Skip to main content

सरणार कधी रण..?


सरणार कधी रण.... (येथे ऐका)

Baji

बाजीप्रभू उवाच - हे देवा, हे परमेश्वरा, कधी रे सरणार हे युद्ध..? अजून माझ्या शिरावर किती घाव बसणार आहेत ते तरी सांग एकदा..!

Partial Existence

Fantasy land मधे जेव्हा भुकंप होतात...
तेव्हा तोकडया झग्यातली एक किरीस्ताव म्हातारी,
माझ्या पायथ्याशी आशाळभुतपणे येऊन उभी रहाते!
माझ्यातलं काहीतरी काढुन नेते
काळ्या पिशवीत grams मधे ....
मी स्वताशीच हसतो
आणि शिव्या वगळुन sonnets गात रहातो
Macbeth च्या आवाजात....
जुन्या डायरीच्या आत दडवलेलं
गुलाबी symbolic असत्य
चोरट्या नजरेने उराशी कवटाळुन
मी fantasy land ची वाट धरतो...
वेशीपाशी दिसते अवजड विटांची भिंत!
त्यावर लटकलेली असंख्य घड्याळं.....
काळाला नागवु पहाणारी,
त्यांची स्थितप्रद्न्य निर्ल्लज्ज भुतावळ
वेड्या आशेने मी घेतॊही अंगावर ....
आधारासाठी चाचपडताना हाती लागतो,

"द जर्नी होम - ऑटोबायोग्राफी ऑफ अ‍ॅन अमेरिकन स्वामी"

तसं मी फारसं इंग्रजी वाचन करत नाही. वाचनाचा वेग कमी पडतो हे कदाचित कारण असेल पण मुद्दाम इंग्लिश साहित्याचं वाचन होत नाही हेच खरं. असं असूनही 'द जर्नी होम' या नावाचं एक इंग्लिश पुस्तक माझ्या हाती पडलं आणि माझ्या उपरोल्लेखित वैशिष्ठ्याला न जागता मी या पुस्तकाचा अगदी फडशा पाडला.

मुखपृष्ठ "मुखपृष्ठ"

अरे थिएटर थिएटर

कार्यालयीन कामाची काही पूर्तता आणि तत्संबंधीचे गुप्तता अहवाल देण्यासाठी कलेक्टर ऑफिसकडे चाललो होतो. कोल्हापुरातील रस्त्यांची दुर्दशा या विषयावर एका प्रबंधाइतपत लिखाण होऊ शकेल याची खात्री असल्याने ऑफिसची गाडी न घेता स्वतःच्याच होंडा पॅशनवरून त्या गर्दीच्या रस्त्याने अगदी स्नेल स्पीड म्हणावे अशारितीने जात होतो. मागे बसलेल्या सहकार्‍याकडे अहवाल-दप्तर होते. संभाजी पूल ओलांडल्यावर पुढे एस.टी.स्टॅण्डच्या दिशेने जाणारी के.एम.टी.ची बस होती. तिच्यामागूनच पॅशन चालली होती. वाटेत पुढचा बस स्टॉप होत.

'दारु पिण्या'तला भ्रष्टाचार

सामना'च्या 2011 दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख. अंकात जागेच्या उपलब्धतेनुसार काही मजकूर गाळला गेला आहे. येथे दिलेला लेख पूर्ण आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वाजंत्री वाजतात, वाड्यात काय झालं?

राम राम मंडळी,

मासिक धर्म सुरू होणं ही कुठल्याही मुलीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना. निसर्गाने तिला बहाल केलेलं ते सन्माननीय स्त्रीत्व. आजच्या काळात मासिक धर्म सुरू होऊन जेव्हा एखादी मुलगी वयात येते, ते तिच्या आईशिवाय कुणालाच फारसं कळत नाही. फार तर तिच्या वडिलांना किंवा मोठ्या ताईला हे कळणं शक्य आहे. या व्यतिरिक्त ती घटना फारशी कुणाला कळावी किंवा तिचा गाजावाजा व्हावा असं त्यात विशेष काही नाही. ती एक नैर्सर्गिक गोष्ट आहे.

मी कोण?

का कधी केव्हा कुठे कशाला कोणासाठी...
सगळ्या प्रश्नांना तू पुरून उरलास

भव्यताः भव्यतेपेक्षा मोठी. विस्तारणारत जाणारी. अथांग
झपाटून टाकणा-या चेटुकासारखी.

म्हटलं तर तू नाहीस (तुला काहीच कळत नाही!)
आणि सगळीकडे पसरलेला

तुला मन नाही पण
तू खुबीने इन्स्टॉल केलंस माझ्यात
व लावून दिलीस किती लटांबरं मागे...

कोळ्याच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या माशीसारखा
मी अडकतोय सतत..
लक्षावधी पायांचा किडा मी.
अर्धे पाय जगण्यासाठी उत्सुक
अर्धे मरणाने घाबरलेले.

तू मात्र दगड.
कोणाशीही संबंध नसलेला. निश्चल.

आकाशगंगेला आलेल्या फोडाने
तुला दुखत नाही.
की तार्‍याला मुलगा झाल्यावर

चंद्राचे फोटो

खाली चंद्राचा टेलिस्कोप वापरून काढलेला फोटो देत आहे. फोटो काढण्याच्या प्रक्रियेची माहिती द्यायची इच्छा आहे, पण ते फारच वेळखाऊ काम असल्याने ते पुन्हा केव्हातरी.







वरील फोटो चंद्राच्या २२० फ्रेम्स एकत्र करून बनवला आहे.
मोठ्या आकारतला फोटो येथे पहा.


याच तंत्राने काढलेला अजून एक फोटो.

डॉक्टर कापरेकर

"ओ ठाकरे! याला चार मरायच्या गोळ्या द्या"
असं प्रिस्क्रिप्शन खणखणीत आवाजात आपल्या कंपाऊंडरना देणारा डॉक्टर बहुदा कापरेकरांनंतर कोणी होईलसं वाटत नाही. दहिसरमधे तसे अनेक डॉक्टर होते मात्र या डॉक्टरांचे आणि आमचे ऋणानुबंध आजोबांच्या काळापासूनचे. मी अगदी लहान असल्यापासून त्यांच्याकडे जात असेनच. त्यामुळे त्यांना प्रथम कधी पाहिलं वगैरे प्रश्न या इसमाच्या बाबतीत गैरलागू आहेत. जितके माझे आई, वडील, आजी किंवा इतर कुटुंबीय माझ्या आयुष्यात जन्मापासून 'होते' तितकेच आमचे हे डॉक्टरही जन्मापासून 'होते'.