भ्रष्टाचारासारखा प्रश्न मिटणार नाही.
Taxonomy upgrade extras
देशापुढील अनेक समस्यासह, भ्रष्टाचार, महागाईसारखे अनिर्णीत आणि अनियंत्रित प्रश्नांमुळे समाजात सतत रोष वाढत चालला आहे; पण तरीही त्याकडे दुर्लक्ष करून झटपट पैसा मिळवण्याची स्पर्धा दिसून येत आहे. आर्थिक धोरणे पूर्वी सामाजिकतेवर आधारित होती, आता त्यांचे लक्ष्य बदलले आहे. सामाजिकतेऐवजी भांडवल उभारणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. सामाजिक समतेच्या उद्देशाने आखण्यात येणा-या मोठमोठय़ा योजनांनासुद्धा भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याने त्यांचे लाभ अपेक्षित घटकांपर्यंत पोहोचत नाहीत. मोठय़ा संख्येने जागृत होणा-या समाजाला, तरुणवर्गाला या उणिवा आणि चलाखी चटक्न कळते.
- Read more about भ्रष्टाचारासारखा प्रश्न मिटणार नाही.
- 16 comments
- Log in or register to post comments
'कोंड्या'
लहानपणी आमचं एकत्र कुटुंब. शेतीकामाला चिक्कार गडीमाणसं असायची. कोंड्या त्यापैकीच एक.कातकरी समाजातला. इतर गडी शेतीच्या हंगामापुरतेच कामाला यायचे. पण कोंड्या मात्र वर्षभर आमच्याच घराशी आणि शेताशी बांधलेला असायचा. वडिलधार्यांकडुन ऐकायला मिळायचे की,लहान असताना त्याचा बाप आमच्याच शेतात राबायचा. एकदा गुरे चारायला गेला असताना बापाच्या अंगावर वीज पडली. संध्याकाळी गुरे एकटीच गोठ्यात आल्यावर त्याची शोधाशोध झाली. माळावर तो हातात काठी आणि तोंडात तंबाखु अशा अवस्थेत गवतात गतप्राण झालेला सापडला. तेव्हापासुन बापाची गुराख्याची काठी कोंड्याने सांभाळली. आमच्या घरातच तो लहानाचा मोठा झाला.
- Read more about 'कोंड्या'
- 22 comments
- Log in or register to post comments
निखारा
‘माझ्यासाठी काय गंमत आणलीएस?’
तू लहान मुलीसारखी
हात पुढे करत म्हणालीस
तुझे हात-
गुलाबी
पारदर्शक
नितळ!
मी स्तब्ध
सायमलटेनियसली तुझ्याकडे व हातांकडे पाहत
पाठीमागे हातातल्या हातात
निखारा खेळवत राहतो
- प्रणव
- Read more about निखारा
- 16 comments
- Log in or register to post comments
शिव्या
Taxonomy upgrade extras
काही कारणा निमीत्ताने एस.टी. महामंडळाच्या बसमधून प्रवास करावा लागला होता, भर दूपारी शिवाजीनगर स्थानकावरच बसमधे चढ्लो, बस तशी रीकामी होती व सूटायला बराच वेळ होता, माझ्या मागे हिरव्या रंगाची सूरेख साडी नेसलेली हसतमूख स्त्रि तीच्या नवर्यासोबत प्रसन्न चेहर्याने बसली होती. सोबतच मांडीवर काही महीन्याच एक मूलही झोपी गेलं होत. जोडपं एखाद्या तालूक्यात राहणारं वाटत होतं. नवरोबा शांत गंभीर पण चेहर्यावर सहजभाव ठेऊन निवांत बसले होते एकूणच जोडपं सूशील वाटत होतं, जोपर्यंत त्या स्त्रिने मोबाइल उचलला न्हवता... जसा फोन तीने तोंडाला लावला, सूरूवातच दरडावणीच्या सूरात केली....
- Read more about शिव्या
- 34 comments
- Log in or register to post comments
होकायंत्र
तुझ्या सावळया त्वचेच्या
समुद्रावर
मी जहाज घेउन
उतरलो . अनावर
इच्छेला मृदुतेच्या
शिडाचे गाउन ...
इथवर नव्हते
होकायंत्र, त्याच्या
नसल्याच्या जाणीवेसकट.
पण रोमारोमात इच्छा
तुझ्या, दिसते
आकर्षक, उत्कट !
- Read more about होकायंत्र
- 8 comments
- Log in or register to post comments
देशी वधूंना चिनी वधूंची टक्कर - बातमी
***********************************
मुंबई - चिनी वस्तूंपाठोपाठ आता चिनी वधूंनीही भारतीय बाजारपेठेवर आक्रमण सुरू केले आहे. लगीनसराईच्या निमित्ताने "चिंक्स' म्हणून ओळखल्या जाणार्या चिनी वधू लग्नाच्या बाजारात उपलब्ध होत आहेत. शौकीन तरूण जिंदगी कुर्बान करण्यासाठी या वधूंनाच पसंती देत आहेत, असे आमचा शिलॉन्गचा वार्ताहर कळवतो.
- Read more about देशी वधूंना चिनी वधूंची टक्कर - बातमी
- 20 comments
- Log in or register to post comments
Dual SIM मदत/सल्ला हवाय....
Taxonomy upgrade extras
एक dual SIM वाला mobile घ्यावा म्हणतोय. त्यासाठी सल्ला हवाय. माझे निकष खाली देतोय, त्यानुसार सुयोग्य असा कुठला ठरेल?
१.तो micromax नसावा.(माझ्या सर्व मित्रांना ह्याचा अत्यंत वाइट अनुभव आलेला आहे.)
२.परफॉर्मन्स चांगला हवाय. आवाजात सुस्प्ष्टता हवी.(सोनीचे पूर्वी सातेक हजार पर्यंत मिळणार्या काही मॉडेल्स मध्ये अशी अप्रतिम स्पष्टता होती. तितकी असेल तर उत्तम, त्याच्या जवळपास तरी जाणारी हवी.)
आज काय तर स्पीकर बिघडलाय. उद्या काय तर बॅटरीच बदलायची वेळ आली, असा सततचा त्रास नको. micromax सारखे नको. आमचा नोकिया ६०३० जसा पाचेक वर्षापासून ठणठणीत आहे, तसे काहितरी हवे.
- Read more about Dual SIM मदत/सल्ला हवाय....
- 21 comments
- Log in or register to post comments
.
बुकर पारितोषिक, साहित्यिक मूल्य, दर्जा वगैरे
Taxonomy upgrade extras
प्रतिसादांना मिळणाऱ्या श्रेणी आणि आता धाग्यांनाही मूल्य देता येणं या सुविधांवर अनेक मतमतांतरं वाचतो आहे. मराठी आंतरजालावर याविषयी अजूनही चर्चा होत राहणार हेही जवळपास निश्चित आहे. कोणतीही गुणवत्तानिर्देशक व्यवस्था ही अधिकाधिक निर्दोष कशी करता येईल हा प्रश्न कठीण आहे. गुणवत्ता आणि लोकाभिमुखता यांतलं द्वंद्वात्मक द्वैत फक्त इथेच नाही तर अनेक ठिकाणी दिसतं. बुकर पारितोषिकाच्या निमित्तानं नुकतंच उठलेलं वादळ मला या निमित्तानं आठवलं. त्याचा हा थोडक्यात परिचय. त्या अनुषंगानं साहित्यिक दर्जाविषयी चर्चा होऊ शकते किंवा धागे आणि प्रतिसादांच्या श्रेणी यांवरही काही मुद्दे मांडले जाऊ शकतात.
हिची, तिची अवस्था
'ही' भल्या पहाटे पाच वाजता उठते. मुलांचं करून तिला ऑफिस गाठायचं असतं. नाश्त्याला मुलीला पॅन केक हवा तर मुलाला ऑम्लेट. 'ही' पहाटे उठून एका बाजूला कांदा कापत, दुसर्या बाजूला पॅनकेकचं मिश्रण घोळवत घड्याळाकडे नजर टाकून उभी असते. दोघांनी एकच नाश्ता करा सांगितलं तर सकाळी उठून भोकाड पसरतो तिचा लहानगा. जे तिला हवं असतं ते हमखास याला नको असतं. सकाळी सकाळी नको वाटतं त्याचं रडणं आणि त्याची समजूत घालत बसणं. वेळ असतो कुठे तेवढा?
- Read more about हिची, तिची अवस्था
- 44 comments
- Log in or register to post comments