(कॉंग्रेस का हरली?)

शीर्षकाबद्दल -
१. शीर्षक यांपैकी एका चालीवर वाचावे - कोंबडीने रस्ता का ओलांडला किंवा भाकरी का जळली?
२. 'एन्डीए/भाजप/मोदी का जिंकले' असं लिहीण्याइतपत खिलाडूपणा आमच्याकडे नाही.

कोणत्याही युद्धात, भले ते रणांगणात लढलेलं असो, क्रीडांगणावर किंवा मतपेट्यांमध्ये वा जालावर, बडबडबहाद्दूरांना चांगली संधी मिळते. आधी कोण जिंकणार, कोण हरणार याबद्दल आकडेबाजी करायची आणि नंतर का हरले/जिंकले याबद्दल निबंध लिहईत सुटायचं. आता आकडे फेकायची सवय मला नाही, निदान माझी तशी ख्याती नाही. विद्रटपणा घासकडवी (गुर्जीं) ना शोभतो. त्यांना च्यालेंज देत अरुणजोशी (जोशी आहेत ते!) सुद्धा अधूनमधून आकडेवारी देतात. पण माझ्या सदस्यनामात आकडा असला तरी मी आकडेबाजीसाठी प्रसिद्ध नाही. (मुन्नी बदनाम हुई स्त्रीवाद के लिये।) त्यामुळे निकाल लागण्याआधी मी मोठ्या कष्टाने या प्रलोभलावर नियंत्रण मिळवलं. पण निबंध लिहायची खुजली कशी जाणार. तर आता चांगली संधी आहे, आकडे न देता निबंध लिहीत आरोप करत सुटण्याची. (कोण रे ते 'रोज मरे' म्हणतंय? भॉ करते थांबा.)

तर मुख्य विषय असा कॉग्रेस का हरली? मला सुचणारी मुख्य कारणं अशी - (यांचा क्रम मनावर घेऊ नये.)
१. सदस्य अतिशहाणा यांनी एकतर असं सदस्यनाम घेतलं आणि वर स्वाक्षरीत कॉंग्रेसचा प्रचार केला. एकतर त्यांनी सदस्यनाम बदलून गुण्यागोविंद, हृदयमर्दम असं काही घेऊन कॉंग्रेसचा प्रचार केला असता किंवा आहे त्याच नावाने मोदीं*चा प्रचार केला असता तर निर्णयात फरक पडला असता.
२. सदस्य नितिन थत्ते यांनी गांधी घराण्याला जाहीररित्या विठोबाची उपमा दिली. (दुवा मागायचाच असेल तर माझ्याऐवजी थत्ते यांच्याशी संपर्क साधावा.)
३. अगदी शेवटच्या टप्प्यात छद्मसम्राट चिंतातुर जंतू यांनी अतिछद्मीपणा केलाच, शिवाय दुसऱ्या बाजूने सातत्याने हिटलर, मोदी, काहीशे लोकांचं हत्याकांड, कॉंग्रेसचं सरकार असणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात जातीयतावाद आहे अशा प्रकारचे विषय काढले.
४. संख्येने जास्त प्रतिसाद देणाऱ्या सदस्यांवर सातत्याने मोदीपाठींबा जाहीर करण्यासाठी स्वयंघोषित पुरोगाम्यांकडून असह्य दबाव आला. निरूपाय होऊन त्यांना मोदींची बाजू घ्यावीच लागली. याचा परिणाम वाचकांवर झाला.
५. 'ऐसी'सारख्या वाचकप्रियतेचा उच्चांक स्थापन करणाऱ्या संस्थळाने, संस्थळाची राजकीय भूमिका जाहीर केली नाही. याचा कॉंग्रेसला तोटा आणि मोदींचा चिकार फायदा झाला. विशेषतः गुजराथ आणि वाराणसीतून संस्थळावर येणारे हिट्स पाहता, मोदींना या भूमिका न घेण्याच्या भूमिकेचा बराच जास्त फायदा झाला.

या निकालामागे यापेक्षा अधिक कारणं असणार आणि ती आमच्या लक्षात आलेली नाहीत. कृपया प्रतिसादांतून त्यावर प्रकाश पाडावा. 'अच्छे दिन' तर आलेच आता.

*मोदी = भाजप = एन्डीए = देश अशी समीकरणं आणायला कशाला उगाच उशीर करायचा?

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (4 votes)

प्रतिक्रिया

मला एक शंका आहे बरे दिसणारे लोक कमी बुद्धीवान वाटतात का? म्हणजे मला स्वतःला राहुल गांधी दिसायला अथवा कसाही अजिबात आवडत नाही. पण असं ऐकून आहे की काही मुलींना तो चिकना वाटतो ROFL
त्यामुळे तो "चिकना आहे/चॉकेलेट बॉय आहे = मठ्ठ आहे" अशा सर्वसाधारण समजूतीतून काँग्रेस हरली असावी का? आपलं असं उगाचच. ..... जाणकार प्रकाश टाकतीलच म्हणा.
याउलट उग्र व्यक्तीमत्त्वाचे मोदी हुषार वाटले असावेत का?
आता अदितीने धागाच असा काढल्याने या (लघु)शंकेचा निचरा होऊनच जाऊंद्या!!!!

मला एक शंका आहे बरे दिसणारे लोक कमी बुद्धीवान वाटतात का?

आमचं बायको म्हणतं रघुराम राजन चिकणा पण आहे व बुद्धीमान पण.

शशी थरूर आणि ज्योतिरादित्य सिंधीया यांना पंतप्रधानपदाचे दावेदार बनवलं नाही यामुळे कॉंग्रेसचा पुरेसा फायदा झाला नाही असं म्हणता येईल.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शशी थरुरांना चिकनेपणापायी आंतरराष्ट्रीय तोटा झालाय, म्हणून आय्नसीला त्यांना पंप्र-उमेदवार जाहीर करताना रिस्क वाटली असणार.
शशी-शिंदे दोघंही stubble ठेवत नाही, हाही मोठा निकष असू शकतो.

अ‍ॅग्रीड!!! आत्ताच जाऊन इमेज सर्च दिला. चांगले आहेत दिसायला.

मोदी सुद्धा अनेक बायकांना चिकणे आणि सेक्सी वाटतात.

काय सांगता? Smile

सदस्य अतिशहाणा यांनी एकतर असं सदस्यनाम घेतलं आणि वर स्वाक्षरीत कॉंग्रेसचा प्रचार केला.

काँग्रेसला ज्या काही जागा मिळाल्या आहेत त्या अतिशहाणा यांच्या प्रचारानेच मिळाल्या आहेत. अन्यथा आणखी कमी मिळाल्या असत्या.

असा जर तुमचा दावा असेल तर तुम्ही फारच कमी प्रतिसाद देता आणि तुमच्या प्रतिसादाला आणखी कमी प्रतिसाद मिळतो असा निष्कर्ष काढावा लागेल. प्रतिमा सुधारा. (हे 'मोठे व्हा' या चालीवर वाचणे.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

५. 'ऐसी'सारख्या वाचकप्रियतेचा उच्चांक स्थापन करणाऱ्या संस्थळाने, संस्थळाची राजकीय भूमिका जाहीर केली नाही. याचा कॉंग्रेसला तोटा आणि मोदींचा चिकार फायदा झाला. विशेषतः गुजराथ आणि वाराणसीतून संस्थळावर येणारे हिट्स पाहता, मोदींना या भूमिका न घेण्याच्या भूमिकेचा बराच जास्त फायदा झाला.

हेच मला सगळ्यात महत्त्वाचं कारण वाटतं. मोदींनी जाणून घेतलेलं होतं की ही निवडणुक केवळ चौकाचौकातल्या नारेबाजीने नव्हे तर संस्थळासंस्थळावरच्या चर्चांनी फिरणार आहे. त्यामुळे त्यांनी खूप आधीच ऐसीच्या व्यवस्थापनाला अॅप्रोच केलं. गुजरातमध्ये शेतकऱ्यांना दहापट पैसे देऊन मिळवलेली जमीन ऐसीच्या जगड्व्याळ ऑफिससाठी फुकट, ऐसीला पुढच्या वीस वर्षांसाठी करमाफी (टेक्निकली माफी नाही, पण पुढची वीस वर्षं जितका कर होऊ शकेल तितकं कर्ज बिनव्याजी... म्हणजेे माफीच) ऐसीच्या मालकांना फिरण्यासाठी अदानींचं हेलिकॉप्टर, आणि संपादकांना घसघशीत पे पॅकेजेस देण्यासाठी पुन्हा ऐसीला बिनव्याजी, बिनमुदतीचं कर्ज... एवढं केल्यावर मोदींचं म्हणणं न ऐकणं म्हणजे राष्ट्रद्रोहच वाटायला लागला आम्हाला. ऐसीने आपला शब्द पाळला, आता बारी मोदींची आहे. केम मोदीभाय, सामढो छो के नई?

शिवाय (गुजराथ मॉडेलनुसार) संस्थळांतर करायचं असेल तर त्यासाठी स्थानिक कलेक्टरकडून परवानगी आणावी लागेल असा कायदा पास करून घेणारेत संसदेत. ते विसरलात तुम्ही गुर्जी. मी नाही हो विसरणार.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काँग्रेस का हरली?

घोडा का अडला?

भाकरी का करपली?

न फिरवल्यामुळे.

-बॅटबल.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मला वाटत दिग्विजय यांची गर्लफ्रेंड आहे हे समल्यावर लोकं प्रचंड जेलसले आणि मोदींनी बायकोला सोडून दिलय हे समजल्यावर त्यांना मर्यादा पुरुषोत्तमच आठवला. म्हणुन काँग्रेस हरली आणि मोदी जिंकले.
बादवे मला राहुल चिकणा वाटतो आणि उमर अब्दुल्ला, सलमान खुर्शिदपण क्युट्ट आहेत :-).

काँग्रेसने म्हणजे सरकारने(पक्षी: भारत नामक संस्थळ चालकांनी) फक्त आणि फक्त आपलं लक्ष्य डाव्या(थत्ते, अतिशहाणा, गुर्जी, जोशी(हे निदान डावखुरे तरी असावेत)) लोकांवर केंद्रित केलं अगदी नंतर संस्थळीय चिंतन बैठकीत (पक्षी: धाग्यात) सुद्धा त्यांनी उजव्यांना फाट्यावर(अनुल्लेखानं) मारलं, हे असं झालं तर उजव्यांची गर्दी असलेल्या जगात डाव्या चालक/मालकांना ते कितीही क्यूट असले तरी कोण विचारणार? त्यात परत छ्द्मीपणा वगैरे करून उच्चभ्रू टीका करून जमीनीवरच्या(पक्षी: फक्त प्रतिसाद लिहिणार्‍या) लोकांपासून अंतर राखत कॉफिनात खिळे मारले, आता प्रियांकाने येऊन कितीही सारवासारव केली तरी उपयोग काय? शेवटी कुंभार गेला तो गेलाच.

जाता-जाता : अहो मला तर ह्या संस्थळाचे नाव सुद्धा डाव्या हाताने लिहल्यासारखं वाटतयं, उद्या भडकाउ हि श्रेणी जाऊन 'उजवा प्रतिसाद' ही श्रेणी आली तरी मला विशेष वाटणार नाही.

काँग्रेसला गेल्या निवडणुकीइतकीच म्हणजे सुमारे साडेदहा कोटी मतं मिळाली. म्हणजे काँग्रेसने जे टारगेट ठेवलं ते अचीव्ह झालं असावं.

प्रॉब्लेम इतकाच झाला की दरम्यानच्या काळात ८-१० कोटी मतदार वाढले तेवढं ते विसरून गेले. गलतीसे मिष्टेक हो गया. Biggrin

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वरच्या लिस्टमधे बाकीचे सर्व कसे दिसतात ते माहित नाही पण नितिन थत्ते कट्ट्यावरील फोटोंमधे अगदी हॅन्डसम वाटतात. त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य दिसणार्‍या
सदस्यांनी जेलसीने कमळाला मतदान केले.

'कोण कमळा ?' हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण थत्त्यांचा हॅन्डसमपणा, फोटोतल्या इतरांचा तौलनिक नॉनहॅन्डसमपणा नि त्यांच्या आपापल्या राजकीय निष्ठा, इ. गोष्टी या खासगी गोष्टी निवडणूकीत दावणीस लागल्या. तसेही, या धाग्यावर क्यूट दिसण्यावरून अत्यंत गहन मौजमजा चालू आहे, या पार्श्वभूमीवर हा प्रश्न ऐरणीवर आणणे महत्त्वाचे ठरते.
- (यादीत वा फोटोंत नसलेला) तमुक (तटस्थ + अमुक)

काँग्रेसच्या जुन्या खोडांना तंत्रज्ञान नीट वापरता आले नाही म्हणून.
अन्नसुरक्षेपेक्षा मोबाईल फोन जास्त महत्त्वाचा आहे हे त्यांना कळले नाही. थरुर आणि दिग्विजयसिंग भलत्याच गोष्टी ट्विटत राहिले.

मिडियाबाजीत आम आदमी पार्टीवाले काही फार मागे नव्हते.
फक्त मिदियाबाजीपेक्षा अजूनकाहीतरी आहे; काय आहे नक्की ठाउक नाही.
धर्मांध पिसाटांचं ध्रुवीकरण झालय की विकास आपल्यापर्यंत न पोचल्याचा पब्लिकचा संताप आहे की अजून कशाकशाची गोळाबेरीज आहे त्याचा विचार करतोय.
२००४मध्येही मिडियागिरी करण्यात , इंडिया शायनिंगवाले - फील गुडवाले लै पुढं होते; तरी ते थोबाडावर आपटलेच.
फक्त भाजपची मिडियागिरी एवढेच कारण नसावे असे वाटते.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मग बहुतेक दिग्विजयसिंग आणि थरुर यांनी दुसरी लग्ने/लफडी केल्याने व शिवाय त्याबद्दल ट्विट करून भुकेल्या भारतीयांना जळवल्यानेच काँग्रेस हारली.
त्याउलट मोदींचे ब्रह्मचर्य अनेक मजबूर व एकभार्याग्रस्त लोकांना जवळचे वाटले असेल. Wink

एकभार्याग्रस्त!
शब्द आवडण्यात आला गेल्या आहे. दाते शब्दकोश, मोल्सवर्थ शब्दकोशांत याची भर घालण्यासाठी ऐसीतर्फे लॉबीइंग करण्यात येईल.

"एकभार्याग्रस्त" बद्दल ऐसीकरहृदयसम्राट राजेश घासकडवी यांच्याशी सहमत.

भारताला स्वातंत्र्य २०११* मधे मिळाले. डावे, सेक्यूलर, पुरोगामी, सिडोसेक्यूलर, इ इ जनतेला मूर्ख बनवून ८०% वेळ देशावर राज्य केले. मध्यंतरी बॅटमॅन, मी, मनोबा इ इ ची छोटमोठि सरकारे आली नि गेली पण मेघना, अदिती, चिंज, घासकडवी, सचिन, तेजा, अतिशहाणा, थत्ते, इ इ इतका वाईट प्रकार चालवला होता कि दुसर्‍या पक्षाचे सरकार जाऊ द्या, उल्लेखनीत विरोधी पक्ष बनेना. बरे, असेना का, भारताचा दर्जा बकवासच. मग जून २०१३** मधे अरुणजोशी या सितार्‍याचा जन्म झाला. त्याला मे २०१४*** पर्यंत कडवट अवहेलना झेलावी लागली, परंतु पहिल्यांदा भारतात प्रतिगामी सरकार स्थापन झाले. चवताळलेल्या पुरोगाम्यांना (बहुतेक वेळा) डोके थंड ठेऊन चारी मुंड्या चित केले. आजही तथाकथित पुरोगामी लॉबीचा संशयगंड तिथेच आहे, उलट त्यांना सद्हेतूबद्दलच शंका आहे, परंतु पुरो वा प्रति गामिता बाजूला ठेऊन देशाचे उत्थान होईल अशी आशा उत्पन्न झाली आहे.

* १९४७
** १९९१
*** आज

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मौजमजेचा धागा आहे ना?

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आयला म्हणजे मौजमजा करायचे बंधन आहे का? कॉंग्रेसचा सेक्युलरिझम असा सारखा उघडा पडत असतो म्हणून काँग्रेस हारली.

वाकई आज मौज का दिन है.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सोप्पय ! काणकी कॉंग्रेस निवण्णूकीला उभी होती . आणीबाणी लादली असती तर असा सपाटून मार खावा लागला नसता .
काणकी पप्पूकडे खॉकी हॉप्प्याण्ट नव्हती . सोनियाला संतोषी मातेची आरती तोंडपाठ नव्हती . मनमोहनला संता बंताचे विनोद येत नव्हते . वगैरे .

क्युट्ट क्युट्ट म्हणूनही त्या चिकण्या राहुलची १० वर्षे वाट पाहिली तरी राहुल आम आदमीलाच महत्त्व(भाव) देत राहिला, आआपने तर नावातही फक्त आदमीलाच स्थान दिलंय हे पाहून सर्व आम औरत यांनी मोदींसारख्या 'संभाव्य' बॅचलरला मते दिली. एकदा का स्त्री शक्ती एकवटली की मग बाकीचे पाचोळ्यासारखे उडून जातात हो की नै मुन्नी आपलं अदिती?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला प्रियंका क्यूट वाटते, पण ती पंतप्रधानपदाची उमेदवार नव्हती म्हणून मी काँग्रेसला मत दिलं नाही.
माझ्या एका नाशकातल्या मैत्रिणीला छगन भुजबळ क्यूट वाटतात (अहो ज्याची त्याची जाण समज वगैरे) पण ती आता नाशकात नसते तर यूएसमध्ये असते. म्हणून भुजबळ हरले.
माझ्या एका पुण्यातल्या मैत्रिणीला अनिल शिरोळेपेक्षा दीपक पायगुडे हँडसम वाटला, पण ती अमराठी आहे. शिवाय ती भारती विद्यापीठात शिकायची. म्हणून तिनं शेवटी शिरोळेंनाच मत दिलं.
माझ्या २ गे मित्रांना दाढीवाले केसाळ पुरुष आवडतात म्हणून त्यांनी मोदींना मत दिलं (तसंही त्यांना एकमेकांशी किंवा मोदींशी किंवा कुणाशीच लग्न करण्यात फारसा रस नाही. त्यामुळे ३७७ला त्यांचा विरोध नाही)
माझ्या ओळखीत कुणालाही केजरीवाल क्यूट वाटले नाहीत.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

का कोण जाणे पण मला "क्यूट" आणि "च्युत" या दोन शब्दांमध्ये साम्य वाटते.

फडतूस डायलॉग @ नगरिनिरंजन.
आवडला नाही. मचाकवर शोभला असता, इथे नाही.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

गैरसमज होतोय. हे वाचा.
विचार बदला, देश बदलेल; एकटा मोदी कायकाय करणार? (हा अत्यंत पाण्चट ज्योक मारायचा चान्स दिल्याबद्दल धन्यवाद Wink )

Biggrin Biggrin

>> माझ्या २ गे मित्रांना दाढीवाले केसाळ पुरुष आवडतात म्हणून त्यांनी मोदींना मत दिलं (तसंही त्यांना एकमेकांशी किंवा मोदींशी किंवा कुणाशीच लग्न करण्यात फारसा रस नाही. त्यामुळे ३७७ला त्यांचा विरोध नाही)<<

माझ्या गे मित्रांना राष्ट्राची नाडी सापडलेली आहे ह्याचा ढळढळीत पुरावा!

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझ्या मते, भा. ज. प. जिंकल्यामूळे काँग्रेस हरली असावी.... Biggrin

*********

उतनाही उपकार समझ कोई जितना साथ निभाए |
जनम मरन का मेल है सपना, ये सपना बिसरा दे |
कोई ना संग मरे ...

माझ्या तर मते निवडणूक झाली म्हणून काँग्रेस हरली. शिंची निवडणूक झालीच नसती तर .......

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कैच्या कै बोलता थत्ते. काँग्रेस होती म्हणून हरली, नसतीच तर कशी हरली असती?

क्षाँक्ष्रेक्षक्षुक्ष्क्ष क्षाक्षक्ष

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भारी आहे धागा, आणि प्रतिसादही! Biggrin

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

http://whycongresslost.in/

हे कारण आहे कॉग्रेस हरण्याचं. एपीक आहेत काही कोट्स!

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

See, there is a tendency to look at India as a country.

काय बाबा, या राहुलला काय म्हणायचं असावं काही अर्थ काढता येईना.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Dalit community 'needs the escape velocity of Jupiter' to achieve success.

या वाक्याचा अर्थ कोणी मला सोप्या मराठीत समजावून सांगू शकेल काय? मला तरी यात कोठेतरी प्रचंड निरर्थक गॉबलडीगूक दडल्याचा भास होतो.(कॉलिंग ऐसीकर रेसिडेंट पदार्थवैज्ञानिक...)

--------------------------------------------------------------------------------------------------------

"It's like Shakespeare. Sounds great, but does not mean a thing." - P.G. Wodehouse.

चाललेला विनोद दुर्लक्षून गंभीर प्रतिसाद देतो आहे. मोदी जिंकले कारण त्यांची दूरदृष्टी. गेली अनेक दशकं गुजरात्यांनी भारतभर आपलं वास्तव्य वाढवलं. मोदींनी बरोबर वेळ निवडून उमेदवारी जाहिर केली. एकून मतांच्या किती टक्के गुजराती मतं होती याच्या कोणी हिशेब केला आहे का? असेल तर पहा.

जाता जाता, थोड्याच वर्षात एखादा गुजराती अमेरीकेवर, पक्षी जगावर, राज्य करेल असे भाकीत वर्तवतो.

-Nile

आणि काल कोणीतरी म्हणत होता की मुसलमानांची संख्या झपाट्याने वाढते आहे की ते भारतावर राज्य करतील. Blum 3

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काँग्रसची चक्क ऐसीला 'कारणे शोधा' नोटिस आली आहे वाटतं. पुढच्या निवडणुकीचे काँग्रेसचे प्रचार काँट्रॅक्ट ऐसी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे काय?