आरोग्य सांभाळणारी-अ‍ॅप्स? नको रे बाबा!

गेल्या आठवडयात जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सदर लेख, आरोग्यविषयक ‘अ‍ॅप’ला भूलणा-या आणि त्यावर विसंबून आरोग्यविषयक निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेणा-या टेक्नोप्रेमी ग्राहकांसाठी..

HealthApps

‘तंत्रज्ञान’ हा आजच्या युगाचा गुरुमंत्र आहे. सारे जग या तंत्रज्ञामुळे जवळ येत आहे. तंत्रज्ञान एक महत्त्वपूर्व आविष्कार म्हणजे आपला भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल. मोबाईल हा संपर्कक्षेत्राच्या साधनांमधील एक चमत्कार आहे. त्याची व्याप्ती आता केवळ संपर्कापुरती मर्यादित राहिली नसून तो आता प्रतिसंगणकाचे रूप धारण करत आहे.
‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही उक्ती मोबाईलला बरोबर लागू पडते. बाजारातील कंपन्यांमध्ये असलेल्या स्पर्धेमुळे आपल्याला हव्या त्या बजेटमध्ये, आपल्याला हव्या असणा-या सुविधा असलेला फोन घेणे आता सर्वसामान्यांना सहज शक्य होत आहे.
संगणक वापरून आपण जी काही कामे करत होतो ती सर्व आता मोबाईलद्वारे करणे शक्य होत आहे. मोबाईल तंत्रज्ञान आपल्याला वेगवेगळी ‘अ‍ॅप्स’ फ्री किंवा सशुल्क उपलब्ध करून देते. त्याचा वापर बँकिंग, खरेदी, तिकीट बुकींचे (वाहतूक + मनोरंजन) टाईमटेबल, फोटो काढणे, रेडिओ, मनोरंजन, खेळ अशा नानाविध गोष्टींसाठी करता येतो.
आजकालची तरुण पिढी ही टेन्कोसॅव्ही आहे. वेळेचा अभाव, पैशाची उपलब्धता यामुळे ऑनलाईन सर्व गोष्टी करण्याकडे तरुण पिढीचा कल आहे.
वैद्यकीय विषयाशी निगडित जी अ‍ॅप्स आहेत त्याचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. असे सर्वेक्षणाद्वारे दिसून येते आहे.
या घडीला ५०,००० वैद्यकीय अ‍ॅप्स बाजारात उपलब्ध आहेत आणि जवळजवळ ५० कोटी लोक त्याचा वापर करत आहेत.
वैद्यकीय विषयातील सर्वात जास्त वापरली जाणारी अ‍ॅप्स ही आहार, लठ्ठपणा, लठ्ठपणा कमी करणारे विविध प्रकारचे आहार, वेगवेगळ्या अन्नघटकांतून मिळणा-या कॅलरीज, विविध प्रकारचे व्यायाम प्रकार त्यातून जळणा-या कॅलरी, त्याचे फायदे/तोटे याविषयी मार्गदर्शन करणारी आहेत. काही अ‍ॅप्स ही मधुमेह रक्तदाब मोजणारी आहेत. फक्त बोट स्क्रीनवर ठेवा आणि तुमचे बीपी किंवा मधुमेह किती आहे ते जाणून घ्या.
मुंबईतील प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे यांनी याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात डॉक्टरकडे जाऊन प्रयोगशाळेत केलेल्या परीक्षा आणि मोबाईलवरील रीडिंग यात फारच तफावत असते असे आढळून आले आहे.
आजकालच्या फास्ट फूडच्या जमान्यात ‘पी हळद नि हो गोरी’ वृत्ती जनमानसात वाढत आहे. लोकांनी समजून घेतले पाहिजे की प्रत्येकाची शरीररचना, चयापचय, अनुवंशिकता, आरोग्य, अन्नघटक, जेवणाखाण्याच्या सवयी, राहणीमान भोवतालचे पर्यावरण हे भिन्न असते. प्रत्येक माणूस हा वेगळा असतो.
उपलब्ध असलेल्या अनेक अ‍ॅप्सवरील घटकांचा विचार न करता लोकांना त्यांचे आरोग्य, आहार दिनचर्या, व्यायाम याविषयी चुकीचे मार्गदर्शन करून दिशाभूल करणारी असतात.
विशेषत: वजन कमी कसे करावे, याविषयीचे विविध अ‍ॅप्स वापरून व्यक्ती स्वत:ची दिशाभूल करून घेत आहेत, असे मोठया प्रमाणावर आढळून येत आहे. हीच बाब मधुमेह, रक्तदाब या विषयांवर माहिती देण्याऱ्या अॅप्सना सुध्दा लागू आहे. दिल्लीतील मधुमेहतज्ज्ञ सुधीरकुमार यांनी या अ‍ॅप्सची वाढती लोकप्रियता आणि त्यांनी दिलेली हमी याबद्दल साशंकता व्यक्त केली आहे.
काही लोक आपली लक्षणे रोगाचे निदान करणा-या अ‍ॅप्सवर टाकून आपल्याला कोणता आजार किंवा रोग झाला आहे हे स्वत:च ठरवतात आणि मन:स्ताप करून घेतात.
प्रत्यक्षात डॉक्टरकडे गेल्यावर यातला कोणताही आजार किंवा रोग त्यांना झालेला नाही असे दिसून येते. काही लोक औषधांची माहिती देणा-या अ‍ॅप्सचा वापर करून स्वत:च कोणती औषधे घ्यायची हे ठरवतात.
ही जी काही विविध अ‍ॅप्स उपलब्ध आहेत ती काही कोणी प्रमाणित केलेली नसतात. त्यांच्या सत्यतेबद्दल आपण कशी माहिती मिळवणार, कशी खात्री करून घेणार हाही एक अनुत्तरित प्रश्नच आहे. ब-याचशा अ‍ॅप्सचे मूळ हे परदेशी आहे. ती त्यांच्या राहणीमानावर आधारित असतात.
इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी हवी ती माहिती आपल्याला बोटावर चुटकीसरशी मिळवता येते. पण माहितीचा योग्य वापर करण्यासाठीसुद्धा कौशल्य आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते. याचा आपल्याला विसर पडता कामा नये.
वेळ नाही म्हणून आपण सगळ्याच गोष्टींसाठी (विशेषत: आरोग्य) अ‍ॅप्सच्या मृगजळामागे धावणारा असू तर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम हे आपल्याला भोगावेच लागतील.
मोबाईल अ‍ॅप्सच्या ‘फॅड’ला वेळीच आळा घातला नाही, तर मोबाईल कंपन्यांचा नफा फक्त वाढेल आणि ग्राहकांच्या पदरी मात्र निराशाच येईल.
- ममता आठल्ये, मुंबई ग्राहक पंचायत
पुर्वप्रसिध्दी - दैनिक प्रहार - प्रतिबिंब

मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग
सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

अशा ऍप्स ची यादी / काही नावे दिली असती तर बरं झालं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही लोक आपली लक्षणे रोगाचे निदान करणा-या अ‍ॅप्सवर टाकून आपल्याला कोणता आजार किंवा रोग झाला आहे हे स्वत:च ठरवतात आणि मन:स्ताप करून घेतात.

.
https://s3.amazonaws.com/lowres.cartoonstock.com/health-beauty-patient-healthcare-self_diagnosis-hypochondriac-doctor-llan1103_low.jpg
.
http://www.cashdoctor.com/images/general/posts/self-diagnosing-internet-cartoon.jpg

श्रेय-अव्हेर- नेट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे बाकी खरं आहे.
बर्‍याच वर्षांपूर्वी मला पोटाखाली दुखू लागलं, त्यावेळी मी आधीच हे हर्निया किंवा अपेंडिक्स असेल आणि ते नसले तर एखाद्या क्यान्सर शेवटच्या स्टेजला आला असेल असे इंटरनेटवरून वाचून ग्रह करून घेतलेला. अख्खी रात्र या विचाराने/भितीने तळमळत काढल्यावरस सकाळी फ्यामिली डॉक्टरांकडे गेलो - तोवर दुखणंही आपोआप कमी झालं होतं - तर त्यांनी माझ्या चेहर्‍यावरील भितीकडे बघुनच सांगितलं होतं की "तुला इंटरनेटवर सल्ले हवे असतील तर माझ्याकडे यायचं नाही, इथे यायचं असेल तर तिथे काहीतरी वाचून झोपेचं खोबरं करायचं नाही".

त्यानंतर मी काही होऊ लागलं की सरळ आणि केवळ डॉक्टर गाठतो. इंटरनेटवर कै च्या कै घाब्रवतात! Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी सायटिका चे असे वाचलेले नेटवरती आणि त्या नवख्या नर्सने ते कन्फर्मही केले. पण काही काळातच हे सिद्ध झाले की पाय लचकला होता Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे हर्निया किंवा अपेंडिक्स असेल आणि ते नसले तर एखाद्या क्यान्सर शेवटच्या स्टेजला आला असेल

ही ऑर्डर उलटी असायला हवी होती
Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अॅॅप्सचे काय घेऊन बसला, हॉस्पिटल मध्ये कार्यरत अप्सरे समान सुंदर नर्सेसच्या हातून सेवा घेण्यासाठी हि भाग्य लागते. या बाबतीत तरी मी भाग्यवान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हॉस्पिटल मध्ये कार्यरत अप्सरे समान सुंदर नर्सेसच्या हातून सेवा घेण्यासाठी हि भाग्य लागते

नाय ब्वा!! ब्लड प्रेशरचं रीडिंग नेहेमी जास्त येतं!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजच एक बातमी टीव्हीवर ऐकली. फिटबिटवरचा डेटा वापरून एका गुन्हेगाराचा माग काढला. (बातमीचा दुवा शोधायचा प्रयत्न केला, पण सहज सापडला नाही.) तेव्हा काही गुन्हेबिन्हे करायचे असतील तर फिटबिट घरीच ठेवून जा. अॅलाबाय म्हणून वापरता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Extra

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मुंबईतील प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे यांनी याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात डॉक्टरकडे जाऊन प्रयोगशाळेत केलेल्या परीक्षा आणि मोबाईलवरील रीडिंग यात फारच तफावत असते असे आढळून आले आहे.

पण प्रयोगशाळेतले रीडिंग हे खरे आहे व मोबाईलवरचे रीडिंग खोटे आहे हे कसं सिद्ध करणार ?

डॉक्टर म्हणतो ते त्याच्या स्वतःच्या हितसंबंधांनी प्रेरित नसतं असं म्हणताय ? अ‍ॅप्स चा प्रादुर्भाव झाला तर डॉक्टर ची मागणी काही प्रमाणावर कमी होईल - असे कंजेक्चर मांडणे चूक/हास्यास्पद आहे का ? जर चूक नसेल तर डॉक्टर हा स्वतःच्या संभाव्य स्पर्धकाची क्रेडिबिलिटी कमी करण्याचा यत्न करीत नसेल कशावरून ??

----

मोबाईल अ‍ॅप्सच्या ‘फॅड’ला वेळीच आळा घातला नाही, तर मोबाईल कंपन्यांचा नफा फक्त वाढेल आणि ग्राहकांच्या पदरी मात्र निराशाच येईल.

५०,००० वैद्यकीय अ‍ॅप्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यातली काही नि:शुल्क असतील व काही पैसे घेऊन वापरता येण्याजोगी असतील. यातली बहुतांश अ‍ॅप्स ही खोटी आकडेवारी दाखवणारी असू शकतात असं म्हणताय ??

बाजारात लक्षावधी डॉक्टर्स आहेत. सगळेच बीजे मधून आलेले हुशार हुशार नसतात. काही डॉक्टर्स हे चुकीची तंत्रं वापरत असतीलही. काही खोटेपणा करणारे डॉक्टर्स असतीलही. काही डॉक्टर्स कामचलाऊ असतीलही. पण म्हणून काय डॉक्टर्स कडे जाण्याच्या फॅड वर आळा घालावा ? (का डॉक्टर्स वर सरकारचे रेग्युलेशन/नियंत्रण असल्यामुळे डॉक्टर्स हे लगेच स्वस्त दरात हाय-क्वालिटी रुग्णसेवा देणारे ठरतात ??)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रतिसाद गब्बरच्या म्हणण्याचा थेट प्रतिवाद म्हणून नाही. एक सांगोवांगीचं उदाहरण.

पण प्रयोगशाळेतले रीडिंग हे खरे आहे व मोबाईलवरचे रीडिंग खोटे आहे हे कसं सिद्ध करणार ?

मी सॅमसंगचं एस-हेल्थ नावाचं अॅप वापरते. सध्या माझा आकार आणि वजन कमी करायचा प्रयत्न सुरू आहे. त्यात वजनाचा आणि दिवसभरात (व्यायाम वगळता) किती पावले चालले याचा ट्रॅक ठेवायला हे अॅप वापरते.

शनिवारी सकाळी उठले तेव्हा वजन ६२.६ किलो दिसलं. म्हणजे बीएमआय २५ पेक्षा जास्त. मला ते काही फार आवडलं नाही, पण लिहून ठेवलं. सकाळी खाल्लं, व्यायाम केला, पाठ आणि पाय मोडेस्तोवर बागकाम केलं. मग आंघोळ केली, तेव्हा बरीच तहान आणि भूक लागली होती. पण समोर काटा दिसत होता म्हणून लगेच वजन केलं. ते ६२ किलो भरलं. बीएमआय २५ पेक्षा कमी. (आकडे-फेटीश असणाऱ्यांनी अंदाज सांगा, माझी उंची किती!) मग मी ते ६२ किलो लिहिलं आणि ६२.६ चं मोजमाप काढून टाकलं. एरवी मी सकाळी उठल्यावर लगेचच जे वजन दिसतं त्याची नोंद करते. पण या खाडाखोडीमुळे गेल्या आठवड्याची वजनाची सरासरी जरा जास्त आरोग्यपूर्ण दिसायला लागली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उंची साधारण १५७.५-१५८.२ सेमी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बी एम आय पेक्षा फॅट% जास्त रेलेव्हन्ट आहे.
http://www.nytimes.com/interactive/projects/cp/summer-of-science-2015/la...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते माझं अॅपही मला सांगतं; पण मुद्दा तो नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऐप विरोधात ग्राहक तक्रार मंच गाठता येइल का ? इट्स मा लाइफ़ इज ऑन द लाइन ? विशेषत: न्यायाधीशासमोरच रीडिंग चुकीचे येत असेल तर ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!