६ नोव्हेंबर जन्मदिवस : 'महाराष्ट्र सारस्वत'कार वि. ल. भावे (१८७१), लेखक रॉबर्ट म्युसिल (१८८०), समीक्षक श्री. के. क्षीरसागर उर्फ श्रीकेक्षी (१९०१), सिनेदिग्दर्शक, पटकथा व संवादलेखक दिनकर द. पाटील (१९१५), लेखक मायकेल कनिंगहॅम (१९५२) मृत्युदिवस : संगीतकार चायकॉव्ह्स्की (१८९३), अभिनेता संजीव कुमार (१९८५), नाट्यदिग्दर्शक व विज्ञानलेखक भालबा केळकर (१९८७)
---
राष्ट्रीय दिन : डॉमिनिकन प्रजासत्ताक, ताजिकीस्तान
१९१३ : दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक
१९६२ : दक्षिण आफ्रिकेच्या वंशभेदाविरोधात संयुक्त राष्ट्रांमध्ये ठराव संमत; द. आफ्रिकेशी सामरिक व आर्थिक संबंध तोडण्याचे सदस्य राष्ट्रांना आवाहन.