राजकीय

मतदार यादी घोटाळा आणि कारस्थान

Taxonomy upgrade extras: 

केवळ महाराष्ट्रात 64 लाख मतदारांची नावे गायब . म्हणजे एकूण साडेआठ कोटी मतदारांपैकी 8% मतदारांची नावे गायब केली आहेत. यामागे फार मोठे कारस्थान असू शकते ,किंबहुना आहेच ! जरा विचार करा की संपूर्ण देशात जर आशा प्रकारे कारस्थान करून सुमारे 8 ते 10 % मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले गेले असेल, तर सत्ताधारी कोंग्रेस पक्षाची फार मोठी खेळी यामागे आहे. देशभरात मोदींची लाट असताना भाजपला मतदान करणार्‍या मतदारांना मतदान करूच द्यायचे नाही, आणि केले तरी ईव्हीएम मधील घोटाळे करून चुकीचे निकाल लावायचे ,ज्यायोगे भाजप 10% मतांनी पिछाडीवर राहील ,असे हे कोंग्रेस चे काळे कारस्थान आहे.

माझे अंदाजः लोकसभा २०१४

Taxonomy upgrade extras: 

प्रत्येक विभागाचे तपशीलवार विवेचन करणारा लेख लिहिला होता पण प्रकाशित करताना तांत्रिक कारणाने काहितरी गडबड झाली आणि लेख प्रकाशित झाला नाही. मी मूर्खपणा असा केला की बॅकअपही घेतला नाही Sad आता पुन्हा इतके सगळे मुद्दे टंकायची शक्ती नाही व वेळही नाही. मी पुढिल काही दिवस जालावर नसेन, तेव्हा आजच आतापर्यंतच्या घडामोडींनंतर, माझे राज्य निहाय अंदाज देतो आहे.

सदर अंदाजांसाठी लोकसभा, विधानसभा निवडणुका,स्थानिक राजकारण व काही ठिकाणी उमेदवार यांचा अभ्यास केला आहे. मात्र कोणतीही एक शास्त्रीय पद्धत वापरलेली नाही. निव्वळ हौस म्हणून हे अंदाज काढत आहे.

मध्यमवर्ग, कॉर्पोरेट्स आणि काँन्सन्ट्रेशन कँप : लोकसत्तामधील एक लेख

Taxonomy upgrade extras: 

डाखाउ कॉन्सन्ट्रेशन कँपला दिलेल्या भेटीच्या निमित्ताने हिटलर, राष्ट्रवादाने भारलेली तत्कालीन जर्मन जनता, तत्कालीन 'स्युडोसेक्युलरीस्ट, समतावादी' यांना लावली जाणारी विशेषणे आणि सद्य भारतीय परिस्थिती यांचे ललित अंगाने साधर्म्य दाखवु पाहणारा श्री लोकेश शेवडे यांचा हा कालच्या लोकरंगमधील लेख

मोदींना थेट हिटलर बरोबर तुलना करण्याइतके अजुन काही घडले नसले तरी काही साम्यस्थळे रेड फ्लॅग उंचावायला योग्य वाटतात. तसेही भारतीय काय अभारतीय काय मध्यमवर्गाला एखाद्या हुकुमशहाचे असलेले आकर्षण जगाला नवे नाहीच म्हणा!

ब्राह्मण समाजाला खरेच 'अँट्रॉसिटी कायद्या'चे संरक्षण द्यावे काय?

Taxonomy upgrade extras: 

आजच्या लोकमतमध्ये प्रसिध्द झालेली बातमी खाली देत आहे. आपणास काय वाटते :

ब्राह्मण समाजालाही 'अँट्रॉसिटी अँक्ट' लागू करा : ब्राह्मण महासंघाची मागणी

ब्राह्मण हा टिंगलीचा विषय झाला आहे

पुणे : ब्राह्मण हा टिंगलीचा विषय झाला आहे. त्यांना पोलीस संरक्षण देण्याऐवजी कायद्यानेच संरक्षण मिळावे यासाठी ब्राह्मणांचा समावेश 'अँट्रॉसिटी अँक्ट'लागू होणार्‍या समुदायांत केला जावा, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

निवडणूक प्रचार - खालावलेली पातळी एक चिंताजनक बाब

Taxonomy upgrade extras: 

निवडणुका जस जशा जवळ येवू लागल्यात देशातील राजकारण बदलू लागले आहे अनेकांना उमेदवारी न मिळाल्यामुळे आपला पक्ष हा कुचकामी तर नेतृत्व हे स्वार्थी वाटू लागलेय. जो तो आपली राजकीय सोय बघू लागलाय एका रात्रीत पक्ष बदल घडू लागलेत व दुसर्या पक्षाकडून त्यांना बक्षिसादाखल उमेदवारीही मिळत आहे. जो कार्यकर्ता पक्षासाठी राबतो त्याच्या एवजी अशा आयाराम गयारामांना राजकारणात चांगलाच भाव येवू लागलाय. अनेक युत्या, महायुत्य,, आघाड्या होवू लागल्यात .जो तो पक्ष आपण काहीही करून सत्तेवर कसे येवू ह्याचा प्रयत्न करू लागलाय.

भारतीय राजकारण व लोकसभा निवडणूका - २०१४ (भाग ३)

Taxonomy upgrade extras: 

सदर धागा तत्कालीन राजकीय चर्चा, मते व अन्य स्वरूपाचे लेखन करण्यासाठी काढत आहे.
विदा/संदर्भ देऊन केलेले दीर्घ-विश्लेषणात्मक लेखन सोडल्यास सदर विषयाशी संबंधीत सर्व लेखन या धाग्यावर करावे अशी विनंती करतो. या विषयाशी समांतर लेखन नव्या धाग्यात काढल्यास ते लेखन या धाग्यावर हलवण्यात येईल याची नोंद घ्यावी! कोणते लेखन या धाग्यात हलवायचे याचा निर्णय संपादकांचा असेल.

भाग: |

============

निवडणुकीच्या रिंगणात उतरताना: गप्पा ’आप’च्या उमेदवाराशी - २

Taxonomy upgrade extras: 

ठाण्यातले 'आप'चे उमेदवार संजीव साने यांच्याशी मारलेल्या गप्पा. ठाण्यातल्या प्रश्नांबाबत आणि 'आप'च्या पुढच्या प्रवासाबाबत...

ऐसी अक्षरे: आता तुम्हांला ठाण्याबद्दल काही प्रश्न विचारायचे आहेत. ठाण्यातल्या कुठल्या समस्यांकडे तुम्ही लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आहे? ठाणे मतदारसंघ म्हणून बराच मोठा आहे आणि समूहही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत.

हर हर मोदी घर घर मोदी

Taxonomy upgrade extras: 

हर हर मोदी..घर घर मोदी

भारतीय राजकारण व लोकसभा निवडणूका - २०१४ (भाग २)

Taxonomy upgrade extras: 

सदर धागा तत्कालीन राजकीय चर्चा, मते व अन्य स्वरूपाचे लेखन करण्यासाठी काढत आहे.
विदा/संदर्भ देऊन केलेले दीर्घ-विश्लेषणात्मक लेखन सोडल्यास सदर विषयाशी संबंधीत सर्व लेखन या धाग्यावर करावे अशी विनंती करतो.

या विषयाशी समांतर लेखन नव्या धाग्यात काढल्यास ते लेखन या धाग्यावर हलवण्यात येईल याची नोंद घ्यावी!
कोणते लेखन या धाग्यात हलवायचे याचा निर्णय संपादकांचा असेल.

भाग १

============

लांगूल चालनाची हद्द!

आधी घोषित केल्याप्रमाणे असे अल्पाक्षरी राजकीय धागा इथे हलवला आहे.

Taxonomy upgrade extras: 

पाने

Subscribe to RSS - राजकीय