विज्ञान
"ब्रेकिंग न्यूज" - कृष्णविवरं नाहीतच - स्टीफन हॉकिंग
कोणी अंतराळवीर जर कृष्णविवरात पडला तर? कृष्णविवर म्हणजे काही बोअरवेलचा खड्डा नव्हे की ज्यात कोणी प्रिन्स पडला तर संपूर्ण देशातली माध्यमं त्याबद्दल बातम्या दाखवू शकतील. हे एक बरं. आणि दुसरी चांगली गोष्ट अशी की या प्रश्नाचा विचार करून काही शास्त्रज्ञांचं पोटही भरतं.
---
धाग्याचा प्रकार निवडा:
- Read more about "ब्रेकिंग न्यूज" - कृष्णविवरं नाहीतच - स्टीफन हॉकिंग
- 61 comments
- Log in or register to post comments
- 31570 views
उष्णता
गेले चारेक दिवस उत्तर अमेरिकेत आलेली थंडीची लाट हा विषय स्थानिक माध्यमांमधे हॉट आहे. त्यातच अग्नि आणि संस्कार धाग्यातही हा विषय चर्चेला आलेला आहेच. उष्णता म्हणजे काय, थंड-गरम, तापमान या संकल्पना समजून घेण्यासाठी हा धागा.
धाग्याचा प्रकार निवडा:
- Read more about उष्णता
- 72 comments
- Log in or register to post comments
- 17100 views
वैमानिकांना विमानाची दिशा बदलावी लागते का?
विमान जर एका रेषेत उडत असले तर ते स्पर्शिकेच्या दिशेने पृथ्वीबाहेर जाईल
जाणार नाही, तितकी ताकद विमानाच्या इंजिनात नसते. काळजी नसावी.
वैमानिकांना विमानाची दिशा बदलावी लागते का? (म्हणजे दिल्ली ते शिकागो विमानाला १८० अंशातून वळवावे लागते का? कि ते आपोआप गुरुत्वाकर्षणाने वळते? दिल्ली शिकागो सरळ हवाई (?) मार्ग पृथ्वीच्या पोटातून जातो.)
नेमकं गवि सांगतील. पण विमान वळवण्याची सोय असते.
(या धाग्यातली चर्चा वेगळी काढली आहे.)
धाग्याचा प्रकार निवडा:
- Read more about वैमानिकांना विमानाची दिशा बदलावी लागते का?
- 33 comments
- Log in or register to post comments
- 16611 views
आपल्या शरीरातील छुपी घड्याळे
मागच्या महिन्यात माझ्या जुन्या शाळासोबत्यांबरोबर एक संध्याकाळ गप्पा गोष्टींमध्ये घालवण्याचा योग आला. आता हे सर्व शाळा सोबती वयाची सत्तरी ओलांडलेले असल्याने, या स्वरूपाच्या गप्पागोष्टींमध्ये आताशा होते तसेच त्या दिवशी झाले व गप्पांचा रोख आमच्या तब्येती व वयोमानानुसार येणार्या व्याधी यांकडे वळला. त्या वेळेस माझ्या सहजपणे हे लक्षात आले की तेथे जमलेल्या आम्हा 8/10 मित्रांपैकी बहुतेक जण आता चष्मा वापरत होते. काही जणांच्या डोळ्यांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली होती. निदान चौघांना तरी मधुमेह होता व त्यासाठी नियमित औषधपाणी करावे लागत होते.
धाग्याचा प्रकार निवडा:
- Read more about आपल्या शरीरातील छुपी घड्याळे
- 16 comments
- Log in or register to post comments
- 7343 views
लाजाळू देवकण आणि त्यांचा तितकाच लाजाळू शोधक
मला वाचकांना अनेक खर्व किंवा निखर्व वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एका क्षणापर्यंत मागे न्यायचे आहे. हाच तो क्षण होता की ज्या क्षणी या विश्वाची निर्मिती, वैश्विक महास्फोट किंवा बिग बॅन्गमुळे झाली होती. या क्षणानंतर लगेचच हे प्रसरण पावणारे विश्व, प्रकाशाच्या वेगाने इतस्ततः फेकल्या जाणार्या आणि संपूर्णपणे वस्तूमान विरहित असलेल्या तेजकणांनी भरून गेले होते. परंतु याच्या पाठोपाठ किंवा एका निखर्वांश सेकंदानंतर, अशी एक अगम्य घटना घडली की ज्यामुळे संपूर्णपणे वस्तूमान विरहित असलेल्या या तेजकणांपैकी काही तेजकणांना अचानक वस्तूमान प्राप्त झाले.
धाग्याचा प्रकार निवडा:
- Read more about लाजाळू देवकण आणि त्यांचा तितकाच लाजाळू शोधक
- 6 comments
- Log in or register to post comments
- 2770 views
विकीपंडीत किंवा गूगलपंडीत ?
सध्याच्या इंटरनेटप्रणित युगात, इंटरनेट हे माहितीचे मायाजाल न राहता माहितीचा अफाट स्रोत झाले आहे. त्याचा वापर करून कोणीही कुठल्याही विषयाची माहिती मिळवून, त्या माहितीचा यथायोग्य वापर करून, त्या माहितीचा मानवजातीसाठी योग्य उपयोग करू शकतो. जसे विज्ञान हे शाप किंवा वरदान होऊ शकते त्याचप्रमाणे इंटरनेटवरच्या अफाट माहितीचा हा सागर त्याचा वापर कसा करू त्याप्रमाणे उपयोगी किंवा दुरुपयोगी ठरू शकतो. ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अबलंबून आहे. कोणाला अर्धा भरलेला ग्लास 'अर्धा रिकामा' असा दिसू शकतो किंवा 'अर्धा भरलेला' दिसू शकतो.
- Read more about विकीपंडीत किंवा गूगलपंडीत ?
- 9 comments
- Log in or register to post comments
- 4772 views
आकाशगंगेच्या मध्यभागी असणारा मॅग्नेटार
मुख्य बातमीआधी काही संज्ञांचं स्पष्टीकरणः
धाग्याचा प्रकार निवडा:
- Read more about आकाशगंगेच्या मध्यभागी असणारा मॅग्नेटार
- 62 comments
- Log in or register to post comments
- 14722 views
'टायटन् अॅरम्' ऊर्फ 'कॉर्प्स् फ्लॉवर' ऊर्फ 'शवफुला'चे फुलणे
वॉशिंग्टन् डीसी मधील 'यू.एस्.बोटॅनिक् गार्डन्' मध्ये आज एक फूल फुलते आहे.
ते फूल म्हणजे 'टायटन् अॅरम्'. आपण त्यास 'शवफूल' म्हणूयात.
हे अवाढव्य जांभळे-हिरवे-पिवळे फूल १० फुटांपर्यंत उंच होऊ शकते. याच्या उमलण्याचा / बहराचा काळ निश्चित नाही. कधी वर्षांनी तर कधी दशकांनी ते उमलते. उमललेल्या स्थितीत २४ ते ४८ तास राहिल्यावर ते झटकन मिटते. निरीक्षकांच्या मते डीसी मधील ते फूल पूर्ण फुलण्याचा आज दिवस आहे (२२ जुलै - ईस्टर्न् टाईम्).
धाग्याचा प्रकार निवडा:
- Read more about 'टायटन् अॅरम्' ऊर्फ 'कॉर्प्स् फ्लॉवर' ऊर्फ 'शवफुला'चे फुलणे
- 6 comments
- Log in or register to post comments
- 2800 views
ऊर्जेची गणिते ४: धोक्याची घंटा - २
कधी ढगफुटी होते. नदीला पूर येतो. पाण्याचा महाप्रचंड लोंढा घोंघावतो. आणि आपल्या वाटेत येणाऱ्या हजारो लोकांना वाहवून नेतो. काही काळ प्रलय होतो, आणि नंतर पुन्हा पूर्ववत प्रवाह सुरू होतो. पाण्याचे लोंढे डोळ्याला दिसतात. त्यांचा आवेग जाणवतो. रौद्र रूपाची भीती वाटते. ढगफुटी - पाण्याचा प्रवाह - गेलेले जीव ही साखळी स्वच्छपणे मांडता येते. तीवर कोणी शंका घेऊ शकत नाही. कधी कधी मात्र विचारांची ढगफुटी होताना दिसते. आणि त्यांच्या प्रवाहात लाखो जीव वाहून जातात. अठराव्या शतकाच्या अंतकाळात जी विचारधारा उगवली तिने असेच अनेक बळी घेतले. आता तो प्रवाह पुन्हा पूर्ववत झालेला आहे.
- Read more about ऊर्जेची गणिते ४: धोक्याची घंटा - २
- 19 comments
- Log in or register to post comments
- 7072 views
सूर्य - १
सूर्य हा आपल्या सगळ्यात जवळचा तारा. सूर्याला अनेक प्राचीन संस्कृतींमधे देवाचे रूप दिलेले आहे; आणि सर्वांनाच आपले अस्तित्त्व सूर्यामुळे आहे याची जाणीव होती. सूर्याच्या शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यासालाही बराच मोठा इतिहास आहे. या लेखमालेतून हा इतिहास न पहाता सूर्याची थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
हा फोटो आहे सूर्याच्या "शांत" पृष्ठभागाचा. सूर्याचा "शांत" पृष्ठभाग असा रवाळ का दिसतो, "अशांत" पृष्ठभाग कसा दिसतो, याचे कारण अर्थातच सूर्याच्या आतल्या भागात ज्या घडामोडी चालतात ते आहे. ही कारणे समजून घेण्यासाठी सूर्याच्या अंतर्भागाची माहिती करून घेऊ.
धाग्याचा प्रकार निवडा:
- Read more about सूर्य - १
- 36 comments
- Log in or register to post comments
- 33650 views