भाजीमंडई

मला लहानपणी फार मजा वाटायची. आमच्याकडं परगावचे कोणीही पाहुणे आले की इथून जाताना मंडईतून भाज्या घेऊन जात. परगावचे म्हणजे अगदी मुंबईपुण्यातले नातेवाईकसुद्धा. तोपर्यंत मी काही मुंबईपुण्यातलं भाजीमार्केट बघितलं नव्हतं. कोकणातून नातेवाईक यायचे ते पण न्यायचेच. पण तिथं खरंच मोजक्याच भाज्या मिळतात हे मी स्वतः बघितलेलं त्यामुळं त्याची गंमत वाटत नव्हती.

किंचित मोठं झाल्यावर पुण्याचं भाजी मार्केट बघितलं. म्हण्टलं इथं तर सगळ्या भाज्या दिसतात की! मग कोल्हापूरातनं ओझी का नेतात ही येडी लोकं? पण असं डायरेक्ट विचारलं नव्हतं म्हणा. मात्र मग पुण्यात वांग्याची भाजी खाल्ल्यावर लक्षात आलं की का आमच्या इकडची वांगी एवढी नावाजली जातात. आमचे कुठलेपण नातेवाईक असूदेत, फलटण,सातारा, पुणे, मुंबई, कोकण आणि कुठलेपण ते कोल्हापूरातून जाताना न चुकता दीडदोन कीलो पांढरी बारकी वांगी घेऊन जायचे. कृष्णेकाठची वांगी. सांगलीतून खरंतर जयसिंगपूर वाडी औदुंबरातून वगैरे पहाटेच्या एस्टी/टेम्पो/वडापनी टीकंच्या टीकं भरून शेतकरी कोल्हापूरातल्या मंडईत कृष्णाकाठची वांगी विकायला यायची. कोल्हापूरात सांगलीमिरजेपेक्षा भाजीमार्केट मोठं म्हणून येत असणार असा माझा अंदाज आहे. मग पाहुणे आले की त्यांच्याबरोबर मंडई व्हिजिट असायची. आणि इतर काही घेऊदे न घेऊदे ही कृष्णाकाठची पांढरीवांगी ती पण निवडून निवडून बारकी घेऊनच जाणार सगळे हे ठरलेलंच.

अख्ख्या पुण्यात मला वाळकं कुठंच दिसली नव्हती, सगळीकडं त्या फिकट हिरव्या रंगाच्या गुळगुळीत काकड्या. मी तोपर्यंत त्या कधीच खाल्ल्या नव्हत्या. फक्त ओटी भरताना असतात तसल्या या काकड्या वाटतं असं वाटलेलं. पण त्या अजूनच वेगळ्या हे नंतर समजलं. तर या खिऱ्या काकड्या. मला आवडल्या त्या. कोल्हापूरात त्या दिसायच्या पण कधी आम्ही घरी आणायचो नाही, वाळकंच आणायचो. हिरवीगार, कोवळी कोवळी, नुसतं एक चावा घेतला की गारच वाटायला पाहीजे अशी वाळकं असायची. मला तेव्हा वाटायचं या खिऱ्या काकड्या 'आपल्याकडं' खात नसतात. म्हणून पुण्याला जेव्हा पहिल्यांदा खाल्ल्या तेव्हा मनात कुठंतरी होतं आता घरी गेल्यावर बहुतेक ओरडा पडणार. पण असं काहीच झालं नाही. इथं ती चव विशेष आवडायची नाही आणि त्याहीपेक्षा वाळकं सहजच बारा महीने मिळायची म्हणून तीच घेतली जायची. पुण्यामुंबईचे लोकं इकडून दोनदोन किलो वाळकं का घेऊन जायचे ते मग समजलं.

एरवी दादा न्यायचा नाही पण लग्न झाल्यानंतर तो कधी सुट्टीला कोल्हापूरला आला की जाताना पालेभाज्यासुद्धा घेऊन जायचा. वहिनी म्हणायची इथल्या भाज्या खाल्ल्यावर तिथल्यातर विकतपण घ्याव्या वाटत नाही. तोपर्यंत मुंबईत जगातल्या सगळ्या बेस्ट गोष्टी आधी मिळतात हे माहिती होतं, मग तरी भाज्या मिळू नयेत चांगल्या? असा प्रश्न पडलेला असायचा. मग मुंबईला गेल्यावर त्याही प्रश्नाचं निरसन झालंच. मुंबईत दादर, माहीम इ. भागात उत्तम भाज्या मिळतात असं जाणवलं. त्या मानानी कांदिवली, बोरीवली सारख्या ठीकाणी व्हरायटी भरपूर असली भाज्यांची तरी ती जी एक चव असते भाज्यांना ती नसते, जो एक प्रकारचा ताजेपणा असतो तो नसतो असं लक्षात आलं. असं कशामुळं होत असेल? पाणी मारून मारून भाज्यांना टवटवीत ठेवण्याचा प्रकार तर सगळेच बघतात. तसं असेल एखादवेळेस. हे अर्थात काही एक वर्षांपुर्वी असं होतं. आता सगळीकडे मिळत असतील असं वाटतं.

आमच्याइकडं लाल कांदाच मिळणार, तसा तो सगळीकडंच लाल कांदा मिळतो पण कोकणात काही ठीकाणी विशेषतः अलिबागला पांढरा कांदा मिळणार. क्वचित कधीतरी तो आमच्या मंडईत मिळायचा पण. त्या कांद्याच्या पांढऱ्याशुभ्र सुबक वेण्या बघूनच तो घरी घेऊन यावा असं वाटायचं. मग त्या आणून दाराच्या हॅण्डलला किंवा कायम बंद असणाऱ्या दाराच्या कोयंड्याला सुतळीनं अडकवून स्वयंपाकघराची शोभा वाढवायची. पण एरवी खायला मात्र लाल कांदाच. मोठा आणि बारका असे दोन्ही प्रकार घेतले जातात इथं. मोठा चिरायला वगैरे. आणि बारका मुठीनं फोडून डाळ भाकरीसोबत खायला. तर हा बारका लालकांदासुद्धा आमच्याइथनं लोकं न्यायची परगावला. मग मात्र मला जरा उगंच हे काय करतात असं वाटायचं जे अजूनही वाटतं. कारण कांदा आणि बटाटा ह्या विश्वभरात पसरलेल्या भाज्या आहेत. जगाच्या पाठीवर तुम्हाला लालकांदा नी बटाटे कुठंपण मिळतील. (बहुतेक) पण न्यायचे/नेतात बाबा परगावचे पाहुणे.

लसणीची पात खातात हेच मुळात कितीतरी लोकांना माहिती नव्हतं पुर्वी. त्याची अप्रतिम चवीष्ट चटणी करतात. तर ही ताजी पात आमच्या मंडईत मिळायची. (आमच्या घरी आमच्या गावाकडनं यायची ती गोष्ट वेगळी) पुण्याला जाताना आत्या तिच्या स्वतःसाठी आणि तिच्या अनेको मैत्रिणींसाठी लसणीची पात घेऊन जायची. तेव्हा तिथं मिळायची नाही अगदी मोठ्या मंडईतसुद्धा. पण आता उलटं झालंय आता पुण्यात सर्रास लसणीची पात मिळते इथं मात्र क्वचितच दिसते. मग आता आमचे रोल्स एक्सचेंज होतात. आम्ही पुण्याहून येताना पात आणतो मग.

जवारी कणसं इथून घेऊन जायचे मी बाईंसाठी. पुण्यात सगळीकडंच स्वीटकाॅर्न मिळायचे. मक्याचं उप्पीट/उसळ करायला जवारी कणीस पाहीजे, तर ती चव येणार. मग बाईंचा फोन यायचा आम्ही इथून निवडून पारखून कोवळी कोवळी जवारी कणसं घेऊन जायचो. आता इथेसुद्धा जवारी कणसांचं प्रमाण कमी झालंय. मुळात त्याला मार्केट कमी म्हणून शेतकऱ्यांनी अमेरीकन कणसांचं पिक घ्यायला सुरूवात केलीये. अमेरीकन स्वीटकाॅर्नच्या, नंतर उरलेल्या बुरखुंड्यालापण मागणी आहे म्हणतात कडब्यासाठी कारण ते वजनाला जवारीपेक्षा जास्त भरतंय. क्वचित कधीतरी जवारी कणसं दिसली की मग मात्र ती आणल्या शिवाय राहवत नाही

ढोबळी मिरचीत इथं मइतर प्रकारासोबतच, रवीमाठी ढोबळीमिरची मिळते. तशी इतरत्र नाही बघितली. बारकी असते ही मिरची, आणि तिची देठाच्या विरूद्ध असणारी बाजू ताक घुसळायच्या रवीसारखी असते. म्हणून तिला रवीमाठी म्हणतात. ही मिरची इतर ढोबळ्यामिरच्यांपेक्षा तिखट असते. आणि चवीलापण चांगली असते. पण माझं स्वतःच हीची भाजी करताना डोकं फिरतं. कारण तिचा आकार मुळात लहानबाळाच्या मुठीपेक्षाही लहान असतो त्यात सारण भरणे वगैरे किचकट पडतं. पण चवीला मात्र उत्तम असते.

पापडी, श्रावणघेवडा, घेवडा, उसावरल्या शेंगा, वरण्याच्या शेंगा या मिळतात सगळीकडे पण जनता इथून घेऊन जाई विशेषतः उसावरल्या शेंगा, त्या इथं एकदमच कोवळ्या असतात म्हणून असेल. शिवाय इथं सगळ्यांनी मिळून त्या निवडूनही होत असत त्यामुळं घरी जाऊन फक्त फ्रीजात ठेवायचं किंवा फोडणीला टाकायचं काम असे.

इथल्यासारखी बोरं पुण्यात मिळत नाहीत म्हणून इथून जाताना बहीणीकडं आणि दित्तुबाईंकडं बोरं घेऊन जायचो आम्ही. मलाही पुण्यातल्या त्या वास्तव्यात इथल्यासारखी बोरं दिसलीच नव्हती. पण फलटणसाईडला बोरं जास्त चांगली आणि मधुर खाल्लीत मी. त्यामुळं इथलीच बेस्ट असं म्हणणं चुकीचंच.

काळाप्रमाणं इथे सुद्धा बदलतायेत. इथल्या मंडईत आधूनमधून रंगीत ढोबळी मिरची, ब्रोकोली, लेट्युसचे निरनिराळे प्रकार, मश्रुमचे निरनिराळे प्रकार, ब्रुसेल्स स्प्राऊट्स, विदेशी फळं वगैरेसारखा एक्झाॅटीक मालसुद्धा विकणारे विक्रेते असतात.

काही भाज्याफळं मात्र इथं मिळत नाहीत. जसं की लाल मुळा, तो इतका चवीष्ट असतोय की काय नव्हेच पण तो इथल्या मंडईत मिळणारच नाही. तुती इथल्या फळमार्केटमधे मिळत नाहीत. स्टारफ्रुट, पॅशनफ्रुट आणि कसली बाहेरदेशातली फळं पण मिळतात पण तुती काही मिळत नाहीत. आंबटचुक्याची भाजी पुर्वी इथं फार मिळायची. पण आता ती मिळत नाही. दिसतंच नाही. पुण्यात सर्रास मिळते. मुंबईतही मिळते.
बाकी भाज्या जसं की कोबी, फुलावर, गाजर, मुळा, कापाची वांगी, भरीताची वांगी, भेंडी, दोडकी वगैरे. सगळीकडंच मला सारख्या मिळत आल्यात.

मंडईत फिरताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोर बघून चालत असतानाच पायाखाली कुठला पाला येणार नाही याकडे लक्ष देणं. दुसरी गोष्ट म्हणजे समोर बघून चालत असताना ओळखीचं कोणी दिसलं आणि आपल्याला वेळ नसेल तर पटकन् दिशा बदलून "आणि मग ही पात कशी दिली हो?" असं विचारायचं सुचणं. कुठल्याही मंडईतल्या भाजीवाल्यांकडून त्यांच्या समोरच्या दुरडीत, टोपलीत केलेली भाज्यांची रेखीव मांडणी ही शिकण्यासाखी गोष्ट आहे. आणि हे युनिवर्सल आहे. कुठल्याही गावात जा वांगी, भेंडी, दोडकी, काकड्या वगैरे काय सुंदर रचलेलं असतं! तसं एकदोनदा घरी करण्याचा प्रयत्न केला होता खरा पण ते काही जमलं नाही. दुसरं म्हणजे इथले मंडईतले विक्रेते उर्मट नाहीत, जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेऊन ते आपला माल विकत असतात. दिवस सरत जाईल तसं उरलेला माल निम्म्याहून कमी किंमतीला विकतात. काहीजणं गरीबात/भिकाऱ्यात उरलेल्या भाज्या वाटून टाकतात. हे सगळेच सरसकट शेतकरी नसतात. सकाळी लिलाव विकून ते (शेतकरी) आपल्या कामाला जातात. मग दिवसभर हे भाजीविक्रेते निरनिराळ्या स्वभावाच्या अनेक लोकांना सामोरे जात असतात. तिथंच जेवण, तिथंच चहा, तिथंच एखादी पाच मिन्टाची डुलकी काढतात. उन्हं असूदे नाहीतरी ओतणारा पाऊस असूदे. ह्यांचं काम थांबत नसतं. ही पण एक शिकण्यासारखीच गोष्ट आहे की!

एवढंच काय ते!!

~अवंती

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

म‌स्त‌ लिहिलंय‌, बाकी ते अंबाडी तांद‌ळी पोक‌ळा माठ‌ चाक‌व‌तादींचा उल्लेख राहिला वाट्टे. कोल्हापुरातील मंड‌ईतील ख‌रेदीचा माझा अनुभ‌व बाकी तोक‌डाच‍- एक‌दाच‌ ख‌रेदी केलेली. न‌व‌वी-द‌हावीत असेन तेव्हा. आतेभावाब‌रोब‌र जाऊन दोन जुड्या पाल‌क घेऊन आलो तेव्हा साफ क‌र‌ताना आत्याच्या ल‌क्षात आले की त्या जुडीत भुंगा ल‌प‌लेला होता. ROFL क‌ळाय‌चं बंद झालेलं तेव्हा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान आहे ललित. कृष्णा आता वाहात नाही आणि काठाची वांगी इतर वांग्यांसारखीच आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही दुर्दैवी लोकांना ती गुळगुळीत खिरा काकडी म्हणजेच काकडी असं वाटतं. वाळुक न खाल्लेली काही माणसं ओळखीत आहेत पुण्यातली.
अजून एक म्हणजे गाजर.
दोडका जर अर्ध्या फुटापेक्षा मोठा असेल तर माझी आजी तो सरळ म्हशीला घालते. पुण्यात लहान कोवळी दोडकी मिळणं महामुष्कील. बंगलोरला तर लहान कोवळी दोडकी खाणे म्हणजे पाप आहे की काय असं वाटतं.
काशी बोरं आणि देशी बोरं असे दोन बोरांचे प्रकार. हे सगळीकडे मिळतात. सांगली-मिरज-कोल्हापूर इकडे भाज्या खरंच मस्त ताज्या मिळतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोडका जर अर्ध्या फुटापेक्षा मोठा असेल तर माझी आजी तो सरळ म्हशीला घालते.

हाहाहा खूप छान्. निब‌र‌ खाव‌व‌त नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्र‌त्येक गांवी, भाज्या वेग‌ळ्या च‌वीच्या मिळ‌तात‌, असा अनुभ‌व‌ आहे. मुंब‌ईत‌ र‌हात‌ अस‌ताना, कोबी, फ्लॉव‌र‌ या भाज्यांना, शिज‌व‌ल्याव‌र‌, एक प्र‌कार‌चा उग्र वास‌ जाण‌व‌त‌ असे. त्यांत‌ कोबीच्या भाजीला त‌र‌, घासाच्या शेव‌टी, एक‌ क‌ड‌व‌ट‌ च‌व‌ जिभेव‌र‌ जाण‌वाय‌ची. अर्थात‌च‌, ती फ‌क्त‌ माझ्यासार‌ख्या ख‌व‌य्यांनाच‌ जाण‌वाय‌ची. आता पुण्याला आल्याव‌र‌ फ‌र‌क‌ जाण‌व‌तो. कोबीची भाजी नुस‌तीच‌ खाऊ श‌क‌तो, पाहिजे तेव‌ढी. फ्लॉव‌र‌चा उग्र‌प‌णा तेव‌ढा जाण‌व‌त‌ नाही. वांगी क‌धीही क‌डु निघ‌त‌ नाहीत‌. आम्ही एव‌ढ्याव‌र‌च‌ खूष‌! म‌ग कोल्हापूर‌ला गेलो त‌र‌ याहून‌ चांग‌ल्या च‌वीच्या भाज्या मिळ‌तील‌, हे क‌ळ‌ले.
ब‌डोद्याला, खंडेराव‌ मार्केट‌म‌धे फार‌च‌ छान भाज्या मिळाय‌च्या. वांगी त‌र‌ फार‌च‌ चांग‌ल्या च‌वीची. पुढे, कामानिमित्त‌ कंप‌नीच्या गेस्ट‌ हाऊस‌व‌र गेल्याव‌र, त्या राज‌स्थानी म‌हाराज‌च्या हाताला त‌र‌ अशी काही च‌व‌ होती की साधाच‌ स्व‌यंपाक‌ प‌क्वान्नासार‌खा वाटाय‌चा. आम‌टी त‌र‌ किती वाट्या प्याय‌चो, त्याची ग‌ण‌नाच‌ नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक‌च‌ अनंत‌
बाकी सारे यात्री

काही गोष्टी आठवल्या. ज‌मेल त‌शा लिहितो.

मलाही अगोदर कळायचं नाही की हे लोक दोन-दोन किलो वांगी घेऊन का जातायत त्यांच्या गावी. एकदा मावशीच्या घरी फलटणला गेलो असताना तिने बाकी काही नको फक्त वांगी आणि खवा घेऊन ये (मिरजेच्या विटा डेअरीत उत्तम खवा मिळायचा) असं सांगितल्याचं आठवतंय. ती घेऊन गेलो तर तिच्या मिस्टरांनी खुश होत "वाह कृष्णाकाठची वांगी!!" असं म्हणल्याचं आठवतंय. त्यावेळी आम्हाला त्याच नावाचा मराठीत एक धडा होता ते झटकन मला तिथे क्लिक झालं.पुस्तकात वाचलेल्या गोष्टींचं ते पाहिलं प्रात्यक्षिक वगैरे असावं.
त्यात पण सगळ्यात बेस्ट वांगी म्हणजे नरसोबाच्या वाडीची. हिरवट पांढरी. त्या वांग्याची भरली भाजी काय होते म्हणून सांगू. माणूस वाडीला जाणार असेल तर त्याला बासुंदी,कवठाची बर्फी आणि किलोभर वांगी घेऊन येण्याची ऑर्डर ह‌मखास मिळते आजही घरच्यांकडून.
इथे मुंबईतली जांभळी वांगी अजिबात आवडत नाहीत त्यामुळे आजही घरून जाताना वांगी घेऊन जाणं होतच.

अख्ख्या पुण्यात मला वाळकं कुठंच दिसली नव्हती, सगळीकडं त्या फिकट हिरव्या रंगाच्या गुळगुळीत काकड्या. मी तोपर्यंत त्या कधीच खाल्ल्या नव्हत्या. फक्त ओटी भरताना असतात तसल्या या काकड्या वाटतं असं वाटलेलं. पण त्या अजूनच वेगळ्या हे नंतर समजलं.

माझी आज्जी अस्सल कोल्हापुरी. आम्ही सरसकट सगळ्याच प्रकारांना काकडी म्हणायचो. पण ती मात्र वाळकं काकडी असे दोन शब्द वापरायची. स्वैपाक करताना वाळकाची कोशिंबीर करू काय असं विचारायची. वाळकं आणि काकडी कशी ओळखतात ते मला समजायचं नाही. आज किती दिवसांनी वाळकं हा शब्द ऐकला.

कोल्हापुरात मिळणारी अजून एक भारी पालेभाजी म्हणजे पोकळा जो आमच्या बाबांना अतिशय आवडायचा आणि आजी मिरजेला येताना न चुकता दोन पोकळ्याच्या पेंड्या घेऊन यायची. बाबांनी प्रचंड शोधूनही त्यांना शेवटपर्यंत मिरजेत-सांगलीत पोकळा मिळाला नाही कधी. अजून पण मिळतो की नाही माहित नाही.
चवीला काय लागायची ती भाजी. कितीही मोठी पेंडी असली तरी भाजी करताना इतकी आळायची की जेमतेम दोघांना पुरेल इतकीच भाजी बनायची. पण अफाट चव होती. खूप वर्षं झाली खाल्लाच नाही पोकळा.

केवळ पन्नास किलोमीटर अंतर असूनही सांगली आणि कोल्हापूरच्या ठेवणीतल्या शब्दांत कमालीचं अंतर आहे. उदा. आमच्या इथे हरभरा डाळ वाटून केलेल्या तिखट पदार्थाला "वाटली डाळ" म्हणतात तर कोल्हापुरात त्याच पदार्थाला "मोकळं तिखट" म्हणतात. हे एक उदाहरण झालं बाकी अनेक असतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स‌ह‌म‌त‌. पोक‌ळ्याब‌द्द‌ल क्व‌चित क‌धीत‌री ऐक‌लं प‌ण भाजी क‌धीच नै खाल्ली. सांग‌ली-मिर‌जेत पोक‌ळा मिळ‌त नाही हे ख‌रेच‌.

वाळुक हा श‌ब्द आजी-आजोबा वाप‌र‌त‌. काक‌डी अन वाळूक यांत काय फ‌र‌क आहे ते म‌ला अजून‌ही माहिती नाही. आईबाबांनी मात्र क‌धी हा श‌ब्द वाप‌रल्याचे आठ‌व‌त‌ नाही. 'आळ‌णे' हाही खास तिक‌ड‌चाच श‌ब्द‌.

विटा डेअरीतील ख‌वा अजून‌ही उत्त‌म आहे.

वाट‌ली डाळ हा एक अतिप्रिय प‌दार्थ‌. त्याला कोल्हापुरात मोक‌ळं तिख‌ट म्ह‌ण‌तात हे माहिती न‌व्ह‌ते. र‌च्याक‌ने ह‌ळ‌दीकुंक‌वातली ती क‌स‌लीशी कोशिंबीर अस‌ते तीही फार आव‌ड‌ते. ल‌हान‌प‌णी आईसोब‌त क‌धी ह‌ळ‌दीकुंक‌वात जात असे तेव्हाच ती केली जाई, अद‌र‌वाईज क‌धी केल्याचे आठ‌व‌त‌ नाही.

काक‌डीब‌द्द‌ल अजूनेक म्ह‌. आम‌चे उत्त‌र‌भार‌तीय मित्र‌ही क‌क‌डी आणि खीरा असे दोन श‌ब्द वाप‌र‌तात‌. प‌ण त्यांचे म्यापिंग काही केल्या ल‌क्षात येत नाही.

माईन‌मुळा हा प्र‌कार‌ही ब‌हुधा म‌ला वाट‌ते विशेष‌क‌रून आप‌ल्या भागात‌लाच असावा. धार‌वाड भागात होत नाही हे न‌क्की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पोकळा खाऊन बघ बॅटमॅन, त्याच्याच जातीतली तांदळी/तादूळसा/तांदूळजाची भाजी. नुसतीच परतून भाकरीबरोबर खायलाफार मजा येते. इथं पोकळा मुबलक मिळतो.

वाळकं म्हणजे हिरव्या रंगाची बारकी (कधी सरळ, कधी वाकडी) असणारी काकडी. ती त्या खिऱ्या काकडीसारखी गब्दुल असत नाही आणि गुळगुळीतपण असत नाही. तिला अगदी बारीक लव असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

तांद‌ळी खाल्ल्याचे अंधुक आठ‌व‌ते. एके व‌र्षी पाऊस खूप झालेला तेव्हा बागेत नेह‌मीच्या झाडांखेरीज हेsssss नुस्त्या पालेभाज्या उग‌व‌ल्या होत्या त्यात तांद‌ळीही होती.

वाळ‌कं ब‌हुधा ब‌घित‌लेली आहेत प‌ण खात्री नाही.

कोल्हापुरात जेव्हा येईन तेव्हा खाईन‌च‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मिरजेच्या बसाप्पाचा पेढा जगात भारी असतोय.
होय मोकळ तिखट म्हणजे वाटली डाळ, काळा भात म्हणजे मसाले भात. इथं जरा निराळे शब्द असतात खरं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

ब‌साप्पाचा पेढा भारी हे ख‌रेच‌, प‌ण हाडाचा मिर‌ज‌क‌र असून‌ही माझे म‌त वाडीच्या पेढ्याला. त्याची स‌र क‌शालाच येऊ श‌क‌त नाही. ताजा ताजा ख‌वा क‌र‌तात, डोळ्यास‌मोर‌च दूध आट‌व‌तात‌. त्याची च‌व ज‌गात‌ भारी अस‌ते. वाडीला जेवाय‌चं आणि खिद्रापूर‌चं देऊळ पाहून मिर‌जेला प‌र‌ताय‌चं हा प्रोग्र्याम स्ट्याण्ड‌र्ड‌ आहे. तेव‌ढा तिथ‌प‌र्यंत‌चा र‌स्ता नीट ब‌न‌वा म्ह‌णावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाडीत करदंट मिळतो तो पण भारी असतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स‌ह‌म‌त‌! अन बासुंदी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाडीचा पेढा आणि बासुंदी लै भारी. प‌ण ती तिथेछ खायला म‌ज्जा येते. वाडीच्या म‌ंदिराच्या र‌स्त्याला लागून अस‌लेल्या ग‌ल्लीत १-२ म‌स्त दुकानं आहेत. स‌काळी-स‌काळी गेलं त‌र आप‌ल्यास‌मोर ख‌वाम‌शीन‌म‌ध्ये दूध आट‌त अस‌तं. फ‌क्त तेव्हा मिळ‌णारी बासुंदी गार न‌स‌ते. १०-११च्या सुमाराला गेलात त‌र थंड‌गार बासुंदी मिळ‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो. बादवे मध्यंतरी मिरजेत सुभाषनगर रोडला "जय हिंद भोजनालय " नावाची नवीन मांसाहारी खाण सापडली. जबरदस्त मटण. अगोदर कधीच ऐकलं नव्हतं या जागेबद्दल पण एकंदरीत गर्दी पाहता आजूबाजूच्या भागात प्रचंड फेमस अस‌ली प‌हिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असं? ल‌क्षात ठेवीन‌. तूर्त म‌ला सांग‌लीत सिव्हिल हॉस्पिट‌ल‌ज‌व‌ळ‌चे अनुराधा हे एक उत्त‌म म‌ट‌न‌ थाळीवाले हाटेल माहिती आहे. मिर‌जेत‌ला रेहेम‌तुल्ला म्ह‌. नुस्ते नाव‌च मोठे, ल‌क्ष‌ण इत‌के कै खास नै. प‌वार बंग‌ल्याज‌व‌ळ प‌टेल म्ह‌णून न‌वीन हाटेल सुरू झालेय तेही ब‌रे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म‌ट‌नाच्या हाटेला ला हे नाव म्ह‌ण‌जे अनुराधा नावाचा गैरवाप‌र आहे. ठोक‌ले पाहिजे माल‌काला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब‌रोब‌रे, अनुराव‌ असे नाव ठेवाय‌ला सांगित‌ले पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी4
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजून म्हणजे बसाप्पाकडचा खाजा झालंच तर वाडीला मिळणारी कवठ बर्फी विसरायलाय तुम्ही .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

क‌व‌ठ ब‌र्फी नाय आव‌ड‌त‌ स‌ब‌ब क‌धी फार‌शी खाल्लीच नाही. खाजा बाकी उत्त‌म‌च‌!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

करदंट गोकाकचा खायचा बघा, एक नंबर असतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

सोमणांकडचं जेवण जबरी आवडतंय, त्यांच्याकडं मिरचीचा एक ठेचा असतोय तो मस्त असतो एकदम. वाडीचा गोडापेढा मला आवडायचा लहानपणी खूप. कवठाची बर्फी आवडते पण त्यानं तोंड येतं रंगामुळं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

बरोबर काळा भात. अजून एक, चहासोबत जो कडकडीत बटर आपण खातो त्याला वर्की म्हणतात बहुतेक ते पण फक्त कोल्हापुरातच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शाहुपुरीतल्या खेमराजबद्दल तुम्हाला काय वाटतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

खेमराजबेकरीचा ताजा गरम ब्रेड, खारी, वरक्या, क्रीमरोल आणि मावाकेक मस्त असतोय. बाकी त्याच्याबद्दल काय वाटायचं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

हे क‌र‌द‌ंट‌ काय‌ प्र‌क‌र‌ण आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
Why should we borrow words from others when we can make our own?

https://en.wikipedia.org/wiki/Karadantu

डिंक डेस‌र्ट‌. क‌र्नाट‌क पेश्श‌ल‌, बॉर्ड‌र‌क‌डं फेम‌स‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार‌! भारी प्र‌कार‌ दिस‌तोय‌!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
Why should we borrow words from others when we can make our own?

त्या विकिपिडियाच्या फोटोव‌र जाउ न‌कोस, अॅक्चुअलि लै भारि दिस‌तो.
म‌स्त चौकोनि ठोक‌ळे, डिंक, सुकामेवा ठासुन भ‌र‌लेले. एक‌च लंब‌र त‌ब्येत ब‌न‌वाय‌ला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अग‌दी अग‌दी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत. प्रत्यक्षात दिसताना त्या फोटोपेक्षा लैच भारी दिसतो. म्हणजे दिसताक्षणीच खायची इच्छा व्हायला लागते. आणि खाताना त्यात मध्ये मध्ये डिंक लागला की तोंडातच त्यातलं किसलेलं खोबरं डिंकात मिक्स करून चावायला तर लै मजा येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डिंकाच्या लाड‌वाचा वित‌ळ‌वून‌, काजूब‌दाम‌ व‌गैरे घालून केलेला काही प्र‌कार‌ स‌म‌जावा काय‌? 'डिंकाचा ह‌ल‌वा'?

प्र‌कार‌ रोच‌क‌ दिस‌तोय‌ त‌र‌ ख‌रा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोंदपाक/गोंदकाहलवा वेगळं असतंय. करदंटाची रेसिपी आईला, काकूला माहिताय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

आबा , भर पुण्यात नवीन पुणे तिसात ( म्हणजे कोथरूड , कर्वेनगर , सिंहगड रोड ईस्ट * )मध्ये सगळीकडे जोशी स्वीट्स मध्ये मिळतंय . ( हे जोशी स्वीट्स वाले जोशी /परचुरे का जे कोण ते हुबळी का धारवाड चे आहेत . एकमेकांशी कानडीतच बोलतात )
* म्हणजे सिंहगड रोड विठ्ठलवाडी पर्यंत . धायरी ते किरकिटवाडी पुणे तिसात नाही येत .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अग‌दीच‌ मोठे आभार‌! हे अग‌दीच‌ घ‌राप‌र्यंत‌ पोच‌लं!

(सिंह‌ग‌ड‌ रोडाव‌र‌च्या त्या जोशी स्वीट्स‌च्या शेजारी शेगाव‌ क‌चोरी नावाच‌ं एक‌ भ‌याण दुकान‌ झालं आहे. चुकून‌ही त्यात‌ जाऊ न‌ये. मूळ शेगाव‌ची क‌चोरी क‌शी अस‌ते माहीत‌ नै, प‌ण ही भीष‌ण‌ आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
Why should we borrow words from others when we can make our own?

मूळ शेगाव‌ क‌चोरीही त‌शी सुमार‌च अस‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख‌ आव‌ड‌ला. मी देखील ठाण्यात गाव‌देवी मार्केट‌म‌धे एका ठिकाणाहून भाज्या घेतो. विक्रेता म्ह‌ण‌तो की त्या भाज्या पुण्याप‌लीक‌डून म्ह‌ण‌जे सातारा व‌गैरे भागातून येतात‌. म‌हाग‌ अस‌तात प‌ण‌ च‌व‌ उत्त‌म‌ अस‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त. कपिलतीर्थ मंडई भुलभुलैय्या आहे एक .. कुठून कुठे निघायचो कळायचंच नाही.
बाकी भाजीविक्रेत्यांप्रमाणेच इथले रिक्षावाले पण उर्मट नाहीत. विशेषतः पुण्याहून आल्यावर हा फरक लगेच जाणवतो.

अवांतर : अवंतीचं कांदेपोहे प्रकरण पण आवडलेलं . त्यावर लिहायचं होतं पण आळस ...
आता तर आमच्या कोल्हापूरची आहे म्हणून अजूनच आवडली अवंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

खूप्प‌च‌ छान लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

द‌रव‌र्षी सुट्टीत‌ नाशिक‌ला जाताना, घार‌गावचा पेढा म‌ला व‌डिल‌ घेऊन‌ द्याय‌चे. अजुन‌ही तो म‌ला फार‌ आव‌ड‌तो. प‌ण आता त‌शी च‌व‌ राहीली नाही. ग‌ड‌द‌ त‌पकीरी र‌ंगाचा मोठा च‌प‌टा गोल‌ आकाराचा पेढा एस‌ टी च्या खिड‌कीतून‌ विक‌त‌ घ्याय‌चा. साध्या व‌र्त‌मान‌ प‌त्रात‌ गुंडाळून‌ तो पेढा माझ्या हातात‌ यायचा. काय‌ आन‌ंद‌ व्हाय‌चा तेव्हा.
त‌स‌च‌ न‌ग‌र‌ माझ‌ आजोळ‌ तिथून‌ नेह‌मी बोर‌ पुण्याला आण‌ली जाय‌ची. आधी वाटायच‌ की पुण्यात‌ प‌ण‌ मिळ‌तात‌ की. जेव्हा ती बोर‌ खाल्ली त्या वेळी च‌वीत‌ला फ‌र‌क‌ क‌ळाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माण‌साला आप‌ल्या मूल‌स्थानाच्या च‌वीची जास्त आव‌ड‌ अस‌ते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

धागा व‌ प्र‌तिक्रिया फार‌ आव‌ड‌ल्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0