शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शतकी वर्षात प्रवेश केला. महाराष्ट्रातील सामान्य जनतेची ,इतिहासाकडे पाहण्याची नजर घडवण्यात (किंवा आधीची नजर पक्की करण्यात) त्यांचा काही एक वाटा नक्कीच आहे एका मध्यमवर्गीय ब्राह्मणी घरातील मुलाचे त्यांच्या शिवचरित्राविषयीचे आधीचे भारलेपण आणि नंतर त्याला पडत गेलेले प्रश्न.......
लहानपणी मी आजोळी गेलो कि रात्री झोपताना मला आजी, डोक्यावर थोपटत थोपटत, "शिवाजीच्या गोष्टी" सांगायची. ती सांगलीच्या चिमड संप्रदायांच्या संतश्रेष्ठ गोविंदराव (मामा) केळकरांची अनुग्रहित होती.( स्वतः कै. गोविंदराव (मामा) केळकर साक्षात शांतीब्रह्म होते). त्यामुळे तिच्या गोष्टीत लढाया वगैरे फारसे नसायचे तर शिवाजी महाराज शंकराचा अवतार कसे होते, लाडक्या शिवबाचा अहंकार समर्थांनी कसा दगडातील बेडकी दाखवून नष्ट केला. महाराज तुकोबांकडे गेले असता पांडुरंगाने अनेक शिवाजी निर्माण करून त्यांना कस सुखरूप ठेवल, तुकोबांनी दागदागिने कसे परत पाठवले असल्या भन्नाट गोष्टी असायच्या. तेंव्हापासून शिवाजी महाराज म्हणजे आमच्यासाठी स्पेशल आयकोन झाले होते.
नंतर आजीच्या गोष्टीतले चमत्कार रम्य असले तरी असं घडू शकेल का वगैरे किडे चावायला सुरवात झाली. सांगलीच्या ताम्हणकर बुक डेपो मधून शिवाजी महाराजांची छोटी पुस्तके आणून वाचणे वगैरे चालू होत. अश्यावेळी इतिहासात एमे केलेला , माझ्या आईचा मामा, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे नावाच्या व्यक्तीबद्दल झपाटून बोलायचा. माझे कोंग्रेसी आजोबा, मामा त्याची चेष्टा करायचे. (तुझा शिवाजी शाखेतला शिवाजी आहे हे पेटंट वाक्य, पुरंदर्यांच्या तिथी तारखा सांगून समोरच्याला चकित करण्याची नक्कल वगैरे) मग पुरंदरे सांगलीत आले कि शेजारच्या घारपुर्यांकडेच राहतात, त्यांच्या कडे त्यांची सगळी पुस्तके आहेत हे कळल आणि घारपुरे काकुनी कौतुकाने त्याचं महाराज हे पुस्तक वाचायला दिल, त्यातली चित्रे आणि खाली थोडा थोडा मजकूर अशा स्वरूपाचे लेखन सोलिड भारी वाटल.
पुढे ६-७ वीत गेल्यावर पुरंदर्यांचे "राजा शिवछत्रपती" वाचल. इचलकरंजीत त्यांची व्याख्यानमाला ऐकली आणि त्या वयात झपाटून गेलो. त्यातले भाषेचे अनंतदेखणे सोहळे, शिवाजी महाराजांचे दैवी भव्य रूप, लढाया, समस्त खान लोकांची केलेली चेष्टा वगैरे सोलिड आवडायचं. शाळेत off तासाला, घरी पाहुणे आले कि आमच्या पुरंदरे स्टैलने सादर केलेल्या शिवचरित्राचे कार्यक्रम सुपरहिट जायचे. असच एकदा पाहुण्यांकडे गेलो असताना माझ भाषण ऐकून त्यांनी मला कौतुकाने दुसरे एक ( बहुदा दि वी काळे यांचे) शिवचरित्र दिलेले आठवते. एकंदर ती वर्षे पुरंदरे नावाच्या कवीने मांडलेल्या चमत्कारविरहित शिवचरित्राने रंगीत करून सोडली होती.
पुढे त्यांच्याबरोबर पुलं हे आमचे आणखी एक वाढीव "बुवा" झाले. पुलंनी शिक्का मारला कि तो माणूस मोठा. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरचा लेख वाचल्यावर पुरंदरे म्हणजे लास्ट वर्ड ओंन शिवाजी अस ठरवून टाकल.
या भक्तीला पहिल्यांदा किंचित तडा गेला तो कुरुंदकर यांची "श्रीमान योगी"ची प्रस्तावना वाचताना. कुरुंदकर सांगतायत यातल फारसं काही पुरंदरे सांगत नाहीत बाबासाहेबांच्या शिवाजीपेक्षा त्यांचा शिवाजी जास्त भव्य वाटतो अस वाटायला लागल. (कुरुंदकर यांनी पण काही ढिसाळ विधाने केलीयेत, हे नंतर लक्षात आले)
पुढे शिक्षण व्यवसाय वगैरे मागे लागल्याने सलग आणि elegant history म्हणता येईल अस काही वाचल नाही तरी वर्तमानपत्री लेख, सदानंद मोरे याचं लिखाण, यातून महाराष्ट्रातील ब्राह्मण- ब्राह्मणेतर वाद, संघप्रणीत हिंदुत्ववाद वगैरे थोड थोडे समजत गेले आणि इथला पॉप्युलर इतिहास या दोन अक्षांभोवती कसा फिरतो हे कळत गेले. बहुतेक लोकप्रिय इतिहास (सन्माननीय अपवाद असतीलही) हा ब्राह्मण किंवा मराठा या दोन सत्ताधीशांचा उदो उदो करणे किंवा ब्राह्मण आणि मुस्लिमांना खलनायक ठरवणे याभोवती फिरतो. हा आजच्या राजकारणाला सोयीचा इतिहास आहे. हेही लक्षात आले. या पार्श्वभूमीवर ५ वर्षापूर्वी पुन्हा राजा शिवछत्रपती जेव्हा जमेल तसं वाचल तेंव्हा मात्र हळूहळू अपेक्षाभंग होत गेला. पुरंदरे पण या राजकारणाचे वाहक आहेत किंवा महाराष्ट्रात हे राजकारण शेप करण्यात त्यांच्या शिवचरित्राचा काही वाटा आहे अशी शंका येऊ लागली. सीबीटी (cognitive behavior therapy) वाचल्यामुळे त्यांच्या लिखाणातल्या दृष्टीकोनाच्या, चुका लक्षात येऊ लागल्या.
एकतर भारतीय इतिहासात कुठलाही काल हा सहसा संपूर्ण काळा किंवा पांढरा नसतो. पण पुरंदरे यांनी पहिल्या शिवपूर्वकालीन काळ रंगवताना त्या काळाचे फार सिम्प्लीस्टिक रूप उभे केलय. खिलजी यायच्या पूर्वी यादवांचा महाराष्ट्र म्हणजे दुधातुपात नहात होता गजांत वैभवात महाराष्ट्रलक्ष्मी वास करीत होती, खिलजीनंतर मात्र काळरात्र सुरु झाली(इथे झाडावर बसलेल्या गिधाड, घुबड याचं चित्र पाहिलेलं मला आठवत) अस अतिशयोक्त black and white वर्णन त्यांनी केलंय. स्वतःच्या चुलतभावाला दग्याफटक्याने पकडून त्याचे डोळे काढून सत्तेवर आलेला रामदेवराव मुस्लीम सुल्तानांपेक्षा कुठे उजवा आहे? खिलजी येतोय हे कळून पण आपल्या मुलाला सैन्य घेऊन कोकणात कदंबंविरुद्ध लढायला पाठवणारा, कोठारात धान्याऐवजी मीठ भरलंय हे शेवटपर्यंत न समजणारा राजा कितपत प्रजाहितदक्ष असेल? ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ समाजात काहीतरी सडले कुजले असेल तेंव्हा जन्माला येतो अस मानल तर, पुरंदर्यांच्या वर्णनात हे सडले कुजलेपण का उमटत नाही? मुस्लीम सत्ता सरसकट धर्मवेडाने पेटल्या होत्या तर २०० वर्षात ४-५ मुस्लीम सत्ता इथे असून अक्खा महाराष्ट्र मुस्लीम का झाला नाही? आदिलशहा निजामशहा धर्मप्रसार हे प्रधान कर्तव्य मानीत होते तर त्यांनी मराठा सरदारांचा उदय कसा होऊ दिला? संपूर्ण महसूल व्यवस्था देशपांडे-कुलकर्णी-पाटील-देशमुख या हिंदूंकडे कशी राहू दिले? इस्लामला थ्रेट ठरू शकेल अशी पंढरीची वारी शेकडो वर्षे (काही वर्षाचा अपवाद असेल कदाचित) कशी सुरु राहिली? अश्या कुठल्याही प्रश्नच उत्तर पुरंदरे शोधत नाहीत किंबहुना असे प्रश्न त्यांना पडले कि नाही हे पण निश्चित सांगता येणार नाही.
पुलं "पुरंदरे शिवाजीला दैवी अवतार मानत नाहीत तर महापुरुष मानतात" अश्या अर्थाचं विधान करतात. ह्यातही फारस तथ्य नाही. "पुत्र महाराष्ट्राला झाला, सह्याद्रीला झाला, (आणि किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ उडाला. वाद्यें कडाडूं लागलीं. संबळ झांजा झणाणूं लागल्या. गडावरच्या नगारखान्यांत सनई चौघडा झडूं लागला. नौबत सहस्रशः दणाणूं लागली. नद्या, वारे, तारे, अग्नी सारे आनंदले. तो दिवस सोन्याचा! तो दिवस रत्नांचा! तो दिवस कौस्तुभाचा, अमृताचा! छेः हो, छेः छेः छेः! त्या दिवसाला उपमाच नाही! शुभ ग्रह, शुभ नक्षत्रें, शुभ तारे, शुभ घटका, शुभ पळें, शुभ निमिषे-तो शुभ क्षण गाठण्यासाठीच गेलीं तीनशे वर्षें शिवनेरीच्या भवती घिरट्या घालीत होतीं!) ह्या वर्णनात पुरंदर्यांच्या, शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष होते ह्या धारणा दिसत नाहीत का? ते काव्यात्मक वर्णन आहे या बचावाला अर्थ नाही. बर मी "इतिहास नाही तर चरित्र लिहिलंय", हि सबब फारशी समाधानकारक नाही. समाजाच्या अभ्यासाचा आधार घेत उत्तम चरित्र/fiction लिहिता येऊ शकत नाही अस का म्हणावं?
पुरंदर्यानी शिवकालाचा उदोउदो करताना पण फारशी चौकस वृत्ती ठेवली आहे असे मला वाटत नाही. शिवाजी महाराजांनी वतनदार लोकांचा धोका ओळखला होता हे खरच पण कर गोळा करायला त्यांच्याजवळ तरी पर्यायी यंत्रणा सुरुवातीच्या काळात होती का? त्यामुळे महाराजांनी नवीन वतनदार निर्माण केले नाहीत, त्यांना आडवे गेलेले वठणीवर आणले, त्यांच्याबरोबर राहिलेले सांभाळून घेतले हे आणि एवढेच वास्तव आहे. हे वतनदार किती पद्धतीने गावगाड्यात रुजले होते (Stewart Gorden ने यासाठी nested inerests अशी चपखल संज्ञा वापरली आहे) हे पाहिले तरी वतनदारी पूर्ण उखडणे हे नवीन राजाच्या आवाक्याबाहेरचे काम होते. तेच गनिमी काव्याबद्दल. त्याचा इतका उदोउदो त्यांनी आणि इतर लोकांनी केलाय कि पुढे पेशवे काळात त्या पद्धतीने पेशवे लढले नाहीत हा जणू मूर्खपणा, गंभीर पाप वाटावा.
ललित चरित्रात या सार्याचा उहापोह असावा अशी अपेक्षा नाही पण या गोष्टी लक्षात घेतल्या असत्या, त्यांचे प्रतिबिंब लेखनात पडले असते तर हे चरित्र कदाचित जास्त वास्तववादी झाले नसते का?
या पुस्तकातील दलालांची चित्रे हि पण कुतूहलजन्य आहेत. त्यांनी रंगवलेले हबशी, इराणी, तुर्की मुस्लीम सरदार सगळे एका छापाचे आहेत. त्यांच्यात कुठेच फरक दिसत नाही. हे सपाटीकरण पुस्तकाच्या मुळ नरेटिव्हला धरून आहे. "अक्कल वाटताना मुघल कुठे गेले होते" या वाक्यातून विनोद निर्मिती होत असली तरी सत्याचे दर्शन घडते असे मला वाटत नाही. पुरंदरे यांनी सनावळ्यात अडकून पडलेला इतिहास प्रवाही केला हे खर पण तो प्रवाह त्यांनी कोणाच्या अंगणात जाईल अशा पद्धतीने वळवला हेही महत्वाचे आहेच.
बाबासाहेबांच शिवचरित्र जसं लोकप्रिय होत गेलं तसे त्याला शह देण्यासाठी इतर शिवचरीत्रे आली किंवा तुकारामांचा खून झाला अश्या ना शेंडा बुडखा पद्धतीचा इतिहास आला . पुरोगामी महाराष्ट्र जात, धर्म यांच्या चिखलात अजुनी आनंदाने डुंबू लागला.
आज मी राजा शिवछत्रपती वाचले तर त्यातल्या वैभवशाली भाषेसाठी, रसांच्या आस्वादासाठी वाचेन पण त्याला इतिहास किंवा सत्य इतिहास म्हणावे का याबद्दल मला शंका वाटत राहील
लेख आवडला
(तूर्तास केवळ पोच.)
धन्यवाद!!
धन्यवाद!!
आणखी लिहाच.
हे तर फारच अद्भुत आणि नवीन प्रकरण आहे माझ्यासाठी! याबद्दल तपशिलात लिहाल का? (मी टिंगल करणार नाही याची, अशी खात्री देते.)
(मी टिंगल करणार नाही याची,
(मी टिंगल करणार नाही याची, अशी खात्री देते>>>सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
:प
हाहाहा!
मुघल हे अत्याचारी च होते
मुघल हे अत्याचारी होते .विविध मंदिर उध्वस्त केल्याचा खुणा आहेत ना.
बाबरी मशिद वाद तो तर आहे.अजुन बऱ्याच मंदिराचा वाद आहे.
YAWN
*boredom* *TIRED* |-0 :boredom:
ऐसी वर
असे लेख इतिहासातील विविध घटनेबाबत आले पाहिजेत.लोकांना दुसरी बाजू पण समजेल.
दोष समाजाचा
पुरंदरे सरळ स्वत:ला "शाहीर" म्हणवतात. या शब्दाच्या अर्थासंबंधी खालील अवतरणे पहावी:
१. मराठी शब्दकोष: "शाहीर—पु. १ पोवाडे, लावण्या व ह्या धर्तीचीं कवनें करणारा कवी; २ कवनें रचून तीं म्हणून दाखविणें यांवर चरितार्थ चालविणारा कवि. भाट; चारण. ३ तमाशा करून उपजी- विका करणारा माणूस. ४ (सामा.) राष्ट्रीय किंवा वीर- वृत्तीची कविता करणारा कवि. [अर. शाइर] ॰की-गिरी- १ कवित्व 'रामकृष्ण गुणीरामा कासार; शाहीरकीमधिं सदा मगन.' -पला १०७१. २ शाहीराची वृत्ति, पेशा. शाहीरी- वि. शाहिरासंबंधानें. -स्त्री. कवित्व. [फा. शाइरी]"
२. विकासपेडिया: "शाहिरी वाङ्मय म्हणजे मुख्यतः पोवाडे, लावण्या आणि लावण्यांतच मोडणारी भेदिक कवने. एखाद्या वराचा पराक्रम, राज्यकर्त्यांचे गुणगान, परचक्र व दुष्काळ वा दंगा यांसारखे देशावर कोसळलेले संकट, तीर्थक्षेत्राचे वा राजधानीचे वर्णन इ. विषय पोवाड्यांचे होत. स्त्रीपुरुषांचे सौंदर्य, त्यांची प्रेमभावना, विरहावस्था, प्रणयक्रीडा, झगडे रुसवेफुगवे, निपुत्रिकेची दु:खे, गरोदर स्त्रीचे डोहाळे, पुराणांतील कथा, आध्यात्मिक वा व्यावहारिक उपदेश, अध्यात्म वा पुराणकथा वा लौकिक जीवन यांवरील कोडी, लोककथा इ........ या वाङ्मयाला शाहिरी काव्य म्हणतात."
शाहीर त्यांच्या ठरावीक ग्राहकांसाठी वरील गोष्टी करतात. पूर्वी शाहिरी ही मुख्यत: सादर करण्याची कला (performing art) होती. लिखित शाहिरी वाङ्मय नसे. ती गरज बखरी भरून काढत. बखरींचा "टोन" ही बहुधा शाहिरीच असे.
पुरंदरे यांच्या सादरीकरणास शाहिरी आणि "राजा शिवछत्रपति" सारख्या त्यांच्या पुस्तकांस (बखरसदृश) ऐतिहासिक कादंबरी असेच समजावयास हवे. अनेक वेळा आणि अनेक ठिकाणी पुरंदरे यांनी हे स्पष्ट म्हटले आहे. आणि तो त्यांचा खोटा विनय आहे असे मला वाटत नाही. सबब "इतिहासकार" असल्याच्या आरोपातून त्यांना दोषमुक्त करायला हवे. त्यांच्या कथनास इतिहास समजणे किंवा त्यांच्याकडून इतिहासकाराच्या विचक्षण कामाची अपेक्षा करणे हा समाजाचा मूर्खपणा होय. पराभूत मानसिकतेच्या, चिकीत्सक दृष्टी बिल्कुल नसलेल्या, आणि स्मरणरंजनात आनंद मानणाऱ्या समाजात तो होणारच.
बहुत काय लिहिणे?
ते बरोबर असले तरी लेखकाचा हा
ते बरोबर असले तरी लेखकाचा हा मुद्दा तितकाच गंभीर आहे.
दुनिया झुकती है...
लोकांचे 'bullshit detectors' निकामी झाले असले (किंवा मुदलात ते installed च नसले!), तरच पुरंदरे यांच्यासारखे शब्दबंबाळ, अतिशयोक्त, अतिरंजित आणि एकतर्फी कथन इतिहासाचा जनमानसातील “प्रवाह वळवू” शकते. पण प्रश्न असा आहे, की पुरंदरे यांनी "वळवण्याआधी" तो "प्रवाह" होता का? कुठे होता, आणि नेमक्या कुठल्या दिशेने वाहत होता?
बाकी सर्व ठीक, परंतु...
पुरंदरे हे इतिहासकार असल्याचा दावा खुद्द पुरंदऱ्यांनी केलेला नसल्याकारणाने त्यांना तो (पक्षी: इतिहासकार असल्याचा) आरोप लागू होऊ नये (आणि म्हणूनच, त्यांच्यावर तो केला जाऊ नये), इथवर मान्य आहे. (He is a bard, at best, आणि ते ठीकच आहे.)
इथवरही ठीक.
मात्र,
कोठल्या समाजात हे होत नाही, याबद्दल कुतूहल आहे. (नाही, तुमच्या विवेचनाच्या विरोधात मुळीच नाही; किंबहुना, बहुतांशी सहमत आहे. फक्त, ही आपल्या(च) समाजाची खासियत बहुधा नसावी, अशी एक दाट शंका आहे, एवढेच.)
टाइम प्लीज
नबा, वरील प्रतिसादात तुम्ही व्यक्त केलेली शंका रास्त आहे. त्याबद्दल पुन्हा केंव्हातरी. पण दरम्यान; मूळ लेखाला तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेत सूचित केल्यानुसार, त्या मूळ लेखाबद्दलचे तुमचे विचारही लिहा ही विनंती.
ठीक.
बाकी त्या पुस्तकास डोक्यावर घेणारे बरेच आहेत.
निपक्षपाती
शिवाजी महाराजांबद्दल निपक्षपाती आणि फक्त फॅक्टस सांगणारा इतिहास कुठे वाचायला मिळेल ? आणि अशाच प्रकारचा संभाजी महाराजांबद्दलचा वास्तव इतिहास आता लिहिण्याचे धारिष्ट्र्य कोणी दाखवेल का ?
दोनशे भाकऱ्या आणि आठ फूट उंची
दोनशे भाकऱ्या आणि आठ फूट उंची हाच खरा इतिहास आहे.
दोनशे भाकऱ्या आणि आठ फूट उंची हाच खरा इतिहास आहे.
९० किलोची तलवार राहिली . *dash1* *DASH* *WALL*
आणि ५६” ची छाती!
.
निःपक्षपाती इतिहास म्हणजे उडू शकणारा हत्ती
निःपक्षपाती इतिहास हे मोदींच्या १५ लाख रुपयांसार्ख आहे.अस काही नसतंच. पण भरपूर पुरावे देऊन लिहिलेलं वाचायचे असेल तर मेहेंदळे आहेत कि.=)) *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))
जगाचा ज्ञात असलेला इतिहास
जगाचा आज ज्ञात असणारा इतिहास हा उडणारा हत्ती आहे की.फक्त हिंदू चा इतिहास उडणारा हत्ती आहे ह्याचे उत्तर द्यावे.
निःपक्षपाती इतिहास हा उडणारा हत्ती आहे.
"जेंव्हा एखादा विद्यार्थी माझ्याकडे येतो आणि सांगतो, कि तो उत्तम इतिहास लिहू शकेल कारण तो unbiased आहे,तेंव्हा मी त्याला सांगते कि तू खोट बोलतोयस. तुला तुझे biases निश्चित आहेत. Biases नसलेला इतिहासकार अस्तित्वात नाही. फक्त चांगल्या इतिहासकाराला स्वतःचे biases नक्की कुठले ते पूर्ण माहिती असतात."
रोमिला थापर, (तिस्ता सेटलवाड यांना दिलेल्या मुलाखतीतून)
#ठठस्थसमतोलअंतिमसत्यअसलेलावगैरेइतिहास
इतिहासाचे ग्लोरीफिकेशन
इतिहासाचे ग्लोरीफिकेशन सर्वत्रच अढळतं. काही वेळा तर असत्य घटना/कथा बिनदिक्कत ऐतिहासिक म्हणून सांगितलेल्या असतात. पण पुरंदऱ्यांनी असे काही केल्याचे मला तरी दिसून आले नाही. त्यांची भाषा क्लिष्टं आणि ऐतिहासिक वाटत नाही हा तुम्हाला दोष वाटतो का? एखाद्याचे गुणवर्णन करताना कुणी त्यांच्या गुणांची यादी सादर करेल, तर कुणी (ज्याच्याकडे समृद्ध भाषा आहे) त्याच गुणांचे वर्णन रसाळपणे करेल... पण म्हणून ते असत्य समजायचे कारण नाही. पुरंदऱ्यांची शिवभक्ती वादातीत आहे. त्यांच्या आराध्य दैवता बद्दल बोलताना ते भाषामौक्तीकाची मुक्तं उधळण करतात.. आता दैवत म्हणलं म्हणून लगेच ते महाराजांना देव मानत होते असं म्हणायचे नाहीये मला.... आदर्श या अर्थाने दैवत.
शिवाजी महाराज हे ऐतिहासिक व्यक्ती होते. त्यांच्याबद्दल जे काही लिखित पुरावे आहेत , त्यातून त्यांचे थोरपण दिसून येतेच. त्याचेच वर्णन जर कुणी केले, तर त्याला खोटा का म्हणायचे? काहींची भाषा रोखठोक असते तर काहींची अघळपघळ.
कुठलाही काळ, काळा अथवा पांढरा नसतो हे खरं आहे. पण सर्वसामान्य माणूस देखिल बोलताना सहजतेने म्हणून जातो, की ती काही वर्षे माझ्यासाठी फार वाईट होती. म्हणजे त्या काळात काहीच चांगले नसेल का? असेल पण वाईटाच्या तुलनेने खूपच कमी.... म्हणून त्यांनी 'काळरात्र' म्हणलेला काळ असा होता की ज्यात वाईट घटना जास्तं होत्या.. त्यात अतिशयोक्ती काही नाहीये.
मी वाचलेल्या त्यांच्या पुस्तकात तरी महाराजांचे वर्णन शूर, लढवय्या असेच फक्तं नसून, राजकारण धुरंधर असेही आहे. त्यात त्यांनी स्वराज्याची घडी कशी नेटकी केली, याचही वर्णन आहे. तुमच्या दृष्टीने त्यात काही त्रूटी असतील, पण फक्तं व्यक्तीपुजा नक्कीच नाही.
दलालांच्या चित्राबद्दल तुमचा आक्षेप मला आश्चर्यकारक वाटतो.
तुम्ही तुमचे आक्षेप नोंदवले आहेत.. पण त्याच्या समर्थनार्थ फारसे काहीच लिहिलेले नाही.
चौकस नसणे, उदो उदो करणे, पक्षपाती असणे, अलंकारीक भाषा वापरणे इत्यादी दोषारोप मुक्तंपणे केलेले आहेत. तसेच नुसत्या सनावळ्या तोंडपाठ करून लोकांना दिपविणे वगैरे गोष्टी लिहून टीका करायचीच ठरविल्यावर कुठल्या थरापर्यंत जाता येते ते दाखविले आहे.
असो
असत्य, अर्धसत्य, निवडक सत्य
>> पुरंदऱ्यांनी असे काही केल्याचे मला तरी दिसून आले नाही.
नाही हो! असत्य, अर्धसत्य, निवडक सत्य आणि सत्य घटनांतून काढलेले चुकीचे निष्कर्ष इत्यादि गोष्टी पुरंदरे यांच्या ऐतिहासिक कादंबरीत भरपूर आहेत. त्या सर्व गोष्टींचा परामर्श घ्यायचा, तर त्यासाठी एक पुस्तकच लिहावे लागेल. काही प्रमाणात तसे लिखाण लोकांनी केलेले आहे. मेहेंदळे यांच्या ‘श्री राजा शिवछत्रपती’ या द्विखंडात्मक ग्रंथात याची उदाहरणे दिलेली आहेत.
इतिहास म्हणजे काय?
इतिहासाचे ग्लोरीफिकेशन सर्वत्रच अढळतं>> हे अतिव्याप्त विधान आहे. उदात्तीकरण किंवा किरकोळीकारण न करता इतिहास समजावून घेणारे भरपूर इतिहासकार आहेत.. काही वेळा तर असत्य घटना/कथा बिनदिक्कत ऐतिहासिक म्हणून सांगितलेल्या असतात.पण पुरंदऱ्यांनी असे काही केल्याचे मला तरी दिसून आले नाही>>> इतिहास म्हणजे बरोबर तारखा आणि विश्वसर्ह घटना अशी तुमची कल्पना असेल बहुदा. इतिहास म्हणजे त्यापलीकडे जाऊन केलेले त्या काळाचे खोल interpretation. reconstruction.
त्यांची भाषा क्लिष्टं आणि ऐतिहासिक वाटत नाही हा तुम्हाला दोष वाटतो का?>> उलट मी तो त्यांचा strong पोइंट म्हणून घेतलाय.
पुरंदऱ्यांची शिवभक्ती वादातीत आहे. त्यांच्या आराध्य दैवता बद्दल बोलताना ते भाषामौक्तीकाची मुक्तं उधळण करतात.. आता दैवत म्हणलं म्हणून लगेच ते महाराजांना देव मानत होते असं म्हणायचे नाहीये मला.... आदर्श या अर्थाने दैवत.>>> तुमच्या वाक्यातच contradictions आहेत. पाहिलं वाक्य लिहिल्यावर माझा मुद्दा मान्य केलायासार्ख होत म्हणून पुढच वाक्य लिहील गेलंय असा अंदाज आहे.
कुठलाही काळ, काळा अथवा पांढरा नसतो हे खरं आहे. पण सर्वसामान्य माणूस देखिल बोलताना सहजतेने म्हणून जातो, की ती काही वर्षे माझ्यासाठी फार वाईट होती. म्हणजे त्या काळात काहीच चांगले नसेल का? असेल पण वाईटाच्या तुलनेने खूपच कमी.... म्हणून त्यांनी 'काळरात्र' म्हणलेला काळ असा होता की ज्यात वाईट घटना जास्तं होत्या.. त्यात अतिशयोक्ती काही नाहीये.>>सामान्य माणसाच्या चुका इतिहास लेखकाने करू नयेत .
तुमच्या लिहिण्यात मुद्दे जिथपर्यंत होते त्यावर लिहिलंय. पुढच्या आरोपांना उत्तर देण्यात मला स्वारस्य नाही.
इतिहास म्हणजे बरोबर तारखा आणि
नाही माझी अशी काही कल्पना नाही. इंटरप्रिटेशन हे सब्जेक्टीव्ह आहे. त्यामुळे बायस्ड असणारच.दृष्टीकोनात असलेल्या फरकामुळे इंटरप्रिटेशन सुद्धा वेगळे असू शकते. त्यामुळे कोणाचे किती खरे आणि किती खोटे हे ठरवायला पाहिजे. ते ठरवायचा अधिकार कुणाला असावा हाही एक प्रश्नं आहेच.
रिकन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे कळले नाही.
तुमचा अंदाज चुकीचा आहे. मला जे म्हणायचे होते तेच मी लिहिले आहे. तुम्हाला त्यात कॉन्ट्राडिक्शन दिसली हे तुमचे चुकीचे इंटरप्रिटेशन आहे.
यात चूक काय आहे. बोलण्याची ती एक पद्धत आहे.
मी काही तुमच्यावर आरोप केले नाहीयेत. फक्त तुम्ही फारच वरवरचे लिहिले आहे. त्याचे साधार स्पष्टिकरण दिले असते तर बरे झाले असते एव्हढेच...
बाकी काही नाही.
असो .. चालू द्या!
वेगळाच दृष्टीकोन मांडणारा
वेगळाच दृष्टीकोन मांडणारा रोचक लेख आहे. व्यक्तीपूजेचे स्तोम आपल्याकडे आहेच मग ते संत असोत की ... एकदा श्रद्धा म्हटली की मग चिकीत्सक वृत्ती, डोळसपणा वगैरे निकालात निघतात. त्यात काळे पांढरे वर्गीकरण एकदा केले की मग, विचार करण्याच्या जबाबदारीतूनही मुक्तता होते. काळे म्हणजे खल व पांढरे ते सर्व पूजनिय असे समीकरण मांडले की मग सर्व काही सोप्पे व सपाट होउन जाते. नुआन्सेस ची, करड्या छटांची दखल घेण्याची गरज उरत नाही.
लेख जमलाय.
ओघवत्या शैलीत लिहिला आहे. जाणूनबुजून मांडलेला विखार दिसत नाही. तो दिसतो ब्रिगेडी इतिहासात. विखारी, द्वेषपूर्ण आणि उगाच ब्राह्मणांची हेटाळणी हे ब्रिगेडचे आवडते क्षेत्र. पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या ब्रिगेडी ऐतिहासिक पुस्तकात एवढे अकलेचे तारे तोडलेले असतात की विचारायची सोय नाही.
बाबासाहेब पुरेंदरे यांनी इतिहास कथाकथन ज्या कुशलतेने केलेले आहे त्याला तोडच नाही. इतिहास आवडीने वाचायला लावणारी पुस्तके त्यांनी लिहिली.
त्यांचे शिवचरित्र वाचताना रटाळ वाटत नाही हे फार महत्त्वाचे.
भारतात इतिहास
आता राजकीय फायदा कसा होईल त्या प्रमाणेच इतिहास चा अर्थ लावून तसे लेख पडण्याची फॅशन आहे.
पुरोगामी लोकांना रजिकिय फायद्यासाठी हिंदू विरोध करावा लागतो.ते मोठे अभ्यासू आहेत असे काही नाही.
आणि उजवे त्यांच्या सोयी नुसार इतिहास चा अर्थ काढतात.
भारतीय लोकांवर माझा तरी विश्वास नाही.भारतीय व्यक्ती सोडून बाकी जगातील लोकांनी भारताच्या इतिहास कसा लिहला आहे तोच इतिहास थोडाफार खरा आहे.
मुस्लिम इतिहासकार सोडून .
Bjp विजयो होण्यास सर्वात मोठा हातभार पुरोगामी लोकांचा आहे.
त्यांनी असेच डावे,हिंदू विरोधी मत मांडवी आणि bjp नेहमी विजयी होत जावी.हिंदू नी जास्त मुल जन्मास घालावी हा उजव्या मंडळी चा विचार लोकांस प्रॅक्टिकल वाटू लागला आहे.हे पुरोगामी मंडळी चेच यश आहे.
इतिहास लिहायचाच म्हटला तर
कागदपत्र आहेत. पण तो इतिहास कुणाला वाचायचा नाही. तोंडावर पडलेत किंवा विरोध झाला. जेम्स लेन प्रकरण.
आपल्याच देशाची
आपल्याच देशाची बदनामी करणारे डावे विचार वंत फक्त भारतीय (कारण हे ठराविक हेतू नी प्रेरित आहेत स्व बुध्दी 0)डोक्यात जातात.
देश हित विरूद्ध लिहणे ह्यांचा छंद आहे.आणि ढोंगी पण आहेत
चीन मधील मुस्लिम लोकांवर होणाऱ्या अत्याचार हे काहीच बोलणार नाहीत..जगातील सर्व मुस्लिम राष्ट्र पेक्षा भारतीय मुस्लिम जास्त स्वतंत्र उपभोगत आहेत हे सत्य त्यांना दिसत नाही.
इराण,इराक,सीरिया,अफगाणिस्तान मधील सामान्य लोकांची जी वाईट अवस्था आहे त्याला हेच विज्ञान ,वादी ,धर्म निरपेक्ष ,पुरोगामी थोडेफार तरी जबाबदार आहे.
आपल्याच देशाची
आपल्याच देशाची बदनामी करणारे डावे विचार वंत फक्त भारतीय (कारण हे ठराविक हेतू नी प्रेरित आहेत स्व बुध्दी 0)डोक्यात जातात.
देश हित विरूद्ध लिहणे ह्यांचा छंद आहे.आणि ढोंगी पण आहेत
चीन मधील मुस्लिम लोकांवर होणाऱ्या अत्याचार वर हे काहीच बोलणार नाहीत..जगातील सर्व मुस्लिम राष्ट्र पेक्षा भारतीय मुस्लिम जास्त स्वतंत्र उपभोगत आहेत हे सत्य त्यांना दिसत नाही.
इराण,इराक,सीरिया,अफगाणिस्तान मधील सामान्य लोकांची जी वाईट अवस्था आहे त्याला हेच विज्ञान ,वादी ,धर्म निरपेक्ष ,पुरोगामी थोडेफार तरी जबाबदार आहे.
कोडं
मोबाईल वर चंद्रकांत देशपांडे नावाच्या गृहस्थांची comment दिसते पण laptop वर दिसत नाही हे काय प्रकरण आहे?
मोबाईल वर चंद्रकांत देशपांडे
चंद्रकांत की सदानंद? ती फेसबुकवरून आलेली आहे. कदाचित त्यामुळे दिसत नसेल.
मोबाइलवरूनच दोन वेगळे ब्राउजर आणि डेस्कटॉप/मोबाईल पेज
यात फरक होतो. फेसबुकी टिप्पण्या डेस्कटॉप पेजवर दिसतात पण मोबाईल-पेजवर दिसत नाहीत.
laptop वापरल्यावर तिथे फुल पेजच येत असणार पण कुणीतरी अगोदर सेटिंग्ज मध्ये 'data compression settings' 'high/low' मधून 'high' ठेवले असेल.
ब्रिटिश साम्राज्य जसे जगभर पसरले होते
तिथे ब्रिटिश ऐवजी भारताने जग जिंकले असते तर अनेक महापुरुष भारताला पूजेला मिळाले असते.
प्रतेक महापुरुष प्रतेक समाजाने वाटून घेतलेला आहे.
पण कार्यक्षेत्र लहान असल्या मुळे महापुरुषांची संख्या पण कमी आहे.
प्रतेक समाजाच्या वाटनीला फक्त एक च महापुरुष येत आहे.
तेच जग भारताने काबीज केले असते तर कमीत कमी दहा महापुरुष तरी एका समाजाला मिळाले असते.
हे फेसबुक वर कुणी कुणी शेअर केल हे कळत का?
हे फेसबुक वर कुणी कुणी शेअर केल हे कळत का?
'ऐसी अक्षरे' फेसबुक पान
'ऐसी अक्षरे' फेसबुक पानावर ही पोस्ट अशी दिसते. तिथून जर कुणी शेअर केलं आणि ते शेअर पब्लिक असेल तर बहुतेक कळेल. इतर ठिकाणाहून केलं तर दिसू शकेल, पण सहज नाही; किंवा पोस्ट पब्लिक नसेल तर बहुतेक कळणार नाही.
श्रद्धांजली
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
महाराष्ट्र डबक्यातून बाहेर
महाराष्ट्र डबक्यातून बाहेर पडायला तयार नाही,
??????
.
बहुतेक
... हा संदर्भ असावा. शरद पवार आणि राज ठाकरेंमध्ये बाबासाहेब पुरंदरेंवरुन वाद सुरु असतानाच लेखक जेम्स लेनने केलं भाष्य; म्हणाले “पुरंदरेंनी मला…”
हम्म्म्म...
बरे, ते जाऊ द्या. त्या लेखातील पुढील वाक्याचा अर्थ कोणी मला लावून देऊ शकेल काय?
नक्की कोणी कोणाला काय केले? वाक्यात कर्ते, कर्मे, आणि क्रियापदे, रानोमाळ भटकत आहेत.
हे वार्ताहरलोक भय्ये खासे नसावेत; 'मराठी'च असावेत.
महाराष्ट्र डबक्यात आहे काय, तेथून तो बाहेर पडायला तयार आहे किंवा नाही, वगैरे फार पुढच्या चिंता झाल्या. मुळात महाराष्ट्रच मराठी भाषेची वाट अत्यंत प्रभावीपणे लावीत आहे, हा मला तातडीच्या चिंतेचा विषय वाटतो.
आपलेच लोक आपल्याच भाषेची वाट लावण्यास इतके समर्थ असताना, उगाच इतरभाषकांना शिव्या नक्की काय म्हणून द्यायच्या? "महाराष्ट्राची वाट मराठी माणूसच लावेल; इतरांच्या मदतीची आम्हांस गरज नाही."
असो चालायचेच.
एक न'वी बाजू
वर जे दिले आहे, ते मराठी भाषेचे व्याकरण नियम माहित नाहीत, किंवा लेखकास एक वाक्य धड लिहिता येत नाही- ह्यातला प्रकार वाटत नाही. लेखक मराठी व्याकरणाचे पुनर्लेखन करण्यास इच्छुक दिसत नाही.
एकूण, वरील उदाहरण केवळ आणि केवळ एडिटोरियल ओव्हर्साइटचे मानले जाऊ शकते. भाषेची वाट हे प्रकरण दूर वर दिसत नाही. जर तसे असेल तर मराठी भाषा संपली आहे, किंवा ती कधीही अस्तित्वात नव्हती असे म्हणावे लागेल. वर्तमानपत्रात अश्या चुका क्वचित व्हाव्यात हि अपेक्षा रास्त आहेच, पण चुकीचा अर्थ "मराठी भाषेची वाट" हा काढणे फार फार काहीही आहे. अश्या चुका पूर्वीही व्हायच्या, आजही होतात, उद्याही होणार आहेत.
- ग'वी बाजू
मुस्लिम सत्ता असून पण
भारतात मुस्लिम सत्ताधारी असून पण महाराष्ट्र किंवा भारत मुस्लिम बहुल का झाला नाही?
ह्याचे उत्तर साफ आहे आता जे भारत ,पाकिस्तान ,बांगलादेश मध्ये जवळ जवळ ६० कोटी मुस्लिम आहेत.
ते मूळचे हिंदू च होते.
मुस्लिम सत्ताधारी लोकांनी जबरदस्ती नी त्यांना धर्म परिवर्तन करायला लावले.
.ज्या भागात मुस्लिम लोकांचे राज्य होते तिथे आज पण मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे.
उत्तर भारतात मुस्लिम लोकांची संख्या जास्त आहे.
पण महाराष्ट्र मध्ये परप्रांतीय सोडून फक्त मराठी मुस्लिम लोकांची संख्या खूप कमी आहे.
कारण येथे मुस्लिम लोकांना निर्विवाद पने सत्ता गाजवता आली नाही.
कडवा विरोध झाला.
लेखात हा प्रश्न स्पेसिफिकली
लेखात हा प्रश्न स्पेसिफिकली महाराष्ट्राबाबत विचारण्यात आला आहे. हुशारीने त्यात भारत ऍड करून काही फायदा नाही. बहामनी १३४७, आदिलशाही १४८९ची निजामशाही ,इमादशाही १४९० ची. महाराजांच्या जन्माआधी ३०० वर्षे इस्लामी राजवटी होत्या. त्यांना कडवा विरोध झाला हा हवेतला गोळीबार आहे. जास्तीत जास्त लढाया त्यांच्या त्यांच्यात झाल्या.
मुस्लिम परकीय सत्तेशी
फक्त महाराष्ट्र च लढला.आणि मुस्लिम परकीय राजवटी चा पराभव केला.
देश हा मुर्दाड आहे त्याला स्वत्वाची जाणीव नाही.
म्हणून काही मोजकेच .
देशापासून तुटलेले,समाजा पासून तुटलेले.
भारताचा द्वेष करणारे.
काही ही लिहीत असतात..
कोणी दखल पण घेत नाही.
फक्त आपल्याच टोळक्यात त्यांचे विचार मंथन चालू असते.
लेख वाचला.
लेख वाचला.
काही अतिशय अतार्किक गोष्टी लिहिल्या आहेत. त्या खाली नमूद करतो. त्याचे इंटरप्रिटेशन पुरंदरेंनी लिहिलेले बरोबरच होते आणि ऐतिहासिक सत्यच होते असे करू नये, तर पुरंदरेंनी लिहिलेलं बरोबर नाही हे सांगण्यासाठी तुम्ही जी उदाहरणं दिली आहेत ती अपुरी किंवा असंबंद्ध आहेत असा घ्यावा.
Black and white चित्रण- इथे तुम्ही केवळ argument from incredulity केले आहे. जगात कृष्णधवल बदल होऊ शकतात.
त्याच मुद्द्यात पुढे-
हे कसे काय ? जर यादव घराण्यातल्या लोकांची साधारण सत्ता करण्याची पॉलिसी एकसारखी असेल असे मानले तर कोण यादव कोणाच्या उरावर बसून काय करतो ह्याने जनतेस काय फरक पडणार आहे ?
अकार्यक्षम सत्ताधीश आणि द्वेष्टा सत्ताधीश यामध्ये डावं उजवं होऊ शकते असे मला वाटते.
हॅ, काहीही.
हा क्रिटीसीझम फेअर म्हणता येईल.
मुद्दा नीटसा समजला नाही. कि अब्वमेन्शनड गोष्टी केल्या नाहीत म्हणून "मुस्लिम सत्ता धर्मवेडाने पेटल्या होत्या असे म्हणता येणार नाही" असे म्हणायचे आहे काय?
वाचला, फारसा पटला नाही
लेख वाचला. फारसा पटला नाही. पुरंदऱ्यांनी तो प्रवाह वळवला मधे ध्वनित अर्थ तो संघाकडे/हिंदुत्त्ववादाकडे वळवला असा मी घेतला. तसा नसेल तर हे पुढचे इग्नोअर करा. तो तसा वळवला असे नक्की कशामुळे तुम्हाला वाटले? पुस्तकातील २-३ उदाहरणे दिलीत तर समजेल.
मी हे पुस्तक ३-४ वेळा वाचले आहे. आत्ता काही महिन्यांपूर्वीच पुन्हा वाचले. माझ्या ऑल टाइम फेवरिट पुस्तकांमधे अजूनही ते पहिल्या १० मधे आहे. मला ते मुस्लिमविरोधी वाटले नाही. स्वराज्याच्या विरोधात असलेले सगळे वाईट व बाजूने असलेले सगळे चांगले अशी त्यांची साधीसोपी मांडणी आहे. त्यामुळे विरोधात असलेल्यांचे सद्गुण किंवा बाजूने असलेल्यांचे दुर्गुण गाण्यात त्यांना इन्टरेस्ट नाही.
बाकी तत्कालीन समाजातील अनेक गोष्टींचे प्रतिबिंब या पुस्तकात दिसत नाही वगैरे खरे आहे. ते पटले. पण तसा या पुस्तकात काही उद्देशही दिसत नाही.
(मी पानसऱ्यांचे "शिवाजी कोण होता", म. फुल्यांचा पोवाडा, जदुनाथ सरकारांचे ऑनलाइन मिळालेले पुस्तक हे ही वाचले आहे. तरीही राजा शिवछत्रपती हे अजूनही या विषयावर सर्वात आवडते पुस्तक आहे)
अवांतर पण महत्वाचे
महापुरुष विषयी सर्व च जाती धर्मातील लोकांचे प्रेम बेगडी असते..
प्रेम व्यक्त करण्याचे नाटक केले की वैयतीक फायदा कोणत्या ना स्वरूपात होत असेल तर च बेगडी प्रेम उतू येते..
छ्त्रपती चे गड किल्ले आज शाबूत नाहीत. ते नक्की शत्रू नी उध्वस्त केले की डागडुजी न झाल्यामुळे आज नष्ट झाले ह्या वर कोणी पुस्तक लिहीत नाही.कोणी संशोधन करत नाही.आणि ह्या वर कोणी बोलत पण नाही.
छत्रपती चा फक्त तोंडाने जयजयकार करण्या मध्ये सर्व च पुढे असतात.
त्यांच्या सारखी आदर्श सत्ता आपण पण निर्माण करावी असे मात्र कोणालाच वाटत नाही.
चोरांगा करा इतकेच फक्त माहीत असते.
पण जनतेचे राज्य म्हणून त्यांच्या सत्ता काळाची ओळख आहे.त्याच्या शी मात्र काही देणे घेणे नसते.
हे सर्व महापुरुष आणि त्यांचे बेगडी अनुयायी ह्यांना लागू आहे.
गौतम बुध्द ज्यांनी शांती चा संदेश दिला प्राणिमात्र वर पण दया दाखवा ह्याची शिकवण दिली.
कोणी ती शिकवण गंभीर पने घेतली.
बुध्द धर्मीय असलेल्या .
चीन,जपान,कोरिया नीच भयंकर हिंसा केली.
प्राणिमात्र तर ह्यांचे रोज चे जेवण आहेत च पण माणसांची पण हत्या केली.
कशाला पुतळे तरी उभारता.
मी बघितलेले उदाहरण.
चाळी मधील पाय वाटेने मी बस स्टॉप पर्यंत जात असे.
शॉर्ट कट होता.
तिथे एक भगवान शंकराचे लहान मंदिर आहे.
ज्या दिवशी वार असेल तेव्हा अनेक भक्त भक्ती दाखवत असतात.
पावसात जेव्हा गटार पाण्यानी वाहत असतात.तेव्हा बाजूच्या चाळी च्या बाजूने असणाऱ्या गटारात लोकांनीच टाकलेल्या कचऱ्या मुळे पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होतो आणि ते पाणी दिशा बदलून सरळ मंदिरात जाते.
पण भक्तांना तो कचरा बाजूला करावा हे सुचत नाही.
बेगडी भक्ति आणि बेगड प्रेम ह्याची उदाहरण दोन दोन फुटावर दिसतील.