Skip to main content

निबंध

एका नास्तिकाची धार्मिकता

सतीश तांबे म्हणतो, 'आस्तिक आणि नास्तिक हे विरुद्ध अर्थाचे शब्द नाहीतच.' याचं उत्तम उदाहरण पुस्तकी आहे. आयन रँडच्या ’फाउंटनहेड’ मधला हॉवर्ड रोर्क म्हणतो, ’मी आर्किटेक्ट झालो कारण माझा देवावर विश्वास नाही. हे जग जसं आहे, तसं मला आवडत नाही, ते मला बदलावंसं वाटतं.’ पुढे रोर्ककडे हॉप्टन स्टोडार्ड जेव्हा देऊळ बांधण्याचा प्रस्ताव घेऊन येतो तेव्हाही रोर्कचं तेच म्हणणं असतं: मी देऊळ कसं बांधू? माझा देवावर विश्वास नाही. पण एल्सवर्थ टूहीने पढवलेला हॉप्टन अत्यंत आत्मविश्वासाने त्याला ऐकवतो, ’मला नको सांगूस, तू नास्तिक आहेस म्हणून; तुझ्या धर्मपालनाची साक्ष तू निर्माण केलेल्या वास्तूच देताहेत!’

ललित लेखनाचा प्रकार

छोट्या बाल्कनीतलं बागकाम!!!

इथं रहायचं का राहतं घर सोडायचं हा निर्णयचं अनेक वर्ष बासनात गुंडाळल्यानं, घर नको असलेल्या वस्तुंनी गच्च भरलेलं. घरातल्या वस्तूंना डाव्या- उजव्या डोळ्यानं बघायला लागल्यानं नको असलेलं ठळक होत गेलं. हे कशाला हवं ? ते कशाला हवं ? असं होत होत संपूर्ण घरंच रिकामं होईल एव्हढी मोठी यादी तयार झाली. जुने लोखंडी रॅक, कोठ्या, प्लग, होल्डर, वायर, पणत्या, बोळके, जुने आकाशकंदील, जुने कपडे, नको असलेली भांडी- कुंडी, पुस्तकं, फोटो, देवाच्या तसबिरी, दिवाळी गिफ्ट्स. एक टेम्पो भरेल इतकं सामान झालं.

ललित लेखनाचा प्रकार

माझा गोड बालवाडी शिक्षक

bahurupi p l deshpande

मुंबईच्या उपनगरात राहणाऱ्या, मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या, घरी टेपरेकॉर्डर, टीव्ही असणाऱ्या आणि लायब्ररीसाठी पैसे मागितले तर लगेच मिळणाऱ्या अनेक लोकांच्या आयुष्यात हा माणूस जशा प्रकारे आला त्याचप्रकारे माझ्याही आयुष्यात आला. त्याने माझं वाचनविश्व समृद्ध करून टाकलं.

ललित लेखनाचा प्रकार

विश्वस्तवृत्तीकडे वाटचाल्

या जगाकडे पाहण्याचे दोन दृष्टीकोण आहेत- एक असा की हे विश्व निराधार नि निरीश्वर आहे. दुसरा असा की ते साधार नि ईश्वरप्रणित आहे. निराधार विश्व आपसूकच निरर्थक ठरतं. कारण शेवटी अशा विश्वातली प्रत्येक गोष्ट ही केवळ भौतिक स्वरुपाची असते. आणि स्वतःचे अस्तित्व असल्याचे भान असलेल्या, स्वतःस मुक्तेच्छा आहे असे मानत असलेल्या, बुद्धिमान, विवेकी, विचारी मनुष्यजातीस आपण केवळ करकच्च नियमांनी बांधलेले एक भौतिक पदार्थ आहोत असं सांगणं म्हणजे त्याच्या स्वतःसकट सगळं काही निरर्थक आहे असं सांगीतल्याजोगं आहे.

ललित लेखनाचा प्रकार

मराठी यु ट्यूब वर बदलते वारे

कोरी पाटी प्रोडक्शनच्या "गावाकडच्या गोष्टी" च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी यू ट्यूब वर ग्रामीण भागातल्या वेब सिरीजचा ऊत आला आहे. कोरी पाटी चे वेगळेपण असे की अतिशय अल्पावधीत त्यांनी "भाडीपा" सारख्या स्टार कास्ट असलेल्या मराठी चॅनेल पेक्षा दुप्पट सबस्क्रायबर्स मिळवले आहेत. तुम्हाला हे चॅनेल माहीत नसेल तर त्यांचा हा इंटरव्ह्यू पहा.
https://youtu.be/DuKodeZd_ms

ललित लेखनाचा प्रकार

आकलन व आत्मभान ..

आपण जे विचार अगदी मनापासून मांडतो आहोत , ते ऐकणाऱ्याला वाचणाऱ्याला खरतर अंशतःच समजत आहेत ; आणि म्हणून स्वतःच्या उक्ती-कृतींचा विपर्यास होतो आहे याची जाणीव झाली की हताश अर्थशुन्यता वाटते . गैरसमजांमुळे विनाकारण मतभेद व मनस्ताप होतो , पण यातून उद्भवणाऱ्या भावनाविवशतेला लवकरात लवकर निकराने बाजूला सारून बौध्दिक पातळीवर या परिस्थितीचे तार्किक विश्लेषण केल्यास , असे लक्षात येते की स्वतःची गृहीतके , धारणा , पूर्वानुभव व पूर्वग्रह हे इतरांच्यापेक्षा निराळे असल्याकारणाने; इतरांना त्याच भाषेतील त्याच शब्दांचे निराळे व वेगळ्याच वजनाचे अर्थ प्रतीत होत असतात .

ललित लेखनाचा प्रकार

माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं.

मायबोली संकेतस्थळावर आमचा एक गप्पांचा कट्टा आहे. तिथे एकदा सहज गप्पा मारता मारता तेथील अक्षय नावाच्या एका मित्राने सगळ्यांना 'माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं?' ह्या विषयावर एक निबंध लिहिण्याची विनंती केली होती. त्याला अनुसरून मी तेथे खालील निबंध लिहिला. आपल्या सर्वांच्या वाचनाकरिता तोच निबंध मी खाली देत आहे.

विषय :- माझं लिहणं (कथा/कविता/ललित) कसं सुरू झालं.

ललित लेखनाचा प्रकार

चार्ली चाप्लीन – प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!

चार्ली चाप्लीन – प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
( एका थोर व्यंगचित्रकाराने म्हणजे बाळासाहेब ठाकरे ह्यांनी चार्लीचे काढलेले व्यंगचित्र )

ललित लेखनाचा प्रकार