इतर

फिडबॅक

वर्गात interrupt शिकवायला चालू होतं. व्याख्या, व्याप्ती अन् एक-दोन real time उदाहरणं देउन झाली. तेवढ्यात दरवाजाची कडी वाजली, महामहिम. अन् मी विद्यार्थ्यांना म्हटलो, is called as??? एका सुरात उत्तर आलं interrupt... फिडबॅकसाठी आलेल्या महामहिमच्या कपाळावर पडलेल्या आट्या नजरअंदाज करत अन् हास्याची उबळ आवरत वर्गाच्या बाहेर पडलो.

ललित लेखनाचा प्रकार: 

बाळा, उरले तुजपुरती,

कोणत्याही युद्धग्रस्त देशात घडणारी एक नेहमीची घटना. एक अनाम सैनिक लढता लढता मृत्यू पावलाय... अंत्यविधीसाठी त्याचे शव त्याच्या घरी आणलंय..... सुन्न झालेले त्याचे कुटुंबीय व सुहृद त्याच्या मृत्यूचे दु:ख अन त्याच्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता यात दुभंगून गेलेले..... वातावरणात एक अस्वस्थ करणारी , दुखरी शांतता……..काळ जणू गोठलाय. पण त्याचवेळी कठोर वास्तव आपल्या निर्मम अस्तित्वाची जाणीव करून देतंय......

सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी या अटळ परिस्थितीवर कविता लिहिली त्यावेळी ब्रिटनचा राजकवी असलेल्या आल्फ्रेड टेनिसन याने.

ललित लेखनाचा प्रकार: 

अंड्याची गोष्ट

एक होते अंडे. त्याला शायनिंग खायची खूप हौस होती.
एकदा ते इमारतीच्या पहिल्या मजल्यावर चढले. ग्यालारीतून त्याने तळमजल्यावरील अंगणात उडी मारली. आणि आश्चर्य. ते फुटले नाही.
तात्पर्य : धडाडीला नशिबाची साथ मिळाली तर चमत्कार होऊ शकतात.
प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. गर्दी जमली.
छाती फुगलेले अंडे मग दुसऱ्या मजल्या वर गेले आणि तिथून अंगणात उडी मारली तरीही ते फुटले नाही.
तात्पर्य : यशातून आलेला आत्मविश्वास अवघड प्रसंगातून निभाऊन नेऊ शकतो.
गर्दीने आणखी टाळ्या वाजवल्या. अंड्याच्या धडाडीची स्तुती होऊ लागली.

ललित लेखनाचा प्रकार: 

रनवे

-मंगेश पंचाक्षरी, नासिक. (मुक्तचिंतन)

अलीकडेच नाशिक मध्ये खा. शरद पवार यांची एक मनमोकळी मुलाखत विश्वास लॉन्स येथे झाली. दुसऱ्या दिवशी साहेब जळगावला जाणार होते. आम्ही त्यांना निरोप देण्यासाठी ओझर विमानतळावर गेलो होतो. साहेब विमानात बसले आणि थोढ्याच वेळात विमानाने पश्चिम दिशेला टेक-ऑफ घेतला. कोणीतरी पटकन बोलले की अरे साहेबाना तर जळगावला जायचे होते आणि विमान तर मुबईकडे गेले. पायलट विसरले की काय? सर्वांच्याच मनात हा प्रश्न आला होता की विमान मुंबईच्या दिशेने का उडाले असेल?

ललित लेखनाचा प्रकार: 

ठिपक्यांची मनोली (मुनिया) आणि माळमुनिया

आर्य हे दक्षिण भारतीय होते

(आपल्या स्वार्थासाठी नव्याने इतिहास लिहिणाऱ्या आजच्या महान इतिहासकारांपासून प्रेरणा घेऊन लिहिलेला तर्क पूर्ण लेख)

आर्य शब्दाचा संस्कृत अर्थ आहे उत्तम आणि सुसंस्कृत व्यक्ती अर्थात आचार आणि विचाराने चांगला व्यक्ती. आर्य नावाची कुठली जाती होती आणि ती परदेशातून भारतात आली या भाकड कथेवर मी कधीच विश्वास ठेवला नाही. तरीही जे माझे मित्र आर्य आणि संस्कृत बोलणारे ब्राम्हण विदेशातून भारतात आले होते, त्यांच्या साठी हा लेख. आर्य हे दक्षिण भारतीय होते आणि त्यांची भाषा संस्कृत होती हे मी लेखात तार्किक रित्या सिद्ध करणार आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

आपलासुद्धा कोणीतरी डुप्लिकेट आहे

Disclaimer : खालील लेख ऐसीवरील 'डू आयडी' विषयी नाही.

मी एकदा एका सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त गेलो होतो. तेव्हा त्यांची जेवणाची वेळ चालली होती. वाट पहात मी कार्यालयाच्या आवारात फिरत होतो. तेथे इतर काही लोकसुद्धा कार्यालयाच्या जेवणाची वेळ संपण्याची वाट पहात वेळ काढत होते.

ललित लेखनाचा प्रकार: 

तू...ना jealous झालीस ना की...

तू...ना jealous झालीस ना की मला असुरी आनंद होतो... माझी दखल तुझ्याशिवाय कोणीच घेऊ नये ही भावनाच किती जबरदस्त आहे ना. माझा मोबाईल माझ्या नकळत चेक करताना मलाही ते समजतच ना, तुझे चेहर्‍यावरचे चढऊतार होणारे भाव मीही तुझ्या नकळत टिपतोच. Specially खटकलेल्या व्यक्तिंचे मग call records, messages, whatsapp च्या posts...सग्गळं अगदी सगळं मन लाऊन scan करणं आणि खरंच एखादी गोष्ट खटकली की मग तुझी चिडचिड...कळत की पटलं पाहीजे असं ऊत्तर (तयार कराव) द्यावंच लागणारय. पण तुझ्या या सगळ्या करण्यामुळं, खर सांगू, एक प्रकारचा confidence निदान माझ्यामध्ये तरी निर्माण होतोच.

ललित लेखनाचा प्रकार: 

इस Q के...

हे माझं अजून एक पुर्वप्रकाशित. (जरा काहिही हं T टायपाच आहे)

ललित लेखनाचा प्रकार: 

कविता...

कविता लिवली की हितले लोक लई कावत्यात कुणास ठौ काऊन ते (उदयजी, लगे रहो, हम भी है साथमे). पण मी आणलोच ऊलशाक कविता अन् ऊलसक तिज्याबद्दल.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - इतर