गद्य

दिवाकरांची क्षमा मागून…

हे बघा गणपतराव, तुमचा गुलामगिरीला विरोध आहे हे मला माहित आहे. कुणालाही गुलाम म्हणून हालात जगावं लागू नये ही तुमची भूमिका मी समजतो. तुमच्या तत्त्वांबद्दल मला आदरच आहे. तुम्ही स्वत: गुलाम बाळगावा, किंवा त्याला कासरा बांधून मुलीच्या रुखवतात मांडावा असं मी कधीही म्हणायचा नाही. पण म्हणून मीही गुलाम बाळगू नये असं सांगणारे तुम्ही कोण? किंवा आपल्या गावकट्ट्यावर गुलामांचा बाजार भरता कामा नये असा तुमचा दुराग्रह का? जोपर्यंत बाकी कुणाला त्रास होत नाही - म्हणजे अर्थात गुलाम वगळून - तोपर्यंत मला माझं करू द्या आणि तुमचं तुम्ही करा! जगा आणि जगू द्या… काय? बरोबर की नाही?!

ललित लेखनाचा प्रकार: 

प्रादेशिक राष्ट्रवादाचे सनई चौघडे

सध्या टेलिव्हिजनवर साऊथ डब चित्रपट मोठ्या प्रमाणात दाखवले जातात. त्यातला एक चित्रपट पाहण्यात आला. एक स्थानिक ‘तेलुगू’ डॉन (नागार्जुन) एका पाकिस्तानी डॉनचा बस्तान मांडण्याचा बेत कसा उधळून लावतो, असं काहीसं कथानक होतं. काही दिवसांनी मला त्या चित्रपटाची ‘तेलुगू’ प्रत बघण्याची संधी मिळाली. मूळ ‘तेलुगू’ सिनेमा बघितल्यावर मला धक्का बसला. कारण ‘डब वर्जन’मध्ये पाकिस्तानमधून आलेला खलनायक, मूळ तेलुगू सिनेमात मुंबईवरून आलेला दाखवला होता. हे धक्कादायक होतं...

ललित लेखनाचा प्रकार: 

व्हर्जन

कोड करता करता कंटाळून सुमितने घड्याळात पाहिलं. पावणेचार. आजूबाजूला त्याने एक नजर टाकली. एक-दोघांना खुणेनंच “येतो का?” म्हणून विचारलं. पण नाही. एकटाच कॉफी घेण्यासाठी तो मशिनजवळ आला. बटन दाबून ‘मग’ भरेपर्यंत एकटक तिकडे पाहत राहिला. कॉफी आणि बिस्किटं घेऊन वळला आणि एकदम हबकलाच.

ललित लेखनाचा प्रकार: 

जंटलमन्स गेम ८ - बेवडा मार के!

क्रिकेटच्या खेळाने जगाला अनेक उत्तमोत्तम खेळाडू दिले आहेत. यापैकी अनेक खेळाडू हे चांगलेच रगेल आणि रंगेलही निघाले! अगदी पार चार्ल्स बॅनरमन, डब्ल्यू जी ग्रेस पासून ते डेव्हीड वॉर्नर, जो रूट यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे! यापैकी अनेक खेळाडूंच्या रंगेलपणाच्या कहाण्या तर इतक्या प्रसिद्ध झाल्या की त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रेक्षकांनीही त्या खेळाडूंना त्यावरुन चिडवण्यास सोडलं नाही! शेन वॉर्नला इंग्लंडच्या बार्मी आर्मीने त्याच्या बायकोशी डायव्होर्स घेतल्यावरुन चिडवणं हा या प्रकरणाचा कळसाध्याय!

ललित लेखनाचा प्रकार: 

विलाप

जोपर्यंत एखादा क्षण, आपल्याबरोबर घटलेली acute दुर्दैवी घटना resolve होत नाही तोवर ती तुटकी, कुरुप, unintegrated अशी आपल्याला छळत रहाते. त्यातून मग ते साधण्याकरता कोणी देवदेव करतं तर कोणी गुन्हेगारीची कास धरतं. असा माझा कयास आहे. तो खरा असणारच असा हट्ट नाही. पण मानवी मनातील , तुमच्या माझ्या अशाच तुटक्याफुटक्या पैलूंना एकसंध करण्याकरता लिहीलेले/सुचलेले हे मनोगत.
http://www.authorsden.com/PoetryImage/172756.jpg
___________

ललित लेखनाचा प्रकार: 

"भाषण छापा, नाही तर ..." ही सबनिसांची धमकी व साहित्य महामंडळासमोरील धोका

"भाषण छापा, नाही तर ..." ही सबनिसांची धमकी व साहित्य महामंडळासमोरील धोका
.

साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे किंवा खरे तर आपले काही खरे दिसत नाही.

अध्यक्षीय भाषणात त्यांनी त्यांचे छापील भाषण न वाचता भलतेच भाषण केले. अतिशय तावातावाने. कुठल्या साहित्यसंमेलनाचा अध्यक्ष नव्हे, तर कुठल्या तरी कामगार युनियनचा नेता भाषण करतो आहे असा भास होत होता.

त्यांचे छापील भाषण सव्वाशे-दीडशे पानांचे आहे असे म्हणतात. आता ते महामंडळाने छापावे अशी मागणी सबनीसांनी केली आहे. ही मागणी २६ जानेवारीपूर्वी पूर्ण झाली नाही तर ते नंतर पत्नीसह उपोषणाला बसणार आहेत.

ललित लेखनाचा प्रकार: 

गुलामी नात्यातली!!

एखादी भिडस्त व्यक्ती असेल जी कधी कुणाला "नाही" म्हणू शकत नसेल त्याची आजकालच्या जगात फारच परवड, कुचंबणा आणि गोची होत असते. अशा भिडस्त असलेल्या समोरच्या व्यक्तीची संमती न घेता त्याला गृहीत धरून अनेकदा काही गोष्टी केल्या जातात. समोरच्याने त्याबद्दल चकार शब्द काढायचा अवकाश की त्या अगोदरच त्याच्या तोंडावर "भावनिक धमकी" असलेली चिकट पट्टी लावली जाते आणि त्याला बोलू न देता व स्वत:चे मत व्यक्त न करू देता त्याचेवर अगणित स्वार्थी अपेक्षा, इच्छा, आकांक्षा कर्तव्याच्या वेष्टनात बांधून लादल्या जातात मग पट्टी काढली जाते. याला काहीजण संवाद म्हणतात.

ललित लेखनाचा प्रकार: 

मुंबई मॅरथॉन (८)

* मुंबई मॅरथॉन चे हे 16 वे वर्ष आहे . या वेळी मी सहभागी होऊ शकलो नाही. पण दर वर्षी होतो. मॅरथॉन वरती लेख पाहून मला माझा अनुभवपर एक लेख आठवला जो मी 8 व्या मॅरथॉन नंतर लिहिला होता . त्यावेळी पहिल्यांदाच सहभागी झालो होतो. म्हणून हा लेख माझ्या ब्लॉग वर टाकला होता. तोच लेख इथे शेअर करत आहे . * सळसळते चैतन्य , उत्साह, जोश, थ्रिल असेच मी मुंबई मेरेथोन चे वर्णन करेन.!!! ८ व्या मुंबई मेरेथोन मधील व्हील चेअर इवेन्ट चा स्पर्धक असतानाचे सारे अनुभव डोळ्यासमोर तरळत आहेत.

ललित लेखनाचा प्रकार: 

संक्रांती आणि पतंगबाज

निरभ्र आकाश, थंडगार झुळझुळ वाहणारे वारे, आणखीन काय पाहिजे पतंग उडविण्यासाठी. देशातल्या इतर भागांप्रमाणे महाराष्ट्रात हि संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविल्या जातात.

ललित लेखनाचा प्रकार: 

भटकंती २

भटकंती आणि टूर ह्या दोन शब्दांत एक फरक आहे.

कुठे जायचं? कसं जायचं? किती दिवस? काय काय करायचं? खाण्यापिण्याची सोय काय? आधी जाऊन आलेलं आहे का कोणी? थोडक्यात, परीटघडीचा प्रवास म्हणजे टूर.

अस्मादिक भटकंतीवर जास्त विश्वास ठेवणारे. एकदा कुठे जायचं आणि किती दिवस ते ठरलं, की बाकीचं जसं समोर येईल तसं. माणसं भेटायला हवीत, तिथलं खाणं पिणं, गाणं, इतर कल्चर, इमारती, त्यावरुन होणारी त्या गावाची ओळख, सार्वजनिक ठिकाणं, पार्क्स, म्युझियम्स, रेल्वे, ट्राम, त्यामधे दिसणारी तिथली जनता, त्यांचा पेहराव , लोकल ते ग्लोबल फुटट्टीवर त्यांचा नंबर शोधणं हे माझे आवडते विषय.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य