कथा

नियतीचे वर्तुळ

रेखा झपझप पावलं उचलत चालत होती. कामावर जायला फार उशीर झाला होता. आठ तेराची लोकल आज पुन्हा सुटणार होती. आजकाल कामावर जायला उशीर होणं रोजचंच झालं होतं. अलार्म वाजूनसुद्धा तिची बिछान्यातून बाहेर पडायची इच्छाच होत नसे. रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नसे. ती सतत प्रदीपचाच विचार करी. तासंतास त्याचेच विचारचक डोक्यात फिरत राही. प्रदीपबरोबर आपण जसं वागलो त्याचे ती मनातल्या मनात सारखं समर्थन करण्याचा प्रयत्न करीत राही. आपलं वागणं चूक की बरोबर होतं याचा ती निर्णय करू शकत नव्हती.

ललित लेखनाचा प्रकार: 

स्मृतिगंध-एक ह्रदयस्पर्शी प्रेमकथा

का गं अशी अचानक सोडून गेलीस मला?..असं मध्येच मला एकट्याला सोडून जाण्यासाठी का आपण एकत्र आलो होतो?..आज आठवतंय सगळं अगदी पहील्यांदा तुला कॉलेजमध्ये पाहून माझं मन तुझ्यावर 'लट्टू' झालतं त्या क्षणापासून ते आजवर घडलं आणि घडवलं गेलेलं जसंच्या तसं आणि माझ्याही नकळत माझ्या डोळ्यांतून आसवं वाहू लागतात..कसा गं आवर घालू या भावनांच्या कल्लोळाला?..कुठं गं शोधू सखे तुला?..तुझ्या आठवणींत रमणं हा तर आता एक छंदच होवून बसलाय...

ललित लेखनाचा प्रकार: 

पहिला पाऊस- एक आठवण

"लगी आज सावन की फिर वो झड़ी है।
वही आग सीने में फिर जल पड़ी है।

कुछ ऐसे ही दिन थे वो जब हम मिले थे। 
चमन में नहीं फूल दिल में खिले थे।

वही तो है मौसम मगर रुत नहीं वो..
मेरे साथ बरसात भी रो पड़ी है।"

ललित लेखनाचा प्रकार: 

बर्गर आणि वडापाव.

ती : "का रे बोलावलंस मला या बागेत? असं काय महत्वाचं सांगायचं आहे म्हणालास? फोनवर बोलता आलं नसतं का आपल्याला? संध्याकाळचे सहा वाजून गेले तरी बॉस काही मला सोडायला तयार होत नव्हता. एक अर्जंट लेटर टाईप करूनच जा म्हणत होता. शेवटी आले मी त्याला आईला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे असं सांगून. त्यालाही माहीत आहे ना, आईच्या कॅन्सरचं! जा म्हणाला."

तो : "अगं हो! हो! जरा दम खाशील की नाही? बस की जरा या बेंचवर. बघ समोरच्या झोपाळ्यावर कशी लहान बाळं खेळताहेत. आणि ते बघ ती मुलगी फुलपाखराच्या मागे पळतेय. अरे! अरे! बघ कशी धपकन् पडली ना ती!!"

ललित लेखनाचा प्रकार: 

प्लियाडाइन्स आणि प्रुफरीडिंग

लेखकमहोदयांनी प्रकाशन कार्यालयात प्रवेश केला अन मनगटी घड्याळाकडे नजर टाकली. नियोजित वेळेच्या पाच मिनीटं आधीच ते पोहोचले होते. इथे आलं की त्यांना एकाचवेळी माहेरी आल्यासारखं अन चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आल्यासारखं असं संमिश्र काहीतरी वाटायचं. आताही तसंच वाटलं. बंद पडलेल्या फिल्टरमधलं पेलाभर पाणी घटाघट पिऊन त्यांनी संपादकांचं ऑफिस गाठलं. दरवाजाबाहेर जुनाट लाकडी पाटी ठोकलेली होती. त्यावर ‘वामन निळकंठ महाशब्दे’ हे नाव स्टार वॉर्स चित्रपटाच्या फ़ॉन्टमध्ये पेंटलेलं होतं.

ललित लेखनाचा प्रकार: 

थ‌रार (क‌था)

संध्याकाळचे ६ वाजलेले होते. सॅण्डल्स चा टिकटॉक आवाज करता अंजली कॅफे ब्लु हेरॉन मध्ये शिरली. इथे तशी ती कितीदा तरी येऊन गेलेली होती. आशुतोषच्या आवडीचा कॅफे होता हा आणि कितीतरी पावसाळी दुपारी, उन्हाळ्यातील रम्य संध्याकाळी दोघानि येथेच व्यतीत केलेल्या होत्या. इतक्या कि आता येथील वेटरही त्यांच्या परिचयाचे झालेले होते. पण आज तिला तो कॅफे जास्त उन्मादक वाटतं होता. कदाचित आज जे काही घडणार होते ते तिला नवीन होते म्हणूनही असेल. पण एकदम अनोखा थरार घेउन ती आता प्रवेश करती झाली. "हाऊ मेनी?" अशरच्या शब्दांनी भानावर येत तिने उत्तर दिले "५.

ललित लेखनाचा प्रकार: 

बुंगाट रपेट (विनोदी कथा)

सकाळची वेळ होती. सूर्य नुकताच लांबलचक पसरलेल्या काळ्या शेतायच्या मागून उगवला. त्यानं आपल्या बोचऱ्या किरणायनं मंगरूळकरायले खडबडुन जागं केलं. सुर्य वीतभर वर येईलोक सगळेजण उठले होते. घराच्या खबदाडीत, गोठ्याच्या ताटव्याले, मोरीच्या खिळ्याले अडकवलेले टमरेलं मोहिमेवर निघले. अजून झोपेचा अंमल पूर्णपणे न उतरलेले जीव टमरेलात घोटभर पाणी ओतून ते डुचमळत घेऊन निघाले.
मानकशेठ मात्र आपल्या पेशल बेडरुममध्ये टिरि वर करून झोपला होता. सूर्य आजुन थोडा वर आला तव्हा त्याले जाग आली. मग निसर्गानं बोकांडी मारलेले प्रात:विधी पार पाडून त्यानं दुकान उघडलं.

ललित लेखनाचा प्रकार: 

सुभाषितोपदेश

तो काळ असा होता की प्रश्नांचा नुसता पूर, आणि मी उपायांना कंटाळत आलो होतो. Because nothing was fruitful! Nothing was coming by my way! आणि माझी हालत पाहून घरून-मित्रांकडून सल्ल्यांचा पाऊस! आई त्यादिवशी चक्क इच्छा नसताना एका महाराजांकडे घेऊन आली. “What is this आई?! इथे कशाला घेऊन आली आहेस मला ? म्हटल ना , आजच्या जगात गुरू-बिरू-मार्गदर्शन वगैरे मला पटत नाही !” “थोड थांबशील का? धीर धर !” “तू आणि बाबांनी कष्टाने Engineer बनविल! ते काय असे दुसऱ्यांच्या मताप्रमाणे चालायला ?! करेन ना प्रयत्न, थोड एकट सोडलं असतस तरी सगळ सुरळीत झालच असत. कसले गुरू आणि कसले काय ?

ललित लेखनाचा प्रकार: 

सुरवंट‌

मालाडला रहात असतानाची गोष्ट आहे ही. सकाळी लवकर, बहिणी शाळेला गेल्या होत्या. शाळेत जायला, मी अजून लहान होतो.नाना ऑफिसला गेले होते. सकाळपासून, तीनचाकी सायकल, बाहेरच्या गॅलरीत चालवून मला कंटाळा आला होता. मग घरांत येऊन खेळण्यांची पिशवी जमिनीवर रिकामी केली. जड खेळणी तिथेच पसरली आणि गोट्या, बॉल वगैरे मंडळी, सैरावैरा चारी दिशांना पळाली. लाकडी घसरगुंडीवरुन 'टकाक्क- टकाक्क करत खाली येणारा एक मिष्किल डोळ्याचा लाकडी मुलगा होता. ते माझं आवडतं खेळणं होतं तेंव्हा. त्याच्याशी थोडा वेळ खेळलो. मग भोवरा फिरवायचा प्रयत्न केला. पण ती दोरी बांधता बांधता, सैल होऊन सुटून यायची आणि मग भोवरा काही फिरायचा नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 

काही रोचक अनुभव - ३

साधारण ७५-७६ च्या सुमारास पुण्यात शिकायला होतो, तेंव्हाचीच गोष्ट. वेळ मिळेल तेंव्हा मुंबईला जाणे-येणे व्हायचेच. अशाच एका रविवारी संध्याकाळी, व्ही.टी. ला जाऊन, डेक्कन क्वीन मधे बसलो होतो. गाडी सुटायला साधारण पंधरा मिनिटे तरी अवकाश असेल. एक, माझ्यासारखाच मध्यमवर्गीय दिसणारा, गोरटेला तरुण माझ्यासमोर येऊन उभा राहिला.

"तुम्ही पुण्याला कुठे रहाता ? सदाशिव पेठेच्या जवळ आहे का ?" मी होकारार्थी मान हलवली. (आयला, म्हणजे आपणही सदाशिवपेठी दिसायला लागलो की काय?)

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - कथा