भाजपाच्या डॉ. गावित आणि आआपच्या मेधा पाटकर यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता डीनएने आजच्या पेपरात वर्तवली आहे
अधिक तपशील समजले नाहित, पण डॉ. हिना गावित यांना उमेदवार असूनही मेडिकल स्टायपेंड मिळतोय, तर मेधाताईंना २००२ मध्ये जन सहयोग ट्रस्ट साट्।ई पैसे मिळाले होते जे त्यांनी नर्मदा बचाव कार्यासाठी वर्ग केले होते - ते अॅफिडेव्हिट मध्ये दाखवलेले नाहीत असा आरोप करून त्यांचे अॅफिडेव्हिट चॅलेंज केले आहे.
अधिक तपशील अन्य कुठे आलेत का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अॅफिडॅविटमध्ये काय लिहायचे
अॅफिडॅविटमध्ये काय लिहायचे असते ठाऊक नाही. पण आजची मालमत्ता जाहीर करायची असेल तर २००२ मध्ये मिळालेले पैसे दाखवले नाहीत वगैरे खोडसाळपणा वाटतो.
राहुल गांधीला अमेठीचे डोमिसाइल सर्टिफिकेट नाकारले आहे अशी बातमी वाचली होती.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
कळ्ळं नै
डोमिसाइलचा झोल अजूनही कळ्ळा नै.
भारतभरात कुणीही कुठूनही निवडणूक वगैरे लढवू शकत असताना त्या डोमिसाइल झोलबद्दल अर्धवट ऐकण्यात आले.
मुळात राहुलला ते डोमिसाइल हवे कशाला आहे ?
त्याला अडचण आली, तशीच अडाचण वाराणशीत मोदीए- केजरी ह्यांना कशी आली नाही ?
ते ही तिथले स्थानिक नाहितच.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
प्रत्येक उमेदवाराने लोकल
प्रत्येक उमेदवाराने लोकल ब्यांकेत* खाते उघडावे असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. त्यासाठी हवे आहे.
कुठलाही पत्ता असलेला इसम कुठल्याही गावातल्या बँकेत खाते उघडू शकतो असा वैयक्तिक अनुभव आहे. अमेठीच्या पत्त्याची काय गरज ते कळत नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ही निव्वळ पक्षासाठी
ही निव्वळ पक्षासाठी 'एम्बॅरेसमेंट" आहे की एखाद्या विद्यमान खासदाराला त्याच्याच मतदारसंघातून रहिवासी असल्याचा दाखला मिळवता येऊ नये - तितकेही वास्तव्य तिथे नसावे. टेक्निकली यात बेकायदेशीर काहि नाही.
उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यात त्यामुळे आडकाठी होणार नाही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
'कागझ के फूल'साठी फिल्मफेअर
'कागझ के फूल'साठी फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेले, गुरु दत्त यांच्या चित्रपटांमधले छायाचित्रकार व्ही. के. मूर्ती यांचं निधन.
'द हिंदू'मधली बातमी.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
Dunning–Kruger
या बातमीचे शीर्षकच पुरेसे बोलके आहे -
The less Americans know about Ukraine’s location, the more they want U.S. to intervene.
Dunning–Kruger न्यायाचे अजून एक उदाहरण!
सरसकटीकरण?
मला यूक्रेन नक्की कोठे येते, याबद्दल आजमितीस जर असलीच, तर अॅट बेष्ट अत्यंत धूसर कल्पना आहे. (आणि हे क्रिमिया नक्की कोठे आहे, याबद्दल "तिथेच कोठेतरी असावे" याहून अधिक अचूकतेने सांगू शकणार नाही.)
मात्र, अमेरिकेने यात (किंवा फॉर द्याट म्याटर यापुढे कशातच) काशी घालू नये, असे मनापासून वाटते.
आणि हो, बायदवे, मी अमेरिकन आहे.
या अमेरिकनास मार्जिनलाइज़ करून भलतेसलते सरसकट निष्कर्ष काढू पाहणार्यांच्या बैलाला घो, नानाची टांग, आबाचा ढोल, इ.इ.
(उलटपक्षी, असा मथळा एका अमेरिकन वृत्तपत्रातच यावा, हेदेखील पुरेसे बोलके आणि टिपिकल - प्रस्तुत विधानसुद्धा सरसकटच असले, तरी - नाही काय?)
सरसकटीकरण - जंगल की झाड?
सरसकटीकरण आहे हे मान्यच. शिवाय असा मथळा दिला की, अलगद त्या बातमीच्या हिट्स वाढतात हाही एक अंतस्थ हेतू असणं अशक्य नाही. पण एका मर्यादेपर्यंत एका झाडाला मार्जिनलाईझ करून जंगलावर लक्ष केंद्रित करण्यास काहीच हरकत नसावी
थोडे अवांतर - 'वर्ल्ड मॅप अॅकॉर्डिंग टू अमेरिकन्स' ही सध्या तशी क्लिशेड् मीम. (न्यू यॉर्करचे ३५ वर्षांपूर्वीचे हे मुखपृष्ठ कदाचित याची पहिली आवृत्ती म्हणता येईल). पण अशा नकाशांचे पेव फुटल्यावर xkcd ची याबद्दलची टिप्पणी पहा:
So this is one of those things where you point out our ignorance and stereotypes?
That's not the point!
झाड मार्जिनलाइज़ करता यावे, इतकेही अल्पसंख्य असावे, असे वाटत नाही१. (अर्थात, "झाड" नेमके कशाला म्हणत आहात, यावर अवलंबून आहे.) पण मुद्दा तो नाही.
वर आपण दिलेला नकाशा ज्यांच्या जागतिक भौगोलिक दृष्टिकोनाचा प्रातिनिधिक असू शकतो, त्या अमेरिकन (प्रातिनिधिक) गटाससुद्धा, उर्वरित व्यापक अमेरिकन गटापेक्षा त्यांचे सरासरी भौगोलिक ज्ञान अधिक चांगल्या पातळीवरचे असते, असे मानले, तरी, "यूक्रेन साधारणतः काळ्या समुद्राच्या आसपास कोठेतरी आहे" असा एक व्हेग अंदाज याहून अधिक तपशिलात यूक्रेनचे नकाशावरील नेमके स्थान ठाऊक असेलच, असे सांगता येत नाही. (सामान्यतः, ठाऊक असण्याचे कारण किंवा गरजही नसावी.) आणि, यूक्रेन/रशिया/सोविएत संघ आदींच्या इतिहासाचा तपशीलवार आणि सखोल अभ्यास केलेला असल्याखेरीज सध्याच्या समस्येचे नेमके ज्ञान (पेपरांत जे छापून येते, त्यापलीकडे) असण्याचेही कारण नाही. (त्या इतिहासाचा इतका सखोल अभ्यास डिप्लोम्याटिक आणि त्या विषयासंबंधी अक्याडेमिक वर्तुळांबाहेर किती जणांचा असू शकेल, अगदी सामान्यज्ञानाची पातळी बरी असणारांतसुद्धा, याबद्दल साशंक आहे.)
म्हणण्याचा रोख, अमेरिकेने या भानगडीत हस्तक्षेप करावा की न करावा याबद्दलचे (दोन्ही प्रकारच्या) अमेरिकनांचे दृष्टिकोन हे त्यांच्या View of the Worldपेक्षा View of America (and her role vis-a-vis the World)वर (किंवा, या नावावर त्यांच्या डोक्यात जे काही भरवून दिले असू शकेल, वन वे ऑर द अदर, त्यावर) अवलंबून असावे, असे वाटते. (किबहुना, View of the World ही बाब येथे तुलनेने गौण असावी, अशी शंका येते.)
काही अतिअवांतर प्रश्न / शंका:
- प्रस्तुत बातमी / मथळा ज्या वृत्तपत्रात छापून आला, त्या वृत्तपत्राचा राजकीय कल सामान्यः कोणत्या पक्षाकडे / विचारसरणीकडे असावा?
- 'यूक्रेनचे नकाशावरील नेमके स्थानसुद्धा ज्यांना ठाऊक नाही, असे लोक' हे साधारणतः कोणत्या विचारसरणीकडे झुकणार्या लोकांचे प्रतीक म्हणून वापरले जाऊ शकावे?
=====================================================================================================================
१ केवळ वननिरीक्षणाप्रीत्यर्थ आणि -पुरते. अन्यथा, अल्पसंख्यांस (अल्पसंख्य आहेत या कारणास्तव) खुशाल मार्जिनलाइज़ करता यावे, असा (सरसकट) दावा करण्याचा हेतू नाही.
एक जुनीच गोष्ट!
एक जुनीच (ऐकीव) गोष्ट!
The United Nations conducted a worldwide survey with one single question:
"Would you please give your opinion about solutions to the food shortage in the rest of the world?"
The survey was a huge failure:
In Latin America, they didn't know what please meant ...
In China, they didn't know what opinion meant ...
In the Middle East, they didn't know what solution meant ...
In Europe, they didn't know what shortage meant ...
In Africa, they didn't know what food meant ...
In the United States, they didn't know what the rest of the world meant ...
दुरुस्ती
ह्याच्याच अजून एका ऐकिव व्हर्जननुसार एकाची भर :-
"Would you please give your HONEST opinion about solutions to the food shortage in the rest of the world?"
In India, they didnt know what honesty means!
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
(अतिअवांतर) एक प्रयोग
एक प्रयोग करून पाहू. (तूर्तास विचारप्रयोगच. तूर्तास माझी धाव तितपतच आहे. प्रत्यक्षात करून पाहण्याकरिता लागणारा वेळ, उत्साह, इच्छा आणि संसाधने यांपैकी माझ्याजवळ काहीही नाही. इतरांना प्रत्यक्ष करून पाहावयाचे असल्यास त्यांचे स्वागत आहे - शिवाजी नेहमी दुसर्याच्या घरात जन्मावा.)
आम्हां अमेरिकनांचे सोडा. भारतीयांसमोर - सोडा. प्रयोगाकरिता फार मोठा संच होतो. इथे ऐसीवर जे बहुतांश भारतीय सदस्य आहेत, त्यांच्यासमोर - जर देशांची (किंवा कशाचीही) नावे न लिहिलेला जगाचा नकाशा - जगाचा सोडा, युरेशियाचा नकाशा घेऊ. - मांडला, तर त्यांपैकी किती जणांना "हा सूर्य आणि हा जयद्रथ"च्या थाटात "हा यूक्रेन नि हा क्रिमिया" असे चटकन पिनपॉइंट करून दाखवता यावे?
रशिया-क्रिमिया-यूक्रेन भानगडीबद्दल (आणि त्यात कोणत्याही तृतीयसत्तेने हस्तक्षेप करण्याबद्दल) भारतीय ऐसीकरांचे प्रातिनिधिक मत काय निघावे?
हाच प्रयोग जर ऐसीपातळीऐवजी जर किंचित व्यापक पातळीवर करून पाहिला (समजा, अखिल-सकाळ-अधिक-मटा-अधिक-लोकसत्ता-वाचकगट पातळीवर केला), तर त्यातून नेमके काय निष्पन्न व्हावे असा अंदाज काढता यावा?
(माझा आगाऊ - आणि बिनबुडाचा - निष्कर्ष: उगाच कशाचाही कशाशीही संबंध जोडून द्यायचा, झाले. मसालेदार मथळा मिळाल्याशी मतलब.)
लेख
लेख सध्या वरवर चाळलाय.
निरवाइझ फारुक ह्या फुटिरतावाद्याची/स्वातंत्र्यवाद्याची भूमिका मांडली आहे.
पत्र लिहून जनमत बनवण्याचा प्रयत्न स्वागतार्ह आहे.
लेखातील काही ठिकाणी अध्याहृत धमकी दिसली.
पण एकदा तरी वाचावे असा आहे.
http://www.thehindu.com/opinion/op-ed/an-open-letter-to-the-people-of-in...
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
'बहुआयामी शेक्सपिअर'
२३ एप्रिल हा जागतिक शेक्स्पिअर दिवस म्हणून पाळण्यात येतो.
त्या निमित्ताने 'सर्वांसाठी शेक्सपिअर' या संस्थेने, 'बहुआयामी शेक्सपिअर' हा परिसंवाद पुण्यात आयोजित केला आहे.
सहभाग
शेक्स्पिअरचा नाट्यविचार - अमित वझे
शेक्स्पिअर आणि वक्तृत्त्वकला - रौनक देव
शेक्स्पिअर आणि वास्तुकला - सौरभ मराठे
शेक्स्पिअर आणि व्यवहारज्ञान - रविमुकुल कुलकर्णी
समारोप - विनय हर्डिकर
स्थळः
भारती निवास सोसायटी सभागृह
इन्कम टॅक्स ऑफिस जवळा
बुधवार दि.२३ एप्रिल २०१४ संध्या ६:३० वाजता
--
माहितगार
--- http://tinypic.com/r/f3rk
---
http://tinypic.com/r/f3rkm0/8
---
Gross capital formation (formerly gross domestic investment) consists of outlays on additions to the fixed assets of the economy plus net changes in the level of inventories. Fixed assets include land improvements (fences, ditches, drains, and so on); plant, machinery, and equipment purchases; and the construction of roads, railways, and the like, including schools, offices, hospitals, private residential dwellings, and commercial and industrial buildings. Inventories are stocks of goods held by firms to meet temporary or unexpected fluctuations in production or sales, and "work in progress." According to the 1993 SNA, net acquisitions of valuables are also considered capital formation. Data are in current U.S. dollars.
---http://tinypic.com/r/2126
---
एनडीए चा कालावधी हा विशेष रंगाने दर्शवलेला आहे.
---
http://tinypic.com/r/2enxbu8/8
Central government debt, total (% of GDP)
Debt is the entire stock of direct government fixed-term contractual obligations to others outstanding on a particular date. It includes domestic and foreign liabilities such as currency and money deposits, securities other than shares, and loans. It is the gross amount of government liabilities reduced by the amount of equity and financial derivatives held by the government. Because debt is a stock rather than a flow, it is measured as of a given date, usually the last day of the fiscal year.
रिक्षाचालकाने केजरीवालांच्या श्रीमुखात भडकावली!
http://www.loksatta.com/desh-videsh-news/arvind-kejriwal-slapped-again-bjp-says-aaps-false-promises-may-be-the-cause-429645/
ह्या बातमीत तसे काही वेगळे नाही, पण
आणि
माझा आपेक्ष अंडरलाईन्ड कृतींना आहे.
हा देश आणि ह्या देशाची व्यवस्था समूळ बदलू पाहाणार्या व्यक्तिला, पक्षाला जर आधी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पक्षाला, लोकशाहीय व्यवस्थेची, त्याच्या कायद्याची शिस्त लावता येत नसेल तर इतर पक्षांत आणि आपमध्ये असा काय फरक आहे?
अवांतर - मी काही आप ह्या पक्षाचा विरोधक / प्रचारक नाही.
एक उत्सुकता म्हणून आणि आप नेमके काय करते हे माहिती करुन घेण्यासाठी काही महिन्यांपूर्वी त्याच्या संस्थळावर माझे नाव कार्यकर्ता म्हणून नोंदविले.
तेव्हापासून आजपर्यंत जवळ जवळ रोज माझ्या ईमेलच्या इन बॉक्समध्ये आपचे मेल्स येत आहेत. एकही मेल आप काय आहे, काय करणार आहे, त्यांचे स्ट्रक्चर काय आहे, पॉलिसी काय आहे, इत्यादी बद्दल काहीही सांगत नाही.
जवळ जवळ प्रत्येक मेल हा फक्त त्यांच्या पक्षाला पैशाची मदत / फंड डोनेट करा ह्यासाठीच येत आहे.
सुहास
झाले गेले गंगेला मिळाले,
आता उदय नव्या रामाचा.
नमो नमो
माझा आपेक्ष अंडरलाईन्ड
+१ कृती आक्षेपार्हच आहे!
आआप एखाद्या विचारधारेतून जन्माला आलेला पक्ष नसल्याने त्यांची एक अशी पॉलिसी असेल असे वाटत नाही. मुलाखतींमध्ये आआपचे उमेदवार भारतीय घटनेचे प्रीअॅंबलला बेस मानतात. थोडक्यात, व्यवस्थेला भिडणारे, बदलु पाहणार्या विविध नेत्या-कार्यकर्त्यांची मोळी असे पक्षाचे स्वरूप आहे. शिवाय दिल्लीतील यशानंतर आआपचा फुगा-बबल- फुगलेला दिसतो. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाला आत्मपरिक्षणासाठी थोडा अवसर मिळेल, नॅचरल 'करेक्शन' होईल आणि महाराष्ट्रातील विधानसभेपर्यंत काही मोठे बदल दिसतील असा माझा होरा आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आआप राजकारण
सोनिया गांधीं विरूद्ध रायबरेलीतून उभ्या असलेल्या आप उमेदवाराची (निवृत्त न्यायाधीश फक्रुद्दीन) माघार.
http://www.cnn.com/2014/04/08
http://www.cnn.com/2014/04/08/showbiz/archie-comics-death/index.html?hpt...
कॉमिक कॅरेक्टर आर्चि मरणार!
एकदाचा!
येस्स्स्स्स्स्स्स्स्स!!!!!!
(अवांतर:
HELLRUNG'S LAW
If you wait, it will go away.
SHAVELSON'S EXTENSION
... having done its damage.
GRELB'S ADDITION
If it was bad, it'll be back.
- येथून साभार.
)
- (आख्ख्या सीरीज़मधला फक्त (आणि फक्त) जगहेड (फोरसाइथ पी.) जोन्ज़ आवडणारा) 'न'वी बाजू.
ह्म्म मलाही जगहेड आवडायचा.
ह्म्म मलाही जगहेड आवडायचा. बेट्टीही. आर्चि न व्हेरॉनिका नॉट मच!!!
भन्नाट
संवाद आवडला!
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
डॉ भाऊ दाजी लाड संग्रहालयात
डॉ भाऊ दाजी लाड संग्रहालयात Life Between Borders: The Nomadic Life of Curators या पुस्तकाचं प्रकाशन आणि बाझिम माग्दी याच्या Turtles All The Way Down या लघुपटाचा खेळ.
वेळ - गुरुवार, १० एप्रिल २०१४. संध्याकाळी ६ वाजता चहापान, चित्रपट ६:३० वाजता. ६:४५ ते ७:४० चर्चा. लघुपट पुन्हा ७:४५ वाजता दाखवला जाईल.
--
माहितगार
आजच
मिरजेत मोदींची सभा झाली.
http://timesofindia.indiatimes.com/home/lok-sabha-elections-2014/news/Mo...
(सांगली असे लिहिले असले तरी ज्या ग्रौंडवर सभा होती ते ग्रौंड मिरजेत आहे.)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मग
मग एकदम नेटिझन्ससारखा भारावून वगैरे गेलास की नाही ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
नेटिझन असणे आणि मोदीसभेमुळे
नेटिझन असणे आणि मोदीसभेमुळे भारावणे यात परस्परसंबंध काय आहे ते 'क्रुपया' करून विशद करू शकाल काय?
वरील बातमी देण्याचे कारण हे की मोदी फक्त मोठ्या शहरांतच नै तर टियर २-३ मध्येही फिरतोय. लातुरातली सभा आटपून तसाच मिरजेला आला.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मग एकदम नेटिझन्ससारखा भारावून
मग एकदम नेटिझन्ससारखा भारावून वगैरे गेलास की नाही ?
राहुल किंवा लालू यांच्या मुळे भारावून जाण्यापेक्षा मोदीं मुळे भारावून जाणे उत्तम. मागे इस्लामपुरात लालू ची सभा झाली होती तेव्हा अफाट जनसागर उसळला होता. इस्लामपूर हे सांगली जिल्ह्यातच येते.
व भारावून जाणे हा फक्त नेटिझेन्स चा च गुणधर्म नाही. आसाम मधे काही स्त्रियांनी राहूल चे चुंबन घेतले होते - काही आठवड्यांपूर्वी. आता राजकारणी माणसाचे चुंबन घेणे हे भारावून जाण्याचेच लक्षण नाही का? या स्त्रिया नेटिझेन्स होत्या की नव्हत्या ते तुम्हीच ठरवा.
च्यायला. इस्लामपुरात आणि कधी
च्यायला. इस्लामपुरात आणि कधी आल्ता म्हणे लालू?
अर्थात सांगलीत कधी कोण येईल ते सांगता नै येणार म्हणा. २००३ झाली धाव्वीच्या सुट्टीत कपिलदेव आल्ता. तरुण भारत स्टेडीयमला काही बॉल खेळला. स्टेडियममध्ये आत जात असताना मी दारात उभा राहिलो आणि त्याला सिग्नेचर मागितली."कपिलजी एक ऑटोग्राफ प्लीज!" भाईंनी एक मख्खसा लुक देऊन तसेच पुढे गेले. दुसर्या दिवशीच्या पुढारीत त्याचा छोटासा इंटरव्ह्यू, काञ तर म्हणे आजकालची पोरं क्रिकेट खेळण्याऐवजी नुस्त्या सह्या मागतात
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
२००४ / २००५ च्या आसपासची
२००४ / २००५ च्या आसपासची गोष्ट आहे.
तो २००८ मधे पाकिस्तानात गेला तेव्हा सुद्धा प्रचंड गर्दी झाली होती.
दणकाच की हो.
दणकाच की हो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
नेटिझेन्स हा काहीसा डिरॉगेटरी
नेटिझेन्स हा काहीसा डिरॉगेटरी शब्द झालेला आहे की काय अशी शंका मनास चाटून गेली. डिरॉगेटरी नसेल तर निदान दुसर्या व्यक्तीस तिच्या प्रगती बद्दल खजील करणे - या उद्देशाने वापरला गेलेला शब्द असावा असे वाटते. इंटरनेट कनेक्शन असणे, ते वापरणे व त्याचा फायदा घेणे हे प्रगती चे लक्षण आहे असे माफक गृहीतक आहे.
खरंतर नेटिझेन्स ना आपण नेटिझेन्स असल्याचा अभिमान वाटायला हवा. (किमान तेवढा अभिमान वाटायला हवा - जेवढी लाज शेतकर्यांना त्यांच्या खालावलेल्या उत्पादकतेबद्दल वाटायला हवी - तेवढा). किमानपक्षी लोकांनी इतरांना नेटिझेन्स असे संबोधताना त्यातून खजील करण्याचा यत्न तरी करू नये.
"इंटरनेट द्वारे ज्ञान कमी व इन्फरमेशन जास्त मिळते" किंवा "इंटरनेटवरील ऐकीव ज्ञान (व बांधून दिलेली शिदोरी) फार काल टिकत नाही" - अशी टीका केली की नेटिझेन्स उगीचच खजील होतात.
डिरॉगेटरी
डिरॉगेटरी संज्ञा झाली आहे का ? माहित नाही.
मी स्वतः काय संज्ञा वापरली हे सांगतो .
नेटिझन्स नक्कीच नाही; पण "भारावून गेलेले नेटिझन्स " ही डिरॉगेटरी संज्ञा म्हणून वापरली आहे; असे म्हणणे
असेल तर त्यात तथ्य असू शकते.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सोलापूर मध्ये पण आजच सभा झाली
सोलापूर मध्ये पण आजच सभा झाली
मोदी पेटलाय तर!
मोदी पेटलाय तर!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सभेचा व्हिडिओ
सभेचा व्हिडिओ इथे पाहता येईल. ज्यांच्यावर प्रभाव पडायचा तो पडो; ह्या इसमाला डायलॉग डिलीव्हरीचं शिक्षण हिंदी फिल्लम इंडस्ट्रीतल्या कुणी तरी दिलं असावं असं मात्र वाटत राहतं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
व्हिडिओ
इथून व्हिडिओ दिसत नाहीये.
कसंय ना की फार प्रगल्भ, घनगंभीर वगैरे असल्यावर विचारी लोकांचा पाठिंबा मिळेल.
पण मतांच्या संख्येच्या राजकारणात ह्या वर्गाला काहीच स्थान नाही.
त्यापेक्षा जे आपल्याला सवंग म्हणतात त्यांना तसेच म्हणू देउन स्वतः आक्रमक, प्रसंगी प्रचारकी
भाषणबाजी करणेच फायद्याचे ठरु शकते. खरे तर ह्यावेळी आख्ख्या प्रचारानं डोकं उठवलं असलं तरी राममंदिर वगैरे
अस्मितेच्या राजकारणाची टोकं तीव्र नाहित; हेच बरं वाटतं.
मोदिला लोटांगण घालणं,सुपरम्यान बनवणं व विकासाचे ढोल बडवणं हे राममंदिरासाठी रान उठवण्यापेक्षा मला बरच बरं/स्वागतार्ह वाटतं. (राममंदिर बांधायलाही किंवा न बांधायलाही माझा काहीच आक्षेप नाही. पण ही मंडळी अक्रत काहिच नाहित. फुकाच्या गर्जना करुन लोकांना मृत्यूमुखी पाडतात. शेवटी हाती राहतो घंटा. त्यापेक्षा विकासाचे अवास्तव दावे आणि स्वप्ने परवडली.
सत्ता मिळालीच तर पब्लिकचेही डोळे उघडतील. कारण पैशाचे सोंग आणता एय्त नाही. "हा सूर्य आणि हा जयद्रथ"
ह्याप्रमाणे लोकांना थोडीफारसुद्धा सुधारणा झालेली आसपास दिसली नाही तर ती पुन्हा घरी पआठवाअयला कमी अक्रणार नाहित.
(आथवा इंडिया शायनिंग.) लोक सध्या मूर्ख बनत असलेच तर त्यांना बनू देत. ते नेहमी बनणार नाहित.(म्हणजे पुढच्यावेळी अजून कुणाकडून तरी बनतील. भाजपवाल्यांकडून नाही, असे मी म्हणतोय.))
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
प्रगल्भ, घनगंभीर वगैरे?
माझ्या वरच्या प्रतिसादावरून किंवा इतर कशाहीवरून 'मोदींनी स्वतःला प्रगल्भ किंवा घनगंभीर भासवावं' असं माझं मत असेल असा काही समज झाला असला तर शुभेच्छा. बाकी सर्व क्षेमकुशल असेल अशी आशा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अमित शाह
मोदींचे सहाय्यक अमित शाह हेदेखील हिंदी फिल्लम इंडस्ट्रीतल्या नाना स्पॉट (रामी रेड्डी) सारखे दिसतात असे कुणाला वाटते का?
द्या टाळी!!!! यद्यपि अंमळ
द्या टाळी!!!! यद्यपि अंमळ काळेपणा वाढवल्यास साम्य अजून जास्त होईल असे वाट्टे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शहामत
होय. त्यांचे तोंड काळे करणे आवश्यकच आहे.
पण
पण सध्या तरी गांधी घराण्याच्या घराणेशाहीने तोंड काळे करणे अधिक आवश्यक आहे
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
का? गांधी घराण्याच्याच
का? गांधी घराण्याच्याच का?
तुम्हाला वरूण गांधी येऊ नये असे का बरे वाटावे?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
:)
प्रतिसादाचं टायमिंग आणि जागा दोन्ही झकास.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मोदी विवाहित असल्याची कबुली?
ह्या बातमीनुसार मोदींनी आपण विवाहित असल्याचं प्रथमच अधिकृतरीत्या कबूल केलं आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
नवीनच माहिती
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5089157796928902378&Se...ताज्या बातम्या&NewsDate=20140410&Provider=- सकाळ वृत्तसेवा&NewsTitle=देशाचे लक्ष नागपूरकडे - आज मतदान
ह्या दुवयवरील शेवटचा परिच्छेद सगळ्यांच्याच कामाचा ठरावा.
तो इथे चिटकवत आहे :-
मतदानाला जाताना...
"व्होटर आयडी' नाही?...चिंता नको!
निवडणूक ओळखपत्र (व्होटर आयडी) आहे; पण यादीत नाव नाही किंवा यादीत नाव आहे पण व्होटर आयडी नाही, अशा दोन्ही स्थितींमध्ये मतदान करण्याची संधी आहे. पण यादीतही नाव नाही आणि व्होटर आयडीदेखील नाही अशावेळी मात्र मतदान कसे करायचे, याबाबत मतदारांमध्ये दरवर्षी संभ्रम निर्माण होतो. पण अशांनाही यंदा चिंता करण्याची गरज नाही. कारण यंदा निवडणूक आयोगाने अशा मतदारांसाठी वेगळी व्यवस्था केली आहे. ज्या मतदारांकडे या दोन्ही गोष्टी नसतील त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपली समस्या सांगायची. त्यांना एक विशिष्ट प्रकारचा फॉर्म संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात येईल. हा फॉर्म भरताना मतदाराने दोन छायाचित्रे आणि स्वतःचे कुठलेही ओळखपत्र जवळ बाळगावे, अशा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. यामध्ये पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, आधार कार्ड, कार्यालयीन ओळखपत्र आदींचा समावेश करण्यात आला आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
कट्टर मोदीविरोधक
कट्टर मोदीविरोधक असणारा आणि नंतर त्यांचा समर्थक बनलेल्या लंडनस्थित मुस्लिम माणसाची कहाणी वाचण्यात आली.
ह्या माणसानं पूर्वी मोठी चळवळ वगैरे मोदींविरुद्ध आंतररष्ट्रिय पातळीवर चालवली होती.
पण मोदी भेटींनतर त्याच मत बदलत गेलं. नंतर तो स्वतः एकटाच गुजरातेत जाउन राहून आला.
मत बदलण्यात तो महत्वाचा टप्पा ठरला. तो लेख इथे देत आहे.
पुस्तकही उपलब्ध आहे असं दिसतं.
http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/XYZ/entry/modi-muslims
.
.
**************************लेख सुरु*********************
मोदी आणि मुसलमान : दुसरी बाजू
"२००२च्या दंगली उगाळत बसणारे लोकं विसरतात की १९६९ साली अहमदाबादमध्ये झालेल्या दंगलीत ५०००हून अधिक मुसलमान मारले गेले होते. कॉंग्रेसचे हितेंद्रभाई देसाई हे गुजरातचे मुख्यमंत्री आणि स्व. इंदिरा गांधी तेव्हा देशाच्या पंतप्रधान होत्या. दोषींना शिक्षा होणं दूर, पोलिसांकडून साधं एक आरोपपत्रंही त्यावेळेस ठेवलं गेलं नव्हतं." झफर सरेशवाला
आजपासून सुरू होत असलेल्या लोकसभा निवडणूकांतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नरेंद्र मोदी. मोदी आले तर देशातील १५% मुसलमानांशी भेदभाव केला जाईल; त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाईल; देशात ठिकठिकाणी दंगे होतील अशा आवया कॉंग्रेस आणि अन्य तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांकडून उच्चरवाने उठवल्या जात आहेत. गेल्याच आठवड्यात कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामांना साकडं घालत त्यांना मुसलमानांना कॉंग्रेसच्या मागे उभं रहाण्याचं आवाहन करायला लावलं.
निवडणूकांचं वातावरण सांप्रदायिकतेच्या मुद्द्यावरून तापलं असताना १ एप्रिल रोजी वरिष्ठ संशोधक आणि स्तंभलेखक मधु पुर्णिमा किश्वर यांचे "मोदी, मुस्लिम्स अॅंड मिडिया - व्हॉयसेस फ्रॉम नरेंद्र मोदीज गुजरात" हे पुस्तक प्रकाशित झाले. २०१३ साली गुजरातला अनेकदा भेट देऊन, तेथील मुस्लिम समुदायाच्या लोकांशी, २००२ च्या दंगलग्रस्तांशी, सरकारी अधिकाऱ्यांशी आणि खुद्द नरेंद्र मोदींशी साधलेल्या विस्तृत संवादावर आधारित हे पुस्तक मोदी विरोधाची होळी पेटवून त्यावर गेली १२ वर्षं स्वतःची पोळी भाजणाऱ्यांचा बुरखा टरकावते.
या पुस्तकाची प्रस्तावना ख्यातनाम पटकथा लेखक (आणि हो सलमान खानचे वडील) सलीम खान यांनी लिहली असून ती डोळ्यांत अंजन घालते. २००२ च्या दंग्यांतल्या सहभागासाठी मोदींविरूद्धं लंडनमधून चळवळ चालवणारे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचणारे झफर सरेशवाला मोदींचे जवळचे सहकारी कसे बनले याची हकीकत वाचकांना खिळवून ठेवते. आपण सर्वांनी हे पुस्तकं वाचावं म्हणून मी त्यातील सरेशवालांच्या कहाणीचा थोडासा स्वैर अनुवाद सारांशरूपाने तुमच्यासमोर मांडत आहे.
सरेशवाला म्हणतात, सौदी अरेबियातून सुमारे २५० वर्षांपूर्वी गुजरातमध्ये स्थायिक झालेल्या सुन्नी बोहरा समाजातील मी एक. अत्यंत कर्मठ मुसलमान असूनही आम्ही शिक्षण व उद्योगांत मोठी प्रगती केली आहे. २००२च्या दंगली उगाळत बसणारे लोकं विसरतात की १९६९ साली अहमदाबादमध्ये झालेल्या दंगलीत ५०००हून अधिक मुसलमान मारले गेले होते. कॉंग्रेसचे हितेंद्रभाई देसाई मुख्यमंत्री आणि स्व. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या.
दोषींना शिक्षा होणं दूर, पोलिसांकडून साधं एक आरोपपत्रंही ठेवलं गेलं नव्हतं. १९८५ ते २००२ सालापर्यंत, जवळपास दर २-३ महिन्यांनी दंगे व्हायचे. कर्फ्यू लागायचे. कॉंग्रेस राजवटीत झालेल्या या दंग्यांमध्ये अनेकदा आमचं घर, ऑफिस किंवा फॅक्टरी जाळली गेली. विमा काढला असूनही त्याचे पूर्ण पैसे मिळायचे नाहीत. कदाचित २००२ च्या दंगली २४x७ टीव्ही आणि इंटरनेट युगात झाल्यामुळे त्या इतरांपेक्षा उठून दिसतात.
२००२च्या दंगलींच्या वेळेस मी इंग्लंडमध्ये असलो तरी त्यात आमच्या कुटुंबाच्या व्यवसायाची वाताहत झाली. इंग्लंडला माझ्या आजूबाजूला रहाणारे ३ मुस्लिम रहिवासी या काळात गुजरातमध्ये गेले असता दंगलींत मारले गेले. आम्ही एकत्र येऊन मोदींना आणि गुजरात सरकारला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचले. तत्कालिन गृहमंत्री लाल कृष्ण आडवाणींना अटक होण्याच्या भीतीने आपला इंग्लंड दौरा रद्द करावा लागला.
एका रात्रीत मी "हिरो" ठरलो पण आपण यातून काय साध्य केलं या विचाराने मी अस्वस्थ होतो. इग्लंडमध्ये असताना जगभरातील मुसलमानांची स्थिती मी जवळून पाहिली. मुस्लिम जगात सर्वत्रं युद्धं, दहशतवाद आणि यादवीमुळे करोडो लोकं देशोधडीला लागले असून स्वतःच्या किंवा दुसऱ्या देशांत निर्वासितांसारखे जगत आहेत.
त्यांच्या दुःखाचं भांडवल करणारे; त्यांना वाटाघाटींपासून परावृत्त करून संघर्ष चालू ठेवायला भाग पाडणारे लोकं, स्वतः मात्र दुसऱ्या देशांमध्ये रहातात. आलिशान ऑफिसं थाटून त्यातून इमेल पाठवणे किंवा मिडियात आंदोलनं करून लाखो डॉलरच्या देणग्या आणि सात आकडी पगार मिळवतात.
मुस्लिम सर्व एक आहेत असा माझा तोपर्यंत समज होता. गुजरात दंगलग्रस्तांसाठी मदत गोळा करताना तो दूर झाला. अरब हे अरब आहेत आणि पाकिस्तानी हे पाकिस्तानी आहेत. भारतातही लखनौचे मुस्लिम हे गुजरातच्या मुसलमानांपेक्षा वेगळे आणि सुरतचे मुस्लिम हे अहमदाबादच्या मुसलमानांपेक्षा वेगळे असून गरज पडल्यास कोणी कोणासाठी धावून जात नसल्याचा प्रत्यय आला.
त्यावेळेस इस्रायल आणि पॅलेस्टिनी लोकांच्यात भयंकर संहार सुरू असूनही त्यांनी शांतता वाटाघाटींना सुरूवात केली. जर गेल्या ६० हून अधिक वर्षांपासून लढणारे हे लोकं एकमेकांशी बोलू शकतात तर आपण का नाही? पण बोलणार तर कोणाशी? थेट मोदींशीच बोलायचे का? का नको? मोदी काही कोणी परके नाहीत. अहमदाबादच्या बाजूच्या आणि मुस्लिम वस्ती असलेल्या वडनगरमध्ये ते मोठे झाले. दोन तृतियांश मताधिक्याने ते पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते.
त्यांना आणि गुजरात सरकारला वाळीत टाकले तर सर्वाधिक नुकसान गुजराती मुसलमानांचेच होणार होते. आम्हालाही शाळा, दवाखाने, मदरसे चालवायला प्रशासनाची मदत लागतेच. म्हणून मी याबाबत अनेक मौलवींशी चर्चा केली. कुराण आणि हदीथचे दाखले देत त्यांनी सांगितले की, जर तुमचा हेतु स्वच्छ असेल तर शांतता आणि सद्भावना प्रस्थापित करण्यासाठी अगदी शत्रूशीही बोलणी करण्यास इस्लामची मान्यता आहे.
पण मोदी आमच्याशी बोलतील का? गेली दोन वर्षं आम्ही त्यांच्याविरूद्धं आग ओकत होतो. हिटलर आणि अन्य क्रूरकर्म्यांशी आम्ही त्यांची तुलना करत होतो. तेव्हा मी माझे मित्र सिनेनिर्माते महेश भट यांचा सल्ला घेतला. त्यांनी आपले पत्रकार मित्र रजत शर्मांच्या माध्यमातून मोदींशी आमची भेट घडवून आणण्याची व्यवस्था केली. ऑगस्ट २००३ मध्ये पहिल्या "व्हायब्रंट गुजरात" परिषदेच्या प्रसारासाठी मोदी इंग्लंडला येणार होते.
वेंब्लीच्या कुठल्यातरी हॉलमध्ये भेटायला त्यांनी सांगितले पण आम्ही एकांतातील भेटीसाठी आडून बसलो तेव्हा मोदींनी ते रहात असलेल्या जेम्स कोर्ट येथे भेटायला बोलावले. मी मोदींना भेटणार आहे हे कळताच तोपर्यंत स्तुतीवर्षाव करणारे लोकं माझ्यावर तुटून पडले. माझा धिक्कार करणाऱ्या ११०० इ-मेल मला आल्या. तरीही मी मागे हटलो नाही. मी म्हटलं की, हाच माझा जिहाद आहे.
आमचे स्वागत करायला मोदी स्वतः लिफ्टपर्यंत आले होते. "या मित्रांनो" असं म्हणत अत्यंत आदबीनं त्यांनी अमचं स्वागत केले. आम्ही थेट मुद्द्यालाच हात घातला. तुम्ही ५ कोटी गुजरातींची भाषा करता, त्यात ६० लाख मुसलमान समाविष्ट आहेत का नाही? तुम्ही इथे व्हायब्रंट गुजरातच्या नावाखाली आर्थिक विकासाची गोष्टं करता पण सामाजिक न्यायाचं काय? जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता कशी नांदेल. हा प्रश्नं फक्त दंगलींची झळ बसलेल्या मुसलमानांचा नाही तर हिंदूंचाही आहे.
त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका बड्या उद्योगपतीने घड्याळाकडे बघालया सुरूवात केली असता मोदींनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की, आजची संध्याकाळ मी या लोकांबरोबर घालवणार असून माझे बाकीचे सर्व कार्यक्रम रद्द करा. माझ्याबरोबर आलेल्या मौलवी इसा मन्सूरींनी तर मोदींना धारेवरच धरलं. तब्बल दीड तास त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. आम्ही त्यांना सुनावले की, या दंगलीत जे झाले त्याची जबाबदारी शेवटी मुख्यमंत्री म्हणून तुमच्यावर येते.
मोदींनी आम्हाला शांतपणे ऐकून घेतलं. त्यांनी सांगितलं की, गुजरातच्या हिंदूंप्रमाणेच मुसलमानही माझेच आहेत. जेव्हा मी नर्मदेचं पाणी साबरमतीत आणलं तेव्हा त्याचा फायदा मुसलमानांनाही तेवढाच झाला. दंगलींबाबत करण्यात आलेल्या आरोपांना त्यांनी अतिशय मुद्देसूद उत्तरं दिली. तथ्यहीन व अतिशयोक्तीपूर्ण आरोप त्यांनी पुरावे आणि आकडेवारीनिशी खोडून काढले. जिथे प्रशासनाच्या तृटी राहिल्या त्या त्यांनी खुलेपणाने मान्य केल्या.
गुजरात दंगलींपूर्वी केवळ ४ महिने आधी ते मुख्यमंत्री झाले होते आणि केवळ ३ दिवस आधी राजकोट विधानसभेच्या पोटनिवडणूकीत ते विजयी झाले होते. त्यापूर्वी ना कधी ते आमदार होते ना सरकारात त्यांनी कोणती जबाबदारी पार पाडली होती. मुख्यमंत्री व्हायच्या आधीची ६ वर्षं ते राष्ट्रीय राजकारणात असल्याने गुजरातबाहेरच राहिले होते.
या त्यांच्या मुद्यांमध्ये तथ्य असल्याचं आम्हाला पटलं. "हा कलंक माझ्या कारकिर्दीत लागला असून मलाच तो धुवावा लागणार आहे" अशा शब्दांत त्यांनी दंगलींची जबाबदारी स्वतःकडे घेतली. नरेंद्र मोदी दंगलींबद्दल माफी मागत नाहीत असा अनेकांचा आक्षेप असतो. पण आपली न्यायव्यवस्थाही "सॉरी" म्हटलं म्हणून कोणाचे गुन्हे माफ करत नाही. मी दोषी असेल्याचं सिद्धं झाल्यास मला भर चौकात फाशी द्या असं मोदी सांगतात.
यापूर्वी गुजरातमध्ये एवढ्या दंगली झाल्या पण कॉंग्रेसच्या एकाही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आमचे म्हणणे मांडायला संधी दिली नाही. १९९२च्या दंगलींनंतर पंतप्रधान नरसिंहा राव यांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात माझे काका होते. त्यांना ४ दिवस ताटकळत ठेऊन पंतप्रधानांनी शेवटी भेट दिलीच नाही असं सरेशवाला सांगतात. या भेटीपासून सुरू झालेल्या मोदींसोबतच्या मैत्रीबाबत बोलताना ते कशाप्रकारे गेल्या १० वर्षांमध्ये गुजरातमध्ये एकही दंगल झाली नाही, आधी गुजरातमध्ये मुस्लिम शाळा काढणे दूरास्पद होते ते आता किती सहजशक्य झाले आहे आणि गुजरातच्या मुसलमानांनी कशा प्रकारे आर्थिक प्रगती केली आहे याचे अनेक दाखले देतात.
दुसरीकडे मोदीविरोधी ब्रिगेडमधील तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार कशा प्रकारे दंगलींची केवळ एकच बाजू दाखवतात, दंगलींमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी असलेल्या कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या सहभागाबद्दल मूग गिळून गप्प बसतात, स्वतः मुंबईत राहून गुजरातच्या मुसलमानांबद्दल नक्राश्रू ढाळतात आणि कशा प्रकारे दंगलग्रस्तांच्या जखमा भळभळत राहतील यासाठी प्रयत्नं करतात याबद्दलही ते भरभरून बोलतात.
आजवर मोदींची एवढी स्तुती ऐकायची सवय नसल्याने मधु किश्वर यांनी यातील शक्य तेवढ्या संवादांचे व्हिडिओ चित्रिकरण केले असून सरेशवालांच्या कहाणीची महेश भट आणि रजत शर्मांकडून खातरजमा केली आहे. पुस्तकाचा भर गुजरात दंगली, नरेंद्र मोदींना खलनायक ठरवण्यासाठी कॉंग्रेस तसेच मिडिया आणि सामाजिक संस्थांच्या एका गटाने गेली १२ वर्षं अविरतपणे चालवलेली मोहिम आणि गुजरातमधील मुसलमानांचा विकास या विषयांवर असला तरी ते कोणत्या पार्श्वभूमीवर मोदींची गुजरातमध्ये थेट मुख्यमंत्री म्हणून पाठवणी करण्यात आली, मोदींच्या नियुक्तीवर नाराज असलेल्या भाजपाच्या विविध गटांनी त्यांना कशा प्रकारे त्रास दिला, मोदींनी अल्पावधीतच कशा प्रकारे प्रशासन व्यवस्थेवर पकड मिळवली आणि भ्रष्टाचारमुक्त, कार्यक्षम आणि संवेदनशील व्यवस्था कशाप्रकारे निर्माण केली यावरही प्रकाश टाकते.
२६ जानेवारी २००१ला कच्छला देशातील सर्वात मोठा भूकंप झाला. त्यानंतर ९ महिन्यांनी मोदींची गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. तोपर्यंत भूकंपग्रस्तांचे हाल कुत्रं खात नव्हतं. ते न पाहवल्याने कच्छमध्ये तळ ठोकून सामान्य माणसांच्या दुःखात सहभागी होणारे; त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासह जेवणारे, त्यांचे आश्रू पुसणारे मोदी या पुस्तकातून आपल्या समोर येतात तेव्हा रांगडी आणि पोलादी प्रतिमा उभी केलेल्या मोदींचे मन किती संवेदनशील आहे याचा आपल्याला प्रत्यय येतो.
देशातल्या सर्वात मागास जिल्ह्यांत समावेश असलेल्या कच्छला नरेंद्र मोदींनी कशा प्रकार देशातील सर्वाधिक वेगाने विकास होणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत पोहचवले (यावर गेल्या वर्षी मी कच्छला भेट देऊन आल्यानंतर "जेव्हा कासव धावू लागते http://goo.gl/iBPQNd हा लेख लिहिला होता) याची कहाणीही रोचक आहे.
मोदींवर काय वाट्टेल ती टीका करणारे असंख्य लोकं आहेत आणि त्यात समाजातील अनेक मान्यवरांचाही समावेश आहे. दुसरीकडे "मोदींसाठी काय पण" असाही एक वर्ग आपल्याला इंटरनेट आणि सोशल मिडियावर हमखास भेटतो. त्यामुळे कुंपणावरच्या माणसांची स्थिती गोंधळल्यासारखी होते. मधु किश्वर यांनी स्वतः २००२ च्या दंगलींनंतर मोदींवर टीका करणारे अनेक लेख लिहिले होते.
२०१३ साली स्वतः केलेल्या अभ्यास दौऱ्यानंतर त्यांचे मनःपरिवर्तन झाले. या पुस्तकात अनेक लोकांच्या मुलाखती त्यांच्या शब्दात मांडल्या असल्याने काही गोष्टी आणि उल्लेख पुन्हा पुन्हा येतात. तेवढा भाग सोडला तर हे पुस्तक मनाचा ठाव घेते. या निवडणूकींत मतदान करण्यापूर्वी शक्य झाल्यास हे पुस्तक वाचा असं सुचवायला मला आवडेल.
*************************लेख समाप्त*******************
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
ते चित्र आणि हे चित्र
जर लंडनस्थित जफर सरोशवालांचं ते म्हणणं वाचलंत तर मग जरा अहमदाबादेतल्या जुहापुरा ह्या मुस्लिम वस्तीतल्या जाहिर जानमोहंमद ह्या रहिवाशानं मधु किश्वरना लिहिलेलं हे पत्रदेखील वाचावंत अशी नम्र विनंती.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सहमत आहे. मोदी पंतप्रधान झाले
सहमत आहे. मोदी पंतप्रधान झाले तर अराजक माजेल देशात. देशाला काँग्रेसचीच गरज आहे. कॉग्रेसचीच सत्ता राहिली पाहिजे या देशात जो पर्यंत चंद्र-सूर्य आकाशात आहेत.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
स्वतः मुंबईत राहून गुजरातच्या
हे वाक्य इंग्लंडमधे राहून लिहीण्यासाठी फार धैर्य लागतं.
एकंदर लेख होमिओपथी समर्थकांसारखा वाटतो. "मी अमक्या तमक्या रोगासाठी औषध घेतलं आणि बरा झाला की हो रोग. म्हणून होमिओपथी ही वैज्ञानिक उपचारपद्धती आहे."
(आणि हो, या प्रतिसादात मला स्त्रीवादाची आठवण झाली नाही.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अवांतर
(आणि हो, या प्रतिसादात मला स्त्रीवादाची आठवण झाली नाही.)
हे वाक्य अवांतर आहे.
ज्या धाग्यावर "माझी भूमिका अशी अशी आहे" हे असं साधार मांडून दाखवलं गेलं आहे,
तिथे विधानात दुरुस्ती असणं गरजेचं आहे असच म्हटलं गेलं आहे.
आता त्याबद्दलचा तिरकसपणा इथे कशाला ?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
धैर्य आणि अंतर
"जसजसे आपण गुजरातपासून दूर जातो त्या प्रमाणात गुजरात दंग्यांबद्दल लिहिण्यासाठी लागणारे धैर्य वाढत जाते" हा नियम रोचक आहे. वास्तविक नक्राश्रू ढाळणारे जर तुमच्यापेक्षा गुजरातच्या जवळ असतील तर you automatically cease the right to comment. Great!!!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पोलिटीकली करेक्ट
नव्हे. मूळ विधानात आहे तेवढा तर्कदुष्टपणा करण्यासाठी एकतर धैर्य हवं किंवा मूर्खपणा (किंवा दोन्ही)*. वाक्य मूर्खपणाचं म्हणण्यापेक्षा लिहीणाऱ्याला धैर्यशाली म्हणणं माझ्यासाठी सोपं, शिवाय पोलिटीकली करेक्ट. पण तुमच्या प्रतिसादामुळे नंदनच्या या प्रतिसादाची आठवण झाली.
* असा तर्कदुष्टपणा, खरंतर तर्कहीनता विनोद करण्यासाठी वापरतात. 'द अनियन'च्या प्रत्येक बातमीत असा प्रकार असतो. पण तो ठरवून, हेतूतः केलेला असल्यामुळे स्पृहणीय वाटतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
(अवांतर)
वदतो व्याघातः?
की मेटाल्याङ्गविज?
आपल्या मनाच्या तारा जुळल्या
आपल्या मनाच्या तारा जुळल्या आहेत. (किंवा तो खवचटपणाही किती खवचट आणि किती नाही ते तुम्हाला समजलंच.)
--
अंतर कितीका असेना, आपल्या ओळखीतलं, घरातलं कोणी गेलं तरच आपल्याला दुःख होतं, किंवा तेच दुःख खरं, आणि मुंबईतल्या लोकांचं कोणी गोध्राकांडात मेलं नाही (हे तरी किती खरं पण तरीही) म्हणून त्यांचे नक्राश्रू असं म्हणणारा माणूस 'परदुःख शीतल' यापलिकडे मोठा झालेला नाही. या वाक्यामुळे मला लेखकाच्या हेतूबद्दल शंका आहे. त्यापुढे मोदींनी काय स्पष्टीकरण दिलं याबद्दल एक अक्षर न लिहीता (असे तपशील नसल्यामुळे त्या दोघांमधे काही टेबलाखालचं डीलही झालेलं असण्याची शक्यता, हे पत्र वाचून नाकारता येत नाही), मला मोदींनी स्पष्टीकरण दिलं ते पुरेसं आहे म्हणून तुम्हीही ते मान्य करा (कारण माझ्या नात्यागोत्यातले लोक गोध्राकांडात गेले, तुमच्या घरचे नाहीत) असं म्हणतो ते तर आणखी खोटारडं आहे.
मोदी खरंच गोध्राकांडात दोषी का नाही हा प्रश्नच इथे नाही. आणखी एका 'फेकू' समर्थकाची पोपटपंची किती मनावर घ्यायची?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
निरीक्षण रोचक आहे, पण... (शंका)
शारीरिक स्थान ग्राह्य धरायचे, की मानसिक / भावनिक?
गुजरातेत राहणारा माणूस जर मनाने पाकिस्तानात असू शकतो (असे म्हणतात / असा आरोप केला जाऊ शकतो), तर इंग्लंडमध्ये राहणारा माणूस मनाने गुजरातेत का असू शकत नाही? एनारायांनीच नेमका कोणता अश्वमेध केलाय?
बाकी, धाडसाचेच म्हणाल, तर 'सारे जहाँ से अच्छा' आणि 'चीनो-अरब हमारा'१ हे दोन्हीं एकाच हाताने लिहायला आणि त्याचबरोबर हिंदुस्थानातील मुसलमानबहुल प्रदेशांच्या स्वायत्त राज्याची कल्पना प्रतिपादायला२ लागणार्या धाडसाच्या प्रघातापुढे या क्षुल्लक धाडसाचे काय घेऊन बसलात?
========================================================================================================================================================
१ इक्बाल-आवृत्ती. साहिर-आवृत्ती नव्हे.
२ यात निश्चितपणे काही तात्त्विक अंतर्विरोध किंवा विसंगती आहेच, असा दावा नाही. परंतु वरकरणी भासमान होते खरी. असो.
अश्वमेधाबद्दल टाळ्या.
अश्वमेधाबद्दल टाळ्या.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+१
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars