Skip to main content

कतरिना कैफ : सौंदर्य, मेहनत आणि अभिनयाची चमक

सिनेसृष्टीतील सौंदर्य, आकर्षण आणि कष्टाच्या गाथेत कतरिना कैफ हे नाव अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आज तिचा ४१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिला समस्त हत्ती परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. जीवेत शरदः शतम. १६ जुलै १९८४ रोजी हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या कतरिनाचा प्रवास भारतीय सिनेसृष्टीत तितकाच रोमहर्षक आहे, जितका तिच्या अभिनयातील बदल व नवतेने भरलेला आहे. तिची आई इंग्लंडमधील असून वडील काश्मिरी मुस्लिम आहेत. बालपणीच कतरिनाच्या पालकांचा घटस्फोट झाला आणि ती आईसोबत जगभर विविध ठिकाणी राहिली.

वार्तालाप: संपन्न बनण्याचा मार्ग

जाणपण निरूपण समासात समर्थांनी आध्यात्मिक प्रगती सोबत संसारात संपन्न आणि वैभवशाली बनण्याचा मार्ग ही सांगितलेला आहे. समर्थ म्हणतात, समाजात आर्थिक आणि सामाजिक विषमता नेहमीच असते. अजाणते पणे लोक राजकीय व्यवस्थेला दोष देतात, काही प्रारब्धला दोष देतात. भारतात अनेक राजनेता सामाजिक विषमतेचा उपयोग जातीय, भाषिक आणि प्रांतीय आधारवर प्रजेत भेद टाकून निवडणूक जिंकण्यासाठी करतात. समर्थांच्या शब्दांत नेणता अर्थात अज्ञानी माणूस यातच गुरूफटून जातो. जसे आजकाल महाराष्ट्रात भाषा विवादात प्रजा गुंतली आहे.

आरोग्यपूर्ण वृद्धत्व

सत्तरी पार केलेल्या वृद्धांच्या बरोबरीच्या संवादातील पहिला प्रश्न “आपण कसे आहात?”... हा असतो व संवादाचा शेवट “तब्येतीचा काळजी घ्या.” या वाक्याने होत असते. कारण वृद्धत्व नेहमीच त्रासदायक असते. वृद्ध व्यक्ती आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी योग्य प्रकारे घेत नसल्यास कुटुंबाला व पर्यायाने समाजाला श्रम, वेळ व पैशाच्या स्वरूपात फार मोठी किंमत द्यावी लागते. वृद्धालासुद्धा आपले जिणे नको नकोसे वाटू लागते. अनेक वृद्धांना 80 हे वय एक अभेद्य भिंत वाटू लागते.

स्मरणगाथा - गोनीदांचा विलक्षण जीवनप्रवास!

खरं तर ही समीक्षा नाही. स्मरणगाथा वाचून जे समजलं, उमजलं आणि भावले त्याचा घेतलेला एक आढावा!

क्रिकेटचे ‘लिटल मास्टर’ : सुनील गावस्कर (७६व्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख)

१० जुलै १९४९ या दिवशी मुंबईत जन्मलेला एक मुलगा भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल, हे कुणालाही त्या वेळी ठाऊक नव्हते. हा मुलगा म्हणजेच क्रिकेटचा ‘लिटल मास्टर’  सुनील मनोहर गावस्कर. आज त्यांच्या ७६व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे योगदान, प्रवास आणि प्रेरणादायी जीवनमूल्ये आठवावीत अशीच आहेत. सर्वप्रथम त्यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त समस्त हत्ती परिवाराकडून सुनील गावस्करांना हार्दिक शुभेच्छा. जीवेत शरदः शतम.

मराठी अस्मिते साठी : उच्च शिक्षण मराठीत द्या.

काही महिन्यांपूर्वी मराठीचिये नगरी पुण्याला गेलो होतो. बाप आपल्या दोन वर्षाच्या मुलीशी आंग्ल भाषेत बोलत होता. दोन्ही उच्च शिक्षित नवरा -बायको ही त्याच भाषेत बोलत होते. दोन दिवस तिथे राहिलो आणि मला आपण "अनपढ़ गंवार" आहोत असा फील येऊ लागला. त्याची लेक बाहेर खेळताना इतर मराठी मुलांशी हिन्दीत मिश्रित आंग्ल भाषेत बोलत होती. बाहेर हिन्दी आणि घरात आंग्ल. लेकीसाठी मराठी भाषा परकी झाली होती. तिच्या वडिलांना ही चूक म्हणू शकत नाही. प्रत्येक पालकला वाटते त्याच्या मुलाने उत्तम दर्जाचे शिक्षण घ्यावे आणि उत्तम पगारची नौकरी त्याला मिळावी.

पार

जनुकांचा जिना सोसे
प्रसवाच्या कळा
श्रवणाच्या पार उभा
अनाहत निळा

प्रतिबिंब जाऊ पाहे
बिंबाच्याही पार
आरशाचा पारा उडे
काच आरपार

पिंपळाच्या पारापाशी
खोरणात दिवा
लावण्यास कोण येते
घोर लागे जीवा

नक्षत्रांच्या पार जाई
मिथकांचा पैस
सृजनाच्या कल्लोळात
सावरून बैस

शब्दांच्याही पार ओळ
कवितेची गेली
लुटुपुटू राजा खेळे
तरी भातुकली

फाया

"कृबु (*)-व्यापित या जगी सांग तुज स्थान काय उरते ?
मनात येता क्षणार्धात बघ इच्छित अवतरते !
काव्य, नाट्य, शिल्पे, चित्रे अन् जटिल अधिक काही
गरज तुझी यासाठी कशाला? कृबुच सर्व देई !"

कठोर शब्दे मानवी प्रतिभा दुःखमग्न झाली
नवक्षितिजांना ओलांडुन कृबु पार पुढे गेली
हताश होत्साती प्रतिभा क्षण-भर निष्प्रभ झाली
पुन्हा सावरून मनात काही जुळवून मग वदली,