डीडी सह्याद्री वाहिनी, शनिवार, ६ जून रोजी सायंकाळी ७:१५ वाजता -
राजीव तांबे व विनायक रानडे यांच्या समवेत 'बालगोपालांची वाचन संस्कृती' या विषयावर चर्चा आहे.
कार्यक्रमाचे पुनर्प्रक्षेपण रविवारी ७ जून रोजी सकाळी १० वाजता होईल.
राजीव तांबे हे २०१३ च्या 'बालकुमार साहित्य संमेलना'चे अध्यक्ष होते. त्यांनी 'युनिसेफ'साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम केले आहे. विपुल बालसाहित्य लेखनासोबत ते मुलांसाठी अनेक उपक्रम चालवतात.