ऑगस्ट दिनवैशिष्ट्य
ऑगस्ट
१ | २ | ३ | ४ | ५ |
६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ |
१६ | १७ | १८ | १९ | २० |
२१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |
१ ऑगस्ट
जन्मदिवस : पहिली व्यावसायिक स्त्री खगोलशास्त्रज्ञ मारीया मिशेल (१८१८), लेखक हर्मन मेलव्हिल (१८१९), पत्रकार अच्युत कोल्हटकर (१८७९), हाफनियम शोधणारा, प्राण्यांच्या चयापचयाच्या अभ्यासासाठी किरणोत्सर्गी पदार्थ वापरण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता ग्यॉर्गी हेव्हेसी (१८८५), क्रिकेटपटू मोहम्मद निसार (१९१०), सिनेनिर्माते, दिग्दर्शक व अभिनेता मा. भगवान (१९१३), लेखक श्री. ज. जोशी (१९१५), लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (१९२०), समाजशास्त्रज्ञ पिएर बूर्दिअ (१९३०), अभिनेत्री मीना कुमारी (१९३२), फॅशन डिझायनर इव्ह सँ लोराँ (१९३६), क्रिकेटपटू यजुर्वेंद्रसिंग (१९५२), क्रिकेटपटू अरुणलाल (१९५५)
पुण्यस्मरण : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (१९२०), कॉर्टीझोन हा अंतःस्राव, कृत्रिमरित्या क जीवनसत्त्व बनवण्याची कृती शोधणारा नोबेलविजेता तादीयुश राईखस्टाईन (१९९६), लेखक निरद चौधुरी (१९९९), ज्ञानपीठ विजेते कवी अली सरदार जाफरी (२०००)
---
राष्ट्रदिन : बेनिन (१९६०), स्वित्झर्लंड
मुक्ती दिन : त्रिनिदाद आणि टोबेगो, बार्बडोस
१६९१ : अमेरिकेत पहिले आफ़्रिकन गुलाम आणले गेले.
१७७४ : जोसेफ प्रीस्टली व कार्ल विल्हेम शीलं यांनी ऑक्सिजन या मूलद्रव्याचा शोध लावला.
१८०० : ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंड या राज्यांचे युनायटेड किंग्डममध्ये विलीनीकरण.
१८३४ : ब्रिटिश साम्राज्याने गुलामगिरीस बंदी असल्याचे जाहीर केले.
१९०२ : अमेरिकेने फ्रान्सकडून पनामा कालवा बांधून वापरण्याचे हक्क विकत घेतले.
१९४४ : अॅन फ्रँकने आपल्या रोजनिशीत शेवटची नोंद केली.
१९४४ : पोलंडची राजधानी वर्षावा (वॉरसॉ)मध्ये नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव.
१९६० : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये हलवली गेली.
१९६२ : सर्वोदयी समाजाचे नेते शंकरराव देव यांनी सासवड आश्रमापासून भूदान चळवळीच्या महाराष्ट्रातल्या कार्याची सुरुवात केली.
१९६७ : इस्राएलने पूर्व जेरुसलेम बळकावले.
१९७१ : चंद्रजन्माच्या वेळचा दगड अपोलो-१५ ला सापडला.
१९८१ : संगीत वाहिनी एमटीव्हीची सुरूवात.
२०१२ : पुण्यात चार कमी क्षमतेचे बॉंबस्फोट; मनुष्यहानी नाही.
२ ऑगस्ट
जन्मदिवस: 'स्वातंत्र्यदेवते'चा शिल्पकार फ्रेदेरिक बार्तोल्दी (१८३४), रसायनशास्त्रज्ञ, देशभक्त प्रफुल्लचंद्र रे (१८६१), तिरंगा बनवणारे स्वातंत्र्यसैनिक पिंगली वेंकय्या (१८७६), लेखक पु. शि. रेगे (१९१०), अभिनेता पीटर ओ'टूल (१९३२), विचारवंत व लेखक गो. पु. देशपांडे (१९३८), क्रिकेटपटू अर्शद अयुब (१९५८)
पुण्यस्मरण: पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक सखाराम बापू बोकील (१७८१), चित्रकार थॉमस गेन्सबरो (१७८८), दूरध्वनी संशोधक अलेक्झांडर ग्रॅहम बेल (१९२२), सिनेदिग्दर्शक फ्रिट्झ लांग (१९७६)
---
प्रजासत्ताक दिन : मॅसडोनिया
१८५८ : ईस्ट इंडिया कंपनी बंद करून व्हिक्टोरिया राणीने भारताच्या सत्तेची सूत्रे स्वतःकडे घेतली.
१८६९ : जपानमधील वर्णसंस्थेचा शेवट.
१९३० : मुंबईत सरदार वल्लभभाई पटेल, पं. मदनमोहन मालवीय, जयरामदास दौलतराम यांना ब्रिटिशांनी अटक केली.
१९३२ : कार्ल अँडरसनने पॉझिट्रॉनचा (इलेक्ट्रॉनचा प्रतिकण) शोध लावला.
१९३४ : अडॉल्फ हिटलर जर्मनीच्या फ्यूररपदी.
१९३९ : आल्बर्ट आईनस्टाईन आणि लेओ शिलार्ड यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहून अणुबॉंब बनवण्याची विनंती केली.
१९५३ : सोविएत रशियाने हायड्रोजन बाँबचा स्फोट केला.
१९५५ : 'वेल्क्रो'चे पेटंट घेतले गेले.
१९५९ : लिटल थिएटरची स्थापना.
१९८० : आसाममधल्या परदेशी नागरिक संदर्भातल्या, दहा महिने सुरू असलेल्या आंदोलनात तडजोडीचा मार्ग निघाला.
१९८७ : एल.टी.टी.ई. ला भारत-श्रीलंका करार अमान्य; त्यातून नवे प्रश्न उद्भवले.
१९८७ : रशियाने भूगर्भात दोन अणुचाचण्या केल्या.
१९९० : इराकने कुवेतवर आक्रमण केले.
जन्मदिवस: सदाशिवराव भाऊ पेशवे (१७३०), हिंदीच्या 'खडी बोली'त कविता प्रथम लिहीणारे मैथिली शरण गुप्त (१८८६), आधुनिक हिंदी एकांकिकाकार, कवी, कादंबरीकार उदयशंकर भट (१८९८), प्रतिसरकारचे जनक क्रांतिसिंह नाना पाटील (१९००), गीतकार, कवी शकील बदायुनी (१९१६), संगीतकार जयदेव (१९१९), रहस्यकथालेखक पी. डी. जेम्स (१९२०), क्रिकेटपटू अपूर्व सेनगुप्ता (१९३९), क्रिकेटपटू बलविंदर सिंग संधू (१९५६), सिनेदिग्दर्शक मणी शंकर (१९५७), मोठ्या प्रमाणावर रेणूंचा वर्णपट मिळवण्याची पद्धत शोधणारा नोबेलविजेता कोईची तनाका (१९५९), गोलंदाज गोपाल शर्मा (१९६०)
पुण्यस्मरण: सूतकताई प्रक्रिया संशोधक रिचर्ड आर्कराईट (१७८२), लेखक जोसेफ कॉनरॅड (१९२४), ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर (१९३०), हरितद्रव्य आणि इतर वनस्पती रंगद्रव्यांचा अभ्यास करणारा नोबेलविजेता रिचर्ड विलस्टेटर (१९४२), फ्रेंच लेखिका कोलेत (१९५४), छायाचित्रकार आँरी कार्तिए-ब्रेसाँ (२००४), लेखिका, समीक्षक सरोजिनी वैद्य (२००७), नोबेलविजेता लेखक अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन (२००८), भरतनाट्यम नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती (२०२४)
---
स्वातंत्र्यदिन : नायजर (१९६०)
१४९२ : कोलंबस पालोका बंदरातून भारताकडे जाणारा सागरी मार्ग शोधायला निघाला.
१६७७ : शिवाजीमहाराजांच्या दक्षिणस्वारीत येलवान्सारचा किल्ला महाराजांच्या ताब्यात आला.
१९५४ : दादरा-नगर हवेली पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त.
१९५८ : 'नॉटिलस' ही अमेरिकेची आण्विक पाणबुडी बर्फाखालून उत्तर ध्रुवाखालून प्रवास करणारी पहिली नौका ठरली.
१९९६ : भारतीय टेनिसपटू लिअँडर पेस याने अटलांटा येथील शतकमहोत्सवी ऑलिंपिक स्पर्धेत ब्राँझ पदक मिळविले.
१९९८ : संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या जमिनीवरून हवेत मारा करणार्या बहुवेधी 'आकाश' या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.
२००३ : अमेरिकेतल्या अँग्लिकन चर्चने समलिंगी बिशपच्या नियुक्तीला मान्यता दिली.
जन्मदिवस : कवी पर्सी शेली (१७२९), व्हेन आकृत्यासाठी प्रसिद्ध गणिती जॉन व्हेन (१८३४), वृत्तपत्र प्रकाशक, कॉंग्रेस पक्षाच्या संस्थापकांपैकी एक सर फिरोजशहा मेहता (१८४५), नोबेलविजेता लेखक नट हॅम्सन (१८५९), महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री महादेव भट्ट अभ्यंकर (१८६३), लेखक प्रा. ना. सी. फडके (१८९४), जाझ गायक व ट्रंपेटवादक लुई आर्मस्ट्राँग (१९०१), हॉकीपटू उधमसिंग (१९२८), गायक, संगीतकार, अभिनेता किशोरकुमार (१९२९), क्रिकेटपटू नरेन ताम्हाणे (१९३१)
पुण्यस्मरण : परीकथालेखक हान्स क्रिस्टिअन अँडरसन (१८७५), लेखिका डॉ. शरदिनी डहाणूकर(२००२), रंगकर्मी, नाट्यशिक्षक आणि कलासंग्राहक इब्राहिम अल्काझी (२०२०)
---
१७८९ : फ्रान्सच्या राष्ट्रीय सभेने जहागिरदारीची पद्धत बंद करण्याचे ठरवले.
१९५६ : अप्सरा ही तुर्भे येथील अणुभट्टी कार्यान्वित झाली.
१९६९ : भारतातील १४ प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा ठराव लोकसभेत मंजूर.
१९७१ : मूलभूत हक्कांसकट घटनेत कुठलीही दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेस देणारी २४वी घटनादुरुस्ती लोकसभेत मंजूर.
१९७२ : युगांडातून आशियाई लोकांनी चालते व्हावे असा आदेश युगांडाचा हुकूमशहा 'दादा'इदी अमीन याने दिला.
१९९३ : राजेंद्र खंडेलवाल या पुण्याच्या अपंग साहसवीराने लडाखमधील सर्वात उंच खार्दुंग ला (खिंड) चार सहकार्यांसह स्कूटरवरून पार केली.
२००१ : 'मरणोत्तर त्वचादान' करून दुसऱ्यांना जीवनदान देणारी भारतातील पहिली 'स्किन बँक' मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन.
२००४ : 'नासा' ने आपल्या 'अल्टेक्स ३०००' या महासंगणकाला भारतीय अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्याचे ठरविले.
जन्मदिवस : गणितज्ञ नील्स एबेल (१८०२), फ्रेंच कथाकार गी द मोपासाँ (१८५०), ग्रंथकार, इतिहाससंशोधक वासुदेवशास्त्री खरे (१८५८), बुद्धिवादी विचारवंत नारायण गोविंद चापेकर (१८६९), महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार (१८९०), लोकगीतांचे संग्राहक, कथाकार नरेश भिकाजी कवडी (१९२२), लेखक शंकर पाटील (१९२६), चांद्रवीर नील आर्मस्ट्रॉंग (१९३०), लेखिका विजया राजाध्यक्ष (१९३३), क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद (१९६९), अभिनेत्री काजोल (१९७५)
पुण्यस्मरण : समाजशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, राजकीय सैद्धांतिक, लेखक फ्रेडरिक एंगल्स (१८२०), अभिनेत्री मेरिलिन मन्रो (१९६२), अभिनेता रिचर्ड बर्टन (१९८४), नेते अच्युतराव पटवर्धन (१९९२), पहिले शतकवीर लाला अमरनाथ (२०००), अभिनेता अॅलेक गिनेस (२०००), गायिका, अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे (२००१)
---
स्वातंत्र्यदिन : बर्किना फासो (१९६०)
१८८८ : बर्था बेंझ हिने मॅनहाईम ते फॉरझाईम आणि परत अशी (१९४ किमी) कारमधून फेरी मारून जगातली पहिली लांबची कारट्रिप केली.
१८९७ : थॉमस अल्वा एडिसनने पहिला जाहिरातपट निर्माण केला.
१९१४ : जगातला पहिला विद्युतचलित वाहतूक सिग्नल अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरात सुरू झाला.
१९३९ : पहिली अटलांटिकपार हवाई टपालसेवा सुरु झाली.
१९६० : 'मुघल-ए-आझम' चित्रपट प्रदर्शित.
१९६२ : दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेलांना कैद. २८ वर्षांनी १९९० मध्ये सुटका
१९६३ : युके, युएस आणि सोव्हिएत संघाने अणूचाचणी बंदी करारावर सह्या केल्या.
१९६५ : पाकिस्तानी सैनिकांनी ताबारेषा ओलांडल्यामुळे भारत-पाकिस्तान युद्धाला सुरुवात.
१९९४ : 'हम आप के है कौन' चित्रपट प्रदर्शित.
१९९७ : रशियाच्या दोघा अवकाशयात्रींना घेऊन 'सोयूझ' हे यान 'मीर' अंतराळ स्थानकाकडे रवाना.
२००६ : मराठी विकिपिडीयाने ५,००० लेखांचा टप्पा ओलांडला.
२०१९ : जम्मू काश्मीर राज्याला विशेषत्व देणारे घटनेतील कलम ३७० रद्दबातल.
जन्मदिवस : कवी टेनिसन (१८०९), अस्थिशास्त्राचा पाया घालणारा अँड्रयू स्टील (१८२८), पेनिसिलिनच्या शोधासाठी नोबेल पुरस्कार मिळवणारा अलेक्झांडर फ्लेमिंग (१८८१), संगीतसमीक्षक व लेखक गोपाळ कृष्ण भोबे (१९२१), लेखिका योगिनी जोगळेकर (१९२५), पॉप आर्ट चळवळ सुरू करणारा बहुमाध्यमकलाकार अँडी वॉरहॉल (१९२८), मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग (१९५९)
पुण्यस्मरण : चित्रकार दिएगो व्हेलास्केझ (१६६०), मराठी ग्रंथकार कृष्णाजी केशव उर्फ कृष्णशास्त्री राजवाडे (१९०१), स्वातंत्र्यसैनिक विचारवंत सुरेंद्रनाथ बॅनर्जी (१९२५), संगीत दिग्दर्शक वसंत पवार (१९६५), मेदाचा चयापचय आणि नियमनाबद्दल संशोधन करणारा नोबेलविजेता फिओदोर फेलिक्स कॉनरॅड लायनन (१९७९), शाहीर पुंडलिक श्रीपतराव फरांदे (१९९६), गणितज्ज्ञ व संगणकतज्ज्ञ एडगर डाइक्स्ट्रा (२००२)
---
हिरोशिमा दिवस
स्वातंत्र्यदिन : बोलिव्हिया (१८२५), जमैका (१९६२)
१७३२ : खेळताना वेळ जाऊ नये म्हणून अर्ल ऑफ सॅंडविचने ब्रेडच्या दोन स्लाईसमध्ये मांसाचे तुकडे घालून खाल्ले. या प्रकाराला पुढे 'सॅंडविच' म्हणण्यात येऊ लागले.
१८०३ : इंग्रज अधिकार जनरल वेलस्ली याने मराठी सरदार शिंदे आणि होळकरांविरोधात आघाडी उघडली. त्यांच्यात फूट पाडून पुढे त्यांची सत्ता संपवली.
१९०८ : अश्मयुगीन कलेचा एक महत्त्वाचा नमुना 'व्हीनस ऑफ विलेनडॉर्फ'चा शोध.
१९२६ : गरट्र्यूड एडर्ली ही इंग्लिश खाडी पोहून पार करणारी पहिली महिला ठरली.
१९४५ : जगातला पहिला अणुबॉंब अमेरिकेने हिरोशिमावर टाकला. सुमारे ७०,००० मृत.
१९८६ : पहिल्या भारतीय टेस्टटयूब बेबीचा मुंबईत जन्म.
१९९१ : टिम बर्नर्स-ली ह्यांनी 'वर्ल्ड वाईड वेब'बद्दल एक निबंध http://info.cern.ch येथे प्रकाशित केला. ही इंटरनेटची सुरुवात मानली जाते.
२०१० : लडाखमध्ये ढगफुटी; सुमारे २५० मृत.
७ ऑगस्ट
जन्मदिवस: भारतीय चित्रकलेच्या पुनरूज्जीवनाचे आद्य प्रणेते, चित्रकार अवनींद्रनाथ टागोर (१८७१), भारतीय हरितक्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन (१९२५), लेखिका चित्रा बेडेकर (१९४८), गायक सुरेश वाडकर (१९५४), विकिपीडीयाच्या संस्थापकांपैकी एक जिमी वेल्स (१९६६), अभिनेत्री शर्लिझ थेरॉन (१९७५),
पुण्यस्मरण: भारतीय तत्त्वज्ञ, कलावंत रवींद्रनाथ टागोर (१९४१), गायिका अंजनीबाई मालपेकर(१९७४)
---
स्वातंत्र्यदिन : आयव्हरी कोस्ट (१९६०)
१९४४ : हार्वर्ड मार्क १ नावाने प्रसिद्ध असणारा, आज्ञावलीनुसार नियंत्रित होणारा कॅलक्यूलेटर आयबीएमने तयार केला.
१९४७ : मुंबई महापालिकेने बेस्ट कंपनी आपल्या अधिकारात घेतली; बेस्ट सेवा सुरू.
१९४८ : उस्मानाबाद जिल्ह्यात ४२ खेड्यांनी निजामाची सल्तनत झुगारून दिली.
१९८७ : आरती प्रधान १२ तास २८ मिनिटांत इंग्लिश खाडी पोहून जाण्यात यशस्वी. आशिया खंडातील पुरुष व महिलांमधील सर्वात लहान जलतरणपटू बहुमानाची ती मानकरी ठरली.
जन्मदिवस : पुलित्झर पुरस्कारविजेती लेखिका मार्जरी रॉलिंग्ज (१८९६) अणुवैज्ञानिक पॉल डिरॅक (१९०२), हॉकीपटू ध्यानचंद (१९०५), गायिका सिध्देश्वरी देवी (१९०८), लेखक व अभिनेता भीष्म सहानी (१९१५), वैद्यकशास्त्रज्ञ वुलिमीरी रामलिंगस्वामी (१९२१), व्हायोलिनवादक अनंत जोग (१९२५), लेखक शंकर पाटील (१९२६), संगीतदिग्दर्शक, गायक भूपेन हजारिका (१९२६), भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ रॉजर पेनरोज (१९३१), अभिनेते दिग्दर्शक दादा कोंडके (१९३२), अभिनेता डस्टिन हॉफमन (१९३७), क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई (१९४०), क्रिकेटपटू सुधाकर राव (१९५२), क्रिकेटपटू ॲबी कुरूविला (१९६८), टेनिसपटू रॉजर फेडरर (१९८१)
पुण्यस्मरण : जीवशास्त्रज्ञ अर्न्स्ट हेकेल (१९१९), कृषितज्ञ पांडुरंग पाटील (१९७८), उद्योगपती नवल गोदरेज (१९९०), लेखिका सुमती क्षेत्रमाडे (१९९८)
---
भारत छोडो दिन.
जागतिक मांजर दिवस.
१५०९ : सम्राट कृष्णदेवरायचा राज्याभिषेक व विजयनगर साम्राज्याची स्थापना.
१५७६ : खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे याच्या वेधशाळेची पायाभरणी. त्या काळात युरोपातील ही सर्वात महत्त्वाची वेधशाळा मानली जाई.
१८७६ : थॉमस एडिसनला स्वस्त छपाईयंत्राचे (मिमेओग्राफ) पेटंट मिळाले.
१९०८ : राईट बंधूंच्या यशस्वी विमानोड्डाणांपैकी पहिले उड्डाण.
१९४२ : 'भारत छोडो'चा ठराव राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात मंजूर होऊन गांधीजींच्या नेतृत्वाखाली अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय.
१९४९ : 'भूतान' राष्ट्राची स्थापना.
१९६३ : पक्षाच्या हितासाठी काम करण्याकरिता प्रमुख नेत्यांनी मंत्रिपदे सोडावीत, ही कामराज योजना जाहीर.
१९६७ : 'आसियान'ची (असोशिएशन ऑफ साऊथईस्ट एशियन नेशन्स) स्थापना.
१९७८ : 'पायोनियर-२' हे यान शुक्राच्या दिशेने निघाले.
१९८५ : 'ध्रुव' ही भारतातील सर्वात मोठी 'फास्ट ब्रीडर' संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित.
१९९४ : पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय सुरू केले.
१९९६ : 'नाग' या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची चंडीपूर येथील तळावर यशस्वी चाचणी.
जन्मदिवस : मुलांच्या वर्तनवाढीचा अभ्यास करणारा मानसशास्त्रज्ञ जॉं पिआजे (१८९६), लेखक व्ही.के. गोकाक (१९०९), क्रिकेटपटू खुरशेद मेहेरहोमजी (१९११), ताऱ्यांच्या अंतरंगाबद्दल संशोधन करणारा नोबेलविजेता विल्यम आल्फ्रेड फाऊलर (१९११), कवी फिलिप लार्किन (१९२२), टेनिसपटू रॉड लेव्हर (१९३८), गायिका व्हिटनी ह्यूस्टन (१९६३), अभिनेता एरिक बाना (१९६८), अभिनेता महेश बाबू (१९७४), अभिनेत्री ओद्रे तोतू (१९७८), 'पुसी रायट'मधली कार्यकर्ती येकातेरीना सामुत्सेविच (१९८२)
पुण्यस्मरण : चित्रकार हिएरॉनिमस बॉश (१५१६), चित्रकार खाइम सूतीन (१९४३), नोबेलविजेता साहित्यिक हर्मन हेसं (१९६२), नाटककार जो ऑर्टन (१९६७), संगीतकार दिमित्री शोस्ताकोव्हिच (१९७५)
---
जागतिक मूलनिवासी दिन.
राष्ट्रदिन : सिंगापूर (१९६५)
ऑगस्ट क्रांती दिन
११७३ : पिसाच्या मनोऱ्याचे बांधकाम सुरू. बांधकाम संपण्यास २०० वर्षे लागलेला हा मनोरा चुकीने कलता बांधला गेला.
१३२९ : कोल्लम, केरळ येथे भारतातील पहिल्या ख्रिस्ती डायोसिजची उभारणी.
१८५४ : हेन्री डेव्हिड थोरोचे पुस्तक 'वॉल्डन' प्रकाशित.
१८९२ : एडिसनला टेलिग्राफचे पेटंट मिळाले.
१९२५ : काकोरीला स्वातंत्र्यसैनिक रामप्रसाद बिस्मिल आणि अश्फाक उल्लाह खान यांनी रेल्वेगाडी लुटली.
१९३६ : बर्लिन ऑलिंपिकदरम्यान कृष्णवर्णीय खेळाडू जेसी ओवेन्सने चौथे सुवर्णपदक मिळवले. तत्कालीन सत्ताधारी हिटलरच्या आर्यन वंशश्रेष्ठत्वाच्या मांडणीला ही जोरदार चपराक होती.
१९४२ : 'चले जाव' आंदोलनामुळे म. गांधींना मुंबईत अटक.
१९४५ : अमेरिकेने नागासाकी शहरावर अणुबाँब टाकला. सुमारे ७५,००० मृत.
१९७१ : भारत व सोव्हिएत रशियादरम्यान मैत्री करार.
१९७४ : वॉटरगेट प्रकरणात अमेरिकेचे अध्यक्ष निक्सन दोषी ठरल्यामुळे त्यांचा राजीनामा.
जन्मदिवस : नेस्ले कंपनी सुरू करणारा हेन्री नेस्ले (१८१४), संगीतकार, संगीतज्ञ पं. विष्णू नारायण भातखंडे (१८६०), राजकारणी व्ही. व्ही. गिरी (१८९४), अभिनेता आंतोनियो बांदेरास (१९६०), बुद्धिबळपटू दिप्तयन घोष (१९९८)
पुण्यस्मरण : संगीतकार खेमचंद प्रकाश (१९५०), लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य (१९८६), साहित्य अकादमी पुरस्कारविजेते विनोदी लेखक हरिशंकर परसाई (१९९५), इतिहासकार, समीक्षक आचार्य बलदेव उपाध्याय (१९९९), साहित्य अकादमी पुरस्कारविजेते कवी, निबंधकार, संपादक सुरेश दलाल (२०१२)
---
स्वातंत्र्यदिन : इक्वेडोर (१८०९)
आंतरराष्ट्रीय जैविक डिझेल दिन
१५१९ : पृथ्वीला वळसा घालणार्या मॅजेलानच्या सफरीची सेव्हीलमधे सुरुवात.
१६७५ : रॉयल ग्रीनीच वेधशाळेची पायाभरणी.
१७९३ : लुव्रच्या संग्रहालयाचे उद्घाटन.
१८४६ : जेम्स स्मिथसनच्या ५,००,००० डॉलरच्या देणगीने स्मिथसॉनियन संस्थेची स्थापना.
१८९७ : 'अॅस्पिरिन'चे (अॅसेटिल सॅलिसिलिक अॅसिड) प्रयोगशाळेत प्रथम यशस्वी उत्पादन.
१९३२ : पाच किलोवर वजन असणारा कॉंड्राईट प्रकारचा अशनी निदान सात तुकड्यांमध्ये विभागून अमेरिकेत आदळला.
१९६० : अंटार्क्टिकावर आंतरराष्ट्रीय मालकी प्रस्थापित.
१९६१ : तणनाशक एजंट ऑरेंजचा व्हिएतनाम युद्धात प्रथम उपयोग; ५० लाख एकर जमीन उजाड; दीड लाख मुलांमध्ये जन्मतः दोष; चार लाख मृत्यू.
१९६२ : स्पायडर मॅनचे 'अमेझिंग फॅंटसी'च्या पंधराव्या प्रकाशनात पदार्पण.
१९८६ : निवृत्त लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांची खलिस्तानी अतिरेक्यांनी हत्या केली.
१९८८ : टेलिफोन टॅपिंग प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांचा राजीनामा.
१९९० : मॅजेलान प्रोब शुक्रावर पोहोचले.
१९९४ : इस्लामविरोधी लिखाण केल्याबद्दल निघालेल्या मृत्युदंडाच्या फतव्यामुळे लेखिका तस्लिमा नसरीन ह्यांचे स्वीडनमध्ये आगमन.
२००३ : अवकाशातले पहिले लग्न - अंतराळवीर युरी मालेंचेन्को
जन्मदिवस : जिम्नॅस्टिकचा जनक फ्रेडरिक लुडविग यान (१७७८), बेरीबेरी रोगाचे कारण शोधून काढणारा नोबेलविजेता ख्रिस्तियन आईकमन (१८५८), लेखिका इनिड ब्लायटन (१८९७), लेखक अॅलेक्स हेली (१९२१), लेखक वि. स. वाळिंबे (१९२८), 'अॅपल'चा एक संस्थापक स्टीव्ह वॉझनियाक (१९५०), क्रिकेटपटू, प्रशिक्षक एम. व्ही. नरसिंहराव (१९५४), क्रिकेटपटू, पंच यशपाल शर्मा (१९५४), क्रिकेटपटू, प्रशिक्षिका अंजू जैन (१९७४)
पुण्यस्मरण : चित्रकार हान्स मेमलिंग (१४९४), क्रांतिकारक खुदीराम बोस (१९०८), चित्रकार जॅकसन पोलॉक (१९५६), मानववंशशास्त्रज्ञ, साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका इरावती कर्वे (१९७०), विशेष ऑलिंपिकची पायाभरणी करणाऱ्यांपैकी एक युनिस केनेडी श्रीव्हर (२००९), भाषाविद भद्रीराजु कृष्णमूर्ती (२०१२), अभिनेता रॉबिन विलिअम्स (२०१४), नोबेलविजेते लेखक व्ही.एस. नायपॉल (२०१८)
---
स्वातंत्र्यदिन : चाड (१९६०)
१९१९ : जर्मनीत वायमार प्रजासत्ताकाची सुरुवात. दोन महायुद्धांच्या काळात हे एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र होते.
१९४२ : हॉलिवूड अभिनेत्री हेडी लामार आणि संगीतकार जॉर्ज अँटहाइल यांना वाय-फाय तंत्रज्ञानासंदर्भात प्राथमिक पेटंट दिले गेले.
१९४३ : रिझर्व बँकेचे पहिले भारतीय वंशाचे गव्हर्नर म्हणून सी. डी. देशमुख नियुक्त झाले.
१९४७ : मुहम्मद अली जीनांचे पाकिस्तानी संसदेसमोर भाषण; धार्मिक स्वातंत्र्य, कायद्याचे राज्य आणि समानता आणणारे सर्वसमावेशक सरकार आणण्याची ग्वाही.
१९६१ : दादरा आणि नगरहवेलीचा स्वातंत्र्यदिन; भारतात समावेश.
१९७९ : गुजरातमधील मोरवी धरण फुटले; २,००० ते १५,००० मृत.
१९९९ : गेल्या शतकातले शेवटचे खग्रास सूर्यग्रहण; भारतातूनही दिसले.
१२ ऑगस्ट
जन्मदिवस: चरित्रकार व वाङ्मय विवेचक बाळकृष्ण गणेश खापर्डे (१८८०), मूकपट आणि बोलक्या चित्रपटांचा निर्माता, दिग्दर्शक सेसील बी. डेमील (१८८१), चित्रकार, लिथोग्राफर जॉर्ज बेलोज (१८८२), क्वांटम सिद्धांताचा पाया रचणारा अर्विन श्रोडींजर (१८८७), चित्रकार ना. श्री. बेंद्रे (१९१०), भौतिकशास्त्रज्ञ, भारतीय अंतराळकार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई (१९१९), शिल्पकार बी. आर. उर्फ अप्पासाहेब खेडकर (१९२६), मराठी कवी व लेखक फ. मु. शिंदे (१९४८), गिटारवादक व गायक मार्क नाॅफलर (१९४९), बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे (१९५९), माजी टेनिसपटू पीट सांप्रास (१९७१),
पुण्यस्मरण: कवी आणि चित्रकार विल्यम ब्लेक (१८२७), रेल्वेचे जनक जॉर्ज स्टीफन्सन (१८४८), दानशूर उद्योजक सर विठ्ठलदास ठाकरसी (१९२२), लेखक इयान फ्लेमिंग (१९६४), मेंदूच्या भागांचे कार्य शोधून काढणारा नोबेलविजेता वॉल्टर रुडॉल्फ हेस (१९७३), पेनिसिलिनवर संशोधन करणारा नोबेलविजेता अर्न्स्ट बोरीस चेन (१९७९), चित्रपटनिर्माता, दिग्दर्शक, अभिनेता हेन्री फोंडा (१९८२), वर्गभेद, वसाहतवादावर टीका करणारा कलाकार जॉं-मिशेल बास्किआ (१९८८), ट्रान्झिस्टर शोधणाऱ्यांपैकी एक नोबेलविजेता विल्यम शॉकली (१९८९), छायाचित्रकार प्रबुद्ध दासगुप्ता (२०१२), अभिनेत्री लॉरेन बॅकॉल (२०१४)
---
जागतिक युवा दिन
ययाती तारकासमूहात उल्कावर्षाव
१८५१ : आयझॅक सिंगरला शिलाई यंत्राचे पेटंट मिळाले.
१८७७ : असॅफ हॉल याला मंगळाचा दुसरा उपग्रह डीमॉस याचा शोध लागला.
१९०८ : पहिली 'मॉडेल-टी' गाडी तयार झाली.
१९४२ : 'चले जाव' चळवळीत आप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार; दोन ठार, १६ जखमी .
१९४६ : काँग्रेसचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांना सरकार स्थापन करण्यासाठी व्हाईसरॉयने बोलावले.
१९४८ : लंडन ऑलिंपिकमध्ये भारताने हॉकीचे सुवर्णपदक मिळवले.
१९५३ : सोव्हिएत संघाने पहिल्या अणुबॉंबची चाचणी केली.
१९६१ : शीतयुद्धाचे प्रतीक असलेल्या बर्लिन भिंतीचे बांधकाम पूर्व जर्मनीने सुरू केले.
१९६६ : "बीटल्स येशूपेक्षा अधिक प्रसिद्ध आहेत" या उद्गाराबद्दल जॉन लेननने पत्रकार परिषदेत माफी मागितली.
१९७८ : चीन आणि जपान यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
१९८१ : आय.बी.एम.चा पहिला वैयक्तिक संगणक (मॉडेल ५१५०) बाजारात आला.
१९९० : सू हेंड्रिक्सनला टिरॅनोसोरस रेक्सचा सगळ्यात मोठा सांगाडा सापडला.
१९९८ : स्विस बँकांनी नाझी वंशविच्छेदामधून वाचलेल्यांना सव्वाशे कोटी डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.
२००४ : अमेरिकेत न्यू जर्सी राज्याच्या राज्यपाल, जेम्स इ. मकग्रीव्हीने राजीनामा देऊन आपण 'गे अमेरिकन' असल्याचा उच्चार केला.
२०१० : रिक्षाचालकांच्या मग्रूरीविरोधात मुंबईत प्रवाशांनी स्वयंस्फूर्तीने 'मीटर जॅम' आंदोलन पुकारले.
२०१२ : लंडन ऑलिंपिकमध्ये पैलवान सुशील कुमार कुस्तीत दोन रौप्य पदके जिंकून दोन वैयक्तिक पदके जिंकणारा पहिला भारतीय ठरला.
२०२२ : लेखक सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेत चाकूहल्ला.
जन्मदिवस : क्लोरोफिलच्या कार्याचे स्पष्टीकरण शोधणारा नोबेलविजेता रिचर्ड विलस्टेटर (१८७२), दूरचित्रवाणीचे संशोधक जॉन लोगी बेअर्ड (१८८८), बालकवी तथा त्र्यंबक बापूजी ठोंबरे (१८९०), अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आचार्य प्रल्हाद केशव अत्रे (१८९८), सिनेदिग्दर्शक आल्फ्रेड हिचकॉक (१८९९), लेखक विश्राम बेडेकर (१९०६), विषाणूंवर संशोधन करणारा नोबेलविजेता साल्व्हादोर लूरीया (१९१२), इन्सुलिन, डीएनएवर संशोधन करणारा दुहेरी नोबेलविजेता फ्रेडरीक सँगर (१९१८), अभिनेत्री वैजयंतीमाला (१९३६), अभिनेत्री श्रीदेवी (१९६३)
पुण्यस्मरण : समाजसेवी राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर (१७९५), चित्रकार यूजीन दलाक्र्वा (१८६३), चित्रकार जॉन एव्हरेट मिले (१८९६), आधुनिक रुग्ण-परिचर्याशास्त्राच्या संस्थापिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल (१९१०), किण्वनावर संशोधन करणारा नोबेलविजेता एदुआर्द बुकनर (१९१७), लेखक एच. जी. वेल्स (१९४६), लेखक पु. भा. भावे (१९८०), सिनेदिग्दर्शक, भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे (FTII) प्रथम प्राचार्य गजानन जागिरदार (१९८८), विचित्रवीणावादक गोपाल शंकर मिश्रा (१९९९), पॉप गायिका नाझिया हसन (२०००), कलादिग्दर्शक केशव दत्तात्रेय तथा दादा महाजनी (२००३)
---
डावखुऱ्यांचा दिवस
स्वातंत्र्यदिन : सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक (१९६०)
१८९८ : पृथ्वीजवळ असणाऱ्या अवकाशस्थ वस्तूंपैकी पहिला दगड (४३३ इरॉस) सापडला.
१९४३ : रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून सी. डी. देशमुखांची नियुक्ती.
१९५६ : भारतीय लोकसभेत राष्ट्रीय महामार्ग बिल पास झाले.
१९६० : उपग्रह वापरून पहिला दूरध्वनी संवाद घडला.
१९६१ : ईस्ट जर्मनीने सीमा बंद केल्या. बर्लिन भिंतीचे बांधकाम सुरू.
१९६६ : चीनचा सर्वेसर्वा माओने सांस्कृतिक क्रांती जाहीर केली. ह्या अंतर्गत माओने आपल्या विरोधकांचा नायनाट केला; अंदाजे २० लाख मृत.
जन्मदिवस : चुंबकीय क्षेत्र आणि विद्युतवहनावर संशोधन करणारा हान्स ओरस्टेड (१७७७), मानसशास्त्रज्ञ रिचर्ड व्हॉन क्राफ्ट-एबिंग (१८४०), नोबेलविजेता लेखक जॉन गॅल्सवर्दी (१८६७), अभिनेता गणपतराव जोशी (१८६७), लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या, काँम्रेड गोदावरी परुळेकर (१९०८), माजी हवाईदलप्रमुख हृषिकेश मुळगावकर (१९२०), लेखक जयवंत दळवी (१९२५), 'अॅस्टेरिक्स'चा लेखक रने गॉसिनी (१९२६), लेखक दया पवार (१९३५), लेखिका अंजली ठकार (१९३६), सिनेदिग्दर्शक विम वेंडर्स (१९४५), अभिनेता जॉनी लिव्हर (१९५६), बास्केटबॉलपटू मॅजिक जॉन्सन (१९५९), अभिनेत्री एमॅन्युएल बेआर (१९६३), अभिनेत्री हाल बेरी (१९६६), क्रिकेटपटू प्रवीण अमरे (१९६८)
पुण्यस्मरण : नाटककार बेर्टोल्ट ब्रेश्त (१९५६), कृत्रिम किरणोत्साराचा शोध लावणारा नोबेलविजेता फ्रेदेरिक जोलिओ-क्यूरी (१९५८), पहिले भारतीय ऑलिंपिक पदकविजेते कुस्तीगीर खाशाबा जाधव (१९८४), नोबेलविजेता लेखक एलिआस कॅनेट्टी (१९९४), नोबेलविजेता कवी चेस्लाव्ह मिलोश (२००४), अभिनेता शम्मी कपूर (२०११)
---
स्वातंत्र्य दिन : पाकिस्तान (१९४७), बहारेन (१९७१)
१६७२ : छत्रपती शिवाजीमहाराजांचा खांदेरी घेण्याचा प्रयत्न फसला. १६७५ च्या ऑगस्ट महिन्यातच तो यशस्वी झाला.
१८६१ : मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना.
१८७७ : एडिसनने फोनोग्राफची निर्मिती केली. त्यावर 'मेरी हॅड अ लिट्ल लँब' हे गाणे वाजविण्यात आले.
१८८५ : पहिले जपानी पेटंट गंजरोधक रंगाला दिले गेले.
१८९३ : गाड्यांची नोंदणी करणारा फ्रान्स हा पहिला देश ठरला.
१९०४ : साप्ताहिक म्हणून सुरू झालेले 'ज्ञानप्रकाश' दैनिक झाले.
१९१४ : पनामा कालवा वाहतुकीस खुला.
१९४८ : डॉन ब्रॅडमन आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाले.
१९९५ : 'विदेश संचार निगम लिमिटेड'ने भारतात इंटरनेट सेवा सुरू केली.
२००६ : इस्राएल व लेबेनॉनमध्ये युद्धबंदी लागू.
जन्मदिवस : लेखक वॉल्टर स्कॉट (१७७१), पुरातत्वज्ञ, इतिहासकार रामप्रसाद चंदा (१८७३), कण-लहरी द्वैत सिद्धांत मांडणारा नोबेलविजेता लुई दी ब्रॉयली (१८९२), शर्करा रक्तात साठवली जाण्याची प्रक्रिया शोधणारी नोबेलविजेती गर्टी कोरी (१८९६), गायक उस्ताद आमिर खान (१९१२), कवी, लेखक भगवान रघुनाथ कुलकर्णी (१९१३), लोककवी वामनदादा कर्डक (१९२२), मानसशास्त्रज्ञ स्टॅन्ली मिलग्रॅम (१९३३), कार्टूनकार प्राण कुमार शर्मा (१९३८), अभिनेत्री राखी (१९४७), अभिनेता बेन ॲफ्लेक (१९७२)
पुण्यस्मरण : चित्रकार पॉल सिन्याक (१९३५), म. गांधींचे सहकारी महादेवभाई देसाई (१९४२), चित्रकार रने माग्रित (१९६७), लेखक स्लावोमिर म्रोझेक (२०१३), क्रिकेटसंघाचा माजी कर्णधार अजित वाडेकर (२०१८)
---
स्वातंत्र्यदिन : उ. कोरिया, द. कोरिया (१९४५), भारत (१९४७), कॉंगो (१९६०)
१४८३ : व्हॅटिकनमध्ये सिस्टीन चॅपेलचे पोपच्या हस्ते प्रत्यार्पण.
१६०९ : अमेरिकेत कायमस्वरूपी युरोपियन वसाहत निर्माण करणारा पहिला गट घेऊन इंग्लंडच्या साऊदॅम्टनहून मेफ्लॉवर जहाज निघाले.
१८२४ : अमेरिकेतील गुलामगिरीतून मुक्त झालेल्यांनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.
१८४३ : अजून सुस्थित असणारी सगळ्यात जुनी अम्यूझमेंट पार्क, तिव्होली गार्डन कोपनहेगन, डेन्मार्कमध्ये उघडली.
१९१४ : पनामा कालव्यात वाहतूक सुरू.
१९४५ : जपानने दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्करली. दुसऱ्या महायुद्धाची अखेर.
१९४८ : संस्थापक आणि पहिले संपादक साने गुरूजी असणाऱ्या 'साधना' साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९६३ : स्कॉटलंडमधला शेवटचा मृत्युदंड.
१९७५ : सैन्याच्या उठावात बांग्लादेशचे जनक शेख मुजीबूर रहमान यांची बहुतेक नातेवाईकांसकट हत्या.
१९७५ : 'शोले' चित्रपट प्रदर्शित.
२०१३ : स्मिथसोनियन संस्थेने अमेरिका खंडात ३५ वर्षांनंतर प्रथमच नवी मांसाहारी प्रजाती (ओलिंगुटो) सापडल्याचे जाहीर केले.
१६ ऑगस्ट
जन्मदिवस : छायाचित्रणात रंग आणणारा नोबेलविजेता गाब्रिएल लिपमन (१८४५), 'लॉरेन्स ऑफ अरेबिया', टी. ई. लॉरेन्स (१८८८), कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान (१९०४), गायिका हेमलता (१९५४), क्रिकेटपटू रणधीर सिंग (१९५७), अभिनेत्री, गायिका मडोना (१९५८), अभिनेत्री मनीषा कोईराला (१९७०), अभिनेता सैफ अली खान (१९७०)
पुण्यस्मरण : गणितज्ञ जेकब बर्नूली (१७०५), लेखिका मार्गरेट मिचेल (१९४९), अणूवैज्ञानिक, नोबेलविकेता अरविंग लँगम्यूर (१९५७), स्ट्रेप्टोमायसिन आणि इतर प्रतिजैविकांचा शोध लावणारा नोबेलविजेता सेल्मन वाक्समन (१९७३), गायक, अभिनेता एल्व्हीस प्रेसली (१९७७), गायक नुसरत फतेह अली खान (१९९७), कवी नारायण सुर्वे (२०१०), माजी पंतप्रधान आणि कवी अटल बिहारी वाजपेयी (२०१८)
---
१८५८ : अटलांटिकपार तारायंत्र सेवा सुरू; पण तारेच्या कमी शक्तीमुळे काही काळातच सेवा खंडित.
१८६५ : डॉमिनिकन प्रजासत्ताकला परत स्वातंत्र्य.
१९३० : रंग, आवाज असणारे पहिले कार्टून फिडलस्टिक्स प्रदर्शित.
१९४६ : कोलकात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू; पुढच्या तीन दिवसात चार हजारांवर लोक मारले गेले.
१९४६ : अखिल हैद्राबाद व्यापारी युनियन कॉंग्रेस स्थापित.
१९४२ : चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर आणि अष्टी गावांत उत्स्फूर्तपणे छोडो भारत चळवळ सुरू.
१९५८ : सत्यजित राय यांच्या 'पाथेर पांचाली' चित्रपटाला व्हँकूव्हर चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी व इतर चार पुरस्कार.
१९६० : सायप्रस हे स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्र झाल्याची घोषणा.
१९६२ : विलीनीकरणाला आठ वर्षं झाल्यानंतर फ्रान्सने "फ्रेंच भारत" अधिकृतरीत्या भारतात विलीन करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.
१९८९ : सौर ज्वाळेमुळे आलेल्या भूचुंबकीय वादळामुळे मायक्रोचिप्सवर परिणाम होऊन टोरोंटो शेअरबाजार बंद पडला.
२०१० : अर्थव्यवस्थेच्या आकारात चीनने जपानला मागे टाकले.
१७ ऑगस्ट
जन्मदिवस : गणितज्ञ पिएर द फर्मा (१६०१/१६०७), अर्वाचीन बंगाली आणि मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे इंग्रज पंडित, कोशकार, व्याकरणकार, भाषांतरकार विल्यम कॅरी (१७६१), अभिनेत्री मे वेस्ट (१८९३), साहित्य अकादमी पुरस्कारविजेता लेखक अमृतलाल नागर (१९१६), कवी व लेखक टेड ह्यूज (१९३०), नोबेलविजेता लेखक व्ही. एस. नायपॉल (१९३२), अभिनेता रॉबर्ट रेडफर्ड (१९३७), अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक रॉबर्ट डी निरो (१९४३), नोबेलविजेती लेखिका हेर्टा म्युलर (१९५३)
पुण्यस्मरण : क्रांतिकारक मदनलाल धिंगरा (१९०९), अणूरेणूंचे लहरस्वरूपात अस्तित्त्व दाखवणारा नोबेलविजेता ऑटो स्टर्न (१९६९), गायक पं. जसराज (२०२०), सिनेदिग्दर्शक निशिकांत कामत (२०२०)
---
स्वातंत्र्यदिन : इंडोनेशिया (१९४५), गॅबन (१९६०)
१६६६ : शिवाजी महाराजांनी आग्ऱ्याच्या तुरुंगवासातून स्वतःची सुटका करवून घेतली.
१९४२ : चौदा प्रकाशनांनी वृत्तपत्र बंद ठेवून ब्रिटिशांनी घातलेल्या वृत्तपत्रीय निर्बंधांचा निषेध केला.
१९४७ : भारत आणि पाकिस्तानमधली सीमा असणारी रॅडक्लिफ रेखा जाहीर झाली.
१९७८ : गरम हवेच्या फुग्यातून अटलांटिक महासागर ओलांडण्याचा विक्रम तीन अमेरिकन नागरिकांनी केला.
१९८८ : विमान अपघातात पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झिया उल-हक व अमेरिकन राजदूत आर्नोल्ड रफेल ठार.
२००५ : इस्राएलकडून एकतर्फी योजनेनुसार वसाहती रिकाम्या करायला सुरूवात.
२००८ : मायकेल फेल्प्सने ऑलिंपिकमध्ये आठवे सुवर्णपदक जिंकून उच्चांक स्थापला.
१८ ऑगस्ट
जन्मदिवस: टेलर सिरीज शोधणारा ब्रूक टेलर (१६८५), थोरले बाजीराव पेशवे (१७००), रंगवर्णशास्त्राचा पाया घालणाऱ्यांपैकी एक, आंदर्स योनास अँगस्ट्रॉम (१८१४), गायक पं. विष्णू दिगंबर पलुस्कर (१८७२), संयुक्त राष्ट्रसंघातल्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा विजयालक्ष्मी पंडित (१९००), 'नवकादंबरी'चा एक जनक लेखक व सिनेदिग्दर्शक आलँ रोब-ग्रिए (१९२२), क्रिकेटपटू सदाशिव शिंदे (१९२३), सिनेदिग्दर्शक रोमान पोलान्स्की (१९३३), कवी, सिनेदिग्दर्शक गुलजार (१९३४), अभिनेता रॉबर्ट रेडफर्ड (१९३६), क्रिकेटपटू संदीप पाटील (१९५६), गायक दलेर मेहदी (१९६७)
पुण्यस्मरण: लेखक ओनोरे द बाल्झाक (१८५०), सीग्रम कंपनीचा जनक जोसेफ सीग्रम (१९१९), ख्राईसलरचा जनक वॉल्टर ख्राईसलर (१९४०), स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस (१९४५), अभिनेत्री, मॉडेल पर्सिस खंबाटा (१९९८), लेखक नारायण धारप (२००८)
---
१८६८ : पिएर जॉंसे याने सूर्यग्रहणात हेलियम वायूचा शोध लावला.
१८७७ : ॲसफ हॉलने मंगळाचा मोठा उपग्रह फोबॉस शोधला.
१९२० : अमेरिकेच्या संविधानात बदल लागू होऊन स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला.
१९४१ : नागरिकांच्या दबावापुढे झुकून हिटलरने मतिमंद व्यक्तींचे शिरकाण तात्पुरते थांबवले.
१९४५ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांना घेऊन जात असलेल्या विमानाला तैवानमध्ये अपघात.
१९६३ : जेम्स मेरेडिथ या पहिल्या कृष्णवर्णीयाने मिसिसिपी विद्यापीठातून पदवी मिळवली.
१९६४ : वर्णभेदी धोरणांमुळे दक्षिण आफ्रिकेवर टोक्यो ऑलिंपिकमध्ये बंदी.
१९६९ : 'वूडस्टॉक' संगीत महोत्सवाची तीन दिवसांनंतर अखेर; सुमारे ४ लाख लोक उपस्थित असलेला हा महोत्सव १९६८नंतरच्या हिप्पी पिढीच्या उदयातला एक महत्त्वाचा टप्पा होता.
२००८ : पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचा राजीनामा.
१९ ऑगस्ट
जन्मदिवस : कवी जॉन ड्रायडेन (१६३१), चित्रकार ग्युस्ताव्ह कायबोत (१८४८), फॅशन डिझायनर गॅब्रिएल 'कोको' शानेल (१८८३), लेखक गं. दे. खानोलकर (१९०३), लेखक, कबीर आणि नाथ संप्रदायावर संशोधन करणारे, साहित्य अकादमी पुरस्कारविजेते हजारी प्रसाद द्विवेदी (१९०७), माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा (१९१८), 'स्टार ट्रेक' कथानकाचा निर्माता जीन रॉडनबरी (१९२१), गायक बबनराव नावडीकर (१९२२), सीसीडी शोधणाऱ्यांपैकी एक नोबेलविजेता विलार्ड बॉयल (१९२४), सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका सुधा मूर्ती (१९५०), टेनिसपटू मेरी जो फर्नांडिस (१९७१), अभिनेत्री इलियाना डीक्रूझ (१९८७)
पुण्यस्मरण : भौतिकशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ ब्लेझ पास्कल (१६६२), वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारा जेम्स वॉट (१८१९), नृत्यरचनाकार सर्ज दिआघिलेव्ह (१९२९), कवी व नाटककार फेदेरिको गार्सिया लोर्का (१९३६), क्रांतिकारक भिखाई कामा (१९३६), अभिनेता व दिग्दर्शक मास्टर विनायक (१९४७), विश्वरचनाशास्त्रज्ञ जॉर्ज गॅमॉव्ह (१९६८), कवी जान निसार अख्तर (१९७६), विनोदवीर ग्राउचो मार्क्स (१९७७), लेखक, दिग्दर्शक, अभिनेता उत्पल दत्त (१९९३), दुहेरी नोबेलविजेता लिनस पॉलिंग (१९९४), बोडो साहित्यिक बिनेश्वर ब्रह्म (२०००), सिनेदिग्दर्शक राऊल रुईझ (२०११), संगीतकार खय्याम (२०१९)
---
छायाचित्रण दिन
जागतिक मानवतावादी दिन
स्वातंत्र्यदिन : अफगाणिस्तान (१९१९)
१६९२ : चेटूक करत असल्याच्या आरोपावरून सेलम, मॅसेच्युसेट्स येथे एक स्त्री व एका धर्मगुरूसहित पाच व्यक्तींना मृत्युदंड.
१७५७ : इस्ट इंडिया कंपनीच्या कोलकात्यातील टांकसाळीत भारतीय रुपयाच्या पहिल्या नाण्याचे उत्पादन झाले.
१९३४ : जर्मन जनतेने ८९.९% मतांनी फ्युहरर हे पद निर्माण करण्याचे ठरवले.
१९५३ : सीआयए आणि एमाय ६ यांच्या मदतीने इराणमधील मोहम्मद मोसादेघचे सरकार पदच्युत करून शहा मोहम्मद रझा पहलवीने सत्ता काबीज केली.
१९८९ : पोलंडमध्ये ४२ वर्षांनंतर पहिला साम्यवादी नसणारा राष्ट्रपती सत्तेवर आला.
२००४ : जालावरचा गूगल शोध लोकांसाठी उपलब्ध झाला.
२००५ : मुंबई शेअर बाजार 'पब्लिक लिमिटेड' झाला.
२०१३ : राज्यराणी एक्सप्रेसला बिहारमध्ये अपघात होऊन ३७ ठार, २४ जखमी
२० ऑगस्ट
जन्मदिवस : सम्राट अशोकाच्या लेखातील लिपीचा शोध लावणारा संशोधक व पुरातत्त्वज्ञ प्रिन्सेप जेम्स (१७९९), आद्य ऐतिहासिक नाट्यलेखक विनायक कीर्तने (१८४०), समाजसुधारक कृष्णराव केळुसकर (१८६०), लेखिका प्रतिभा रानडे (१९३७), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४), 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती (१९४६), अभिनेता रणदीप हूडा (१९७६)
पुण्यस्मरण : रक्तपेशींचे विकार शोधण्याची पद्धत शोधणारा नोबेलविजेता पॉल एहलरिच (१९१५), नीळ बनवणारा अडॉल्फ व्हॉन बायर (१९१७), लेखक, पत्रकार माधव दामोदर अळतेकर (१९५९), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रावर संशोधन करणारा नोबेलविजेता पर्सी ब्रिजमन (१९६१), अणुभौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक (१९८४), जादूगार रघुवीर (१९८४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक गोपीनाथ मोहंती (१९९१), गुजराथी नाटककार प्रागजी डोसा (१९९७), विश्वरचनाशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल (२००१), इतिहासकार राम शरण शर्मा (२०११), लेखक, संपादक, विवेकवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर (२०१३)
--
जागतिक डास दिवस
१८२८ : राजा राममोहन रॉय यांनी कर्मकांड, पुरोहितवर्ग, जातीभेद, अस्पृश्यता नाकारणाऱ्या 'ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली.
१८८५ : इंडियन नॅशनल कॉग्रेसची स्थापना.
१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी ॲनॉफिलीस जातीच्या डासांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो हे शोधून काढले.
१९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.
१९२० : पहिली व्यावसायिक रेडिओ वाहिनी अमेरिकेत डेट्रॉईटमध्ये सुरू.
१९४० : हद्दपार रशियन क्रांतिकारक लेऑन ट्रॉस्कीवर हल्ला, दुसऱ्या दिवशी मृत्यु.
१९५३ : सोव्हिएत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.
१९६० : सेनेगलने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.
१९७७ : व्हॉयेजर-१चे प्रक्षेपण.
१९८८ : आठ वर्षे चाललेल्या युद्धानंतर इराण-इराकमध्ये युद्धबंदी.
१९९१ : इस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.
२०१३ : 'साधना'चे संपादक, विवेकवादी विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या.
२१ ऑगस्ट
जन्मदिवस : गणितज्ञ ऑग्युस्तां-लुई कोशी (१७८९), रेखाचित्रकार ऑब्री बीअर्डस्ली (१८७२), चित्रकार ना. श्री. बेंद्रे (१९१०), लेखिका इस्मत चुगताई (१९१५), गायिका, अभिनेत्री जयमाला शिलेदार (१९२१), क्रिकेटपटू, प्रशिक्षक व्ही. बी. चंद्रशेखर (१९६१), गूगलचा सहसंस्थापक सर्गेई ब्रिन (१९७३), धावपटू उसेन बोल्ट (१९८६)
पुण्यस्मरण : गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९३१), साम्यवादी विचारवंत क्रांतिकारक लेऑन ट्रॉटस्की (१९४०), गांधीवादी, साहित्यिक, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर (१९८१), खगोलशास्त्रज्ञ, नोबेलविजेते चंद्रशेखर सुब्रह्मण्यन (१९९५), अभिनेते शरद तळवलकर (२००१), सिंथेसाइझरचा निर्माता रॉबर्ट मूग (२००५), सनईवादक उ. बिस्मिल्ला खाँ (२००६), ज्ञानपीठविजेती लेखिका कुर्रतुल ऐन हैदर (२००७), साक्षेपी संपादक व प्रकाशक श्री.पु. भागवत (२००७)
---
१८८८ : बेरीज करण्याच्या यंत्राचे पेटंट विल्यम बरोज याने मिळवले.
१९६४ : हेब्बाळला 'कृषिविज्ञान विद्यापीठा'ची स्थापना.
१९६८ : प्राग वसंत - चेकोस्लोव्हाकियातील उदारमतवादी प्रवाहाचे निर्दालन करण्यासाठी रशियन आणि वॉर्सॉ करारातील इतर देशांच्या फौजा प्रागमध्ये दाखल. १९६८च्या युरोपातील विद्यार्थी आंदोलनासाठी एक महत्त्वाची घटना.
१९११ : जगप्रसिद्ध 'मोनालिसा' या चित्राची फ्रान्समधून चोरी; दोन वर्षांनंतर चित्र सापडले.
१९९४ : बारा वर्षीय रुपाली रेपाळे ह्या मराठी जलतरणपटूने इंग्लिश खाडी पार केली.
१९९१ : लातव्हियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.
२२ ऑगस्ट
जन्मदिवस : इतिहासविषयक पुस्तकांचे लेखक मोरेश्वर जोशी (१८८७), सिनेदिग्दर्शिका लेनी रिफेनश्टाल (१९०२), छायाचित्रकार आँरी-कार्तिए ब्रेसॉं (१९०८), लेखक रे ब्रॅडबरी (१९२०), लेखक हरिशंकर परसाई (१९२४), अभिनेता चिरंजीवी (१९५५)
पुण्यस्मरण : चित्रकार जाँ-ओनोरे फ्रागोनार (१८०६), लेखक व मराठी भाषाअभ्यासक मुरलीधर पानसे (१९७०), समीक्षक, संपादक विष्णू बापूजी आंबेकर (१९७१), कन्याकुमारीचे विवेकानंद शिलास्मारक उभारणारे एकनाथ रानडे (१९८२), गायक पं. कृष्णराव शंकर (१९८९), अभिनेते सूर्यकांत मांढरे (१९९९), 'ज्ञानपीठ'विजेता कन्नडा साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती (२०१४)
---
मद्रास स्थापना दिवस.
१८६४ : पहिल्या जिनीव्हा करारावर बारा देशांनी सह्या केल्या. 'रेड क्रॉस'ची स्थापना. मानवी हक्कांसाठीच्या आंतरराष्ट्रीय चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा.
१९०२ : कॅडिलॅक कंपनी स्थापन झाली.
१९०३ : लो. टिळकांनी विदेशी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन पुण्यातल्या विद्यार्थ्यांच्या सभेत केले.
१९०७ : भारतीय राष्ट्रध्वजाची रचना तयार करून मॅडम भिखाई कामा यांनी तो प्रदर्शित केला.
१९३२ : बीबीसीने दूरचित्रवाणी प्रसारणाचा पहिला प्रयोग केला.
१९५० : आल्थिया गिब्सन ही आंतरराष्ट्रीय टेनिस खेळणारी पहिली कृष्णवर्णीय खेळाडू ठरली.
१९७२ : ऱ्होडेशियाच्या वर्णविद्वेषाबद्दल त्याची आंतरराष्ट्रीय ऑलिंपिकमधून हकालपट्टी.
१९८७ : भारतीय नौदलाची विराट ही दुसरी विमानवाहू नौका काफिल्यात दाखल.
२३ ऑगस्ट
जन्मदिवस : शल्यचिकित्सक, शरीररचनाशास्त्रज्ञ ॲस्टली कूपर (१७६८), स्वातंत्र्यसैनिक तांगुतुरी प्रकाशम (१८७२), अभिनेता जीन केली (१९१२), कवी, अनुवादक, समीक्षक, लघुनिबंधकार, ज्ञानपीठविजेते गो. वि. उर्फ विंदा करंदीकर (१९१८), सिनेदिग्दर्शक रॉबर्ट मलिगन (१९२५), संगीतकार, गायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नत (१९७०), अभिनेत्री मलाईका अरोरा (१९७३), ग्राफीनवर संशोधन करणारा नोबेलविजेता कॉन्स्टंटीन नोबोसेलॉब (१९७४)
पुण्यस्मरण : भौतिकशास्त्रज्ञ शार्ल-ओग्युस्तँ कूलाँ (१८०६), प्राच्यविद्यासंशोधक डॉ. रा. गो. भांडारकर (१९२५), अभिनेत्री हंसा वाडकर (१९७१), क्रिकेटपटू प्रा. दि. ब. देवधर (१९९३)
---
आंतरराष्ट्रीय गुलामविक्रीविरोधी दिवस
१६३२ : मुरार जगदेव याने मोगलांचा पराभव करून मध्ययुगातली प्रसिद्ध तोफ मुलुख-ए-मैदान विजापुरात आणली.
१८३९ : ब्रिटिशांचा हॉंगकॉंगवर कब्जा; यातून पुढे पहिले अफूयुद्ध सुरू झाले.
१९०४ : बर्फात गाडी चालवण्यासाठी चाकांना लावण्याच्या साखळीचे पेटंट घेतले गेले.
१९६६ : लूनर ऑर्बिटर १ यातून सर्वप्रथम चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीचे छायाचित्र घेतले गेले.
१९८९ : इस्टोनिया, लातव्हिया आणि लिथुआनियातील वीस लाख लोकांनी सोव्हिएत रशियापासून स्वातंत्र्याच्या मागणीसाठी व्हिल्नियस-तालिन रस्त्यावर मानवी साखळी निर्माण केली.
१९९० : आर्मेनियाने सोव्हिएत संघापासून स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.
१९९० : टिम बर्नर्स-ली याने वर्ल्ड वाईड वेब (www) नवीन वापरकर्त्यांसाठी खुले केले.
१९९३ : गॅलिलेओ यानाने २४३ आयडा या लघुग्रहाला असणारा डॅक्टील हा पहिला लघुग्रहाचा उपग्रह शोधला.
१९९४ : पहिल्या महायुद्धातील एकमेव कृष्णवर्णीय वैमानिक यूजीन बुलार्ड याला मृत्युपश्चात सेकंड लेफ्टनंटचे पद देण्यात आले.
२००५ : अमेरिकेत सुमारे १,८०० लोकांचा बळी घेणारे चक्रीवादळ 'कत्रिना' निर्माण झाले.
२०२३ : चांद्रयान-३ मोहिमेअंतर्गत पाठवलेले विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचले. चंद्रावर पोचणारा भारत चौथा देश ठरला, आणि दक्षिण ध्रुवावर पोचणारा पहिलाच देश ठरला.
२४ ऑगस्ट
जन्मदिवस : लेखक, समाजसुधारक नर्मद उर्फ नर्मदाशंकर दवे (१८३३), नाटककार, संपादक, साहित्यसम्राट न. चिं. केळकर (१८७२), कवयित्री बहिणाबाई चौधरी (१८८०), लेखक होर्हे लुई बोर्हेस (१८९९), पेशींवर संशोधन करणारा नोबेलविजेता आल्बेर क्लोद (१८९९), क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू (१९०८), सिनेनिर्माती, अभिनेत्री अंजली देवी (१९२७), लेखक पाओलो कोएलो (१९४७), अभिनेता स्टीफन फ्राय (१९५७)
पुण्यस्मरण : शास्त्रज्ञ, विचारवंत, लेखक प्लिनी थोरला (७९), चित्रकार पार्मिजियानिनो (१५४०), इंग्लिश रेल्वेचा उद्गाता अभियंता सर डॅनियल गूच (१८१६), उष्मागतिकीशास्त्राचा जनक सादी कार्नो (१८३२), तत्त्वज्ञ व लेखिका सिमोन वेल (१९४३), अभिनेत्री सीमा देव (२०२३)
---
स्वातंत्र्यदिन : युक्रेन (१९९१)
७९ : इटलीतील माऊंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक. पॉम्पेई, हर्क्युलेनियम आणि स्टेबी ही शहरे राखेखाली दडपली जाउन नष्ट.
१२१५ : पोप इनोसंट तिसऱ्याने मॅग्ना कार्टा रद्द केल्याचे जाहीर केले.
१६०८ : ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे उतरला.
१६९० : सुतानाती येथे इस्ट ईंडिया कंपनीच्या एका एजंटाने व्यवसाय सुरू केला. हा कोलकाता शहराचा जन्म मानला जातो.
१७८९ : फ्रेंच राज्यक्रांती - मानवी हक्कांच्या जाहीरनाम्याच्या ११व्या कलमाअन्वये वृत्तपत्रस्वातंत्र्य अस्तित्वात आले.
१८५८ : शिक्षण घेतल्याबद्दल ९० कृष्णवर्णीय व्यक्तींना अमेरिकेतील रिचमंड शहरात अटक करण्यात आली.
१८७५ : कॅ. मॅथ्यू वेब याने प्रथमच इंग्लिश खाडी पोहून पार केली.
१८९१ : एडिसनने चलचित्र कॅमेऱ्याचे पेटंट मिळवले.
१९४९ : नाटो करार कार्यान्वित झाला.
१९५४ : अमेरिकेत कम्युनिस्ट पक्षावर बंदी.
१९६० : व्होस्तोक, अंटार्क्टिका येथे जगातील सगळ्यात कमी तपमान (उणे ८८ अं.से.) नोंदले गेले.
१९६६ : विक्रमवीर जलतरणपटू मिहिर सेन याने जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.
१९९१ : युक्रेनला सोव्हिएत संघापासून स्वातंत्र्य.
१९९५ : मायक्रोसॉफ्टने विण्डोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
१९९८ : माणसाचे रेडिओ टॅगिंग करण्याचा पहिला प्रयोग यूकेमध्ये झाला.
२००६ : आंतरराष्ट्रीय खगोल संघाने प्लूटो हा ग्रह नसल्याचे ठरवले.
२०११ : स्टीव्ह जॉब्जने ॲपल कंपनीच्या सीईओपदाचा राजीनामा दिला.
२५ ऑगस्ट
जन्मदिवस : थायरॉईडवर संशोधन करणारा नोबेलविजेता एमिल कोचर (१८४१), ॲनाफिलॅक्सिस या जीवघेण्या ॲलर्जीवर संशोधन करणारा नोबेलविजेता शार्ल रिशे (१८५०), लेखक गंगाधर गाडगीळ (१९२३), अभिनेता शॉन कॉनरी (१९३०), व्यावसायिक गिरीधारीलाल केडीया (१९३६), लेखक मार्टिन एमिस (१९४९), लेखिका तस्लीमा नसरीन (१९६२), क्रिकेटपटू संजीव शर्मा (१९६५), क्रिकेटपटू, समालोचक विवेक रझदान (१९६९)
पुण्यस्मरण : तत्त्वज्ञ डेव्हीड ह्यूम (१७७६), वाफेच्या इंजिनाचा जनक जेम्स वॉट (१८१९), अवरक्त किरणांचा शोध लावणारा खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षल (१९२२), रसायनशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ मायकल फॅरडे (१८६७), तत्त्वज्ञ, समीक्षक फ्रेडरिक नित्शे (१९००), किरणोत्सार शोधणारा, नोबेलविजेता आँरी बेकरेल (१९०८), पहिला सेक्सॉलॉजिस्ट आल्फ्रेड किन्झी (१९५६), अभिनेता पॉल म्युनी (१९६७), लेखक ट्रुमन कपोटे (१९८४), 'डॉनल्ड डक'चे रेखाचित्रकार कार्ल बार्क्स (२०००), समीक्षक, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. व. दि. कुलकर्णी (२००१), पहिला चांद्रवीर नील आर्मस्ट्राँग (२०१२), कर्नाटक शैलीतले संगीतकार, गायक रघुनाथ पाणिग्रही (२०१३)
---
स्वातंत्र्यदिन : उरुग्वे (१८२५), बेलारूस (१९९१)
१६०९ : गॅलेलियोने आपल्या प्रथम दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.
१७६८ : 'एन्डेव्हर' जहाजातून कॅ. कूक पॅसिफिक सफरीवर निघाला. दक्षिणेकडच्या भूभागावर (ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड) ताबा करणे हा ब्रिटिशांचा त्यामागील सुप्त हेतू होता.
१९६१ : पं. नेहरू आणि संत फत्तेसिंग यांच्यातल्या वाटाघाटी फिसकटल्या.
१९८९ : व्हॉयेजर अवकाशयान नेपच्यूनपर्यंत पोहोचले.
१९९१ : लिनस टोरवाल्डस याने लिनक्सची पहिली आवृत्ती प्रदर्शित केली.
१९९६ : अमरनाथ यात्रेदरम्यान २५० भाविक मृत.
२००३ : मुंबईत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या दोन कार-बॉम्बस्फोटांमध्ये ५२ ठार.
२००७ : हैदराबादमध्ये अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ४३ ठार.
२०१२ : व्हॉयेजर -१ ही आंतरतारकीय अवकाशात पोहोचणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.
२६ ऑगस्ट
जन्मदिवस : π हा इरॅशन आकडा असल्याचे सिद्ध करणारा योहान लँबर्ट (१७२८), आधुनिक रसायनशास्त्राचा जनक आंत्वान लावाजिए (१७४३), कवी गियोम आपोलिनेर (१८८०), क्वांटम सिद्धांत प्रयोगातून शाबीत करणारा नोबेलविजेता जेम्स फ्रँक (१८८२), ऐतिहासिक कादंबरीकार, नाटककार आचार्य चतुरसेन शास्त्री (१८९१), प्रथम विमानाने अटलांटिक पार करणारा वैमानिक चार्ल्स लिंडबर्ग (१९०२), लेखक ख्रिस्टोफर इशरवूड (१९०४), तोंडावाटे घेण्याची पोलिओ लस शोधणारा आल्बर्ट साबिन (१९०६), समाजसेविका, नोबेलविजेत्या मदर तेरेसा (१९१०), लेखक हुलिओ कोर्ताझार (१९१४), स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ ग. प्र. प्रधान (१९२२), वास्तुरचनाकार बाळकृष्ण दोशी (१९२७)
पुण्यस्मरण : 'केसरी'चे संपादक कृ. प्र. खाडिलकर (१९४८), मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव (१९५५), टेनिसपटू नरेंद्रनाथ (१९९९), अभिनेता बालन के नायर (१९५५), न्यूट्रिनो शोधणाऱ्यांपैकी एक नोबेलविजेता फ्रेडरीक रीन्स (१९९८), अभिनेता ए. के. हंगल (२०१२)
---
१३०३ : अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगढ जिंकले.
१७८९ : फ्रेंच राज्यक्रांती - फ्रान्सच्या संसदेने मानवी हक्कांचा जाहीरनामा संमत केला.
१९२० : अमेरिकेत महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. अमेरिकेत हा दिवस 'स्त्री समता दिन' म्हणून साजरा होतो.
१९७० : नव्या स्त्रीवादी चळवळीने बेटी फ्रीडनच्या नेतृत्त्वाखाली अमेरिकेत समानतेकरता स्त्रियांचा राष्ट्रव्यापी संप सुरू केला.
१९९४ : बॅटरीवर चालणारे हृदय प्रथमच मनुष्याच्या शरीरात बसवले गेले.
२००८ : रशियाने जॉर्जियाचे अबखाझिया आणि दक्षिण ओसेशिया हे प्रांत स्वतंत्र असल्याचे परस्पर जाहीर केले.
२०११ : बोईंगच्या ७८७-ड्रीमलायनरला युरोप आणि अमेरिकेच्या हवाई सुरक्षा आस्थापनांकडून हिरवा कंदील मिळाला.
२७ ऑगस्ट
जन्मदिवस : तत्त्वज्ञ हेगेल (१७७०), विधिज्ञ दादासाहेब खापर्डे (१८५४), उच्च दाबाच्या रसायनशास्त्राचा जनक, नोबेलविजेता कार्ल बॉश (१८७४), रोल्स-रॉईस कंपनीचा एक मूळ मालक चार्ल्स रोल्स, (१८७७), छायाचित्रकार, चित्रकार व सिनेदिग्दर्शक मॅन रे (१८९०), क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन (१९०८), इतिहाससंशोधक सेतुमाधवराव पगडी (१९१०), लेखक नारायण धारप (१९२५), लेखिका व मानसशास्त्रज्ञ नॅन्सी फ्रायडे (१९३३), मल्ल दिलीप सिंग राणा उर्फ खली (१९७२), अभिनेता एरन पॉल (१९७९), मॉडेल, अभिनेत्री नेहा धुपिया (१९८०)
पुण्यस्मरण : लेखक लोपे द व्हेगा (१६३५), सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आंत्वान व्हॅन लीवेनहूक (१७२३), चंदीगढ़चा वास्तुरचनाकार ल कोर्ब्यूजिए (१९६५), गायक मुकेश (१९७६), सिनेदिग्दर्शक बासु भट्टाचार्य (१९९७), सिनेदिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी (२००६)
---
स्वातंत्र्यदिन : मॉल्दोव्हा (१९९१)
१८५९ : व्यावसायिकरित्या यशस्वी झालेली पहिली तेलविहीर पेनसिल्व्हेनिया राज्यात मिळाली.
१९२७ : पाच कनेडीयन स्त्रियांनी कनेडीयन सर्वोच्च न्यायालयात "कायद्यानुसार स्त्रियांचा व्यक्तींमध्ये समावेश होतो का?" अशी याचिका दाखल केली.
१९६२ : चौथ्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये मिल्खासिंग आणि गणपतराव आंदळकर यांना सुवर्णपदके.
२००३ : नाशिकच्या कुंभमेळ्यात गर्दीत चेंगराचेंगरी होऊन ३३ भाविक मृत्युमुखी आणि ८६ जखमी.
२००३ : साठ हजार वर्षांनी मंगळ पृथ्वीच्या सर्वात जवळ आला होता.
२०१३ : मुझफ्फरनगरच्या धार्मिक दंगलींना सुरुवात. किमान ६२ मृत; सुमारे ५०,००० विस्थापित.
२८ ऑगस्ट
जन्मदिवस : मराठ्यांच्या आरमारातले सेखोजी उर्फ जयसिंगराव आंग्रे (१७३३), कवी योहान ग्योट (१७४९), लेखक लेओ टॉलस्टॉय (१८२८), पंडुरोगावर इलाज शोधणाऱ्या नोबेलविजेत्यांपैकी एक जॉर्ज व्हीपल (१८७८), लेखक, कवी, समीक्षक फिराक गोरखपुरी (१८९६), सीटीस्कॅनपद्धत शोधणाऱ्यांपैकी एक गॉडफ्रे हाऊन्सफील्ड (१९१९), भौतिकशास्त्रज्ञ एम. जी. के. मेनन (१९२८), सतारवादक विलायत खां (१९२८) , बहुमाध्यम कलाकार, चीनच्या राजवटीचा विरोधक आय वे वे (१९५७), गायिका शनाया ट्वेन (१९६५)
पुण्यस्मरण : स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन (१९६९), लेखक, चित्रकार व्यंकटेश माडगूळकर (२००१), स्त्रीवादी लेखिका, कार्यकर्ती शुलामिथ फायरस्टोन (२०१२)
---
मुक्तीदिन : हॉंगकॉंग
१७८९ : विल्यम हर्शल याने एका बाजूने काळाठिक्कर असणारा शनीचा उपग्रह एन्सिलाडस शोधला.
१८४५ : 'सायंटिफिक अमेरिकन' या नियतकालिकाचा पहिला अंक प्रकाशित.
१८८९ : पुढे 'पेप्सी कोला' नावाने ओळखल्या गेलेल्या पेयाचा शोध कॅलेब ब्रॅडहम याला लागला.
१९३७ : टोयोटा मोटर्स ही स्वतंत्र कंपनी बनली.
१९६३ : मार्टिन ल्युथर किंग यांनी 'I have a dream' हे आपले जगप्रसिद्ध भाषण केले.
१९९० : इराकने कुवेतविरोधात युद्ध सुरू केले.
१९९३ : मतदार ओळखपत्र आवश्यक असण्याची घोषणा निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी केली.
१९९८ : कुराण आणि सुन्ना हे सर्वोच्च कायदे बनवण्याची घटनादुरुस्ती पाकिस्तानी राज्यसभेने नामंजूर केली.
२९ ऑगस्ट
जन्मदिवस : विचारवंत जॉन लॉक (१६३२), चित्रकार अॅन्ग्र (१७८०), नोबेलविजेता लेखक मॉरिस मॅटरलिंक (१८६२), स्वातंत्र्यलढ्यातले नेते, प्राचीन संस्कृत वाङमयाचे अभ्यासक लोकनायक बापूजी अणे (१८८०), सहकार चळवळीतले अग्रणी विठ्ठलराव विखे पाटील (१९०१), मानववंशशास्त्रज्ञ व्हेरीयर एल्व्हीन (१९०२), साहित्यिक भगवती शरण वर्मा (१९०३), हृदयात कॅथेटर घालण्याची प्रक्रिया शोधून काढणारा वर्नर फॉर्समान (१९०४), हॉकीपटू ध्यानचंद (१९०५), अभिनेत्री इनग्रिड बर्गमन (१९१५), सॅक्सोफोनवादक व जाझ संगीतकार चार्ली 'बर्ड' पार्कर (१९२०), क्रिकेटपटू हिरालाल गायकवाड (१९२३), सिनेदिग्दर्शक, अभिनेता रिचर्ड अटेनबरा (१९२९), गायक, संगीतकार मायकल जॅक्सन (१९५८), अभिनेता नागार्जुन (१९५९)
पुण्यस्मरण : लेखक बाबा पदमनजी (१९०६), विमा उद्योजक अण्णासाहेब चिरमुले (१९५१), शाहीर अमर शेख (१९६९), भारतीय-बांग्लादेशी विद्रोही कवी आणि बासरीवादक काझी नझरूल इस्लाम (१९७६), अभिनेत्री इनग्रिड बर्गमन (१९८२), लेखक व संपादक जयंत पवार (२०२१)
---
राष्ट्रीय क्रीडा दिन
तेलुगु भाषा दिन
१७५८ : स्थानिक अमेरिकन लोकांसाठी पहिला आरक्षित विभाग स्थापन झाला.
१८३१ : मायकल फॅरडेने विद्युतचुंबकीय इंडक्शनचा शोध लावला.
१८४२ : नानकिंगला तह होऊन पहिले अफूचे युद्ध संपले.
१८८५ : गॉटलिब डेम्लरने अंतर्गत ज्वलनावर चालणाऱ्या मोटरसायकलचे पेटंट मिळवले.
१८९८ : गुडयीअर या टायर कंपनीची स्थापना.
१९४९ : सोव्हिएत संघाने पहिली अणुबॉंब चाचणी केली.
२००५ : कत्रिना चक्रीवादळ न्यू ऑरलिन्सच्या किनाऱ्यावर धडकले. चक्रीवादळाने १,७००पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला.
२०१२ : २०११ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातला दोषी अजमल कसाबच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.
३० ऑगस्ट
जन्मदिवस : मुघल सम्राट जहांगीर (१५६९), चित्रकार जाक-लुई दाविद (१७४८), 'फ्रँकनस्टाईन'ची लेखिका मेरी शेली (१८९७), प्राच्यविद्या संशोधक, मुंबई विद्यापीठाचे पहिले देशी कुलगुरू काशिनाथ त्र्यंबक तेलंग (१८५०), अणुविज्ञानाचा जनक अर्नेस्ट रुदरफर्ड (१८७१), बौद्ध साहित्याचे अभ्यासक व पाली भाषा तज्ज्ञ चिंतामण राजवाडे (१८८९), एमारायसाठी मूलभूत संशोधन करणारा नोबेलविजेता एडवर्ड मिल्स पर्सेल (१९१२), गीतकार शैलेंद्र (१९१६), संगीतकार दशरथ पुजारी (१९३०), उद्योजक वॉरन बफे (१९३०), क्रिकेटपटू बाळू गुप्ते (१९३४), अभिनेत्री कॅमेरून डियाझ (१९७२)
पुण्यस्मरण :कृष्णपदार्थावर संशोधन करणारा नोबेलविजेता विल्हम वीन (१९२८), इलेक्ट्रॉन शोधणारा नोबेलविजेता जे. जे. थॉमसन (१९४०), कवी 'बी' उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते (१९४७), महानुभाव साहित्याचे संशोधक शं. गो. तुळपुळे (१९९४), नोबेलविजेता लेखक नागिब महफूझ (२००६), नोबेलविजेता कवी शेमस हीनी (२०१३), सोव्हिएत रशियासाठी खुले धोरण स्वीकारणारे नेते मिहाईल गोर्बाचेव्ह (२०२२)
---
स्वातंत्र्यदिन : अझरबैजान
१९४७ : काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी मुंबई सरकारचा वटहुकूम.
१९६३ : यूएस आणि सोव्हिएत संघाच्या नेत्यांमधली संपर्क हॉटलाईन कार्यान्वित.
१९६७ : थरगुड मार्शल अमेरिकी सर्वोच्च न्यायालयातले पहिले कृष्णवर्णीय न्यायमूर्ती ठरले.
१९८४ : स्पेस शटल डिस्कव्हरीचे पहिले अंतराळगमन.
१९९० : तातारस्तानने रशियापासून स्वातंत्र्य जाहीर केले.
१९९९ : पूर्व तिमोरने मतदान करून इंडोनेशियापासून स्वातंत्र्याला कौल दिला.
३१ ऑगस्ट
जन्मदिवस : शिक्षणतज्ज्ञ मारिया मॉन्टेसरी (१८७०), रेडिओ खगोलशास्त्रज्ञ सर बर्नार्ड लॉवेल (१९१३), लेखक शिवाजी सावंत (१९४०), अभिनेता रिचर्ड गीअर (१९४९), क्रिकेटपटू क्लाइव्ह लॉईड (१९४४), सिनेदिग्दर्शक ऋतुपर्ण घोष (१९६३), क्रिकेटपटू जवगल श्रीनाथ (१९६९), टेनिसपटू आंद्रे मेद्वेदेव्ह (१९७४)
पुण्यस्मरण : कवी शार्ल (चार्ल्स) बोदलेर (१८६७), चित्रकार जॉर्ज ब्राक (१९६३), सिनेदिग्दर्शक जॉन फोर्ड (१९७३), चित्रकार व शिल्पकार हेन्री मूर (१९८६)
---
जागतिक ब्लॉग दिन.
स्वातंत्र्यदिन : किरगिझिस्तान, मलाया, त्रिनिदाद व टोबॅगो
१८९७ : सिनेमाचा पूर्वसुरी कायनेटोस्कोपचे पेटंट एडिसनला मिळाले.
१९३९ : पोलिश असल्याचा बहाणा करून जर्मन सैनिकांनी एका जर्मन रेडिओ स्टेशनवर हल्ला चढवला. ह्याचा गैरफायदा घेत मग एका दिवसानंतर जर्मनीने पोलंडवर हल्ला चढवला आणि दुसरे महायुद्ध सुरू झाले.
१९६८ : क्रिकेटपटू गॅरी सोबर्सने एका षटकात सहा षटकार ठोकले.
१९९७ : राजकन्या डायना हिचे अपघाती निधन.