जानेवारी दिनवैशिष्ट्य

जानेवारी

१०
११ १२ १३ १४ १५
१६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३०
३१

१ जानेवारी

जन्मदिवस : आधुनिक ऑलिंपिक खेळांचा जनक पिएर द क्यूबर्तँ (१८६३), छायाचित्रकार अल्फ्रेड स्टिग्लिट्झ (१८६४), लेखक इ. एम. फॉर्सटर (१८७९), गांधीवादी कार्यकर्ते महादेवभाई देसाई (१८९२), भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस (१८९४), लेखक जे. डी. सॅलिंजर (१९१९), शिल्पकार सेझार (१९२१), सिनेदिग्दर्शक उस्मान सेंबेन (१९२३), नृत्यदिग्दर्शक मॉरिस बेजार (१९२७), नाटककार जो ऑर्टन (१९३३), लेखक राजा राजवाडे (१९३६), अभिनेता असरानी (१९४१), शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर (१९४३), कवी नामदेव कांबळे (१९४८), सिनेदिग्दर्शिका दीपा मेहता (१९५०), अभिनेता नाना पाटेकर (१९५१), सिनेदिग्दर्शक शाजी करूण (१९५२), अभिनेत्री विद्या बालन (१९७८)
पुण्यस्मरण : गणितज्ञ योहान बर्नोली (१७४८), रसायनशास्त्रज्ञ शांतिस्वरूप भटनागर (१९५५), संपादक व लेखक शं. वा. किर्लोस्कर (१९७५)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई, हैती, सुदान

१७७२ : ९० युरोपिअन शहरांत चालणारे जगातील पहिले ट्रॅव्हलर्स चेक्स लंडनमध्ये उपलब्ध.
१७८८ : 'द टाइम्स' या लंडनहून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राची पहिली आवृत्ती उपलब्ध.
१८०० : डच इस्ट इंडिया कंपनीचा विलय.
१८०८ : अमेरिकेत गुलामांच्या आयातीवर बंदी.
१८१८ : भीमा कोरेगावच्या लढाईत ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने फक्त ५०० सैनिकांनिशी पेशव्यांच्या नेतृत्वाखालील २५,०००च्या सैन्याचा पराभव केला.
१८४८ : महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
१८६२ : भारतीय दंडविधान (Indian Penal Code) अस्तित्वात आले.
१९०६ : भारतीय प्रमाण वेळ भारतात स्वीकृत.
१९३२ : डॉ. नारायण भिकाजी परुळेकर यांनी सकाळ हे वृत्तपत्र सुरू केले.
१९५९ : क्यूबात क्रांती : फिडेल कॅस्ट्रोच्या नेतृत्वाखालील क्रांतिकारकांचा राजधानी हवानावर ताबा.
१९७० : 'युनिक्स टाईम'ची सुरुवात.
१९८३ : आर्पानेट या इंटरनेटच्या पूर्वसुरीने TCP/IP प्रोटोकॉल वापरण्यास सुरुवात केली. आजचे इंटरनेटही हाच प्रोटोकॉल वापरते.
२००२ : युरोपिअन महासंघातील १२ देशांत युरो चलन सार्वत्रिक. मानवी इतिहासातील हा सर्वात मोठा चलनबदल होता.
२०१२ : मॅग्नस कार्लसनने बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वोच्च इलो गुण प्राप्त केले व गॅरी कास्पारोव्हचा याआधीचा इलो गुणांचा विक्रम मोडीत काढला.

२ जानेवारी

जन्मदिवस : शिल्पकार अर्न्स्ट बार्लाक (१८७०),सिनेदिग्दर्शक झिगा व्हर्टोव्ह (१८९६), लेखक जैनेंद्र कुमार (१९०५), लेखक आयझॅक असिमोव्ह (१९२०), गणितज्ञ श्रीनिवास वरधन (१९४०), क्रिकेटपटू किर्ती आझाद (१९५९), क्रिकेटपटू रमण लांबा (१९६०)
पुण्यस्मरण : समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (१९४४), इतिहास संशोधक भास्कर वामन भट (१९५२), नाटककार, अभिनेता व दिग्दर्शक सफदर हाशमी (१९८९), शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर (२०१५)

---

१७५७ : ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता जिंकून आपल्या साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली.
१८८१ : लो. टिळकांनी 'मराठा' हे इंग्रजी दैनिक सुरू केले.
१८८५ : पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजची स्थापना.
१९५४ : भारतरत्न या सर्वोच्च किताबाची स्थापना.
१९८९ : 'जन नाट्य मंच' या संस्थेद्वारे पथनाट्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे सफदर हाशमी यांची पथनाट्य सादर करताना अज्ञात हल्लेखोरांकरवी गोळ्या झाडून हत्या.

३ जानेवारी

जन्मदिवस : रोमन राजकारणी व विचारवंत सिसेरो (१०६), समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (१८३१), लेखक जे. आर. आर. टोल्कीन (१८९२), लेखक कर्तारसिंग दुग्गल (१९१७), सिनेदिग्दर्शक चेतन आनंद (१९२१), सिनेदिग्दर्शक सर्जिओ लिओने (१९२९), इतिहासकार व विचारवंत य. दि. फडके (१९३१), टेनिसपटू मॅग्नस गुस्ताफसन (१९६७), माजी फॉर्म्युला-१ विश्वविजेता मायकेल शुमाकर (१९६९)
पुण्यस्मरण : कोशकार पिएर लारूस (१८७५), नाटककार मोहन राकेश (१९७२), अभिनेता डेव्हिड (१९८२), अंतराळशास्त्रज्ञ सतीश धवन (२००२), व्हायोलिनवादक एम. एस. गोपालकृष्णन (२०१३), लेखिका सरिता पदकी (२०१५)

---

वर्धापनदिन : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे, अ‍ॅपल.

१९५२ : स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका.
१९५७ : विद्युत घटावर (बॅटरी) चालणारे पहिले घड्याळ बाजारात उपलब्ध झाले.
१९६१ : अमेरिकेने क्यूबाशी संबंध तोडले.

४ जानेवारी
जन्मदिवस : शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन (१६४३), परिकथालेखक जेकब ग्रिम (१७८५), ब्रेल लिपीचा जनक लुई ब्राय (१८०९), लघुलिपीचा जनक आयझॅक पिटमन (१८१३), कृषितज्ज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर (१८६४), लेखक प्रभाकर पाध्ये (१९०९), कवयित्री इंदिरा संत (१९१४), लेखक व संपादक विद्याधर गोखले (१९२४), सिनेदिग्दर्शक कार्लोस सॉरा (१९३२), क्रिकेटपटू सुरेंद्रनाथ (१९३७), नोबेलविजेता लेखक गाओ चिंगजियान (१९४०), लेखक श्रीकांत सिनकर (१९४०)
पुण्यस्मरण : दुसरे बाजीराव पेशवे (१८५१), लेखक व विचारवंत राजारामशास्त्री भागवत (१९०८), तत्त्वज्ञ हेन्री बर्गसन (१९४१), नोबेलविजेता लेखक व विचारवंत अल्बर्ट काम्यू (१९६०), भौतिकशास्त्रज्ञ अर्विन श्रॉडिन्जर (१९६१), कवी टी.एस. एलियट (१९६५), लेखक ख्रिस्तोफर इशरवूड (१९८६), संगीतकार राहुल देव बर्मन (१९९४)
---
स्वातंत्र्यदिन : म्यानमार (१९४८)
आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन.
१८८१ : लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले.
१८८५ : आंत्रपुच्छ (अ‍ॅपेंडिक्स) काढण्याची पहिली शस्त्रक्रिया.
१९३२ : काँग्रेसवर बंदी; म. गांधींना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक.
१९३६ : बिलबोर्डची पहिली 'टॉप चार्ट' यादी जाहीर.

५ जानेवारी
जन्मदिवस : सम्राट शाहजहाँ (१५९२), कवी व तत्त्वचिंतक खलील जिब्रान (१८८३), भाषाअभ्यासक कृ.पां. कुलकर्णी (१८९२), लेखक श्री.ना. पेंडसे (१९१३), नाटककार फ्रीडरिक ड्यूरेनमॅट (१९२१), लेखक उम्बेर्टो एको (१९३२), क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी (१९४१), गायिका-अभिनेत्री फय्याझ (१९४८)
पुण्यस्मरण : कर्नाटक संगीताचे धुरीण त्यागराज (१८४७), शिक्षणतज्ज्ञ व वनस्पतितज्ज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर (१९४३), लेखक ना.धों. ताम्हणकर (१९६१), जादूगार पी.सी. सरकार (१९७१), संगीतकार सी. रामचंद्र (१९८२), वेदाभ्यासक व कोशकार सिद्धेश्वरशास्त्री चित्राव (१९८४), चित्रकार, समीक्षक व नेपथ्यकार द.ग. गोडसे (१९९२)
---
१६७१ : छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेर मुघलांकडून काबीज केले.
१८९६ : विल्हेल्म रॉन्टजेनने विशिष्ट प्रकारचा किरणोत्सर्ग शोधल्याचे ऑस्ट्रियाच्या दैनिकात प्रसिद्ध झाले. या किरणोत्सर्गाला पुढे क्ष-किरण असे नाव दिले गेले.
१९१४ : फोर्ड मोटर कंपनीने आठ तासांचा दिवस व ५ डॉलर रोजचा पगार जाहीर केला. याआधी कामगारांना ठराविक तासांचे काम करणे भाग नसे.
१९१९ - जर्मनीत कामगारांच्या शांततेसाठीची मुक्त समिती स्थापन झाली. याचेच पुढे नाझी पक्षात रूपांतर झाले.
१९२४ - महाड नगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले केले.
१९३३ - सॅन फ्रान्सिस्कोच्या खाडीवर गोल्डन गेट पुलाचे बांधकाम सुरू झाले.
१९४८ - वॉर्नर ब्रदर्सनी प्रथम रंगीत सिनेमाचे प्रदर्शन केले.
१९६८ - अलेक्झांडर दुब्चेक चेकोस्लोव्हेकियाच्या राष्ट्राध्यक्षपदी. चेकोस्लोव्हाकियामध्ये प्राग वसंत सुरू.

६ जानेवारी

जन्मदिवस : 'दर्पण'कार व मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर (१८१२), चित्रकार ग्युस्ताव्ह दोरे (१८३२), लेखक विजय तेंडुलकर (१९२८), लेखक कमलेश्वर (१९३२), गायक, गीतकार व गिटारिस्ट सिड बॅरेट (१९४६), क्रिकेटपटू कपिल देव (१९५९), संगीतकार ए. आर. रहमान (१९६६)
पुण्यस्मरण : संगीतज्ञ त्यागराज (१८४७), अंधांसाठीच्या ब्राय लिपीचा जनक लुई ब्राय (१८५२), वनस्पतिशास्त्रज्ञ ग्रेगर मेंडेल (१८८४), गणितज्ञ जॉर्ज कॅंटर (१९१८), लेखक ए. जे. क्रोनिन (१९८१), संगीतकार जयदेव (१९८७), जाझ संगीतकार डिझी जिलेस्पी (१९९३), नर्तक व नृत्यरचनाकार रुडॉल्फ न्यूरेयेव्ह (१९९३)

---

पत्रकार दिन (महाराष्ट्र).

वर्धापनदिन : मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण (१८३२)
१८३८ : सॅम्युएल मॉर्सचा मॉर्स कोड वापरून तारायंत्राचे पहिले प्रात्यक्षिक.
१९०७ : मारिआ माँटेसरी यांनी पहिली 'माँटेसरी शाळा' चालू केली.
१९२४ : स्वातंत्र्यसैनिक वि. दा. सावरकर यांची अंदमान कारागृहातून सुटका.
१९९३ : सोपोर हत्याकांड - अतिरेक्यांनी छावणीवर केलेल्या हल्ल्याला प्रतिसाद म्हणून भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी (किमान) ४३ काश्मिरी नागरिकांची हत्या केली.
२०२१ : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या समर्थकांचा २०२०च्या निवडणूक निकालाविरोधात वॉशिंग्टन डीसी येथील काँग्रेस भवनावर हल्ला; पाच मृत.

७ जानेवारी

जन्मदिवस : भारतभर भाषिक सर्वेक्षण करणारे भाषातज्ज्ञ जॉर्ज अब्राहम ग्रीरसन (१८५१), नाटककार माधव नारायण जोशी (१८८५), लोकसाहित्याच्या संकलक व अभ्यासक सरोजिनी बाबर (१९२०), अभिनेता चंद्रकांत गोखले (१९२१), लेखक जेरल्ड डरेल (१९२५), अभिनेत्री सुप्रिया पाठक (१९६१), अभिनेत्री बिपाशा बासू (१९७९)
पुण्यस्मरण : भौतिकशास्त्रज्ञ निकोला टेस्ला (१९४३)

---

१६१० : गॅलिलिओने गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला.
१७८९ : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षासाठीची पहिली निवडणूक. जॉर्ज वॉशिंग्टन विजेता.
१९२७ : अटलांटिक महासागरातून जाणारा आणि न्यू यॉर्क - लंडन जोडणारा पहिला टेलिफोन दुवा उपलब्ध झाला.
१९२९ : 'टारझन' कॉमिकचे प्रथम प्रकाशन.
१९७९ : कंबोडिआमध्ये हुकूमशहा पॉल पॉट आणि ख्मेर रूजच्या क्रूर सत्तेचा अंत.
१९८० : आणीबाणीनंतरच्या पराभवानंतर इंदिरा गांधी प्रचंड बहुमताने पुन्हा विजयी झाल्या व केंद्रात पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन झाले.
१९८८ : विश्वनाथन आनंदला बुद्धिबळात ग्रॅंडमास्टर दर्जा प्राप्त झाला. यथावकाश त्याने अनेकदा विश्वविजेतेपद जिंकले.
२०१५ : पॅरिसमध्ये 'शार्ली एब्दो' ह्या उपरोधिक नियतकालिकावर दहशतवादी हल्ला; संपादक व प्रमुख व्यंगचित्रकारांसह १२ मृत.

८ जानेवारी
जन्मदिवस : कृषी, आरोग्य, देशी कारागिरीवर पुस्तके लिहिणारे बाळकृष्ण आत्माराम उर्फ भाऊसाहेब गुप्ते (१८५१), युद्ध आणि लष्करविषयक ग्रंथकार यशवंत श्रीधर परांजपे (१९०१), ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणार्‍या प्रथम लेखिका आशापूर्णादेवी (१९०९), ओडिसी नृत्यगुरू केलुचरण महापात्र (१९२६), अभिनेता सईद जाफरी (१९२९), लेखिका प्रभा गणोरकर (१९४५), संगीत दिग्दर्शक हॅरीस जयराज (१९७५)
पुण्यस्मरण : खगोलशास्त्रज्ञ गॅलिलेओ गॅलिली (१६४२), अध्यात्मविषयक ग्रंथांचे लेखक परशुराम गोविंद चिंचाळकर (१९३४), स्काऊटचा जनक लॉर्ड बेडन पॉवेल (१९४१), दिग्दर्शक बिमल रॉय (१९६३), प्राच्यविद्यापंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर (१९६७), 'सकाळ'चे संस्थापक नानासाहेब परुळेकर (१९७३), तत्त्वज्ञ आणि विचारवंत स. ज. भागवत (१९७३), 'आनंद' मासिकाचे माजी संपादक द. प्र. सहस्रबुद्धे (१९९२)

---

१८८९ : हर्मन हॉलरिथने संगणकाचा एक पूर्वज बनवला.
१९१४ : रेडियमचा कर्करोगाच्या इलाजासाठी प्रथम वापर.
१९६१ : अल्जिरीयाच्या स्वातंत्र्याच्या बाजूने फ्रेंचांनी मतदान केले.
१९७१ : 'स्वतंत्र बांगलादेश जाहीर केल्याच्या गुन्ह्याखाली' अटक झालेल्या शेख मुजिबूर रहमान यांची तुरुंगातून मुक्तता.

९ जानेवारी
जन्मदिवस : लेखक आणि नाटककार वृंदावनलाल वर्मा (१८८९), 'द सेकंड सेक्स'ची स्त्रीवादी लेखिका सिमोन दी बोव्व्हार (१९०८), सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक ,समीक्षक, रा. भा. पाटणकर (१९२७), पार्श्वगायक महेंद्र कपूर (१९३४), इतिहासकार मोहम्मद इशाक खान (१९४६), दिग्दर्शिका, नृत्यदिग्दर्शिका फराह खान (१९६५), अभिनेता, दिग्दर्शक, गायक फरहान अख्तर (१९७४), अभिनेता शरद मल्होत्रा (१९८३)
पुण्यस्मरण : पखवाजवादक शंकरबापू आपेगावकर (२००४)

---

१८६७ : प्रोफेसर वेल्स यांनी मुंबईत बलुनचे यशस्वी उड्डाण केले.
१८८० : क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
१९२२ : ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ हे संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले.
१९३९ : फ्रान्सियम या मूलद्रव्याचा शोध
१९६६ : भारत पाकिस्तान यांच्यात रशियातील ताश्कंद येथे करार झाला.
१९८० : इंदिरा गांधीं विक्रमी मतं मिळवून सत्तेवर.
१९९० : पिसा कलता मनोरा पर्यटकांसाठी बंद झाला.
२००७ : स्टीव्ह जॉब्जने पहिला आयफोन दाखवला.

१० जानेवारी
जन्मदिवस : कवी पिंगली लक्ष्मीकांतम (१८९४) स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक काकासाहेब तथा नरहर विष्णु गाडगीळ (१८९६), इतिहाससंशोधक डॉ. गणेश हरी खरे (१९०१), अभिनेता शिवाजी गणेशन (१९२७), पार्श्वगायक येशुदास (१९४०), चित्रपट निर्माता अलू अरविंद (१९४९), दिग्दर्शक आणि पटकथालेखन मुरली नायर (१९६६), अभिनेता ऋतिक रोशन (१९७४)
पुण्यस्मरण : मराठा साम्राज्यातला सरदार दत्ताजी शिंदे (१७६०), फॅशन डिझायनर आणि शनाल ब्रँडची निर्माती कोको शनाल (१९७१), अभिनेता, 'फ्लॉप शो'फेम विवेक शौक (२०११), रॉकस्टार डेव्हिड बॉवी (२०१६)

---

वर्धापनदिन : मुंबईचे छत्रपती शिवाजी संग्रहालय (१९२२)
शनिवारवाडा बांधायला सुरुवात झाली.

१७६० : 'बचेंगे तो और भी लडेंगे' या वाक्याने प्रसिद्ध असलेली दत्ताजी शिंदे वि. कुतुबशहा लढाई
१७७६ : थॉमस पेनने 'कॉमन सेन्स' प्रसिद्ध केले.
१८४० : इंग्लडने पेनी पोस्ट सेवा सुरु केली.
१८६३ : लंडन अंडरग्राऊंड रेल्वे प्रवाशांसाठी खुली झाली.
१८७० : जॉन रॉकफेलरने अमेरिकेतले सर्वात मोठी तेलकंपनी स्टँटर्ड अॉईलची स्थापना केली.
१९२० : जर्मन साम्राज्य नष्ट करणारा, व्हर्सायचा तह प्रत्यक्षात आला, जिनिव्हामधे राष्ट्रसंघाची स्थापना, युनोचे पहिले अधिवेशन.
१९९९ : संजीव नंदा (माजी नौदलप्रमुखाचा नातू) नवी दिल्लीत गाडी चालवताना तीन पोलिसांची चिरडून हत्या केली
२००१ - विकिपिडीया न्यूपिडीयाचा एक भाग म्हणून सुरू झाला. पाच दिवसांनी त्याचे स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण झाले.

११ जानेवारी
जन्मदिवस : हिंदी साहित्यिक श्रीधर पाठक (१८५८), ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स.खांडेकर (१८९८), चित्रपट दिग्दर्शक बोनी कपूर (१९५४), क्रिकेटपटू राहुल द्रविड (१९७३)
पुण्यस्मरण : क्रांतिकारक मास्टर सूर्यसेन (१९३४, चितगाव येथे फाशी), साहित्यिक वासुदेवाचार्य केसर (१९२१), माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री (१९६६),उद्योगपती घनश्यामदास बिर्ला (१९८३), लेखक, इतिहाससंशोधक य. दि. फडके (२००८), पहिला एव्हरेस्टवीर एडमंड हिलरी (२००८)

---

प्रजासत्ताक दिन : आल्बेनिया.
एकता दिन : नेपाळ.
स्वतंत्रता संघर्ष दिन : मोरोक्को.
चाडचा स्वातंत्र्यदिन

१७८७ - विल्यम हर्शलने युरेनसचे उपग्रह, टायटेनिया व ओबेरोन, यांचा शोध लावला.
१९२२ : मधुमेहाच्या रुग्णावर प्रथम इन्सुलिनचा प्रयोग केला गेला.
१९३५ : श्वेतबटू ताऱ्यांच्या वस्तुमान मर्यादेवरून चंद्रशेखर आणि एडिंग्टन यांचा वाद. (पुढे चंद्रशेखरना याच शोधासाठी नोबेल)
१९७२ : बांग्लादेशाचे नामकरण
२००२ : अल्झायमर विकाराचे वेळेत निदान करणारी पहिली चाचणी कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजलिस (UCLA) यांनी जाहीर केली.

१२ जानेवारी
जन्मदिवस : राजमाता जिजाबाई (१५९८), Principle of least time मांडणारा फ्रेंच गणिती पियार दी फर्मा (१६६५), स्वामी विवेकानंद (१८६३), संगीतकार सी. रामचंद्र (१९१८), न्यायरत्न, महर्षी धुंडिराजशास्त्री विनोद (१९०२), संस्कृतिकोशाचे संपादक महादेवशास्त्री जोशी (१९०६), लेखक हारुकी मुराकामी (१९४९)
पुण्यस्मरण : पंडित कुमार गंधर्व (१९९२), लो. टिळकांचे सहकारी आणि चित्रशाळेचे विश्वस्त वासुकाका जोशी (१९४४), रहस्यकथालेखिका अगाथा ख्रिस्ती (१९७६), अभिनेता अमरिश पुरी (२००५)

---

राष्ट्रीय युवा दिन
झांजिबार क्रांती दिन : टांझानिया.

१७०८ : मराठी राज्याची नवी राजधानी सातारा इथे हलवण्यात आली.
१९०८ : पहिला लांब अंतरावर पाठवला गेलेला रेडिओ संदेश आयफेल टॉवरवरून प्रसारित झाला.
१९२६ : पास्चर संस्थेने धर्नुवातासाठी लस शोधल्याची घोषणा केली.
१९३६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा.
१९९८ : एकोणीस युरोपीय देशांनी मानवी क्लोनिंगवर बंदी आणली.
२००० : ब्रिटीश सैन्यात समलैंगिकांचा समावेश करण्याचा निर्णय
२०१० : तीन लाखावर बळी घेणारा हैतीचा भूकंप

१३ जानेवारी
जन्मदिवस : रविकिरण मंडळातल्या कवयित्री मनोरमा रानडे (१८९६), सिनेदिग्दर्शक, निर्माता शक्ती सामंता (१९२६), संतूरवादक शिवकुमार शर्मा (१९३८), अंतराळवीर राकेश शर्मा (१९४९), अभिनेता इम्रान खान (१९८३)
पुण्यस्मरण : कवयित्री मनोरमा रानडे (१९२६)
---

केप वेर्देचा लोकशाही दिन
स्वातंत्र्यदिन : टोगो

१८४९ : इंग्रज आणि शीखांची दुसरी लढाई, चिलीयनवाला इथे सुरू झाली. (शीखांचा विजय)
१९१० : न्यूयॉर्कमधे पहिली रेडीओ ब्रॉडकास्ट
१९३० : मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित
१९४२ : प्लास्टीकच्या गाडीचं पहिलं पेटंट हेन्री फोर्डने दाखल केलं.
१९५७ : हिराकूड धरणाचे उद्‌घाटन
१९६४ : कोलकात्यामधल्या धार्मिक दंगलींमधे १०० हून अधिक ठार
२०११ : भारतातील शेवटची पोलिओ रुग्ण सापडली.

१४ जानेवारी
जन्मदिवस : संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण याविषयी काम करणारे कृतिशील विचारवंत, र.धों.कर्वे (१८८२), क्रिकेटमहर्षी दि.ब.देवधर (१८९२), माजी अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख (१८९६), सिनेअभिनेत्री दुर्गा खोटे (१९०५), ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत द्वा. भ. कर्णिक (१९०८), कवी कैफी आझमी (१९१९), ज्ञानपीठ आणि इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार विजेत्या लेखिका महाश्वेतादेवी (१९२६), एफ१ चालक नारायन कार्तिकेयन (१९७७)
पुण्यस्मरण : धूमकेतूची कक्षा शोधणारा एडमंड हॅले (१७४२), "अॅलिस इन द वंडरलँड"चा लेखक आणि गणितज्ञ लुईस कॅरोल (१८९८), डॉज कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन प्रान्सिस डॉज (१९२०), कवी, लेखक आणि नाटककार जयशंकर प्रसाद (१९३७), सिनेअभिनेता हंफ्रे बोगार्ट (१९५७), संगीतकार नाशाद (१९८१), संगीतकार चित्रगुप्त (१९९१), कांत्स्य शिल्पकार जसुबेन शिल्पी (२०१३), हार्मोनियमवादक पं. पुरुषोत्तम वालावलकर (२०१४)

---

१७६१ : पानिपतच्या तिसऱ्या लढाईतला अखेरचा घनघोर संग्राम. विश्वासराव आणि सदाशिवरावभाऊ या मातब्बरांचा मृत्यु.
१८५७ : भारतात मिळालेली लूट ठेवून घेण्याची मुभा ईस्ट इंडीया कंपनीला देणारा हुकूम इंग्लंडच्या राजाने काढला.
१९३३ : 'बॉडीलाईन' गोलंदाजीमुळे अॉस्ट्रेलियन कप्तान बिल वुडफुलच्या हृदयावर चेंडू लागला.
१९८२ : इंदिरा गांधींनी आर्थिक सुधारणाबाबतचा २० कलमी कार्यक्रम विशद केला.
१९९३ : मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले.
२००४ : जॉर्जियाच्या पाच क्रॉस ध्वजला पाचशे वर्षांनंतर पुन्हा अधिकृत ध्वजाचे स्थान देण्यात आले.
२००५ : शनिचा उपग्रह टायटनवर हायगेन्स प्रोब हे अंतराळयान उतरले.

१५ जानेवारी
जन्मदिवस : फ्रेंच नट आणि नाटककार मोलिएर (१६२२), हेलसिंकीमधे अॉलिंपिक कांत्स्यपदक मिळवणारे खाशाबा जाधव (१९२६), सामाजिक समानतेच्या अमेरिकन चळवळीचे नेते मार्टिन ल्यूथर किंग ज्यू. (१९२९), सिनेअभिनेता नील नितीन मुकेश (१९८२)
पुण्यस्मरण : चित्रकार दीनानाथ दलाल (१९७१), माजी पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक गुलजारीलाल नंदा (१९९८), राष्ट्रपतीपदक विजेत्या तमाशा कलावंत विठाबाई भाऊ नारायणगावकर (२००२), दलित पँथरचे संस्थापक आणि ज्येष्ठ साहित्यिक नामदेव ढसाळ (२०१४)

---

१७६१ : पानिपतचे तिसरे युद्ध संपले
१८८९ : 'पेंबर्टन मेडिसीन कंपनी' या नावाने कोकाकोला कंपनीची सुरूवात
१९४९ : स्वातंत्र्यानंतर फिल्डमार्शल के.एम. करिअप्पा यांनी पहिले लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली. हा दिवस लष्करदिन म्हणून ओळखला जातो.
१९१९ : छत्रपती शाहू महाराजांनी स्पृश-अस्पृशांना एकत्रित शिक्षण व्यवस्था सुरु केली.
१९७१ : नाईल नदीवरच्या आस्वान
१९७५ : अँगोलाला पोर्तुगाल पासून स्वातंत्र्य.
१९९६ : भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभाचे साक्षीदार बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले.
२००१ : विकीपीडीया आंतरजालावर उपलब्ध
२००५ : ESAच्या SMART-1 या चांद्र-उपग्रहाने चंद्राच्या पृष्ठभागावर असणाऱ्या कॅल्सियम, सिलीकन, लोह, आणि अन्य मूलद्रव्यांचा शोध लावला.
२००९ : यूएस एअरवेजच्या विमानाचं, प्राणहानी टाळून हडसन नदीत आश्चर्यकारक लँडींग

१६ जानेवारी
जन्मदिवस : चित्रपटनिर्माता, चित्रकार, शिल्पकार, नेपथ्यकार बाबुराव पेंटर (१८९०), संगीतकार ओ.पी.नय्यर (१९२६), अभिनेता कबीर बेदी (१९४६)
पुण्यस्मरण : न्या. महादेव गोविंद रानडे (१९०१), कादंबरीकार शरदचंद्र चट्टोपाध्याय (१९३८), अर्थशास्त्रज्ञ लक्ष्मीकांत झा (१९८८), अभिनेता प्रेम नझिर (१९८९), क्रीडा संघटक, शिवछत्रपती पुरस्कार विजेता पंडितराव बोरस्ते (२००१), उद्योगपती रामविलास जगन्नाथ राठी (२००३), संगीतकार श्रीकृष्ण "पेटीवाले" मेहेंदळे (२००५), लेखक व प्रकाशक अरुण जाखडे (२०२२)

---

१६८१ : संभाजी राजांचा छत्रपती म्हणून राज्यभिषेक
१८७७ : उर्दूतले पहिले व्यंगचित्र साप्ताहिक 'अवध पंच' लखनौमधून प्रकाशित
१९२० : 'लीग ऑफ नेशन्स'ची पहिली बैठक
१९४१ : नेताजी सुभाषचंद्राचे भारताबाहेर प्रयाण
१९६७ : गोव्यात महाराष्ट्रात सामील व्ह्यायचे की नाही यासाठी सार्वमत घेतले गेले.
१९९५ : आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण
१९१९ : अमेरिकेत घटनादुरुस्ती : संपूर्ण राष्ट्रात दारूबंदी जाहीर
१९५५ : नॅशनल डिफेन्स अकॅडमी इमारतीचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न
१९९१ : इराक-कुवेत युद्धात अमेरिकेचा सक्रीय सहभाग जाहीर
१९९६ : गिरणी कामगार नेते दत्ता सामंत यांची हत्या
२००३ : स्पेस शटल कोलंबिया अंतराळात. १६ दिवसानंतर परतताना अपघातात सर्व अंतराळवीरांचा मृत्यू
२००६ : एलेन जॉन्सन-सर्लिफ लायबेरियाच्या अध्यक्षपदी. सर्वात प्रथम आफ्रिकन महिला राष्ट्राध्यक्ष
२००८ : टाटा मोटर्सच्यानॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या ‘पीपल्स कार’चे अनावरण

१७ जानेवारी
जन्मदिवस : अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी बेंजामिन फ्रँकलिन (१७०६), रशियन साहित्यिक आंतोन चेक्कॉव्ह (१८६०), लेखक, शिक्षणतज्ञ, वि. द. घाटे (१८९५), गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर (१९०५), कुटुंब नियोजनाच्या कार्यकर्त्या, रधोंच्या सहकारी शकुंतला परांजपे (१९०६), क्रिकेटपटू यादवेंद्रसिंग (१९१३), नट, दिग्दर्शक, राजकारणी एम.जी.रामचंद्रन (१९१७), सिनेदिग्दर्शक कमाल अमरोही (१९१८), हिंदी लेखक रांगेय राघव (१९२३), हॉकीपटू जगतसिंग (१९४४), कवी आणि लेखक जावेद अख्तर (१९४५),
पुण्यस्मरण : पेशव्यांचे सरदार गोपाळराव पटवर्धन (१७७१), कवी, नाटककार, दिग्दर्शक ज्योति प्रसाद अगरवाला (१९५१), 'त्रिकाळ' साप्ताहिकाचे संस्थापक आणि पत्रकार शिवराम लक्ष्मण करंदीकर (१९६९), गायक आणि अभिनेते, सुरेश हळदणकर (२०००), अभिनेत्री सुचित्रा सेन (२०१४), कथक नर्तक पं. बिरजू महाराज (२०२२)

---

शिल्पी दिन

१६०५ : मिग्युएल दि सर्व्हांतेस याची डॉन किहोते ही पहिली कादंबरी प्रकाशित
१८६१ : प्रसाधनगृहाच्या फ्लशचे पेटंट थॉमस क्रॅपरने दाखल केले.
१९२९ : एल्झी सीगर याचे पोपाय - द सेलर हे कार्टून पात्र सर्वप्रथम थिंबल थिएटर या कॉमिकमधे अवतरलं.
१९४१ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थानबद्धतेतून स्वतःची सुटका करून घेतली.
१९४९ : पहिली सिटकॉम 'द गोल्डबर्ग्ज'ची सुरुवात
१९५६ : बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा
२०११ : मॉरिटेनिया, सुदान आणि ओमान या देशांमधे एकाच वेळेस जनतेने राजकीय हक्कांसाठी आंदोलन सुरू केले. त्यामुळे सरकारी धोरणात काही बदल घडले.

१८ जानेवारी
जन्मदिवस : न्या. महादेव गोविंद रानडे (१८४२), नाट्यछटाकार दिवाकर (१८८९), 'लॉरेल आणि हार्डी'तला अॉलिव्हर हार्डी (१८९२), रविकिरण मंडळातील कवी विठठ्ल दत्तात्रय घाटे (१८९५), सिने आणि फॅशन फोटोग्राफर जगदीश माळी (१९५२), क्रिकेटपटू विनोद कांबळी (१९७२), सिनेअभिनेत्री मिनीषा लांबा (१९८५)
पुण्यस्मरण : 'जंगल बुक'चा लेखक रुड्यार्ड किपलींग (१९३६),अर्थशास्त्रज्ञ व नेमस्त पुढारी रावबहादुर काळे (१९३६), गायक, अभिनेता कुंदनलाल सैगल (१९४७), लेखक सादत हसन मंटो (१९५५), कृषितज्ज्ञ व क्रांतिकारक पांडुरंग सदाशिव खानखोजे (१९६७), वकील, संसदसदस्य बॅ. नाथ पै (१९७१), शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक प्राचार्य नारायण गोपाळ तवकर (१९८६), साहित्यिक हरिवंशराय बच्चन (२००३)

---

१८८६ : इंग्लंडमध्ये हॉकी असोसिएशनची स्थापना; हॉकीच्या खेळाला प्रथमतः मान्यता
१९१९ : व्हर्सायची परिषद सुरू, याच परिषदेत राष्ट्रसंघाची निर्मिती
१९१९ : 'बेंटली मोटर लिमिटेड'ची स्थापना
१९३८ : अंदमानच्या कारागृहातून सर्व राजकीय बंदी बाहेर काढले गेले.
१९४४ : भारतीय ज्ञानपीठाची स्थापना
१९५६ : संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार. १० ठार, २५० जखमी, औद्योगिक विभागात दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू. मुंबईच्या पाच कॉंग्रेस आमदारांचा राजीनामा
१९६४ : न्यूयॉर्कमध्येवर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींचे भूमिपूजन
१९७७ : लीजन तापाला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा शोध

१९ जानेवारी
जन्मदिवस: वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावणारा जेम्स वॉट (१७३६), तत्त्वज्ञ ओग्यूस्त कोम्त (१७९८), लेखक एडगर अ‍ॅलन पो (१८०९), चित्रकार पॉल सेझान (१८३९), श्रेष्ठ गायक सवाई गंधर्व (१८८६), विनोदी लेखक व पाली भाषेचे अभ्यासक चिं.वि. जोशी (१८९२), चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते मास्टर विनायक (१९०६), संगीतकार वसंत प्रभू (१९२४), अभिनेता सौमित्र चॅटर्जी (१९३५), गायिका जॅनिस जॉपलिन (१९४३)
पुण्यस्मरण: महाराणा प्रताप (१५९६), तत्त्वज्ञ देबेन्द्रनाथ टागोर (१९०५), मराठी चित्रपटाचे प्रवर्तक दादासाहेब तोरणे (१९६०)

---

१९१५ : निऑन ट्यूबचे पेटंट जॉर्ज क्लॉडला मिळाले.
१९५६ : संयुक्त महाराष्ट्र आंदोलनासंदर्भात काँग्रेस कार्यकारिणीचे मंत्र्यांना राजीनाम्याचे आदेश.
१९६६ : इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधानपदी.
१९८३ : क्लाऊस बार्बी हा नाझी अधिकारी पकडला गेला.
१९८३ : ज्याला ग्राफिकल युजर इंटरफेस आणि माऊस असेल असा लिसा नामक व्यक्तिगत संगणक (पी.सी.) अॅपल कंपनीने जाहीर केला
१९८६ : आयबीएमच्या संगणकाचा पहिला व्हायरस मोकाट सोडला गेला.
२००६ : जेट एरवेझने एर सहारा विकत घेतले व भारतातील सगळ्यात मोठी विमान कंपनी झाली.
२००७ : ह्रान्त डिन्क या आर्मेनिअन वंशाच्या वार्ताहराची तुर्की राष्ट्रवाद्याकडून इस्तंबूलमध्ये हत्या.

२० जानेवारी
जन्मदिवस : उद्योजक सर रतनजी जमशेदजी टाटा (१८७१), सिनेदिग्दर्शक फेदेरिको फेलिनी (१९२०), ज्ञानपीठविजेती लेखिका कुरतुल ऐन हैदर (१९२६), पत्रकार व लेखक फरीद झकारिया (१९६४)
पुण्यस्मरण : वास्तुविशारद जॉन सोन (१८३७), चित्रकार जाँ-फ्रॉन्स्वा मिये (१८७५), लेखक व समीक्षक जॉन रस्किन (१९००), सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान (१९८०), अभिनेत्री ऑड्री हेपबर्न (१९९३), अभिनेत्री परवीन बाबी (२००५)

---

१२६५ : इंग्लंडच्या पहिल्या पार्लमेंटची पहिली सभा झाली.
१९३२ : 'ब्लड ऑफ अ पोएट' हा प्रायोगिक चित्रपट प्रदर्शित. (दिग्दर्शन : कवी व चित्रकार जाँ कोक्तो)
१९४२ : वान्सी परिषदेत नाझींनी ज्यूंच्या प्रश्नावरचा अखेरचा उपाय म्हणजे शिरकाण करण्याचा (फायनल सोल्यूशन) निर्णय घेतला.
१९५७ : पं. जवाहरलाल नेहरू यांनी ‘अप्सरा’ ही आशियातील पहिली अणुभट्टी देशाला अर्पण करून ‘अ‍ॅटोमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (एईई) या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.
१९६९ : क्रॅब नेब्युलात प्रथमतः पल्सार दिसून आला.
१९७७ : जनता पक्षाची स्थापना झाली. आधुनिक भारताच्या इतिहासात पहिले बिगर काँग्रेसी केंद्रीय सरकार या पक्षाने दिले. परंतु हे सरकार स्वत:चा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही.

२१ जानेवारी
जन्मदिवस : मराठीतील विचारप्रधान कादंबरीचे जनक वामन मल्हार जोशी (१८८२), कवी माधव ज्युलिअन (१८९४), अभिनेते व संगीतकार कृष्णराव फुलंब्रीकर (१८९८), कवी व सिनेदिग्दर्शक शांताराम आठवले (१९१०), समाजवादी नेते व संसदपटू मधू दंडवते (१९२४), लेखक लिट्टन स्ट्रॅची (१९३२), गायक प्लासिडो डोमिंगो (१९४१), कलाकार जेफ कून्स (१९५५), अभिनेत्री जीना डेव्हिस (१९५६)
पुण्यस्मरण : सिनेदिग्दर्शक जॉर्ज मेलिए (१९३८), स्वातंत्र्यवीर रासबिहारी बोस (१९४५), लेखक जॉर्ज ऑरवेल (१९५०), सिनेदिग्दर्शक सेसिल बी. डीमिल (१९५९), अभिनेत्री गीता बाली (१९६५), लेखक व समीक्षक माधव आचवल (१९८०)

---

१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सचा राजा सोळाव्या लुईला देहदंड.
१९२१ : चार्ली चॅप्लिनचा अजरामर चित्रपट 'द किड' प्रदर्शित.
१९२४ : रशियन क्रांतीचा नेता लेनिनचे निधन.
१९७२ : त्रिपुरा, मणिपूर व मेघालय राज्यांची स्थापना.
१९८१ : ४४४ दिवसांच्या ओलीसनाट्यानंतर इराणने ५२ अमेरिकी नागरिकांना सोडले.

२२ जानेवारी
जन्मदिवस : तत्त्वज्ञ फ्रान्सिस बेकन (१५६१), कवी बायरन (१७८८), नाटककार ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग (१८४९), सिनेदिग्दर्शक डी. डब्ल्यू. ग्रिफिथ (१८७५), चित्रकार फ्रान्सिस पिकाबिया (१८७८), राजकीय विचारवंत आंतोनिओ ग्रामची (१८९१), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ लेव लँडाऊ (१९०८), संतवाङ्मयाचे अभ्यासक व कोशकार ह. श्री. शेणोलीकर (१९२०), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (१९३४)
पुण्यस्मरण : कवी चांगदेव (१२९७), सम्राट शाहजहान (१६६६), समर्थ रामदास (१६८२)

---

१८४९ : नऊ महिन्यांनंतर मुलतानचा वेढा संपला. शिखांची ब्रिटिशांपुढे शरणागती.
१९२७ : फुटबॉलच्या सामन्याचे रेडिओवरून झालेले जगातील पहिले थेट प्रसारण. (आर्सेनल विरुद्ध शेफील्ड)
१९६४ : मुंबईत ७.४ अंश सेल्सियस हा तापमानाचा नीचांक नोंदला गेला.
१९७० : 'जंबो जेट' बोईंग ७४७चे पहिले व्यावसायिक उड्डाण.
१९७३ : 'रो वि. वेड' या अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालान्वये गर्भपात कायदेशीर.
१९८० : सोव्हिएत युनियनच्या अफगाणिस्तानमध्ये सैन्य ठेवण्याच्या धोरणांवर टीका केल्यामुळे अणुशास्त्रज्ञ व शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते आंद्रे साखारोव्ह यांना अंतर्गत हद्दपारी. (१९८६मध्ये तत्कालीन अध्यक्ष गोर्बाचेव्ह यांनी त्यांची सुटका केली.)
१९८४ : 'सुपर बोल'दरम्यानच्या जाहिरातीद्वारे अ‍ॅपलने आपला मॅकिंटॉश हा नवा व्यक्तिगत संगणक उपलब्ध झाल्याचे जाहीर केले.
१९८६ : पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येबद्दल तिघांना फाशी.
१९९९ : ग्रॅहॅम स्टेन्स हे ऑस्ट्रेलिअन मिशनरी व त्यांच्या दोन मुलांची हिंदुत्ववाद्यांनी जिवंत जाळून हत्या केली.

२३ जानेवारी
जन्मदिवस : लेखक स्टेन्डाल (१७८३), पुरातत्ववेत्ते व 'आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया'चे संस्थापक अलेक्झांडर कनिंगहॅम (१८१४), चित्रकार एदुआर माने (१८३२), गणितज्ञ डेव्हिड हिल्बर्ट (१८६२), स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस (१८९७), सिनेदिग्दर्शक सर्गेई आयझेनस्टाईन (१८९८), जाझ गिटारिस्ट जँगो राईनहार्ड (१९१०), लेखक व भाषांतरकार श्रीपाद जोशी (१९२०), संपादक, व्यंगचित्रकार व शिवसेनाप्रमुख बाळ केशव ठाकरे (१९२७), अभिनेत्री जान मोरो (१९२८), नोबेलविजेता लेखक डेरेक वॉलकॉट (१९३०), चित्रकार जॉर्ज बेसलित्झ (१९३८), टेनिसपटू पेत्र कोर्डा (१९६८)
पुण्यस्मरण : शहाजीराजे भोसले (१६६४), चित्रकार ग्युस्ताव्ह दोरे (१८८३), भाषाप्रभू साहित्यिक राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज (१९१९), बॅलेरिना आना पाव्हलोव्हा (१९३१), चित्रकार एडवर्ड मुंक (१९४४), इन्स्टॉलेशन कलाकार जोसेफ बय (१९८६), चित्रकार साल्व्हादोर दाली (१९८९), समाजशास्त्रज्ञ पिएर बूर्दिअ (२००२), छायाचित्रकार हेल्मट न्यूटन (२००४)

---

१५६५ : विजयनगर साम्राज्याची अखेर. या दिवशी निजामशहा, आदिलशहा, कुतुबशहा व वेरीदशहा यांनी एकत्र येऊन विजयनगरचा सत्ताधीश रामराजा याला ठार मारले.
१५७० : अग्निशस्त्र वापरून केलेली इतिहासातील पहिली ज्ञात हत्या. (जेम्स हॅमिल्टनने जेम्स स्ट्यूअर्टची हत्या केली.)
१८३५ : अमेरिकेतील लोकशाहीवरचे अलेक्सिस द तोकव्हिलचे पुस्तक प्रकाशित.
१८४९ : एलिझाबेथ ब्लॅकवेल ही पाश्चात्य जगातील पहिली महिला डॉक्टर ठरली.
१८९५ : आर्क्टिक खंडावर मानवाचे पहिले पाऊल.
१८९६ : रोंटजेनने एक्स-रेचे प्रात्यक्षिक दाखवले.
१८९९ : अ‍ॅसिटिल सॅलिसिलिक अ‍ॅसिडचे 'अ‍ॅस्पिरिन' असे नामकरण.
१९२२ : मधुमेहींसाठी इंशुलिनचे इंजेक्शन देण्याची उपचारपद्धत सुरू.
१९२६ : 'बाँबे टेक्स्टाईल लेबर युनियन' या संघटनेची स्थापना. ना. म. जोशी अध्यक्षपदी तर रघुनाथराव सरचिटणीस.
१९७३ : व्हिएतनाममध्ये शांतितह मंजूर झाल्याची घोषणा अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी केली. (पण एप्रिल १९७५पर्यंत चकमकी चालू राहिल्या.)
१९९२ : रशिया परकीय गुंतवणुकीला खुली.
१९९६ : संगणक भाषा जावाचे सर्वप्रथम प्रकाशन.
२००२ : 'वॉल स्ट्रीट जर्नल'चा पत्रकार डॅनिएल पर्लचे कराचीमधून अपहरण.

२४ जानेवारी
जन्मदिवस : नाटककार बोमार्शे (१७३२), विचारवंत व तत्त्वज्ञ मे. पुं. रेगे (१९२४), मानववंशशास्त्रज्ञ डेजमंड मॉरिस (१९२८), अभिनेत्री नास्तास्या किन्स्की (१९६६), जिमनॅस्ट मेरी लू रेटन (१९६८)
पुण्यस्मरण : मुघल सम्राट हुमायूं (१५५६), शिल्पकार व चित्रकार आमेदेओ मोदिग्लिआनी (१९२०), भारतीय अणुयुगाचे शिल्पकार होमी भाभा (१९६६), सिनेदिग्दर्शक जॉर्ज क्यूकर (१९८३), गायक पं. भीमसेन जोशी (२०११), सिनेदिग्दर्शक थिओ अँजेलोपूलोस (२०१२)

---

राष्ट्रीय बालिका दिन

वर्धापन दिन : बॉय स्काउट (१९०८), अ‍ॅपल मॅक (१९८४)
१८४८ : कॅलिफोर्निआत सोने सापडले. 'गोल्ड रश'ची सुरुवात.
१८५७ : भारतातील पहिले आधुनिक विद्यापीठ कोलकात्यात स्थापन.
१९३५ : 'ब्रिटिश इंडिया अ‍ॅक्ट'न्वये भारताला संघराज्यात्मक दर्जा मिळाला.
१९५२ : पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईत सुरू.
१९६२ : फ्राँस्वा त्रूफोचा 'ज्यूल अँड जिम' चित्रपट प्रदर्शित.
१९६६ : एअर इंडियाचे विमान आल्प्स पर्वतराजीत कोसळले. ११७ ठार. त्यात वैज्ञानिक होमी भाभा यांचा मृत्यू.

२५ जानेवारी
जन्मदिवस : रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल (१६२७), गणितज्ञ जोसेफ लुई लाग्राँज (१७३६), कवी रॉबर्ट बर्न्स (१७५९), सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे (१८६३), लेखक सॉमरसेट मॉम (१८७४), लेखिका व्हर्जिनिया वूल्फ (१८८२), 'प्राचीन मराठी कविता' संग्रहित करणारे मराठी वाङ्मयाचे संशोधक जगन्नाथ शामराव देशपांडे (१९१४), गायिका कविता कृष्णमूर्ती (१९५८)
पुण्यस्मरण : चित्रकार ल्यूकास क्रानाक धाकला (१५८६), 'मराठी भाषेतील वाक्प्रचार व म्हणी' यांचा कोश तयार करणारे वि. वा. भिडे (१९३६), कार्यकर्ते व तत्त्वज्ञ मानवेंद्रनाथ रॉय (१९५४), अभिनेत्री अ‍ॅव्हा गार्डनर (१९९०)

---

राष्ट्रीय मतदार दिन.
स्थापनादिन : भारतीय निवडणूक आयोग (१९५०)

१८७४ : निबंधमालेचा पहिला अंक प्रकाशित. संपादक - विष्णू कृष्ण उर्फ विष्णुशास्त्री चिपळूणकर. टिळक-आगरकरांचे मानसिक व वैचारिक भरण-पोषण निबंधमालेवर झाले असे मानले जाते. (संदर्भ - मराठी वृत्तपत्रांचे इतिहासकार रा. के. लेले)
१८८१ : थॉमस अल्वा एडिसन व अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी 'ओरिएंटल टेलिफोन कंपनी' सुरू केली.
१९१९ : पहिल्या महायुद्धानंतर 'लीग ऑफ नेशन्स'ची स्थापना.
१९७१ : 'हिमाचल प्रदेश'ला भारताचे १८वे राज्य म्हणून मान्यता.
१९७१ : युगांडावर इदी अमीनचा ताबा.
२००५ : मांढरदेवी यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी. २५० मृत.
२०११ : इजिप्तमध्ये जनतेचे आंदोलन सुरू. या जनआंदोलनाची परिणती अध्यक्ष होस्नी मुबारक पायउतार होण्यात झाली. लष्कराकडून सत्ता काबीज करण्यात आली. घटना व संसद बरखास्त करण्यात आली.

२६ जानेवारी
जन्मदिवस : चित्रकार कीस व्हॅन डोंगेन (१८७७), अभिनेता पॉल न्यूमन (१९२५), क्रिकेटपटू शिवलाल यादव (१९५७), क्रिकेटपटू अशोक मल्होत्रा (१९५७)
पुण्यस्मरण : 'प्रचंडकवी' दासोपंत दिगंबर देशपांडे (१६१६), वैद्यक संशोधक एडवर्ड जेन्नर (१८२३), चित्रकार थिओडोर जेरिको (१८२४), लोकनायक बापूजी अणे (१९६८), सर्वप्रथम ग्रँड स्लॅम जिंकणारा टेनिसपटू डॉन बज (२०००), व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण (२०१५)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : गणराज्य दिन (भारत), ऑस्ट्रेलिया दिन, मुक्ती दिन (युगांडा).
१५६४ : ट्रेंट काऊन्सिलतर्फे कॅथॉलिक व प्रोटेस्टंट असे ख्रिस्ती धर्माचे विभाजन.
१७८८ : सिडनीमध्ये ऑस्ट्रेलिया खंडातील पहिली ब्रिटिश वसाहत स्थापन.
१९२६ : जॉन लोगी बेअर्ड यांच्या प्रयोगशाळेत पहिले टेलिव्हिजन प्रसारण यशस्वी.
१९३० : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने २६ जानेवारी हा पूर्ण स्वराज्य दिन असल्याचे जाहीर केले. वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून कॉंग्रेसने २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्यास सुरुवात केली.
१९४९ : भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर.
१९५० : भारत प्रजासत्ताक देश झाला. डॉ. राजेन्द्रप्रसाद राष्ट्रपतिपदी.
१९६५ : भारताने हिंदी भाषेला शासकीय भाषा म्हणून जाहीर केले.
२००१ : गुजरातमध्ये भूकंप. २५,००० ठार, लाखो बेघर.
२०२१ : शेती कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान हिंसाचार; लाल किल्ल्यावर हल्लाबोल; १ शेतकरी मृत.
२७ जानेवारी
जन्मदिवस : संगीतकार मोझार्ट (१७५६), तत्त्वज्ञ फ्रीडरिक शेलिंग (१७७५), वास्तुविशारद व्हिओले-ल-द्यूक (१८१४), लेखक ल्यूईस कॅरॉल (१८३२), अभिनेत्री इनग्रिड थुलिन (१९२६), अभिनेता बॉबी देओल (१९६७), क्रिकेटपटू चमिंडा वाझ (१९७४), टेनिसपटू मारात साफिन (१९८०)
पुण्यस्मरण : दर्यावर्दी फ्रान्सिस ड्रेक (१५९६), तत्त्वज्ञ योहान फिश्ट (१८१४), संगीतकार व्हेर्दी (१९०१), अभिनेता भारत भूषण (१९९२), लेखक जॉन अपडाइक (२००९), राष्ट्रपती आर. वेंकटरमन (२००९), लेखक जे. डी. सॅलिंजर (२०१०), धावपटू अजमेर सिंग (२०१०), गायक, वादक व संगीतकार पीट सीगर (२०१४)

---

ज्यू वंशविनाश (होलोकॉस्ट) स्मृति दिन.

१५५६ : अकबर सम्राटपदी विराजमान.
१५९३ : व्हॅटिकनतर्फे गणितज्ञ व तत्त्वज्ञ जिओर्डानो ब्रूनोविरोधात धर्मविरोधी वर्तनाच्या आरोपाविषयी सुनावणी चालू. सात वर्षांनंतर त्याला दोषी ठरवून जिवंत जाळण्यात आले.
१८८० : थॉमस अल्वा एडिसनने विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतले.
१८८८ : नॅशनल जिऑग्राफिक सोसायटीची स्थापना.
१९४४ : जर्मन सैन्याने घातलेला ९०० दिवसांचा लेनिनग्राडचा वेढा संपुष्टात.
१९४५ : रशियन सैन्याने आउशवित्झ छळछावणी मुक्त केली.

२८ जानेवारी
जन्मदिवस : स्वातंत्र्यवीर लाला लजपत राय (१८६५), सिनेदिग्दर्शक अर्न्सट ल्यूबिश (१८९२), वैचारिक नियतकालिकांचे प्रणेते, गांधीवादी विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक शं. द. देव (१८९५), चित्रकार जॅकसन पोलॉक (१९१२), अणुशास्त्रज्ञ राजा रामण्णा (१९२५), सिनेदिग्दर्शक हिरोशी तेशिगाहारा (१९२७), गायक पं. जसराज (१९३०), लेखक इस्माइल कादारे (१९३६), गायिका सुमन कल्याणपूर (१९३७)
पुण्यस्मरण : नोबेलविजेता कवी डब्ल्यू. बी. यीट्स (१९३९), सिनेनिर्माता, दिग्दर्शक व अभिनेता सोहराब मोदी (१९८४), पुरातत्त्वज्ञ हसमुख सांकलिया (१९८९), नोबेलविजेता कवी जोसेफ ब्रॉड्स्की (१९९५), शास्त्रज्ञ पां. वा. सुखात्मे (१९९७), संगीतकार ओ. पी. नय्यर (२००७)

---

विदा संरक्षण (किंवा खाजगीपणा) दिन.

१८१३ : जेन ऑस्टेनलिखित कादंबरी 'प्राइड अँड प्रिज्यूडिस' प्रकाशित.
१८२० : अंटार्क्टिक खंडाचा शोध.
१८४६ : अलिवालची लढाई - रणजीतसिंग यांच्या नेतृत्वाखाली लढणारे शीख सैन्य इंग्रजांकडून पराभूत.
१८८७ : आयफेल टॉवरच्या बांधकामास प्रारंभ.
१८९६ : २ मैल प्रतितासाची तत्कालीन वेगमर्यादा ओलांडल्यामुळे वेगमर्यादा उल्लंघनाच्या गुन्ह्यात शिक्षेची सर्वप्रथम नोंद.
१९५६ : एल्व्हिस प्रेस्ले पहिल्यांदा टी.व्ही.वर.
१९५८ : लेगो कंपनीने लेगो विटांचे पेटंट घेतले.
१९८६ : 'चॅलेंजर' स्पेस शटल दुर्घटना. सात अंतराळवीर ठार.

२९ जानेवारी
जन्मदिवस : संतकवी निवृत्तीनाथ (१२७४), लेखक थॉमस पेन (१७३७), लेखक आंतोन चेकॉव्ह (१८६०), नोबेलविजेता लेखक रोमॅं रोलॉं (१८६६), कवी चंद्रशेखर गोऱ्हे (१८७१), चित्रकार बार्नेट न्यूमन (१९०५), नोबेलविजेता शास्त्रज्ञ अब्दुस सलाम (१९२६), जलतरणपटू ग्रेग लूगानिस (१९६०), नेमबाज राजवर्धन सिंग राठोड (१९७०)
पुण्यस्मरण : लेखक अलेक्सांद्र पुश्किन (१८३७), चित्रकार अल्फ्रेड सिसले (१८९९), संशोधक व 'गाथा सप्तशती'चे संपादक स. आ. जोगळेकर (१९६३), कवी रॉबर्ट फ्रॉस्ट (१९६३)

---

१७८० : 'हिकीज बेंगॉल गॅझेट' हे भारतातील पहिले वर्तमानपत्र सुरु.
१८८६ : कार्ल बेंझने पेट्रोलवर चालणाऱ्या मोटारीचे पेटंट घेतले.
१९९६ : फ्रान्सने अणुचाचण्या बंद केल्याचे जाहीर केले.
२००६ : इरफान पठाणने पहिल्याच ओव्हरमध्ये तीन बळींची हॅट ट्रिक करून कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम केला.

३० जानेवारी
जन्मदिवस : विज्ञानविषयक लेखक गो. रा. परांजपे (१८८९), लेखक जयशंकर प्रसाद (१८८९), चित्रकार अमृता शेरगिल (१९१३), 'माऊस'चा निर्माता डग्लस एंगेलबार्ट (१९२५), अभिनेता जीन हॅकमन (१९३०), अभिनेत्री व्हनेसा रेडग्रेव्ह (१९३७), रशिअन बुद्धिबळपटू बोरिस स्पास्की (१९३७), सिनेदिग्दर्शक निक ब्रूमफील्ड (१९४८), नाटककार सतीश आळेकर (१९४९), गायक फिल कॉलिन्स (१९५१)
पुण्यस्मरण : चित्रकार जॉर्ज द ला तूर (१६५२), महात्मा गांधी (१९४८), विमानोड्डाणाचा प्रणेता ऑरव्हिल राइट (१९४८), कवी माखनलाल चतुर्वेदी (१९६८), लेखक जेरल्ड डरेल (१९९५), हार्मोनिअमवादक गोविंदराव पटवर्धन (१९९६), नाटककार वसंत कानेटकर (२००१), स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ (२०२०)

---

राष्ट्रीय हुतात्मा दिन

१९०१ : आंतोन चेकॉव्हच्या 'थ्री सिस्टर्स' नाटकाचा पहिला प्रयोग.
१९०३ : लॉर्ड कर्झनने कलकत्त्यात 'इंपीरियल लायब्ररी'ची (आताची नॅशनल लायब्ररी) स्थापना करून ती सार्वजनिक वापरासाठी खुली केली.
१९११ : जॅक्सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा.
१९१७ : पहिली जाझ ध्वनिमुद्रिका मुद्रित.
१९३१ : चार्ली चॅप्लिनचा 'सिटी लाइट्स' चित्रपट प्रदर्शित.
१९३३ : अ‍ॅडॉल्फ हिटलर जर्मनीच्या चॅन्सलरपदी.
१९४८ : नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली.
१९६९ : 'बीटल्स'चा अखेरचा जाहीर कार्यक्रम.
१९७२ : 'ब्लडी संडे' - ब्रिटिश सैन्याने उत्तर आयर्लंडमध्ये कॅथॉलिकांच्या शांततामय निदर्शनावर केलेल्या गोळीबारात १३ मृत.
१९७२ : पाकिस्तानने ब्रिटिश राष्ट्रकुलातून अंग काढून घेतले.
१९८२ : पहिला संगणक व्हायरस लिहिला गेला.
१९८९ : अमेरिकेने अफगाणिस्तानमधील आपला राजदूतावास बंद केला.
१९९४ : पीटर लेको बुद्धिबळातील सर्वात लहान (तत्कालीन) ग्रँडमास्टर झाला.
२००५ : १९५३नंतर प्रथमच इराकमध्ये राष्ट्रीय निवडणुका.

३१ जानेवारी
जन्मदिवस : संगीतकार शुबर्ट (१७९७), नर्तिका आना पाव्हलोव्हा (१८८५), ज्ञानपीठविजेते कवी द. रा. बेंद्रे (१८९६), संगीतकार गंगाधर महांबरे (१९३१), संगीतकार फिलिप ग्लास (१९३७), अभिनेत्री प्रीति झिंटा (१९७५)
मृत्युदिवस : नोबेलविजेता लेखक जॉन गाल्सवर्दी (१९३३), 'विनी द पू'चा लेखक ए.ए. मिल्न (१९५६), अभिनेता के.एन. सिंग (२०००), गायिका व अभिनेत्री सुरैय्या (२००४)

---
स्वातंत्र्यदिन : नाउरू (१९६८)
१८७६ : अमेरिकेने स्थानिक रहिवाश्यांना आरक्षित जमिनींवर स्थलांतर करण्यास भाग पाडणारा हुकूम काढला.
१९१५ : पहिले महायुद्ध - जर्मनीने रशियाच्या सैन्याविरुद्ध विषारी वायूचा उपयोग केला.
१९२९ : सोवियेत संघाने लिओन ट्रोट्स्कीला हद्दपार केले.
१९३० : ३एम या अमेरिकन कंपनीने स्कॉच टेप विकायला सुरुवात केली.
१९४९ : इस्राएल या नव्या राष्ट्राला अमेरिकेने अधिकृत मान्यता दिली.
१९५० : राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.
१९९० : मॉस्कोमध्ये पहिले 'मॅकडोनाल्ड्स' उघडले.
१९९६ : कोलंबोमध्ये तमिळ अतिरेक्यांनी स्फोटके भरलेला ट्रक सेंट्रल बँकेच्या दारात उडवला; ९१ ठार; १,४०० जखमी.
२०२० : ब्रेक्झिट : युरोपियन संघातून युके बाहेर.

जानेवारी | फेब्रुवारी | मार्च | एप्रिल | मे | जून | जुलै | ऑगस्ट | सप्टेंबर | ऑक्टोबर | नोव्हेंबर | डिसेंबर