लग्नानंतरही मुलगी माहेरच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग - स्वागतार्ह निर्णय

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

अनेकांना माझा प्रतिसाद आक्षेपार्ह वाटला. तो तसा वाटण्याचा आणि प्रतिसाद/श्रेणी अशा माध्यमांतून व्यक्त होण्याचा त्यांचा अधिकार मान्यच आहे. हा प्रतिसाद फक्त माझ्या भूमिकेची संगती उलगडून सांगण्यासाठी आहे.

अन्यायाविरोधात लढताना शस्त्र म्हणून परिणामकारक असो नसो, विनोदाला (जरी ते प्रसंगी शिष्टाचारांना सोडून देणारे किंवा अभिरुचीहीन वाटले, तरी) त्याची म्हणून एक जागा असते, अशी मांडणी मी पूर्वी 'हुकुमशहांना विनोदाचं वावडं का असतं?' ह्या लेखात केली होती. प्रसंगी बोचरं किंवा जहाल वाटेल अशा लिखाणालादेखील (कृतीला नव्हे) अशी जागा असते असंही मी मानतो. ह्याचे अनेक परिचित दाखले देता येतील. 'सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?' असा सवाल टिळकांनी उठवणं हे वसाहतवादाचे बळी म्हणून आपण टिळकांच्या (आणि एक समाज म्हणून आपल्याही) बाणेदारपणाचं लक्षण मानतो. म. फुल्यांचं जातीयवादाविरोधातलं लिखाण चांगलंच धारदार आहे. ताराबाई शिंद्यांचं पुरुषी वर्चस्ववादाविरोधातलं 'स्त्री-पुरुष तुलना'सुद्धा बोचरं आहे.

आरक्षणासारख्या 'अफर्मेटिव्ह अॅक्शन'ला एक सवर्ण उदारमतवादी पुरुष म्हणून माझा तत्त्वत: पाठिंबा अाहे. 'पूर्वीच्या अन्यायासाठी आज कुणाला तरी झुकतं माप देणं ही असमानता आहे' अशी भूमिका मी घेत नाही. तद्वत, अन्यायग्रस्तांचं प्रातिनिधित्व करणाऱ्या बोचऱ्या, जहाल वक्तव्यांना त्यांची जागा देणं हेदेखील मला त्या उदारमतवादी भूमिकेशी सुसंगत वाटतं. अशा वेळी ते जहाल वक्तव्य करणारी व्यक्ती स्वत: अन्यायग्रस्त आहे का, हे पाहणं मला पटत नाही. त्या वक्तव्यांनी प्रश्न सुटायला मदत होत नसते हे (हुकुमशहांवरच्या विनोदाप्रमाणे) मान्य करूनच ती जागा मी देऊ इच्छितो.

सगळं काही गोड गोड असताना उदारमतवादी असणं सोपं असतं. अशा प्रकारच्या जहाल वक्तव्यांना सामोरं जाताना मात्र तुमच्यातल्या उदारमतवादाची कसोटी लागते असं मला वाटतं. समोरचा पायरी सोडतो तेव्हा तुम्ही कसे वागता? तुमचा तोल ढळू देता की तो सांभाळून त्याचा प्रतिवाद करता? हे पाहण्यात मला रस असतो. माझ्या मते माणसं निरखायला आवडणाऱ्या कुणालाही हे वेधक आणि प्रसंगी उद्बोधक ठरू शकतं.

इथे ह्या धाग्यावर आणि त्या अनुषंगानं इतर धाग्यांवर अनेकांनी आपला तोल ढळू दिला. त्यातले अनेक मराठी संस्थळांवरचे दिग्गज म्हणता येतील असे होते. स्त्रियांनी त्याची दखल घेतली, तर त्याबद्दल 'तुम्ही बायकाच आहात; त्यांच्याच बाजूनं बोलणार' अशी भूमिका घेतली जाऊ शकते. म्हणून, एक उदारमतवादी पुरुष ह्या नात्यानं त्याची दखल घेणं मला गरजेचं वाटलं. ही दखल व्यक्तिगत टिप्पणी म्हणून घेतली जाणं मला अभिप्रेत नव्हतं. त्यामुळे मी कुणाचंही नाव घेतलं नाही. कुणाच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद न देता मी तो मुख्य धाग्यावर दिला त्यामागेही हे कारण होतं. आताही मी माझ्याच प्रतिसादाला प्रतिसाद देतो आहे. 'स्वत:ला उघडे पाडणारे', 'विचारप्रवर्तक' किंवा 'विचारात पाडणारा' ह्यापेक्षा 'लढवय्या', 'अतिरेकी वाटावं असं टोक गाठणारे' ही विशेषणं माझ्या मते अधिक जोरकस आहेत. तरीही, माझ्या वक्तव्यात जो अतिरेक ज्या बाजूनं असण्याचा अारोप झाला, किंवा त्यात 'कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट' असण्याचा किंवा तो अशिष्ट असण्याचा जो आरोप झाला तो मला पटला नाही. (किंबहुना, उद्बोधकच वाटला!) वर म्हटल्याप्रमाणे माझी ही भूमिका माझ्या उदारमतवादाशी मला सुसंगतच वाटते. बाकी निर्णय मी वाचणाऱ्यावर सोडून देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

एकूण..

१. आपण अधिकार मान्य करता
२. आपण दखल घेता.
३. आपण या, त्या आणि तशा आणि अशा अश्या सर्व मतांना त्यांचीत्यांची जागा देता. (एव्हरीथिंग इन प्लेस अँड प्लेस फॉर एव्हरीथिंग)
४. आपण अ किंवा ब किंवा क किंवा ड असं बरंच काही करत नाही. (करणं टाळता)

हे सर्व उदारमतवादी आणि बॅलन्स्ड व्यक्तीला शोभत असणारच..पण इज दॅट ऑल अबाउट डीबेट ?

पण या सगळ्याच्या उपर स्पष्ट मत एका कोणत्यातरी बाजूचं खणखणीतपणे आणि पुन्हा समजावायला न लागेल असं देता की नेहमी फक्त पंच किंवा निरीक्षकाची मध्यमवादी भूमिका घेता? तराजूचा पिव्हॉट ही एक अत्यंत सुरक्षित आणि निरिक्षक-फ्रेंडली जागा आहे..

पण मग यातून आपल्याला "विचारात पाडणारी" काही मतं दिसली तरी त्या विचारात पडण्याचा आउटकम चर्चेच्या दृष्टीने काय? तो तपशिलात वाचायला मिळाला तर काहीतरी सार्थ ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका तद्दन खवचट व जजमेंटल प्रतिसादाची तुलना टिळक, ताराबाई शिंदे, इ. लोकांच्या लेखनाशी करणं हे उदा. गटणेस्टाईल रोचक (टाळू-गंडस्थळ-न्याय) आणि तितकंच उद्बोधक वाटलं. जर अशी भूमिका कुणाच्या उदारमतवादाशी सुसंगत असेल तर तो उदारमतवादही तितकाच उद्बोधक वाटला. इतकं अर्थनिर्णयन बर्‍यापैकी स्वयंस्पष्ट आहे असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>किंवा स्वतःला उघडे पाडणारे

हे विशेषण पुरुषांवर अन्याय होतोय असा सूर लावणार्‍यांच्या प्रतिसादाविषयी आहे की पन्नासच्या दशकाच्या पुढे काही प्रगती झालीच नाही असा स्टॅण्ड घेऊन प्रतिसाद देणार्‍यांविषयी आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुळात "स्वतःला उघडे पाडणारे (लोक)" हा शब्दप्रयोगच एकूण अदरवाईज वावरताना एक मुखवटा धारण करणारे, ढोंगी वरकरणी दाखवण्याचे दात वेगळे असलेले कोणीतरी , आणि त्यांचे खरे, आतले रुप या कारणाने "उघड" झाले अशा अर्थाचा वाटतो. अनेक पूर्वग्रहदूषित गृहीतके धरणारा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अन्यायाविरोधात लढताना शस्त्र म्हणून परिणामकारक असो नसो, विनोदाला (जरी ते प्रसंगी शिष्टाचारांना सोडून देणारे किंवा अभिरुचीहीन वाटले, तरी) त्याची म्हणून एक जागा असते. प्रसंगी बोचरं किंवा जहाल वाटेल अशा लिखाणालादेखील (कृतीला नव्हे) अशी जागा असते असंही मी मानतो.

तत्त्वतः अशी लेखनपद्धती मला तरी योग्य वाटते.
------------------------------
आपल्या प्रतिसादात अन्याय, त्याचे वर्णन, लढा, त्याचे वर्णन इ थोडे आढळले असते तर तो स्वतःला इतरांपेक्षा वरच्या पायरीवर बसवण्याचा प्रयत्न म्हणून पाहिला गेला नसता. सद्य स्वरुपात सबब प्रतिसाद वरील तत्त्वाच्या निकषात बसतो का हा प्रश्न आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अन्यायग्रस्तांचं प्रातिनिधित्व करणाऱ्या बोचऱ्या, जहाल वक्तव्यांना त्यांची जागा देणं हेदेखील मला त्या उदारमतवादी भूमिकेशी सुसंगत वाटतं. अशा वेळी ते जहाल वक्तव्य करणारी व्यक्ती स्वत: अन्यायग्रस्त आहे का, हे पाहणं मला पटत नाही. त्या वक्तव्यांनी प्रश्न सुटायला मदत होत नसते हे (हुकुमशहांवरच्या विनोदाप्रमाणे) मान्य करूनच ती जागा मी देऊ इच्छितो. सगळं काही गोड गोड असताना उदारमतवादी असणं सोपं असतं. अशा प्रकारच्या जहाल वक्तव्यांना सामोरं जाताना मात्र तुमच्यातल्या उदारमतवादाची कसोटी लागते असं मला वाटतं. समोरचा पायरी सोडतो तेव्हा तुम्ही कसे वागता? तुमचा तोल ढळू देता की तो सांभाळून त्याचा प्रतिवाद करता? हे पाहण्यात मला रस असतो. माझ्या मते माणसं निरखायला आवडणाऱ्या कुणालाही हे वेधक आणि प्रसंगी उद्बोधक ठरू शकतं.

इथे ह्या धाग्यावर आणि त्या अनुषंगानं इतर धाग्यांवर अनेकांनी आपला तोल ढळू दिला. त्यातले अनेक मराठी संस्थळांवरचे दिग्गज म्हणता येतील असे होते. स्त्रियांनी त्याची दखल घेतली, तर त्याबद्दल 'तुम्ही बायकाच आहात; त्यांच्याच बाजूनं बोलणार' अशी भूमिका घेतली जाऊ शकते.

असं म्हणत,

म्हणून, एक उदारमतवादी पुरुष ह्या नात्यानं त्याची दखल घेणं मला गरजेचं वाटलं.

पुढे असं म्हणणं आपल्या धाग्यावरील वर्तनाशी (म्हणजे स्वतःच्या या विषयावरील मतांशी) विसंगत आहे. स्त्रीयांना समाजात जे करावं (घर सोडणे, नाव बदलणे, इ इ) लागतं ते मला (पुरुषाला) करावं लागू नये म्हणून त्यांचेपुढे चार शेंगदाणे (माझे शब्द) टाकणेच मी पसंद करतो असं तुम्ही वारंवार म्हणाला आहात. स्त्रीयांना जे करावं लागतं ते अयोग्यच असेल तर ते त्यांना करावं लागू नये असा निकाल कोर्टाने देऊ नये असेही तुम्ही म्हणाला आहात.

सबब आपण उदारमतवादी नाहीत आणि आपल्याला खर्‍या अर्थाने दखल घेण्यात रस नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अगदी हाच प्रतिसाद आठवला..

मला हे बदल सहन करणं असह्य ठरेल म्हणून त्यापेक्षा अथवा त्याबदल्यात कायदा दुसर्‍या बाजूला झुकला तरी मला चालेल.. अशा आशयाचं ते विधान..

म्हणजे अन्यायग्रस्तांना भरपाई म्हणून समानता आणण्याच्या नादात माझ्यावर तोच त्रास सहन करण्याची वेळ येऊ नये, त्याऐवजी अन्य काही वसाहतीचे स्वराज्य देणारे किंवा वेगळ्याच काही दिशेतले छोटेमोठे फायदे देणारे त्या अन्यायग्रस्तांच्या बाजूचे कायदे आले तरी चालेल..

Smile

कारखानदारांना त्रासदायक आणि खर्चिक ठरणारे, तोशीष देणारे मूलभूत बदल कारखाना-यंत्रणेत करणे नको म्हणून कामगारांना कर्णहानी भत्ता, त्यांच्या मुलांना शाळा इत्यादि "कामगार कल्याणाचे" बाकी उपाय मान्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठ्ठो!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्त्रियांनी त्याची दखल घेतली, तर त्याबद्दल 'तुम्ही बायकाच आहात; त्यांच्याच बाजूनं बोलणार' अशी भूमिका घेतली जाऊ शकते.

किमान ऐसीवर तरी जवळजवळ सार्‍याच स्त्री आयडी "केवळ त्या स्वतः स्त्री आहेत म्हणून" स्त्रीयांच्या बाजूची भूमिका घेताना मी एकदाही पाहिलेलं नाही. जनरली जे लॉजिक ते स्वतःला लावतात ते पुरुषांना लावायला तयार असतात असं पाहिलं आहे. इथे कोणत्याही चर्चेत स्त्री विरुद्ध पुरुष असा रंग नसतो असे मानून मी तरी चर्चा करत आलो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ठ्ठो!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>>स्वतःला निष्पक्षपातीपणाचे निकष लावण्याची तसदीही न घेता, पुरोगामी लोकांनी मात्र सदासर्वकाळ खुल्या मनाचे, तटस्थ, भावनाविरहित, निष्पक्षपाती असलेच पाहिजे अशा अपेक्षा धरणार्‍या छुप्या ट्रोलांचा मी जाहीर निषेध करत आहे

ठ्ठो !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आता कोणी कोणाला काय कारणासाठी ठ्ठो !!! म्हटलेय हेच कळेनासं झालंय. :~

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिग्नेचरहोल्डरलाच ठ्ठो केले आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणार्‍या लोकांनाही लायसेन्स टु पक्षपातीपणा पाहिजे असेल तर तो पुरोगामीपणा तथाकथितच ठरणार नाही का? अन एकदा का तथाकथित पुरोगामीपणा आला तर यांच्या बिरुदावलीला कोण कशाला हिंगलेल? एकीकडं म्हणायचं आम्ही पुरोगामी अन दुसरीकडं पक्षपातीपणाही करू म्हंजे दांभिकपणा नै तर काय आहे ते कुणीतरी सांगा बा एकदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काश्मीरच्या थंडीत थोडं डोकं शांत नाही झालं का रे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

सनबर्न झाला (अजून त्यातून सावरतोच आहे), डोकं कसलं थंड होतंय भेंडी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला प्रथम दिलेल्या प्रतिसादात(मेघनाने, मेघनेने, मेघनाबाईंनी, मेघनाबाईने, मेघनाताईंनी, मेघनाताईने, भुस्कुटेबाईंनी, भुस्कुटेबाईने, भुस्कुटेताईंनी, भुस्कुटेताईने, मेघुने, ...जे काय त्यांना सर्वात म्हणून घ्यायला आवडत असेल ते...) ठ्ठो लिहिलेले मी वाचलेच नाही. मी फक्त ती रंगबिरंगी सहीच वाचली आणि चर्चा कोठे चालली आहे त्याबद्दल सॉलिड कंफ्यूज झालो.
--------------
अगदी आतादेखिल तो 'अजोंच्या' प्रतिसादाला 'मेघनाचा' प्रतिप्रतिसाद असल्याने ठ्ठो म्हणजे आवडले का आवडले नाही हा संभ्रम आहेच! कारण ऋषिकेशचा ठ्ठो निगेटिव असतो. मनोबाचा पॉझिटीव असतो. मेघनाचा हा पहिलाच आहे, म्हणून झेपला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ठ्ठो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अन्यायग्रस्तांचं प्रातिनिधित्व करणाऱ्या बोचऱ्या, जहाल वक्तव्यांना त्यांची जागा देणं हेदेखील मला त्या उदारमतवादी भूमिकेशी सुसंगत वाटतं. अशा वेळी ते जहाल वक्तव्य करणारी व्यक्ती स्वत: अन्यायग्रस्त आहे का, हे पाहणं मला पटत नाही.

भुमिका कोण मांडतं आहे ह्याबद्दल फारसा आक्षेप कुणास नसावा, असल्यास(एखाद/दुसरे उदाहरण) त्याकडे दुर्लक्ष करता यावे.

पळशीकरांचा लेख, अवधुत डोंगरेंचा लेख, अनंतमूर्तीचे विधान, व इंटूक लोकांची जालावरची/प्रेसमधली भुमिका पहाता बोचर्‍या, उपहासपूर्ण भुमिकांना जास्त महत्त्व येऊ लागले आहे काय असे वाटले, अर्थात त्या बोचर्‍या अभिव्यक्तीला एक स्थान नक्कीच आहे पण ते विषयाला धरून आणि लेव्हल प्लेयिंग फिल्डवर(सर्वाना समजेल आणि त्याच भाषेत बोलता येईल) आहे किंवा नाही हे बघणे गरजेचे आहे असे वाटते अन्यथा अर्थाचा अनर्थ होण्याचा संभव अधिक.

किंवा त्यात 'कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट' असण्याचा किंवा तो अशिष्ट असण्याचा जो आरोप झाला तो मला पटला नाही. (किंबहुना, उद्बोधकच वाटला!)

तुम्ही (तुमच्या भुमिकेला अनुकूल नसलेल्यांवर) धाग्याचा विषय सोडून टिका केल्याने तो आरोप झाला, धाग्याबाहेर हे मत मांडले असते तर कदाचीत आरोप झाला नसता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

We never really grow up, we only learn how to act in public.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रौढत्वी निज शैशवास जपणे, बाणा कवींचा असे.

----------------------------------------------------

(अवांतर: याचे वरिजनल / पूर्ण चरण कोणी देऊ शकेल काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उघडे पडलेल्यांनी , उघड्यांना पाहणार्‍यांनी अवश्य वाचावे असे काही :-

http://www.psyfitec.com/p/the-big-list-of-behavioral-biases.html
.
.
.

http://en.wikipedia.org/wiki/List_of_cognitive_biases

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पाने