मानवी स्पंज आणि स्प्रिंग!
तुम्ही दु:खात आणि ताणतणावात असाल तर शक्यतो कुणाला सांगू नका. कारण दु:खावर खरी सहानुभूती देणारे तुम्हाला भेटणार नाहीत किंवा खूपच कमी भेटतील. उलट तुम्ही दु:खी मन:स्थितीत किंवा समस्यांनी वेढलेले आहात हे पाहून तुम्हाला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न जरूर होईल. त्या मन:स्थितीचा फायदा घेतला जाईल. उदाहरण द्यायचे झाले तर आधीच चोळामोळा झालेला कागद रस्त्यावर पडलेला असला तर त्याला आणखी पायाखाली दाबून किंवा आणखी चोळामोळा करणारे आणि समुद्रात फेकून देणारे लोक जास्त असतील.
- Read more about मानवी स्पंज आणि स्प्रिंग!
- 19 comments
- Log in or register to post comments
- 8618 views
माझी शाळा सृजन आनंद -१
ऐसी वर सध्या अपारंपरिक , पर्यायी शाळा वगैरे जी चर्चा चालू आहे ती खरेतर कारणीभूत झाली. अंतरानंद ह्यांच्या धाग्यावर प्रतिसाद देताना जाणवलं कि ह्या प्रकारच्या अपारंपरिक ( मला सेमी पारंपारिक म्हणायला आवडेल ) अशा शाळेत मी १ली ते ४थी शिकले. माझ्याकडे विद्यार्थी point of view ने माझे शाळेतील अनुभव नंतर शाळा बदलल्यावर (नाईलाजाने बदलावी लागली कारण हि शाळा फक्त ४थी पर्यंतच होती ) पारंपारिक शाळेतील अनुभव, (रूळ बदलताना झालेला खडखडाट ) आणि त्याही पलीकडे जाऊन पुढील आयुष्यात जाणवलेला शाळेचा प्रभाव हे खूप काही सांगण्यासारखं आहे.
- Read more about माझी शाळा सृजन आनंद -१
- 35 comments
- Log in or register to post comments
- 28129 views
मूचो मांस, ग्रासियास!
फोटोंसकट वाचण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.
- Read more about मूचो मांस, ग्रासियास!
- 12 comments
- Log in or register to post comments
- 13640 views
मनातील छोटे मोठे प्रश्न -भाग ३९
Taxonomy upgrade extras
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
_______________
मला एक शंका आहे. ४०१ क / ५२९ मध्ये पैसे टाकताना, खालील अनेक विकल्प असतात. तेव्हा एखादा विकल्प ऋणमध्ये गेलेला असतो (त्याच्या शेअर्स चा भाव पडलेला असतो वाटतं) तर एखादा धन असतो.
- Read more about मनातील छोटे मोठे प्रश्न -भाग ३९
- 98 comments
- Log in or register to post comments
- 47432 views
निसर्ग नियम आणि मानवी जीवन..!!
हे जग निसर्गनियमानुसार चालते. म्हणजे जे पेरले ते उगवते. तसेच पुन्हा पुन्हा पेरले की पुन्हा पुन्हा उगवते. त्या नियमानुसार कोणतीही गोष्ट करण्यासाठी कधीही वेळ "निघून गेलेली" नसते. वेळ/काळ परत परत येत राहतो. जीवन आपल्याला पुन्हा पुन्हा संधी देत असते. ती आपल्याला फक्त दिसली पाहिजे. जीवनाकडे सकारात्मक दृष्ट्या पाहिल्यास काहीही अशक्य नसते. प्रयत्न करीत राहावे आणि फळ निसर्गावर सोडून द्यावे. चांगल्या गोष्टी पेरत जाव्या. निसर्ग नियमानुसार फळ मिळतेच. चांगल्या कर्माचे फळ चांगले मिळते आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळते. चांगले कर्म करा आणि चांगल्या फळाची अपेक्षा जरूर करा.
- Read more about निसर्ग नियम आणि मानवी जीवन..!!
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4444 views
एक पुरातन व्यापार केंद्र; तगर -भाग 3
गाभाऱ्यातील शिवलिंगाची पूजा अजूनही केली जात असलेले, तेर गावातील उत्तरेश्वर मंदीर, एक गाभारा सोडला तर आज पूर्णपणे भग्नावशेष स्वरुपातच दिसते. एके काळी मंदिराच्या बाह्य प्रवेशद्वाराचा भाग असलेली लाकडी चौकट मात्र अजूनही उभी आहे. इतकेच म्हणता येते की 1901 मध्ये, हेनरी कुझेन्स याने जेंव्हा या मंदिराला भेट दिली होती तेंव्हा मंदिराचे एकूण स्वरूप आजच्यापेक्षा थोडे जास्त उजवे होते आणि त्यामुळे कुझेन्सला काही निरीक्षणाची नोंद करणे शक्य झाले होते. कुझेन्स आपल्या निरीक्षणात म्हणतो:
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about एक पुरातन व्यापार केंद्र; तगर -भाग 3
- 5 comments
- Log in or register to post comments
- 10736 views
[मुलाखत] गोवंशहत्याबंदी कायदा: १० लाख लोकांना बेरोजगार करणारा कायदा - श्री विजय दळवी
गोवंशहत्याबंदी कायदा महाराष्ट्रात लागू झाला. गायीसोबत, बैल व वासराचे मांस (बीफ) साठवणे, विकणे वा बाळगणे हा गुन्हा घोषित झाला. ही बातमी वाचल्यावर ’ऐसी अक्षरे’वरही थोडी चर्चा झाली होती. तदनंतर हा निर्णय किती उपयुक्त आहे हे काही दिवसांत कळेलच असे म्हणून मी नंतर या विषयाकडे दुर्लक्ष केले. दरम्यान योगायोगाने माझे बोलणे श्री. विजय दळवी यांच्यासोबत झाले आणि या विषयाशी संबंधित इतर अनेक बाबतीतली माहिती मला मिळाली, आमच्यात झालेल्या लहानश्या चर्चेचा/गप्पांचा गोषवारा ऐसीकरांना लेखरूपात वाचायला आवडेल व काही अधिकची तथ्ये वाचकांना समजतील या उद्देशाने हा लेख लिहीत आहे. श्री.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about [मुलाखत] गोवंशहत्याबंदी कायदा: १० लाख लोकांना बेरोजगार करणारा कायदा - श्री विजय दळवी
- 83 comments
- Log in or register to post comments
- 37292 views
शाळा: पर्यायी आणि पारंपारिक
ह्या धाग्याच्या निमित्त्याने माझे अनुभव. लेख छोटा करायचा प्रयत्न केलाय पण जमलेलं नाही परंतु मनने माझ्याशी बोलुन इथे लिहीलय त्याची पुनरावृत्ती टाळलीय.
काल परवा चक्क पाउस पडला. पाउस आला की मला शाळा आठवते. ते नविन दप्तर, नव्या वह्या पुस्तकांचा वास आणि हो "यावर्षी मी पहिल्या दिवसापासून अभ्यास करणार" हा पावसाळी अळंब्यांसारखा चारच दिवस टिकणारा निर्धार.
- Read more about शाळा: पर्यायी आणि पारंपारिक
- 139 comments
- Log in or register to post comments
- 62912 views
एक कोडे: मोरी आणि स्वयंपाकघर
कायमच स्थलांतर
भाड्याचे घर
अनेक बोल्यांची
एक भाषा
वरील ओळी वाचून न वाचल्यासारखे करणे
याचा भाषेशी संबंध असावा का
- Read more about एक कोडे: मोरी आणि स्वयंपाकघर
- 16 comments
- Log in or register to post comments
- 6542 views
तो आणि आपण
काहीतरी भव्यदिव्य करून दाखवायचं हे त्याने फार लहानपणीच ठरवलेलं. तो कोण कुठचा कोणाला माहीत नाही.कसा दिसायचा कसा वागायचा कुणाला कल्पना नाही. पण तुमची स्वप्न तुम्हाला कधी तुमची जातकुळी विचारत नाहीत. एक नक्की कि जेव्हा तो होता तेव्हा त्याला खेळायला बऱ्याचशा गोष्टी होत्या. अर्थात सगळ्याच लहान मुलांप्रमाणे त्याचा आवडीचा खेळ होता गोट्या खेळणे. आठ नऊ गोट्या असाव्या त्याच्याकडे त्यांच्यासोबत एकटाच खेळत असायचा. रांगेने सगळ्या मांडून ठेवायचा आणि मग एका मागोमाग एक सगळ्या फटाफट गलीत मारायच्या. सगळ्या रांगेने ,मांडल्या कि त्यातली एक गोटी नेहमी त्याचं लक्ष वेधून घ्यायची.
- Read more about तो आणि आपण
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2565 views