Skip to main content

जुन्या काळचे खेळातले बांधणी संच

सध्या माझी नात (वय वर्षे 8) आमच्याकडे रहायला आली आहे. काल रात्री झोपताना मी तिच्याशी गप्पागोष्टी करत होतो. त्या वेळेस मी तिला सहज विचारले की तुझी आवडती पुस्तके व खेळ कोणते आहेत? मला उत्तर देण्याऐवजी तिने मलाच प्रतिप्रश्न केला की मी लहान होतो तेव्हाची माझी आवडती खेळणी कोणती होती? आणि तिला त्या खेळण्याबद्दल ऐकायला आवडेल. खरे तर तिचा प्रश्न ऐकून मी चक्रावूनच गेलो होतो कारण खरे सांगायचे तर मला माझ्या लहानपणचे एकही खेळणे त्या क्षणाला मला आठवत नव्हते.

डार्क चॉकलेट ट्रफल्स

_DSC0282

काही वर्षांपूर्वी एरो चॉकलेट्सची एक जाहिरात पाहिली... त्यातला मदनाचा पुतळा बरंच काही बोलतो पण एकूण त्या जाहिरातीत लक्ष इतकं विचलित होतं...:p की काही मोजकेच शब्द ऐकू येतात. जसे "चॉकलेट ३६ अंश तापमानाला वितळतं" वगैरे. अर्थात या शब्दांखेरीज बाकीचं काहीच महत्वाचं तो बोलत नाही हे एकदा डोळे मिटून ऐकल्यावर कळलं.

तंत्र विद्येची ओळख

Taxonomy upgrade extras

अति-प्राचीन भारतीय वैदिक परंपरेत चार वेद आणि सहा दर्शने आहेत . परंतु पुराण-काळात म्हणजे इ.स.पूर्व १००० पासून भारतीय अध्यात्माला बदनाम करणारा वामाचारी पंथ अस्तित्वात आला . मूळ तंत्र विद्या ही कुंडलिनी जागरण आणि आत्मसाक्षात्कार /सिद्धी-साधना या उद्दिष्टा साठी होती .परंतु काही स्वार्थी /लबाड आणि आसुरी प्रवृत्तीच्या लोकांनी वामाचारी तंत्र-मंत्र विद्या चा प्रचार-प्रसार केला .

भारतीय अध्यात्म आणि मेट्रीक्स

मेट्रीक्स चित्रपट पाहताना पौर्वात्य मनाला ओळखिचे काहीतरी जाणवत असते. त्यातही आपण भारतीय मंडळी तर पटकन आपल्या अध्यात्मातील दाखले देऊन चित्रपटाशी असलेले भारतीय तत्वज्ञानाचे साम्य दाखवु लागतो. साम्य पाहायला गेले तर आहेच यात शंका नाही. मात्र ते पाहताना विरोध कुठे आहे याकडे लक्ष दिले पाहिजे तरच या विषयाचा नीट मागोवा घेतल्यासारखे होईल. साम्य पाहण्याच्या नादात विरोधाकडे बहुतेकांचे संपुर्ण दुर्लक्ष झालेले दिसते. या लेखात साम्य व विरोध या दोन्हींचा परामर्ष घेण्याचा विचार आहे.

समीक्षेचा विषय निवडा

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो.

भारतीय प्रजासत्ताक ६५व्या वर्षात पदार्पण करतआहे.२६जानेवारी१९५०रोजी भारतीय घटना हि अमलात आणली गेली.नि भारत हा एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला. ह्यापूर्वी आपला हा देश एकसंघ नव्हता. ह्या देशाच्या तुकड्या तुकड्यावर अनेक राजे राज्य करत होते त्यांची जि संस्थाने होती ती सार्वभौम होती. हि संस्थाने म्हणजे वेगळे देशच होते. त्यांच्या सतत आपापसात लढाया होत दुसर्याचे राज्य बळकावून आपले राज्य मोठे कसे करता येईल ह्या दृष्टीने ते प्रयत्न करत. इंग्रजांनी ह्या साऱ्या राजांना हरवून आपला एकछत्री अंमल सुरु केला तेव्हा त्याला एका अखंड देशाचे स्वरूप आले.

बॉम्बस्फोट आणि शहर

तरतरीत सकाळ
चकचकीत शहराची
नेहमीची गजबज
सरावल्या गर्दीची

लख्ख उजेडात
दिपला गोळा
अनुभवला दुर्मिळ
स्फोटाचा सोहळा

रूपेरी ढगांना
किनार अंधारी
कोंदू पाहते
जमीन सारी

कायापालट तिथे
झालेला असा
मघाचा रस्ताही
दिसेना कसा?

भोवताली कोण?
बोलेना कोण!
बोलले कोण?
ऐकेना कोण!

कामाचे हात
कायमचे निवांत
कोवळ्या स्वप्नांची
नजर नभात

रूग्णवाहिकांचे
ध्वनिक्षेपकांचे
मिसळले आवाज
जिवंत शरीरांचे

आकांत आक्रोश
बडवून छाती
अनवाणी मनाची
क्षणात माती

भारतीय राजकारण व लोकसभा निवडणूका - २०१४

Taxonomy upgrade extras

सदर धागा तत्कालीन राजकीय चर्चा, मते व अन्य स्वरूपाचे लेखन करण्यासाठी काढत आहे.
विदा/संदर्भ देऊन केलेले दीर्घ-विश्लेषणात्मक लेखन सोडल्यास सदर विषयाशी संबंधीत सर्व लेखन या धाग्यावर करावे अशी विनंती करतो.

या विषयाशी समांतर लेखन नव्या धाग्यात काढल्यास ते लेखन या धाग्यावर हलवण्यात येईल याची नोंद घ्यावी!
कोणते लेखन या धाग्यात हलवायचे याचा निर्णय संपादकांचा असेल.

मराठी ट्विटर?

ऐसी अक्षरे या संकेतस्थळाचा एक (वाढीव) भाग या स्वरूपात Microblogging सुरु करता येईल का?
१. संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची आणि लेखन करणार्‍यांची संख्या यामुळे वाढेल.
२. लांबलचक प्रतिसाद देण्याचा कंटाळा येऊन शेवटी काहिच लिहिले नाही, असे होणार नाही (अशी आशा आहे.) ़कदाचित सभासदांची प्रतिसाद देण्याची इच्छाशक्ती आणि सहभाग वाढू शकतो.
३. काही ट्रोल आय.डी. चे प्रतिसाद १४० अक्षरांत संपतील. :D

स्थानिक भाषेत ट्विटर ही कल्पना नवीन नाही. उदा. http://en.wikipedia.org/wiki/Sina_Weibo