Skip to main content

जेंडर प्रोनाउन्स - सर्वनामात काय आहे?

या लेखाची संपादित आवृत्ती २३ मार्चच्या 'लोकमत' मध्ये आली होती. या समूहावर उत्तम चर्चा होईल असं वाटल्यानं पूर्ण लेख इथं देत आहे.

---------------

ललित लेखनाचा प्रकार

भेट

सूर्य तो अन काजवा मी, जाणुनी होतो जरी
पोचलो धुंदीत एका, थुंकण्या त्याच्यावरी

मत्त तो गजराज, मी तर श्वान श्रीमंताघरी
लागता चाहूल उठलो, भुंकण्या त्याच्यावरी

भेट होता आमुची, प्रत्यक्ष दिसले मज परी
माझिया हातात पत्थर, चांदण्या त्याच्या करी

करोनाचा बड्डे

२० मार्च २०२० रोजी फेसबुकवर लिहिलेली ही पोस्ट. मेमरीत वर आली. नेमकी आताही अशीच परिस्थिती येतेय की काय अशी वेळ आहे. लाॅकडाउन नाही होणार अर्थात मागच्यासारखा पण रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुन्हा भीती वाटायला लागली आहेच.
हे स्टेटस मी काल वाचलं तेव्हा मी किती निरागस होते असं वाटून गेलं :P
"वायफाय, वीज, पाणी, टीव्ही सुरू आहे त्यामुळे हे दिवस सुसह्य होतायत हे निश्चित. नाही तर नक्की वेड लागलं असतं अनेकांना, किंवा भांडणं/मारामाऱ्या झाल्या असत्या. जीवनावश्यक वस्तू मिळतायत, तोही प्रश्न नाही.

खिडकी

क्षितिजावरचा
निळसर पर्वत
कातळमाथा
ढगात घुसळत
भूशास्त्राला
कोडी घालत
खोल ठेऊनी
लाव्हा धुमसत
पुरातनाचे
सूक्त गुणगुणत

नभरेषेवर
उंच उसळुनी
दिसे अनाहूत माझ्या खिडकीत

निळे पाखरू
पहाटफुटणीत
पंखभिजवत्या
दवास झटकत
चोच मुलायम
पिसात फिरवीत
पंखांतील
अचपळ बळ जोखीत
साद घालुनी
अधीर, अवचित

नभांगणाला
उभे छेदुनी
उतरे अलगद माझ्या खिडकीत

आखीव रेखीव
खिडकी चौकट
निळ्या नभाचा
कापुनी आयत

इंद्रजाल
निळसर पसरवुनी
जड चेतन द्वैताला मिटवीत

आई-बाबांच्या आठवणी (भाग ३)

वडील स्वातंत्र्यसैनिक आणि संस्कृतचे गाढे पंडित, आईसुद्धा स्वातंत्र्यसैनिक, उत्कृष्ट स्त्रीरोगतज्ज्ञ. दोघेही महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या निकट संबंधात. त्यांच्या आठवणी सांगताहेत बालमोहन लिमये.

ललित लेखनाचा प्रकार

कोव्हीड-१९ आणि शैक्षणिक तूट : अभियानात्मक प्रयत्नांची गरज

कोव्हीड-१९मध्ये शालेय विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक तूट झाली त्याबद्दल सांगताहेत किरण लिमये.

लाल इश्क्

"तू त्याच्या प्रवासातली चुकलेली पाउलवाट आहेस. आणि मी त्याचं फायनल डेस्टिनेशन आहे.
...आणि तरीही तुम्ही माझ्याकडे आलात. पाउलवाटेची भीती वाटली, की प्रवाशावरचा विश्वास उडाला?"

समीक्षेचा विषय निवडा