सामाजिक

भेट हवी की भेटवस्तू ?

Taxonomy upgrade extras: 

सुमारे ४० वर्षांपूर्वीचे लग्नसमारंभ आठवतात का पाहा. लग्न लागल्यानंतर वधूवर मंचावर बसत आणि मग लोक त्याना भेटायला येत. तेव्हा लग्नाला आलेला प्रत्येक पाहुणा हा त्यांच्यासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊनच येई. वधू आणि वराच्या बाजूस प्रत्येकी एक जवळचा माणूस वही घेऊन बसलेला असे. पाहुण्याने वर किंवा वधूच्या हातात ती वस्तू दिल्यावर ते ती बाजूस बसलेल्या माणसाकडे देत. मग तो त्या वस्तूची व्यवस्थित नोंद (कुणी दिली यासह) त्याच्या वहीत करत असे. एक प्रकारे हा माणूस वधू अथवा वरपक्षाचा ‘ रोखापाल’ च असे !

मुक्त लैंगिक व्यवहाराने बलात्कार थांबतील काय?????

Taxonomy upgrade extras: 

आजच मुंबईत झालेल्या सामुहीक बलात्काराची बातमी वाचली.अश्या बातम्या रोजच कानावर पडू लागल्या आहेत.भारतात मागच्या काही वर्षांपासून बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.यावर मिडीयातून ,आंतरजालावर ,चर्चासत्रांमध्ये बराच उहापोह झाला आहे.अगदी ऐसिवरही यावर अनेक धागे निघाले आहेत ,चर्चा झडल्या आहेत याची मला कल्पना आहे.

मराठा मूक मोर्चा

Taxonomy upgrade extras: 

महाराष्ट्रामध्ये - आणि देशामध्ये - काय चालू आहे हे आम्हासारख्या परदेशस्थ लोकांना मुख्यत्वेकरून वृत्तपत्रांमधून कळते. गेले काही दिवस वृत्तपत्रे 'मराठा मूक मोर्चा' ह्याचे गावोगावचे फोटो दाखवून मोर्चा कसा शिस्तबद्ध होता इत्यादि सांगत आहेत. ह्यांच्या मुळाशी मराठा समाजास राखीव जागांची मागणी हा प्रमुख विषय असावा असे दिसते. पण बरोबरच SC/ST ह्यंना मिळणार्‍या राखीव जागांबद्दल, त्यांच्या रक्षणासाठी केलेल्या अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबद्दल जळजळहि दिसत आहे.

मराठा समाज म्हणजे काय ह्याबद्दलहि संभ्रम दिसत आहे. कुणबी म्हणजे मराठा का कोणी अलग असाहि उपप्रश्न येथे आहे असे दिसते. (नागपूरला असा भव्य मेळावा २५ ऑक्टोबरला भरणार आहे पण त्यातून कुणबी समाजाला वगळले जाणार आहे असे दिसते. संदर्भ म्हणून इंडियन एक्स्प्रेसची हेडलाईन "Maratha ‘silent march’ in Nagpur on Oct 25, Kunbis excluded. The Sakal Maratha Samaj, which is organising the silent march in the city, has excluded the Kunbis from the protest." पहा.

(माझे थोडे अवान्तर - कुणबी येथे २००० वर्षांपासून राहात आहेत ह्याची कोणास जाणीव दिसत नाही. अशाच एका 'कुणब्या'ने आणि त्याच्या आईने तळेगावजवळ शेलारवाडीला लेणी कोरण्यासाठी देणगी दिली होती असे तेथील कोरीव लेखावरून दिसते.)

सैराट चित्रपटातून कोपर्डीसारखे अत्याचार होतात तेव्हा तो चित्रपटच बहिष्कृत करावा, कोपर्डी घटनेतील गुन्हेगारांना त्यांचे हातपाय तोडून भर चौकामध्ये लटकावून द्यावे अशा मागण्या येत आहेत. माता जिजाऊ, रणरागिणी ताराऊ ह्यांचे वेष करून स्त्रिया मोर्चामध्ये सहभागी होत आहेत.

असले लाखोंचे मोर्चे सुरुवातीला शांततेने चालले आहेत असे दृश्य दिसले तरी ते हिंसाचारी होण्याची कितपत शक्यता आहे? ह्यातून ब्राह्मण समाज सध्यातरी बाजूस ठेवला गेला आहे असे दिसते पण ब्राह्मण समाज अशा चळवळींचे नैसर्गिक शत्रु असतात. ही चळवळ ब्राह्मणविरोधात केव्हा उलटेल?

सध्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या 'ऐसी'च्या विचारवंतांकडून माहितीची अपेक्षा बाळगून आहे. पण तूर्तास तरी ते फेमिनाझी, कुंडली असल्या गहन विषयांच्या काथ्याकूटात गढलेले दिसतात.

सांस्कृतिक दहशतवादाचं आव्हान... : प्रज्ञा पवार ह्यांनी केलेलं भाषण

Taxonomy upgrade extras: 

प्रज्ञा दया पवार ह्यांच्या फेसबुक भिंतीवरून.

---

पाटणला विभागीय मराठी साहित्य संमेलनात जे घडलं त्यासंदर्भात विस्तृत अशी पोस्ट मी आजच टाकली आहे. त्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी मी तिथे जे भाषण केलं ते इथे देण्यासंबंधी सुचवलं आहे. भाषण देते आहे. जरा दीर्घ आहे. थोडा पेशन्स ठेऊन वाचावं लागेल. Smile

सांस्कृतिक दहशतवादाचं आव्हान...

हे जग स्वातंत्र्य समतेच्या दिशेने बदलण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या सर्व महामानवांना मी सुरुवातीलाच वंदन करते.

"माझ्या घरी स्त्री-नातेवाईक आहेत."

Taxonomy upgrade extras: 

सूचना : अमेरिकी निवडणुकांबद्दल चर्चांचा ज्यांना कंटाळा आहे; अशांसाठी ही चर्चा सुरक्षित आणि असुरक्षित ह्यांच्या मधल्या न-चर्चा-भूमीत आहे.

(अमेरिकन वेळेनुसार) शुक्रवारी संध्याकाळी डॉनल्ड ट्रंपने स्त्रियांसंदर्भात उधळलेली मुक्ताफळं जगजाहीर झाली. (मुक्ताफळांचा एक दुवा.) ट्रंपने जी बडबड केली आहे त्याचं थोडक्यात वर्णन 'लैंगिक अत्याचार' असं करता येईल. (हे वर्णन ट्रंपने नाकारलं तरी अमेरिकन न्यायमंडळानुसार हे वर्णन ग्राह्य आहे.)

A.F.S.P.A. आर्म्ड फ़ोर्सेस स्पेशल पॉवर्स अ‍ॅक्ट - भाग पहीला - BASICS

Taxonomy upgrade extras: 

प्रस्तावना

"आर्म्ड फ़ोर्सेस स्पेशल पॉवर्स अ‍ॅक्ट" उर्फ़ AFSPA. हा भारतीय संसदेने मंजुर केलेला सशस्त्र लष्करी/निमलष्करी/ अर्ध्वलष्करी दलांना विशिष्ट परीस्थीतीत विशिष्ट भौगोलिक क्षेत्रांतर्गत कारवाई करतांना विशेषाधिकार देणारा एक जुना वादग्रस्त कायदा आहे. या कायद्याचा एकुण प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा व अनेक पैलु असणारा आहे. या लेखाची मांडणी माझ्या सोयीसाठी मी खालीलप्रमाणे तीन भागात करायची असे ठरविले आहे.

उबरीकरण -- आपले UBER होउ घातले आहे का ?

Taxonomy upgrade extras: 

चर्चेचं मूळ कारण गब्बर.
अहो, ते तर सोडाच. लेण्डिन्ग क्लब्स ही संकल्पनाच आख्ख्या एका इंडस्ट्रिला, ब्यांकिगला खायला उठलिये असं वाटतय. तंत्रज्ञान एक आख्खी इंडस्ट्री झोपवेल की काय अशी भीती वाटते आहे. (की ही भीती पुरेसा अभ्यास नसल्यानं आहे? ब्यांकिंग आणि लेंडिन्ग क्लब्ज दोन्ही एकाच वेळी अस्तित्वात राहू शकतात?)
.
.
खफवरच्या संक्षिप्त प्रतिक्रिया
अतिशहाणा
सोमवार, 22/08/2016 - 04:24
मनोबा उबरीकरणाबाबतच्या शंका रास्त आहेत पण मला हे सगळं बघून मजा वाटते आहे. कदाचित मशीन्समुळं आपण रिटर्न टू इनोसन्सच्या पातळीवर येऊ.

मृत जनावरांची विल्हेवाट

Taxonomy upgrade extras: 

यापुढे मेलेली ढोरे ओढायची नाहीत असा निश्चय दलितांनी केल्याची बातमी पाहिली. या नियमाविरुद्ध वागणार्‍याला दंडही करण्यात येणार आहे असेही त्या बातमीत होते. हा अर्थात दलित समूहाच्या आत्मसन्मानाचा निर्णय आहे आणि त्याचे मनापासून स्वागतच आहे. पण यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. अर्थात त्याचा विचार दलितांनी करण्याची गरज नाही. ज्यांना विल्हेवाटीची निकड असेल ते यावर उपाय शोधतीलच. मानवेतर प्राण्यांच्या विल्हेवाटीचे बहुधा यांत्रिकीकरण होईल. पण यातही, कमीतकमी का होईना मनुष्यबळ लागेलच. खाजगी संस्था हे काम करतील तर नफ्याचे प्रमाण पुरेसे राखण्याची काळजी त्या घेतीलच.

पर्यावरण संवेदनशील इमारती/ शहरे (Environment sensitive buildings/ urban Development) (भाग २) : पाणी

Taxonomy upgrade extras: 

ह्या महिन्यात महाराष्ट्रात सर्वदूर बर्यापैकी पाउस सुरु झाला आहे. ह्यावर्षी तरी दुष्काळी परिस्थितीला तोंड द्याव लागेल असा वाटत नाही पण मागील वर्षान्सारखी परिस्थिती येऊ नये म्हणून पाणी वापराचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे.

भारताचा 'इमेज प्रॉब्लेम' - जोसेफ स्टिग्लित्झ

Taxonomy upgrade extras: 

Joseph Stiglitz says India needs to realize it has an image problem

One of the big concerns is the difficulties for NGOs to operate in India. It puts India in the same group of countries as Egypt and Russia, and that is not the group of countries that you want to be in

[...]

पाने

Subscribe to RSS - सामाजिक