एकच कप

शंभर वर्षांपूर्वी गडकऱ्यांच्या 'एकच प्याला'ने महाराष्ट्रात खळबळ माजवली होती. आता वेळ आली आहे एका आगळ्याच 'कपा'तल्या वादळाची! हा काही चहाचा कप नव्हे. मला सांगायचं आहे 'मेन्स्ट्रुअल कप' म्हणजे ऋतुस्रावाच्या कपाबद्दल. आपल्याकडे मुळातच हा विषय चारचौघातच काय - अगदी चार बायकांतही काढला जात नाही. म्हणूनच गेल्या सहा खेपांच्या वेळी यशस्वीरित्या कप वापरल्यावर मला हा लेख लिहायचे बळ आलं. ह्या विषयाबद्द्ल मी आता 'व्हीस्पर' न करता उघडपणे सांगायला लागले आहे. माझ्या एका मैत्रिणीने दोन वर्षापूर्वी मला "मेन्स्ट्रुअल कप" बद्दल सांगितलं होतं. ही मैत्रीण पर्यावरणासाठी काहीही करायला तयार असते. अगदी प्रत्येक टाकाऊतून टिकाऊ गोष्टी करणारी! त्यामुळे तिला जमतय म्हणजे आपल्याला जमेलच असं नाही अशी माझी धारणा होती. ती तर एक मॅरेथॉन रनर असून पाळीच्या वेळेससुद्धा लांब पल्ल्याच्या शर्यती धावलेली आहे! धावताना वा खेळताना नॅपकिन वापरणं फारच त्रासदायक असतं. एक तर घामाने अन्‌दुसरं कमरेभोवतीच्या जास्तीच्या वजनाने घामोळं येऊ शकतं. तिने कित्येकदा सांगूनही मला स्वत:ला कप वापरण्याची हिंमत नव्हती. शेवटी मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत हिय्या केला अन मागवला एक कप इंटरनेट वरुन. कप येऊन घरी पोहोचेपर्यंत सारखी काळजी - कुणी पाहील का की मी काय मागवतेय? दुकानात जाऊन निर्लज्जपणे(!) सॅनिटरी नॅपकिन्स घेणारी मी उगीचच घाबरत होते. शी-कप (SheCup) आणि साबणाच्या पट्ट्यांचे पाकीट एका खादीच्या छोट्याशा चंचीत आले. त्याच्यावर आणखी एक अपारदर्शक पाकिट होते. आत काय आहे ते कळतही नव्हतं. मी सुटकेचा नि:श्वास सोडला!

नेटवर भरभरून माहिती गोळा करत होते. सगळी थिअरी डोक्यात आली होती पण प्रॅक्टीकलचे काय? पहिल्यांदा योनीमार्गात कप कसा मावेल अशी चिंता होती. मग लक्षात आले की जर आख्खं बाळ तिथून येऊ शकतं तर एक पातळ घडी घातलेला कप का नाही आत जाणार? आता कधी नव्हे ती मी पाळीची वाट पहायला लागले! शेवटी एकदा कप वापरायलाही सुरुवात झाली. एक-दोन महिन्यांनंतर वाटायला लागले की इतकी साधी कल्पना या आधी कोणालाच कशी नाही सुचली. असंच गुगल करतांना असं ध्यानात आलं की मी सहा महिने वापरत असलेल्या कपच्या डिझाईनच्या मागे जुना इतिहास आहे. १८६०-७० च्या सुमारास कपाचं पहिलं डिझाईन आलं. पण त्याची पुढे फारशी प्रगती झाली नाही. १९३७ मध्ये अमेरिकेतील लिओना चामर्स (Leona Chalmers) ह्या अभिनेत्रीने लॅटेक्स रबराच्या कपाचे पॅटन्ट घेतले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रबराचे उत्पादन कमी झाले. नंतर श्रीमती चामर्सनी १९५० मध्ये आणखी काही सुधारणा करुन नवीन पॅटन्ट घेतले. १९३० मधील 'टॅसेट' हा ब्रॅंड पुन्हा १९५० मध्ये नव्याने बाजारात आला. ह्या कंपनीने बरीच जाहिरात केली पण बायकांना धुवून पुन्हा वापरण्याचे कष्ट नको होते. तेव्हा 'डिस्पोझेबल'चा जमाना येऊ लागला होता. मग 'टॅसेट'ने सॅनिटरी नॅपकिनशी स्पर्धा करत 'युज अँड थ्रो' कपसुद्धा काढला होता. पण तो ही फार चालला नाही. फ़िनलंडमध्ये काही 'युज अँड थ्रो' कप वापरले जात. पण त्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. १९८० मध्ये रबराचा 'द कीपर' कप आला; तो अजूनही मिळतो. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला मेडिकल दर्जाच्या सिलिकोनपासून बनवलेले अत्यानुधिक कप आले. ज्यांना रबराची एलर्जी आहे त्या स्त्रियांनाही पाळीचे कप वापरणं शक्य झालं. ल्युनेट ही कंपनी २००५ पासून विविध आकारांचे व मापांचे कप बनवत आहेत.

भारतामध्ये कपचे उत्पादन मलानी बंधूंनी २०१० मध्ये सुरू केले. आता व्ही-कप, सिल्की कप असेही ब्रँड्स आलेले आहेत. शी-कपमध्ये एकच साइज आहे. पण दुसऱ्या काही कंपन्यांचे लग्न न झालेल्या मुलींसाठी लहान आकाराचे आणि जास्त स्राव असणाऱ्या बायकांसाठी मोठ्या आकाराचे कपसुद्धा मिळू लागले आहेत. प्रियांका नागपाल-जैन यांच्या वेबसाईट वर याबाबत सर्व माहिती उपलब्ध आहे. किंबहुना अमेरिकेमध्ये कितीतरी मुली वयात आल्या की लगेचच कप वापरायला लागल्या आहेत. कप वापरताना योनीपटल फाटू शकते. परंतु योनीपटल खेळतानासुद्धा ताणले जाऊ शकते. काही वेळा मातांना भीती वाटते की कप वापरल्यामुळे मुलीचे कौमार्य संपेल परंतु वैद्यकीय परिभाषेनुसार कौमार्य योनीपटलावरुन ठरत नाही; मुलीचा लैंगिक संबंध आला आहे किंवा नाही यावर ठरते. आजच्या बदलत्या जमान्यात कौमार्य ही खरोखरच जपायची गोष्ट आहे काय? आजच एका विडीयोमध्ये एका माय-लेकींनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत. अशा माऊलींचे व मुलींचे कौतुक केले पाहिजे.

मी वयात आले तेव्हा माझी आई कपड्याच्या घड्याच वापरायची. घरची परिस्थिती बेताचीच. आई आमच्यासाठी (मी आणि बहिण) पोटाला चिमटा घेऊन 'केयर-फ्री' आणायची. ते ही कमी पडायचं म्हणून कपडापण लागायचा. 'केयर-फ्री'मध्ये कापूस असायचा. त्यामुळे प्लॅस्टीकची पट्टी काढून फ्लश करता यायचं. नव्वदच्या दशकात अमेरिकेत गेल्यावर व्हीस्पर वापरू लागले. त्यामध्ये सर्व द्रव शोषून घेणारा पेट्रोलिअम पासून तयार होणारा जेल असायचा. आता कपड्याची गरजच भासेना. किंमतही खिशाला परवडू लागली. आपण किती कचरा करतोय याचा विचारच मनात येत नव्हता. १९९८ भारतात आल्यावर इथेही व्हीस्पर आलेले पाहून आनंद झाला होता. पल्लवी जोशीच्या जाहिरातीत असायचं की पाकीटामागे काही रक्कम मुलीच्या शिक्षणाला जाणार. तेवढचं बरं वाटायचं! त्याकाळी बंगलोर हिरवंगार आणि स्वच्छ होतं. घन कचऱ्याचा प्रश्न एवढा भेडसावत नव्हता. पण आता परिस्थिती बिकट आहे. बंगलोरच्या आसपास असलेल्या डंपिग ग्राऊंड्च्या आसपास राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कित्येकदा आंदोलने करून झालेली आहेत. त्यांच्या मुलांना कित्येक प्रकारचे आजार होत असतात व जन्मजात विकृतीही आढळतात.गेल्या ३-४ वर्षांत ओला-सुका कचरा वेगवेगळा करण्याची सक्ती झाली. अन्‌ लक्षात आलं की त्या चार दिवसातील माझा एकटीचाच कचरा किमान २ लिटर आकारमान अन्‌ किमान अर्धा किलो वजनाचा असावा. आयुष्यात पहिल्यांदाच मी हा विचार करत होते. गेली साडेतीन दशकं दर महिन्याला दहा नॅपकिन्स धरले तरी आतापर्यंत मी एकटीनेच चार हजाराच्या वर नॅपकिन्स वापरून कुठेतरी टाकलेत ह्या जाणीवेने वाईट वाटलं. प्रभाकर नानावटींच्या (सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट : एक भेडसावणारी समस्या) ह्या लेखातील गणितानुसार भारतात ३.६ कोटी स्त्रिया नॅपकिन्स वापरत असाव्यात. दर महिन्याला १२ नॅपकिन्स या हिशोबाने वापरलेल्या ४३.२ कोटी नॅपकिन्सचे वजनच ५००० टन होईल. आपण वापरून फेकून देत असलेल्या नॅपकिन्सच्या संख्येचा विचार केल्यास दररोज प्रदूषणात किती भर पडत आहे याची नक्कीच कल्पना येईल. कुठलेही नॅपकिन्स पूर्णपणे नष्ट व्हायला ५०० ते ८०० वर्षं लागतात. म्हणजे आजपासून ३००-४०० वर्षांनी कोणी संशोधकाने उत्खनन केले तर त्याला काय सापडेल? नुसती घाण. ती ही प्लास्टीक, क्रुड ऑइलने भरलेली. आणि जर हे जाळले तर आणखीच घातकी वायू आपल्या हवेत पसरतात. सुरक्षित विल्हेवाटीचे दुसरे कुठलेही उपाय माहित नसल्यामुळे मुली- स्त्रिया हे कुठेही टाकतात. कित्येकदा संडासच्या बाहेर येऊन टाकायला व्यवस्थित कचराकुंडी नसते म्हणून संडासच्या खिडकीतून भिरकावून देतात. अगदी उच्चभ्रू वस्त्यांमध्येही ही समस्या आहे मग झोपडपट्टीवासी, चाळकरी बायकांची तर गोष्टच सोडा.

हा सारा अपराधी विचार करता करता मी कप वापरू लागले. पूर्वी त्या चार दिवसात बाथरुमला जाणेच नको व्हायचे कारण दर वेळेला शिसारी यायची. कप असला की चार-पाच तासांनी एकदा काढून धुतला आणि तोच पुन्हा घातला की झाले. चार दिवसांनी गरम पाण्यात उकळून पर्समध्ये खादीच्या चंचीत परत! ऋतुस्रावाचा कप ही पाळीत वापरण्याची एकमेव वस्तू आहे जी पूर्णपणे निर्जंतुक करता येते. आणि कप वापरतांना मनात येणारी सगळ्यात चांगली भावना म्हणजे "आपण कचरा वाढवत नाही". कपाची इंग्रजी "C" आकाराची घडी घालून तो योनीमार्गात घालायचा. मग हळूच फ़िरवल्यावर तो आतमध्ये उघडतो व स्राव त्यामध्ये जमतो. हवेच्या दाबामुळे तो आत व्यवस्थित बसतो. तो एकदा नीट बसला की पाच-सहा तासांची सुट्टी. पाळी आहे हेच विसरायला होतं. सुरुवातीला काढ-घाल करायचा सराव व्हायला एक-दोन महिने जावे लागतात पण एकदा सवय झाली की पॅड वापरावेसेच वाटत नाही. हा केवळ माझाच नव्हे तर माझ्या कित्येक नेट-मैत्रीणींचा अनुभव आहे.

नॅपकिन्समुळे रक्तस्रावाचा वास येतो. याचं कारण टॅम्पन, नॅपकिन्स रक्त शोषून घेतात. त्यामुळे जास्त वेळ न बदलल्यास, त्यात जंतू वाढतात आणि कुबट वास येतो. पण कप “मेडीकल ग्रेड” सिलिकोनचा असतो. त्यामुळे त्याची रक्ताबरोबर कुठलीही रासायनिक क्रिया होत नाही. म्हणून आपलंच आपल्याला अगदी कसं स्वच्छ आणि पवित्र वाटतं. रक्त कपाला फारसं चिकटतपण नाही. वाटलंच तर दुसऱ्या दिवशी एक पातळ लायनर किंवा सुती कापडाचा पातळ नॅपकिन लावायचा. म्हणजे डाग पडण्याची भीती नाही. अलिकडे 'एको-फेम'चे छान पुन्हापुन्हा वापरता येतील असे रंगीबेरंगी सुती नॅपकिन्स आलेले आहेत. पुरळ, घसपटणे आणि चालताना जड वाटणे हे सगळंच बंद. गंमत म्हणजे कप वापरतांना तुम्ही धावणं, पोहणं, योगा-व्यायाम अगदी निश्चिंतपणे करू शकता. कित्येक योगा शिक्षिका आणि मॅरेथॉन धावपटू आता कप वापरू लागल्या आहेत. पाळी आहे म्हणून कुठलीच बंधनं नाहीत. हवी ती साडी/ पांढरा स्कर्ट घालायला तुम्ही मोकळ्या. डागांची काळजी न करता रात्रभर गाढ झोपता येतं. पांढऱ्या शुभ्र कापसामध्ये ग्ल्यायको फॉस्फेटसारखी कर्करोगाला कारणीभूत असलेली द्रव्ये असतात. टॅम्पन किंवा नॅपकिन्समुळे 'टॉक्सिक शॉक सिन्ड्रोम'सारखे गंभीर, जीवघेणे आजार होऊ शकतात. कप वापरणाऱ्या स्त्रियांत तो धोका नाही कारण जंतूसंसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. अगदी साबण नसलाच तर नुसता पाण्याने विसळून, टीश्यूने सुकवून कप वापरता येतो. मध्यंतरी एका नेट-मैत्रिणीने कांचनगंगा बेस कॅम्पवर दहा दिवसाच्या ट्रेकमध्ये शी-कप वापरला आणि तिने शी-कपचे मनापासून आभार मानले आहेत.

खूपदा बायका म्हणतात, "माझ्या अंगावरून खूप स्राव जातो". पण कपावरील मापावरुन मोजल्यावर कळतं की आपण ज्याला जास्त समजतो तेवढा स्रावही कपात आरामात राहतो. समजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी अगदी नाहीच जमत असं वाटलं तर सोडून द्या पण पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी वापरून पहायला काहीच कठीण नाही. एवढं केलं तरी आपला कचरा कमी होईल. कप आत घालणे व काढणे सुरुवातीला कठीण वाटायचं पण फेसबुक वर फक्त बायकांचा एक प्रायव्हेट ग्रुप सापडला. त्यावर जवळजवळ साडेसहा हजार मैत्रिणी भेटल्या. दररोज कुणीतरी 'पहिलटकरीण' आपला अनुभव शेअर करते आणि बाकीच्या तिला दिलासा देतात. मी ही हळूहळू त्यात भाग घेऊ लागले. कितीतरी व्हिडीयो पाहिले आणि ब्लॉग्ज वाचले. शाळेतील सहशिक्षिका व इमारतीमधील मैत्रिणींना माहिती द्यायला लागले. दहा जणींना सांगितलं तर एखादीच कप मागवते. सुरुवातीला भीती वाटणं साहजिक आहे पण भीतीवर एकदा मात झाली की पाळीबद्दलची घृणा व दडपण नाहीसे होईल. सध्या शी-कपची किंमत सातशे रुपये आहे. पण एकच कप आपण महिनोंमहिने काय ५ ते १० वर्षं वापरु शकतो. याउलट नॅपकिन्सचा महिन्याचा खर्च १०० ते १५० रु. असतो. म्हणजे केवळ सहा-

सात महिन्यांत आपले पैसे वसूल होतात. पण एक समस्या आहे- कप अजून औषधांच्या दुकानात आलेला नाही. इंटरनेटवरुन मागवावा लागतो. त्याच्या वैद्यकीय चाचण्या झालेल्या असल्या तरीही स्त्री-रोगतज्ञ त्याबद्दल अनभिज्ञ आहेत. जसजशी मागणी वाढेल, तसतशी किंमत कमी होईल. दानशूर लोकांनी मदत केल्यास गावागावांतून बायकांना स्व-स्वच्छतेबद्दल व ग्राम स्वच्छतेबद्दल जागृत करता येईल. मुलींची शाला-कॉलेजांमधील हजेरी व त्यांची गुणवत्ता वाढेल.मैत्रिणींनो, आता खरोखरच वेळ आली आहे बदलायची - हीच खरी स्त्री-मुक्ती म्हणायला हरकत नाही. स्वत:ला मुक्त करा. प्लास्टीक असलेले, वापरून फेकण्याचे नॅपकिन्स हा विसाव्या
शतकातील शोध होता. एकविसाव्या शतकातल्या स्त्रियांनी आता घ्यायला पाहिजे 'एकच कप'!

गौरी दाभोळकर
dabholkar.gauri@gmail.com

संदर्भ दुवे

[१] http://www.shecup.com/
[२] http://www.hygieneandyou.com/
[३] https://www.youtube.com/watch?v=PyDoKFn2fB8
[४]सॅनिटरीनॅपकिन्सची विल्हेवाट:एक भेडसावणारी समस्या http://www.aisiakshare.com/node/1921
[५] https://www.facebook.com/groups/sustainablemenstruation/?fref=nf

टीप: हा लेख इथे प्रकाशित करण्यासाठी ३_१४ विक्षिप्त अदितीचे मार्गदर्शन मिळाले. त्याबद्दल तिचे मनःपूर्वक आभार.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (6 votes)

प्रतिक्रिया

'ख्रिसमस शॉपिंग' केलं आहे.

... त्याची रक्ताबरोबर कुठलीही रासायनिक क्रिया होत नाही. म्हणून आपलंच आपल्याला अगदी कसं स्वच्छ आणि पवित्र वाटतं.

या वाक्यांत पवित्र हा शब्द वापरण्याबद्दल एक कडक चुम्मा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मेरी ख्रिसमस अदिती!

गेल्या महिन्यात बाईच्या पवित्रतेवरुन इथे मोठे वादळ उठले होते. शबरीमला मध्ये १० ते ५० वयोगटातील स्त्रियांना प्रवेश नसतो. त्यावरच्या एका चर्चेत असे म्हतले गेले की देवस्थानच्या लोकांना बाईची "पवित्रता" चेक करायचं मशीन जो पर्यंत येत नाही तो पर्यंत तिला देऊळ निषिद्ध! हे मनुष्य-अधिकाराच्या(ह्यूमन राइट्स) विरुद्ध आहे. तिची जर श्रद्धा असेल तर तिला जाऊ द्यावे की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

चांगली माहिती आहे.

अशा प्रकारचे नवे साधन सोयीचे असले, की त्याचे सुपरिणाम खूपच होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही माहिती स्त्रियांना अतिशय महत्वाची आणि उपयोगी असूनही कोणी उघडपणे ती मांडणं किंवा चर्चा करणं या गोष्टी अजूनही अतिशय संकोचाच्या मानल्या जातात. डिनायलमधेच राहण्याच्या वातावरणात ही माहिती तपशीलवार देणं हे र.धों.च्या तोडीचं काम आहे हे म्हटलं तर आजरोजीही खरं आहे. अशी गप्प बसा संस्कृती या विषयाभोवती घट्ट वेटोळं घालून बसली आहे. तस्मात्, या आणि अशा लेखांबद्दल अभिनंदन आणि प्रणाम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असंच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!
तुमच्या मैत्रीणी/बहिणी/बायकांना ही माहिती पाठवा. या बद्द्ल त्यांना मदत हवी असल्यास खुशाल संपर्क करायला सांगा. कारण या वर कितीही माहिती जालावर असली आणि लिंका दिल्या तरी प्रत्यक्ष संवाद केव्हाही दिलासा देतो!
गौरी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

अशा लेखाबद्दल ऐसीच्या धारिष्ट्य लेखनाचे अभिनंदन.कोणीतरी कुठेतरी अशा कुजबुजीतच घुसमटणाय्रा परंतू महिलांच्यासाठी अती महत्त्वाच्या विषयावर स्पष्ट मराठीत अनुभव लिहिणे अती गरजेचे होते.छापील माध्यमांत हे लेखन पुढेमागे आले तरी त्यात अद्यायावतपणाचा अभाव राहतो शिवाय शंका निरसन होत नाही.याप्रकारच्या विषयावर माहिती देण्यात विकिमिडिआही अपुरा आणि असमर्थ ठरतो कारण त्यांची पद्धत फक्त सिद्ध झालेल्या मूळ संदर्भांनी पुष्टी करण्याकडे असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे काही साधन माहीत नव्हते. वाचल्यावर पहील्यांदा प्रचंड ऑकवर्ड वाटले. दुपारपासून काहीतरी प्रतिक्रिया टंकते आहे आणि मग लॉग ऑफ होते आहे. काय लिहावे समजत नाही. कारण एकच ..... सोइस्कर अन स्वच्छ ( प्रत्येक वेळेस नवीन घडी) नॅपकिन सोडून धुवा-वाळवा-परतपरत वापरावाला कप कितपत सोइस्कर ठरेल याचा विचार करते आहे. टँपॉन्स एकदा दोनदा वापरले पण अजिबात आवडले नाही कारण घालताना लहान असतो व त्रास होत नाही पण काढताना त्रास(वेदना/डिसकंफर्ट) होतो. त्यामुळे कपबिप घालण्या-काढण्याच्या भानगडीत पडेनसे वाटत नाही. आशा करते प्रदूषण करत असल्याने समाजकंटकतेचा ठप्पा बसणार नाही.
.
अन परत बसला तर बसला, किती काळजी करत जगायचं? जे सोईचं आहे ते टाकून देण्याचे जीवावर येते. बरेचदा नवीन नवीन कचर्‍याला उत्तेजन नको म्हणून गुडविलच्या वस्तू, कपडे, पुस्तकं सग्गळं वापरते. किंबहुना पैसे वाचविल्याचा आनंदच मिळतो. (कोणी मनात tacky म्हणत असेल तर म्हणो .... चोरी करत नाही.), कारऐवजी बसने जाते, जिकडे लोक नवेनवे गॅजेटस बिनधास्त घेऊन, जुने टाकून देऊन, प्रदूषण करत असतात तिथे माझा बेसिकेस्ट बेसिक सेल वापरते. I think I am doing enough for environment.
.
मला कप अनकंफर्टेबल वाटतोय त्यामुळे वापरेनसे वाटत नाही.
______
लेख अतिशय आवडला विशेषतः त्यामागचे धाडस व भावना. अच्रट, गवि, धनंजय आदिंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने जरा धीर झाला. धीर मूळात जाण्याचे कारण मध्यंतरी हिंदी कवितांवर फक्त मीच भरभरुन प्रतिसाद दिले होते अन्य एकानेही दिला नाही. योगायोग असेल पण तेव्हा पासून टॅबू विषयांबद्दल आपणच अति बोलतोय की काय, गप्प बसावं की काय असं काहीसं वाटू लागलं होतं. अर्थात हा विषय टॅबु असला तरी अत्यंत महत्त्वाचा आहेच पण गौरी यांनी उत्तम माहीती पुरवली आहे. त्यांचे कौतुकच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आशा करते प्रदूषण करत असल्याने समाजकंटकतेचा ठप्पा बसणार नाही.

असं काही वाटून घेण्याची गरजही नाही.

ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो ती टाळावी. पर्यावरण वाचवणं योग्यच आहे, पण त्यासाठी स्वतःचा बळी देणं अपेक्षित नाही. पर्यावरण आपल्यासाठी आहे, आपल्यासाठी आपण पर्यावरण वाचवू बघतोय तर आपलाच बळी देऊन काय फायदा होणार?

नीधपने जे म्हटलं आहे, ज्या स्त्रिया दिवसभर घराबाहेर, ऑफिसाबाहेर असतात, दिवसभर फिरतात त्यांच्यासाठी कप वापरणं कठीण आहे. सुस्थित, प्रगत समाजात अशी गैरसोय फारच कमी होणं अपेक्षित आहे. ज्या स्त्रिया शौचालयांचा विचार करता सुस्थित नाहीत, रक्त बघवत नाही, किळस वाटते, इतर काही भीती आहे त्यांनी कप वापरू नये. त्याबद्दल अपराधगंड देऊ नये आणि या स्त्रियांनी अपराधगंड बाळगूही नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अरे वा! धन्यवाद. खरेदी करून टाकते. उपयुक्त आणि अगदी साधेपणाने दिलेली माहिती आहे. लगेच करून पाहण्याचा मोह झाला (तरी! पाळीची वाट मी बघीन असं मला नाही हो वाटते. ;-))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

खरा होली ग्रेल!
प्रचार व प्रसार केला जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कप अक्षरश: होली ग्रेल ......"चॅलिस" सारखा दिसतो! मला डॅन बाऊन साहेबाची आठवण झाली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

व्वा! असे लेखन इतक्या साधेपणाने, फुकटची लपवालपवी न करता करावे यातच तुम्ही जिंकलात!

लेखनाचे (व लेखिकेचे) स्वागत आणि अभिनंदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उपयुक्त माहिती सोप्या शब्दांत. हा लेख अनेकांना पाठवत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त! दुवा पाठवला आहे. बहुत आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अत्यंत उपयुक्त आणि स्वच्छ! सोसायट्यांचे ड्रेनेज तुंबणे, या प्रकाराला यामुळे आळा बसेल. (हो, आमच्या सोसायटीतच हा प्लॉब्लेम आहे) प्रसार केला जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेले दोन तीन वर्षे याबद्दल ऐकते वाचते आहे. काही प्रश्नांची उत्तरे कुठल्याच फोरमवर मिळाली नाहीत.
विसंवादी सूर लावतेय. लेखात जेवढे वर्णन केलेय तेवढे हे प्रकरण क्रांतिकारी किंवा वरदान वगैरे वाटत नाही मला.
भारतामधे लहान शहरे, गावे, खेडी यांच्याबद्दल तर बोलायलाच नको पण अगदी मेट्रो सिटीज, होऊ घातलेल्या स्मार्ट सिटीजमधेही बायकांसाठी स्वच्छ व सुरक्षित असलेली सार्वजनिक स्वच्छतागॄहे ही अजून फँटसीच आहे.
ज्या स्त्रियांचे काम एकाच शहरात का होईना पण फिरतीचे आहे अश्यांचे नुसते पॅड बदलायचे झाले तरी काय हाल होतात याचा भरपूर अनुभव आहे. खराब पॅडच्या स्वच्छ बाजूला पकडून, गुंडाळून वापरलेले पॅड फेकून देता येते. नवीन पॅडच्या शरीराकडे असलेल्या बाजूला हातही न लावता ते घेता येते. इथे तीच वस्तू रिकामी करून परत वापरायची आहे. कप इन्सर्ट केलेला आहे म्हणजे काढताना त्या भागाला हात लागणार, कप बाहेर काढून रक्त फेकून देऊन, धुवून (पाणी उपलब्ध असल्यास) किंवा पाणी नसेल तर टिश्यू पेपरचे बोळे वापरून (मग इको फ्रेंडलीचे काय झाले?), परत तो कप आत बसवायचा. हे सगळे भयाण प्रकारच्या सार्वजनिक टॉयलेटमधे. म्हणजे बाहेर काढलेला कप कशाकशा प्रकारच्या हवेला आणि आपल्या हातांनाही एक्स्पोज होऊन, जंतू घेऊन आत जाणार त्याला तोड नाही. परत हा सगळा उपद्व्याप चालू असेतो, हेवी फ्लो असेल तर आपले हात अजून खराब होणार. ते धुवायला पाणी मिळेलच आणि तेही आतमधेच मिळेल याची खात्री नाही. मग त्यासाठी अजून टिश्यू पेपरचे बोळे.. गेला सगळा इको फ्रेंडलीनेस 'डाऊन द ड्रेन'. माफ करा पण फिरतीत कश्यातरी उपलब्ध होणार्‍या आडोसा टाइप सोयींमधे हे पुरेसे हायजिनिक वाटत नाही.
हे मोठ्या शहरात फिरत काम करणार्‍यांचे. छोटी शहरे, गावे, खेडी यांचे तर विचारूच नका.

परत भारतीय म्हणून आपण बर्‍यापैकी अस्वच्छ लोक आहोत. बेसिक हायजिन बहुतेक लोकांना कळत नाही ही वस्तूस्थिती आहे. अश्या वेळेला रियूजेबल वस्तू ही अजूनच हानीकारक होऊ शकते.

ज्या घरून काम करतात किंवा घरून निघून अद्ययावत ऑफिसेसमधे काम करतात जिथे स्त्रियांसाठी स्वच्छ व सुरक्षित टॉयलेटस असतात अश्याच स्त्रियांना हे शक्य आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

प्रतिसाद खूप आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दा महत्त्वाचा आहे. मलाही ही प्रवासात असे अनुभव आलेत. पण नेमक्या अशाच वेळी कप आणि एखादे डिस्पोजेबल प्याड वापरुन अगदी १० तास काढता येतील. मध्ये सार्वजनिक टिकाणी फक्त बाथरुमला जायचं. जास्त क्षमतेचे कप सुद्धा मिळतात.
राजसी कुलकर्णीचा हा अनुभव वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

प्रवास नसताना/ फिरती नसताना वापरून सवय करून घेतल्याशिवाय माझी तरी हिंमत होणार नाही वापरायची.
नाट लावायच्या हेतूने प्रतिसाद लिहिला नव्हता पण हे सगळे प्रश्न आहेत आणि ते काही प्रमाणात तरी सुटल्याशिवाय हा पर्याय उपयोगाचा ठरणार नाही असे वाटते इतकेच. याचा अर्थ वापरू नये असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

अत्यंत महत्त्वाची माहिती. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

माझ्या अज्ञानामुळे किंवा प्रत्यक्ष अनुभवाच्या अभावामुळे कुणाला ही comment भोळसट किंवा असंवेदनशील वाटली तर आधीच मनापासून क्षमा मागतो. मला असा प्रश्न पडलाय की:- 'मिरेना' सारखे काही modern IUD's वापरले तर पाळी लवकरच पूर्णपणे बंद होते (आणि गर्भनिरोधनही होते, पण तो मुद्दा निराळा). तर गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या एका मर्यादित गटाव्यतिरिक्त, पाळी येणाऱ्या वयातल्या इतर बहुतांश स्त्रिया तसे IUD का वापरत नसतील? माझ्या समजुतीप्रमाणे IUD काढला की परिस्थिती पूर्ववत होते. त्यामुळे काही अपरिवर्तनीय बदल होण्याचा धोका नसतो. आणि बहुतांश स्त्रियांना IUD विनात्रास वापरता येतो (statistically काही जणींना allergy किंवा तत्सम त्रास होत असेल, त्यांना अर्थात हा उपाय गैरलागू). जुन्या काळचे IUD (कॉपर-टी इ.) बरेच problematic होते, त्यामुळे नव्या IUD's बद्दलही काळजी वाटत असेल का? दुसरी शक्यता म्हणजे काहीसा त्रास झाला तरी 'पाळी बंद करू नये' असे काहीजणींना वाटत असेल का? प्रत्येक स्त्रीचा यासंबंधात तिला योग्य वाटेल तसा निर्णय घेण्याचा संपूर्ण हक्क आणि समाजाने त्याकडे निकोप दृष्टीने बघण्याची गरज अर्थातच मान्य. वरील प्रश्न शास्त्रीय दृष्टीकोनातून आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

मी हे प्रथमच ऐकते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सर्वप्रथम, मी डॉक्टर नाही.

मिरेना किंवा IUS (दुवे बघा) यांबद्दल माझी माहिती जालवाचनातूनच आलेली आहे. थोडक्यात IUD म्हणजे गर्भाशयात बसवण्याचं उपकरण आणि IUS म्हणजे गर्भाशयात बसवण्याची हॉर्मोनयुक्त प्रणाली. IUD मध्ये तांबं असतं ज्यामुळे गर्भाशयात शुक्रजंतूंचं शिरकाण होतं; परिणामतः गर्भधारणा होत नाही. ही कॉपर-टी किंवा तांबीची पुढची पिढी. IUS मध्ये शुक्रजंतूंचं शिरकाण होतंच, शिवाय कृत्रिम हॉर्मोन, प्रोजेस्टिन असतं ज्यामुळे गर्भाशयाचं अस्तर फार पातळ तयार होतं. गर्भधारणा झाल्यास गर्भ गर्भाशयात चिकटू शकत नाही त्यामुळे शुक्रजंतू-बीजांड एकत्र आले तरीही गर्भ राहत नाही. या चर्चेत IUD गाळून टाकता येईल कारण त्याचा पाळीशी तसा काही संबंध नाही.

IUS चा एक ब्रँड मिरेना. दररोज घेण्याच्या गर्भनिरोधक गोळ्यांचा एक अवतार म्हणजे IUS. गोळ्या घ्यायला विसरण्याची शक्यता असते; पण एकदा 'न'वी तांबी गर्भाशयात बसवल्यावर हे लक्षात ठेवायची गरज नाही. म्हणजे विसरण्याचा धोका नाही. एकदा हे उपकरण बसवलं की तीन किंवा पाच वर्षं निश्चिती. कृत्रिम हॉर्मोन्स घेण्यामुळे गर्भाशयाच्या आतलं आवरण पातळ तयार होतं. पाळी येते तेव्हा हे आवरण झडून जातं आणि पुढच्या महिन्यात नवं आवरण तयार होतं. या आवरणात बऱ्याच रक्तनलिका असतात त्यामुळे आवरण झडताना रक्तस्रावही होतो. आवरण पातळ असेल तर रक्त कमी, थोडक्यात कृत्रिम हॉर्मोन घेण्यामुळे रक्तस्राव कमी होतो. फार रक्त जात नसेल तर ते आणखी कमी जातं. ज्यांना खूप रक्तस्रावाचा 'त्रास' होत असेल, वेदना, गैरसोय, पंडुरोग, इत्यादी, त्यांना कृत्रिम हॉर्मोन्स - गोळी वा IUS यांचा बराच फायदा होत असावा.

गोळ्या आणि IUS यांच्यात फरक असा की गोळ्यांमध्ये चार गोळ्या 'रिकाम्या' - प्लासिबोच्या असतात. त्या गोळ्या घेत असताना पाळी येते - किंवा रक्तस्राव होतो. पुन्हा दोन हॉर्मोनच्या गोळ्या शरीरात गेल्या की रक्तस्राव थांबतो. IUS मध्ये मायक्रोचिप - २४ दिवसांनंतर ४ दिवस काम नाही अशी काही सोय नसल्यामुळे रोजच प्रोजेस्टीन हॉर्मोन शरीरात सोडला जातो. त्यामुळे पाळी येतच नाही. IUS काढलं किंवा गोळ्या थांबवल्या की पुन्हा महिन्यात, दोन महिन्यांत शरीरातली नैसर्गिक व्यवस्था ताबा घेते.

ज्यांना अजिबात, यापुढे किंवा सध्या मुलं नकोत त्या स्त्रिया गोळी किंवा IUS का वापरत नाहीत असा प्रश्न भगताचा नाग्या यांना पडला आहे.

याचं मला समजणारं उत्तर - पाळी हा प्रकार बहुतेकींसाठी फार मोठा कष्टदायक नसतो. थोडा त्रास होतो, थोडी गैरसोय होते, पण हे सगळं असह्य पातळीवर जाणारं नसतं. ज्याचा फार त्रास नाही, जो कोणताही रोग नाही, त्यासाठी औषध का घ्यायचं असा प्रश्न पडतो. जसा पाळी म्हणजे आजार नाही तसंच हॉर्मोन्स म्हणजे औषध नाही असंही म्हणता येईल. पण बाहेरून मुद्दाम कृत्रिम हॉर्मोन्स शरीरात घ्यावेत का असा प्रश्न मला पडतो. डॉक्टरही ह.पा औषधं देत नाहीत, तसंच हॉर्मोन्स देत नसावेत. अँटीबायोटिक आणि हॉर्मोन्समध्ये फरक आहे हे मान्य करूनही, उगाच रसायनं शरीरात सोडण्याबद्दल माझ्या मनात अढी आहे.

पण .. इथे थोडा राजकीय मुद्दाही येतो असं मला वाटतं. मी स्वतःही काही काळ गोळ्या घेतल्या. (अन्य वैद्यकीय कारणासाठी घेणं बंद केलं.) गोळ्या घेण्यात माझी मोठी सोय होती. चार दिवस गैरसोय सहन करून शरीर व्यवस्थित राहतं, तर ते चार दिवस कधी येणार हे मला ठरवता येतं याचा आनंद मोठा होता. मी लहानपणापासून ज्या वातावरणात वाढले त्यात (माझ्या घरात नसलं तरीही) स्त्रिया परावलंबी असणं गृहित धरलेलं होतं. कधी आराम करायचा, हे मला ठरवता येणं यातूनही आपलं आयुष्य कसं चालवायचं हे आपण ठरवतोय याचा आनंद होतो.

दुसरं, शनीच्या देवळात १०-५० वयाच्या स्त्रियांना प्रवेशबंदीचा उल्लेख प्रतिसादात गौरीने केला आहेच. पाळीला अपवित्र समजणं, रक्तस्रावाला 'विटाळ' मानणं हे अजूनही आपल्याकडे चालत आलेलं आहे. Right to Pee, Happy to bleed अशी कँपेन्स स्त्रियांना चालवावी लागतात. मंदिरातल्या प्रवेशाचा मुद्दा माझ्या लेखी (नास्तिक असल्यामुळे) गौण आहे; पण पाळी आहे म्हणजे काहीतरी बिनसलेलं आहे, वाईट आहे अशा प्रकारचे ग्रह आज 'प्रगत' अमेरिकेतही दिसतात. (आठवा, डॉनल्डकाका ट्रंप.) अशा परिस्थितीत, 'औषध' उपलब्ध असूनही रक्तस्राव होऊ देणं हीसुद्धा राजकीय भूमिका ठरू शकते. मूलभूत सुविधा देणार नाही, त्याबद्दल उदासीनता दाखवणार, माणूस म्हणून समान वागणूक देणार नाही; पण तुम्हीच का पाळी थांबवत नाही अशा वृत्तीचा विरोध करणं ही ती राजकीय भूमिका.

आरोग्याच्या दृष्टीने त्या तेवढ्याशा रक्ताने माझं काही बिघडत नाही. ज्यांना इंटरनेटवर लिहा-वाचायला वेळ आहे त्यांना तितपत रक्त परवडू शकेल असा चांगला आहार निश्चित परवडू शकतो. ज्यांना पोटालाच पुरेसं मिळत नाही त्यांच्यासाठी कदाचित गोळ्या किंवा IUS यांचं महत्त्व अधिक असेल. पण बहुदा त्यांना या गोष्टी परवडत नसतीलही.

एवढं सगळं लिहूनही, कृत्रिम हॉर्मोन्स, IUD, IUS यांच्याबद्दल माझी मतं तीव्र नाहीत. व्यक्तिगत पातळीवर मागच्या अनुभवामुळे मी शक्यतोवर कृत्रिम हॉर्मोन्स टाळेन; माझ्या शरीराला माझी राजकीय भूमिका झेपत नाही.

हा विषय काढण्याबद्दल भगताचा नाग्या यांचे आभार. स्त्रियांना या विषयात रस असणं अनपेक्षित नाही. पण स्वतःला काहीही त्रास होत नसताना उरलेल्या अर्ध्या जगाबद्दल संवेदनशीलता दाखवणं सोपं नसतं हे वारंवार आंतरजालावर दिसत राहतं; तेव्हा पुरुषांकडून आलेल्या सगळ्या संवेदनशील प्रतिसादांचं महत्त्व अधिकच वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदितीने वर सविस्तर लिहलेच आहे. मी ही डॉक्टर नाही.
पण मी फ्क्त एवढेच म्हणेन की कृत्रिम हॉर्मोन्स शरीरात आणखी काय गोच्या करतील त्याचा नेम नसतो. निसर्ग नियमात जितकी कमी ढवळा-ढवळ होईल तेवढे उत्तम. नैसर्गिक रित्या जगणे केव्हाही चांगले. शेवटी ज्ञन्माचे भोग- भोगायला तर लागणारच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

प्रतिसाद माहितीपूर्ण आहेच. पण 'राजकीय भूमिका' हा मुद्दा मला वाटते यातून प्रथमच समोर येतो आहे आणि किंचितसा दहशतवादही. सण करायचे आहेत, तीर्थयात्रा करायच्या आहेत, मग आवर पाळी. हे तर भीक नको पण कुत्रा आवर या धर्तीवर पण काहीच नको असे द्विनकारी झाले. म्हणजे 'तीर्थयात्राही नकोत आणि पाळी आवरण्याची धमकीही नको' असे. 'तुम्हाला त्रास होतोय ना, मग बंद करा की पाळी. मोठी हौस आहे ना, मग भोगा त्रास गपगुमान' इथपर्यंत हे लॉजिक जाऊ शकते. यावर प्रिंट मीडियातूनही चर्चा व्हायला हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमती.

पाळीची क्वचित कटकट, कधीतरी थोडी जास्त कंबरदुखी, पोटदुखी असा त्रास, क्वचित थकवा.. असं होतं खरं. पण मला कोणतंही दगदगीचं काम करायचं नसतं. पाळी मला कोणत्याही धार्मिक कृत्यात नडत नाही. मला रक्ताची घृणा/भीती वाटत नाही. मला स्वतःच्या शरीराची पाळीमुळे किळस वगैरे तर अजिबात वाटत नाही. वर अदितीने म्हटल्याप्रमाणे मला तेवढं रक्त जाणं परवडतं. गौरी म्हणते आहे, तद्वत कृत्रिम हार्मोन्सचे परिणाम काय होऊ शकतात, ते माहीत असल्यामुळे मी त्यापासून लांबच राहीन.

त्यामुळे पाळी का बुवा बंद करावी? तिची तिची होईल तेव्हा होईलच. तोवर गैरसोय होईल तेवढी कमी करावी. बस. बाकी शी, शू, घाम, अश्रू, लाळ ही प्रकरणं असतात तसंच ते एक. प्रॉब्लेम इल्ले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पाळीचे काय करायचे हे कुणीही एखाद्या स्त्रीला "सांगणे/सुचवणे" (आज्ञार्थक किंवा विध्यर्थक सुद्धा) निषेधार्ह. आणि देवधर्म / सण यासारख्या विवेकशून्य गोष्टींच्या संधर्भात तसे करणे दुप्पट निषेधार्ह (दोन आचरट पूर्वपक्ष एकत्र आल्यामुळे!). आणि "पुरुषी" टोनमधून यापैकी काही करणे तर धिक्कारार्हच! मात्र स्वतःच्या ईषणेने ज्या स्त्रियांना पाळी थांबवावीशी वाटत असेल त्यांना काय मार्ग उपलब्ध आहेत आणि ते वापरण्याचे किंवा न वापरण्याचे फायदेतोटे काय असतील / असू शकतील याकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे. स्त्रीमुक्तीसाठी त्यासंदर्भातल्या सर्व शक्यतांचा उहापोह करायलाच हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

मिश्र वाचकवर्गापुढे हा विषय स्पष्ट आणि धीटपणाने मांडल्याबद्दल धन्यवाद.
'ऐसी'लाही धन्यवाद; त्यांनी खास महिलांसाठी असे स्वतंत्र दालन ठेवले नाही. त्यामुळे हा विषय समस्त मराठी आंतरजालावर येऊ शकला.
आणि शेवटी, 'ऐसी'च्या मॅचुअर, उदारमतवादी पुरुषसभासदांना धन्यवाद; त्यांनी कोणतेही कुत्सित अथवा पातळी सोडणारे सवंग प्रतिसाद दिले नाहीत. उलट गांभीर्याने कौतुक आणि स्वागत केले. आणि अशा माहितीचे योग्य मूल्यमापन कसे करावे हे दाखवून दिले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम माहितीपूर्ण लेख! नुकताच शेअर केला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Hello Gauri,

Very informative article and I must confess lot of new information in the article as well as the comments. Already shared the link.

But, wanted to congratulate you for writing such a factual, open and honest piece on a topic which still is a big taboo in our society. Keep writing.

Regards,

Amit Arun Pethe

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद मित्र-मैत्रीणींनो,
प्रींट मेडियामध्ये काही लिहिण्याआधी "ऐसी वर" लेख टाकल्यामुळे बरीच चर्चा झाली. माझ्या लक्षात न आलेले मुद्देही समोर आले. हा ही एक पर्याय आहे हे बायकांना माहीत असावे म्ह्णून ही धडपड.
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

'लेख तर आवडलाच, पण तो 'ऐसी'वर प्रथम टाकावासं वाटणं हेही 'ऐसी'च्या वाचकवर्गावर विश्वास दाखवणारं, म्हणून आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहीती रोचक आहे. आणि उपयुक्तही

... नीधप यांच्या प्रमाणेच मलाही याच्या वापरात काही अडचणी जाणवतात. आणि याच्या वापराची सवय करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागेल असे वाटते. कारण तो कप साफ करण इ. किळसवाणं वाटु शकतं.

तसेच स्त्रीरोग तज्ञांकडून परीक्षण होऊन योग्यतेचे प्रमाणपत्र मिळाल्यास याचा प्रसार आणि प्रचार करणे अधिक सुलभ होईल असे वाटते.

माहीतीबद्दल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

या स्थळावर काही रीपोर्ट्स मिळतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

त्यातील एका रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे -

Shecup is safe, user friendly and very promising eco-friendly revolutionary alternative, but as with any other new thing counseling, motivation and large trials spanning a longer time period are required.

खरं आहे मोटिव्हेशन असं काही वाटतच नाहीये उलट .... Sad असो. परत परत तेच उगाळत बसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय चांगला, माहितीपूर्ण लेख,प्रतिक्रियाही आवडल्या. नक्कीच वापरुन पाहिन. घरा॑तल्या कचर्^याचं खत करायला सुरुवात केल्यावर ओल्या कचरा फेकणे बंद झालेय पण ही पॅडस टाकून आपण कचर्^याला हातभार लावतो ही ख्ंत होतीच पण ते टाळण्यासाठी आधीसारखी सुती कपडा वापरणं काही जमण्यासारखं नाही. हा पर्याय ठिक वाटतोय. नीधप यांनी व्यक्त केलेली अडचणही आहे खरी.
हा लेख ऐसीवर टाकावासा वाटल्याबद्दल आणि लेखाला सकारात्मक प्रतिसाद देउन त्या विश्वासाला सार्थ ठरवल्याबद्द्ल 'ऐसी'चं आणि सदस्यांचं अभिनंदन.
लेख शेअर करत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतर सर्वांनी लिहिल्याप्रमाणेच, हा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. शेअर केला जाईल आणि हा पर्याय वापरून पाहायला हरकत नाही असं वाटतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अप्रतिम लेख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या पेक्षा 'चार दिवस कावळा शिवला पाहिजे' स्त्रियांना चार दिवस तरी हक्काचा आराम मिळेल. (सौ. मराठी वाचत नाही, नाहीतर ४ दिवस घरकाम करायला भाग पाडले असते. तूर्त आता ती शक्यता नाही).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाग पाडायची नाहीतर कावळा शिववण्याची वेळ येते कशाला काका, तुम्ही एवढे समजूतदार असताना? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

इथे डिव्हा कप म्हणून मिळतो वाटतं. मुलीला माहीती होती. नवी पीढी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो! त्यात साइजेस पण मिळतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

खूप छान लेख. माहितीपूर्ण. अशा "नाजूक" विषयाबद्दल न लाजता, साध्यासोप्या भाषेत, उपयुक्त लेख लिहिलात म्हणून तुमचे अभिनंदन आणि तसेच ऐसीचे आभार.
यातील काही माहिती मराठी विकीपिडियावर टाकता आली तर बघा, म्हणजे हा धागा नंतर वाहून गेला तरी ही माहिती सुलभपणे मिळू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या पर्यायासंबंधी लेखनाला वृत्तपत्रांतही प्रसिद्धी हवी असे वाटते. त्या दृष्टीने प्रयत्न केला आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

अभिनंदन, दिव्य मराठीचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अभिनंदन गौरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम! अभिनंदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा विषय ओपन फोरम वर मांडल्याबद्दल खुप खुप आभार. आणि तु खुप सोप्या साध्या आणि चांगल्या शब्दात लिहिले आहेस. तुझा ह्या लेखाची लिंक मी फेसबुक वर टाकते आहे. प्रत्येक मैत्रिणीला पर्सनली पाठवणे शक्य नाही म्हणून.

कोणत्याही स्त्रीला ह्या संदर्भात काही माहिती अथवा मदत हवी असल्यास मी मदत महिती द्यायला तयार आहे.

प्रत्येकीने हे कप्स वापरायला घ्याच असे काही कम्पल्शन नाही. पण मला अस वाटतं की ज्यांना फक्त हा प्रश्न आहे की हे कप्स घराबाहेर वापरणे अन्हायजनिक आहे त्यांनी ते घरात वापरुन पाहा. घरात आपण ८ ते १० तास असतोच ना. तेवढ्या वेळात जरी आपण हे कप्स वापरले तरी दिवसाचा एक असे चार पाच पॅड्स कमी वापरले जातील ना?

कप्स वापरणे जमेल का असा प्रश्न असेल तर नॉन पिरियड्स च्या दिवसात घरात वापरुन पाहा.

तसे सुद्धा त्याची किंंमत १००० च्या आत आहे. आणि आता तर भारतात मिळत आहेत. अगदीच वापरलं नाही गेलं नाही जमलं तर एक ड्रेस फाटला फुकट गेला असं समजा. मनाला हे थोडं तरी समाधान की ५०० ते ८०० वर्ष विघटन न होणारा कचरा कमी करायचा प्रयत्न तरी केला मी.

जबरदस्ती नाही. पण मला वाटतं प्रयत्न करुन पाहायला काहीच हरकत नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घरात असतानातरी काही प्रमाणात पॅड्स वापरणं टळेल याबद्दल सहमती.

कप्स वापरणे जमेल का असा प्रश्न असेल तर नॉन पिरियड्स च्या दिवसात घरात वापरुन पाहा.

या बाबतीत मोठ्ठ्या आवाजात "नको".
पाळी सुरू असतानाही, योनीमार्ग कोरडा असताना टँपन, कप, असल्या मोठ्या गोष्टी वापरायचा प्रयत्न करू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

असे काहीतरी पर्याय निर्माण करणं; ते उपलब्ध असल्याची माहिती इतर महिलांना देणं हे नुसतंच टॉयलेट नसतात म्हणून (ओ)रडत बसण्यापेक्षा खूपच चांगलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पर्यावरण रक्षणाबद्दल जागृती करणार्‍या संघटनांनीच याची निर्मिती केलेली नाहीये हे ही लक्षात घ्या हं!
त्यांनी केवळ जागृती निर्माण केली आणि त्यामुळे असे काही प्रोडक्ट बनण्याची लोकेच्छा जागृत होण्यात हातभार लागला. त्यामुळे त्यांनी केलेली जागृती हा कालापव्यय होता किंवा नुसतीच (ओ)रड होती असे मला तरी वाटत नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कपाबद्दलचे काही गैरसमज
Myths

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

हा लेख आजच पाहिला, वाचला. मूळ लेख, चर्चा, प्रतिसाद या सर्व गोष्टी प्रबोधन करणार्‍या आहेत. हा विषय सांगोपांग मांडल्याबद्दल लेखिकेचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

लेख मनापासून आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गौरी, लेखाबद्दल पुन्हा आभार.

कप वापरला. पर्यावरण, पैसे सगळं गेलं "पाकिटात"; कप वापरल्यावर फार कोरडं-कोरडं वाटलं. रात्री सुखात आणि कोरड्यात झोपले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती,
धन्यवाद! खालील लिंका मैत्रीणींना पाठवायला हरकत नाही.
myths
Best practices

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

अशाच एक एक मुली / बायका सेल्फ मोटिव्हेट व्हाव्यात अशी इच्छा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0