न्यूनगंड... कोंडमारा...घुसमट...लोकापवादाचे भय...

न्यूनगंड हा एकप्रकारचा शत्रू असल्यागत आहे. असल्यागत म्हणजे ज्यांनी त्यांच्यावर मात केली नाही त्यांच्यासाठी. बहुतेक वेळा करतच नाहीत.
का येतो न्यूनगंड? आपल्या भोवतालच्या लोकांमुळे, लोकापवदाच्या भयामुळे, परिस्थितीमुळे. पण मुख्य कारण लोकांमुळेच. तेच हे परिस्थिती, भय निर्माण करतात.
न्यूनगंडाचे मला माहित असलेले प्रकार/कशाकशामुळे येऊ शकतो
स्वत:च्या रंगाबद्दल
शरिराबद्दल
व्यंग्याबद्दल
स्वभावाबद्दल / वागण्या /असण्या / बोलण्याबद्दल
परिस्थितीमुळे...
टिका/टिपन्नी

काय होतं न्यूनगंडामुळे? मात न केल्यास?
सोप्प उत्तर/अनुभव, प्रगती खुंटते
मला लहानपणी रंगावरुन चिडवायचे, मग मी भसाभसा पावडर घोळसायचो. त्याच्यावर शाळेत चर्चा. पावडर बंद, रंग न्यूनगंड आॅन.
मला किरकोळ शरिरयष्टीमुळे चिडवायचे, मी चिडायचो, चिडक्या xxच, बोलणं बंद, घुसमट मोड आॅन. कुणी समोर भाषण द्यायला गेलं, त्याच्या कुळाचा दबक्या आवाजात ऊद्धार, मलापण शिव्या घालणार हे. मंचावर जायचा फोबिया आॅन. आर्थिक परिस्थितीवरुन चिडवाणे, ऊगीच हलकेपणाची भावना यायची. दबून रहायचा मोड आॅन. आज भलेही ते अजूनही बोंबलत फिरुन वा सटरफटर काम करुन जगताहेत पण त्यांच्या ह्या देणग्यांच काय?

कुणाला बोलताना आपल्या डोळ्याला चिपडं तर नाही ना?
नाकातले केस बाहेर तर दिसत नाहीत ना?
चेहर्यावर कुठे काही लागलेलं तर नाही ना?
घरातनं बाहेर निघाल्यावर पँटची झीप ऊघडी तर नाही ना?
समोरच्याला बोलून गेल्यावर त्याला वाईट तर वाटणार नाही ना?
नविन कुणी भेटायला येण्यापुर्वी ते सुपेरीयर अन् स्वतः किरकोळ वाटणे.
आपल्या तोंडाचा वास तर येत नाही ना?
साला मीच का?
इंजिनीयरींगला सायकलवर जाऊन मी ती बाहेर दूर का लावत होतो?
तो/ती मला/तुला बघणार/बोलणार सुद्धा नाही.
कुणाची भीड का लोटत नाही?
नाही करत/जमणार/होणार कधी बोलायला जमणार?
कोण कधी काय म्हणेल?

नुसतं लोकापवादाचे भय...न्यूनगंड...घुसमट...कोंडमारा...माय फूट.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

भय हेच खरे कारण.
आनंदीपणा आणि स्वत:वरच विनोद हा उत्तम उपाय.
तिसरा उपाय म्हणजे आजुबाजुचं 'पब्लिक' ज्या क्षेत्रात जायला घाबरतं,लाजतं त्यात मुसंडी मारणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण स्वत:वर विनोद स्वत: केला तरच जमतं, तोच विनोद दुस-या कुणी केला तर? आयत कोलीत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

न्यूनगंडावर मात करायची असेल तर थोडे उन्मत्त व्हावे. लोकांनी गर्विष्ठ म्हटले तरी चालेल. पण न्यूनगंडापासून सुटका होते. ती इंग्रजीत म्हण आहे ना,
ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स, तसं!
राजकारणांत आपण ही उदाहरणे रोज बघतच असतो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणूनच सगळ्यात शेवटचा शब्द घुसडलाय, माय फूट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

ऐसीवर लोकांनी काय काय वाचलंय आणि आपलं वाचन किती तोकडं आहे हे पाहूनसुद्धा येतो न्यूनगंड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेल्वे टाइमटेबल, पुण्याची टेलिफोन डिरेक्टरी, झालेच तर अंकलिपी...

तुम्ही वाचले आहेत का हे सगळे? नसल्यास, यायलाच पाहिजे मग न्यूनगंड!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0