व्यवस्थापकः या आधीचे २०१४मधील बागकामाचे धागे: १ | २ | ३ | ४
=====
अदितीला सांगितलं होतं की नवीन धागा सुरू कर म्हणून...
पण जोजोकाकू बहुतेक झोपा काढतायत आपला जेटलॅग घालवायला! :)
म्हणून मीच आता हा नवीन धागा सुरू करतोय...
तर स्प्रिंग आला...
चमेलीचा वेल बहरलाय कुंपणावरती.
चिनी गुलाब
अजून...
खरे गुलाब...
एकच झाड, पण वेगळे रंग...
माझा विशेष आवडता, पिवळा गुलाब...
खरा सुगंधी लाल गुलाब. याचा घरगुती गुलकंद केलाय पूर्वी. मस्त लागतो...
तर सारांश काय मंडळी,
आता घ्या खुरपं हातात!!!!
:)
ओ जोजोकाकू
जरा मदत करा. फ्लिकरवरनं फोटो टाकलेत पण इथे आले नाहियेत. काय करता येतं का बघा प्लीज...
डु मज्जा! तुफान आलाय
जोजोकाकू बड्डे श्रमाने झोपल्या बहुधा. बदल केलाय. डु मज्जा! :)
तुफान आलाय बहर!
==
अवांतर:
सध्या बहुतांश झाडांना अप्रतिम बहर आहेला दिसत होता. बहावा नुकताच फुलू लागलाय पण सोनमोहोर, जॅकरँडा, शेवरी, शिरीष वगैरे झाडे तुफान बहरलीएत
रादर होती. फोटोही काढायचे ठरवले होते पण.. या विकांताच्या पावसाने सगळा मोहोर/बहर गळलाय! :(
थॅन्क्यू ऋषिकेश! पण तू नक्की
थॅन्क्यू ऋषिकेश!
पण तू नक्की काय केलंस (किंवा खरी प्रोसेस काय आहे फोटो लोड करायची) ते जरा व्यनि करशील का प्लीज?
कदाचित मी काहितरी चूक करत असेन...
अजून बरेच फोटो टाकायचे आहेत इथे यावर्षीच्या शेतीचे...
:)
तुम्ही दिलेल्या युआरएल
तुम्ही दिलेल्या युआरएल उघडल्या त्यावरून फोटोची URL शोधली. फोटोची URL साधारणतः jpg / png अश्या एक्सटेन्शनने संपणारी असते.
मग आधी तुम्ही दिलेले सगळे ट्याग उडवले ;)
नी ऐसीवर प्रतिक्रीया/लेखन देतेवेळच्या चौकटीत डावीकडून दुसरा आयकॉन आहे ('सुरयोदया'चा) त्यावर क्लिकवले आणि तिथे एकेक फोटोची युआरएल टाकली.
झालं!
==
तुम्हाला संपादन म्हणून टॅब दिसत असेल तिथे जाऊन नक्की काय केलंय ते अधिक लक्षात येईलच
ओके आणि धन्यवाद. मी यापुढे
ओके आणि धन्यवाद.
मी यापुढे लक्षात ठेवीन...
काकाश्री, अच्छे ग़ुल खिलाए हैं
काकाश्री, अच्छे ग़ुल खिलाए हैं आप ने!! ;-)
दोन आठवड्यापूर्वी सध्या घरी
दोन आठवड्यापूर्वी सध्या घरी दुधाच्या क्रेटमध्ये क्रेटभर मेथी लावली होती. (फोटो नंतर डकवेन)
मेथी दाणे पेरल्यावर सागरमेथी (बारीक असते ती) येते असे दोघांनी सांगितले होते. पण नॉर्मल नेहमीचीच मेथी उगवली आहे.
विकांताला ती स्वाहा होईल! मग नवी लागवड काय करावी असा विचार चाललाय
नाही रे.
मेथीचे दाणे पेरले की उगवणारी मेथी ही मोठ्या जुड्यावालीच असते. माझा तरी तसाच अनुभव आहे. ती पिटुकली मेथी हा वेगळाच प्रकार आहे बहुतेक.
मेथीची आणखी एक ट्रि़क म्हणजे सगळं झाड उपटून न टाकता फक्त वरचा शेंडा ठेवून खालची पानं काढत रहायची भाजीला. नवीन पानं येत रहातात. रोपाला फुलं येईपर्यंत (म्हणजे ३-४ वेळा)असं करता येतं. एकदा फुलं आली की मग चव जाते, मग रोपं उपटायला हरकत नाही...
ओह! हे बरं झालं
ओह! हे बरं झालं सांगितलंत!
तसही मेथीला पाणी घालणे (आणि कुरवाळणे ;) ) ही कामे माझी मुलगी (३ वर्षे) आवडीने करते आहे. तिला केव्हाची पाने खुडायची आहेत. आता लावतो कामाला ;)
==
अवांतरः
गेल्या वर्षीपासून मिनिएचर/कुंड्यातले का होईना बागकाम करू लागल्यापासून तिलाही त्यात खूपच मजा वाटू लागली आहे. बी पेरून रोज पाणी घातले की, कशी छोटी छोटी झाडं येतात, मग त्यांना फुलं येतात मग त्यांना खायचं असं चक्र तिला खूप आवड्तं. कधी कधी तर झाडांशी बोलतेही ती :)
अरे तोच खरा आनंद
अरे तोच खरा आनंद असतो...
माझ्या मुलाला स्ट्रॉबेरीज भयंकर आवडतात. म्हणून तो असाच ३-४ वर्षांचा असतांना मी पहिल्यांदा एक स्ट्रॉबेरीचा पॅच लावला. त्याला ते प्रकरण अतिशय आवडलं. नेहमी नजर ठेऊन असायचा. पिकलेली लाल स्ट्रॉबेरी तर खायचाच पण अर्धपिकी स्ट्रॉबेरीही (आपल्या अहमदाबादी बोरांसारखी चवीला लागते) खायचा. त्या स्ट्रॉबेर्या खाण्यासाठी खारी ससे वगैरे आले की त्यांच्या अंगावर दुडूदुडू धावून जायचा! आणि ओरडायचा,
"गो अवे! इट इज नॉट फॉर यू, इट्स माईन!!!!" :)
आता मोठा झालाय. त्याला म्हंटलं की आता हा स्ट्रॉबेरीचा पॅच काढून टाकून तिथे दुसरं काहीतरी लावूया. पण मला तो पॅच काही काढू देत नाही!!
..एम्प्रेस गार्डन
छान आहे बाग तुमची.
माझ्या कडचा कढीपत्ता अगदी जगतो का मरतो वाटत असताना आता दोन तीन मोठे कोंब येऊन छान पाने येऊ लागली आहेत. घोसाळ्याचा वेल मोठा होतोय पण फुले फुलण्या आधीच पिवळी पडत आहेत. ऊन जास्त होत असावे, माती कमी पडत असावी किंवा आणि काही.
---
बागेबद्द्ल असल्याने इथे लिहिते. गेल्या रविवारी एम्प्रेस गार्डन मध्ये (पुणे) फेरी मारली. अनेक वृक्ष सध्या बहरत आहेत तर काहींचे बहर ओसरून फळे धरली आहेत. तिथे पाहिलेले काही:
टेमरू - फुले आणि फळे
रोहीतक - फळे (अतिशय सुंदर दिसतात- हिरव्या कोंदणात तीन लाल-केशरी बीया)
मुचकुंद - फुले
शिरीष - फुले आणि गेल्या बहरातील शेंगा
कुठलेलसे ऑस्ट्रेलियन झाड (नाव विसरले) - केशरी फुलांचा बहर
वेल कांचन - पांढरी सुंदर फुले
महागनी - नवीन पालवी
किनई - पांढरट पिवळे खोड (पाने वगैरे फार वर असल्याने नीट दिसली नाहीत; पण खोड सगळ्या झाडांमध्ये उठून दिसते)
पर्जन्य वृक्ष - फुले
वावळ - काही दिवसांपूर्वी पोपटी फळांनी लगडलेली होती, आता फळे वाळून वार्यावर उडत आहेत; नवीन पालवी
सीता अशोक - लाल फुलांचे गुच्छ आणि कोवळ्या शेंगा (आणखीन एक थोडे वेगळे लाल फुलांच्या गुच्छाचे झाड पाहिले पण नाव माहित नाही त्याचे)
शीसम - पांढरी बारीक फुले
रिठा - नवी पालवी आणि फळे
पिचकारी / आफ्रिकन ट्यूलिप - फुले अजूनही काही झाडांवर आहेत पण फळेही दिसू लागली आहेत
काटेसावर - फळे (फुलांचा बहर थोडा ओसरला आहे आता)
कडुनिंब - फुले आणि पालवी
...
एम्प्रेस गार्डन मध्ये बर्याच झाडांच्या पाट्या गायब आहेत किंवा कधी लावल्याच नसाव्या. ओळखता न येणार्या झाडांना पाटी नसते...आणि गुलमोहोर, आंब्याच्या मात्र प्रत्येक झाडावर पाटी. 'नो एन्ट्री' असलेलाही बराच भाग आहे...तिथे कुंपणातील भोकांमधून तरूणांची टोळकी येजा करताना दिसली. बाग बघताना या गोष्टी रसभंग करतात. फीडबॅक दिला आहे त्यांना.
पुणे विद्यापीठात देखील यातली बरीच झाडे पहायला मिळतील.
आभार.. छान माहिती आहे. किनई
आभार.. छान माहिती आहे.
किनई हे नाव नेहमी विसरतो :)
बाकी आमच्या कुंडीतील कढिपत्ता आजवर अनेकदा असा आता-मरतो-का-जगतो स्टेजला येऊन पुन्हा बहरला आहे :) तेव्हा ही नेहमीची सायकलच असावी असे वाटते.
ही कडीपत्त्याची बहरण्याची
ही कडीपत्त्याची बहरण्याची वेळच आहे, थोडा शेणखताचा डोस दिला तर जिवात जीव येईल! आणि मधून मधून थोडे पातळ ताक पाण्यात मिसळून द्यावे - चव सुधारते असे सगळे तमिळ मित्र-मैत्रिण म्हणतात.
ताकाची ट्रिक आमच्याही तमिळ
ताकाची ट्रिक आमच्याही तमिळ नातेवाईकांनी सांगितल्याने आमच्या इवल्याशा कढिपत्त्यावर ताक-पाण्याचा इतका मारा झाला की मातीवर सफेद थर दिसू लागला. आधी वाटले ताकातील स्निग्धांशाचा उन्हाने वाळलेला चुरा असेल, मग लक्षात आले बुरशी येऊ लागली आहे :)
मग प्रमाण पंधरवड्यातून एकदा केले.
होय, चवीत फरक पडतो. (त्यावेळी काही काळ असा होता की नवी पालवी छान वासाची होती. धीर धरवेना. पण जुनीच पाने आधी तोडणे भाग असल्याने एकदा कडिपत्त्यांची चटणी केली आणि मग लगेच थोडी नवी खुडली ;) )
घोसाळ्याच्या वेलाचा एखादा
घोसाळ्याच्या वेलाचा एखादा फोटो टाका की. मला वाटतं मी चुकून पडवळच्याच एका प्रकाराला घोसाळं म्हणत आलीये.
गेले दोन महिने येथील "पॉलाश" आणि "शिमुल" फुलांच्या बहराला ऊत आलाय - येता जाता एखादं फूल डोक्यावर पडलं तर चांगलाच दणका बसतो.
पळस
होय...पळस महिन्यापूर्वी ऐन बहरात होता. 'शिमुल' म्हणजे बहुतेक 'शाल्मली' म्हणजेच काटेसावर...लिंक्स उघडत नाहीयेत त्यामुळे खात्री करता आली नाही.
घोसाळ्याच्या (घोसावळे असा उच्चारही ऐकलेला आहे) वेलाचा फोटो काढला की डकवीन. घोसाळी वर दिलेल्या फोटोत (अनूप ढेरे) आहेत त्यापेक्षा थोडी वेगळी दिसणारीही
असतात- आकार साधारण सारखाच पण पांढरे पट्टे नसलेली मी जास्त पाहिली आहेत.
इंग्लिशमध्ये झुकिनी म्हणतात
इंग्लिशमध्ये झुकिनी म्हणतात ती घोसाळीच का?
नाही झुकिनी वेगळी...रूचीने
नाही झुकिनी वेगळी...रूचीने लिहिलं आहे की घोसाळे म्हणजे 'स्पाँज गोर्ड'. मी पाहिलेली आहेत ती अशी दिसतात:
फोटो आंतर जालावरून घेतला आहे.
गिलके असे पॉप्युलर नांव
गिलके
असे पॉप्युलर नांव महाराष्ट्राच्या बर्याच भागांत वापरतात.
स्पाँज गोर्ड
घोसाळे म्हणजे स्पाँज गोर्ड, नवर्याने हौसेने बिया मागवून घरात रोपे बनवायला घेतली आहेत त्याची आमच्या झोन ४ (खरंतर ३च) मधे! आता सहा महिने उष्ण हवा लागणारे रोप इथे लावायच्या अट्टाहासाला भाबडा आशावाद म्हणायचा की नाकावर आपटवणारा खुळा आत्मविश्वास हे कळेलच लवकर :-)
घोसाळे वेल
हा पहा घोसाळ्याचा वेल; पाने साधारण १२-१३ सेंटीमीटरची आहेत आकाराने.
सुंदर!!
सुंदर!!
कढीपत्ता
माझ्याकडे कढीपत्ता अजिबात जगत नाही. :(
आजवर अनेक रोपं (आणि पैसे) फुकट घालवले....
आमच्याकडे न म्हणता माझ्याकडे म्हणतोय कारण इथून एक १५ मैलांवर माझ्या एका अमेरिकन मित्राचं घर आहे आणि त्याच्या साल्याच्या आवारात कढीपत्त्याचा भलामोठा वृक्ष आहे!
त्याला त्याचा काहीही उपयोग नाही. मीच स्वयंपाकाला जरूर पडेल तशी त्याच्याकडून पानं घेऊन येतो, झालं!!!
देव पण बघा, नको त्याच्यात नेऊन घालतंय!!!
:)
कढीपत्ता
माझ्याकडे काही वर्षांपूर्वी कढीपत्त्याचं एक रोप होतं. त्याची कधी पूर्ण पानगळ झाली नव्हती....छान पानं असायची नेहमी. ते एका मित्राला शहर बदलताना भेट दिलं कारण लांब पल्ल्याच्या प्रवासात आणि मूवर्सच्या गोडाऊनमध्ये ते राहू शकलं नसतं. हे नवीन रोप आहे ते माझ्याकडे आणून वर्षही झालं नाहिये, त्यामुळे त्याची वार्षीक सायकल माहिती नाही. पण थोडी वेगळी असावी. ऋषिकेशकडे आहे ते रोप ह्या रोपा सारखं पानगळीच्या सायकल मधून जाणारं असावं.
तुम्हीही परत प्रयत्न करा कधीतरी...मित्राच्या झाडा शेजारी उगवलेलं एखादं रोप असेल तर लावून पहा.
त्याला त्याचा काहीही उपयोग
उगवला कढिपत्ता दारी, पाने का जाती पिडाघरी?
उगवे कढीपत्ता अमेरिकनाच्या
उगवे कढीपत्ता अमेरिकनाच्या दारी,
त्यास तयाची किंमत नसे खरी...
तडके, सांबार सर्व पिडांकाकी करी,
मग का न जावी पाने पिडांघरी?
:)
पि•डा/फोटो आणिबाग आवडली,
पि•डा/फोटो आणिबाग आवडली, ऋता++ माहितीछानच
आहा- सुंदर! स्वत:च्या
आहा- सुंदर! स्वत:च्या बागेतल्या गुलाबांचा गुलकंद म्हणजे खासच असेल चव.
चमेलीच्या मागे डावीकडे सेज चा प्रकार आहे का? चमेलीचा रंग मस्त आहे.
फळं-भाज्या काही लावणार आहात का? तुमचा झोन कुठला आहे - घरात रोपं तयार करावे लागतात का सरळ जमिनीत बिया पेरता येतात?
आमचे हिवाळ्याचे टोमॅटो-वांगी अजून जोरात आहेत, पण आता उकाडा वाढल्यामुळे वाळायला फार दिवस नाही. इतके दिवस, अगदी पार एप्रिल पर्यंत चालतील असं वाटलं ही नव्हतं!
जानेवारीत उन्हाळ्याच्या भाज्या लावल्या - लाल भोपळा, दुधी, पडवळ (यात आणि घोसाळ्यात नेमका फरक काय?), दोडका, काकडी, कारली, आणि भेंडी. एक काकडीची वेल उन्हाळ्याच्या स्ट्रोकने कोमेजून गेली, दुसरी अजून जीव धरून आहे. बाकीच्या वेली छान वाढताहेत, बरीच फुलं आलीत पण अजून फळं नाहीत. उद्या- परवा फोटो टाकते.
जाई-जुई-मोगरा देखील मस्त वाढताहेत.
सगळ्या भाज्या कुंड्यांमधे टेरेसवर असल्याने नेमके पाण्याचे प्रमाण किती असावे हे कळत नसल्याने थोडा त्रास होतोय. कधी सकाळ-संध्याकाळ, कधी दोन दिवसातून एकदा. त्यावर या अवकाळी पावसाने गोंधळ घातलाय.
अलिकडे एका मैत्रिणीने हे पुस्तक मला भेट दिले. नवशिक्यासाठी सुरुवात म्हणून ठीक आहे, अगदी बेसिक माहिती आहे. वेगवेगळ्या भाज्यांच्या हायब्रिड प्रजातींबद्दल, खतांच्या प्रकारांबद्दल बरीच माहिती आहे.
पडवळ (यात आणि घोसाळ्यात नेमका
नाशिक मधे ज्या भाजीला आम्ही गिलके/की म्हणत असू त्याच भाजीला पुण्यात काही भागात आणि सांगली/सातार्या कडील लोक 'घोसाळं' म्हणतात. त्यामुळे पडवळ आणि घोसाळं ह्या दोन्ही अगदी वेगळ्या भाज्या असं माझा अनुभव तरी सांगतो.
परवाच ऑफिसातील एकीने सांगितलं की गिलक्याला त्यांच्या भागात (भाग : परभणी) 'पारशी दोडका' म्हणतात :)
हे घोसाळं ऊर्फ गिलकं हा पडवळ
हे घोसाळं ऊर्फ गिलकं
हा पडवळ
ढेरे, गिलक्याचा फोटो चुकीचा
ढेरे, गिलक्याचा फोटो चुकीचा आहे.
"पारशी दोडका" हा धोंडोपंत
"पारशी दोडका" हा धोंडोपंत जोशांबरोबर बेन्सन जॉन्सन कंपनीत कामाला असावा असं वाटतं! :-)
हो, इतके दिवस माझाच गैरसमज झाला होता. गिलके हे नाव पहिल्यांदाच ऐकले.
चमेलीच्या मागे डावीकडे सेज चा
चमेलीच्या डावीकडे ती फिकट हिरवी पानं म्हणताय का? ती पानं हवाईयन पेरूच्या झाडाची आहेत. बाकीचं गडद हिरवं आहे ते ग्राऊंड कव्हर आहे...
चमेलीचा रंग तर आहेच पण त्याहुन घमघमाट सुटलाय. आमच्या घराच्या बेडरूम्स त्या बाजूला येतात. रात्री खिडकी उघडी ठेवली की नुसता सुगंध परिमळत असतो या दिवसांत....
आमचा झोन ११-१२ याच्या मधला येतो. फळं काही नवीन लावणार नाही, माझ्याकडे अगोदरच खूप फळ्झाडं/वेली लावलेल्या आहेत. पीच, पेअर, सफरचंद, लिंबू, प्लम, डाळिंब, हवायन पेरू वगैरे दर वर्षी फळं देतात. स्ट्रॉबेरी, रास्पबेरीचे पट्टे आहेत. द्राक्षं, पॅशनफॄट वगैरेचे वेल आहेत.
भाज्या लावणार/ लावल्या आहेत. मुख्यतः काकडी, मिरच्या, टोमॅटो, स्क्वॉश वगैरे नेहमीचे यशस्वी खेळाडू!!
मी तयार रोपंही वापरतो आणि काही बियांपासून बनवतोही. विशेषतः यावेळेस कलिंगड आणि खरबूजाची रोपं तयार करण्याचा प्रयत्न आहे, बघू येतात का रुजुन ते! ही आधी पॉटमध्ये रोपं उगवून घेऊन नंतर मग जमिनीत लावतो. पण मेथी, मोहरी, कोथिंबीर, हरभरा वगैरे सरळ जमिनीतच पेरतो....
वा, काय बाग आहे!
काय मस्त बाग आहे तुमची!
ज ळ ज ळ! झोन १२ आहे मग काय रोज मटाराची उसळ आणि शिकरण, मजा आहे :-)
आम्हा पामरांना जमीनीत थेट काही पेरायचे म्हणजे मे च्या अखेरीपर्यंत थांबावे लागते. सुदैवाने यावर्षी इथे हिवाळा तुलनेने सौम्य होता त्यामुळे जरा लवकर सुरुवात करता येईल. तोपर्यंत रेज्ड बेड्स बनविणे, रोपे घरात सुरु करणे असले फुटकळ बागकाम करायचे. हे वर्ष नवीन घरात पहिलेच असल्याने इथे टिकू शकतात अशी थोडी सास्काटून बेरी, सफरचंद, हनी बेरी (यांचा स्वाद अगदी गोड करवंदांसारखा असतो) अशी फळझाडे लावायचा विचार आहे.
पुन्हा ज ळ ज ळ! हे सगळं लावायचं आहे मलाही पण जूनमधे. हरबर्याला पेरणीपासून दाणे धरायला किती आठवडे लागतात?
ही सर्व रोपे मीही घरात बनवायला घेतली आहेत शिवाय यावर्षी गवार, वांगी आणि भेंडीही लावून पहाणार आहे. मागच्या वर्षी गाजरे, श्रावणघेवडा, मटार आणि बटाटे चांगले आले त्यामुळे तेही लावायचे आहे पण थेट जमीनीत लावायचे म्हणजे अजून महिनाभर तरी किमान थांबावे लागेल!
मग काय रोज मटाराची उसळ मटार
मटार लावली आहे पण आत्ताशी रोपं उगवताहेत. अजून बॉक्स कंटेनरमध्येच आहेत...
बेरीज लवकर येतात पण जर सफरचंद, पेअर वगैरे फळझाडं लावायची असतील तर लवकरात लवकर लावा. कारण त्यांना चांगली वाढुन फळं धरायला ४-५ वर्षेही लागतात.
गवारीचं बी कुठे मिळालं? मलाही हवं आहे....
देशी बियाणे
देशी बियाणी इथे मिळतात. मी ऑनलाईनच मागवली होती, दोन-तीन आठवड्यात मिळाली.
अनेक धन्यवाद. बुकमार्क करून
अनेक धन्यवाद.
बुकमार्क करून ठेवला आहे.
मी यंदा "सहज सीड्स" या
मी यंदा "सहज सीड्स" या बंगलोरस्थित देशी बीजरक्षण संस्थेकडून मागवले. ८०% च्या आसपास जर्मिनेशन! बिया फारच चांगल्या निघाल्या. फक्त एका पुडीत वांग्याच्या बिया होत्या (म्हणजे त्यावर लेबल होतं, आणि वांग्याच्या बियांसारख्या दिसणार्याच होत्या), त्या लावल्या तर हे उगवलं:
वांग्यासारखी पानं दिसत नाहीयेत, आणि नेमकं कुठलं झाड आहे हे कळेना. अगदी वेगळ्याच प्रकारचं देशी वांगं असल्यास माहित नाही, फुलं आली की थोडा उलगडा होईल अशी आशा आहे. :-)
देशी बीजरक्षण संस्थेने पाठवली
देशी बीजरक्षण संस्थेने पाठवली असल्याने कदाचित ती 'पुराणातली वांगी' (वानगी) असावीत!!!
;)
देशी बीजरक्षण संस्थेने पाठवली
चिं वि जोश्यांच्या चिमणरावमधला एक प्रसंग आठवला. चिमणरावला तब्येत सुधारण्यासाठी डॉक्टरने अंडी खायला सांगितलेलं असतं. तो लपवून लपवून खातो, पण त्याच्या आईला ते कळतंच. मग ती वैतागून घर सोडून जाताना म्हणते 'मी जाते कशी इथून. मग तुम्ही खुश्शाल कोबडीचीच काय पण गोमातेचीही अंडी खा हवी तेवढी!' त्याच धर्तीवर आजकाल देशात चाललेलं गोरक्षणाचं कार्य पाहिलं तर देशी बीजरक्षण संस्थेने पाठवलेली बीजं गोमातेचीसुद्धा असू शकतील!
अरे व्वा. ऐसी वर असेही काही
अरे व्वा. ऐसी वर असेही काही धागे असतील हे माहीतच नव्हत. बागकाम हा माझ्याही खूप आवडीचा विषय आहे. आम्ही हि ग्यालरी मध्ये छोटीशी बाग तयार केलीये. किचन गार्डन संदर्भात आणखी काही नवी माहिती असेल कोणाकडे तर सांगावी.
गवती चहा
गवती चहा वेगाने वाढावा यासाठी काय करता येईल? मी एका कुंडीत ग.च.चे ३ कंद लावलेत सहा महिन्यापूर्वी. ग.च.ला पाणी जास्त लागतं असं ऐकून काळी, पाणी धरून ठेवणारी माती वापरली. रोज पाणी घालतो, बर्यापैकी सावलीही आहे. तरीही आमच्या गचची मजल ४ पात्यांच्या पुढे काही जात नाही. असे का बरे?
गवती चहा वेगाने वाढावा यासाठी
गवती चहा वेगाने वाढावा यासाठी काय करता येईल?
गवती चहा ला पाणी जास्त लागत पण कदाचित याच कारणामुळे प्रमाणापेक्षा जास्त पाणी होत असेल पाण्याचे प्रमाण कमी करा.
रोज १ ग्लास पाणी घाला. चंगली वाढ होईल
आँ?
गवती चहाला खरं तर वेगळं असं काहीच करावं लागत नाही. फार भसाभसा वाढणारी वनस्पती आहे ती.
माझ्याकडचा गवती चहा तर वेळोवेळी छाटून लहान करत रहायला लागतो...
पिडा काय फोटो आहेत एकेके.
पिडा काय फोटो आहेत एकेके. एकाहून एक सरस.
ट्रेलर
हा तर फक्त ट्रेलर आहे! खरा पिक्चर तर पुढेच आहे!! :)
गेल्या वर्षी मला या बागकामाच्या धाग्यांवर येईपर्यंत खूप उशीर झाला होता. बहुतेक सीझन संपला होता. आता यावेळेस सुरवातीपासून आहे...
बरं झालं काका धागा काढलात ते.
बरं झालं काका धागा काढलात ते. तुमच्याकडची फुलझाडं फोटोत तरी दिसली.
आमच्याकडे सगळं गॅलरीतलं बागकाम. मर्यादित जागा, मर्यादित झाडं. या वर्षीपण मी बाझिल बरंच लावलंय. पेस्तो आम्हाला दोघांना फार आवडतो. शिवाय भोपळी मिरची आणि टोमॅटोची रोपं आणून लावल्येत. वांग्याच्या पेरलेल्या बिया फुकट गेल्या असं दहा दिवसांनंतर वाटलं, पण आता पहिली दोन पानं आल्येत.
गेल्या वर्षी केलेलं कंपोस्ट अर्ध्याधिक संपलं. उरलेल्यात पुन्हा कचरा टाकायला सुरूवात केली.
गेल्या वर्षी हे उद्योग रोचनाच्या धाग्यानंतर, जून अखेरीस सुरू केले होते. या वर्षी मार्चच्या मध्यात. गेल्या वर्षीपेक्षा जरा जास्त खायला मिळेल अशी आशा आहे.
मेथी :)
मस्त!
आणि ती छोटी रोपं काय कोथिंबिरीची आहेत काय?
होय कोथिंबीर आहे.
होय.. काहितरी करताना धणे कुटणे चालले होते. मुलगीही तिथेच होती.
"याच्यातून पण येतं झाड?"
"हो, येतं की कोथिंबीर येते"
मग ती काही न बोलता तिच्या मुठीत मावतील इतके धणे उचलून तुरूतुरू धावत गेली नी त्या कुंडीत टाकून आली :)
त्यातले काही रुजलेत.
मस्त...मी एकदा मेथी लावली आणि
मस्त...मी एकदा मेथी लावली आणि फुले-फळे येई पर्यंत थांबले. मग फार जून मेथी खावी लागली.
हा क्रेट तुम्ही कुठून आणला/मिळवला ? क्रेट्ची उंची किती आहे ?
क्रेट मला माझ्या काकूने दिला,
क्रेट मला माझ्या काकूने दिला, तिच्या घरी पडिक होता - तिला कसा मिळाला विचारून सांगतो.
इंची साधारण १०एक इंच असावी. दूधवाल्यांकडे सकाळी सकाळी बाहेर पिशव्या ठेवलेले क्रेट असतात ना त्यातलाच एक आहे.
क्रेटमधे माती घालण्याआधी काही
क्रेटमधे माती घालण्याआधी काही लाइनिंग दिलं का? छिद्रांचं काय केलं? मी सुद्धा पालेभाज्या लावण्यासाठी अशा क्रेट्स शोधत होते. पण इथल्या फळवाल्याने एकेका क्रेटचे ३०० रु सांगितले! मग नाद सोडून दिला.
मातीच्या कुंड्यांचं वजन नको असल्यास "ग्रो बॅग्स" हा एक पर्याय आहे. मी पहिल्यांदाच वापरतेय, चांगल्या वाटतायत.
मेथीचं आयुष्य फार नसेल
मेथीचं आयुष्य फार नसेल त्यामुळे लायनिंग दिलं नाही.
क्रेटला आधीच काही चिरा होत्या, त्यातून अतिरिक्त पाणी घातले तर वाहून जाते. दुधाच्या पिशव्या थंड असल्याने त्याचे बाष्प/पाणी वाहून जायला ती रचना आधीच केलेली असावी.
मात्र मेथीला दिवसातून एकदाच पाणी घालतोय (माती बर्यापैकी पाणी पकडणारी आहे) त्यामुळे की काय माहिती नाही पण पाणी फार बाहेर येत नाही अगदी थोडे बाहेर येते. पाणी येणे बंद झाले की पाण्याचे प्रमाण थोडे वाधवतो. संध्याकाळी पाणी न देता फक्त पाणी स्प्रे करतो (रादर मुलगी ते करते कारण तिला त्या स्प्रे बरोबर पाण्यात खेळायला आवडते ;) )
रच्याकने, प्लास्टिक घेणारे काही रद्दीवाले असतात त्यांनाही विचारा, शिवाय भंगारवाल्यांनाही. फ्रिज खालचे ट्रे, काही फ्रिजमधील उथळ ट्रे / दुधाचे रॅक वगैरेला क्रॅक गेला की यांच्याकडे ते दिले जातात. माझ्या खाली रहाणार्या एका आज्जींनी कोथिंबीर वॉशिंगमशीनसोबत आलेल्या थर्माकोलच्या कुशनला खाली प्लास्टिक शीट लाऊन (प्लास्टिकला भोकं) ट्रेसदृश आकार केला आहे व त्यात कोथिंबीर नी ओवा लावला आहे.
प्रश्नः मी लहान असताना
प्रश्नः मी लहान असताना मातीच्या कुंडीच्या तळाला एक छिद्र असते असे पाहिले आहे. हे छिद्र कशासाठी असते? आजकाल बाजारात मातीच्या कुंड्यापेक्षा प्लॅस्टिकच्या कुंड्या स्वस्त मिळतात ज्यात असे छिद्र नसते. प्लॅस्टिकच्या कुंडीसाठी ते तसे पाडणे अत्यावश्यक आहे काय?
अधिकचे पाणी वाहून जाण्यासाठी
अधिकचे पाणी वाहून जाण्यासाठी तसे छिद्र असते.
माझ्याकडील कुड्यांना आहे (काही कुंड्यांना ते नीट पडलेले नसते बहुधा किंवा काही अधिक पाणी लागणार्या झाडांसाठी तशा कुंड्या लागत असतील तर कल्पना नाही)
माझ्याकडच्या मोठ्या
माझ्याकडच्या मोठ्या कुंड्यांना खाली पाणी जमा होण्यासाठी ताटली आहे आणि हे प्रकरण एकत्र आहे. तसं काही आहे का?
ते इथे अधिकचं मातीमिश्रित
ते इथे अधिकचं मातीमिश्रित पाणी खालून वाहून कारपेट किंवा हार्डवूड खराब करू नये म्हणून ते ताटलीत जमा करण्यासाठी....
अधिकचे (एक्सेस) पाणी वाहून
अधिकचे (एक्सेस) पाणी वाहून जाण्यासाठी असे छिद्र आवश्यक आहे. नाहीतर जास्त पाणी कुंडीत कोंडून राहून मुळांची हानी होते.
प्लास्टिकच्या कुंड्यांनाही जर आधीच छिद्र नसल्यास ते पाडणे उत्तम.
मला व्यक्तिशः प्लास्टिकच्या कुंड्या आवडत नाहीत. भारताच्या हवेत तर अगदीच नाहीत. उन्हामध्ये त्या लवकर गरम होतात आणि माती ड्राय करतात. टेंपररी काही लावायचं असल्यास प्लास्टिकच्या कुंड्या ठीक आहेत अन्यथा मातीच्याच कुंड्या बेस्ट!
जड असतात, थोड्या महागही असतात पण मला वाटतं की झाडं मातीच्या कुंड्यामध्ये जास्त हॅपी असावीत (हा आपला माझा अंदाज!) :)
+१ उन्हाने प्लॅस्टिकच्या
+१ उन्हाने प्लॅस्टिकच्या कुंड्यांना तडेही जातात.
पण आमच्यासारख्या बाल्कनीत झाडे लाऊ पाहणार्यांसाठी मातीच्या कुंड्या जड होतात. बाल्कनीत इतकं जड काही ठेऊ नये म्हणतात म्हणून मी प्लॅस्टिकच वापरतो.
पॉईंट बरोबर आहे. माझ्या ते
पॉईंट बरोबर आहे.
माझ्या ते बाल्कनीचं ध्यानात आलं नव्हतं...
यंदा उकाड्याच्या मोसमाच्या
यंदा उकाड्याच्या मोसमाच्या भाज्या पहिल्यांदाच लावून पाहतीये - भेंडी, पडवळ, काकडी, दोडका, भोपळा, दुधी, वगैरे. सगळ्या कुंड्या गच्चीवर असल्यामुळे पॉलिनेशन नीट होत नाहीये, बरीच छोटी फळं न वाढताच कोमेजून जाताहेत. काही फुलझाडं शेजारी ठेवलीयेत, पण फारसा उपयोग झालेला दिसत नाही. निसर्गाला थोडी ए-आर-टी मदत करावी लागणार आहे असं दिसतंय. वर पाण्याचे प्रमाण थोडे चुकल्याने एक काकडीच्या रोपाचा निरोप घ्यावा लागला. पण आज भेंडी बघून फार आनंद झाला.
सीझनची पहिली भेंडी:
चिमुकला दोडका आणि भोपळा:
पडवळाची सुंदर फुले:
वॉव! त्या भेंडीची लवही इतकी
वॉव! त्या भेंडीची लवही इतकी तरतरीत दिसत्येय! भेंडी, आयेम इन लव ऑफ दॅट भेंडी! :P
==
ते दोडकं आहे का शिराळं?
मला पडवळही आवडतो. फुलं आजचं पाहिली.
===
या वेलींना किती जागा लागते?
आत्ताच पडवळ-घोसाळ्यातला गोंधळ
आत्ताच पडवळ-घोसाळ्यातला गोंधळ दूर झाला आणि आता हे शिराळं काय काढलंयस बाबा? माझ्या (लिमिटेड) ज्ञानानुसार तर हा दोडकाच आहे!
वेलींना चढायला, पसरायला उन्हातली चांगलीच जागा लागते. भोपळा, दुधी तर भरभर वाढून पसरतात. मी गच्चीवर भक्कम नारळाच्या दोर्या लावून "मचान" तयार केलंय.
हे शिराळे. याला बाहेरून शिरा
हे शिराळे. याला बाहेरून शिरा असतातः
आतून बर्यापैकी दोडक्यासारखेच फक्त किंचित अधिक दडस असते.
आम्ही त्या शिरा काढून वाळवून त्यांची चटणी करतो. येकदम खतरनाक लागते.
मी याला पाहून दोडकाच म्हटलं
मी याला पाहून दोडकाच म्हटलं असतं! ही वेगळी प्रादेशिक नावं आहेत, का दोन्ही वेगळ्या प्रजाती आहेत?
माझ्या समजुतीप्रमाणे, घोसाळे
माझ्या समजुतीप्रमाणे, घोसाळे = गिलके (वर पडवळांच्या बरोबर दिलेला दुसरा फोटो). शिराळे = दोडके (ऋनं दिलेला फोटो).
अजून काही नावं असतील, तर तीही येऊ द्यात. :प
कालपासून गिलके शब्द वाचला की
कालपासून गिलके शब्द वाचला की भाऊसाहेबांच्या बखरीतले गिलचे आठवतायत. उगाच घोड्यांवर बसलेले, हातात लांबलांब घोसाळे घेऊन चढा देणारे दाढीवाले गिलचे डोळ्यासमोर येतायत.
+१
हो की! दोडका व शिराळे एकच
हो की! दोडका व शिराळे एकच :) सॉरी!
आमच्या घरी दोडका शब्दच वापरला जात नाही. घोसाळे व शिराळे असे म्हटले जाते . ज्याला शिरा असतात ते शिराळे, अन्यथा घोसाळे :)
विश्वकोशात ही माहिती मिळाली:
+१
अगदी अगदी. नुकत्याच पेरलेल्या भेंडीच्या रोपाला अशा भेंड्या कधी येतील याची स्वप्ने पहातेय :-)
डुप्रकाटाआ
डुप्रकाटाआ
ती भेंडीच्या कुंडीत उपडी
ती भेंडीच्या कुंडीत उपडी बाटली कशाला आहे? बहुधा यावर मागे चर्चा झाली होती. विसरलो :(
मुळांपर्यंत थेट पाणी पुरवठा
मुळांपर्यंत थेट पाणी पुरवठा करण्याचा तो एक प्रयोग आहे. कुंडीत माती घालतानाच बाटलीच्या टोपणाला दोन-तीन बारीक छिद्रं देऊन ती कुंडीत उपडी ठेवली. त्याच्या बुडाला (म्हणजे आता वर असलेल्या बाजूला) भोक पाडून त्यातून पाणी घातले जाते. दोन लिटरची बाटली असल्यामुळे पाणी हळूहळू मातीत जाते, आणि रोज देण्याऐवजी दोन दिवसातून एकदा देता येते. माझ्या एका मैत्रिणीने केलेला प्रयोग पाहून केला, पण माझा प्रयोग थोडा फसलाय, कारण एकतर पाणी कधी भसाभसा जाते, कधी अडकून बसते; छिद्रांमधे माती अडकते. वर रोपं लहान असताना वरून पाणी घालावेच लागते. म्हणून सध्या बाटली सोडून नेहमीसारखेच वरून पाणी घालतेय.
ही आठवण बरी आत्ताच केलीस.
ही आठवण बरी आत्ताच केलीस. नुकत्या पेरलेल्या वांग्याच्या बियांचे अंकुर आणि मिरचीची आणलेली रोपं लहान आहेत तोवर बाटल्या चटकन अडकवता येतील.
हे उपकरण बघ
वाईनच्या बाटलीचा (रिकाम्या हो!)उपयोग करायचा असेल तर हे उपकरण बघ. बागकामाच्या साहित्याच्या दुकानांत सहज मिळून जाईल.
हाहाहा अन उपकरण आल्यावर ते
हाहाहा अन उपकरण आल्यावर ते वापरण्यासाठी मुद्दाम वाईन आणावी लागेल. हाकानाका ;)
झाडांसाठीतरी आता वाईन प्यावी
झाडांसाठीतरी आता वाईन प्यावी लागणार. नाहीतर मी थोडा डीटॉक्सचा विचार करत होते.
(No subject)
=)) =))
कसली रशरशीत भेंडी आहे. माझा
कसली रशरशीत भेंडी आहे. माझा प्रयोग सध्या एका फुलझाडापुरता मर्यादित आहे. पुढच्या आठवड्यात झिनिया आणि चेरी टोमॅटोची लागवड करणार आहे.
चेरी टोमॅटो आत्ता या मोसमात
चेरी टोमॅटो आत्ता या मोसमात कदाचित चांगले वाढणार नाही. फार उष्ण हवा असली तर फुलं येतात, पण फळं येत नाही - जीवंत राहण्यातच झाडाची सगळी एनर्जी खर्च होते. मुंबईच्या हवामानात साधारणत: सप्टेंबर महिन्यात बिया पेरल्या तर नोव्हेंबर पासून उन्हाळा सुरू होईपर्यंत चांगले पीक यायला हरकत नाही.
ओह..बरं झालं वेळेत कळालं ते.
ओह..बरं झालं वेळेत कळालं ते. थँक्यू.
फळं धरायला किती वेळ लागतो ते
फळं धरायला किती वेळ लागतो ते तपासून पहा. माझ्याकडचे काही टोमॅटो ५५ दिवसांत फळणारे आहेत, काही ७५ दिवसांत. ७५ दिवसवाली जात आत्ता पेरली तरी चालेल.
हेही पाहाते. घरी सध्या
हेही पाहाते. घरी सध्या फेरीवाल्याकडे मिळणारं एक फूलझाड आहे. त्याची मूळ फुले गळून पडलीयेत पण नवीन कोंब आले आहेत आणि साधारण महिना उलटलाय परंतु प्रगती काही नाहीय. त्यामुळे एका झाडावर 'कर्मण्यदाधिकारस्ते' चालू आहे ते दुसर्या झाडासोबत कंटिन्यू करेन.
?
फोड कळली नाही.
टायपो झाला.
टायपो झाला. ’कर्मण्येवाधिकारस्ते’ म्हणायचं होतं. फळाची (फारशी) आशा न ठेवता सध्या झाडाला पाणी घालतेय.
मस्त!
सगळेच फोटो सुरेख आहेत!!
अभिनंदन!!
सुंदर आहेत सगळीच...रोपाला
सुंदर आहेत सगळीच...रोपाला आलेली भेंडी तर फारच आवडली.
दोडक्याच्या शिरांची तेलावर
दोडक्याच्या शिरांची तेलावर भाजून तीळ-कूट-लाल तिखट वगैरे घालून चटणी करतात.
पण काही दोडके इतके निबर असतात ना, की चटणी करावीशीच वाटत नाही त्यांची.
________
येस्स अशीच दिसते -
http://pltambe.blogspot.com/2012/03/blog-post.html
खूप वर्षांपूर्वी रुचीने
खूप वर्षांपूर्वी रुचीने वेगळ्या एका जालीय साइटवर दोडक्याच्या चटणीचा सुंदर फोटो टाकला होता. शिरा न कुटताा लांबलांबच ठेवून सगळे जिन्नस मिसळून केलेली. आजही मी ती चटणी केली की माझ्या डोळ्यासमोर येतो. रुची, आठवतं का?
हा तो फोटो
हा तो फोटो :-)
वा!! खमंग आहे. खूप छान. तीळ,
वा!! खमंग आहे. खूप छान. तीळ, खोबरं, कढीलिंब, मोहरी, कोथिंबीर आहाहा!!!
येस्स! या वेलीला चांगले दोडके
येस्स! या वेलीला चांगले दोडके आले तर अशीच चटणी करणारच.
आमेन
आमेन
अजून काही
दह्याच्या रिकाम्या झालेल्या ६ प्लास्टिक ग्लासेस मध्ये धने पेरले होते. दोन आठवड्यांनंतर एकातून उगवले आहेत. बाकीचे नाही आले अजून तरी.
सांबार कांदे (छोटे असतात ते) मातीत खोचले होते. पाती आहेत पण पुढे काही येणार का त्याला माहित नाही. घोसाळ्याला पहिले मादीफूल फुलले पण नर फुले नाहीयेत त्यामुळे काही होणार नाही पुढे. दोन्ही फुले हवीत एकाच दिवशी.अजून कळ्या आहेत त्यात हा योगायोग जुळून यायची वाट पहाते आहे.पुदिन्याची बरीच छोटी रोपे आली आहेत.
कवडी पाटाजवळ्च्या रानातून अळू आणलं होतं थोड्या मुळांसकट. ते वाढतय आता. खाण्याचच आहे की नाही माहित नाही खात्रीने...असलच तर भाजीचं आहे.
झाडांविषयी थोडे परत. गेल्यावेळी लिहिले ते फक्त एम्प्रेस गार्डन मधले होते, तसे हे नाही; कंसात ठिकाण दिले आहे.
'पुवी' = पुणे विद्यापीठ
रतन गुंज - मोहोर (पुवी)
दुरंगी बाभूळ - फुले दिसत आहेत...पण झाड अलिकडेच फुले असताना पहिल्यांदा दिसले त्यामुळे कधीपासून फुलते आहे माहित नाही (पुवी)
लकूच - पिवळी मादी फुले दिसायला लागलीत झाडावर (पुवी जवळ बाहेर आणि एम्प्रेस गार्डनमध्येही होतं, लिहायचं राहिलं होतं मागच्या प्रतिसादात)
पेपर मलबरी - नर मादी फुलांची वेगवेगळी झाडे फुललेली पहाण्यात आली; हे झाड 'पुवी'तील अॅलिस गार्डनमध्ये फोफावत आहे...इन्वेजिव स्पीशी आहे असे वाचनात आले (पुवी आणि बाहेरही)
कहांडळ - शिवनेरीवर अचानक हा वृक्ष दिसला आणि पडलेली फळे उत्साहात उचलली, बारीक काटे नंतर काढत बसावे लागले हाताचे. झाड निष्पर्ण होते, काही वळलेली फळे तेवढी होती. (शिवनेरी)
अर्जुन - वाळलेली फळे आणि नवी पालवी (नारायणगाव)
करंज - फुले (पुवी आणि त्या जवळच बाहेर)
काळा कुडा - फुले (शिवनेरी)
सालई - फळे, मोजकीच वाळू लागलेली फुले आणि कोवळी पाने (शिवनेरी)
कदंब - फुले (पुवी)
कैलासपती - फुले, वाढलेली फळेही (पुवी)
जांभूळ - फुले (पुण्यात अनेक ठिकाणी)
घोसाळ्याला पहिले मादीफूल
याबद्दल अधिक माहिती लिही ना.
परागण
सॉरी ऋता ऐवजी उत्तर मी देतेय, पण सध्या याचेच प्रयोग चालू असल्यामुळे:
काही झाडांचे नर-मादी भाग (स्टेमेन/केसरदल आणि पिस्टिल/किंजमंडल) एकाच फुलात असतात - टोमॅटो, वांगं, मिर्ची (Solanaceae). त्यांचे परागण एकाच फुलाद्वारे होतं, फुलांवर मधमाशी बसून स्टेमेनमधले पराग सुटे करून पिस्टिलमधे पाडतात (फुलांना गदागदा हलवले तरी तसे होऊ शकते).
पण कुकुर्बिट (Cucurbita) जातीतल्या झाडांची नर-मादी फुलं वेगळी असतात. वर मी मादी-भोपळ्याच्या फुलाचा फोटो टाकलाय. ते छोटंसं फळ ओव्हरी असतं. नर फुलातले पराग या फुलाच्या कुंजकांमधे पडले, तर ते वाढून भोपळा होऊ शकतो. नाही तर तसंच वाळून जातं. त्यामुळे मादी-फुल फुलले असताना नर फुल देखील फुललेले हवे. (मी काढलेल्या फोटोतल्या फुलाचं मी कृत्रिम परागारण केलं, कारण आमच्या टेरेसवर तेवढ्या मधमाशा दिसत नाहीत. पण तरी वाळलं.) एकाच नर फुलाने अनेक मादी फुलांचे परागारण करता येतं.
अगं मला तशी फक्त जुजबी माहिती
अगं मला तशी फक्त जुजबी माहिती आहे. थँक्स रोचना महिती दिल्याबद्दल.
घोसाळ्याला
घोसाळ्याला पेरणीपासून फुले यायला किती वेळ लागतो? घरात पेरलेल्या एकदोन बिया उगवून आल्या आहेत त्यांचे काही भवितव्य आहे का ते तपासायचे होते.
रूची, माझ्याकडे मी बिया
रूची, माझ्याकडे मी बिया पेरल्या त्यानंतर २ आठवड्यांनी त्यातून कोंब आले होते. मग ७-८ पाने आल्यानंतर नर फुले फुलली एक्दोन. तेव्हा मादीफुले आलेली होती पण ती न फुलता बरीच लहान असतानाच पिवळी पडून गळली. मग पानेच जोमाने वाढली...वेल बराच लांब झाला. आता ~३ महिने झाले आहेत पेरल्यापासून. आता मादी फुल फुलले पहिले. नर-मादी फुलांच्या आणखीन कळ्या आहेत. आधी पेक्षा जरा सुदृढ वाटत आहेत.
माझ्याकडच्या दोडक्याचे असेच
माझ्याकडच्या दोडक्याचे असेच झाले. पहिली मादी फुले तशीच कोमेजून गेली. थोडा उन्हाचा ताप ही आहे, पण आमचे एक शेजारी म्हणत होते की झाड थोडे सुदृढ झाले की मादी फुले आपोआप उन्हातही टिकतात, पहिली तेवढी स्वाहा होतातच.
हा विडियो पाहिला.
हा विडियो पाहिला. कडीपत्त्याच्या झाडाबद्दल माहिती. मी कधीच असे छाटले नाही, त्यामुळे माझा कडीपत्ता ताडमाड उंच झालाय. पण आता चार-एक वर्षं झाली, आता सांगितल्यासारखा छाटला तर झुपकेदार होईल का नाही ठाउक नाही.
छान व्हिडिओ आहे आणि पाने हवी
छान व्हिडिओ आहे आणि पाने हवी असतील तर कशी छाटायची ते समजले. पण माणूस फारच धाडसी चंदू आहे, एवढ्याश्या झाडाच्या मोठ्याश्या फांद्या छाटायचा धीर ह्यायला हवा. माझे (घरात) कुंडीत लावलेले झाड चार पाच इंचाचे झाले आहे, उन्हाळ्यात थोडे वाढले की प्रूनिंग करायला हवे.
धाडसी चंदू! आमच्याकडचा
धाडसी चंदू! :ड
आमच्याकडचा कढीपत्ता गेल्या वर्षीच सुकून गेला; कशामुळे ते समजलं नाही. पुरेसं ऊन मिळालं नाही (दिवसाला पाचेक तास) अशी एकच थिअरी सध्या आहे. सध्या वाण्याकडे एक डॉलरला महिनाभर पुरेल इतपत कढीपत्ता मिळतोय, त्यामुळे फार वाईट वाटून घेतलं नाही.
अमेरिकेत कढीपत्ता
हा दुवाही बहुधा उपयोगी ठरावा - http://www.maayboli.com/node/18243