सत्यजित रे लिखित फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा मालिकेच्यानिमित्ताने ‘महाराष्ट्र टाइम्स’ व ‘रोहन प्रकाशन’ आयोजित
फेलूदा रहस्यकथा लेखन स्पर्धा...
स्पर्धेची संकल्पना :
१. वाचकांनी ‘फेलूदा’ या मूळ कथा मालिकेतील फेलूदा, तोपशे, जटायू अशा पात्रांचाच समावेश करून आपली स्वत:ची रहस्यकथा लिहावी.
२. कथा ३००० ते ५००० शब्दांमध्ये लिहावी.
३. कथेचा प्लॉट व पार्श्वभूमी निवडण्याबाबत लेखकाला पूर्ण स्वातंत्र्य राहील. मात्र मूळ कथांशी साधर्म्य राहील अशी अपेक्षा असेल.
प्रथम पुरस्कार : रु.२१०० अधिक रु.५००ची पुस्तकं
द्वितीय पुरस्कार : रु.११०० अधिक रु.३००ची पुस्तकं