Skip to main content

घुंगरू

पायातल्या घुंगरानी मला विचारले ….
“खरे खरे सांगशील? ...तू नाचतेस की मी नाचतो ?
तूच नाचतेस तर माझी जरुरी काय ?
जर मीच नाचतो तर तुझा उपयोग काय ?
केव्हा केव्हा अशीच श्रांत उगाचच बसलेली असतेस …
माझ्याकडे नजर जाताच …
सारी सारी फुलून येतेस !
माझ्यासवे तू आणि तुझ्यासवे मी ..
मग नाचच नाच होतो …
तू तू नसतेस ..मी मी नसतो …..”
प्रश्न माझेच घुंगरानी विचारलेले ….
नाच होतो तेव्हा नेमके काय होते ?
मी आणि घुंगरू ...दोघे असतो ही आणि नसतो ही ..
दोघे मिसळून जातो …
एकच एक ….फक्त नाच जन्मतो .
सारे प्रश्न गळून जातात ..
उत्तरे मग असतच नाहीत .

सुष्ट-दुष्ट

"को S हम" प्रश्न सनातन आहे असे म्हणतात. पण मला तरी जवळ जवळ त्या प्रश्नाइतकाच सनातन प्रश्न जो वाटतो तो म्हणजे - जगामध्ये "खल प्रवृत्ती चे अस्तित्व का आहे?"

ललित लेखनाचा प्रकार

The Reader: वाचाल तर वाचवाल

Kate Winslet म्हटली, कि Titanic मधली उच्चभ्रू, सुसंस्कृत तरुणी आठवते. तिच्यातली उत्स्फूर्त, प्रखर अस्मिता असलेली प्रेयसी जॅक च्या सान्निध्यात समोर येते. त्या व्यक्तिरेखेचा इतका पगडा मनावर होता, की पुढची अनेक वर्ष अभिनेत्री आणि व्यक्तिरेखेतली सीमारेषाच धूसर होती.

समीक्षेचा विषय निवडा

Dead Man's Hand - 2

आधीचा भाग - १

Dead Man's Hand - 2
-----------------------------------------------------------

"जयहिंद! मालवणी पोलीस स्टेशन, सब् इन्स्पेक्टर महाडीक बोलतोय..."

"साहेब, मढ आयलंडच्या दाणापाणी बीचच्या उलट्या बाजूला एक मुलगी मरुन पडली आहे. तुम्ही लवकर या!"

महाडीक पुढे काही बोलण्यापूर्वीच फोन कट् झाला होता.

"च्यायला, पोलिसांना पूर्ण माहिती का देत नाहीत हे लोक? डिस्ट्रीक्ट, जीप काढा.. डिटेक्शनवाले कोणकोण आहेत बघा..."

ललित लेखनाचा प्रकार

Dead Man's Hand - 1

Dead Man's Hand - 1
-----------------------------------------------------------

पहाटे दोनचा सुमार ....

पश्चिम क्षितिजापर्यंत अथांग पसरलेला अरबी समुद्र ....
भर समुद्रात दूर अंतरावर असलेल्या जहाजांवरचे ठिपक्यांसारखे दिसणारे दिवे ....
किनार्‍यावर आदळणार्‍या लाटांचा आवाज सोडला तर वातावरणात नीरव शांतता ....
अमावस्येची रात्रं असल्याने डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा गडद अंधार ....
रस्त्याच्या कडेल उभी असलेली त्याच अंधारात सहज मिसळून गेलेली काळ्या रंगाची कार ....

"एकदा बाहेर चेक करा, आसपास कोणी दिसत तर नाही..."

ललित लेखनाचा प्रकार

uBlock Origin - भडक सायटींपासून आणि नको असलेल्या जाहिरातींपासून सुटका

* म्यू ब्लॉक ओरिजिन काय आहे?

या ब्राउझर एक्सटेंशन चा वापर करून तुम्ही तुम्हाला दिसायला आवडत नसलेल्या वेबसायटींना सुधारू शकता. जसे कि फेसबुक मधून साईडबार गायब करणे. फ्रेंड सजेशन गायब करणे वगैरे वगैरे.

तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती सुद्धा तुम्ही वेबपेजेसवरून गायब करू शकता.

जर एखादी वेबसाईट तुम्हाला ब्राउझर मधून ओपन होऊ द्यायची नसेल - तर तिला नेहमीसाठी ब्लॉक पण करू शकता.

(हे एक्सटेंशन क्रोम डेस्कटॉप, फायरफॉक्स वर चालते पणअँड्रॉइड वरच्या क्रोम वर चालत नाही)

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

फसलेल्या उपवासाची कहाणी

पूर्वी एका मासिकासाठी जुन्या अनुभवांवर एक लिहून द्यायचा होता. विषय होता - बदलत्या खाद्यसंस्कृती व तुमचे अनुभव. परवा घरी येऊन गप्पा मारताना जेव्हा बायकोला त्याची माहिती दिली तेव्हा किती वेळ तिचे हसू थांबेचना.तिचे ते हसणे पाहून पहिल्यांदा जरा रागच आला पण नवर्‍याने बायकोने प्रयत्नपूर्वक बनवलेला (बिघवडलेला) नवीन पदार्थ आणि आपल्याला आलेला राग हा निमूटपणे गिळायचा असतो हे १० वर्षाच्या संसारानंतर मी नक्कीच शिकलो आहे. पहिल्याच बॉलवर शून्यावर आऊट होऊन पँव्हिलीयन मध्ये परतणार्‍या खेळाडूसारखा झालेला माझा चेहरा पाहून मग बहुधा तिला माझी दया आली असावी.

तरुणाई

कुणाच्याही समोर शरीर पसरतात , तरुणाईला कसली बंधने नसतात.
शरीराची भूक हाक देते ,मनाची कसली भिती नसते.
घरात आई असून नसते ..बाहेर बापाची आडकाठी नसते…
“ आजकाल सगळे असेच करतात “ अश्या शब्दांची ढाल असते.
मोह असतो पण प्रेम नसते ..मी आणि माझे या शिवाय काही दिसत नसते.
प्रेमातून प्रार्थना ...प्रार्थनेतून परमेश्वर ….असले काही अजिबात नसते...
कसल्या खुळचट कल्पना ! कसल्या बुरसटलेल्या विचारांचा पगडा !
आला क्षण महत्वाचा ...आत्ता मिळतंय ते ओरबाडा..
पैसा हवा. पैसा सोडला की हवे ते मिळते …
तरुणाईची नशा तुम्हा जुनाट लोकांना काय कळते ?