Skip to main content

कलाकारांचे अजब जग...

अफाट समुद्राच्या तीरावर असलेल्या एका डोंगर माथ्यावर बसून अभय दातार बायनाक्युलर्समधून भोवतालचे दृश्य न्याहाळत होता. समुद्राच्या लाटा, लाटावरून उडणारे पक्षी, दूर कुठेतरी मच्छीमारांच्या होड्या इत्यादी गोष्टी बघत असताना त्याचे मन भरून येत होते. हाडाचा कलावंत असल्यामुळे प्रत्येक दृश्य नवीन काही तरी सांगत आहे, असे त्याला वाटत होते. तितक्यात त्याच्या बायनाक्युलर्सचा रोख समुद्राच्या काठावर पसरलेल्या निर्जन वाटणाऱ्या वाळूत केंद्रित झाला. काही क्षण रोखून पाहिल्यानंतर तेथे दूर कुठेतरी हालचाल दिसत होती.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

स्मॉश: बाष्कळ, आचरट आणि तूफान मजेशीर!

नवीन नवीन फास्ट इंटरनेट जेव्हा घरी आलं तेव्हा युट्यूब ह्या प्रकाराशी ओळख झाली. नेहमीप्रमाणे युट्यूबने रेकमेंडेड मधून कचरा ओतण्यास सुरूवात केली तेव्हाच कळलं की इथे फोकसचा म्याटर आहे. जे पहाल तसंच दिसत राहील. एआयबी, टीव्हीएफशी ओळख झाली होतीच. त्यात आणखी रसेल पीटर्स. कॉमेडी हे चांगलंच जंक दृश्यखाद्य आहे हे कळलं आणि त्याचा शोध सुरू झाला. ह्यात मिळालं स्मॉश. त्यांचा पहिला व्हिडीओ आहे 'मोलेस्टर मून.'

ललित लेखनाचा प्रकार

कवी पर्सी शेली.... राजकुमारी ऍना.... जलपरी एरीथुसा

१९५३ मध्ये आलेला आणि जो जगभर गाजला व आजही हॉलिवूडच्या इतिहासात सर्वोत्तम १०० चित्रपटामध्ये ज्याची गणना न चुकता केली जाते त्या “रोमन हॉलिडे” वर भारतामधील रसिकांनाही तितकेच प्रेम केले आहे. कथानकात एके ठिकाणी राजकुमारी ऍन झोपेच्या इंजेक्शनच्या अंमलाखाली असून ती राजवाड्यातून देखरेख करणार्‍यांच्या नजरा चुकवून रात्री बाहेर पडली आहे व वाटेत तिची रोम शहरातील अमेरिकन प्रेस रीपोर्टर जोसेफ़ ब्रॅडले याच्याशी भेट होते. त्याला वाटते या पोरगीने काही नशापाणी केले आहे आणि अन्य काही उपाय सापडत नाही म्हणून तो तिला रोममधील आपल्या खोलीवर आणतो.

समीक्षेचा विषय निवडा

गुडमाॅर्निंग पथक

झावळातच गडी ग्रामपंचायती समोर हजर झाला.तिथचं खिळपाटाला पार चिटकून फटफटी उभी केली.उपरण्याने जॅम आळपलेले थोबाडं मोकळ केल. कावरं बावऱ होऊन इकडं तिकडं पाहिलं.कुणाचाच पत्ता नव्हता.कुणाचा म्हंजी पथकातलं एक ही मेंबर अजून टपकालं नव्हता.ते पथक तालुक्याहून येणार व्हतं. ते जिपड नाय नि कुणी मेंबर भी नाय .अपुनच आगुदर आलोत याचं त्यांची त्यांनाच बर वाटलं.बाकीची पथकातली मेंबर कमून आलं नसतील ?त्यांनी उगचं मोबाईलचं डबडं तपासून पाहिल.कुणाचा काल बिल आल्ता का काय ?मिस काल बिस काल काय नव्हता .

ललित लेखनाचा प्रकार

आहे हे असं आहे...

"वॉटसन, डॉक्टरला वॉकिंग स्टिक कोण देईल? अर्थात एखादं हॉस्पिटल, जिथे तो काम करत होता. मग 'सीसीएच' म्हणजे चेरिंग क्रॉस हॉस्पिटल असण्याची शक्यता जास्त आहे."

"बरं तर मग. चेरिंग क्रॉस हॉस्पिटल. आणखी कोणते निष्कर्ष काढता येतील?"

"तुला माझी पद्धत ठाऊक आहे, वॉटसन. वापर!"

"मला सुचणारा एकच निष्कर्ष म्हणजे या माणसाने खेड्यात आपली प्रॅक्टिस सुरू करण्याआधी लंडनमध्ये काही काळ काम केलं असावं."

अल्लोळीबल्लोळी

लहानपणी म्हणजे शाळेत असताना आमच्याजवळ पैसे असत नसत. एकतर घर जवळ होतं त्यामुळं रिक्षा बसचा प्रश्न नव्हता, सायकल वापरत नव्हतो त्यामुळं हवा, पंक्चरचाही प्रश्न नव्हता. दुसरं म्हणजे वह्या, पेनं, शिसपेन्सिली, शाया, पाटीपेन्सिली, सगळंच नीट असत असे. आणि डबे वाॅटरबॅगासुद्धा नीट असत. आमची पंचाईत व्हायची मग शाळेत असताना, मधल्यासुट्टीत किंवा शाळा सुटल्यावर ते बारकी बोरं, रंगीत फुटाणे, खारे शेंगदाणे, पेरु, रंगीत गोळ्या, आवळे, चिंचेचे गोळे, इमलीपाॅप्स वगैरे पदार्थ आम्हाला घ्यायला मिळत नसत. आणि घरी 'हे हवंय' असं म्हणालं की मोठ्ठच्या मोठ्ठं प्रवचन, व्याख्यान इ कायकाय ऐकावं लागत असे.

काॅपी,शाळा,पोलिस अाणि सुंदर मुली वगैरे

दहावी बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या.आता एका मागून एक परीक्षा सुरू होणार.हे एक दोन महीने परीक्षाचे दिवसच …. पूर्वी परीक्षा ही एक शैक्षणीक प्रक्रीया होती.अध्यनं अध्यापना सारखीच साधी आणि निंरतर चालणारी प्रक्रीया. आता मात्र या परीक्षानां फार महत्व आलयं कारण या परीक्षाचे अधारे मुलांचे वर्गीकरण करण्यात येऊ लागले.त्या प्रमाणे गुणवत्ता यादया तयार करण्यात येऊ लागल्या. अती हुशार, हूशार, मध्यमं,साधारण आणि` ढ`असे मुलांचे प्रकार करण्यात येऊ लागले.मेरीट नावाची एक फुलपटटी तयार करण्यात आली. त्याने त्यांच्या बुदधीची मापे घेण्यात येऊ लागले.एकाच तराजूत सा-याना मोजले जाऊ लागले.

ललित लेखनाचा प्रकार

अधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान

माणसाने विवेकाचा, शिक्षणाचा, आधुनिकतेचा कितीही टेंभा मिरवला तरी गैरसोईचे सत्य पुढे आले की तो गडबडुन जातो, चवताळतो. हे गैरसोईचे सत्य मी-मी म्हणणार्‍या लोकांना अडचणीत आणते. मग मूळ प्रश्न शिताफीने नाकारून तो प्रश्न उजेडात आणणार्‍याला सुळावर चढविण्याचे उद्योग होतात.

हे सर्व ठाऊक असून आज एक गैरसोईचे सत्य मला सांगायचे आहे. हे सत्य सांगायचे आणि स्वीकारायचे धाडस फार थोडे लोक करतील.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

"फिकट सूर्य आणि आंबा खाणारी बाई"

आज तर करड्या हिवाळी धुरकटपणाने
मंदावलेला सूर्य फिकट मोतिया रंगही
दाखवत नव्हता, वर्षातला सर्वात निस्तेज दिवस!
त्यामुळे पार्किंग लॉटमधल्या शेजारच्या गाडीत
सूर्याला पाहून चकणाच झालो,
एक बाई आवेगाने त्याचे मुके घेत होती,
अफाट देखण्या सूर्यावर भाळली होती जबरदस्त ,
त्याच्या मिशांतून पाझरणारा गोडवा
आपल्या दातांनी खेचून घेण्याच्या प्रयत्नांत
तिची कांती चेतून उठलेली दिसत होती,
त्या सूर्याच्या असूयेत मी निरखून पहिले:
तो एखादा पुरुष आहे कि काय म्हणून,
मंद उजेडात नीटसे दिसत नव्हते,
अखेर दिसले की ती खातेय एक आंबा,

तुकडे

पेशी दुंभगतात आणि जोडून राहतात
असे काही तुकडे.
शिवण घालून जोडले जातात, अंगचेच होतात
असे गोधडीसारखे काही तुकडे.

माझे आणि माझ्या जगाचेही.
जगाचा एक तुकडा माझ्या एका तुकड्याला ओळखतो.
दुसरा दुसर्‍याला.

जग तुकड्यापुरतं
मीही तुकड्यापुरतीच.

अनोळखी तुकड्यांची वाट दिसत नाही,
बघाविशी वाटत नाही
जगाला आणि मलाही.

जगाला मी कळलेली असते आणि मला जग.
- नी