तुलनेचा तराजू

सततची आणि अंधपणे केलेली स्वतःची इतरांशी आणि इतरांच्या जीवनाशी केलेली तुलना द्वेषाचे आणि नाशाचे कारण बनते. आपण इतर दोन व्यक्तींमध्ये केलेली तुलना सुद्धा हेवा आणि लोभाला जन्म देते आणि त्या दोघांचीही अधोगती करवते.
तुलनेमुळे स्वतःचे दोष आणि इतरांचे गुण आपल्याला दिसत नाहीत.
तुलना केल्याने आपण स्वतःचा वेगळेपणा आणि स्वतंत्र अस्तित्व नकळत नाकारत असतो.
तुलना ही नेहेमी हक्काची केली जाते पण कर्तव्याची आणि कर्तृत्वाची केली जात नाही.
इतरांपेक्षा मी कसा चांगला होईन, इतरांपेक्षा मी स्वतःच्या स्वभावात जास्त बदल कसा घडवेल अशी तुलना दुर्दैवाने होत नाही. अशी तुलना लाभदायक ठरते.
इतरांना मिळालेल्या फळाची तुलना होते पण त्यांनी केलेल्या मेहेनतीची आणि सत्कर्माची तुलना दुर्दैवाने होत नाही.
तुलना जरूर करावी पण पूर्वीचे स्वतः आणि आताचे स्वतः अशी करावी. म्हणजे रोज स्वतःत सुधारणा करून कालपेक्षा किती स्वतःमध्ये सुधारणा झाली अशी तुलना करावी.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुमच्या भावना समजल्यात पण बर्याचदा बाहेरच्या (स्वतः व्यतिरिक्त) जगाशी तुलना फायदेशीर ठरते. जसे कि धावण्याची शर्यत जिंकायची असेल तर सराव करतांना तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे प्रगती करण्यात मर्यादा येते तेच जर माजी विजेत्याशी तुलना केली आणि सराव केला तर नक्किच फायदा होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~ योगी