Skip to main content

समाज

अडगळीत गेलेल्या वस्तु आणि शब्द.

काळ पुढे जातो आणि नवनवीन संशोधनामधून नवनवीन चिजा बाजारात आणि वापरात येऊ लागतात. वागण्या-बोलण्याच्या रीती बदलतात. त्याबरोबरच जुन्या गोष्टी आणि शब्द अडगळीत आणि विस्मरणात जाऊन पडू लागतात. अशा चीजा, कल्पना, शब्द अशांची जर जंत्री केली तर ते मोठे मनोरंजक ठरेल. अशी जंत्री किती लांबेल आणि त्यामध्ये किती प्रकार आणि उपप्रकार असतील ह्याला काही मर्यादा नाही आणि कल्पक वाचक त्या जंत्रीमध्ये मोलाची भरहि घालू शकतील.

ह्या जंत्रीचा प्रारंभ म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये अदृश्य होऊ लागलेल्या काही गोष्टी मला सुचतात तशा लिहितो. (काहीजण मराठी भाषेचा येथे पहिल्याप्रथम उल्लेख व्हावा असे म्हणतील, पण मी इतक्या टोकाला जात नाही!) ही यादी मुख्यत: शहरी आयुष्याशी संबंधित आहेत कारण मला स्वत:ला तेच आयुष्य़ माहीत आहे.

गट १ वापरातील यान्त्रिक वस्तु - जुन्या प्रकारचे घडी घालून खिशामध्ये ठेवण्याचे सेलफोन्स, रोटरी फोन, प्रॉपेलरवर उडणारी प्रवासी विमाने, कोळशाच्या इंजिनांच्या आगगाडया, किल्ली द्यायला लागणारी गजराची घडयाळे, हाताच्या हालचालीवर चालणारी बिनकिल्ली-बॅटरीची घडयाळे, कोळशाच्या इस्त्र्या, कटथ्रोट वस्तरे, जिलेटसारखी ब्लेडस आणि ती घालण्याची खोरी, दाढीचा केकस्वरूपातील साबण आणि ब्रश.

गट २ वापरातील घरगुती वस्तु - स्वयंपाकघरातील अनेक भांडी (तांबे-पितळ्याची भांडी, वाटी, गडू, फुलपात्र, तांब्या, प्रवासासाठी फिरकीचा तांब्या, घागर, गुंड, आंघोळीचा बंब, तामली, सट, सतेले, ओघराळे, कावळा, बसायचे फुल्यांचे पाट, चौरंग, पूजेच्या वस्तु (पळी, ताम्हन, अडणीवरचा शंख, सहाण आणि गंधाचे खोड, रक्तचंदनाचे खोड, गंगेच्या पाण्याचे भांडे, पंचामृतस्नानाचे पंचपाळे, मुकटा.)

गट ३ कपडे - पुरुषांचे लंगोट आणि बायकांच्या बॉडया - झंपर, कोपर्‍या-अंगरखे-टापश्या-पगडया अशी वस्त्रे, बायकांच्या नायलॉन साडया आणि पुरुषांच्य़ा टेरिलिन पॅंटी, बुशकोट, सफारी, नऊवारी लुगडी आणि करवती धोतरे, अंग पुसण्याचे पंचे, मुलींची परकर-पोलकी.

गट ४ सामाजिक आचार - 'ती.बाबांचे चरणी बालके xxx चे कृ.सा.न.वि.वि' असले मायने आणि एकुणातच पोस्टाने पाठवायची पत्रे, तारा, 'गं.भा., वे.शा.सं.. ह.भ.प., चि.सौ.कां., रा.रा.' असले पत्रांमधले नावामागचे उल्लेख, 'लिप्ताचा स्वैपाक, धान्यफराळ, ऋषीचा स्वैपाक, निरसे दूध, अदमुरे दही, तीसतीन ब्राह्मण, अय्या-इश्श' अशा प्रकारचे विशेषतः बायकांच्या तोंडातील शब्द. जुन्या लग्नपत्रिका (सौ.बाईसाहेब ह्यांस असे डाव्या बाजूचे बायकांचे निमंत्रण, लेकीसुनांसह), शरीरसंबंध, चि.सौ.कां. इत्यादि, पानसुपारीचे समारंभ, सवाष्ण, मुंजा मुलगा जेवण्यास बोलावणे, गणपतीमध्ये आवाज चढवून म्हणायचे देवे, जेवणाआधी चित्राहुती आणि जेवणानंतर आपोष्णी.

गट ५ वजने, मापे, नाणी इत्यादि. - आणे, पै, पैसा, अधेली, चवली. पावली, गिन्नी अशी नाण्यांची नावे. खंडी, पल्ला, मण, पायली, पासरी, धडा, शेर, अदशेर, पावशेर, छटाक, रति, गुंज अशी वजने. गज, फर्लांग, कोस, वीत, हात ही लांबीची मापे. अडिसरी, पायली, रत्तल, अठवे, निठवे, चिपटे, मापटे, निळवे, कोळवे इत्यादि धान्यांची मापे. खण, चाहूर, बिघा अशी क्षेत्रफळाची मापे, पाउंड, स्टोन, हंड्रेडवेट ही इंग्रजी वजनी मापे.

असे गट आणि त्यातील वस्तूंच्या याद्या मारुतीच्या शेपटासारख्या कितीहि वाढविता येतील. ऐसीकरांनी यथास्मृति ह्यामध्ये भर घालावी हे विनंति. क.लो.अ.

आपला नम्र,

धागाकर्ता

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

पैसे उकळण्याचे धंदे

शनिवारी दुपारी relaxed खातपीत -वाचत-झोपत असताना ७१५-३९५-१३७१ (हा खरच शेरीफ चा नंबर आहे) नंबरवरुन एक फोन आला व पुढील संभाषण झाले -
बेल वाजली>
मी - हेलो
समोरची व्यक्ती- अतिशय कडक आवाजात व जोरात> मी अमक्या अमक्याशॆ बोलू शकतो काय?
मी- हो बोलतेय
स. व्य.- मी शेरीफ बोलतो आहे. आमच्याकडे तुमच्या अटकेचा warrant आहे. मायकेल Black नावाच्या ऑफिसर ला तुमच्या विरुद्ध तक्रार आहे. त्याला तुम्ही पुढील नंबरावर फोन करा अन तो तुम्हाला काय ते सांगेल.
मी.- पहिल्या झटक्यात या लोकांचा accent कधीच कळत नसल्याने.... :D> हेलो नाही मी यावेळेला रक्तदान करू शकत नाही. माझ्याकडे वेळ नाही.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

ऑफिसस्पीक

जॉर्ज ऑर्वेल या ब्रिटिश लेखकाच्या नायंटीन एटीफोर या गाजलेल्या कादंबरीत 'न्यूस्पीक' या काल्पनिक भाषेचा उल्लेख आहे. भाषेतील नेहमीच्या शब्दांना या न्यूस्पीकमध्ये वेगळाच अर्थ बहाल केलेला असतो. (एका मराठी लेखकानेसुद्धा शब्दांशी असाच खेळ खेळला आहे. पाणी या सर्वमान्य शब्दाचा इंग्रजीतील समीपार्थ (?) Soiled water or turbulent water cannot produce the true replica असा काही होऊ शकतो. त्याचप्रकारे उत्तम म्हणजे the spirit which is transcending the impure & is superior to pure is the Active manifestation of God viz. Benevolent Controller. ऐश्वर्य याचा अर्थ divine glory.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

थरार..... ! फ़क्त (?) आठ सेकंदांचा !!

मी थोडा चक्रावलोच होतो. यावेळी जानेवारीत होणार्‍या आमच्या वार्षिक सेल्स मिटींग्जमध्ये एक संध्याकाळ 'नॅशनल वेस्टर्न स्टॉक शो' साठी राखीव ठेवण्यात आलेली होती. 'वेस्टर्न' हा शब्द ऐकला की त्याबरोबर आम्हाला एकतर 'कल्चर' आठवते नाहीतर 'म्युझिक'. त्यात मी जेव्हा अमेलियाला (एक अमेरिकन सहकारी) जेव्हा या तथाकथीत स्टॉकशो बद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली... इट्स रोडीओज विशाल.... ! दुर्दैवाने (हा दोष तिच्या अमेरिकन उच्चाराचाही आहे म्हणा) आम्ही ते रेडीओज असे ऐकले आणि मनातली 'वेस्टर्न म्युझिक' ही संकल्पना अजुन पक्की झाली.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

अनश्व रथ, पुष्पक विमान आणि आपण सर्व - रवींद्र रु. पं. : लेखांक पहिला

'आजचा सुधारक' या मासिकात रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर २०१४ या तीन अंकात 'अनश्व रथ, पुष्पक विमान व आपण सर्व' या शीर्षकाची एक लेखमाला लिहिली आहे. संघ ह्या विषयावर आतापर्यंत पुरोगाम्यांनी केलेले विश्लेषण अपुरे व सदोष आहे, त्यात आत्मटीकेचा अभाव आहे असे वाटल्याने रवींद्र यांनी हे लेखन केले आहे. हे लेख वाचल्यावर मला असं वाटलं की 'ऐसी अक्षरे'वर ते शेअर करावेत. 'ऐसी अक्षरे'च्या वाचकांना हे लेख आवडतील आणि त्यातून एक चांगलं विचारमंथन घडेल असं मला वाटतं. त्यामुळे रवींद्र रू. पं. यांच्या परवानगीने हे लेख इथे मी शेअर करतो आहे.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

बॉक्सिंग या खेळप्रकारावर बंदी घातली पाहिजे!

प्रियांका चोप्रा या सेलिब्रिटीने काम केलेल्या मेरी कोम हा चित्रपट खोर्‍यांने पैसे कमवत असताना किंवा सरितादेवी या महिला बॉक्सिंगपटूच्या अगम्य वागणुकीमुळे माध्यमांना चघळण्यासाठी भरपूर काही मिळत असताना बॉक्सिंग हा खेळच नको अशी भाषा करणार्‍याला वेड्यात काढण्याची शक्यता जास्त आहे.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

पुस्तक परिचय - अंधारछाया कादंबरी

पुस्तक परिचय - अंधार छाया

प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या छायेत अंधार लपलेला असतो. त्याचा शोध घेणारी आत्मनिवेदनात्मक, सत्य घटनेवर आधारित कादंबरी... कै ती दादांना व कै आईस सादर समर्पित...

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स