तुमची सध्याची वादग्रस्त मते कोणती? - १
कोणताही विषय चालेल. त्या विषयावरचे तुमचे वादग्रस्त / प्रवाहाविरुद्ध मत कोणते ते थोडक्यात सांगा.
कृपया एका कमेंट मधे एकच मत लिहा. दुसऱ्या मतासाठी दुसरी कमेंट वापरा.
उप प्रतिसादांमधून त्या मतावर चर्चा अपेक्षित आहे.
धन्यवाद.
डुएट असले की पुरुष आणी बाई
डुएट असले की पुरुष आणी बाई च्या नैसर्गीक बेस सुरांमुळे संगीतकारांना प्रॉब्लेम यायचा. बायका काळी चार आणि रफी समजा काळी एक मधे ( त्या रेंज मधे ) ऐकायला चांगला वाटत असेल तर संगीतकारांना गाण्याची चाल अशी लावायला लागत असणार की रेंज दोघांना सुट होईल आणि ऐकायला बरी वाटेल.
लता वरच्या पट्टीत पण गाऊ शकायची म्हणुन तिला माझ्यापेक्षा जास्त गाणि मिळायची असे ( मूर्खासारखे ) विधान मुबारक बेगमचे ऐकले आहे.
बायकांची आणि पुरुषांची
बायकांची आणि पुरुषांची नैसर्गीक पट्टी वेगळी असते.
बायकांची पट्टी ही काळी ४, ५ वगैरे असते, पुरुष काळी १,२ मधे गातात.
जर गाण्याची पट्टी काळी २ ठेवली आणि तारसप्तकातील सुर असतील गाण्यात तर रफीचे गाणे वाईट वाटणार नाही पण स्त्री गायिका कीचाळते आहे असे वाटेल.
विषय संपला
>> ये भी तो हो सकता है की लताबाईंना स्वतःला तारसप्तकात गाऊन "ही पहा माझी ताकद" असं शक्तीप्रदर्शन करावंसं वाटलं असेल. सिस्टिम च्या समस्यांसाठी फक्त सिस्टिम बाहेरचेच जबाबदार असतात असं नाही काही.
>> त्या इतक्या वरच्या सुरात गाऊ शकतात म्हणून हे संगीतकार वरच्या सुरातल्या कंपोझिशन करू शकले असंही शक्य आहे ना?
पण हे सगळं इथे अवांतर आहे. लताबाईंचा कोवळा आवाज संपला तेव्हा माझ्यासाठी लताबाईंचा विषय संपला. :-)
दमदार खर्ज
>> मलाही उषा उतुपचा आवाज आवडतो. (आपल्या आवाजाला, वयाला, शोभेल आणि झेपेल असंच गाते ती. गळ्याखाली त्वचेचा पडदा लोंबताना दिसतानाही 'अनदेखा अनजाना सा, पगला सा दीवाना सा' असं किंचाळू नये हे तिला समजतं.)
मला शमशाद बेगम आणि उमादेवीसुद्धा आवडतात. खरं तर लखनौमधल्या एखाद्या कोठ्यावरून येणारा आवाज असल्यासारखा ह्या बायांचा आवाज होता. त्यामुळे 'पाकीजा'मध्ये वगैरे लताबाईंऐवजी मला अशा गायिका अधिक आवडल्या असत्या.
दूश्ट, दूश्ट, वैट्ट
दूश्ट, दूश्ट, वैट्ट आहात. ही शंका विनोदी वाटली तरी त्यात फार तथ्य आहे असं वाटत नाही.
स्त्रियांच्या आवाजाच्या चर्चेमुळे 'कपलिंग'मधली गंमत आठवली. मारीएला फ्रॉस्ट्रप नावाची ब्रिटीश पत्रकार मालिकेतल्या स्टीव्हच्या स्वप्नातली सुंदरी असते. उगाचच यूट्यूबवर वेळ घालवताना मारीएला फ्रॉस्ट्रपची ही पाच मिनीटांची मुलाखत ऐकली. आणि ही बाई चक्क आवडलीच.
कोवळा
तो कोवळा आवाज असलेली गाणी जरा नीट ऐकायला पाहिजेत. कारण हे संगीतकार ज्या गाण्यांना आम्ही जुनी गाणी समजायचो त्यापेक्षाही आधीचे आहेत (अनिल विश्वास वगैरे). एरव्ही शंकर जयकिशन कडच्या गाण्यांत तिचा आवाज "अॅट रोमॅण्टिक बेस्ट" वाटतो मला नेहमी. अजीब दास्तां है ये सारखी गाणी.
हो ऐकलेली आहेत
हो ती १९६० च्या आधीचीही ऐकलेली आहेत (त्या दशकाला हिंदी चित्रपटसंगीताचे सुवर्णयुग म्हंटलेले ही वाचले आहे). पण नव्याने ऐकायला हवीत, कारण आत्तापर्यंत ती एकदम भिडलेली नाहीत कधी. पण माझा अनुभव असा आहे की एकदम कोणत्यातरी गाण्यांच्या बाबतीत डोक्यातला इतके दिवस बंद असलेला एक स्विच ऑन होतो आणि आपल्याला इतके दिवस ही गाणी कशी भिडली नाहीत असा प्रश्न पडतो. मदन मोहन ची अनेक गाणी मधे अशीच एकदम क्लिक झाली (नैना बरसे, नैनों मे बदरा छाये ई) - त्याला कारण होते तो एक तीन कथानके असलेला हिंदी पिक्चर, ज्यात पुलावरची मुलगी 'लग जा गले' म्हणते. तेथे ते गाणे एकदम आवडून गेले आणि मग मदन मोहन ची अनेक ऐकली.
एस डी बर्मन चा प्रचंड फॅन असूनही मला त्यांचे 'ठंडी हवाए...' हे त्या काळातले गाणे जुने वाटते, पण त्याच चालीवरचे रौशन चे रहे ना रहे हम प्रचंड आवडते. पण त्या जुन्या गाण्यांमधे काहीतरी खजिना आहे, जो डोक्यातला स्विच ऑन झाल्यावरच (किंवा "कान तयार झाल्यावरच") मिळेल असेच दिसते :).
अजून एक
अजून एक प्रश्न म्हणजे लता किंचाळली आहे वगैरे जे वरती लिहीले आहे ते "आता" तसे वाटते, की गेली २-३ दशके जेव्हा ही गाणी रिलीज झाली तेव्हाही तुम्हाला तसेच वाटत होते? त्या त्या काळात फॅशनेबल वाटणारे कपडे जसे नंतर हास्यास्पद वाटतात (हम आपके मधली माधुरी आम्ही तेव्हा बदामशेप्ड गॉगल लावून पाहिली. आता तिचे कपडे, मेक अप वगैरे बद्दल ची टीका वाचली की ती पटते) तसे काहीतरी झालेले नाही ना - म्हणजे आता गेल्या १०-१२ वर्षांत गाण्यांची स्टाईल बदलली, खुद्द लताची गाणी खूप कमी झाली व त्यामुळे आता तिची तीच गाणी आपण ज्या (दुसरा योग्य शब्द सापडत नाही) "कानाने" ऐकतो तशी त्या त्या वेळेस वाटली नसतील. कारण लताचा आवाज आमच्या दृष्टीने ऑरगॅनिकली बदलत गेला. रोज बघणार्याला दिसण्यात/वजनात झालेला बदल सहज जाणवत नाही, तसा :)
लताची एक दुजे के लिये मधली
लताची एक दुजे के लिये मधली गाणी ऐकुन घाबरले होते मी लहानपणी.
माधुरी जेंव्हा चित्रविचित्र ड्रेस आणि गॉगल घालत होती, तेंव्हा सुद्धा ते अतिशय मूर्खपणाचे दिसत होते आणि वाटत होते. माधुरीलाच का समजत नाहीये हा प्रश्न तेंव्हा सुद्धा पडलेला मला आठवतो.
बादवे, सुखविंदर नावाच्या एका गुणी गायकानी एका कार्यक्रमात "सोलाह बरस की बाली उमर को सलाम" हे गाणे बाईं समोर अत्यंत उत्तम प्रकारे गायले होते. ते कुठेही यु ट्युब वगैरे वर मिळत नाहीये :-(
सोला बरस की
सोला बरस की हे माझे अत्यंत फेवरिट गाणे आहे (पिक्चर रिलीज झाला तेव्हा ती सगळी गाणी महाबोअर वाटली होती. नंतर आवडू लागली - मुख्यतः लताची. एस पी कधीच आवड्ला नाही). चित्रीकरण, संगीत, गीतकाराचे शब्द, आवाज सगळेच जमलेले. सुखविंदर म्हणजे चक दे वालाच ना? तो ही मस्त गातो, पण 'दमदार, युथफुल' गाणी त्याची आवडतात जास्त. त्याने हे कसे गायले असेल त्याबद्दल कुतूहल आहे.
१९७५नंतर लताबाईंनी
१९७५नंतर लताबाईंनी स्वेच्छानिवृत्ती घ्यायला हवी होती.
असं. बरं असेल बॉ! आपल्याला गाण्यातलं काही कळत नाही. (जसं मी आयडी बघुन प्रतिसाद आवडतोय की नाही ठरवत नाही तसंच) गाणी कोण गातंय वगैरे लक्षात घेऊन गाणी ऐकत नाही. गाणं गायलेलं आवडतं किंवा नाही! पर से लताबाई(सुद्धा) थोर आहेत इतकं कळतं. का वगैरे ते काय सांगता येणार नाही!
बाकी, ज्याला गायचं त्याने गावं, ऐकायचं त्याने ऐकावं, उगाच स्वेच्छानिवृत्ती घ्याय्ला लाऊन पोटावर का लाथ!? रेडीयो वा टिव्ही चालु ठेवण्याची सक्ती नाही तोवर कोणी काय किती व कधी(पर्यंत) गावं याबद्दल मला काय त्रास होत नाही
आत्मा
आत्म्याला स्वतःचे शरीर नसते, मग पिंड कसा खाणार ? म्हणून तो कावळ्याच्या शरीरात प्रवेश करुन पिंड खातो. त्यानंतर त्याला मुक्ती मिळते म्हणे.
मुक्ती म्हणजे या सूर्यमालेतून असावी. नंतर दुसर्या पृथ्वीसदृश्य ग्रहावर जन्म घ्यायला मोकळा. असा थोडा वैज्ञानिक मुलामा दिला नं, म्हणजे लोकं माना डोलावतात.
आजकाल हॉलीवुडचे चित्रपट
आजकाल हॉलीवुडचे चित्रपट म्हणजे फक्त कॉमीकबुक्स झाले आहेत. व्हीएफेक्सचा प्रचंड चकचकाट , मारधाड अन उगा काहीतरी असावी म्हणून घुसडलेली टुकार स्टोरीलाइन आणी फालतु भावनीकता. त्यामुळे ज्यांना खरोखर ड्रामा आवडतो त्यांना टीवी सिरीअल्स शिवाय आता पर्याय उरला नाही.
माझे अजुन एक वादग्रस्त मत "पॉर्न ओके प्लीज पेशल"
ढुंगणावर रट्टा पडल्यावर तीव्र वेदना झाली अथवा किंकी वाटुन ओर्गेजम मीळाला या न्यायाने ऐसी अक्षरे वरती श्रेणी दान होत असेल तर श्रेणी पध्दत यूजर पुरती डीएक्टिवेट करायची सुविधा का नाहित ? म्हणजे मला तुमच्या श्रेन्या नको तुम्ही माझे प्रतिसाद वाचु नका (कधीच) फ़ेअर प्ले
प्लीज कोणीही भलते अर्थ काढू
प्लीज कोणीही भलते अर्थ काढू नये
हाहा.
माझे मत त्यातल्या हेल्थ ईश्युस, फ्लेश ट्रेडिंग, इ भयंकर गोष्टींना धरून होते. जर कायदेशीर केले तर अॅटलिस्ट ऑन पेपर तरी बऱ्याच गोष्टी रेग्युलेट होतील. आणि काही एन.जी.ओज पुढे आले तर ते लॉज इम्प्लेमेंट करायला मदत करतील.
लिस्ट !
१. धोतर , गोटा , शेंडी नसलेल्यानी बायकांना साडी नेसायचे कुंकू लावायचे मंगळसूत्र घालायचे फालतू सल्ले देऊ नयेत , किंवा अशा लोकांना पकडून त्यांचे टक्कल करून शेंडी ठेवायला लावावी.
२. आपल्या पोरांना किंवा पोरांच्या जनरेशन ला नावं ठेवायच्या आधी स्वतः आपल्या आधीच्या जनरेशनकडून जेन्युईननेस चं शरफीटीकेट आणावं
३. आपण पैशासाठी नाही तर समाधानासाठी नोकरी / काम करतो असं सांगणाऱ्यांनी आपला पगार ज्यन्तेच्या खात्यात जमा करावा.
४. घरी पाहुणे आल्यावर टीव्ही , मोबाईल किंवा तत्सम गोष्टींमध्ये डोकं घालून बसणाऱ्यांची मुंडी छाटावी
५. फालतू आणि भिकार गोष्टींची खोटी स्तुती करणाऱ्यांच्या जिभेवर बिब्ब्याच्या फुल्या उठवाव्यात
६. पाहुण्यांच्या आगाऊ , माजोरड्या , रड्या , हट्टी पोरांना दोन रट्टे देण्याची सवलत असावी
७. रस्त्यावरचे कुत्रे , मांजरी यांच्या बद्दल नको इतके प्रेम असलेल्यानी आपल्या घरी समस्त कॉलनीतल्या प्राण्यांना घेऊन जावे, अगदी साग्रसंगीत जेवण करून त्यांच्या पंगती घरच्या हॉल मध्ये उठवाव्यात नाहीतर एकमेकांवर भुंकत वेळ काढावा.... शिंची आमची कटकट तरी कमी.
------------------------------
लगाव बत्ती!
>> पाहुण्यांच्या आगाऊ ,
>> पाहुण्यांच्या आगाऊ , माजोरड्या , रड्या , हट्टी पोरांना दोन रट्टे देण्याची सवलत असावी
पूर्वी ही फ्यासिलिटी होती. म्हणजे मी लहानपणी असे रट्टे खाल्ले आहेत.
>>आपण पैशासाठी नाही तर समाधानासाठी नोकरी / काम करतो असं सांगणाऱ्यांनी आपला पगार ज्यन्तेच्या खात्यात जमा करावा.
उलटही असू शकेल ना? त्या
In reply to . चिंजं शी या मुद्द्यावर by गब्बर सिंग
उलटही असू शकेल ना?
त्या इतक्या वरच्या सुरात गाऊ शकतात म्हणून हे संगीतकार वरच्या सुरातल्या कंपोझिशन करू शकले असंही शक्य आहे ना?
म्हणजे संगीतकारांना उच्च सुरांतील कंपोझिशन करण्यातली अडचण संगीतकारांच्या (सिस्टिम) बाहेर होती ती गायकांच्या कुवतीमुळे सुटली.