Skip to main content

तुमची सध्याची वादग्रस्त मते कोणती? - १

कोणताही विषय चालेल. त्या विषयावरचे तुमचे वादग्रस्त / प्रवाहाविरुद्ध मत कोणते ते थोडक्यात सांगा.

कृपया एका कमेंट मधे एकच मत लिहा. दुसऱ्या मतासाठी दुसरी कमेंट वापरा.

उप प्रतिसादांमधून त्या मतावर चर्चा अपेक्षित आहे.

धन्यवाद.

नितिन थत्ते Mon, 16/05/2016 - 15:43

In reply to by गब्बर सिंग

उलटही असू शकेल ना?

त्या इतक्या वरच्या सुरात गाऊ शकतात म्हणून हे संगीतकार वरच्या सुरातल्या कंपोझिशन करू शकले असंही शक्य आहे ना?

म्हणजे संगीतकारांना उच्च सुरांतील कंपोझिशन करण्यातली अडचण संगीतकारांच्या (सिस्टिम) बाहेर होती ती गायकांच्या कुवतीमुळे सुटली.

अनु राव Mon, 16/05/2016 - 15:49

In reply to by नितिन थत्ते

डुएट असले की पुरुष आणी बाई च्या नैसर्गीक बेस सुरांमुळे संगीतकारांना प्रॉब्लेम यायचा. बायका काळी चार आणि रफी समजा काळी एक मधे ( त्या रेंज मधे ) ऐकायला चांगला वाटत असेल तर संगीतकारांना गाण्याची चाल अशी लावायला लागत असणार की रेंज दोघांना सुट होईल आणि ऐकायला बरी वाटेल.

लता वरच्या पट्टीत पण गाऊ शकायची म्हणुन तिला माझ्यापेक्षा जास्त गाणि मिळायची असे ( मूर्खासारखे ) विधान मुबारक बेगमचे ऐकले आहे.

अनु राव Mon, 16/05/2016 - 16:06

In reply to by प्रथमेश नामजोशी

बायकांची आणि पुरुषांची नैसर्गीक पट्टी वेगळी असते.

बायकांची पट्टी ही काळी ४, ५ वगैरे असते, पुरुष काळी १,२ मधे गातात.
जर गाण्याची पट्टी काळी २ ठेवली आणि तारसप्तकातील सुर असतील गाण्यात तर रफीचे गाणे वाईट वाटणार नाही पण स्त्री गायिका कीचाळते आहे असे वाटेल.

चिंतातुर जंतू Mon, 16/05/2016 - 16:46

In reply to by नितिन थत्ते

>> ये भी तो हो सकता है की लताबाईंना स्वतःला तारसप्तकात गाऊन "ही पहा माझी ताकद" असं शक्तीप्रदर्शन करावंसं वाटलं असेल. सिस्टिम च्या समस्यांसाठी फक्त सिस्टिम बाहेरचेच जबाबदार असतात असं नाही काही.

>> त्या इतक्या वरच्या सुरात गाऊ शकतात म्हणून हे संगीतकार वरच्या सुरातल्या कंपोझिशन करू शकले असंही शक्य आहे ना?

पण हे सगळं इथे अवांतर आहे. लताबाईंचा कोवळा आवाज संपला तेव्हा माझ्यासाठी लताबाईंचा विषय संपला. :-)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 16/05/2016 - 19:23

In reply to by नितिन थत्ते

मलाही उषा उतुपचा आवाज आवडतो. (आपल्या आवाजाला, वयाला, शोभेल आणि झेपेल असंच गाते ती. गळ्याखाली त्वचेचा पडदा लोंबताना दिसतानाही 'अनदेखा अनजाना सा, पगला सा दीवाना सा' असं किंचाळू नये हे तिला समजतं.)

चिंतातुर जंतू Tue, 17/05/2016 - 13:29

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>> मलाही उषा उतुपचा आवाज आवडतो. (आपल्या आवाजाला, वयाला, शोभेल आणि झेपेल असंच गाते ती. गळ्याखाली त्वचेचा पडदा लोंबताना दिसतानाही 'अनदेखा अनजाना सा, पगला सा दीवाना सा' असं किंचाळू नये हे तिला समजतं.)

मला शमशाद बेगम आणि उमादेवीसुद्धा आवडतात. खरं तर लखनौमधल्या एखाद्या कोठ्यावरून येणारा आवाज असल्यासारखा ह्या बायांचा आवाज होता. त्यामुळे 'पाकीजा'मध्ये वगैरे लताबाईंऐवजी मला अशा गायिका अधिक आवडल्या असत्या.

नितिन थत्ते Tue, 17/05/2016 - 13:59

In reply to by चिंतातुर जंतू

>> लताबाईंचा कोवळा आवाज संपला

माझी एक शंका आहे- व्हॉईस रेकॉर्डिंग आणि रिप्रॉडक्शनचे तंत्रज्ञान जसजसे सुधारत गेले तसतसा लताबाईंचा आवाज खराब 'होऊ' लागला.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 17/05/2016 - 19:35

In reply to by नितिन थत्ते

दूश्ट, दूश्ट, वैट्ट आहात. ही शंका विनोदी वाटली तरी त्यात फार तथ्य आहे असं वाटत नाही.

स्त्रियांच्या आवाजाच्या चर्चेमुळे 'कपलिंग'मधली गंमत आठवली. मारीएला फ्रॉस्ट्रप नावाची ब्रिटीश पत्रकार मालिकेतल्या स्टीव्हच्या स्वप्नातली सुंदरी असते. उगाचच यूट्यूबवर वेळ घालवताना मारीएला फ्रॉस्ट्रपची ही पाच मिनीटांची मुलाखत ऐकली. आणि ही बाई चक्क आवडलीच.

फारएण्ड Mon, 16/05/2016 - 19:30

In reply to by चिंतातुर जंतू

तो कोवळा आवाज असलेली गाणी जरा नीट ऐकायला पाहिजेत. कारण हे संगीतकार ज्या गाण्यांना आम्ही जुनी गाणी समजायचो त्यापेक्षाही आधीचे आहेत (अनिल विश्वास वगैरे). एरव्ही शंकर जयकिशन कडच्या गाण्यांत तिचा आवाज "अ‍ॅट रोमॅण्टिक बेस्ट" वाटतो मला नेहमी. अजीब दास्तां है ये सारखी गाणी.

अनु राव Mon, 16/05/2016 - 19:37

In reply to by फारएण्ड

जे गाणे ऐकताना एखादी तरुण स्त्री डोळ्यासमोर येण्या ऐवजी खुद्द लतामंगेशकर त्यांच्या फेमस पांढर्‍या साडीत माइक समोर गातायत हे येते, ते गाणे फेल गेले असे समजते मी. १९७०-७५ नंतर अशी गाणी वाढतच गेली.

चिंतातुर जंतू Tue, 17/05/2016 - 13:32

In reply to by फारएण्ड

>> तो कोवळा आवाज असलेली गाणी जरा नीट ऐकायला पाहिजेत.

'शोला जो भडके' किंवा 'धीरे से आजा रे अंखियन मे' तुम्ही नक्कीच ऐकलेलं असेल. अंगाई तर रात्री विविधभारतीवर पुष्कळदा 'बेला के फूल'मधलं शेवटचं गीत असतं.

फारएण्ड Tue, 17/05/2016 - 18:33

In reply to by चिंतातुर जंतू

हो ती १९६० च्या आधीचीही ऐकलेली आहेत (त्या दशकाला हिंदी चित्रपटसंगीताचे सुवर्णयुग म्हंटलेले ही वाचले आहे). पण नव्याने ऐकायला हवीत, कारण आत्तापर्यंत ती एकदम भिडलेली नाहीत कधी. पण माझा अनुभव असा आहे की एकदम कोणत्यातरी गाण्यांच्या बाबतीत डोक्यातला इतके दिवस बंद असलेला एक स्विच ऑन होतो आणि आपल्याला इतके दिवस ही गाणी कशी भिडली नाहीत असा प्रश्न पडतो. मदन मोहन ची अनेक गाणी मधे अशीच एकदम क्लिक झाली (नैना बरसे, नैनों मे बदरा छाये ई) - त्याला कारण होते तो एक तीन कथानके असलेला हिंदी पिक्चर, ज्यात पुलावरची मुलगी 'लग जा गले' म्हणते. तेथे ते गाणे एकदम आवडून गेले आणि मग मदन मोहन ची अनेक ऐकली.

एस डी बर्मन चा प्रचंड फॅन असूनही मला त्यांचे 'ठंडी हवाए...' हे त्या काळातले गाणे जुने वाटते, पण त्याच चालीवरचे रौशन चे रहे ना रहे हम प्रचंड आवडते. पण त्या जुन्या गाण्यांमधे काहीतरी खजिना आहे, जो डोक्यातला स्विच ऑन झाल्यावरच (किंवा "कान तयार झाल्यावरच") मिळेल असेच दिसते :).

फारएण्ड Mon, 16/05/2016 - 19:39

In reply to by मिलिंद

अजून एक प्रश्न म्हणजे लता किंचाळली आहे वगैरे जे वरती लिहीले आहे ते "आता" तसे वाटते, की गेली २-३ दशके जेव्हा ही गाणी रिलीज झाली तेव्हाही तुम्हाला तसेच वाटत होते? त्या त्या काळात फॅशनेबल वाटणारे कपडे जसे नंतर हास्यास्पद वाटतात (हम आपके मधली माधुरी आम्ही तेव्हा बदामशेप्ड गॉगल लावून पाहिली. आता तिचे कपडे, मेक अप वगैरे बद्दल ची टीका वाचली की ती पटते) तसे काहीतरी झालेले नाही ना - म्हणजे आता गेल्या १०-१२ वर्षांत गाण्यांची स्टाईल बदलली, खुद्द लताची गाणी खूप कमी झाली व त्यामुळे आता तिची तीच गाणी आपण ज्या (दुसरा योग्य शब्द सापडत नाही) "कानाने" ऐकतो तशी त्या त्या वेळेस वाटली नसतील. कारण लताचा आवाज आमच्या दृष्टीने ऑरगॅनिकली बदलत गेला. रोज बघणार्‍याला दिसण्यात/वजनात झालेला बदल सहज जाणवत नाही, तसा :)

अनु राव Mon, 16/05/2016 - 19:42

In reply to by फारएण्ड

लताची एक दुजे के लिये मधली गाणी ऐकुन घाबरले होते मी लहानपणी.

माधुरी जेंव्हा चित्रविचित्र ड्रेस आणि गॉगल घालत होती, तेंव्हा सुद्धा ते अतिशय मूर्खपणाचे दिसत होते आणि वाटत होते. माधुरीलाच का समजत नाहीये हा प्रश्न तेंव्हा सुद्धा पडलेला मला आठवतो.

बादवे, सुखविंदर नावाच्या एका गुणी गायकानी एका कार्यक्रमात "सोलाह बरस की बाली उमर को सलाम" हे गाणे बाईं समोर अत्यंत उत्तम प्रकारे गायले होते. ते कुठेही यु ट्युब वगैरे वर मिळत नाहीये :-(

फारएण्ड Mon, 16/05/2016 - 20:30

In reply to by अनु राव

सोला बरस की हे माझे अत्यंत फेवरिट गाणे आहे (पिक्चर रिलीज झाला तेव्हा ती सगळी गाणी महाबोअर वाटली होती. नंतर आवडू लागली - मुख्यतः लताची. एस पी कधीच आवड्ला नाही). चित्रीकरण, संगीत, गीतकाराचे शब्द, आवाज सगळेच जमलेले. सुखविंदर म्हणजे चक दे वालाच ना? तो ही मस्त गातो, पण 'दमदार, युथफुल' गाणी त्याची आवडतात जास्त. त्याने हे कसे गायले असेल त्याबद्दल कुतूहल आहे.

अनु राव Fri, 07/04/2017 - 11:19

In reply to by गौराक्का

म‌ला इथुन दिस‌त नाहीये. घ‌री जाउन ब‌घ‌ते.
तेंव्हा त‌री म‌ला फार आव‌ड‌ले होते. सुख‌विंद‌र म‌स्तच गातो. ल‌ता सार‌खे कोणी रोबो प‌ण गाऊ श‌क‌तो.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 16/05/2016 - 19:43

In reply to by फारएण्ड

'हम आप के' मधले माधुरीचे कपडे छानेत की. आता तशी फॅशन नाही, पण म्हणून कपडे भिकार वाटत नाहीत. (किंवा सनिमा एवढा भिकार आहे की कपड्यांना किती नावं ठेवणार!)

ऋषिकेश Mon, 16/05/2016 - 20:40

In reply to by मिलिंद

१९७५नंतर लताबाईंनी स्वेच्छानिवृत्ती घ्यायला हवी होती.

असं. बरं असेल बॉ! आपल्याला गाण्यातलं काही कळत नाही. (जसं मी आयडी बघुन प्रतिसाद आवडतोय की नाही ठरवत नाही तसंच) गाणी कोण गातंय वगैरे लक्षात घेऊन गाणी ऐकत नाही. गाणं गायलेलं आवडतं किंवा नाही! पर से लताबाई(सुद्धा) थोर आहेत इतकं कळतं. का वगैरे ते काय सांगता येणार नाही!

बाकी, ज्याला गायचं त्याने गावं, ऐकायचं त्याने ऐकावं, उगाच स्वेच्छानिवृत्ती घ्याय्ला लाऊन पोटावर का लाथ!? रेडीयो वा टिव्ही चालु ठेवण्याची सक्ती नाही तोवर कोणी काय किती व कधी(पर्यंत) गावं याबद्दल मला काय त्रास होत नाही

तिरशिंगराव Fri, 13/05/2016 - 16:32

In reply to by रेड बुल

आत्म्याला स्वतःचे शरीर नसते, मग पिंड कसा खाणार ? म्हणून तो कावळ्याच्या शरीरात प्रवेश करुन पिंड खातो. त्यानंतर त्याला मुक्ती मिळते म्हणे.
मुक्ती म्हणजे या सूर्यमालेतून असावी. नंतर दुसर्‍या पृथ्वीसदृश्य ग्रहावर जन्म घ्यायला मोकळा. असा थोडा वैज्ञानिक मुलामा दिला नं, म्हणजे लोकं माना डोलावतात.

बॅटमॅन Mon, 16/05/2016 - 15:47

इतकी वादग्रस्त मते असणे हेच मुळात वादग्रस्त आहे.

-कॅप्टन वादग्रस्त.

तिरशिंगराव Wed, 18/05/2016 - 11:06

एखाद्या संस्थळाचा कंटाळा आला, त्यावर प्रतिसाद मिळेनासे झाले वा तिथून काही कारणाने निघावे लागले(चपला घालून),

तर चंबुगवाळे जरुर बरोबर घ्यावे, पण नवीन संस्थळावर, पहिल्याच दिवशी सगळे कपडे वाळत घालू नयेत.

रेड बुल Wed, 18/05/2016 - 19:36

कोणाला चित्रपट समजला नसावा शक्य आहे ऐसीचा एंटरटेंमेंट आयक्यु शून्य असणे शक्य आहे गेलाबाजार एखादी ठसठस तरी सर्राट वर अपेक्षित होती

अंतराआनंद Wed, 18/05/2016 - 20:07

In reply to by रेड बुल

मला लिहायचे होते पण इथे सगळे त्या जीओटीत रमलेले, म्हटलं उगाच का त्रास घ्या आणि द्या. :p

.शुचि. Wed, 18/05/2016 - 20:16

In reply to by अंतराआनंद

ए आता तुलाही आग्रह लागू लागला का अंतरा? धनु राशीवरचा धब्बा हैस तू ;) =)). मी बघ सेम राशीची पण कसा मेन फलक हलवत ठेवते. मग कोणी वाचेना का न वाचेना.

.शुचि. Thu, 19/05/2016 - 16:40

In reply to by रेड बुल

पराने कॉइन केलेले संबोधन आहे ते आणि पराच्या मनात कोणताही अंतस्थ हेतू निश्चित नसणार याची मला ठाम पुरेपुर खात्री आहे. नंतर ते संबोधन ऐसीमान्य झाले.

रेड बुल Fri, 20/05/2016 - 16:51

आजकाल हॉलीवुडचे चित्रपट म्हणजे फक्त कॉमीकबुक्स झाले आहेत. व्हीएफेक्सचा प्रचंड चकचकाट , मारधाड अन उगा काहीतरी असावी म्हणून घुसडलेली टुकार स्टोरीलाइन आणी फालतु भावनीकता. त्यामुळे ज्यांना खरोखर ड्रामा आवडतो त्यांना टीवी सिरीअल्स शिवाय आता पर्याय उरला नाही.

रेड बुल Fri, 03/06/2016 - 12:31

ढुंगणावर रट्टा पडल्यावर तीव्र वेदना झाली अथवा किंकी वाटुन ओर्गेजम मीळाला या न्यायाने ऐसी अक्षरे वरती श्रेणी दान होत असेल तर श्रेणी पध्दत यूजर पुरती डीएक्टिवेट करायची सुविधा का नाहित ? म्हणजे मला तुमच्या श्रेन्या नको तुम्ही माझे प्रतिसाद वाचु नका (कधीच) फ़ेअर प्ले

रावसाहेब म्हणत्यात Thu, 06/04/2017 - 22:53

वेश्या व्यवसाय कायदेशीर करावा. वेश्या व्यवसाय बरोबर का चूक आहे हा मुद्दा इथे गौण आहे. fact of the matter is, it is happening whether morally right or not, then why not just legalize it. त्याने थोडे प्रॉब्लेम्स सुटतील असं माझं मत आहे.

सामो Thu, 06/04/2017 - 23:08

In reply to by रावसाहेब म्हणत्यात

वेश्या व्य‌व‌साय‌ ब‌रोब‌र‌च आहे.
तो काय‌देशीर व्हावा की नाही याब‌द्द‌ल मात्र काहीही म‌त नाही, फ‌र‌क प‌ड‌त‌ नाही.
याचा अर्थ‌ राव‌साहेबांना फ‌र‌क‌ प‌ड‌तो असे म्ह‌णाय‌चे नाहीये. प्लीज कोणीही भ‌ल‌ते अर्थ काढू न‌ये.

रावसाहेब म्हणत्यात Fri, 07/04/2017 - 00:05

In reply to by सामो

प्लीज कोणीही भ‌ल‌ते अर्थ काढू न‌ये

हाहा.

माझे मत त्यातल्या हेल्थ ईश्युस, फ्लेश ट्रेडिंग, इ भयंकर गोष्टींना धरून होते. जर कायदेशीर केले तर अॅटलिस्ट ऑन पेपर तरी बऱ्याच गोष्टी रेग्युलेट होतील. आणि काही एन.जी.ओज पुढे आले तर ते लॉज इम्प्लेमेंट करायला मदत करतील.

भटक्या कुत्रा Fri, 07/04/2017 - 00:43

जर माणूस हि एक प्राणी आहे तर तो कपडे का घालतो? लहानपणा पासूनचा प्रश्न!

रावसाहेब म्हणत्यात Fri, 07/04/2017 - 01:20

In reply to by भटक्या कुत्रा

भाऊ, मे महिन्यात जीनची प्यांट घालून सुद्धा बाईकवर बसलं तर *च्याला चटके बसतात. तेही न घालता बसलं तर कुल्ले भाजून निघतील न भाऊ...

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 07/04/2017 - 08:40

In reply to by भटक्या कुत्रा

मी कपडे घालते कारण मी कपडे घालून कशी दिसते हे महत्त्वाचं नाही, कपड्यांमुळे माझं काय दिसत नाही, हे लोकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.

गौराक्का Fri, 07/04/2017 - 10:59

१. धोतर , गोटा , शेंडी नसलेल्यानी बायकांना साडी नेसायचे कुंकू लावायचे मंगळसूत्र घालायचे फालतू सल्ले देऊ नयेत , किंवा अशा लोकांना पकडून त्यांचे टक्कल करून शेंडी ठेवायला लावावी.
२. आपल्या पोरांना किंवा पोरांच्या जनरेशन ला नावं ठेवायच्या आधी स्वतः आपल्या आधीच्या जनरेशनकडून जेन्युईननेस चं शरफीटीकेट आणावं
३. आपण पैशासाठी नाही तर समाधानासाठी नोकरी / काम करतो असं सांगणाऱ्यांनी आपला पगार ज्यन्तेच्या खात्यात जमा करावा.
४. घरी पाहुणे आल्यावर टीव्ही , मोबाईल किंवा तत्सम गोष्टींमध्ये डोकं घालून बसणाऱ्यांची मुंडी छाटावी
५. फालतू आणि भिकार गोष्टींची खोटी स्तुती करणाऱ्यांच्या जिभेवर बिब्ब्याच्या फुल्या उठवाव्यात
६. पाहुण्यांच्या आगाऊ , माजोरड्या , रड्या , हट्टी पोरांना दोन रट्टे देण्याची सवलत असावी
७. रस्त्यावरचे कुत्रे , मांजरी यांच्या बद्दल नको इतके प्रेम असलेल्यानी आपल्या घरी समस्त कॉलनीतल्या प्राण्यांना घेऊन जावे, अगदी साग्रसंगीत जेवण करून त्यांच्या पंगती घरच्या हॉल मध्ये उठवाव्यात नाहीतर एकमेकांवर भुंकत वेळ काढावा.... शिंची आमची कटकट तरी कमी.

------------------------------
ल‌गाव‌ ब‌त्ती!

नितिन थत्ते Fri, 07/04/2017 - 12:26

In reply to by गौराक्का

>> पाहुण्यांच्या आगाऊ , माजोरड्या , रड्या , हट्टी पोरांना दोन रट्टे देण्याची सवलत असावी

पूर्वी ही फ्यासिलिटी होती. म्ह‌णजे मी ल‌हान‌प‌णी असे र‌ट्टे खाल्ले आहेत‌.

>>आपण पैशासाठी नाही तर समाधानासाठी नोकरी / काम करतो असं सांगणाऱ्यांनी आपला पगार ज्यन्तेच्या खात्यात जमा करावा.

.

अनु राव Fri, 07/04/2017 - 12:16

In reply to by गौराक्का

फालतू आणि भिकार गोष्टींची खोटी स्तुती करणाऱ्यांच्या जिभेवर बिब्ब्याच्या फुल्या उठवाव्यात

म‌राठी जालाव‌र वाव‌र‌णाऱ्या ९०% लोकांनी जीभेची काळ‌जी घेणे ग‌र‌जेचे आहे.

तिरशिंगराव Sat, 08/04/2017 - 11:55

फालतू आणि भिकार गोष्टींची खोटी स्तुती करणाऱ्यांच्या जिभेवर बिब्ब्याच्या फुल्या उठवाव्यात

नुस‌त्या जिभेव‌र थांबू न‌का. ते च‌र‌च‌र‌लेल्या जिभेने त‌शीच‌ स्तुती क‌र‌त र‌हातील्. त्यांच्या प‌ड‌जिभेव‌र‌ही फुल्या उठ‌वा.

सामो Thu, 04/04/2019 - 19:45

पाश्चात्य पॉर्न फक्त रोबॉटिक, मेकॅनिकल, भावनाशून्य असतात तर भारतिय पॉर्न फक्त गचाळ असतात.
या दोहोंच्या मधले पॉर्न का सापडत नाहीये? ;)