वैद्यकीय इच्छापत्र

२२ ऑगस्ट २०१५ रोजी कोथरुड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात माझ्या सुखांताचा माझा विचार या विषयावर परिसंवाद झाला होता.खाली नमूद केली वैद्यकीय इच्छापत्र हे नमुन्या दाखल आहे. यात प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार बदल करु शकते. ऎड असीम सरोदे यांनी स्थापन केलेल्या सहयोग ट्रस्ट तर्फे इच्छामरण या विषयावर समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. डॉ शिरीष व डॉ आरती प्रयाग ( वैद्यकीय क्षेत्र) असीम व रमा सरोदे ( कायदा क्षेत्र) मंगला आठलेकर, डॉ रोहिणी पटवर्धन ( वृद्धकल्याणशास्त्र) शुभदा जोशी, विद्या बाळ व रविंद्र गोरे असा एक गट या विषयावर काम करतो आहे. वैद्यकीय इच्छापत्रा आधारे इच्छामरणाला कायदेशीर आधार मिळवण्यासाठी सहयोग ट्रस्ट काम करत आहे. आपण जर हे वैद्यकीय इच्छापत्र संमती व शक्य असल्यास त्यांचे कडे पाठवले तर जनहित याचिकेला जोडता येईल.
सहयोग ट्रस्ट
१, प्रथमेश सहकारी गृहरचना सोसा, प्रभात रोड गल्ली नं ५, पुणे ४११००४
फोन नं- ०२० २५४५९७७७
sahayogtrust.in

वैद्यकीय इच्छापत्र

माझे कुटुंबीय,माझ्या आरोग्याबाबत आस्था बाळगणारी मंडळी आणि माझे डॉक्टर यांच्यासाठी मी हे वैद्यकीय इच्छापत्र लिहून ठेवत आहे.

मी------------------------------------------------------------------------------------------------------------------
जन्मतारीख-.--------------------------------------------------- वय------------------------------------------------
माझा पत्ता-----------------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१) मी मृत्युशय्येवर असेन, लवकरच मरण्याची शक्यता दिसत असेल, आणि मी बोलण्याच्या परिस्थितीत नसेन अशा अवस्थेत माझ्यावर केल्या जाणार्याच उपचारांसंदर्भात मी हे वैद्यकीय इच्छापत्र करुन माझी इच्छा स्पष्टपणे नोंदवून ठेवत आहे
२) आपल्या राज्यघटनेत नमूद केलेल्या, जगण्याचा अधिकार या संकल्पनेची, तसेच अविष्कार स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काची मला पूर्ण माहिती आहे. सन्मानाने जगणे व सन्मानाने मरणे या भूमिकेला माझा पूर्ण पाठिंबा आहे.
३) माझ्या आजारपणात मला जगवण्यासाठी जे उपचार केले जातील त्यासंबंधी स्पष्ट सूचना मी माझ्या संबंधीतांसाठी पुढीलप्रमाणे लिहून ठेवत आहे.
अ) मी मरणाच्या दारात असेन ,किंवा गाढ बेशुद्धीत असेन, तर माझा मृत्यू लांबवण्याकरिता काहीही उपचार करु नयेत, शरीराला सुया टोचून औषधोपचार करण्याचा किंवा कृत्रिम साधनांच्या मदतीने मला जगवण्याचा प्रयत्न कृपया करु नये.कारण अशा अवस्थेत आपल्या परावलंबनाचे ओझे इतरांवर टाकणे आणि जगत राहणे हे मला कीव करण्यासारखे आणि म्हणुनच घृणास्पद वाटते.
ब) अशा प्रकारे केवळ जगवण्यासाठी जर उपचार सुरु झाले असतील आणि तेही मला सन्मानाचे जिणे जगण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार नसतील तर मला असे निरर्थक जीवन जगण्याची अजिबात इच्छा नाही. म्हणुन हे उपचार ताबडतोब थांबवावे अशी माझी आग्रहाची विनंती आहे.
क) मी असाध्य रोगाने आजारी आहे, एकूणच जगण्याच्या शक्यता मंदावल्या आहेत, किंवा बेशुद्धीतून मी बाहेर येण्याची ही आशा नाही, अशा अवस्थेत मला कृत्रिमरित्या अन्नपाणी देउन जगवण्याचा खटाटोप करु नये. मला आग्रहपूर्वक सांगायचे आहे की,मला अशा परिस्थितीत कृत्रिम रित्या जिवंत ठेवण्याचे सारे उपचार मी नाकारु इच्छितो/ इच्छिते.
ड) मला माहित आहे की,मी काहीही इच्छा नोंदवून ठेवली असली तरी वैद्यकीय तज्ञांशी सल्लामसलत, विचारविनिमय केला जाईल; पण मला ठामपणे म्हणायचे आहे की, याबाबत कायदा असे स्पष्टपणे सांगतो की, अशा परिस्थितीत माणुस स्वत: बोलू शकत नसेल तर त्याच्या इच्छापत्राचे ऐकावे.म्हणुनच माझ्या बाबतीत या संदर्भातील निर्णयाची जबाबदारी घेणार्या सर्वांना माझी पुन:पुन्हा विनंती आहे की, माझ्या वैद्यकीय इच्छापत्राचा मान राखला जावा.
४) माझ्यावर प्रेम करणार्यान, माझ्याविषयी आस्था बाळगणार्‍या सार्‍यांसाठी या इच्छापत्रातून सांगू पहात आहे की, ज्यावेळी कृत्रिम जीवनाधारांच्या मदतीनंतरही मी पुन्हा पहिल्यासारखा स्वावलंबी सहज जीवन जगू शकणार नाही, त्यावेळी तशा अवस्थेत जिवंत राहण्याची माझी इच्छा नाही. त्यावेळी मी सुदृढ मनाने निर्णय घेण्याच्या अवस्थेत मी नसेन, म्हणुनच इथे विचारात घेतलेल्या शक्यतांच्या पलिकडे तुम्हाला काही विचार करुन निर्णय घेण्याची वेळ आलीच तर सन्मानाने जगणे आणि तसेच सन्मानाने मरणे या माझ्या ध्यासाची तुम्ही आठवण ठेवा. हे वैद्यकीय इच्छापत्र मी कुणाच्या दबावाखाली नव्हे तर स्वत:च राजीखुषीने करत आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सध्या असे इच्छापत्र करता येत नाही का?अशी बरीच इच्छापत्रे जमली की त्यासाठी मग एक रीतसर कायदा आणि मागणी करण्याचा विचार आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय सध्या ते कायदेशीर नाही. पण बेकायदेशीर ही नाही त्यामुळे त्याचे इंटर्प्रिटेशन केले जाते. सुस्पष्ट कायदा येण्यासाठी ही चळवळ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सध्या असे पत्र तयार केले आणि त्यावर संबंधितांनी अंमल केल्यास खालील कायद्याचे उल्लंघन होते.

Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007

"maintenance" includes provision for food, clothing, residence and medical attendance and treatment

शिवाय

An application for maintenance under section 4, may be made -
by a senior citizen or a parent, as the case may be; or
if he is incapable, by any other person or organisation authorised by him; or
the Tribunal may take cognizance sua motu

याचे काय होईल?

इथे या कायद्याचा मसुदा पहायला मिळेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हा मुद्दा कुणाच्या लक्षात आला नव्हता. कायदा नसला तरी विशिष्ठ परिस्थितीत हे प्रॅक्टीस मधे आहे.
डॉ प्रयागांनी एक किस्सा सांगितला. एका प्रतिथयश वयोवृद्ध व्यक्ती बाबत मल्टिपल फेल्युअर ची केस होती. मुलगा व पत्नी यांनी दयामरणाबाबत अनुकुलता दाखवली. त्याबाबत त्यांनी तसे लिहून दिले. शेवटी आता लाईफ सपोर्ट सिस्टिम काढायचे ठरवले. तेवढ्यात फिल्मि स्टाईल एक मुलगी हॉस्पिटल मधे आली व तिने कुणाच्या आदेशाने हे करता? मी तुमच्यावर कोर्टात केस करीन वगैरे भाषा केली. ती रुग्णाची मुलगी होती. तिला आई व भावाने विश्वासात घेतले नव्हते. मग हा कार्यक्रम रद्द झाला. त्यानंतर काही दिवसानी ती शांत झाली व परिस्थिती पाहून तिनेही अनुकुलता दर्शवली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

बरोबर आहे नितिन थत्ते.अगोदरच्या एका कायद्याला छेद देणारा दुसरा कायदा आणणे अवघड असते.अशी खटपट करण्यापेक्षा एकेका केसमध्ये निर्णय करायला सोपे जाते.केइएम मधल्या शानभागसाठी कुठे कायदा फिरवला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनुष्य अत्यवस्थ अवस्थेत गेला तर वापरायचे ते Living Will. कॅनडामध्ये त्या त्या प्रान्ताच्या कायद्यानुसार केलेले त्याचे कच्चे मसुदे काही स्वयंसेवी संस्था उपलब्ध करून देतात, तरीहि त्यांचा सल्ला असतो की प्रत्यक्ष असे Living Will योग्य वकिलाकडूनच करवून घ्यावे.

अशा Living Will सोबतच आर्थिक आणि अन्य निर्णयांसाठीहि Power of Attorney करवून घेतात आणि कोणा एका व्यक्तीला अत्यवस्थ वा मानसिक दृष्ट्या दुर्बल (डिमेन्शिया, अल्झाइमर इ.) व्यक्तीच्या वतीने आर्थिक निर्णय घेण्याचा वा त्या व्यक्तीच्या नावे आर्थिक व्यवहार बघण्याचा अधिकार दिला जातो.

Living Will आणि Power of Attorney हे दोन्हीहि सारखेच महत्त्वाचे आहेत आणि ते वेळच्यावेळी तयार करून घेणे हिताचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या विषयावर "जगायचीही सक्ती आहे" हे मंगला आठलेकर यांचे पुस्तक या विषयावरच आहे. अत्यंत उत्तम पुस्तक आहे.
http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=537076155293328...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

वाचते आहे. विषय गंभीर तर आहेच पण कायद्याचा दुरुपयोग देखील होता कामा नये उदा - बळजबरीने असे लिव्हिंग विल करुन घेणे Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जे लोक अशा प्रसंगाला सामोरे गेले असतील त्यांना या इच्छापत्रातली निरर्थकता पूर्णपणे जाणवेल.

माझ्या आजारपणात मला जगवण्यासाठी जे उपचार केले जातील त्यासंबंधी स्पष्ट सूचना मी माझ्या संबंधीतांसाठी पुढीलप्रमाणे लिहून ठेवत आहे.

कोणतीच स्पष्टता नसलेल्या मजकुराबाबत असं म्हणण्यात अर्थ नाही. त्यात स्पष्टता आणणं शक्यही नाहीये. यात इच्छापत्र करणार्‍याच्या उद्देशाविषयी किंवा प्रामाणिकपणाविषयी काहीच शंका घेऊ नये.

बॉटमलाईन अशी की बर्‍याच केसेसमधे वरच्या इच्छापत्रातली कंडिशनल इच्छा कम आज्ञा कम विनंती अंमलात आणणं अशक्य होऊ शकतं.

आता पुन्हा काही भाग अधोरेखित करुन पाहू.

अ) (जर) मी मरणाच्या दारात असेन ,किंवा गाढ बेशुद्धीत असेन, तर माझा मृत्यू लांबवण्याकरिता काहीही उपचार करु नयेत, शरीराला सुया टोचून औषधोपचार करण्याचा किंवा कृत्रिम साधनांच्या मदतीने मला जगवण्याचा प्रयत्न कृपया करु नये.कारण अशा अवस्थेत आपल्या परावलंबनाचे ओझे इतरांवर टाकणे आणि जगत राहणे हे मला कीव करण्यासारखे आणि म्हणुनच घृणास्पद वाटते.

ब) अशा प्रकारे केवळ जगवण्यासाठी जर उपचार सुरु झाले असतील आणि तेही मला सन्मानाचे जिणे जगण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार नसतील तर मला असे निरर्थक जीवन जगण्याची अजिबात इच्छा नाही. म्हणुन हे उपचार ताबडतोब थांबवावे अशी माझी आग्रहाची विनंती आहे.

वरवर असं वाटेल की नातेवाईकांचं निर्णयाचं काम सोपं झालंय.. पण उपरोक्त वाक्यांतील "जर, तर"कडे सूक्ष्म लक्ष दिल्यास असं लक्षात येईल की एरवीसुद्धा अशी परिस्थिती आल्यावर नातेवाईकांवर निर्णय घेण्याची जी अवघड जबाबदारी येते त्यात या खास लेखी नोंदवलेल्या कंडिशनल वाक्यांनी आणखी अवघडपणा आणला आहे. आजारी व्यक्तीचं वय अगदी नव्वदीपार असेल तर तर्काने कदाचित काही ठाम अंदाज बांधता येतीलही, पण त्याहून कमी वयाच्या व्यक्तीबाबत उपचार केल्यानंतरचा आउटकम अनेक केसेसमधे नक्की सांगणं डॉक्टर्सना शक्य नसावं. अनेक आजारांमधे दीर्घकालीन लाईफ सपोर्ट, "वन डे अ‍ॅट अ टाईम" तत्वावर केवळ जगविण्यासाठी दिली जाणारी इंजेक्शन्स वगैरे महिनोन महिने देऊन व्यक्ती परत माणसांत येऊ शकते. त्यानंतर त्या व्यक्तीची क्वालिटी ऑफ लाईफ कशी असेल याविषयी ठामपणे विधान करणं कोणालाच शक्य नसतं.

मान्य आहे की कदाचित ८०% केसेसमधे डॉक्टर हे अनुभवाने निश्चित सांगू शकत असतील की या उपचारांनी आजार बरा होणार नाहीये आणि स्थिती अजिबात सुधारणार नाहीये. अशा निश्चित केसेसमधे वरील इच्छापत्र कदाचित लागू पडेल. पण इतर बर्‍यास केसेसमधे हे ठरवणं शेवटी नातेवाईक आणि डॉक्टर्स यांच्या स्वतःच्या तारतम्यावरच अवलंबून असेल.

क) मी असाध्य रोगाने आजारी आहे, एकूणच जगण्याच्या शक्यता मंदावल्या आहेत, किंवा बेशुद्धीतून मी बाहेर येण्याची ही आशा नाही, अशा अवस्थेत मला कृत्रिमरित्या अन्नपाणी देउन जगवण्याचा खटाटोप करु नये. मला आग्रहपूर्वक सांगायचे आहे की,मला अशा परिस्थितीत कृत्रिम रित्या जिवंत ठेवण्याचे सारे उपचार मी नाकारु इच्छितो/ इच्छिते.

पुन्हा एकदा.. ब्रेनडेड किंवा तत्सम केसेसखेरीज अशी व्यक्ती जगण्याची कितपत शक्यता आहे हे १+१=२ असं गणितासारखं सांगणं वैद्यकशास्त्रात शक्य असतं असं वाटत नाही. म्हणजे शेवटी नातेवाईकांवर आणि डॉक्टरवर ती अवघड निर्णयप्रक्रिया पडणारच आहे. माझ्यासमोर "नळ्या काढून टाकूया, त्यांना शांतपणे मरु दे" म्हणून आग्रह झालेल्या केसेस पुढे रिकव्हर होऊन दीर्घकाळ जगल्या आहेत आणि दुसर्‍या बाजूला प्रत्यक्ष नळ्या लावून बरेच दिवस त्या अवस्थेत पडल्यावरही जीवनेच्छा प्रबळ उरलेली काही माणसंही पाहिलेली आहेत. जीवनेच्छा ही आधीच डिक्लेअर करुन ठेवण्यासारखी गोष्ट आहे यावर विश्वास उरलेला नाही. असो.

यातून मला इतकंच म्हणायचं आहे की अशी इच्छापत्रं करुन त्यांना "स्पष्ट सूचना" म्हणण्यापेक्षा "अशा परिस्थितीत माझी विश्वासू अमुक एक 'क्षयझ' व्यक्ती आणि माझे उपचार करणारे डॉक्टर हे जो एकत्रित निर्णय घेतील (उपचार अथवा पॅसिव्ह मरण) तो मला मान्य असेल" अशा प्रकारे इच्छापत्र करावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फार सुदर प्रतिसाद. मलाही वाटतं की धडधाकट असताना "मला उगाच जगवत ठेवू नका." असं म्हणणं सोपं असतं पण त्या अवस्थेत गेल्यावर जगण्याची ईच्छा झाली आणि असं ईच्छापत्र आधी केलेलं असेल तर? मग ती मरण्याची सक्ती नाही का होणार? साध्यासाध्या गोष्टीत आपण नक्की काय करु हे सांगता येत नाही तर एवढ्या मोठ्या निर्णयात माणूस आधीच हे असं ठरवून ठेवणं?
आमच्या शेजारयांच्या ९४ वर्षांच्या आई व्हेंटीलेटरून परत येउन अजून एक वर्ष जगलेल्या पाहिल्या आहेत.
मुळात बरेचदा ईच्छामरणाची बाजूने बोलणार्^यांना आपण परस्वाधीन होणार याची भिती जास्त असते आणि त्यात आपल्या मनासारखं काही होणार नाही ही अध्याह्र्त भिती असते.

माझी आजी नेहमी म्हणायची "मला लोळवत ठेवू नका" पण शेवटी दहा वर्षं अंथरुणाला खिळून होती. काही बाबतीत तिने स्वतःच्या हट्टांना मुरड घातली तर काही बाबतीत इतरांनी. पण ती दहा वर्षं ती होती तिने दहा वर्ष आधी जायला हवं होतं असं नाही वाटलं आम्हाला. तिचं ते तसं असणंही आश्वासक होतं.शेवटी आठवडा तिने अन्न
पाणी टाकलं आणि शांतपणे गेली . हे असं इच्छापत्र वैगेरे गोष्टी म्हणजे ...

'स्वावलंबी आणि सहज जीवन' याच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असणार ना.

एक दृष्य विनाकारण डोळ्यासमोर तळून गेलं. एक म्हातारा अथरुणाला खिळलाय पण जगायचंय त्याला. त्याला मध्ये मध्ये ऐऊ येणारे पोरांचे आवाज त्याला उभारी देतात, उश्याशी लावलेल्या गाण्यांचे आवाज त्याच्या सुहद स्मृतींना उजाळा देतात म्हणून बर वाटतं त्याला. अरे पण ईच्छामरण कायदे संमत झालयं त्या शेजारच्या अमूक-ढमूकने उपचार न घेता ईच्छामरण स्वीकारलं. आपला मुलगाही असाच विचार करत असेल का? आपला पैसा असला तरी तो मुलाला तसाच न देआ आपल्यावर विनाकारण खर्च होतोय का या विचारांचा भुंगा त्याचं डोकं पोखरतो. मग अश्या वेळेस त्याने ईच्छामरण स्वीकारलं तर ती मरण्याची सक्ती नाही होणार का? (पीअर प्रेशर हा शब्द शाळेपासून नोकरीपर्यंतच ऐकू येतो तो म्हातारपणी पण ऐकू येणार .)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विचारात पाडणारा प्रतिसाद. विशेषतः शेवटचा परिच्छेद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>पण त्या अवस्थेत गेल्यावर जगण्याची ईच्छा झाली आणि असं ईच्छापत्र आधी केलेलं असेल तर? मग ती मरण्याची सक्ती नाही का होणार? साध्यासाध्या गोष्टीत आपण नक्की काय करु हे सांगता येत नाही तर एवढ्या मोठ्या निर्णयात माणूस आधीच हे असं ठरवून ठेवणं? इच्छापत्र वेळोवेळी परिस्थिती नुरुप बदलता येते.शेवटी हा निर्णय डॉक्टर व पेशंटचे नातेवाईक हितचिंतक यांनी मिळून घ्यायचा असतो. त्यामुळे तुम्ही इच्छापत्र काहीही केलत तरी ते काही लगेच अंमलात येणार नसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

असा निर्णय केवळ स्वतःच्या इच्छेने बदलता येणं याला फार धैर्य लागेल हो. माझ्यासारखीला वाटायचं कसं सांगू ? पोरं (मनातल्या मनात का होईना) म्हणतील "म्हातारीचा जगण्याचा सोस सुटत नाहीय" . कसं सांगू , काय सांगू च्या घोळातच आम्ही टपकायचो. आणि ते सांगता येईल अशी अवस्था तर असली पाहिजे नाहीतर लोक आधीचंच इच्छापत्र प्रमाण मानून आमची सुटका करायचे.

हे विनोदी वाटलं तर रागवू नका पण फार सिरियसली लिहीतेय. कारण या बाबतीत ही खरोखर शंका आहे मला. आणि अश्या इच्छामरणाच्या मी तरी पूर्ण विरोधात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>अश्या इच्छामरणाच्या मी तरी पूर्ण विरोधात आहे.

मी या इच्छामरणाच्या कल्पनेच्याच विरोधात आहे. ज्याला जगायचं नाहीये ना, त्याला छातीत दुखायला लागल्यावर घरच्यांना हाक न मारणे हा मार्ग उपलब्धच असतो. तेवढा त्यांनी अवलंबला तर पुरे.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ज्याला जगायचं नाहीये ना, त्याला छातीत दुखायला लागल्यावर घरच्यांना हाक न मारणे हा उपाय असतो तेवढा त्यांनी अवलंबला तर पुरे.....

अहो बर्‍याच वेळेला पेशंट बेड रीडन, पॅरलाइस्ड वगैरे असतो. त्याला मरायची इच्छा झाली आणि मरण्याचे सर्व उपाय पाठ असले तरी तो काही करु शकत नाही.

मधे एक प्रचंड भयानक गोष्ट ऐकली.

स्पेन मधला एक कोमामधला पेशंट २३ वर्षानी जागा झाला. नंतर त्यानी सांगीतले की "I was screaming, but nobody listened" काय भयंकर परीस्थिती असेल ना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लॉक्ड इन सिंड्रोम.

https://en.wikipedia.org/wiki/The_Diving_Bell_and_the_Butterfly

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I was screaming, but nobody listened" काय भयंकर परीस्थिती असेल ना.

बापरे किती गुदमरवणारी, भयानक स्थिती. स्वप्नात क्वचित अनुभवलय पण ते म्हणजे- भीती वाटते आहे पण आवाज तोंडातून फुटत नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>आणि ते सांगता येईल अशी अवस्था तर असली पाहिजे नाहीतर लोक आधीचंच इच्छापत्र प्रमाण मानून आमची सुटका करायचे. हा मुद्दा वरच्या प्रतिसादात कव्हर केला आहे. पुनरावृत्ती करतो.."शेवटी हा निर्णय डॉक्टर व पेशंटचे नातेवाईक हितचिंतक यांनी मिळून घ्यायचा असतो. त्यामुळे तुम्ही इच्छापत्र काहीही केलत तरी ते काही लगेच अंमलात येणार नसते." पेशंटची त्यावेळेची स्थिती व इच्छा याच समावेश या निर्णय प्रक्रियेत असतोच. दयामरण म्हणजे इच्छेविरुद्ध माणस मारण्याचा परवाना नव्हे.शांत पणे वेदनाविरहीत मृत्यू ची मुभा असण म्हणजे तसच मरण्याची सक्ती नव्हे. जगण्याचीही सक्ती आहे या मंगला आठलेकरांच्या पुस्तकात याचा परामर्श घेतला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मला माहित आहे की,मी काहीही इच्छा नोंदवून ठेवली असली तरी वैद्यकीय तज्ञांशी सल्लामसलत, विचारविनिमय केला जाईल

हे जरी लिखित स्वरुपात असले तरी परिसंवादात त्यांनी आपलाच खालील मुद्दा अधोरेखित केला आहे
"अशा परिस्थितीत माझी विश्वासू अमुक एक 'क्षयझ' व्यक्ती आणि माझे उपचार करणारे डॉक्टर हे जो एकत्रित निर्णय घेतील (उपचार अथवा पॅसिव्ह मरण) तो मला मान्य असेल"
मलाही हाच मुद्दा व्यवहार्य वाटतो. परिसंवादानंतर मी डॉ प्रयाग यांना भेटलो व या सर्व प्रकारात डॉक्टरांची सदसदविवेकबुद्धी हा फॅक्टरच महत्वाचा ठरतो. त्यांना हे अगदी शंभर टक्के मान्य होते.
परिसंवादात शेवटी श्रोत्यांचे लिखित प्रश्न विचारात घेतले. त्यात मी अवयवदानाच्या दुरुपयोगाची लोकांच्या मनात असलेली भीती व डॉक्टरांची समाजात खालावत चाललेली प्रतिमा हा मुद्दा घेतला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कोणतीच स्पष्टता नसलेल्या मजकुराबाबत असं म्हणण्यात अर्थ नाही. त्यात स्पष्टता आणणं शक्यही नाहीये.

हाच मुद्दा डोक्यात आलेला पण प्रवाहाविरुद्ध बोलायचं कसं? कारण अनेक लोकांनी येऊन बनवलय म्हणजे बरोबरच असणार :(. त्यामुळे बोलले नव्हते अन तसाही अप्रिय विषय आहे. सो....
.
पण गविंचा प्रतिसाद आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विचारांचा सहभाग असणे म्हणजे प्रवाहा विरुद्ध बोलणे नव्हे. हा मसुदा फुल अँड फायनल नव्हे. हे इच्छापत्र आहे. व्यक्तिसापेक्ष असणार आहे. हा मसुदा फक्त एक मार्गदर्शक टप्पा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

काल याच विषयावर पुण्याई सभागृहात परिसंवादाचा कार्यक्रम झाला. रोहीणी पटवर्धन. विद्या बाळ, डॉ संदीप तामणे. अ‍ॅड रमा सरोदे या परिसंवादात सहभागी होते. शुभदा जोशी यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. याविषयावर छोटी फिल्म ही दाखवली.
अद्याप म्हणाव तशी जागृती या विषयावर अजून झाली नाही हे रोहिणी पटवर्धन यांनी सांगितले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/