सामाजिक

कविता किती लहान असावी?

Taxonomy upgrade extras: 

लघुकविता हा माझा प्रांत नाही बहुधा. एक क्षण टिपणारं एखादं कडवं, काहीतरी छोटंसं मौलिक सांगणारी चांगली चारोळी, किंवा हायकू या प्रकारच्या कवितांचा कसा आस्वाद घ्यावा हे नीट कळत नाही. (हे विचार मनात आले ते धनंजयच्या शोधत-शोधत या कवितेमुळे)

सरकारी उच्चपदस्थांना तुटपुंजं वेतन मिळतं का?

Taxonomy upgrade extras: 

अशोक पाटील यांच्या "व्हाय नॉट वुइथ डिग्निटी?" या धाग्यावरच्या चर्चेत भारताच्या चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांच्या वेतनाबद्दल व निवृत्तीवेतनाबद्दल चर्चा झाली. त्यात एका प्रतिसादात त्यांनीच वेतनाची माहिती दिली. ते आकडे वाचून मला थक्क व्हायला झालं. महिन्याला एक लाख साठ हजार रुपये. फक्त. बरं, इतर पर्क्स आहेत, पण त्यांचा हिशोबही महिन्याला तीनेक लाखाचा होत असेल. थोडा कमी थोडा जास्त कदाचित. पण याचा अर्थ एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीला महिना फक्त पाच लाख रुपये मिळतात.

"व्हाय नॉट वुईथ डिग्निटी ?"

Taxonomy upgrade extras: 

देश कारगील प्रकरणात कुणाचे बरोबर कुणाचे चूक याचा लेखाजोखा आजही काढत असताना मिलिटरी आणि त्यातही सर्वोच्च पदावर विराजमान झालेल्या तितक्याच दर्जाच्या सेनानायकाकडून इतरांनी काही आदर्श घ्यावे अशी समजूत असताना सेवेत केवळ एका वर्षाची वाढ मिळावी म्हणून हाच सेनानायक जन्मतारखेच्या 'सत्यते' विषयी ढीगभर कागदपत्रे घेऊन सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावत असल्याचे आजचे चित्र पाहताना एक सर्वसामान्य नागरिक म्हणून याबद्दल अभिमान बाळगावा की खंत बाळगावी हा प्रश्न "सिव्हिलियन्स" पुढे पडला आहे.

नर्मदे, हर!

Taxonomy upgrade extras: 

स्वतःलाच प्रश्न विचारणं कितपत सोपं असतं? आणि त्यांची उत्तरं आधीच्या लोकांनी, विचारपद्धतीने करून दिलेल्या धारणांपेक्षा वेगळी असतील तर? नवीन ठिकाणी गेल्यावर काही प्रकारची प्रतिक्रिया आपल्याला अपेक्षित असते. एकदम वेगळाच प्रतिसाद आला तर? कालच एका ठिकाणी फिरायला गेल्यावर असाच काहीसा अनुभव आला. खिशातून वॉलेट काढताना पहाताच, "इथे प्रवेशफी नाही. देणगी स्वीकारली जाते." आम्ही आधीच चितपट. मग काऊंटरवरच्या माणसाने हसर्‍या चेहेर्‍याने संपूर्ण भागाचा नकाशा दाखवला. पेन्सिलीने खुणा करून "इथे व्यवस्थित चढाव आहे, काळजी घ्या." असं सांगतानाच, "तिथे खाली जाणारच असाल तर या ठिकाणी मात्र नक्की जाऊन या.

दुखवट्याचा ठराव

Taxonomy upgrade extras: 

ज्या बॅटिंगच्या जोरावर भारत टेस्ट क्रिकेटमधला अव्वल संघ बनला होता तिचा नुकताच मृत्यू झाला. तशी गेले बरेच महिने तिची तब्येत तोळामासाच होती. इंग्लंडच्या दौऱ्यावर एकाही इनिंगमध्ये तिला ३०० च्या पलिकडे जाता आलं नाही. त्यामुळे अर्थातच ०-४ असा मार खावा लागला. मध्ये वेस्ट इंडिज वगैरे लोकांबरोबर किंवा भारतातल्या भारतात खेळून तिला जरा बरा काळ आल्यासारखं वाटलं. प्रकृती सुधारते की काय अशी आशा वाटायला लागली.

सरकारी शाळांमधील घसरलेली गुणवत्ता

Taxonomy upgrade extras: 

सरकारी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता नाही, अशी ओरड सतत होत राहते. यात तथ्यांश असल्याचेही काही गोष्टींवरून स्पष्ट होते. याला काही प्रमाणात शिक्षकांमध्ये शाळा व विद्यार्थीप्रति नसलेली आत्मियता, नसलेला एकोपा, त्याचबरोबर शिक्षकांमधला अहंगंड, एकमेकांविषयी असलेली असुया, राजकारण्यांच्या दबावाने दबलेली प्रशासन व्यवस्था आदी गोष्टीसुद्धा कारणीभूत आहेत. शाळा म्हणजे एक कुटूंब आहे, याचा लवलेशसुद्धा काही शाळांमध्ये दिसून येत नाही.

द्विधा मनस्थिती

Taxonomy upgrade extras: 

द्विधा मनस्थितीतून बाहेर कसे पडायचे?

भविष्याला आपली गरज आहे का?

Taxonomy upgrade extras: 

'पृथ्वी वाचवा' ही घोषणा बर्‍याच लोकांना विनोदी वाटते. मलाही वाटते. शिवाय 'पृथ्वी' वाचवण्यासाठी लोकांना सुचवले जाणारे उपायही बरेच गमतीदार आहेत. उदाहरणार्थ, प्लॅस्टिकच्या पिशव्या न वापरणे, घरातले दिवे विनाकारण लावून न ठेवणे किंवा घरात पाणी जपून वापरणे वगैरे. काहीतरी बिघडलंय आणि हे असे उपाय केल्याने बराच फरक पडेल अशी समजूत असलेले भाबडे लोक ते उपाय प्रामाणिकपणे करतही असतील. या 'पृथ्वी वाचवा' वरून एक व्हिडिओ पाहिल्याचे आठवले, तो इथे डकवण्याचा मोह आवरत नाही.

सरासरी अंधश्रद्धा

Taxonomy upgrade extras: 

सरासरी अंधश्रद्धेबद्दल लिहीण्याआधी एक गोष्ट सुचली ती सांगतो. फार पुर्वीची नाही, नेहमीचीच गोष्ट आहे. एकदा एक राजा होता. प्रजेच्या कल्याणासाठी दक्ष वगैरे. वर्षाअखेरीस त्याची प्रधान मंत्र्याशी खास चर्चा असायची. वर्षभराच्या कामगिरीच्या मूल्यमापनाची. तशी ती यावर्षीही ठरली. एकेका खात्याच्या कामगिरीचा सारांश महामंत्री सांगणार आणि राजा त्यावर विचार, टिप्पणी करून त्या खात्याच्या मंत्र्याला बक्षिस किंवा सूचना काय द्यायच्या ते सांगणार अशी पद्धत. समोरासमोर ठेवलेल्या मंचकांवर राजा आणि महामंत्री बसलेले आणि मध्ये ठेवलेल्या मेजावर गेल्या आणि यावर्षीच्या माहितीपत्रांची भेंडोळी.

आपली इच्छाशक्ती

Taxonomy upgrade extras: 

आपली इच्छाशक्ती इतकी तकलादू का?

पाने

Subscribe to RSS - सामाजिक