माहिती: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष
आज RSS च्या ५ लाखांहून अधिक शाखा देशभर कार्यरत आहेत. या शाखा सांस्कृतिक राष्ट्रवाद, व्यक्तिमत्त्व विकास, आणि नैतिक शिक्षण यावर भर देतात. विद्या भारती ही शैक्षणिक संस्था १२,७५४ शाळा चालवते, जिथे भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाते आणि आधुनिक विषयांचाही समावेश असतो. सेवा भारती ही सामाजिक संस्था आरोग्य, शिक्षण आणि आपत्ती मदतीसाठी हजारो प्रकल्प राबवते, विशेषतः दुर्बल आणि दुर्गम भागांमध्ये. राष्ट्र सेविका समितीसारख्या स्त्री संघटनांद्वारे महिलांना नेतृत्व आणि सांस्कृतिक प्रशिक्षण दिले जाते. या सर्व संस्था मिळून शिक्षण, सेवा आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देतात.
- Read more about माहिती: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष
- 38 comments
- Log in or register to post comments
- 14 views
ठाणे अरबस्तानला जोडण्याचा कुटील डाव ?
स्वदेशी चा नारा देणाऱ्या सरकारकडून मराठमोळ्या ठाण्यातील एक नवं सांस्कृतिक केंद्र विवियाना मॉल हा विदेशी शक्तींना , खास करून अरबांना विकला हे ऐकले आणि मन सुन्न झाले, चित्त विचलित झाले, पायाखालची जमीन सरकली.
आज ठाणे विकले गेले
माझी खात्री आहे आज सर्व विवेकवादी , पुरोगामी ठाणेकर रडत असतील
आज मॉल विकला गेलाय उद्या सरकारी ऑफीसेस विकली जातील, मग महापालिका मग विधानसभा, लोकसभा, सेंट्रल व्हिस्टा आणि राष्ट्रपती भवनही विकले जाईल. काय काय बघायला लागणार आहे मोदींच्या राज्यात काय माहित.
- Read more about ठाणे अरबस्तानला जोडण्याचा कुटील डाव ?
- 12 comments
- Log in or register to post comments
- 6 views
ग. वा. बेहरे : समाजसेवा, साहित्य आणि आदर्श व्यक्तिमत्त्व
भारतीय समाजजीवनातील विसाव्या शतकातील अनेक व्यक्ती विविध क्षेत्रांत कार्यरत होऊन समाजाला दिशा देणाऱ्या ठरल्या. अशाच महान व्यक्तींमध्ये ग. वा. बेहरे यांचा समावेश होतो. मराठी साहित्य, समाजसेवा, लोकचळवळी आणि पत्रकारिता या सगळ्या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य करून समाजात जागृती घडवून आणली. त्यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त समस्त हत्ती परिवाराकडून त्यांना विनम्र अभिवादन.
- Read more about ग. वा. बेहरे : समाजसेवा, साहित्य आणि आदर्श व्यक्तिमत्त्व
- 7 comments
- Log in or register to post comments
- 6 views
मध्यमवर्गीयांच्या कपातली वादळं: H1Bचा रोलरकोस्टर
किती वर्षं अमेरिकेत आहे कुणी, यानं काय फरक पडतो? तो कोपऱ्यावरचा लतीफ अंडीवाला माझ्या जन्माच्या आधीपासून भारतात आहे. तिथे, ठाण्यातच तो जन्माला आला. पण त्याचं भारतीयपण अस्सल समजलं जातं का?
- Read more about मध्यमवर्गीयांच्या कपातली वादळं: H1Bचा रोलरकोस्टर
- 21 comments
- Log in or register to post comments
- 16 views
सागर तळाशी
सागर तळाशी | तुटल्या केबल*
त्याने जगड्व्याळ | लोच्या झाला || १ ||
बाह्य जगताशी | संबंध तुटला
येरू डोकावला | आत तेव्हा || २ ||
अनाहत नाद | आला समेवर
कल्लोळ सुस्वर | उसळला || ३ ||
स्थूल ओलांडून | ओसंडे सूक्ष्मात
ऐसी ज्याची रीत | दिसला तो || ४ ||
~~~~~~~~~~~~
*Submarine Internet cable.
- Read more about सागर तळाशी
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1 view
वोट चोरी वर चर्चा
बगीच्यात फेरफटका मारताना निरनिराळ्या लोकांशी भेट होत असते. आजकाल ‘वोट चोरी’चा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. असाच एक तरुण मुलगा भेटला—आयटी क्षेत्रात काम करणारा, अमेरिकन कंपनीत नोकरी करणारा. साहजिकच, स्वतःला महाज्ञानी समजणारा.
- Read more about वोट चोरी वर चर्चा
- 2 comments
- Log in or register to post comments
- 6 views
साबर बोंडं - नवा मराठी सिनेमा
नेहमीपेक्षा वेगळा पण नेटका केलेला सकस मराठी सिनेमा पाहावासा वाटला तर साबर बोंडं जरूर पाहा.
- Read more about साबर बोंडं - नवा मराठी सिनेमा
- 7 comments
- Log in or register to post comments
- 5 views
"Honey, it's not about money"
मागच्या आठवड्यात सलग ३ वेळा ३ वेगवेगळ्या लोकांकडुन तोच जुना डायलॉग ऐकला म्हणजे मला नाही ऐकवला कोणी. इन जनरल बोलण्याच्या ओघात मारला.
"पैशासाठी वेडी झालेली आहेत लोक हल्ली,
"पैशासाठी काहीही करतात , काय वाट्टेल ते,"
"पैसा जणु देवच झालाय आता, "
थोड्याफार फरकाने उन्नीस बीस इधर उधर पैशा संदर्भात तेच ते तेच ते
मनात विचारचक्र सुरु होण्यास इतकं trigger पुरे होतं.
खरचं ? लोक "पैशामागे" वेडी होतात ? पैशाने वेडी होतात ?
- Read more about "Honey, it's not about money"
- 12 comments
- Log in or register to post comments
- 16 views
तात्यांचे टेरिफ: ब्राह्मणी अर्थव्यवस्थेविरुद्ध जनतेच्या संघर्षाचे प्रतीक
तात्यांनी टेरिफ लावून भारतातील गरीब जनतेला ब्राह्मणवादाविरुद्धच्या संघर्षात मदत केली आहे. सर्व पुरोगामी मंडळींनी तात्यांचे आभार मानले पाहिजेत—कारण हा संघर्ष केवळ आर्थिक नाही, तर सामाजिक न्यायाचा यज्ञ आहे.
- Read more about तात्यांचे टेरिफ: ब्राह्मणी अर्थव्यवस्थेविरुद्ध जनतेच्या संघर्षाचे प्रतीक
- 59 comments
- Log in or register to post comments
- 20 views
(π)वाट
स्पर्शरेषा जोखते जणु
वर्तुळाची वक्रता
परीघ अंशी / व्यास छेदी
(π) उरवी तत्त्वता
वर्तुळाचे केन्द्र जीवा #
ना कधीही स्पर्शिते
केंद्र गिळता तीच जीवा
व्यास बनुनी राहते
(π) द्विगुणित होऊनी
परिघास जेव्हा भागतो
हाती ये त्रिज्या-जिला
व्यासार्ध कुणी संबोधितो
वर्तुळाच्या गारुडाने
भूल गणिती टाकली
जटिल विद्यांची कवाडे
(π) करितो किलकिली
परीघ, त्रिज्या दोन्हीही
परिमेय असती पण तरी
(π) का मज वेड लावी
अपरिमेयाचे परी
~~~~~~~~~~~~~
# जीवा = chord of a circle
अपरिमेय= मोजता न येणारे/ irrational
- Read more about (π)वाट
- 22 comments
- Log in or register to post comments
- 2 views