आजचे दिनवैशिष्ट्य - १८

आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

'आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय विरोध दिन' की 'आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसायविरोध दिन'?

बोले तो, आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसायाला विरोध आहे (पक्षी: राष्ट्रांतर्गत वेश्याव्यवसाय चालेल), की वेश्याव्यवसायाला आंतरराष्ट्रीय विरोध आहे?

(अर्थाचा अनर्थ होतो हो! जरा जपून लिहा की.)

असो, हेही दिवस जातील.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'अ‍ॅस्टेरिक्स'चा जनक चित्रकार रने गॉसिनी (१९७७)

खरे तर हे "'ॲस्टेरिक्स'च्या जनकद्वयांपैकी एक" असे पाहिजे. परंतु, त्याहूनही मोठी घोडचूक म्हणजे, 'ॲस्टेरिक्स'च्या जनकद्वयांपैकी, गॉसिनी हा चित्रकार (कधीही) नव्हता. गॉसिनीने स्वत:स पूर्णपणे 'ॲस्टेरिक्स'च्या कथा-संवाद-शब्दांकन यांना वाहून घेतले होते, तर सहजनक उदेर्झो हा चित्रकार होता; (निदान सुरुवातीच्या काळात तरी) चित्रे काढण्याचे खाते पूर्णपणे उदेर्झोकडे होते, नि उदेर्झोने चित्रे काढण्यास स्वत:स पूर्णपणे वाहून घेतलेले होते.

(पुढे गॉसिनी अकाली नि अचानक वारल्यानंतर, चित्रे काढण्याबरोबरच कथा-संवाद-शब्दांकन यांचीसुद्धा धुरा उदेर्झोच्या खांद्यांवर येऊन पडली.)

सारांश, गॉसिनी हा चित्रकार कधीही नव्हता. अर्थात, 'दिनवैशिष्ट्यां'मधील गलथानपणा हे आता 'ऐसी'चे वैशिष्ट्य झालेले आहे; त्यात आश्चर्यजनक असे काहीही वाटत नाही. परंतु, फ्रेंच गोष्टींमध्येसुद्धा असला गलथानपणा व्हावा, ही मात्र आश्चर्याची बाब आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार. ही दुरुस्ती आता केली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'न'बांच्या नावाचा धागा बघून कित्ती कित्ती आनंद झाला म्हणून सांगू!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नबा कित्ती कित्ती ज्ञानी आहेत नै? चक्क, ऐसीला त्यांच्या सूचनेप्रमाणे दुरुस्ती करावी लागली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१६४० : पोर्तुगालला स्पेनपासून स्वातंत्र्य. होआव चौथा, पोर्तुगालच्या राजेपदी.

अधोरेखित शब्द हा Joãoच्या देवनागरी ट्रान्सलिटरेशनचा प्रयत्न असावा, अशी शंका येते. (चूभूद्याघ्या.)

तसे असल्यास:

१. रोमन लिपीतील Jचा उच्चार स्पॅनिश नियमांप्रमाणे '' असा होतो खरा; परंतु, तसा तो (शेजारच्याच प्रदेशातली भाषा असली, तरीही) पोर्तुगीजमध्येसुद्धा होतो काय? (माझ्या कल्पनेप्रमाणे होत नसावा. पोर्तुगीज नियमांप्रमाणे, माझ्या अंदाजाप्रमाणे, त्या नावाचा उच्चार 'जुआंव' असा व्हावा. (चूभूद्याघ्या. याबद्दल अधिक तपास करून खात्री करून घ्यावी लागेल. ãचा उच्चार सानुनासिक व्हावा.))

२. उलटपक्षी, (त्यापूर्वी पोर्तुगाल हे स्पेनचे अंकित राष्ट्र असल्याकारणाने) स्पॅनिश नियमांप्रमाणे ट्रान्सलिटरेशन केले असावे, म्हणावे, तर हे अनेक कारणांकरिता शक्य नाही.

२अ. रोमनच्या स्पॅनिश आवृत्तीत ã असे अक्षरचिन्ह नाही. रोमनच्या स्पॅनिश आवृत्तीत nच्या डोक्यावर टिल्डा (~) बसू शकतो (जसे: ñ, उच्चारी: न्य.); मात्र, (पोर्तुगीज आवृत्तीप्रमाणे) aच्या टाळक्यावर तो बसू शकत नाही. (उलटपक्षी, पोर्तुगीज आवृत्तीत तो स्पॅनिश आवृत्तीप्रमाणे nच्या मस्तकावर आरोहण करू शकत नाही; मात्र, aकरिता तो शिरोधार्य असू शकतो, नि अनुनासिकासमान ठरतो.)

२ब. पोर्तुगीजमधील João या नावाचे स्पॅनिशमध्ये Juan (उच्चारी: हुआन) असे रूपांतर होते. त्यामुळे, स्पॅनिश नियमांप्रमाणे लिहायचे अथवा ट्रान्सलिटरेट करायचे असते, तर हे नाव Juan असे लिहावे (तथा हुआन असे ट्रान्सलिटरेट करावे) लागले असते. (स्पॅनिशमधील Juan, पोर्तुगीजमधील João, इंग्रजीतील John, फ्रेंचमधील Jean (उच्चारी: जाँ? चूभूद्याघ्या; याबद्दल येथील फ्रेंचतज्ज्ञच खात्रीलायक काय ते सांगू शकतील.), जर्मनमधील Johann (उच्चारी: योहान), अरबीतील यूहन्ना अथवा याह्या, ही सर्व एकाच नावाची विविध भाषांतील रूपे आहेत. अधिक माहितीसाठी येथे तथा येथे पाहा.)

सांगण्याचा मतलब, होआव हे कोठल्याही परिस्थितीत निखालस चुकीचे आहे. सबब, कृपया अधिक तपास करून दुरुस्त करणार काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0