राजकीय

थांबा आणि वाट पहा !

Taxonomy upgrade extras: 

थांबा आणि वाट पहा !

भारताचे नवनिर्वाचित प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी शपथग्रहण करून पदभार स्वीकारण्यापुर्वीच त्यांच्या सार्क राष्ट्रप्रमुखाना बोलावण्याच्या निर्णयावरून उलटसुलट निष्कर्ष काढून रणकंदन करणार्या मंडळीना सांगावेसे वाटते ते इतकेच् की जरा थांबा आणि वाट पहा !

मोदी मॅजिक आणि Tipping point

Taxonomy upgrade extras: 

२०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेलं यश अभूतपूर्व आहे, १९८४ नंतर एखाद्या पक्षाला बहुमत मिळण्याची पहिलीच वेळ. ह्या निकालाची जी लोकप्रिय कारणमिमांसा आहे त्यामधे प्रामुख्याने मोदींचे प्रभावशाली कँपेन, काँग्रेसचा नाकर्तेपणा किंवा प्रचाराचा कमकुवतपणा हे घटक आढळतात. ही कारणमिमांसा एकप्रकारे माध्यमांद्वारे जे चित्र जनतेसमोर आले त्याचे सार आहे. ह्याच निकालाकडे बघण्याचा एरवी एक जुनाच पण ह्या निकालासंदर्भात नवीन असा परिप्रेक्ष्य मांडण्याचा मी इथे प्रयत्न करतो आहे, त्यावर त्याच अनुषंगाने चर्चा व्हावी असे वाटते.

चौबे जी छब्बे बनने चले....

Taxonomy upgrade extras: 

व्यवस्थापकीय सोयीसाठी लेखन इथे हलवले आहे.

पुढच्या पाच वर्षात काय होईल?

Taxonomy upgrade extras: 

आधीच्या धाग्यात अरुण जोशींनी प्रश्न विचारला की मोदी सरकार आल्यावर काय होईल याबाबत स्केप्टिक लोकांना काय वाटतं हे खरोखर जाणून घेण्याची इच्छा आहे. त्याचा स्वतंत्र धागा करण्याऐवजी नवीन धागा काढतो आहे. याचं कारण नुसत्याच नकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित न करता सरकारच्या सर्वच धोरणांत कितपत बदल होईल (किंवा होणार नाही) आणि त्याचा परिणाम काय होईल यावर चर्चा व्हावी अशी इच्छा आहे. तेव्हा निव्वळ मोदींबाबत किंवा भाजपाबाबत स्केप्टिक असलेल्यांनीच नव्हे तर सर्वांनी या चर्चेत भाग घ्यावा ही विनंती.

राममंदिर, समान नागरी कायदा आणि ३७० वे कलम

Taxonomy upgrade extras: 

भारतीय मतदारांनी भाजपला स्वबळावर पूर्ण बहुमत दिले आहे. आता भाजपाला ३ अत्यंत जुनी आणि सनातन आश्वासने पाळणे बंधनकारक झाले आहे. ही आश्वासने अशी :

१. संसदेत कायदा करून अयोध्येत राममंदिर बांधणार.
२. देशात समान नागरी कायदा लागू करणार.
३. काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द करणार.

माझे असे मत आहे की वरील पैकी एकाही आश्वासन भाजपा पूर्ण करणार नाही, करू शकणार नाही. ही आश्वासने पूर्ण करणे भाजपाला का शक्य होणार नाही, याची काही कारणे मला दिसतात. या मुद्यांचा उलट्या क्रमाने आढावा घेऊ या.

भारतीय राजकारण (भाग ४)

Taxonomy upgrade extras: 

सदर धागा तत्कालीन राजकीय चर्चा, मते व अन्य स्वरूपाचे लेखन करण्यासाठी काढत आहे.
विदा/संदर्भ देऊन केलेले दीर्घ-विश्लेषणात्मक लेखन सोडल्यास सदर विषयाशी संबंधीत सर्व लेखन या धाग्यावर करावे अशी विनंती करतो. या विषयाशी समांतर लेखन नव्या धाग्यात काढल्यास ते लेखन या धाग्यावर हलवण्यात येईल याची नोंद घ्यावी! कोणते लेखन या धाग्यात हलवायचे याचा निर्णय संपादकांचा असेल.

भाग: | |

============

अबकी बार शरद पवार?

Taxonomy upgrade extras: 

व्यवस्थापकः
सर्वसाधारण व्यवस्थापनाच्या सोयीसाठी सदर धागा इथे हलवला आहे. २०१४ निवडणूकीसंदर्भात लहान धागे/विचार/बातम्या वगैरेसाठी त्याच धाग्याचा विचार करावा.
नवे विश्लेषण, विस्तृत लेख वगैरे स्वतंत्र लिहावे

'अब की बार' च्या निमित्ताने...

Taxonomy upgrade extras: 

नरेंद्र मोदी यांच्या संबंधात गेली १२ वर्षे सुरु असलेला - आणि गेल्या काही महिन्यांत अगदी टिपेच्या स्वराला पोहोचलेला - मतमतांचा गलबला आपण पाहतो आहोत. विजय तेंडुलकर, यू आर अनंतमूर्ती यांच्यासारख्या विश्वासार्ह व्यक्तींची मोदीन्संबंधीची जळजळीत मते आपण ऐकली. डावीकडचे व उजवीकडचे विविध विचार उच्चरवाने व्यक्त झाले/होत आहेत. हे सारे पाहून / ऐकून शेवटी आपण विश्वास कशावर ठेवायचा आणि तो नेमक्या कोणत्या आधारावर, हे मला कळेनासे झाले आहे. काहीश्या गोंधळलेल्या मनस्थितीत मला पडलेले काही प्रश्न:

२०१४ निवडणुका - एक्झिट पोल्स

Taxonomy upgrade extras: 

भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजता एक्झिट पोलचे निकाल जाहीर करण्याची परवानगी मिळालेली आहे. त्यानुसार वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी निकाल जाहीर करायला सुरूवातही केलेली आहे. त्यातून आकडेवारी काय दिसते, कुठच्या राज्यात अपेक्षित निकाल आले, कुठच्या राज्यात आधीच्या ओपिनियन पोलपेक्षा वेगळं चित्र दिसतं आहे, मतमोजणी या एक्झिट पोलशी मिळतीजुळती असेल का, शेवटी कोण जिंकेल, पंतप्रधान कोण होईल वगैरे विषयांवर चर्चा करण्यासाठी हा धागा काढलेला आहे.

सक्षम विरोधी पक्ष

Taxonomy upgrade extras: 

देशातील निवडणुका ह्या आता अंतिम टप्प्यात आहेत. शेवटचा मतदान टप्पा सुरु आहे. लोकांमध्ये मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला. सध्याच्या निवडणुकांमध्ये अफाट पैसा खर्च केला गेला.ह्या निवडणुकीत लक्ष वेधून घेणारा पक्ष ठरला 'आआप'. अत्यंत कमी खर्चात निवडणुका कश्या लढवायच्या ह्याचा आदर्श त्यांनी घालून दिला.

पाने

Subscribe to RSS - राजकीय