एका धर्मांतराची कथा
लग्न होऊन दोन दिवसही लोटले नव्हते तोवर बायको म्हणाली, "मुझे और एक शादी करनी है।"
"English please, " मी म्हणालो.
बायकोच्या बोलण्याचा न पटण्याजोगा अर्थ निघायला लागला कि मी तिला इंग्रजीत बोलायला सांगतो. मुद्दा असा होता कि दिल्लीतलं आमचं लग्न तिच्या घरच्यांना मान्य नव्हतं. म्हणजे नातं मान्य होतं, विधी मान्य नव्हते. तर अजून एकदा तिकडच्या पद्धतीने लग्न करावं लागणार होतं.
- Read more about एका धर्मांतराची कथा
- 55 comments
- Log in or register to post comments
- 34190 views
ऐसीकरांची ओळख
ऐसी अक्षरे वरील सदस्यांची ओळख करून देण्यासाठी हा धागा काढलेला आहे. खालील यादी अपुरी आहे ह्याची आम्हाला जाणीव आहे. पण सर्वच जर आम्ही लिहिले तर अन्य सदस्यांना वाव कसा मिळणार अशा विचाराने आम्ही थोड्क्याच माननीयांचा उल्लेख करून थांबलो आहोत. तरी संधीचा फायदा घेऊन ऐसीकरांनी यात भर घालावी ही विनंती.
अरविंद कोल्हटकर -
- Read more about ऐसीकरांची ओळख
- 95 comments
- Log in or register to post comments
- 53000 views
आज्जीच्या गोष्टी
पूर्वी गावातून एखादी गोष्टीवेल्हाळ आजी फेमस असायची. माझ्या गावी समोरच्या घरातली हीरा ही आज्जी न म्हणवता येईल अशी चिरतरुण आणि उत्साही आजी गोष्टी सांगण्यासाठी प्रसिद्ध होती. तर आजोळी आइची आई गोष्ट सांगायला लागली कि आजूबाजूच्या बाया पोराटोरांना घेऊन ओसरीवर येऊन बसत. आजोबा पण गोष्टी सांगायचे, पण आजीच्या ढापलेल्या.
- Read more about आज्जीच्या गोष्टी
- 12 comments
- Log in or register to post comments
- 25107 views
कॉपिराइट आणि मराठी साहित्य
Taxonomy upgrade extras
आज कोलटकरांच्या कवितेच्या हक्काबाबत सुप्रिम कोर्टाने प्रकाशक अशोक शहाणे यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर -
१. लोकसत्ता या दैनिकाने ही बातमी पहिल्या पानावर सर्वात वर मुख्य बातमी म्हणून छापली.
२. एबीपी माझा या वाहिनीने ही बातमी लावून धरली. रात्री ९ वाजताच्या कार्यक्रमात त्यावर चर्चाही झाली. अशोक शहाणे व संदीप खरे या दोघांशी झालेली बातचित पुन्हा रात्री अकरा वाजता दाखवणार आहेत.
याविषयी फेसबुकवरची पहिली प्रतिक्रिया मी गणेश मतकरी यांची वाचली. त्यांच्या भिंतीवर याबाबत चर्चा सुरू झाली; तिथं प्रतिक्रिया नोंदवून मी ती चर्चा माझ्या भिंतीवर शेअर केली.
- Read more about कॉपिराइट आणि मराठी साहित्य
- 61 comments
- Log in or register to post comments
- 46144 views
कसं काय पाटील, बरं हाय का? - विडम्बन
सोशल मिडीयाचा वापर करून काँग्रेसची बदनामी केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल - इती सतेज पाटील, गृहराज्य मंत्री. त्याला माझं उत्तर!
कसं काय पाटील, बरं हाय का?
आज काय वाचलं ते खरं हाय का?
आवं लकवावालं तुमी
आवं चकवावालं तुमी
आवं घड्याळवालं तुमी
आवं हातवालं तुमी
सांगा, आज काय वाचलंय ते खरं हाय का?
काल म्हनं तुमी दिल्लीला ग्येला
दिग्गीच्या तालमीत तयार होवून आला
सोशल मिडियाची कशी, वाट लावलीत अशी
आता काय शिलकी ऱ्हायलंय का?
सांगा, आज काय वाचलंय ते खरं हाय का?
आता म्हनं तुमी, कायदाच क्येला
फेसबुक, ट्विटरवरी घातलात घाला
सरकारवरती टीका, तुरुंगात फ्येका
- Read more about कसं काय पाटील, बरं हाय का? - विडम्बन
- 9 comments
- Log in or register to post comments
- 5289 views
कानाला खडा
फणीश्वर नाथ 'रेणु' ह्यांच्या 'तीसरी कसम, उर्फ़ मारे गये गुलफ़ाम' ह्या हिंदी कथेचा स्वैर अनुवाद. (ह्याच कथेवर 'तीसरी कसम' हा चित्रपट आधारित आहे.)
हिरामण गाडीवान रोमांचित होत होता.
हिरामण गेली वीस वर्षे बैलगाडी हाकतो आहे. सीमेपार असलेल्या नेपाळच्या मोरंग राज्यातून धान्य व लाकडे आणलेली आहेत त्याने. कंट्रोलच्या काळात रेशनचा माल गुपचूप इथून तिथे पोहोचवला आहे. पण ह्याआधी कधी अंगावर असे रोमांच फुलले नव्हते.
- Read more about कानाला खडा
- 10 comments
- Log in or register to post comments
- 14827 views
[मुक्तक] "मूळ"
हॊ मी वाईट आहे!
मला माहित आहे की मी "वाईट" आहे
आणि खूप वर्षांपासुन आहे
आणि तसा मी वेडापण आहे...
आयुष्याची पन्नाशी नुकतीच गाठली
आणि माझ्या वाईटपणाचं मूळ
सापडलं
फार तपशीलात जायची गरज नाही
मी कष्ट करून लिहिलेल्या संशोधन निबंधाला
सहलेखक म्हणुन त्यांचे नाव लावले नाही
मग मी त्यांच्या नजरेत मी कायमचा वाईट बनलो.
MD परवानगीशिवाय मिटींग मध्ये
सिगरेटी फुंकुन वात आणे. त्याबद्द्ल नाराजी
दर्शवली तेव्हा मी वाईट ठरलो.
गरजा कमी ठेऊन, चार पैसे गाठीला बांधुन
सन्मानाने जगतो म्हणुन पण मी
वाईटच ठरलो.
त्यांच्या नजरेतुन जग बघत नाही
हा पण माझा एक वाईटपणाच आहे
- Read more about [मुक्तक] "मूळ"
- 8 comments
- Log in or register to post comments
- 3611 views
वटवटहुकूम
लेकाची इयत्ता दुसरीच्या वर्गात वर्गप्रतिनिधी म्हणून निवड झाली. (तसा तो पूर्वीपासूनच गुणी बाळ हो.)
मी त्या रात्री त्याच्या खोलीत जाऊन खूप रडले. 'लेकरा, सत्ता म्हणजे विषाचा प्याला हो. कधीही विसरू नकोस बरं. कायम लक्षात ठेव,' हिंदी सिनेमातल्या निरूपा रॉयच्या खास रडक्या स्वरात मी त्याला म्हटलं. लेकरू पुस्तक वाचण्यात दंग होतं. त्याने फक्त मख्खपणे माझ्याकडे एकवेळ बघितलं आणि परत पुस्तकात डोकं खुपसलं.
वर्गप्रतिनिधी म्हणून आख्ख्या वर्गाचा गृहपाठ द्यायची त्याची जबाबदारी होती. त्याप्रमाणे त्याने प्रश्न काढून दिलेही. पण स्वतःच दिलेला गृहपाठ करता करता स्वारी बरीच चिरडीला आली.
- Read more about वटवटहुकूम
- 49 comments
- Log in or register to post comments
- 18003 views
शनिवारवाड्याची पुनर्बांधणी – एक भ्रामक संकल्पना
कृष्णा आणि गोदावरी या नद्यांमधील दुआबाच्या प्रदेशाला दख्खन या नावाने सर्वसाधारणपणे ओळखले जाते. या दख्खनमध्ये इस्लामिक सत्ता प्रथम स्थापन झाली ती 1294 मध्ये, जेंव्हा दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दिन खिलजी याने देवगिरीच्या यादव राजांचा पराभव केला तेंव्हा! या नंतर 1347 मध्ये बहामनी राज्याची स्थापना झाली आणि अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली की दख्खनचे इस्लामीकरण आता पूर्णत्वास जाणार. मात्र याच वेळी सांगमा राजघराण्यातील दोन हिंदू राजे, हरिहर आणि बुक्का यांनी तुंगभद्रा नदीच्या किनार्यावर 1336 मध्ये एका हिंदू राष्ट्राची स्थापना केली आणि पुढची 200 वर्षे तरी दख्खनच्या इस्लामीकरणाची प्रक्रिया थोपवून धरली.
- Read more about शनिवारवाड्याची पुनर्बांधणी – एक भ्रामक संकल्पना
- 26 comments
- Log in or register to post comments
- 15750 views
एक तो सैतान आहे
एक तो सैतान आहे
बाईकवरचा पाईक आहे
नाही नाव, गाव कसले?
स्थेटोस्कोपचा थाट आहे
माहितीचा पूर येता
ज्ञानाची वाट आहे
टंकताना भारंभार पोष्टी
हलते खाली खाट आहे
त्रिशूळ ॐकार विषवल्ली
चरखा मात्र चाट आहे
नाचविण्याची धमकी देणे
सद्ध्या सवय हॉट आहे
विचार लै कृती पूज्य
शून्य त्याला थॉट आहे
बोलघेवडा बोलबच्चन
डोक्याला हा शॉट आहे
कुण्या एका पंचेवाल्याचा
खानदेशी भाट आहे
- Read more about एक तो सैतान आहे
- Log in or register to post comments
- 3689 views