Skip to main content

टांझानियाच्या डायरीतून .......

टांझानिया हा दोन भूभांगाचा देश आहे.त्याची लोकसंख्या ६ करोड म्हणजे महाराष्ट्राच्या निम्मी तर क्षेत्रफळ मात्र महाराष्ट्राच्या तिप्पट आहे. हा एक शेती प्रधान देश आहे. टोमॅटो,अननस,फणस,आणि काजू ही इथली प्रमुख पिके .शेतीवर आधारित उद्योगांना इथे खूप वाव आहे.विशेष म्हणजे फक्त ३०% जमिनीवरच शेती होते.७०% जमिनीला अजूनही फाळ लागलेला नाही.जुलै २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींनी टांझानियाला भेट दिली ,त्यानंतर पहिली मोठी गुंतवणूक श्री.सतीश पुरंदरे या मराठी माणसानी केली.ते साखर कारखाना उभारत आहेत."मराठी पाऊल पडते पुढे......"

२०१९ च्या ऑगस्ट मध्ये मी टांझानियाच्या रेल्वे प्रकल्पावर रुजू झालो तेव्हा इतिहास घडवणाऱ्या कोरोनाच्या कालखंडातून आपण जाणार आहोत याची काहीच कल्पना नव्हती .
टांझानियामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरु झाला.त्याचे मूळ कारण म्हणजे तुर्की आणि युरोपिअन देशातून आलेले प्रवासी.तातडीची व्यवस्था म्हणून सरकारने लगेचच क्वारंटाईन आयसोलेशन वॉर्ड उभारले.जनतेमध्ये मास्क ,सॅनिटायझर आणि सोशल डिस्टस्टिंग बद्दल जागरूकता निर्माण केली.दुकाने, सरकारी आणि प्रायव्हेट ऑफिस यामध्ये सॅनिटायझर अनिवार्य करण्यात आले.कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे सक्त आदेश देण्यात आले.मोबाईलचे स्ट्रॉग नेटवर्क यासाठी कामी आले विशेष म्हणजे पोलीस यंत्रणा किंवा लष्कराचा यात अजिबात सहभाग नव्हता.टांझानियन जनतेचेहि यात पूर्ण सहकार्य होते. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे टांझानिया जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोना मुक्त झाला.यात टांगावीज या टांझानियन पेयाचा मोठा सहभाग आहे.
मी भारतात राहात असलेल्या परिवारापासून ६५००किमी दूर, टांझानियातल्या सोगा येथे या काळात वास्तव्यास होतो, अजूनही आहे...आमचं ऑफिस,घर,मेस हे एका मोठ्या कॅम्पस मध्ये आहे.अंदाजे १००० माणसं इथे राहतात .हे एक छोटंसं गावचं आहे असं म्हणायला हरकत नाही.

Global Health in Tanzania

अचानक २१ एप्रिल ला कॅम्पसमध्ये सरकारी ऍम्ब्युलन्स आली आणि आमच्या ऑफिस मधून एका सहकाऱ्याला घेऊन गेली.आम्ही सगळे प्रचंड ताणात होतो २,३ दिवसांनी कळले कि तो कोरोना पॉझिटिव्ह आहे .संपूर्ण कॅम्पस तणावाच्या मनस्थितीत होता.आमच्या ऑफिस मध्ये बाहेरून कोणी कामाला येईना, आमच्याशी बोलेना आम्हाला एकदम वाळीत टाकल्यासारखं वाटायला लागल .ऑफिसच्या एन्ट्री आणि एक्झिट गेटवर सॅनिटायझर ठेवले गेले.एकमेकांशी बोलताना ,भेटताना भीती वाटू लागली.समोरचा माणूस पॉझिटिव्ह असेल का?आपल्याला कोरोना झाला असेल का ?हे प्रश्न पडायला लागले.थोडासा घसा दुखायला लागला ,ताप आला तर, झाला वाटत आपल्याला कोरोना ?? अस वाटायला लागल.शेवटी १२ मे ला तो पूर्णपणे बरा होऊन घरी आला आणि आमचा जीव भांड्यात पडला.
हा अनुभव सांगायचं कारण असं कि जरी आम्ही तणावात होतो तरी एकमेकांची पूर्ण काळजी घेत होतो. सोशल डिस्टंसिंग ,स्वच्छता,गरम पाणी आणि टांगावीझ पिणे हे सातत्याने करत होतो त्यामुळे आम्ही कोणीही नंतर कोरोना पॉझिटिव्ह झालो नाही.
आपणच आपली काळजी घेतली तर कुठल्याही रोगावर मात करू शकतो हेच खरं.

मिसळपाव Thu, 18/06/2020 - 23:32

यात टांगावीज या टांझानियन पेयाचा मोठा सहभाग आहे.

गूगलवर "टांगावीझी = पिकल्ड जिंजर" . एक प्रकारची जिंजर बिअरपण आहे वाटतं. या 'टांगावीज' बद्दल अजून माहीती द्याल का? एकंदरीत मी रोज आल्याचा चहा पितो तो चालू ठेवावा असं दिसतंय :-)

हा तुमचा अनुभव अबापटांच्या 'करोना बखरीत' पण लिहाल का? तिथल्या नोंदीत ही भर जरूर असावी.

भारतातून टांझानियात जाऊन रेल्वे प्रोजेक्टवर काम?? हे असलं काही वाचलं की मी कीती बाळबोध, कारकुनी आयुष्य जगतो ते कळतं !! हा करोना आटपेल काही महिन्यात. किंवा आपल्या सगळ्याना त्याची सवय होईल. मग जरा सावकाशीने तुमच्या टांझानियाच्या अनुभवांबद्दल अजून लिहा. म्हणजे मला वाचायला आत्ताही आवडेल !!

टांगावीज पेय बनविण्याची कृती - एक कप पाण्यामध्ये एक इंच आले , कुटलेली दोन मिरी , एक लवंग , एक चमचा लिंबू रस आणि चवी पुरते मध घालावे. हे सर्व मिश्रण १० मिनिटे उकळावे व गाळून गरमागरम प्यावे . हे पेय शरीरामध्ये उष्णता निर्माण करते. म्हणून काळजी घ्यावी .

भारतामध्ये साधी रेल्वे सन १८५७ मध्ये सुरु झाली पण टांझानियामध्ये सन १९६० मध्ये सुरु झाली . तसेच आपल्याकडे इलेक्ट्रिक रेल्वे सन १९६० मध्ये सुरु झाली . त्यामुळे भारतामध्ये या क्षेत्रातील मुबलक निपुण इंजिनियर आहे . त्यामुळे आपल्या लोकांना तिकडे नौकरी मिळू शकते.

भटक्या कुत्रा Sat, 20/06/2020 - 17:50

बहुतेक तुमच्या कॅम्प मधला अनुभव चांगला असेल. पण याच्या विरुद्ध परिस्थिती दार एस सलाम मध्ये आहे. अजूनही सरकार कडून पक्के आकडे प्रकाशित नाहीत. हॉस्पिटलची कमतरता आहेच. एक disposable mask Tzs5000 (approx ₹150+) मध्ये विकले2 जात आहेत. मेडिकल2 मध्ये सॅनिटीझर संपलेत. सर्व औषधे आयात होत असल्याने त्यांचा तुटवडा इ इ.
आणि शहरात सिग्नलवर सुद्धा मधीनगन घेतलेले सैनिक नेहमीच असतात.
रस्त्यावर थुंकल्यास Tzs200000 (₹6000 approx) दंड आधीपासूनच आहे.
भ कु ( एक्स अ. नि.भा. फ्रॉम लँड ऑफ बुलडोझर)

भटक्या कुत्रा Sat, 20/03/2021 - 19:53

टांझानियाचे राष्ट्रपती जॉन मागूफुली यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
त्याच्या मते करोना वैगेरे western देशांची चाल आहे.
लस वैगेरे थोतांड आहे.
फक्त येशूची शरण हाच या रोगाचा उपाय आहे.