रा. पु. जोशी
रुढ अर्थाने ही समीक्षा नाही. कारण समीक्षाकाराला चित्रपटाच्या तांत्रिक बाबींचीही माहिती असायला हवी. पण एक सामान्य प्रेक्षक म्हणून काय वाटले ते मांडण्याचा प्रयत्न करतो..
शक्यतो गोष्ट विस्ताराने न उलगडता लिहिली आहे. त्यामुळे , हे वाचूनही ज्यांना हा चित्रपट बघायचा असेल, त्यांनीही हे वाचायला हरकत नाही.
रामचंद्र पुरुषोत्तम जोशी, नांवाचा चित्रपट आला आहे असे कळल्यावर, तो जरा वेगळा, आशयघन असेल असे वाटले होते. म्हणून बघायला गेलो. रिकामे प्रेक्षागृह पाहून तर, हा नक्कीच अॅवॉर्ड जिंकणारा असावा असे वाटू लागले होते.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about रा. पु. जोशी
- 6 comments
- Log in or register to post comments
- 7171 views
चावडीवरच्या गप्पा – पंतांची 'बेबंदशाही'

“देर आये पर दुरुस्त आये!”, भुजबळकाका चावडीवर प्रवेश करत.
“कशाची दुरुस्ती आणि कोण आलेय दुरुस्तीला?”, नारुतात्या खवचटपणे.
“अहो नारुतात्या, भोचकपणा सोडा!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात.
“नारुतात्या खास तुमच्यासाठी, शिवसेनेची दुरुस्ती आणि दुरुस्तीला आलेत शिवसैनिक”, इति भुजबळकाका.
“कसली दुरुस्ती? काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा चेहरा वाकडा करत.
- Read more about चावडीवरच्या गप्पा – पंतांची 'बेबंदशाही'
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3270 views
नवचंदीतला अर्धा तास
साऊंड बंद करा. बंद करा साऊंड. आराधी चिडल्यात. आरे बंद करना भो! आयकाय यायना कायच. आरं थांबना हेवडं गाणं होव दे. नको नको बंद कर तु.
ए नामरे सबसे बडा तेरा नाम ओ शेरोवाली उचे डेरोवाली बिगडे बना दे ... बना दे वर गाणं गचकन् थांबलं.
- Read more about नवचंदीतला अर्धा तास
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4119 views
गुडगाँव ट्रॅफिक पोलिस
दिल्ली परिसरात म्हणे लंडनपेक्षाही रुंद रस्ते आहेत. पण रहदारीच्या बेशिस्तीमुळे त्यांचा फार काय फायदा होत नाही. रात्री सात-आठची वेळ होती, दिल्ली गुडगाव रोडवर गुडगावकडे चाललो होतो. आता सिग्नलवर राइट टर्न घ्यायचा होता. मी एकटाच राईट टर्न घेत होतो. त्या उजवीकडच्या रस्त्यावर मी जाणार होतो, तिकडे अफाट गाड्या एका बाजूला एक थांबलेल्या, माझी गाडी आत तिकडे घ्यायला जागाच नव्हती. वाटलं हा वन वे असावा. अर्धवट राईट टर्नचा मग यु टर्न केला, लगेच जाणवलं कि आपल्याला वास्तविक या पुढच्या सिग्नलवर , दिल्लीच्या भाषेत रेड लाईटवर, यु टर्न घेतला असता तर सोयीचं पडलं असतं. तितक्यात दिसलं अरे हे तर गुरगावचं ट्रॅफिक!
- Read more about गुडगाँव ट्रॅफिक पोलिस
- 13 comments
- Log in or register to post comments
- 12458 views
वाचनप्रेमींना जाहिर प्रश्न....
Taxonomy upgrade extras
इथल्या सर्व पुस्तक्वेड्यांबद्दल मला सदैव पडणारे काही असूयायुक्त प्रश्नः-
तुम्ही इतकी सारी पुस्तकं का वाचता?
काही विशिष्ट पुस्तकं वाचून त्रास होत नाही का? अशा अस्वस्थेतून तुम्ही बाहेर कसे येता? की अस्वस्थ राहणे पसंत करता?(ह्याचं उत्तर जितकी जणं देतील तितकं चांगलच;
शिवाय नगरिनिरंजन ह्यांनीही ह्या प्रश्नाकडं दुर्लक्ष केलं नाही तर बरं होइल.)
.
पुस्तकं वाचणयसाठी वेळ कसा काय काढू शकता? पोटापाण्याच्या चिंता मिटल्याहेत का?
आपल्या मूलभूत गरजांवर नियंत्रण ठेवता, की त्या भागवण्याइतकी संपत्ती तुमची कमावून झालिये?
- Read more about वाचनप्रेमींना जाहिर प्रश्न....
- 59 comments
- Log in or register to post comments
- 72355 views
सकाळनेच कोलटकर-शहाणे यांच्याकडून छपाईचा खर्च वसूल करायला हवा होता
काही तरी चुकते आहे खास.
कोलटकरांची कविता छापून सकाळ आणि संदीप खरे यांनी नेमका गुन्हा काय केला? कोलकटकरांच्या कवितांचे वेगळे पुस्तक छापून त्यांनी पैसे कमावले आहेत का? चांगल्या भावनेने त्यांनी ही कविता छापली. सकाळमध्ये कविता छापून आल्याने कोलटकरांची कविता अधिक लोकांपर्यंत गेली. त्यातून त्यांचे दोन कवितासंग्रह जास्तीचे खपले असणार. याबाबत कृतज्ञता बाळगायचे सोडून आमचे काहीतरी कोट्यवधींचे धन लुटले गेले अशा थाटात त्यांच्यावर खटला भरणे म्हणजे अतीच झाले. हा सगळा उपद्व्याप करण्यामागे कोलटकर-शहाणे यांचा प्रसिद्धी मिळविण्याचा हेतू असणार यात कोणतीही शंका नाही.
- Read more about सकाळनेच कोलटकर-शहाणे यांच्याकडून छपाईचा खर्च वसूल करायला हवा होता
- 43 comments
- Log in or register to post comments
- 21430 views
दोन नैसर्गिक आपत्ती आणि भारत-पाकिस्तान सीमा
भारत आणि त्याच्या पश्चिमेला असलेला पाकिस्तान यांच्यामध्ये 700 पेक्षा जास्त किलोमीटर लांबीची व उत्तर-दक्षिण पसरलेली सीमा आहे. या पैकी जम्मू-कश्मिर मधला प्रत्यक्ष ताबा रेषेचा भाग सोडला तर बाकीची सीमा 1947 मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या देशाच्या फाळणीमुळे झालेली असल्याने ती नद्या किंवा पर्वतराजी या सारख्या नैसर्गिक भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार धरून आखलेली सीमा नाही. मात्र याच सीमारेषेचा नैऋत्येकडचा, पूर्व-पश्चिम असा पसरलेला भाग मात्र फाळणीच्या किमान एक शतकापासून तरी अधिक काळ नैसर्गिक आपत्तींमुळे अस्तित्वात आलेला आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
- Read more about दोन नैसर्गिक आपत्ती आणि भारत-पाकिस्तान सीमा
- 6 comments
- Log in or register to post comments
- 9976 views
एस्पेरांतोः सोपी, साधी परंतु अस्तंगत होत असलेली जागतिक भाषा
आपल्यातील बहुतेक एस्पेरांतो हे नाव प्रथमच ऐकत असतील. कदाचित ही भाषा ओळखणारे वा बोलणारे आपल्यापैकी कुणीही नसतील. परंतु एस्पेरांतो ही एक जागतिक भाषा आहे व त्याचा जन्म 130 वर्षापूर्वी झाला.
- Read more about एस्पेरांतोः सोपी, साधी परंतु अस्तंगत होत असलेली जागतिक भाषा
- 13 comments
- Log in or register to post comments
- 7172 views
काल ना..चैत्रात आभाळ भरून आलेलं.. !!
सकाळी बोचरी थंडी असते. दिवसा गरम होतं म्हणून चैत्रच आहे म्हणायचं..!
पण कोकिळेचं गाणं कानावर पडतंय आणि तुझं गुणगुणणं आठवतं. मी तुला म्हणायचो "ऐक ऐक ..ती म्हणतेय ..कुळीव कुळीव" आणि तू म्हणायचीस "कुहू कुहू..!"
तुझ्या आवाजातलं ते कुहू कुहू ऐकताना कानात ह्रूदय गोळा व्हायचं आणि कुठेतरी मनाच्या पडवीतल्या वीणेच्या तारा झंकारायच्या. तू न्हात असतांना गायचीस .. गाणं होतं कि नुसतंच गुणगुणणं ते..पण ते ऐकताना आसमंतातला प्रत्येक कण न कण सुरांच्या तालावर तरंगू लागायचा. आणि तू केस पुसत तुझ्या गो-या अंगावर टॉवेल गुंडाळून बाहेर यायचीस तेव्हां........!
- Read more about काल ना..चैत्रात आभाळ भरून आलेलं.. !!
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3818 views
इंडिया अगेन्स्ट करेक्शन : २०१४ च्या निवडणुकीसाठी २५ कलमी जाहीरनामा
मी नानांचा फॅन आहे. मी त्यांना अगदी मनसे काका मानतो ते मला पुतण्या मानतात कि नाही कुणास ठाऊक ! पण मी त्यांचा हनुमान आणि ते माझे नाना आहेत. नानांनी विविध प्रश्नांवर मतं मांडून शांत बसण्याच्या प्रवृत्तीवर वस्तरा चालवल्याने माझं मन छिन्नविछिन्न झालं आहे. बास झालं आता !!
- Read more about इंडिया अगेन्स्ट करेक्शन : २०१४ च्या निवडणुकीसाठी २५ कलमी जाहीरनामा
- 12 comments
- Log in or register to post comments
- 5478 views