Skip to main content

गद्य

ज्याचे त्याचे आयुष्य ...

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात असे म्हणतात. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आणि वेगळी असते. फक्त रंग, रूपा मध्ये फरक असतो असे नाही, तर स्वभाव, आवडी-निवडी, बुद्धी, सहनशक्ती इत्यादी देखील अगदी वेगळे असतात. जसे एकाच्या हाताचे ठसे, दुसऱ्या कुणाच्या हाताच्या ठशाबरोबर जुळत नाहीत. तद्वतच प्रत्येक व्यक्तिमत्व देखील भिन्न असते. अगदी जुळी भावंडे देखील एकमेकांपेक्षा खूप वेगळी असतात. परंतु तरीही तुलना केली जाते. एकजण दुसऱ्यासारखा असला पाहिजे अशी अपेक्षा केली जाते. ही अगदी पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे.

ललित लेखनाचा प्रकार

झांटिपी आणि बोका

हे लेख मी फेसबुकवर ही प्रसारित केले आहेत. इथे पुनःप्रसाारण.

मी: तर मी तुम्हा दोघांवर एक सदर लिहिणार आहे. cartoon strip सारखं पण लिहून.

झांटिपी: लिहून का?

मी: मला जे नमूद करायचंय, ते विचारपरिप्लुत असल्याने, शब्द हेच योग्य माध्यम आहे.

बोका: सरळ सांग ना, तुला चित्र काढता येत नाही

मी: आणि तुम्हीही काही फारसे फोटोजनिक नाही. असो. तर मी असं सदर लिहितेय. त्याचं नाव असेल 'झांटिपी आणि बोका'

बोका: झांटिपी कशाला पाहिजे? 'बोक्याचे विचारधन' किंवा नुसतं 'बोका' ठेव. सिर्फ मेरा नाम ही काफी है!

ललित लेखनाचा प्रकार

एका स्त्रीवादी बाईचा महिला दिवस

सकाळी सकाळी मोबाईलवर आलेले प्रमोशनल मेसेजेस वाचून एक स्त्रीवादी बाई फारच वैतागली. मेसेज होता एका ऑनलाइन शॉपिंगच्या सेल संदर्भात. महिला दिनानिमित्त किचन एप्लायन्सेसवर भरघोस सूट. दुसरा मेसेज होता साड्यांच्या सेलबद्दल. त्यातील एक वाक्य होते. 'वुमेन इन सारीज् लूक्स मोअर ट्रेडिशनल. हॅप्पी शॉपिंग'

ललित लेखनाचा प्रकार

'झुंड' आणि काही आठवणी

आठवड्याचे कपडे बांबूच्या हाऱ्यात भरून लांब नदीवर दर रविवारी धुवायला न्यायचो. आम्ही सगळे घरातले मिळून, आईबाबा मुलं, कपडे धुवायचो दोनतीन टोपल्या. काही वर्षांपूर्वी परदेशात मुबलक पाण्यात वॉटर राईड्स केल्या तेव्हा बहीण म्हणाली, ‘ताई, कधी वाटलं होतं, आपण विमानातून इतक्या लांब केवळ फिरायला म्हणून येऊ आणि इतक्या पाण्यात खेळू!’

ललित लेखनाचा प्रकार

माझ्या जंगलगोष्टी

एकदा जंगलात सिंहाने सगळ्या प्राण्यांना एकत्र बोलावून घेतले आणि सांगितले की आपल्याला वाढलेल्या जंगलाचा कारभार पाहण्यासाठी नेमणुका करायच्या आहेत. पण त्या नेमणुका मी राजा असलो तरीही माझ्या मर्जीने करणार नाही. कारण माझा लोकशाहीवर विश्वास आहे. त्यामुळे तुमचे मत विचारात घेतल्याशिवाय माझा निर्णय सांगणार नाही. मग प्रत्येक प्राणीवर्ग आपापले प्रतिनिधी कोण याबद्दल चर्चा करू लागले. एका माकडाने शंका उपस्थित केली की कारभार पाहणाऱ्या मंडळीत सगळ्या प्रकारच्या प्राण्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले पाहिजे. सगळ्यांनी त्याची री ओढली.

ललित लेखनाचा प्रकार

पीएनामा (1): गुटबाजी, शिक्षित आणि अशिक्षित

(पीएनामा: केंद्र सरकारच्या सीएसएसएस केडर मध्ये ग्रुप सी पासून ते ग्रुप ए पर्यन्त प्रवासच्या दरम्यान अनेक वरिष्ठ आयएएस, आयपीएस इत्यादींच्या सोबत कार्य करताना मला आणि माझ्या बांधवांना आलेले अनुभव, ऐकलेले किस्से आणि कल्पना ही, पीएनामाच्या रूपाने सादरीकारण करण्याचा प्रयत्न) किस्से सांगण्यासाठी काही टोपण नावे सुनील, सुशील आणि श्याम सुंदर ही ठेवली आहे)

ललित लेखनाचा प्रकार

"८३" च्या निमित्ताने - ८३ च्या आठवणी

"...इंग्लैंड मे चल रहे विश्वकप के अपने पहले मॅच मे भारत ने वेस्ट इंडिज को हरा दिया है..."

१९८३ च्या जून मधल्या कोणत्यातरी दिवशी संध्याकाळच्या बातम्यांमधे ही बातमी रेडिओवर ऐकली. तोपर्यंत अशी एक काहीतरी टुर्नामेण्ट इंग्लंड मधे होत आहे, त्यातील सामने एका दिवसाचे असतात, त्यांची रेकॉर्ड कसोटी तर सोडाच, पण "फर्स्ट क्लास" मधेही धरली जात नाहीत, भारताने याआधीच्या टुर्नामेन्ट्स मधे फारसे काही केलेले नाही. फास्ट खेळणे वगैरे आपल्याला जमणारे नाही अशा विविध गोष्टी आमच्या गप्पांमधे ऐकल्या होत्या. त्यामुळे काहीतरी नवीन प्रकार आहे इतकेच माहीत होते.

ललित लेखनाचा प्रकार

माझे दोन गणितवेडे मित्र – भाग २ [स्वप्नील महाजन]

गणितज्ञांचे दोन प्रकार करता येतील. काही असतात प्रमेय सोडवणारे आणि दुसरे काही असतात सैद्धांतिक इमारत रचणारे. पहिल्या प्रकारचे गणिती खूप काळ अनिर्णित राहिलेले जटिल पण विशिष्ट प्रश्न सोडवू पाहतात, तर दुसऱ्या प्रकारचे गणिती वरपांगी भिन्न दिसणाऱ्या विषयांतील साम्य शोधून त्या सगळ्या विषयांना एक सैद्धांतिक चौकट मिळवून देतात. स्वप्नील महाजन आणि त्याचा सहयोगी मार्सेलो आगियार हे दुसऱ्या प्रकारचे, अव्वल दर्जाचे गणिती आहेत.

ललित लेखनाचा प्रकार

बारह माह / अर्जन दास

शीख लोकांचे ५ वे गुरु, गुरु अर्जन देव दास यांनी लिहीलेले एक 'बारह माह' नावाचे काव्य सापडले. बारा ऋतु आणि विरहीणी म्हणजे ईश्वरापासून (शिव) वियोग झालेली आत्मारुपी वधू (जीव) अशी सांगड आढळते. हा एक पूर्वापार चालत आलेला लोकगीताचा प्रकार असून, ऋतुंचे मूडस आणि विरह ते मीलन असा वधूचा मानसिक प्रवास या गीतात रंगविलेला आहे. निसर्ग आणि अध्यात्मिक पातळीवरील प्रेम असा सुरेख संगम या पौरींमध्ये येतो. विरहाने पोळलेली नववधू शेवटी आपल्या प्रियकरास भेटल्यानंतर तिला मिळालेली असीम शांती व सुख - असे वर्णन येते.

ललित लेखनाचा प्रकार

माझे दोन गणितवेडे मित्र – भाग १ [शरद कानेटकर]

गणितावरील प्रेमात वेड्या होऊन गेलेल्या या दोन व्यक्ती. त्या दोघांत गणितप्रेम हा समान धागा असला तरी त्यांचे जीवन अगदी वेगळ्या प्रकारे व्यतीत होत आहे. आपल्या गणितप्रेमावर दृढ राहण्यासाठी दोघांनी काय काय केले व अजूनही ते प्रेम कसे टिकवून ठेवले आहे याच्या कहाण्या भिन्न असल्या तरी त्या दोन्ही विलक्षण आहेत.

ललित लेखनाचा प्रकार