ही बातमी समजली का - भाग १९९
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
----
आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
बैल गेला न झोपा केला.
ट्रंपतात्यांचं ट्विटर खातं कायमचं बंद केलं आहे. बातमी
अमेरिकेच्या स्वातंत्र्यापासून , १७७६, पहिल्यांदाच अशी ऐतिहासिक घटना घडत आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ट्विटर खातं कायमचं बंद केलं
१७७६ ते २००६ या कालावधीत हे घडण्याचा स्कोप नसावा..
ट्विटर नव्हतं तेव्हा
तरी प्रचार ( peddling) करत होता. उदाहरणार्थ ओबामाकडे अमेरिकन नागरिकत्व , बर्थ सर्टीफिकेट नाही म्हणून१. मग गप्प बसला.
#१- पुस्तकातून.
आभार.
मूळ प्रतिसादातला विनोद उलगडून सांगण्याबद्दल आभार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बैल गेला
बैल गेला आणि झोपा केला हे अगदी खरे आहे. आता ट्विटर अयातुल्ला खोमेनीचे अकाऊंट कधी बंद करते त्याची वाट पाहतो आहे. त्याच्या अकाऊंटवरुन उदा. डेथ टू अमेरिका वगैरे ट्विट्स नियमितपणे येत असतात.
https://twitter.com/khamenei_ir/status/1093791374204420097
आणखी थोडे...
ब्लॅक लाईव्ज मॅटरची आंदोलनं सुरु झाल्यापासून अनेक कंपन्यांमध्ये लिबरलपणा दाखवण्याची चढाओढ सुरु झाली आहे. अर्थात त्यात काही कंपन्या मूलभूत पावले उचलून नोकरभरती, प्रशिक्षण, कंत्राटी कामे वगैरेमध्ये समाजातील मागासवर्गांना प्राधान्य देत आहेत. याउलट ट्विटरसारख्या कंपन्या तोंडदेखली पावले उचलून 'आम्ही किती लिबरल' असे ओरडून सांगत आहेत.
काही दिवसांपूर्वी गिटहब (मायक्रोसॉफ्ट)ने असेच एक हास्यास्पद पाऊल उचलले होते ते आठवले. त्यांच्या मते (out of context घेतलेला) master हा शब्द गुलामगिरीचे प्रतीक आहे. त्यामुळे त्याऐवजी main हा शब्द वापरावा.
खोमेनी नव्हे
खोमेनी नव्हे. खामेनी.
खोमेनी वायले, नि खामेनी वायले. तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला येवढी शिंपल गोष्ट समजू नाय?
(खामेनी इराणचे सध्याचे सुप्रीम लीडर आहेत. जिवंत आहेत. य वर्षांपूर्वी वारले, ते (रश्दीच्या नावावर फतवा काढणारे) खोमेनी. ते हे नव्हेत. नि हे ते नव्हेत.)
असो. तूर्तास इतकेच. त्या master प्रकरणाबाबत (असलोच, तर) अंशतःच सहमत आहे. म्हणजे, ती "सुधारणा" वरवरची होती, पुरेशी दूरगामी अथवा मूलगामी नव्हती, असा जर दावा असेल, तर त्याच्याशी कदाचित सहमत होता येईलही, परंतु ती "हास्यास्पद" असण्याबद्दल I reserve my opinion. टंकनकंटाळ्यामुळे तूर्तास इतकेच; अधिक उत्साहाचा झटका मागेपुढे कधी आलाच, तर याबद्दल सविस्तर लिहीन.
थ्यँक्यू!
बऱ्या अर्ध्याच्या कामात बऱ्याच ठिकाणी master-slave अशा संज्ञा येतात, त्याही बदलल्या जात आहेत. ते पुरेसं, मूलगामी, दूरगामी किंवा काही असण्याबद्दल माझं काहीही मत नाही. पण ते हास्यास्पद निश्चितच नाही.
तात्यांचं फेसबुक खातंही कायमचं गोठवलं आहे. दंगलींना प्रोत्साहन देण्याबद्दल, आणि पुढे तसल्या छापाच्या हिंसा दिसल्या तरीही फेसबुक-ट्विटरादी कंपन्यांनी भारतात काहीही केलेलं नाही. पुढे काय करतील याबद्दल मला शंका आहे. शेवटी धंदा महत्त्वाचा!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बादवे...
...सकाळीसकाळी पिसाळलेलं लिंडसी ग्रॅहम चावलं१ काय?
-----------
१ नपुंसकलिंग टू बी ड्यूली नोटेड.१अ, १ब
१अ नॉट टू बी कन्फ्यूज़्ड विथ जेंडर न्यूट्रॅलिटी.
१ब याचा कन्नडभाषकांच्या मराठी अभिव्यक्तीशीदेखील काहीही संबंध नाही.
Master - slave
काढलं. तसंच युसबी किंवा इतर कनेक्टर्सना मेल - फीमेल म्हणण्यापेक्षा प्लग - सॉकेट शब्द बरोबर वाटतात.
+
नेमके हेच म्हणणार होतो. माझे टंकनकष्ट वाचवलेत. आभार.
यांच्या मते (out of context
हा प्रकार आमच्या कंपणीतही झाला. आमच्या प्रॉडक्टमधून मास्टर हा शब्द हटवायचा एक प्रोजेक्ट झाला. अमेरिकन ग्राहकांची मागणी होती की आमचे सॉफ्टवेअर वापरणाऱ्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना मास्टर शब्द दिसला नाही पाहिजे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
सुरवातीच्या
ट्रंपच्या सुरवातीच्या काळात ट्विटरने हे धाडस दाखवलं असतं का ? जनावर मरणोन्मुख होऊन पडल्यावर, त्याच्यावर एक पाय ठेवून फोटो काढणाऱ्या शिकारी जमातीची आठवण झाली.
आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.
धाडस??????
धाडस??????
काय करू शकला असता ट्रम्प? आदळआपट करण्याव्यतिरिक्त?
ट्विटर हा खाजगी धंदा आहे; त्यांनी कोणाला अकाउंट ठेवू द्यायचे नि कोणाचे अकाउंट काढून टाकायचे (कोणत्या कारणाकरिता किंवा कारणाविना), हे सर्वस्वी त्यांच्या अखत्यारीत आहे. ट्रम्प काय ट्रम्पचा आकाशातला बाप जरी अवतरला असता, तरी (आदळआपट करण्याव्यतिरिक्त) काहीही (झाट) वाकडे करू शकला नसता.
नाही म्हणजे, ट्रम्पच्या राज्यात अमेरिका रसातळाला गेली असेलही - नव्हे गेलीच, नाही म्हणत नाही मी - नि (अमेरिकेतल्या) कायद्याच्या राज्याचा, सुशासनाचा शाही योनिमार्ग झाला असेलही (नव्हे झालाच), परंतु, अद्याप (ट्रम्पच्या नि रिपब्लिकनांच्या बावजूद) तितकीही अधोगती झालेली नाही. (ट्रम्प पुन्हा निवडून आला असता, तर आणखी चार वर्षांत झालीही असती कदाचित, परंतु तो वेगळा मुद्दा.) ही (अद्याप तरी) अमेरिका(च) आहे, हिंदुस्थान नाही, की मोदींच्या नाहीतर ठाकऱ्यांच्या शेपटावर पाय पडला की आलीच गदा, म्हणायला. ट्रम्पला रिपब्लिकन राजकारणी घाबरत असतीलही (कारण त्यांच्याकडून याच्या शेपटावर पाय पडून याचे डोके फिरले, नि त्यांच्याबद्दल हा जर काही जाहीर वेडेवाकडे बोलला, तर मतदारांवर परिणाम होऊन त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकते, म्हणून), परंतु ट्विटरसारख्या खाजगी धंद्याला त्याला घाबरून राहण्याचे काहीच कारण नव्हते.
मग अगोदर का केले नाही? चांगला प्रश्न आहे. कदाचित तेव्हा तितकी गरज वाटली नसेल. कदाचित त्या वेळेस प्रकरण तितक्या थराला गेले आहे (टू वॉरंट अ पर्मनंट बॅन), असे वाटले नसेल. कदाचित त्याला बॅन करून (त्याच्या चाहत्यांच्या गोटात) जी बॅड पब्लिसिटी होईल१ (आणि त्यामुळे धंद्यावर जो परिणाम होईल), ती रिस्क घेण्याच्या वर्थ परिस्थिती तेव्हा आहे, असे वाटले नसेल. ते काहीही असो, परंतु ते जे काही बिज़नेस डिसीजन ट्विटरने तेव्हा घेतले असेल, त्यामागील जे कॅल्क्युलस असेल, त्याचा संबंध (ट्रम्पसंबंधीच्या) राजकीय भीतीशी नसून व्यावहारिक/व्यावसायिक कारणांशी असणार, हे निश्चित.
सारांश, ट्विटर संत आहे, अथवा ट्विटरने फार मोठे धाडस अथवा सत्कार्य केले, असा माझा मुळीच दावा नाही. त्यांनी त्या त्या वेळी त्यांना जसजसे योग्य वाटले, तसे (कोल्ड, कॅल्क्युलेटेड) धंदेवाईक निर्णय घेतले, इतकेच. त्या संदर्भात धाडस, सत्कार्य, देशप्रेम, ट्रम्पला घाबरणे, मरणोन्मुख होऊन पडलेल्या जनावराच्या छाताडावर पाय ठेवणे, वगैरे सब बाता फ़िज़ूल आहेत, इतकेच सांगायचे आहे.
बाकी चालू द्या.
==========
१ वस्तुत:, याचा अभिव्यक्तिस्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही. घटनादत्त१अ अभिव्यक्तिस्वातंत्र्य जे आहे, त्याची व्याप्ती ही केवळ सरकार त्याची गळचेपी करू शकत नाही, इतकीच आहे. थोडक्यात, लोकांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यास बाधा न आणणे हे सरकारवर बंधनकारक आहे; खाजगी व्यक्तींवर वा व्यवसायांवर असे कोणतेही बंधन नाही. (खाजगी प्लॅटफॉर्म्स हे कोणाचेही अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपण्यास बांधील नाहीत.) ट्रम्पला ट्विटरने स्वमतीने बॅन केल्यास तो सरकारी बॅन नव्हे, ट्विटरचा खाजगी बॅन आहे. ट्विटरसमान इतर ज्या खाजगी सुविधा असतील, त्या वापरायला (त्या सुविधासुद्धा जोवर त्यावर स्वमतीने बंदी आणत नाहीत, तोवर) ट्रम्प मुखत्यार आहेच. नाही तर त्याचे पित्थे असलेल्या रेडियो/टीव्ही चॅनेल्सवर, वर्तमानपत्रांतून, झालेच तर चौकाचौकात जाऊन तो बोंबलू शकतोच. ट्विटरने बंदी आणल्यामुळे (जे - कोणत्याही कारणास्तव किंवा कारणाविना - करणे हे संपूर्णपणे ट्विटरच्या अधिकारांत आहे) ट्रम्पचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे कोणत्याही प्रकारे बाधित होत नाही.
मात्र, हॅविंग सेड दॅट, ट्विटरने बॅन केल्यावर 'अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपीऽऽऽऽऽऽ!!!!!!' असा बोंबलून बोंबलून कांगावा ट्रम्प करू शकतोच. नि मग फॉक्स न्यूज़सारखे त्याचे पित्थे चॅनेल्स तो कांगावा अँप्लिफाय करून पसरवू शकतातच. नि मग त्याच्या भक्तगणात ती कल्पना (खोटी असली तरीही) पक्की बसते. त्यातून मग त्या भक्तगणाकडून होणाऱ्या ट्विटरच्या वापरावर परिणाम होऊ शकतो, ज्याने ट्विटरच्या धंद्यावर परिणाम होऊ शकतो. थोडक्यात, सब बिज़नेस का / पैसे का मामला है|
राहता राहिली गोष्ट 'जनावर मरणोन्मुख होऊन पडल्यावर'ची. ट्र्म्प आजमितीस भले ही (राजकीयदृष्ट्या) मरणोन्मुख होऊन पडलेला असेल. त्याचे भक्तगण हे कोणत्याही प्रकारे मरणोन्मुख होऊन पडलेले नाहीत. त्यामुळे, ट्रम्पला बॅन करण्याचे जे व्यावसायिक / आर्थिक दुष्परिणाम ट्विटरकरिता असू शकतात, त्यांत आजमितीससुद्धा फारसा फरक पडलेला नाही. तरीही, एकंदर परिस्थिती (बुधवारचा गोंधळ) पाहता, ते नुकसान झाले तरी बेहत्तर, परंतु यापुढे या प्रकारास आपल्याकडून (अप्रत्यक्षपणे आणि अवांच्छितरीत्या का होईना, परंतु) हातभार लागणे हे कदाचित (देशाकरिता तर झालेच, परंतु इन द शॉर्टर ऑर लाँगर रन ट्विटरकरितासुद्धा) हितावह ठरणार नाही, असे ट्विटरचालकांस वाटले असू शकेल. सांगण्याचा मतलब, 'जनावर मरणोन्मुख होऊन पडल्यावर त्याच्या छाताडावर पाय' वगैरे आर्ग्युमेंटांत दम नाही.)
१अ पहिल्या घटनादुरुस्तीस अनुसरून.
दुटप्पीपणा.
आजच मार्कोकाका रुबियो 'अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपीऽऽऽऽऽऽ!!!!!!' असं बोंबलायला लागले आहेतच. कुठल्याही खाजगी कंपनीकडे लोकांच्या अभिव्यक्तीवर एवढा ताबा असावा, हे योग्य नाही, असा दावा सुरू आहे. आता रिपब्लिकन काका लोक सरकारनं ट्विटर चालवावं, म्हणणार का, असा प्रश्न मला पडलाय.
दुसऱ्या बाजूनं काही रिपब्लिकन नेतेही 'ट्रंप फारच टोकाला गेला, आता त्यानं राजीनामा द्यावा', अशी मागणी करत आहेत. त्यामुळे किमान काही प्रमाणात मध्यममार्गी, सभ्य, नेव्हर-ट्रंप छापाचे रिपब्लिकन मतदार ट्विटरवर फार आक्षेप घेणार नाहीत, असाही अंदाज आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पण... पण... पण...
...हे 'सोशालिझम'(/'कॉम्युनिझम') नव्हे काय? ज्याच्या विरुद्ध रिपब्लिकन मंडळी जळीस्थळीकाष्ठीपाषाणी/हगल्यापादल्याला बोंबाबोंब करीत असतात, ते?
(सरकारने राष्ट्रीय आरोग्य योजना चालविणे हे जर 'सोशालिझम'(/'कॉम्युनिझम') होऊ शकते, तर सरकारने एखादे माध्यम ताब्यात घेऊन चालविणे कसे नाही?)
या रेटने उद्या गब्बर (दिवंगत) फडतूसगौरव गाताना आढळला, तरी आश्चर्य वाटणार नाही.
असो चालायचेच.
१. हे असलेच, तर फार तुरळक/नगण्य असावेत.१
२. 'सभ्य' आणि 'रिपब्लिकन' हे दोन शब्द एकाच वाक्यात शोभत नाहीत.
असो.
==========
१ बॉस्को नावाचा गुलाबी उंट१अ अखिल विश्वात कोठल्या ना कोठल्या ग्रहावर असण्याची शक्यता जशी अगदीच शून्य नाही, तद्वत.
१अ या संज्ञेचा संदर्भ ठाऊक नसल्यास कृपया श्री. जयदीप चिपलकट्टी यांजजवळ चौकशी करावी. इदं न मम| आगाऊ आभार. इत्यलम्|
सोशल मिडीया
काल जो बायडनला बोहल्यावर चढवल्यानंतर इंटरनेटवर (चेअरमन) बर्नीच जास्त गाजतोय.
Bernie Sanders Is Once Again the Star of a Meme
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
bernie will appear there.
https://bernie-sits.herokuapp.com/ ह्या दुव्यावर एक सॉफ्टवेअर आहे. ते वापरून तुम्ही बर्निला आपल्या गावात बसवू शकाल!
पण श्रीमती ट्रंपचं कवर फोटोवालं वोग नाहीच आलं.
हा पण हट्टीपणाच? का तसं कवर आलं असतं तर वोग मासिकाचा ( जे काही नियतकालिक )खप कोसळणार होता?
यामुळे ट्रंप रुसला आसावा. घरातली युद्ध फार गंभीर जखमा करतात.
लोकप्रियता मिळवता मिळवता
सोशल मीडियामध्ये लोकप्रियता मिळवता मिळवता लोकांचं काय होतं, होऊ शकतं याविषयीचा रोचक लेख -
We Worked Together on the Internet. Last Week, He Stormed the Capitol.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
प्रा. शशिकुमार चित्रे
प्रा. शशिकुमार चित्रे गेले. चित्रेसर आम्हांला एमेस्सीला, मुंबई विद्यापीठात शिकवायचे. सौर विज्ञान. अतिशय गोड माणूस आणि प्रेमळ-दिलदार शिक्षक. मोठा संशोधक. मी एमेस्सी करत असताना ते सत्तरीच्या आसपास असतील.
मी पीएचडीसाठी अर्ज भरत होते. तेव्हा एकदा ते मला म्हणाले होते, "तुला पीएचडी पूर्ण केल्यावर समजेल, आता कुठे शिकायला सुरुवात होत्ये." मी मनात विचार केला, "सरांचं वय झालं म्हणून असं काही बोलत आहेत." पीएचडीची सुरुवात करून सव्वा वर्षानी सुट्टीसाठी घरी आले होते, तेव्हा त्यांना भेटून सांगायचं होतं, तुम्ही म्हणता त्याचा अर्थ आता जरा समजायला लागलाय. तेव्हा भेट झाली नाही, पण भौतिकशास्त्र विभागातल्या पटेलसरांना आवर्जून हे सांगितलं.
पुढे मला बरेच दिलदार शिक्षक मिळाले. पीएचडी सुपरवायजर त्यांतलाच एक. या गोड, पिकलेल्या लोकांनी, आपल्या वागण्यातून मला माणसांबद्दल प्रेम बाळगायला शिकवलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पिफ
दर वर्षी जानेवारीत होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) या वर्षी ४-११ मार्च दरम्यान होणार आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||