ही बातमी समजली का - भाग १९९
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
----
आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
Taxonomy upgrade extras
बैल गेला
बैल गेला आणि झोपा केला हे अगदी खरे आहे. आता ट्विटर अयातुल्ला खोमेनीचे अकाऊंट कधी बंद करते त्याची वाट पाहतो आहे. त्याच्या अकाऊंटवरुन उदा. डेथ टू अमेरिका वगैरे ट्विट्स नियमितपणे येत असतात.
https://twitter.com/khamenei_ir/status/1093791374204420097
आणखी थोडे...
ब्लॅक लाईव्ज मॅटरची आंदोलनं सुरु झाल्यापासून अनेक कंपन्यांमध्ये लिबरलपणा दाखवण्याची चढाओढ सुरु झाली आहे. अर्थात त्यात काही कंपन्या मूलभूत पावले उचलून नोकरभरती, प्रशिक्षण, कंत्राटी कामे वगैरेमध्ये समाजातील मागासवर्गांना प्राधान्य देत आहेत. याउलट ट्विटरसारख्या कंपन्या तोंडदेखली पावले उचलून 'आम्ही किती लिबरल' असे ओरडून सांगत आहेत.
काही दिवसांपूर्वी गिटहब (मायक्रोसॉफ्ट)ने असेच एक हास्यास्पद पाऊल उचलले होते ते आठवले. त्यांच्या मते (out of context घेतलेला) master हा शब्द गुलामगिरीचे प्रतीक आहे. त्यामुळे त्याऐवजी main हा शब्द वापरावा.
खोमेनी नव्हे
आता ट्विटर अयातुल्ला खोमेनीचे अकाऊंट कधी बंद करते त्याची वाट पाहतो आहे. त्याच्या अकाऊंटवरुन उदा. डेथ टू अमेरिका वगैरे ट्विट्स नियमितपणे येत असतात.
खोमेनी नव्हे. खामेनी.
खोमेनी वायले, नि खामेनी वायले. तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला येवढी शिंपल गोष्ट समजू नाय?
(खामेनी इराणचे सध्याचे सुप्रीम लीडर आहेत. जिवंत आहेत. य वर्षांपूर्वी वारले, ते (रश्दीच्या नावावर फतवा काढणारे) खोमेनी. ते हे नव्हेत. नि हे ते नव्हेत.)
असो. तूर्तास इतकेच. त्या master प्रकरणाबाबत (असलोच, तर) अंशतःच सहमत आहे. म्हणजे, ती "सुधारणा" वरवरची होती, पुरेशी दूरगामी अथवा मूलगामी नव्हती, असा जर दावा असेल, तर त्याच्याशी कदाचित सहमत होता येईलही, परंतु ती "हास्यास्पद" असण्याबद्दल I reserve my opinion. टंकनकंटाळ्यामुळे तूर्तास इतकेच; अधिक उत्साहाचा झटका मागेपुढे कधी आलाच, तर याबद्दल सविस्तर लिहीन.
थ्यँक्यू!
बऱ्या अर्ध्याच्या कामात बऱ्याच ठिकाणी master-slave अशा संज्ञा येतात, त्याही बदलल्या जात आहेत. ते पुरेसं, मूलगामी, दूरगामी किंवा काही असण्याबद्दल माझं काहीही मत नाही. पण ते हास्यास्पद निश्चितच नाही.
तात्यांचं फेसबुक खातंही कायमचं गोठवलं आहे. दंगलींना प्रोत्साहन देण्याबद्दल, आणि पुढे तसल्या छापाच्या हिंसा दिसल्या तरीही फेसबुक-ट्विटरादी कंपन्यांनी भारतात काहीही केलेलं नाही. पुढे काय करतील याबद्दल मला शंका आहे. शेवटी धंदा महत्त्वाचा!
यांच्या मते (out of context
यांच्या मते (out of context घेतलेला) master हा शब्द गुलामगिरीचे प्रतीक आहे. त्यामुळे त्याऐवजी main हा शब्द वापरावा.
हा प्रकार आमच्या कंपणीतही झाला. आमच्या प्रॉडक्टमधून मास्टर हा शब्द हटवायचा एक प्रोजेक्ट झाला. अमेरिकन ग्राहकांची मागणी होती की आमचे सॉफ्टवेअर वापरणाऱ्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना मास्टर शब्द दिसला नाही पाहिजे.
धाडस??????
ट्रंपच्या सुरवातीच्या काळात ट्विटरने हे धाडस दाखवलं असतं का ?
धाडस??????
काय करू शकला असता ट्रम्प? आदळआपट करण्याव्यतिरिक्त?
ट्विटर हा खाजगी धंदा आहे; त्यांनी कोणाला अकाउंट ठेवू द्यायचे नि कोणाचे अकाउंट काढून टाकायचे (कोणत्या कारणाकरिता किंवा कारणाविना), हे सर्वस्वी त्यांच्या अखत्यारीत आहे. ट्रम्प काय ट्रम्पचा आकाशातला बाप जरी अवतरला असता, तरी (आदळआपट करण्याव्यतिरिक्त) काहीही (झाट) वाकडे करू शकला नसता.
नाही म्हणजे, ट्रम्पच्या राज्यात अमेरिका रसातळाला गेली असेलही - नव्हे गेलीच, नाही म्हणत नाही मी - नि (अमेरिकेतल्या) कायद्याच्या राज्याचा, सुशासनाचा शाही योनिमार्ग झाला असेलही (नव्हे झालाच), परंतु, अद्याप (ट्रम्पच्या नि रिपब्लिकनांच्या बावजूद) तितकीही अधोगती झालेली नाही. (ट्रम्प पुन्हा निवडून आला असता, तर आणखी चार वर्षांत झालीही असती कदाचित, परंतु तो वेगळा मुद्दा.) ही (अद्याप तरी) अमेरिका(च) आहे, हिंदुस्थान नाही, की मोदींच्या नाहीतर ठाकऱ्यांच्या शेपटावर पाय पडला की आलीच गदा, म्हणायला. ट्रम्पला रिपब्लिकन राजकारणी घाबरत असतीलही (कारण त्यांच्याकडून याच्या शेपटावर पाय पडून याचे डोके फिरले, नि त्यांच्याबद्दल हा जर काही जाहीर वेडेवाकडे बोलला, तर मतदारांवर परिणाम होऊन त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकते, म्हणून), परंतु ट्विटरसारख्या खाजगी धंद्याला त्याला घाबरून राहण्याचे काहीच कारण नव्हते.
मग अगोदर का केले नाही? चांगला प्रश्न आहे. कदाचित तेव्हा तितकी गरज वाटली नसेल. कदाचित त्या वेळेस प्रकरण तितक्या थराला गेले आहे (टू वॉरंट अ पर्मनंट बॅन), असे वाटले नसेल. कदाचित त्याला बॅन करून (त्याच्या चाहत्यांच्या गोटात) जी बॅड पब्लिसिटी होईल१ (आणि त्यामुळे धंद्यावर जो परिणाम होईल), ती रिस्क घेण्याच्या वर्थ परिस्थिती तेव्हा आहे, असे वाटले नसेल. ते काहीही असो, परंतु ते जे काही बिज़नेस डिसीजन ट्विटरने तेव्हा घेतले असेल, त्यामागील जे कॅल्क्युलस असेल, त्याचा संबंध (ट्रम्पसंबंधीच्या) राजकीय भीतीशी नसून व्यावहारिक/व्यावसायिक कारणांशी असणार, हे निश्चित.
सारांश, ट्विटर संत आहे, अथवा ट्विटरने फार मोठे धाडस अथवा सत्कार्य केले, असा माझा मुळीच दावा नाही. त्यांनी त्या त्या वेळी त्यांना जसजसे योग्य वाटले, तसे (कोल्ड, कॅल्क्युलेटेड) धंदेवाईक निर्णय घेतले, इतकेच. त्या संदर्भात धाडस, सत्कार्य, देशप्रेम, ट्रम्पला घाबरणे, मरणोन्मुख होऊन पडलेल्या जनावराच्या छाताडावर पाय ठेवणे, वगैरे सब बाता फ़िज़ूल आहेत, इतकेच सांगायचे आहे.
बाकी चालू द्या.
==========
१ वस्तुत:, याचा अभिव्यक्तिस्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही. घटनादत्त१अ अभिव्यक्तिस्वातंत्र्य जे आहे, त्याची व्याप्ती ही केवळ सरकार त्याची गळचेपी करू शकत नाही, इतकीच आहे. थोडक्यात, लोकांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यास बाधा न आणणे हे सरकारवर बंधनकारक आहे; खाजगी व्यक्तींवर वा व्यवसायांवर असे कोणतेही बंधन नाही. (खाजगी प्लॅटफॉर्म्स हे कोणाचेही अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपण्यास बांधील नाहीत.) ट्रम्पला ट्विटरने स्वमतीने बॅन केल्यास तो सरकारी बॅन नव्हे, ट्विटरचा खाजगी बॅन आहे. ट्विटरसमान इतर ज्या खाजगी सुविधा असतील, त्या वापरायला (त्या सुविधासुद्धा जोवर त्यावर स्वमतीने बंदी आणत नाहीत, तोवर) ट्रम्प मुखत्यार आहेच. नाही तर त्याचे पित्थे असलेल्या रेडियो/टीव्ही चॅनेल्सवर, वर्तमानपत्रांतून, झालेच तर चौकाचौकात जाऊन तो बोंबलू शकतोच. ट्विटरने बंदी आणल्यामुळे (जे - कोणत्याही कारणास्तव किंवा कारणाविना - करणे हे संपूर्णपणे ट्विटरच्या अधिकारांत आहे) ट्रम्पचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे कोणत्याही प्रकारे बाधित होत नाही.
मात्र, हॅविंग सेड दॅट, ट्विटरने बॅन केल्यावर 'अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपीऽऽऽऽऽऽ!!!!!!' असा बोंबलून बोंबलून कांगावा ट्रम्प करू शकतोच. नि मग फॉक्स न्यूज़सारखे त्याचे पित्थे चॅनेल्स तो कांगावा अँप्लिफाय करून पसरवू शकतातच. नि मग त्याच्या भक्तगणात ती कल्पना (खोटी असली तरीही) पक्की बसते. त्यातून मग त्या भक्तगणाकडून होणाऱ्या ट्विटरच्या वापरावर परिणाम होऊ शकतो, ज्याने ट्विटरच्या धंद्यावर परिणाम होऊ शकतो. थोडक्यात, सब बिज़नेस का / पैसे का मामला है|
राहता राहिली गोष्ट 'जनावर मरणोन्मुख होऊन पडल्यावर'ची. ट्र्म्प आजमितीस भले ही (राजकीयदृष्ट्या) मरणोन्मुख होऊन पडलेला असेल. त्याचे भक्तगण हे कोणत्याही प्रकारे मरणोन्मुख होऊन पडलेले नाहीत. त्यामुळे, ट्रम्पला बॅन करण्याचे जे व्यावसायिक / आर्थिक दुष्परिणाम ट्विटरकरिता असू शकतात, त्यांत आजमितीससुद्धा फारसा फरक पडलेला नाही. तरीही, एकंदर परिस्थिती (बुधवारचा गोंधळ) पाहता, ते नुकसान झाले तरी बेहत्तर, परंतु यापुढे या प्रकारास आपल्याकडून (अप्रत्यक्षपणे आणि अवांच्छितरीत्या का होईना, परंतु) हातभार लागणे हे कदाचित (देशाकरिता तर झालेच, परंतु इन द शॉर्टर ऑर लाँगर रन ट्विटरकरितासुद्धा) हितावह ठरणार नाही, असे ट्विटरचालकांस वाटले असू शकेल. सांगण्याचा मतलब, 'जनावर मरणोन्मुख होऊन पडल्यावर त्याच्या छाताडावर पाय' वगैरे आर्ग्युमेंटांत दम नाही.)
१अ पहिल्या घटनादुरुस्तीस अनुसरून.
दुटप्पीपणा.
आजच मार्कोकाका रुबियो 'अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपीऽऽऽऽऽऽ!!!!!!' असं बोंबलायला लागले आहेतच. कुठल्याही खाजगी कंपनीकडे लोकांच्या अभिव्यक्तीवर एवढा ताबा असावा, हे योग्य नाही, असा दावा सुरू आहे. आता रिपब्लिकन काका लोक सरकारनं ट्विटर चालवावं, म्हणणार का, असा प्रश्न मला पडलाय.
दुसऱ्या बाजूनं काही रिपब्लिकन नेतेही 'ट्रंप फारच टोकाला गेला, आता त्यानं राजीनामा द्यावा', अशी मागणी करत आहेत. त्यामुळे किमान काही प्रमाणात मध्यममार्गी, सभ्य, नेव्हर-ट्रंप छापाचे रिपब्लिकन मतदार ट्विटरवर फार आक्षेप घेणार नाहीत, असाही अंदाज आहे.
पण... पण... पण...
कुठल्याही खाजगी कंपनीकडे लोकांच्या अभिव्यक्तीवर एवढा ताबा असावा, हे योग्य नाही, असा दावा सुरू आहे. आता रिपब्लिकन काका लोक सरकारनं ट्विटर चालवावं, म्हणणार का, असा प्रश्न मला पडलाय.
...हे 'सोशालिझम'(/'कॉम्युनिझम') नव्हे काय? ज्याच्या विरुद्ध रिपब्लिकन मंडळी जळीस्थळीकाष्ठीपाषाणी/हगल्यापादल्याला बोंबाबोंब करीत असतात, ते?
(सरकारने राष्ट्रीय आरोग्य योजना चालविणे हे जर 'सोशालिझम'(/'कॉम्युनिझम') होऊ शकते, तर सरकारने एखादे माध्यम ताब्यात घेऊन चालविणे कसे नाही?)
या रेटने उद्या गब्बर (दिवंगत) फडतूसगौरव गाताना आढळला, तरी आश्चर्य वाटणार नाही.
असो चालायचेच.
त्यामुळे किमान काही प्रमाणात मध्यममार्गी, सभ्य, नेव्हर-ट्रंप छापाचे रिपब्लिकन मतदार ट्विटरवर फार आक्षेप घेणार नाहीत, असाही अंदाज आहे.
१. हे असलेच, तर फार तुरळक/नगण्य असावेत.१
२. 'सभ्य' आणि 'रिपब्लिकन' हे दोन शब्द एकाच वाक्यात शोभत नाहीत.
असो.
==========
१ बॉस्को नावाचा गुलाबी उंट१अ अखिल विश्वात कोठल्या ना कोठल्या ग्रहावर असण्याची शक्यता जशी अगदीच शून्य नाही, तद्वत.
१अ या संज्ञेचा संदर्भ ठाऊक नसल्यास कृपया श्री. जयदीप चिपलकट्टी यांजजवळ चौकशी करावी. इदं न मम| आगाऊ आभार. इत्यलम्|
सोशल मिडीया
काल जो बायडनला बोहल्यावर चढवल्यानंतर इंटरनेटवर (चेअरमन) बर्नीच जास्त गाजतोय.
Bernie Sanders Is Once Again the Star of a Meme
bernie will appear there.
https://bernie-sits.herokuapp.com/ ह्या दुव्यावर एक सॉफ्टवेअर आहे. ते वापरून तुम्ही बर्निला आपल्या गावात बसवू शकाल!
लोकप्रियता मिळवता मिळवता
सोशल मीडियामध्ये लोकप्रियता मिळवता मिळवता लोकांचं काय होतं, होऊ शकतं याविषयीचा रोचक लेख -
We Worked Together on the Internet. Last Week, He Stormed the Capitol.
“You always think that evil is going to come from movie villain evil, and then you’re like — oh no, evil can just start with bad jokes and nihilistic behavior that is fueled by positive reinforcement on various platforms.”
प्रा. शशिकुमार चित्रे
प्रा. शशिकुमार चित्रे गेले. चित्रेसर आम्हांला एमेस्सीला, मुंबई विद्यापीठात शिकवायचे. सौर विज्ञान. अतिशय गोड माणूस आणि प्रेमळ-दिलदार शिक्षक. मोठा संशोधक. मी एमेस्सी करत असताना ते सत्तरीच्या आसपास असतील.
मी पीएचडीसाठी अर्ज भरत होते. तेव्हा एकदा ते मला म्हणाले होते, "तुला पीएचडी पूर्ण केल्यावर समजेल, आता कुठे शिकायला सुरुवात होत्ये." मी मनात विचार केला, "सरांचं वय झालं म्हणून असं काही बोलत आहेत." पीएचडीची सुरुवात करून सव्वा वर्षानी सुट्टीसाठी घरी आले होते, तेव्हा त्यांना भेटून सांगायचं होतं, तुम्ही म्हणता त्याचा अर्थ आता जरा समजायला लागलाय. तेव्हा भेट झाली नाही, पण भौतिकशास्त्र विभागातल्या पटेलसरांना आवर्जून हे सांगितलं.
पुढे मला बरेच दिलदार शिक्षक मिळाले. पीएचडी सुपरवायजर त्यांतलाच एक. या गोड, पिकलेल्या लोकांनी, आपल्या वागण्यातून मला माणसांबद्दल प्रेम बाळगायला शिकवलं.
नारळीकरांनी ह्या सगळ्यांना
नारळीकरांनी ह्या सगळ्यांना खडसावून सांगितलेलं ऐकायचं आहे - "हे अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे आणि इतर पावणेरावणे वगैरे कचरा गोळा करत जाउ नका"*
पण ते स्वत:च अध्यक्ष आहेत तेव्हा ...
* - त्यांच्या कथांमधे आणि इतर लेखांतही ह्या फालतू समारंभबाजीबद्दलचा तिटकारा दिसून येतो - पण वयोमानानुसार नारळीकर मवाळले असावेत.
मराठी लोकांचं अभिनंदन!
(निवडणुकीत डॉ. बाळ फोंडकेही होते - तेही उत्तम विज्ञानलेखक आहेत)
मंडळाचं अभिनंदन.
२०२०मध्ये करोनामुळे सगळ्यात आधी उघडं काय पडलं तर भारतीय लोकांच्या अंधश्रद्धा. अंगारे-धुपारे आणि बाबा-बुवा वगैरे प्रकरणांबद्दल मी बोलतच नाहीये. कसलेकसले काढे पिऊन म्हणे प्रतिकारशक्ती वाढते तर करोना टाळण्यासाठी काढे पिणं; किंवा मी व्यायाम करते आणि चांगलंचुंगलं खाते म्हणून मला लशीची गरज नाही; किंवा मोदी सरकारवर माझा विश्वास नाही म्हणून लस घेऊ नका म्हणणारे डॉक्टर, अशा लोकांच्या अंधश्रद्ध आणि विज्ञानद्वेष्ट्या विचारांबद्दल बोलत्ये.
ह्या पार्श्वभूमीवर नारळीकरांसारखा वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा, त्याबद्दल कळकळ बाळगून लिहिणारा आणि काम करणारा, आणि स्वभावानं गोड माणूस साहित्य संमेलनाचा अध्यक्ष असेल. या निर्णयाबद्दल मंडळाचं अभिनंदन.
Caution - चालू विषयाशी संबंधित नसलेला प्रतिसाद
पण नारळीकरांच्या मांडीला मांडी लावून जे राजकीय लोक बसणार आहेत , ते आपण नसतं ब्वॉ सहन केलं! तात्काळ नाकारलं असतं अध्यक्षपद !
मांडीला मांडी लावून, असं म्हटलं की उगिचंच, नुसतं बसायचंच असेल तर मांडीला मांडी कशाला लावायची / लावून घ्यायची, दूर दूर राहायचं ना, असे वेगळ्या विषयाशी संबंधित प्रतिसाद मनात येतात. अध्यक्षपद नाकारणं ठीक आहे पण मांडी आणि पद हे एकमेकांशी संबंधित नाहीत का? एक स्वीकारायचं म्हटलं की दुसऱ्याला कसं नाकारणार?
अर्थात मनी वसे ते स्वप्नी दिसे असं कुणीतरी सांगून गेलंय त्याचा इथे काही संबंध नाही, पण गूगल / इतर अल्गोरिदम्स जसे कीवर्डस शोधून टॅग्स तयार करतात तसं, या प्रतिसादातील पद, मांडी, विषय, संबंध, स्वीकार हे कीवर्ड शोधून एखादं अल्गो त्यातून निराळाच अर्थ तर काढणार नाही ना असं वाटतं.
जाऊ द्या, सध्या वेगळ्या अल्गोवर काम करतोय, उगीचच हा प्रतिसाद लिहावासा वाटला... होऊ दे खर्च, ऐसी आहे घरचं !
अवांतर: बहुतेक वेळा, वाट्टेल ते लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणून मी ऐसीवर येतो की काय, अशी शंका मनात आली.
+/-
पण नारळीकरांच्या मांडीला मांडी लावून जे राजकीय लोक बसणार आहेत , ते आपण नसतं ब्वॉ सहन केलं! तात्काळ नाकारलं असतं अध्यक्षपद !
माझीही वैयक्तिक ॲटिट्यूड या बाबतीत काहीशी अशीच असल्याकारणाने, तुमचे म्हणणे, तुमच्या भावना समजू शकतो. I think I can perfectly understand where you're coming from.
परंतु, who knows? नारळीकर may not be that fragile... असली मंडळी त्यांना(ही) आवडत नसतीलही कदाचित, परंतु, सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या मांडीस मांडी लावून बसण्याची वेळ आल्यास, त्यांच्या (पक्षी: नारळीकरांच्या) अंगास भोकेही पडत नसतील; कोणास ठाऊक? (आणि, 'का पडावीत?' हा प्रश्नदेखील रास्त असू शकतो.)
एखाद्या गोष्टीस सामोरे जाण्याचा मला तिटकारा वाटतो, म्हणून नारळीकरांनाही तो तसाच किंवा तितकाच वाटला पाहिजे, त्यांच्या (त्यासंबंधीच्या) ॲटिट्यूड्ज़ डिट्टो सेम-टू-सेम माझ्यासारख्याच असल्या पाहिजेत, आणि (इथवरही एक वेळ ठीक आहे, परंतु, आणि इथवर गृहीत धरूनसुद्धा) त्याच्याशी डील करण्याच्या त्यांच्या पद्धतीही सेम-टू-सेम माझ्यासारख्याच असल्या पाहिजेत, अशी अपेक्षा मी करण्यात कितपत हशील आहे?
कोणास ठाऊक, केवळ असल्या मंडळींच्या मांडीस मांडी लावून बसल्याने (किंवा बसावे लागल्याने) आपण काँप्रोमाइझ होणार नाही, इतकी स्वतःच्या कॅरेक्टरबद्दल खात्री नारळीकरांना वाटत असेलही. (म्हणजे, तुम्हाला किंवा मला आपापल्या कॅरेक्टरबद्दल तसा भरवसा नाही, किंवा आपण अशा परिस्थितीत काँप्रोमाइझ होऊ, असे मला म्हणायचे नाही. परंतु, अशा परिस्थितीत सापडण्याचा आपल्याला जो एक कमालीचा तिटकारा वाटतो, आणि म्हणून आपण असे प्रसंग टाळू पाहतो, तसे नारळीकरांच्या बाबतीत होत नसेलही कदाचित; Maybe he is not bothered by it at all. (And who would deny him his nonchalance?))
तेव्हा, नारळीकर नारळीकर आहेत, नि आपण आपण आहेत. नारळीकरांचे आणि आपले या गोष्टीशी डील करण्याचे मार्ग निराळे आहेत. ठीकच आहे. पैकी (नारळीकरांच्या किंवा आपल्या) कोठल्याही मार्गात काही गैर आहे, असे या बाबतीत निदान मी तरी म्हणू शकत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे, स्थानमाहात्म्य. नारळीकर जरी या मंडळींच्या मांडीस मांडी लावून बसणार असले, तरी ते कोठे आणि कोणत्या परिस्थितीत, हेही पाहणे महत्त्वाचे आहे. ते काही एखाद्या खाजगी अड्ड्यावर जाऊन या मंडळींबरोबर दारू पिण्यासाठी स्वेच्छेने या मंडळींच्या मांडीस मांडी लावून बसत नाहीयेत. (तसे असते, तर गोष्ट कदाचित वेगळी असती.) तर, एका सार्वजनिक कार्यात, सार्वजनिक ठिकाणी, काही महत्त्वाची भूमिका बजावण्याकरिता ते सहभागी होत आहेत, आणि त्या ठिकाणी असल्या मंडळींच्या मांडीस मांडी लागणे हे अपरिहार्य आहे. त्यामुळे, I would cut him some slack. आता, तेथे गेल्यावर या मंडळींनी त्यांना मंचावरून काही करून काँप्रोमाइझिंग पोझिशनमध्ये जर आणलेच, तर ती पुढली गोष्ट. त्या परिस्थितीत ते परिस्थितीशी कसे डील करतात, ते पाहता येईल. परंतु, absent that, त्यांनी तेथे जाऊच नये (किंवा ते अध्यक्षपद स्वीकारूच नये), अशी अपेक्षा (तूर्तास) निदान मी तरी करणार नाही. (अर्थात, तो निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे.)
कौतिकराव ठाले पाटील ह्या महान
कौतिकराव ठाले पाटील ह्या महान साहित्यिकासोबत त्यांना बसावं लागेल बहुदा.
शरद पवार वगैरे कोणालातरी बोलावतीलच.
नारळीकरांची पत वगैरेपेक्षा साहित्य संमेलनासारख्या निर्बुद्ध प्रकारात नारळीकरांना समाविष्ट केल्याबद्दल मला तरी थोडं दु:ख होतंय.
पण आता मी तरी कुठे कुठे लक्ष देणार?
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/india/ex-cji-ranjan-gogoi-weve-a-ra…
ह्यांचा न्याय पालिकेवर विश्वास नाही , न्यायालयात न्याय मिळत नाही असेही ते म्हणतात. म्हणजे आतापर्यंत ह्यांनी अन्यायकारक निकाल दिले असे म्हणायचे का? की न्याय मिळवायचा असेल तर स्वतः न्यायधीश व्हा असा संदेश देत आहेत?
... आणि
त्यांनी तो नाकारला आहे.
आज दुपारी ३.३०-४ च्या दरम्यान मला निरोप मिळाला, की माझ्या 'उद्या' ह्या जानेवारी २०१४मध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीला 'साहित्य अकादमी'चा पुरस्कार जाहीर झाला आहे. चारएक वर्षांपूर्वी मी कुठलाही पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. समाजाकडून मला आजवर भरपूर मिळालं आहे व ह्यापुढेही घेत राहणे मला इष्ट वाटत नाही. पुरस्कार देणाऱ्या सर्व संस्थांचा आदर राखून व त्यांचे आभार मानत ही माझी भूमिका मी मांडत आहे.
- नंदा खरे
हे काय आता?
या पुढे covaxin च देणार म्हणतात...
https://indianexpress.com/article/cities/pune/vaccine-protocol-shortage…
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/maharashtra-news/female-forest-officer-commits…
दिपाली चव्हाणच्या आत्महत्येबद्दल जितकं वाचू तितकं हतबुद्ध व्हायला होतंय. इतकी संवेदनशील, हुशार मुलगी. किती छळ सहन केला असेल तिने. गलबलून आले.
या धाग्यात
शाहीर ह्मणजे काय आणि पुरंदरे काय होते यासंबंधीचा उहापोह या धाग्यावर झाला होता. https://aisiakshare.com/node/8190
केंद्र सरकारने कृषी कायदे
केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले, पंतप्रधान मोदींची घोषणा
Today I want to tell everyone that we have decided to repeal all three farm laws: PM Narendra Modi pic.twitter.com/ws353WdnVB
— ANI (@ANI) November 19, 2021
कृषी कायद्याचा पूर्ण मसुदा
आणि प्रतेक कलम, अटी,नियम हे सर्व सरकार नी लपवून ठेवले.
भारतीय मीडिया ही पूर्ण पने एकाच व्यापारी जन समुदायाच्या मालकीची आहे.
आणि तो समुदाय bjp च गुलाम आहे.
त्यांचे आर्थिक व्यवहार आहेत.
आशिया मध्ये श्रीमंत होण्यासाठी सरकार च मदत करू शकते जनतेचे पैसे लावून.
हे कायदे च अतिशय भयंकर होते पण त्याची चर्चा कधीच झाली नाही.
फक्त खलिस्तान,अतिरेकी,हेच शब्द जास्त ऐकायला येत होते.
जिद्दी नी विरोध करणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांचे अभिनंदन.
कृषी कायद्याचा पूर्ण मसुदा
आणि प्रतेक कलम, अटी,नियम हे सर्व सरकार नी लपवून ठेवले.
भारतीय मीडिया ही पूर्ण पने एकाच व्यापारी जन समुदायाच्या मालकीची आहे.
आणि तो समुदाय bjp च गुलाम आहे.
त्यांचे आर्थिक व्यवहार आहेत.
आशिया मध्ये श्रीमंत होण्यासाठी सरकार च मदत करू शकते जनतेचे पैसे लावून.
हे कायदे च अतिशय भयंकर होते पण त्याची चर्चा कधीच झाली नाही.
फक्त खलिस्तान,अतिरेकी,हेच शब्द जास्त ऐकायला येत होते.
जिद्दी नी विरोध करणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांचे अभिनंदन.
बिपिन रावत
संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; ११ जणांचा मृत्यू
ताज्या बातमीनुसार रावत, त्यांच्या पत्नी आणि ११ इतर जणांचे निधन झाले आहे.
एक वाइल्ड गेस...
...बोले तो, इकडेतिकडे सापडलेल्या वार्तांकनाच्या तुकड्यांतून. (अर्थात, खरे काय, ते अधिकृत सूत्रांकडून कळल्याखेरीज वर्तविणे अशक्य.)
१. श्री. रावत हे दिल्लीहून तमिळनाडूच्या कोयम्बत्तूर जिल्ह्यातील सुलूर येथील हवाईदलाच्या अड्ड्यापर्यंत (सहकुटुंब) सैन्याच्या विमानाने गेले. तेथून पुढे ते तमिळनाडूतील वेलिंग्टन येथील Defence Services Staff College येथील विद्यार्थ्यांना तथा अध्यापकवर्गाला उद्देशून भाषण करण्यास सैन्याच्या हेलिकॉप्टरने चालले होते. अर्थात, हे सैन्याचे अधिकृत फंक्शन असावे, ज्याकरिता श्री. रावत यांनी सैन्याचे विमान तथा हेलिकॉप्टर वापरणे अधिकृत असावे.
२. कदाचित या फंक्शनला उपस्थित राहण्यास सौ. रावत यांनासुद्धा आमंत्रण असावे. आता, या बाबतीत सैन्याच्या प्रोटोकोलसंबंधी निश्चित कल्पना नाही, परंतु, श्री. रावत हे तेथे सैन्याच्या विमानाने जात आहेत तर सौ. रावत या स्वतंत्रपणे, सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचा वापर करून येत आहेत, हे तर्कास धरून वाटत नाही. अर्थात, सैन्याच्या प्रोटोकोलमध्ये अशा केसिससाठी काही अपवादात्मक तरतुदी असू शकतीलही. विशेषत:, सौ. रावत या अधिकृत आमंत्रित असल्यास. (कल्पना नाही.)
३. कदाचित, सौ. रावत या तेथे निव्वळ अधिकृत आमंत्रित म्हणूनच नव्हे, तर काही अधिकृत कपॅसिटीमध्येही चाललेल्या असू शकतील. (जसे, वक्त्या, प्रमुख पाहुण्या, पारितोषिकवितरक, किंवा अन्य काही?) अशा परिस्थितीत, कदाचित सैन्यानेच (एखाद्या तत्संबंधी तरतुदीखाली) तशी व्यवस्था उपलब्ध करून दिली असणे अशक्य नाही. (यासंबंधी सैन्याचा काही प्रोटोकोल आहे काय आणि असल्यास काय आहे, याबद्दल मला कल्पना नाही. येथे, वर म्हटल्याप्रमाणे, केवळ तर्क लढविला आहे.)
४. वरील प्रतिसादातील पहिल्या बातमीच्या दुव्यात खाली कोठेतरी दिल्ली ते सुलूर उड्डाणाच्या Crew and Passenger Manifestचे छायाचित्र आहे. (हेदेखील लष्करी विमानाचेच उड्डाण होते, आणि सुलूरपासून पुढे लष्करी हेलिकॉप्टरची व्यवस्था होती.) त्यात, सौ. रावत यांच्या नावापुढे (खरे तर त्या यादीतील सगळ्याच प्रवाशांच्या नावांपुढे) Official/Non-Official या रकान्याखाली Official अशी नोंद आहे. यावरून निदान माझ्या तरी पुढीलप्रमाणे धारणा होतात:
- कदाचित सौ. रावत यांचे प्रस्तुत उड्डाण हे प्रस्तुत परिस्थितीत (सैन्याच्या कोठल्या तरी तरतुदीखाली) Official मानले जात असावे, आणि
- कदाचित सैन्याच्या कोठल्या तरी प्रोटोकोलखाली, काही विशिष्ट परिस्थितीत Non-Official वापराकरिता सैन्याची वाहतूकव्यवस्था उपलब्ध करून देता येत असावी. (अन्यथा, Official/Non-Official या रकान्याचे प्रयोजन समजत नाही.)
थोडक्यात, The use of military aircraft by Mrs. Rawat in this case may not necessarily be inappropriate.
अर्थात, आधी म्हटल्याप्रमाणे, हे सर्व काहीही माहिती नसताना केलेले तर्क आहेत. याबद्दल काही अधिकृत माहिती बाहेर आल्याखेरीज प्रत्यक्षात काय ते सांगता येणे कठीण आहे.
भूषण गोखले उवाच
विविध प्रतिगामी व्यासपीठांवर चमकोगिरी करत फिरणाऱ्या भूषण गोखले यांनी हवाई दलातील निवृत्तीबरोबरच बौद्धिक निवृत्ती ही घेतलेली दिसते. दै. लोकसत्ता ने त्यांच्याकडून या अपघातावर प्रतिक्रिया मागविली. अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी अजून झालेलीच नाही. पण:
गोखले उवाच १ : अपघातग्रस्त हेलिकॉप्टर अत्याधुनिक आहे. १४ लोकांस घेऊन ते सहज उडू शकते.
प्रत्यक्ष / कॉमन सेन्स : त्यात बराच माल भरला असेल तर प्रवासी वाहण्याच्या क्षमतेवर मर्यादा येऊ शकते.
गोखले उवाच २ : अतिमहत्वाच्या व्यक्तींना घेऊन उड्डाण करणारे वैमानिक अत्यंत अनुभवी आणि कुशल असतात. एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ती हाताळण्याचे प्रशिक्षण वैमानिकांस दिलेले असते.
प्रत्यक्ष / कॉमन सेन्स: प्रत्यक्षात ते तसे होते काय? आणि असले तरी, कुशल वैमानिकांकडून चुका होऊ शकत नाहीत काय?
गोखले उवाच ३: डोंगराळ भागातील हवामानामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळेच अपघात झाल्याचे स्पष्ट आहे.
प्रत्यक्ष / कॉमन सेन्स: अपघात निलगिरी पर्वतराजीत झाला. सियाचेनमध्ये किंवा ध्रुवीय प्रदेशात नाही. निलगिरीतील हवामान बिघडून बिघडून किती बिघडणार? आणि मी घटनास्थळाच्या त्या दिवशीच्या हवामानाबद्दल सर्च केला त्यात तसे काहीही सापडले नाही.
जराश्या वाईट हवामानामुळे, अत्याधुनिक असूनही ज्यात तांत्रिक बिघाड होऊ शकतो असे हेलिकॉप्टर, मेण्टेनन्स मधील चुकांकडे सुद्धा अंगुलीनिर्देश करीत नाही काय? पण या महत्वाच्या शक्यतेसंदर्भात गोखले महाशय काहीच बोलत नाहीत.
मी या विषयातील तज्ज्ञ बिलकुल नाही, पण फक्त कॉमन सेन्स वापरला तरी गोखले यांच्या विधानांतील भंपकपणा लक्षात यावा.
मी तज्ज्ञ नाही...
निलगिरीतील हवामान बिघडून बिघडून किती बिघडणार?
मी हवामानशास्त्रज्ञ नाही. मला विमानोड्डाणाबद्दल काहीही माहीत नाही. मात्र मी बातम्या कधीमधी वाचते.
लॉस एंजेलिसजवळच्या टेकड्यांमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात होऊन अमेरिकेतला जगप्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट जानेवारी २०२०मध्ये गेला. त्याच अपघातात त्याची मुलगीही गेली. आणि याबद्दल जगभरात, किमान अमेरिकेत तरी मोठा दुखवटा पाळला गेला.
ऑनर किलिंग- कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र (आणि देश )!
ही घटना वाचून सुन्नपणे ' हे असंच चालू रहाणार म्हणायचं?
https://www.bbc.com/marathi/india-59609272
.
महाराष्ट्र (किंवा फॉर्दॅट्मॅटर देशसुद्धा) म्हणजे फक्त मुंबई आणि पुणे, ही कल्पना (पुण्यामुंबईच्या लोकांच्या डोक्यांतून) कधी हटणार, हे तो एक जगन्नियंताच (असला तर) जाणे.
(तरी बरे, ही कल्पना केवळ पुण्यात किंवा मुंबईत प्रत्यक्ष राहणाऱ्या पुण्यामुंबईच्या लोकांच्याच डोक्यात असती, तर गोष्ट वेगळी होती; त्याला कूपमंडूकवृत्तीच्या खाती टाकून मोकळे होता आले असते. परंतु, पुण्यामुंबईत वाढलेल्या परंतु नंतर पुण्यामुंबईहून दूर कोठेतरी – सिंगापुरात, झालेच तर यूएसएत वगैरे – जाऊन राहिलेल्या पुण्यामुंबईच्या लोकांनासुद्धा विहंगमदृश्य/‘बिग पिक्चर’ वगैरे दिसू नये ना! याला काय म्हणावे?)
—————
(तुम्ही पुण्यामुंबईच्या असाव्यात, असे गृहीत धरून हा प्रतिसाद लिहिलेला आहे. या गृहीतकास (तत्त्वास अनुसरून) अर्थातच काहीही आधार नाही. त्यामुळे, तुम्ही पुण्यामुंबईच्या नसल्यास – किंवा, असलात तरीसुद्धा – वाटल्यास हा प्रतिसाद फाऊल समजून त्याकडे खुशाल दुर्लक्ष करावे.)
—————
तर सांगण्याचा मतलब, पुणे आणि मुंबई यांच्या पलिकडेसुद्धा एक प्रचंड मोठा महाराष्ट्र (झालेच तर एक प्रचंड मोठा भारतसुद्धा) आहे. आणि, तो (महाराष्ट्र/भारत) प्रचंड गलिच्छ आहे. (पुणे आणि मुंबईसुद्धा फार स्वच्छ आहेत, अशातला काही दावा अर्थातच नाही.)
काय संबंध?
ऑनर किलिंग देशभर चालतं हे कुणाही बातम्या वाचणार्या /ऐकणार्या माणसाला समजतंच. अगदी QSQT सिनेमापासून ते दाखवलं आहे. आधीही असेल. परंतु कायद्याने अल्पवयीन मुलाकडून त्याच्या आईनेच हत्या करून घेणे - तीही स्वतःच्या मुलीची हे आधी (मी) ऐकलं नव्हतं. त्यात त्या मुलाचे दोन जन्म दाखले! NH10 आणि सैराट सिनेमात या सारखं दाखवूच झालं होतं. शेवटी हत्येला चिथावणी देणारा बाप मात्र फरार झाला आहे. कधी सापडतो पाहू. त्याला आणि त्याच्या मुलाला शिक्षा होण्याची शक्यता कमीच. प्रत्येक देशात गुन्हे होतातच, त्याविषयी वाईट वाटणं, यात टीका करण्याजोगं काय आहे समजलं नाही. असो, प्रतिसाद देण्याची गरज नव्हती परंतु दिला. यावर आणखी चर्चा करणार नाही तुमच्याशी.
लेबर मार्केट आणि स्त्रीवाद
स्त्रियांना पुरुषांपेक्षा सातत्यानं कमी पैसे मिळतात; आणि भांडवलशाहीत त्यामुळे स्त्रियांचं स्थान खालचं राहतं, अशा प्रकारची टीका-चिकित्सा सतत होत असते. ह्या संदर्भात एका नव्या पुस्तकाच्या निमित्तानं वाचलेली मुलाखत -
How ‘Greedy Work,’ More than Bias, Explains the Persistent Gender Wage Gap
सुप्रीम कोर्टाचे अभिनंदन!!
"https://www.loksatta.com/desh-videsh/supreme-court-important-decision-o…"
सुप्रीम कोर्टाचे अभिनंदन!!
अताच ही बातमी वाचली,
अताच ही बातमी वाचली,
The Nobel Prize in Physics 2022 will be awarded to scientists Alain Aspect, John F Clauser and Anton Zeilinger "for experiments with entangled photons, establishing the violation of Bell inequalities and pioneering quantum information science,
म्हणजे "गुंतागुंत" (entanglement) ह्या बहुचर्चित विषयाला आता मान्यता मिळाली तर.
ह्यावर लिहिता येण्यासारखे भरपूर आहे.
ज्यांना रुची असेल त्यांनी Dance of the photons : from Einstein to quantum teleportation / Anton Zeilinger. हे पुस्तक जरूर वाचावे. हे पुस्तक माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकांना समजण्यासारखे आहे.
https://www.loksatta.com/desh
https://www.loksatta.com/desh-videsh/objectionable-remarks-against-prop…
हे असं असतं धार्मिक असणं. माणसाचं हिंसक होणं जस्टिफाय करतो धर्म.
जो हुआ अच्छा हुआ.
एकाही सेलेब्रिटीला निषेध करावा वाटला नाही, टीव्ही वर बातमी नाही, कुठेच काही नाही म्हणजे जे झालं ते बरोबरंच झालं असेल अशी मला खात्री आहे. नाहीतर लोकशाही धोक्यात आली, २०१४ पासून हे असले प्रकार वाढलेत अश्या चर्चा झाल्या, अमेरिकेत, मध्य पूर्वेतल्या बातम्यांमधे अशी "बातमी" आली म्हणजे कळतं की काहीतरी चुकिचं झालंय. त्या मार खाणार्या पोराचं चुकलंच जरा.
https://www.livemint.com
https://www.livemint.com/economy/indiauk-fta-lands-in-row-over-patent-e…
पेटंट एव्हरग्रीनिंगचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भारताने यासंदर्भात कचखाउउ धोरण स्विकारू नये आजिबात.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/explained/explained-why-is-ahir-community-dema…
घ्या. सैन्य तरी जातीविरहीत राहू द्या निदान.
फ्युजन
https://www.cnn.com/us/live-news/nuclear-fusion-reaction-us-announcemen…
हे वाचून बरं वाटलं. अर्थात अजून ग्रिडसारखी उर्जा मिळायला पुष्कळ कालावधी जाणार असला तरीही शक्यता दिसते आहे.
क्लूलेस!
अर्थात, यावर आलेल्या प्रतिक्रियाही बोलक्या नसतील, तरच नवल. वानगीदाखल:
Proof that having a PhD doesn’t guarantee that that individual has good judgment.
असो चालायचेच.
'साईनफेल्ड'मधून
चंद्रावर जाऊन आला, पण साधी अक्कल नाही हो आली याला!
किंवा 'केल्याने देशाटन (आणि) पंडित मैत्री, सभेत संचार ...' चंद्रावर मेलं होतं कोण पंडित मैत्री आणि सभेत संचार करायला!
Monologue
We never should have landed a man on the moon. It's a mistake. Now everything is compared to that one accomplishment. I can't believe they could land a man on the moon . . . and taste my coffee! I think we all would have been a lot happier if they hadn't landed a man on the moon. Then we'd go, They can't make a prescription bottle top that's easy to open? I'm not surprised they couldn't land a man on the moon. Things make perfect sense to me now. Neil Armstrong should have said, "That's one small step for man, one giant leap for every, complaining, sob on the face of the earth. "
बैल गेला न झोपा केला.
ट्रंपतात्यांचं ट्विटर खातं कायमचं बंद केलं आहे. बातमी
अमेरिकेच्या स्वातंत्र्यापासून , १७७६, पहिल्यांदाच अशी ऐतिहासिक घटना घडत आहे.