बखर....कोरोनाची (भाग ५)

आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम' मध्ये आहोत.

म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.

माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.

पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.

म्हणजे ही कोरोनाची साथ एक दोन महिन्यात जाईलही (आणि कदाचित तीनचार महिन्यांनी परत येईल अजून जोरात)
पण त्याचा प्रसार ज्या झपाट्याने झालाय त्यामुळे व्यापार उद्योग ते अर्थव्यवस्था ते हेल्थकेअर , सर्व सर्व बाबींमधे वेगाने आणि मूलगामी बदल होताना आपल्याला दिसेल.

ही प्रलयघंटा आहे का ? माहीत नाही , बहुधा नाहीच.
पण एक जाणवतंय की इतिहास घडतोय , आपल्यासमोर...
वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत.

म्हणून या आज घडणारा इतिहास , आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का ?
हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात ? इथेच, या धाग्यावर?
बखर वगैरे म्हणजे काय असतं ? हेच ना?
चला, जशी दिसेल तशी, कळेल तशी ,कुठल्याही विषयावर कोरोना साथीमुळे झालेल्या बदलांची नोंद करूयात आणि लिहुयात

बखर कोरोनाची
(आधीच्या धाग्यावर ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.)

उदीर जोमात

---
करोनामुळे उंदीर अधिक जोमात!
लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरचा खाद्यकचरा कमी झाल्यामुळे अन्नाच्या शोधात उंदरांना दाहीदिशा फिरावं लागतंय आणि त्यामुळे उंदीर अधिक आक्रमक झाले आहेत. वेळप्रसंगी ते आपल्याच पिलांना खात आहेत असं US Centers for Disease Control and Prevention (CDC) या राष्ट्रीय संस्थेनं जाहीर केलंय.

field_vote: 
0
No votes yet

किराणा आणि मेडिकल शिवाय इतर दुकानांना वार ठरवून दिल्याने थोडे हुश्श झालं.
न्हाव्याकडे टोकन घ्यावे लागेल बहुतेक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेरिकेत कोव्हिड-१९ मृतांची संख्या आता एक लाखावर गेली आहे, त्याविषयी वॉशिंग्टन पोस्टनं ट्रम्पच्या सहीनिशी एक सर्टिफिकेट जारी केलं आहे -

100,000 deaths certificate

पण जिवाला बरं वाटण्यासाठी आज एका भारतीय वंशाच्या शेफविषयी - प्रतिष्ठित मिशेलँ रेटिंग असलेला आणि ज्यानं कोणे एके काळी ओबामा कुटुंबासाठी जेवण बनवलं असा शेफ विकास खन्ना भारतात लॉकडाऊनमुळे भुकेल्या गरीब लोकांना अन्न देतो आहे.

त्याचं ट्वीट -

त्यात गंमत म्हणजे लोकांच्या लक्षात आलं की एवढे पैसे कमावणारा एक एनाराय अद्याप सिंगल आहे. त्यामुळे त्याला स्थळं सांगून येऊ लागली Smile

न्यू यॉर्क टाइम्सनं त्याची गोष्ट सांगितली आहे -
This Chef Has a Michelin Star and a Mission: Feeding Millions in India’s Lockdown

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दरवर्षाच्या पूर्वसंध्येला, मी मिळेल तेवढी वर्षभविष्ये वाचत असतो. त्यावर फार विश्वास आहे म्हणून नव्हे, तर कुणाची किती भाकिते बरोबर येतात हे पडताळण्यासाठी. २०१९ च्या दिवाळी पासून ते वर्षाच्या सुरवातीपर्यंत कोणीही, कोरोना सारख्या संकटाचा पुसटताही उल्लेख केला नव्हता. चीन मधल्या बातम्या यायला लागल्यावरही कुणालाच हे संकट नंतर आपल्या मानगुटीवर बसणार आहे याची कल्पना नव्हती. पण जेंव्हा चीनपासून अतिशय दूर, युरोप अमेरिकेत तो पसरायला लागला तेंव्हा जरा भीति वाटायला लागली होती. त्यानंतर विमानप्रवास करुन भारतात परत येणार्‍यांना जेंव्हा तो होऊ लागला तेंव्हा मात्र संकटाची चाहूल लागली. मार्च २०२० च्या मध्यापर्यंत सर्व व्यवहार व्यवस्थित चालू होते. काही निकडीच्या कामासाठी अमेरिकेला जाणे आवश्यक असल्यामुळे, त्याही परिस्थितीत आम्ही तिकीट काढून ठेवले. पुढे ते कॅन्सल झालेच. १८ मार्चपासून अत्यंत झपाट्याने स्थित्यंतरे होत गेली. राज्य सरकारने बरीच बंधने आणली. आमचा पार्क मधला मॉर्निंग वॉक बंद झाला. पाठोपाठ तो २२ मार्चचा रविवार आला. आधीच्या अनुभवावरुन, आम्ही आता कोणाच्याही 'भ्भो' ला दचकणार नव्हतोच. पण एका दिवसाच्या जनता कर्फ्युच्या दिवशी थाळीनादाचा आदेश हास्यास्पद वाटलाच. त्यानंतर, कुठून तरी कुणकुण लागून मुंबईतल्या बर्‍याच उत्तर भारतीयांनी २३,२४ मार्चला रेल्वेत जी गर्दी केली त्याचे व्हिडिओ पाहून, तेंव्हा जरी फारसा बोध झाला नाही तरी नंतरच्या घटनाक्रमाने, ही मंडळी महामहीमना तोरसेकरांपेक्षा जास्त ओळखून आहेत, याची खात्री पटली. आम्ही मात्र चतुरपणे केशकर्तनालयात धांव घेऊन भादरणीय रुपातून आदरणीय व्यक्तिमत्वात रुपांतर करुन घेतले.

पाठोपाठ ती २४ मार्चची काळरात्र आली. पुन्हा एकदा महामहीम अवतरले. कोणालाही,कसल्याही पूर्वतयारीला वेळ न देता त्यांनी मध्यरात्रीपासून २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करुन टाकला. ते 'जान है तो जहाँ है' हे आम्हाला त्यांच्या सानुनासिक उच्चारांमुळे 'कान है तो कहाँ है' असे ऐकू आल्याने आम्ही कान हलवून पाहिले.

दुसर्‍या दिवसांपासून ते नाकावरचे मास्क, ग्रोसरीच्या रांगा, भाजीवाल्यांपासची खडुची वर्तुळे या प्रकारांची सुरवात झाली. पुढे पुढे मी खिशातच खडु घेऊन खरेदीसाठी बाहेर जाऊ लागलो. सकाळी निर्मनुष्य रस्त्यावरही फिरायला जायची भीति बसली, कारण उठाबश्या काढणे, कोलांट्या उड्या मारणे वगैरे शिक्षा भोगण्याचं आमचं वय राहिलं नव्हतं! आत्तापर्यंतच्या अनुभवामुळे लॉकडाऊन २१ दिवसांचा न रहाता मारुतीच्या शेपटासारखा लांबत जाणार आहे हे सर्व जनतेने ओळखलंच होतं. टीव्ही चॅनेल्स आधीच कानात वारं भरल्यासारखे उधळत असतात. त्यांना तर हे मोठ्ठंच खेळणं हाती आलं. सर्व चॅनेल्सच्या स्क्रीन्सवर, मागे कायम तरंगणारे कोविड विषाणु दिसायला लागले. कोरोनाच्या अतिरंजित बातम्या तिन्ही त्रिकाळ कानावर आदळू लागल्या. ऐकीव माहितीवर आधारित उपचार, स्वयंघोषित मंडळी अधिकारवाणीने ऐकवू लागली. सर्व स्टार अर्थात चमको मंडळी, घरी बसलेल्या जनतेचं मनोरंजन करणं म्हणजेच देशसेवा, अशा थाटात बोअर करु लागली. नवीन कार्यक्रम करणे शक्य नव्हते त्यामुळे तीच तीच वाशाळी हवा आमच्या अंगावर सोडली जाऊ लागली. टीव्ही चॅनेल्स आणि कायप्पा यांत काही फरकच उरला नाही.

चौथा लॉकडाऊन सुरु झाल्यावर परप्रांतीय मजुरांचा धीर सुटला. ते जीवाच्या आकांताने आपल्या मूळ गांवी जाण्यासाठी प्रयत्न करु लागले. जर पहिल्या लॉकडाऊन आधी वेळ दिला असता तर ही भीषण परिस्थिती त्यांच्यावर ओढवली नसती. सर्वच प्रशासकीय स्तरावरच्या गोंधळामुळे त्या दुर्दैवी जीवांची पायपीट, त्यानंतर श्रमिक ट्रेन्स सोडताना उडालेला गोंधळ, हा जगभरच्या बातम्यांत दिसू लागला. त्यावर घाणेरडे राजकारण आणि ब्लेम गेम सुरु झाला. आता चौथा लॉकडाऊन अंतिम टप्प्यांत असताना देशाचे एकंदर चित्र गंभीर आहे. सरकारं गोंधळलेली आहेत. रुग्ण संख्या दीड लाखांपुढे गेली आहे आणि वेगाने वाढतच आहे. टाळेबंदीची क्षमता संपत आली आहे, वाढवली तर आर्थिक आरिष्ट नक्कीच आहे. कोरोनाबरोबरच कसे जगायचे, हे कदाचित आपली गरीब जनताच लवकर शिकेल पण राज्यकर्त्यांच्या बाबतीत अंधारच आहे.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

नै तर काय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शोध पतरकारिता

लोकशाहीत पत्रकरिकाता एक महत्त्वाचा स्तंभ आहे पण आज टीआरपी च्या मागे लागलेले न्यूज चॅनल वाले हे विसरले आहेत किंवा असे म्हणू शकतो की त्यांना त्याची जरूर वाटत नाही
सत्ताधऱ्यांचा आणि विरोधकांचा गेली चार पाच दिवस आरोपाचा धुरळा उडवणे चालू आहे आपल्या कडे आत्ता एक पक्ष केंद्रात आणि एक पक्ष राज्यात सत्तेत आहेत
दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करून एक प्रकारे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत
खरतर या करोनाच्या महामारित एकमेकाशी सहकार्य करून त्याचाशी मुकाबला केला पाहिजे ते सोडून ते त्याचे राजकारण करत आहेत
अशा वेळी पत्रकाराची जबाबदारी आहे की जी आकडेवारी हे राजकीय नेते सांगत आहेत त्यातील सत्य लोकासामोर आणणे पण हे होताना दिसत नाही हे भारतीयाचे दुर्दैवाने घडत आहे

Vishwesh Athavale

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कॅफेंशिवाय पॅरिसची कल्पना करणं अशक्य आहे. आता २ तारखेपासून काही नियम पाळून कॅफे आणि बार पुन्हा उघडतील. मात्र केवळ उघड्यावर टेबलं मांडून सर्व्ह करता येईल. अद्याप बारसमोर उभं राहून पिता येणार नाही.
France to reopen cafes, bars and restaurants

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला म्हणून दक्षिण कोरियानं शाळा सुरू केल्या आहेत. मात्र, काही दिवसांतच शाळांतून संसर्गाची प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे २०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Corona बरोबर जगावे लागेल हे फक्त दुसऱ्यांना सल्ले देण्या पुरते योग्य वाक्य आहे.
खऱ्या आयुष्यात दीर्घ काळ कोणी च स्वतःची काळजी घेवून स्वतची corona pasun सुटका करून घेवू शकत नाही.
दीर्घ काळ मास्क वापरणे शक्य नाही.
दोन दोन तासाला हात धुणे शक्य नाही.
Physical distance नेहमी राखणे शक्य नाही.
दारू,तंबाखू पासून कॅन्सर होण्याची शक्यता असते हे माहीत असून करोडो लोक व्यासनि आहेत.
मास्क नाही वापरला,हात नाही धुतले,अंतर नाही राखले तर covid 19 नी बाधित होतो हे किती ही सांगितलं तरी किती तरी टक्के लोक ते नियम पाळणार नाहीत.
आणि हा साथीचा रोग असल्या मुळे जे नियम पाळत आहेत ते सुद्धा ह्या रोगापासून वाचणार नाहीत.
त्या मुळे corona बरोबर जगायचे आहे ह्या वाक्याला काही अर्थ नाही फक्त ऐकायला बर वाटत.
सायन्स माणसाला covid पासून वाचवण्यासाठी सक्षम नाही.
मानवाची विषाणू विज्ञान मधील प्रगती अगदीच नगण्य आहे हे ह्या corona virus mule जगापुढे आले.
निसर्गाने च चमत्कार केला आणि हा व्हायरस रोग निर्माण करणार नाही असा त्या मध्ये बदल केला तरच माणसाची covid 19 पासून सुटका होईल अन्यथा नाही असं आता वाटायला लागले आहे.
सहा महिने होवून गेले तरी जगभरातील संशोधक ठोस असा काहीच उपाय शोधू शकले नाहीत.
जे उपचार होत आहेत ते जुन्या औषध च्या भरवशावर होत आहेत.
झाला तर झाला उपयोग नाही तर मृत्यू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

https://milindwatve.home.blog/2020/05/27/covid-19-we-need-neither-vaccin...

हा लेख वाचनात आला, यावर जाणकारांची मते ऐकून घ्यायला आवडेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

मत आणि ढुंगण, प्रत्येकालाच एकएक असते. तसेच ते त्यांना आहे. (मलाही आहे. अर्थातच.)

लेखाचा प्रतिवाद करता येण्याइतका काही मी स्वत:ला ज्ञानी किंवा जाणकार समजत नाही, आणि, प्रतिवादाला डिफेंड करता येण्याइतकी कुवत वा ताकद (अथवा वेळसुद्धा) मजजवळ निश्चितच नाही. त्यामुळे, त्या भानगडीत मी पडणार नाही. सबब, आपला पास. आणि, संपूर्ण लेख वाचून त्याचा अर्थ लावण्याची क्षमता तथा पेशन्स माझ्यात नाही. मात्र, एकच रँडम परिच्छेद जो वाचला, त्यातील पुढील वाक्ये भरपूर मनोरंजन करून गेली.

While all research on the virus is engaged in developing vaccine, studying pathogenic mechanisms or suggesting treatments, nobody seems to talk about evolution of the virus. This is for two reasons. One is that people in medicine are never trained to think of evolution.

वॉव! एपिडेमियोलॉजीमध्ये संशोधन करणारी मंडळी व्हायरसच्या म्यूटेशन्सचा विचार करीत नसतील, हे मानायला जरा अवघड जाते. कोविद-१९चे मरू द्या. साध्या फ्लूची लस घ्या. साध्या फ्लूचा व्हायरससुद्धा इतक्या भरभर म्यूटेट होतो, की या वर्षीची लस पुढच्या वर्षी काम करेलच, याची शाश्वती नसते. म्हणून तर दर वर्षी पुन्हापुन्हा फ्लूची लस टोचून घ्यावी लागते. आता मला सांगा, पुन्हापुन्हा टोचून घेण्याकरिता फ्लूच्या नवनव्या लशी दर वर्षी ज्या बाजारात येतात, त्या काय त्यांवर संशोधन करणारी एपिडेमियोलॉजिष्ट मंडळी झोपा काढीत असूनसुद्धा?

The other is that virulence is difficult to quantify. It is easier to sequence the virus, study its proteins, look for antibodies in the host etc. Researchers typically do what is easy to do rather than what is scientifically more relevant. Since one cannot measure a change in virulence easily, nobody will even talk about any hypothesis related to it. This is what I call “evidence bias” in science.

दोन वाक्यांचा परस्परसंबंध कळला नाही. परंतु ते असो. माझीच आकलनक्षमता तोकडी. चालायचेच.

If it is difficult to find evidence to either falsify or support a hypothesis, people will avoid talking about the hypothesis because it cannot make a paper. Whether the hypothesis is relevant to public health is not an important issue, whether you can publish a paper is.

समजा, एखादा हायपॉथेसिस आहे, आणि तो चूक की बरोबर हे पडताळून पाहण्याकरिता काहीही मार्ग तूर्तास उपलब्ध नाहीये. मग तो हायपॉथेसिस (सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने कितीही महत्त्वाचा असला तरीही), तो पडताळून पाहण्याचा एखादा मार्ग उपलब्ध होईपर्यंत काय कामाचा आहे? आणि, असा (पडताळून पाहण्याचा) एखादा मार्ग सापडेपर्यंत त्याबद्दल कोण कशाला बोलेल? उगाच हवापाण्याच्या गप्पा म्हणून?

ब्लॉगवर इतरत्र लेखक स्वत:च्या ब्लॉगबद्दल काय म्हणतो, तेही रोचक आहे.

Various scientific organizations and institutions are built to support science. However, along with the guise of supporting science they also lay down a number of constraints on science and create conditions in which free and unbiased pursuit of science becomes impossible. Now since I have detached myself from all formal science organizations and Universities, I think my real science journey begins now.

The intension of this blog is to express my unconstrained thoughts on a variety of aspects of science, scientific spirit and science education.

Who will read?

I don’t care!!

तर एकंदरीत असा सगळा प्रकार आहे तर.

बाकी म्हणायचे झाले, तर चांगल्या इंग्रजीत काय, मीही लिहू शकतो. (ऑल्दो, 'इंटेन्शन'चे स्पेलिंग मी intension असे करणार नाही. परंतु ते सोडून द्या.) आणि, रंगीबेरंगी ग्राफ काय, आपले घासुगुर्जीही काढू शकतात. सो व्हॉट?

"It's like Shakespeare. Sounds great, but does not mean a thing." (गुरुवर्य वुड्डहौससाहेबांकडून साभार.)

असो चालायचेच.

==========

या शब्दाचे मराठीत ट्रान्सलिटरेशन असेच करण्याची पद्धत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक3
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोथरूड येथील सोसायटीतला राडा तेथील एका रहिवाशाकडून प्राप्त झाला आहे -

गेल्या आठवड्यात आमच्या सोसायटीत राडा झाला. श्री साने (नाव बदलले आहे) सकाळी आंघोळीला जाणार तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की सांडपाण्याच्या पाईपमधून अचानक बाथरूममध्ये पाणी चढत होतं. लवकरच काही केलं नाही तर घरात पाणी शिरलं असतं. बाहेर जाऊन पाहिलं तर काय, वरच्याच फ्लॅटमधून जोरजोरात पाणी ओतल्याचे आणि घासण्याचे आवाज येत होते. तो होता श्री. बापट (नाव बदलले आहे) याने के सोसायटीच्या सेक्रेटरीचा फ्लॅट. सेक्रेटरी बाहेर गेले आहेत असं बघून त्यांच्या बायकोने गपचूप मोलकरणीला बोलावलं होतं आणि तिच्याकडून बाथरुम धुऊन घेत होती. (सोसायटीत सध्या मोलकरणींना प्रवेश नाहीये.) नेमकं पाणी तुंबल्यामुळे चोरी पकडली गेली होती. काय झालंय ते कळताच सेक्रेटरीणकाकू हातपाय गाळूनच बसल्या. म्हणाल्या, आता मी काय करू? तुम्हीच करा काय ते! मग चेअरमन जोशीकाकांना (नाव बदलले आहे) विचारलं की प्लंबर माहित्ये का. ते म्हणाले दोनतीन नंबर देतो पण आता लॉकडाऊनमध्ये कोण येईल माहीत नाही. त्यांनी पाचसहा नंबर दिले. सगळीकडे कॉल केला पण सगळे लांब होते आणि आता येऊ शकणार नव्हते. मग दुसऱ्या एका काकांकडून जवळच्या हार्डवेअर दुकानाचा नंबर मिळाला. त्यांच्याकडे प्लंबर भेटला आणि येतो म्हणाला. तो आला (मास्क लावून), त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं – खालचं चेंबर तुंबलंय म्हणाला. ८०० रुपये होतील साफ करायचे. सोसायटीचाच पैसा, आपल्याला काय! म्हटलं पावती देणार नं तर हो म्हणाला. मग म्हटलं घे भरारी! खरं तर, मार डुबी. तो कामाला लागला आणि हां हां म्हणता काम करून गेलासुद्धा. पण एव्हाना सोसायटीतल्या सगळ्यांची तुंबळ लढाई चालू झाली होती – इतके दिवस पाळला गेलेला नियम सेक्रेटरीण काकूंनीच मोडला होता ना! त्या म्हणाल्या किती दमते मी घरातली कामं करून, वर आपण पण ग्रीन झोनचे आणि आमची बाईपण. मग काय बिघडलं! एव्हाना सेक्रेटरी काका पण आले होते. ते सगळ्यांना सॉरी म्हणाले, आणि म्हणाले की आता कॉर्पोरेशनने अलाऊ केलंय. आपण नियम बदलायला पाहिजे. एव्हाना सोसायटीच्या whatsapp ग्रूपवरही धमासान चालू झालं होतं. दोन घरांत फक्त सिनियर सिटीझन राहतात. ते कधीपासूनचे सांगत होते की आम्हाला सगळं काम झेपत नाही त्यामुळे आमच्या बाईला तरी आत सोडा. तेव्हा इतर मेम्बरांनी सांगितलं होतं – त्या ‘तसल्या’ बायका कुठे राहतात, रोज कुणाला भेटतात ह्यावर आपला ताबा नसतो. तुमच्या हट्टामुळे तुमचा जीवही धोक्यात आणि आमचा जीवही. ते काही चालणार नाही. आता मात्र एक-दोघे तरणेताठे सोडता सगळेच म्हणू लागले की बरं होईल कामवाल्या बाई येऊ लागल्या तर. मग काय, सगळ्यांकडून त्यांच्या कामवाल्या बायकांची इत्थंभूत माहिती मागवायची ठरली - आधार कार्ड पॅन कार्ड ते तुम्ही कुठे गावाबाहेर गेला होता का, तुमच्या वस्तीत कुणाला करोना झाला आहे का, वगैरे लांबलचक प्रश्नावली. त्यात पर्यायी संपर्क म्हणून घरातल्या इतर सदस्याचा मोबाइल नंबर पण मागितला होता. एक बाई म्हणाल्या माझा नवरा लई डेंजर आहे. तो भडक माथ्याचा आहे; एवढंच नव्हे तर हिस्ट्री शीटरपण आहे. मला काय, मी देते नंबर पण तुम्ही जर् का त्याला फोन केलात तर पुढे जे काही होईल ती तुमची जबाबदारी. सगळे अर्थात भिऊन गेले आणि म्हणाले नका देऊ नंबर. तर असं सगळं रामायण घडून गेल्यानंतर आता रोजची कामाची कटकट टळली. एका तुंबलेल्या मोरीच्या कृपेने!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बऱ्याच ठिकाणी सर्रास मोलकरणी येऊ-जाऊ लागल्या आहेत. विशेषत: मा. मनपा आयुक्तांनी परवानगी दिल्यानंतर. मी ऐकलेली आर्ग्युमेंट्स अशी -

१. कामवाल्या बाईला बाथरूमखेरीज इतर कुठे प्रवेश देत नाही आम्ही
२. आल्या आल्या हात सॅनिटायझरने धुवुन मगच आत सोडतो.
३. आत आल्यावर परत हात धुवायला लावतो ते वेगळेच.
४. असेही त्यांचे हात बऱ्याच वेळ धुण्याच्या नाहीतर भांडी घासायच्या साबणातच असतात की...
५. मास्क बांधून काम करायला लावतो.
६. आमची कामवाली कंटेनमेंट झोनमध्ये राहात नाही.
७. त्यांनाही त्यांची आणि त्यांच्या कुटूंबाची काळजी आहेच की. त्या कशाला मुद्दामून काही करतील?
८. तुम्हाला काय करायचंय???? इत्यादी...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कमी दर्जाचे काम करणाऱ्या लोकांना(काम कोणतेच कमी दर्जाचे नसते असे माज मत आहे)तुच्छता पूर्वक वागणूक देण्याची नवीनच भेदभाव व्यवस्था अस्तित्वात आली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

कमी दर्जाचे काम करणाऱ्या लोकांना(काम कोणतेच कमी दर्जाचे नसते असे माज मत आहे)तुच्छता पूर्वक वागणूक देण्याची नवीनच भेदभाव व्यवस्था अस्तित्वात आली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

ट्रम्प, फ्लॉईडच्या मृत्यूविरोधात निदर्शने आणि व्हायरस ह्याविषयीचं एक व्यंगचित्र -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Corona बरोबर जगावे लागेल असे बौद्धिक देणारे हे कल्पनेच्या स्वप्नात असतात खऱ्या परिस्थिती पासून खूप दूर.
आज बीच ओपन केले तर मुंबई मध्ये चौपाटीवर लोकांची वर्दळ वाढली.
सु शिक्षित लोक ,मास्क न वापरता चौपाटीवर फिरत आहेत असे दृश्य मुंबई मध्ये दिसले.
लोकांना परिस्थीती चे गांभीर्य नाही .
Corona सोबत ते जगू शकत नाहीत पण corona nakki पसरवत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमिर पुतिन यांचे अप्रूव्हल रेटिंग करोनामुळे घसरले आहे -
Coronavirus in Russia: 'I don't trust Putin any more'
How Covid-19 is transforming Russia’s power structures

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

स्पर्धात्मक खेळांच्या जगात हळूहळू पुन्हा सुरुवात करण्याच्या दिशेनं हालचाल होत आहे. इंग्लंड विरुध्द वेस्ट इंडीज क्रिकेट सामने होणार आहेत, मात्र ३ जूनऐवजी आता ८ जुलैपासून. विंडीज संघातले तीन खेळाडू भाग घ्यायला तयार नाहीत -
England v West Indies: Three Windies players opt out of tour because of coronavirus fears
NBA owners approve 22-team format to restart season

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

एकीकडे लॉकडाऊन शिथिल होत असतानाच भारतातल्या कोव्हिड रुग्णांची एकूण संख्या आता इटलीपेक्षा जास्त झाली आहे. रुग्णांच्या संख्येत भारताचा सहावा नंबर आहे, पण मृतांच्या संख्येत १२वा आहे.
India overtakes Italy in cases amid easing of lockdown

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हिमाचलातून आजची करोना WTF बातमी -
Tourists yes, but no site-seeing, Tourism department instructs hoteliers

One of the proposals that officials presented before the hoteliers was that the tourists coming to the state will not be allowed for local site-seeing, tours, market visits or move outside the hotel. The tourism department also proposed that in case tourists move outside the hotel, it will be viewed a violation and action will be initiated against the hotelier and client under the law. However, the tourists will be free to move within the hotel

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ब्राझीलमध्ये एकीकडे व्हायरसचा धुमाकूळ वाढतोय आणि तेव्हाच सरकारने अधिकृत विदा देताना cumulative विदा देणे बंद करून केवळ गेल्या २४ तासांतला विदा देणे सुरू केले आहे -
Hard-hit Brazil removes data amid rising death toll

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Corona बाबत सरकारची अवस्था वरील म्हणी प्रमाणेच झाली आहे.
टाळे बंदी चालू ठेवावी तर आर्थिक व्यवस्था कोलमडून पडत आहे.
घरातून काम करण्यास मर्यादा आहेत सर्वच काम घरातून होवू शकत नाही.
आणि त्याच बरोबर घरातच दीर्घ काळ राहिल्या मुळे लोकांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे.
जास्त दिवस लॉक down chalu ठेवणे भयंकर नुकसान दायक आहे.
लॉक down उठवून सर्व चालू करावे तर बाधित लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढू शकते.
आरोग्य यंत्रणेवर प्रचंड तान येवून आरोग्य यंत्रणा
कुचकामी ठरेल.
आरोग्य यंत्रणेशी संबंधित लोक बाधित झाली.
पोलिस बाधित झाले.
तर सर्वच यंत्रणा जीव सोडतील.
किडनी खराब झाली की लिव्हर,heart,aani शरीरातील सर्वच अवयव नष्ट होतात तसे काहीसे घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
बचाव म्हणून जी अस्त्र आपल्याकडे आहेत त्याला नक्कीच खूप मर्यादा आहेत.
मास्क, sanitizer,jast divas bachav karu शकणार नाहीत
नकळत चूक होणारच.
करावे तर काय करावे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हिमाचल टुअरिझमसाठीचे आदेश आणि तंबी पाहता एमटीडीसीचे धोरणही जेव्हा काही सर्व चानचान होते तेव्हाचेही भयानक होते.
कोणत्या डिपार्टमेंटचे कोणी ऐकायचे याला मेळ नसतो. फ्रत्येक सचिव राजा आणि धाड टाकायला मोकळा. म्हणजे आता करोनाकाळात चिखलदरा प्रमोट करायचे का थिबा प्यालेस / माळशेज घाट यावरही घोळ घालत असतील.
एकवेळ आइएएस भूषण गगराणीला आणूनही काही साध्य झाले नाही.
करोनानंतर काय आणि कसे साध्य करायचे याचे टार्गेट्सही असतील. म्हणजे व्ह्युपॉइंटला रांगेत उभे राहून एकेकाने नव्वद सेकंदच पाहावे आणि तीन मिटर्स दूरी ठेवावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आर्थर रोड आणि इतर तुरुंगांत करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हजारो कैदी तुरुंगातून सोडणार असल्याची बातमी पूर्वी बखरीत येऊन गेली आहे. कैद्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या अनेक ताज्या बातम्या येत आहेत.

औरंगाबाद तुरुंगात २९ तर सोलापूर तुरुंगात ५२ कैदी आणि कर्मचारी संसर्गग्रस्त आढळले आहेत. औरंगाबाद तुरुंगातले दोन रुग्ण पळून गेले आहेत. एकूण सुमारे १७,००० कैदी सोडले जाणार होते त्यांपैकी ९,७०० कैद्यांना सोडले गेले आहे.

Day after 29 inmates of Aurangabad prison test positive for Covid-19, 2 escape from care facility

आतापर्यंत महाराष्ट्रात सुमारे ३,००० पोलीस कर्मचारी संसर्गग्रस्त झाले आहेत तर ३० जणांचा बळी गेला आहे.
Maharashtra police has suffered most casualties in Covid-19 fight, says Anil Deshmukh

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

शाळा आणि अंगणवाड्या बंद असल्यामुळे भारतातली कोट्यवधी मुलं दुपारच्या जेवणाला मुकत आहेत. तिथले कर्मचारी करोनाच्या कामाला लावले गेले असल्यामुळे कुपोषण हा सरकारचा प्राधान्यक्रमच राहिलेला नाही. त्यातच कामगार कामाविना शहरांतून आपापल्या गावी परतले आहेत आणि समस्या अधिकच बिकट झाली आहे. भारतात पाच वर्षांखालची मुलं मरण्याचं प्रमाण उत्तर प्रदेशात सर्वाधिक आहे. तिथल्या एका एनजीओचा वृत्तांत -

The fallout of India’s lockdown on child malnutrition will be felt long after the Covid-19 crisis

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

करोनामुळे इतर आरोग्य प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पोलिओ, गोवर अशा रोगांचे जे नियमित लसिकरण होत असे त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे आणि हे रोग पुन्हा डोके वर काढतील अशीही भीती आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Pacman game मधल्या राक्षसाची आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोरोना मुळे अनेक नव्या स्वयंघोषित वैद्यकीय संशोधन संस्था उदयास आल्या आहेत. कल्याण पोलीस ही अशीच एक संस्था. त्यांनी भीमसेनी कापूर हा वातावरण निर्जंतुक करण्यात उपयुक्त असल्याचा शोध आपल्या कार्यालयात केलेल्या संशोधनातून सिद्ध केले आहे. त्याचप्रमाणे लिस्टरिन (पिवळे की निळे/हिरवे हे माहिती नाही) पाण्यात घालून गुळण्या केल्यावर तोंड निर्जंतुक होते हा ही निष्कर्ष प्रयोगाअंती काढला आहे.
त्यानुसार वरील उपाय पोलीस कार्यालयात कर्मचाऱ्यांनी करावेत असा आदेश पुणे पोलीसानी काढला आहे.
फोटो न दिसल्यास इथे पहावा.
https://drive.google.com/file/d/1i6oAFicUeZpt6qqlHMaVurTX0MKKb20y/view?u...

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

करोनाविरोधी करून अजमावून ( उत्रदायित्वास नकारांतर्गत) पाहण्याच्या औषधे आणि तोडग्यांची यादी कधी देणार?

( शंखध्वनिसह, नामजप वगैरे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Corona virus che rup,prakar,gun ह्याची माहिती करून झाली असेल तर प्रतिबंध पण कसा करायचा ह्या वर संशोधन पूर्ण झाले पाहिजे.
हा व्हायरस चीन नी पसरवला असेल हे खरे असेल किंवा नसेल
पण भविष्यात नव नवीन जिवाणू,विषाणू हल्ले करतच राहणार आहेत
काय सांगावे हा corona virus अतिशय किरकोळ विषाणू असेल.
त्या पेक्षा पण भयंकर विषाणू,जिवाणू इथे अस्तित्वात असतील आणि कधी ही मानवात संक्रमित होतील
अंतराळात लोकांना गुंतवून स्वतःचे अपयश विज्ञान लपवू शकणार नाही.
अंतराळ,कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या जंजाळात लोकांना जास्त दिवस गुंतवता येणार नाही
Corona ni he सिद्ध केले माणूस ज्याला विज्ञान म्हणतो तो त्या मध्ये एकदम कच्चा आहे.
अजुन त्याला बेसिक ज्ञान सुद्धा नाही.
त्या मुळे आपण खूप प्रगती केली आहे हा खोटा समज विसरून माणसाने परत kg pasun vinyan shikave

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

खरंय.
मला पटलं हे.
तात्या, तुम्हाला असं नाही वाटत का की आपण सगळे एका सिम्युलेशनमधे रहातो.
आणि जो कुणी हे सिम्युलेशन नियंत्रित करतोय/करतेय/करतायेत - ते विषाणू, युद्ध, ज्वालामुखी वगैरे अडथळे आणून खेळातली मजा वाढवतात.
आणि मग त्यावर बेटिंग करतात.
तुमचं हे मत वाचून तुमच्यावरचे पैसे वाढले असणारेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आषाढी वारी पालखी सोहळा अगदी काही तासांवर येऊन ठेपला असताना -
आळंदीमध्ये करोनाबाधित महिलेच्या मृत्यूने खळबळ; मंदिर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

करोना बखरीत आजचा दिवस अमेरिकेचा -

१. संसर्गाचे वाढते आकडे, एकूण संख्या दोन मिलियनपार आणि स्टॉक मार्केटची मार्चनंतरची सर्वाधिक घसरण
U.S. surpasses 2 million coronavirus cases; market rout reflects bleak economic picture
२. तुम्ही खरे भक्त असाल, तर देवदर्शनाला जाल; मात्र संसर्ग झाल्यास देव जबाबदार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अशीही एक करोना बखर -
‘We Have Been in a Lockdown for Three Decades’

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इतर प्रगत देशांपेक्षा यूकेमधली मंदी अधिक तीव्र असेल असा एक अंदाज -
Looming recession poses second global embarrassment for UK

गोरे वगळून इतर वंशाचे डॉक्टर मरण्याचं प्रमाण अधिक असूनही अनेक डॉक्टरांची रिस्क असेसमेंट झालेली नाही -
BAME doctors feel 'let down' over risk checks

६८ वर्षांत केवळ दुसऱ्यांदा राणीच्या वाढदिवसाची परेड होऊ शकली नाही -
Queen's official birthday being marked with new ceremony

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बीजिंगमध्ये संसर्गाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा अंशतः लॉकडाऊन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

एकूण रुग्णांची संख्या वाढते आहे. त्या बाबतीत भारत सातव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोचला आहे. पुरेशा चाचण्या नसताना लॉकडाऊन उठवल्यामुळे भारताची परिस्थिती लवकरच बिकट होणार असा दावा -
India Is Hurtling Into a Coronavirus Crisis

भारतातून होणारं डेटा रिपोर्टिंग विश्वासार्ह नाही असा दावा -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

शमिका रवी अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या ट्विटर फीडवर करोनासंदर्भात रोचक विदा मिळते. कोणत्या राज्यात मृत्युदर किती आहे ते ह्यात दिसेल -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर राहणारा एक परिचित आहे. त्याच्याकडून आलेला किस्सा : साखर कारखान्यांची यंत्रे दुरुस्त / मेंटेन करणारे काही लोक परिचित आहेत. आता सीमेपल्याड वाहतूक सुरू झाल्यामुळे कर्नाटकातल्या त्यांच्या नेहमीच्या कारखानदार ग्राहकांनी त्यांना दुरुस्ती / मेंटेनन्ससाठी बोलावले. मात्र कर्नाटक सरकार म्हणते की महाराष्ट्रातून आलेली व्यक्ती क्वारंटाईन केली पाहिजे. इतके दिवस सगळी कामं सोडून हे मेकॅनिक काही तिथे राहू शकत नाहीत. मग आता नियमाला अपवाद शोधण्यात आला आहे - २४ तासांच्या आत माणूस महाराष्ट्रात परत गेला तर क्वारंटाईन नाही. तर आता सीमेवरचे जवान असे रोज रात्री आपापल्या घरी परतून जाणार आणि कर्नाटकी साखर कारखान्यांना हलते ठेवणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बिचारे डॉक्टर कावले -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तिथे एक हुशार डॉक्टरांना म्हणतोय, की पंतप्रधानांनी संधी दिली म्हणून तुम्हाला हे करता आलं. जणू पंप्रंनीच डॉक्टरांवर उपकार केल्येत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारतात corona virus ni अस्तित्त्व दाखवले त्याला तीन महिने होवून गेले.
ह्या मधल्या काळात अनेक अंदाज अनेक क्षेत्रातील व्यक्तीने व्यक्त केले.
स्वतः च्या राजकीय,वैचारिक सोयी नुसार अनेक प्रश्न चर्चेत आणले गेले.
मग ते स्थलांतरित चे प्रश्न असतील किंवा आर्थिक
प्रश्न .
वाटत होत समाज,विचारवंत केवढे सवेदांशिल आहे.
पण तीन महिन्यानंतर सुद्धा सर्व प्रश्न पाहिले होते तसेच आहेत.
एक ही प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्न झालेले नाहीत.
बाधित लोकांची संख्या चक्रवाढ व्याजा प्रमाणे वाढतच आहे .
परिस्थिती मध्ये कोणताच सुधार झालेला नाही उलट अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होईल अशा मार्गाने वाटचाल चालू आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

करेक्ट....

आपल्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी योग्य तोच प्रश्न विचारला आहे.

आम्ही कमी पडलो असू पण मग विरोधकांनी काय केलं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

डोंबिवलीतील एका शाळेने आपला करोनाकालीन वाढदिवस साजरा करण्यासाठी केलेला व्हिडिओ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दीनानाथ हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. धनंजय केळकर यांचे करोनाविषयक व्याख्यान (सुमारे २६ मिनिटांपासून पुढे) इथे पाहता येईल.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

डॉ. केळकरांचं व्याख्यान जरुर ऐकावे, अत्यंत वस्तुनिष्ठ आणि अनेक कायप्पा/टीव्ही चॅनेल्स/वर्तमानपत्रे, कोरोना विषयी पसरवत असलेल्या गैरसमजांना खोडून काढणारे आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दहती बहुमना नाना कुशंका !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टेक्सासात करोनाचे रुग्ण मोेठ्या प्रमाणावर वाढत आहेत; मुख्य कारण राज्यातली बंधनं शिथिल केली आहेत. ह्यावरून हाफिसातलं कपातलं वादळ ... येत आहे उद्या.

तर गंमत आहे अशी की ऑफिसात कॉल सेंटर आहे आणि टेक-टीम आहे. टेक-टीमच्या नेत्यांच्या डोक्यात कधीपासून आहे की ह्या दोन्ही गोष्टी निराळ्या कराव्यात. एका ऑफिसातही असू नयेत; कारण सगळा मोकळा प्लॅन असतो आणि कामासाठी ज्यांना दिवसभर बोलावं लागतं त्यांच्या बोलण्याचा टेक-टीमला उपद्रव होतो. शिवाय सततचे त्यांचे सोहळे करायला टेक-टीमला उत्साह नसतो; कामांचं स्वरूपच निराळं असतं; वगैरे.

करोनामुळे सगळेच घरून काम करायला लागले, बहुतेक सगळे. ऑस्टिनातलं ऑफिस संपूर्ण बंद नव्हतंच. टेक्सास राज्यात रियल इस्टेट हा प्रकार आवश्यक सेवांमध्ये मोजला गेला आणि आमचं मुख्य ऑफिस, कॉल सेंटर ऑस्टिनातच आहे. सीईओ आणि मोजके काही लोक ऑफिसातूनच काम करत होते. मग टेक्सास हळूहळू उघडायला सुरुवात झाली. मुळातच आमच्यासाठी पुरेशी डेस्कं नव्हती. ऑस्टिनातली टेक-टीम आधी वेगळ्या मजल्यावरच्या 'वी वर्क'च्या ऑफिसात हलवली होती. ती जागा सध्या बंदच आहे.

सीईओचं म्हणणं, मिलेनियल लोक आळशी आहेत, घरून काम करत नाहीत. म्हणून सगळ्यांनी ऑफिसात येऊनच काम करावं. आळशीपणाचा आरोप फक्त कॉल सेंटरवरच. ह्याचे आकडे वगैरे आम्ही, म्हणजे विदावैज्ञानिकांनी तपासलेले नाहीत. तसे तपासण्याची सोय आहे, पण (अर्थातच) हे आमच्या प्राधान्यक्रमात नाही.

फक्त कॉल सेंटरच्या लोकांना ऑफिसात यायला लावणं ठीक दिसत नाही, म्हणून टेक-टीमनंसुद्धा ऑफिसात यावं. पण ऑफिसात पुरेशी जागाच नाही. मग एकाड-एक आठवडा मार्केटिंग आणि टेक अशी डेस्कं दिली. पण एकत्र कामं करायची तर बोलावं लागतं; त्यासाठी कॉन्फरन्स रूम्स पाहिजेत. फोन बूथं पाहिजेत. करोनामुळे ती वापरण्यावर बरीच बंधनं आली. त्यामुळे ती असून नसल्यागत झाली. वर पुन्हा तोंडं झाकून कामं करायची, म्हणजे मोठ्यामोठ्यानं बोलावं लागतं.

तर आता टेक-टीमच्या सगळ्या नेते लोकांनी बंडखोरी केली आहे. 'तुम्ही घरून काम केलंत आणि ऑफिसात आला नाहीत तर आम्ही कुणीही तुम्हाला हाकलणार नाही', अशी भूमिका ह्या लोकांनी घेतली. त्यातून दोन आठवड्यांपूर्वी टेक्सास पुन्हा थोडं जास्त उघडलं तर करोनाच्या रुग्णांची संख्या सध्या चिकार वाढती आहे. त्यावरही सीईओ माघार घ्यायला तयार नाही. "मी म्हातारा असूनही भीत नाही तर तुम्ही काय घाबरता", वगैरे टकळी अजूनही सुरू आहेच.

कामाचं स्वरूप निराळं; माणसांची कामं करण्यामागची भूमिकाच निराळी - फक्त पैशांसाठी कामं करणारे आणि मजा येते म्हणून काम करणारे; तरी सगळ्यांना एकसारखा नियम लावणं कितपत शहाणपणाचं अशा छापाची कुजबूज सुरू झालेली आहे. सुदैवानं मॅनेजर, आणि न-मॅनेजर लोक शहाणे आहेत. त्यांच्याशी गॉसिपही करता येतं. पण ह्या विषयात आपलं राजकीय भांडवल खर्चू नये, असं त्यांना वाटतं. त्यामुळे आता गोरे, अमेरिकी लोकही जुगाड कसा करावा, सीईओशी फार पंगा न घेता झूमवर बॅकग्राऊंड बदलून आभास कसे तयार करावेत वगैरे चर्चा करायला लागले आहेत.

मी उपाय सुचवला, ऑफिसात तोंडावर मास्क लावून आपला व्हिडिओ रेकॉर्ड करा. आणि घरून काम करतानाही, तोच व्हिडिओ स्वतःचा म्हणून सुरुवातीला लावा. नंतर म्हणा, "इंटरनेटचा स्पीड कमी वाटतोय, मी व्हिडिओ बंद करते." बघू हे लोक काय करतात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

टेस्ट करा, बेस्ट राहा...
French kissing returns to France's film sets

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुम्ही काही व्यावहारिक धडे घेतले का? Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तीन दिवसांपूर्वी अर्धी पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचा योग आला. (म्हणजे आणवला).
विमानतळावर अत्यंत कमी माणसं. सॅनफ्रान्सिस्को विमानतळावर फक्त शंभर-दोनशे माणसं होती. युनायटेड, ANA आणि एअर इंडियाचे काऊंटर्स उघडे होते.
प्रवाशांपैकी बहुसंख्य जपानी, भारतीय व आग्नेय एशियाचे प्रवासी होते.
खाण्या-पिण्याची दुकानं सोडून बाकी सगळं बंद.
उघड्या असलेल्या दुकानांमध्येही स्मशान शांतता.
विमानात जेमतेम ५०-६० लोक. एका कुटुंबातले असाल तरच शेजारी शेजारी बसायची परवानगी; अन्यथा एका रांगेतली सगळी सीटं एका माणसाला. तोंडावर सतत मास्क असलाच पाहिजे. विमानात बाकी विशेष काही बदल जाणवला नाही.
खाण्या-पिण्याची रेलचेल. खाऊन झाल्यावरही आणखी हवंय का वगैरे विचारपूस करत होते.
जपानमध्ये परकीयांना रात्रीचा मुक्काम करायला परवानगी नाही; त्यामुळे चार तास थांबून पुढचं विमान पकडावं लागणार होतं.
जपानच्या नारिता विमानताळावर तर खूपच सामसूम आणि जपानी लोक अजिबातच आवाज करत नसल्याने अत्यंत शांतता. अगदी डिस्टोपियन वातावरण.
चार तास शांत झोप लागली.
पुढच्या विमानातही तेच चित्र. रात्रीच्या अंधारात खिडकीतून बाहेर बघत असताना हे काहीच खरं नाहीय असा अध्यात्मिक अनुभव जपानी व्हिस्कीच्या कृपेने आला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण सॅन फ्रान्सिस्को हुन भारतात आलात की अजून कुठे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी सिंगापूरला परतलो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२० जून रोजी भारतात १५,९१५ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. हा एक नवा उच्चांक आहे. (स्रोत - वर्ल्डोमीटर)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आता जे लोक अमच्या भागात लागण झाले सापडत आहेत त्यांच्या घरचा कुणी अत्यावश्यक सेवेत आहे. मार्चपासून कामावर जात आहेत.
थोडक्यात - शाळा सुरू करण्याचं अजिबात शक्य नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्या सोसायटीत उद्यापासून ठाणे महानगरपालिकेतर्फे प्रत्येक रहिवाशाची तपासणी करून तापमान व ऑक्सिजन लेव्हल मोजण्यात येणार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

काल भारतातून कंकणाकृती ग्रहण दिसलं, त्याबद्दल एक मित्र आणि गप्पा मारत होतो. २०१७चं खग्रास ग्रहण आम्ही अमेरिकेतून बघितलं. तो अनुभव किती विलक्षण होता, आणि त्या मानानं कंकणाकृती ग्रहण अगदीच फुस्स असतं, असं काय तरी आम्ही बोलत होतो. मी बोलताना म्हणाले, "खग्रास स्थितीत करोना दिसायला लागतो ... च्यायला, आता सूर्याच्या करोनाबद्दलही बोलणं कठीण झालंय!"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एकाच ठिकाणाहून अनेक लोकांना संसर्ग झाला तर त्याला सुपर-स्प्रेडर म्हटलं जातं. मांसप्रक्रिया करणारी अनेक ठिकाणं करोनाच्या संसर्गाला कारणीभूत ठरल्याचं दिसत आहे. जर्मनीत संसर्ग आटोक्यात आला आहे असं वाटत असतानाच तिथल्या एका मोठ्या मांसप्रक्रिया कारखान्यात काम करणारे अनेक लोक बाधित झाले आहेत. बाधितांचा ताजा आकडा १३०० आहे. बरेचसे कामगार रुमानिया किंवा तत्सम देशांतून आलेले होते आणि त्यांना अतिशय कमी जागेत काम करावं लागत होतं असं उघड झाल्यामुळे संसर्गामागे सामाजिक घटक होते असंही दिसतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

व्हायरस हंटर डॉ. पीटर पिओट : १९७६मध्ये एबोलाच्या शोधात ज्यांचा हातभार होता आणि पुढे एचआयव्हीच्या संशोधनातही सहभागी असणारे डॉ. पिओट यांना आजतागायत कोणत्याही घातक विषाणूचा संसर्ग झाला नव्हता, पण त्यांना कोव्हिड झाला. त्याविषयी ते बोलताहेत -

त्यांची सोळा मिनिटांची मुलाखत बीबीसीवर २८ आणि २९ तारखेला प्रसारित केली जाणार आहे. तपशील इथे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

न्यू यॉर्क टाइम्सनं दिल्लीतल्या एका गरोदर महिलेची गोष्ट प्रकाशित केली आहे. भारतात अजून फारसे लोक मेलेले नाहीत म्हणजे करोनानं तितका उच्छाद मांडलेला नाही असं ज्यांना वाटतंय त्यांच्यासाठी विशेष -
8 Hospitals in 15 Hours: A Pregnant Woman’s Crisis in the Pandemic

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

स्वीडनचा सैलपणा आणि इतर युरोपीय देशांतला घट्ट लॉकडाऊन यांमुळे शेजारी देशांनी स्वीडनला वाळीत टाकलं आहे :
Sweden Tries Out a New Status: Pariah State

या दोन रणनीतींची तुलना करणारा एक पेपर प्रकाशित झाला आहे. आलेख :

पेपर (पीडीएफ) इथे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नोव्हाक जोकोव्हिच आणि त्याची पत्नी यांना करोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यानेच आयोजित केलेल्या एका प्रदर्शनीय सामन्यामधून संसर्ग झालेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जोकोव्हिच अ‍ॅन्टि-व्हॅक्सर आहे अशी माहिती जाताजाता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

इंग्लंड दौऱ्यावर जायला निघालेल्या १० पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंना करोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. २८ जूनला ते रवाना होणार होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

करोना काळात आणि आधी अ‍ॅप-बेस्ड सावकारांकडून कर्ज घेतल्यावर लोकांवर आलेली संकटे, आपल्या फोनडेटाची नसलेली गोपनियता यावरचा हा लेख. (इथेही चीनचा अ‍ॅंगल आहेच.)

https://www.moneylife.in/article/how-app-based-lenders-are-harassing-suc...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

स्पेन ,फ्रांस आणि इटली या तीनच ठिकाणी महासाथ येऊन मग नवीन इन्फेक्शन्स व मृत्यू हे लक्षणीय रित्या कमी आणि नंतर जवळ जवळ नगण्य स्वरूपात झाले.
इतर कुठेच हे होताना दिसत नाही.
हे फक्त तिथेच का झाले आणि इतर ठिकाणी का होत नाहीये यासंबंधी काही शास्त्रीय लेख वाचण्यात आले आहेत का कुणाच्या?
(चीन ला विश्वासार्ह डेटा नसल्याने यातून वगळत आहे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेरिकेत करोना कसा पसरला ह्याची एक उत्तम टाईमलाईन (नकाशासह) न्यू यॉर्क टाइम्सने दिली आहे. वेळात कृती केली असती तर कित्येक लोकांचे प्राण वाचले असते असं त्यातून दिसतं.

त्याच वेळी, पंधरा लाख लोकांनी गेल्या आठवड्यात राज्य सरकारांपाशी बेरोजगारीचे क्लेम्स केले आहेत. शिवाय, केंद्र सरकारकडे सात लाख क्लेम्स आले आहेत.

डॉ. फाउची आणि इतर तज्ज्ञ लोकांनी अमेरिकन संसदेसमोर देशाला किती धोका आहे हे सांगितले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कोणत्या देशांत किती निर्बंध आहेत आणि निर्बंध उठवल्यानंतर कुठे प्रगती चांगली आहे आणि कुठे व्हायरस पुन्हा डोके वर काढू लागला आहे ह्याविषयी चांगले आलेख आणि विदा देणारा एक लेख गार्डियनमधून. विदा स्रोत : ऑक्सफर्ड विद्यापीठ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

करोनाकाळातल्या लॉकडाऊनमुळे प्रदूषणाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना एक अभूतपूर्व संधी मिळाली आहे. नक्की कशामुळे किती प्रदूषण होतं हे शोधू पाहणाऱ्या एका प्रयोगाविषयी -
Pandemic’s Cleaner Air Could Reshape What We Know About the Atmosphere

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धारावीमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात कसे यश आले ह्याविषयी बीबीसीमधून -
How Asia's biggest slum contained the coronavirus
ह्यातून एक रोचक गोष्ट दिसते. पाश्चात्त्य देशांत प्रामुख्याने जास्तीत जास्त टेस्टिंग करण्यावर भर असतो. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात टेस्ट करणे महागही पडते आणि टेस्ट करणाऱ्या लॅब्सची क्षमताही मर्यादित आहे. त्याऐवजी इथे केवळ तापमान, ऑक्सिजन पातळी वगैरे मोठ्या प्रमाणात मोजली गेली (साडेसहा लाख रहिवाश्यांत साडेतीन लाखांहून अधिक) आणि टेस्ट मात्र केवळ ११,००० (ताप इ. लक्षणे दिसत असतील तरच). भारतासाठी हे एकंदरीत उपयोगी ठरावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पाश्चात्त्य देशांत प्रामुख्याने जास्तीत जास्त टेस्टिंग करण्यावर भर असतो.

अमेरिका ही 'पाश्चात्त्य देशां'त मोडत नाही, अशी आपली कल्पना दिसते. 'बंद करा टेस्टिंग! टेस्टिंग केले, की केसेसच्या संख्या वाढतात.' असे आमचा नारिंगी येडझवा म्हणतो.

त्याऐवजी इथे केवळ तापमान, ऑक्सिजन पातळी वगैरे मोठ्या प्रमाणात मोजली गेली

आणि टेस्ट मात्र केवळ ... (ताप इ. लक्षणे दिसत असतील तरच)

आमच्याकडेदेखील हाच नॉर्म आहे. आणि, साथ कंटेनबिंटेन काहीही झालेली नाहीये. उलट, उलटण्याच्या मार्गावर आहे.

टेस्ट करणाऱ्या लॅब्सची क्षमताही मर्यादित आहे.

आमच्याकडे टेस्ट उपलब्ध करून न देण्याच्या सरकारी बेफिकिरीमुळे टंचाई आहे. म्हणून क्षमता मर्यादित आहे; टेस्टिंगचे रेशनिंग होते.

जाहीर सभांमधून रोगास (चिन्यांवरून) चित्रविचित्र रेसिस्ट नावे ठेवली, की मग आणखी काहीही करावे लागत नाही, नि रोग आपोआप आटोक्यात येतो, अशीही काही समजूत असावी बहुधा.

भारतासाठी हे एकंदरीत उपयोगी ठरावं.

हम्म्म्म्... नक्की कोणाच्या मॉडेलचे अनुकरण करायचे, ते तुम्हीच ठरवा.

जाताजाता: उजवी मानसिकता हा एक आत्मघातकी, साथीचा मानसिक रोग आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल ऐन करोनासाथीच्या काळात रशियात राज्यघटना बदलण्याविषयी मतदान झाले. संसर्ग टाळण्यासाठी की काय, पण चित्रविचित्र ठिकाणी मतदान करतानाचे फोटो/व्हिडिओ व्हायरल झाले आहेत -
Photos of Russians voting in unusual places are all over social media — don’t worry though, it’s legal

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

13 जून ला नगर ला गेलो होतो,
पास साठी परवा अर्ज केलेला, हॉस्पिटल मधले मशीन रिपेर करायचे आहे असे कम्पेलिंग कारण पण दिले, तश्या अर्थाचे CEO चे कम्पनी लेटर हेड चे पत्र पण लावले, पण पास आलाच नाही, मग शेवटी तसाच निघालो

पुणे नगर सीमेवर बॅरिकेड घालून एक लेन चालु ठेवली आहे,तिकडे पोलीस असावेत अशा खुणा दिसल्या, बाकी कुठे काही नाही,

वाटेत मोठे फूड मॉल, पूर्णपणे बंद होते, smile स्टोन वगैरे लेवल चे, पण काही धाबे, छोटी हॉटेल्स चालू होती, एकीकडे थांबलो तर फक्त पार्सल मिळेल म्हणाला, मग आत बसून खायला दिले,

पुण्याच्या तुलनेत नगर मध्ये उघडीप जास्त वाटली, बरीच दुकाने चालू होती

ज्या हॉस्पिटल मध्ये गेलेलो तिकडे सोशल डिस्टनसिंग हा शब्द ऐकिवात नसावा, waitingहॉल मध्ये ठेच गर्दी होती. डॉक्टर आणि स्टाफ मात्र मास्क लावून होते.डॉक्टरांशी बोलताना ते म्हणाले आत्ता पर्यंत नगर मध्ये काही नव्हते, हे पुण्या मुंबई चे लोक आल्यावर केसेस वाढल्या.
मंदी आलीये च्या पार्श्वभूमीवर डॉक्टर 3 4 करोड गुंतवायला तयार होते हे लक्षणीय वाटले.

वाटेत वाघोली जवळ भाज्यांचे टेम्पो थांबवून भाज्या उतरवणे/विक्री चालू होती, धक्का बुक्की होईल इतकी गर्दी ,मास्क नसणे was a norm.

रात्री पुण्यात प्रवेश करताना घोस्ट टाऊन चा फील आला,
अंधारात बुडालेले फिनिक्स मॉल, barklays ची बिल्डिंग , hyatt आणि सगळी मोठी हॉटेल्स पाहून कसेसेच वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जून बारामती
सेम जिल्हा असल्याने या वेळी पास ची भानगड नव्हती.
पुण्यावरून हडपसर-सोलापूर रोड ने बाहेर पडलो, लॉकडाऊन शिथिल झाला असला तरी ट्राफिक कमीच होता.

बारामती करोना मुक्त भाग म्हणावला जातो.
रस्त्यावर गर्दी कमी पण 90%दुकाने चालू,
हॉटेल मध्ये वर पार्सल मिळेल ची पाटी होती पण बेसमेंट मधली सिटिंग व्यवस्था भरलेली.
दागिन्यांच्या 2 दुकानात बऱ्यापैकी गर्दी.
रुग्ण संख्या कमी असल्याने की काय पण लोक मास्क वगैरे फार मनावर घेत नाहीयेत, रुमाल गुंडाळून काम चालवतायत

नगर च्या मानाने हॉस्पिटल्स मध्ये सोशल डिस्टनसिंग फार चांगले पाळले जात आहे, एका हॉस्पिटल मध्ये वेटिंग हॉल छोटा होता तिकडे बाहेर मांडव घालून बसायची व्यवस्था केली होती.
दुसरीकडे बसायच्या सीट्स च कमी करून टाकल्या होत्या की जास्त लोक आत बसु नयेत.
डॉक्टरांनाशी बोलताना बारामती खरेच नो कोरोना झोन आहे हे कळले, 2 3 बाहेरून आलेले पेशनट्स मिळालेले पण ते ट्रेस करता येत होते.

4 km च्या टापू मध्ये 3 हॉस्पिटल्स 50 60 लाखाची गुंतवणूक करायला उत्सुक ( हे मुद्दाम कोरोना नंतर मंदी येणार या प्रेडिक्शन साठी लिहीत आहे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शहरात राहाण्याची हॉस्टेल/सुविधा मार्चमधे एक-दोन दिवसाच्या मुदतीत बंद झाली. मुलं सगळं सामान गावी नेऊ शकली नाहीत. त्यातल्या काही कंत्राटी कामगारांचे प्रोजेक्ट ३१मार्च ला संपले. आता सामान खोलीत पडलंय आणि ते घेऊन जायची व्यवस्था करायला पदरमोड करावी लागणार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बीबीसीने अपंग लोकांच्या अडचणींवर एक छोटं फीचर केलं होतं. एकंदरीत त्यांची अवस्था बिकट झाली आहे हे सांगणारा एक अहवालही प्रकाशित झाला आहे. अनेक कर्णबधिर लोक इतरांच्या तोंडाच्या हालचाली आणि चेहेऱ्यावरचे भाव पाहून अनेक गोष्टी समजून घेतात, पण आता मास्क घेतलेला माणूस समोर असेल तर ते अशक्य होतं. किंवा अंध व्यक्ती एरवी बाहेर वावरू शकतात, परंतु त्यांना समोरच्या व्यक्ती दिसत नसल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणं अवघड जातं आहे. ऑटिझम किंवा तत्सम आजार असलेल्या मुलांना घरात बसून राहायला लागल्यामुळे त्यांची चीडचीड होणं ते हिंसक वर्तन असे अनेक प्रश्न पालकांपुढे निर्माण झाले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काल कोथरुडातील एका सोसायटीत गेलो असता एंट्रन्सपाशी चंद्रकांत पाटलांनी दिलेला सॅनिटायझर स्टँड दिसला पण सॅनिटायझर नव्हता. विचारलं असता कळलं की पाटलांनीच एक बाटली दिली होती ती आता संपली. नवीन बाटली आणण्यावरून सोसायटीत मतभेद आहेत Smile

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नवीन बाटली आणण्यावरून सोसायटीत मतभेद आहेत Smile
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक बाटली देणारे आमदार पुणेरी वाटत नाहीत; एवढी दानत ठाण्याच्या लोकांकडे असते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एक बाटली देणारे आमदार पुणेरी वाटत नाहीत; एवढी दानत ठाण्याच्या लोकांकडे असते!

 1. स्टँडपण दिलाय त्यांनी.
 2. ते कोल्हापूरचे आहेत.
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

स्टँड दिला, घेतला ... हॅ हॅ हॅ!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोल्हापूरच्या पुरातून पुण्यात वाहत आलेली एकमेव बाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१४ मार्चला विद्यापीठ बन्द झालं ते अजूनही उघडलं नाही, इतक्यात उघडण्याची शक्यताही नाही. ऑनलाइन व्याख्यानं सुरु होता होता थांबली, कारण विद्यार्थ्यांकडे साधनांची अनुपलब्धता. पण नॅक मूल्यांकनात चांगली श्रेणी मिळवण्यासाठी ऑनलाइन ऑनलाइन खेळ आपण खेळला असं दाखवता आलं तर बरं असणार आहे. परीक्षा मात्र ऑनलाइन घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना गुगल क्लासरूम, इमेल, पोस्ट, एवढंच काय व्हॉट्सॲपने उत्तरं पाठवण्याची मुभा होती (टंकून किंवा हस्तलिखिताचा फोटो). काही टक्के गुण या परीक्षांचे तर काही टक्के गुण मागील सर्व सत्रांची सरासरी असे देणार आहेत, पण परीक्षांसंदर्भातील सरकारी निर्णय सारखे बदलत आहेत. त्यातून केन्द्र/ राज्य घोळ आहे तो वेगळाच. आमच्या शहरातल्या इतर काही (विशेषत: खाजगी) शिक्षणसंस्थांनी पुढच्या सेमिस्टरची (ज्याला आम्ही विषम २०२० म्हणतो) ऑनलाइन व्याख्यानं चालू केलीसुद्धा, तर राज्यातील (बंगाल) इतर काही विद्यापीठांचे मागच्या (विषम २०१९) सेमिस्टरचे निकाल अजून लागलेले नाहीत.

परीक्षा घेणे - न घेणे - वेगवेगळ्या रीतींनी घेणे - वेगवेगळी सूत्रे वापरून गुण देणे - अभ्यासक्रम पूर्ण करणे - न करणे - अभ्यासक्रमाच्या अमुक भागावर परीक्षा घेणे - लॉकडाउन कालावधीत सर्व विद्यार्थ्यांना हजर दाखवणे या चर्चांच्या गडबडगुंड्यात शिक्षण हा मुख्य विषय कुठे बरं हरवलाय?

एक शिक्षक म्हणून अभ्यासक्रम पूर्ण करणे/ परीक्षा घेणे याव्यतिरिक्त आमच्या काहीच जबाबदाऱ्या नाहीत का? आजूबाजूला जे सामाजिक, आर्थिक (आणि त्यामुळे कौटुंबिक) बदल घडत आहेत, त्यांचे आकलन करून घ्यायला आम्ही विद्यार्थ्यांना मदत करायला हवी का? सद्य परिस्ठितीला तोंड देण्यासाठी त्यांना बळ देणं आमचं काम आहे का?

एक आसामात घर असलेली मुलगी कलकत्त्यात खाजगी हॉस्टेलात राहत होती. ती लॉकडाउनआधी घरी जाऊ शकली नाही. तिच्या हॉस्टेलमध्ये एक कोविड रुग्ण सापडल्याने हॉस्टेल सिल झालं, तिला मदत करणं हे शिक्षणसंस्था/ शिक्षकांचं नैतिक कर्तव्य आहे का? ज्या मुलामुलींची घरची आर्थिक परिस्थिती अचानक अति बिघडली आहे, त्यांच्यामागे सबमिशनचा तगादा कसा लावायचा? घरच्या चिंतांमुळे एका हुशार मुलीने परीक्षेत अतिशय सुमार उत्तरं लिहिली आहेत. तिला धीर देण्याव्यतिरिक्त मी काही करू शकत नाही.

संशोधक-विद्यार्थ्यांपैकी जे फिल्ड वर्कला जाणे अपेक्षित होते ते जाऊ शकले नाहीयेत, आणखी पुढे बराच काळ फिल्ड वर्क अशक्य आहे. ग्राम पंचायतींनी बाहेरच्या - विशेषत: शहरी - माणसांना यायला मनाई केली आहे.

ह्या सगळ्यात चक्रीवादळ आल्याने परिस्थिती आणखी बिकट आहे. चक्रीवादळांची या भागाला सवय आहे, पण यावेळचं अति भयानक होतं. आमच्या विद्यापीठातील सर्व लिफ्ट, काही एसी. तळमजल्यावरील प्रयोगशाळा व त्यांतील महाप्रचंड महाग यंत्रे - ग्रंथालय - लाकडी जमीन असलेला डान्स स्टुडिओ - संस्थेला २०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा उभारलेलं वस्तूसंग्रहालय यांचं नुकसान झालं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

करोनाची सहा महिन्यांतली प्रगती दाखवणारा हा व्हिडिओ बीबीसीवरून

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बखर वाचते आहे.
अनुभव सगळीकडे साधारण समानच वाटतायत.

आमच्या इथे आता बरच काही पूर्ववत चालू झालय.
अर्थात काही बंधने आहेत. उदा. मुखपट्टी, सामाजिक अंतर , मोठ्या समुहास (५ पेक्षा जास्त) परवानगी नाही इ.
अजून एकही नविन रुग्ण नाही असे नाही. परंतु प्रमाण मात्रं अत्यल्प.
याचे श्रेय येथिल प्रशासन आणि नेत्यांचे आहे.
लोकांना घाबरवून न टाकता, परंतु सत्य परिस्थिती अजिबात न दडवता अत्यंत कार्यक्षमतेने परिस्थिती हाताळली जात आहे.
खरोखर अनुकरणीय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

आमच्या इथे म्हणजे कुठे ?कुठल्या भागात असता आपण ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिंगापूर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोना झाल्याचे त्यांनी स्वतः ट्वीट करून जाहीर केले आहे -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

रशियाला मागे टाकून भारत आता रुग्णसंख्येच्या बाबतीत जगात तिसऱ्या स्थानावर पोचला आहे. अर्थात, पहिल्या दोन क्रमांकांवर असलेल्या यूएस आणि ब्राझीलच्या तुलनेत भारतात लोकसंख्येनुसार टेस्टिंगचं प्रमाणही कमी आहे, त्यामुळे अधिकृत आकडेवारी प्रत्यक्षापेक्षा खूप कमी असण्याची शक्यता दांडगी आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भारत नावाच्या महान देशाची एक अशीही करोनाबखर...
Is it the housework? - स्निग्धा पूनम, दिल्ली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अमिताभ बच्चन यांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मौत और टट्टी, किसी को भी, कहीं भी, और कभी भी आ सकती है|

आणि त्याहीपेक्षा,

अमिताभला करोनाचा संसर्ग झाला, तर ती बातमी नव्हे. करोनाला‌ अमिताभचा संसर्ग झाला, तर ती बातमी.

----------

मराठी व्याकरणाच्या प्रचलित नियमांनुसार क्रिकेटर आणि सिनेनट-नट्या यांच्या संदर्भात आदरार्थी बहुवचन वापरले जात नाही. सबब, 'अमिताभ बच्चन यांना' हे व्याकरणदृष्ट्या फाऊल आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आदरार्थी बहुवचन हे कालसापेक्ष असावे!

आम्ही लहानपणी "शिवाजी म्हणतो" असा खेळ खेळत असू. हल्लीच्या मुलांना "छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात" असा खेळ खेळावा लागेल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उदाहरणार्थ जरी महाराजांना एकेरी संबोधलं तरी अंगावर येणारी माणसं झालीयेत हल्ली!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फेसबुकवर पाहिलं आज.....

"प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, कुळवाडीभूषण, गोब्राह्मणप्रतिपालक सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज" असं आपोआप उमटेल अशी कळ कीबोर्डावर उपलब्ध करून देण्यात यावी.

उगाच एखादे विशेषण मिसौट व्हायला नको.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>>"प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, कुळवाडीभूषण, गोब्राह्मणप्रतिपालक सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज" असं आपोआप उमटेल अशी कळ कीबोर्डावर उपलब्ध करून देण्यात यावी.

ते ''कुळवाडीभूषण, गोब्राह्मणप्रतिपालक" असं एकत्र नसतं. तुम्ही कुठल्या बाजूचे याप्रमाणे एक तर गोब्राप्र किंवा कुभू असं आयदर ऑर असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण3
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग काहीतरी टॉगलची सोय हवी. संघोटा* किंवा ब्रिगेडी*

*जे या दोहोंपैकी नाहीत त्यांना केवळ शिवाजी इतकं लिहून पुरलं पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

संघोटे बाकी कसेही असोत, परंतु शिवाजीमहाराजांना शिवाजी म्हटल्याबद्दल एखाद्या संघोट्याने कोणाला बदडल्याचे ऐकिवात नाही. (चूभूद्याघ्या.)

(उलटपक्षी तुमचे ब्रिगेडी! त्यांचा ब्राह्मणांशी पंगा आहे हे ऐकून ठाऊक होते. आणि म्हणून एक वेळ दादोजी कोंडदेवांचा पुतळा पाडला तर ते लॉजिकली कन्सिस्टण्ट म्हणून समजू शकतो. पण एके दिवशी राम गणेश गडकऱ्यांचासुद्धा पुतळा पाडलानीत्! आता, गडकऱ्यांवर यांचा काय म्हणून बुवा राग? गडकरी हे ब्राह्मण कधीपासून झाले म्हणे? हं, आता, गडकरी हे (ब्राह्मणी मांडणीतून आलेल्या) पारंपरिक पितृसत्ताक व्यवस्थेचे पाईक वगैरे होते, असा काही दावा असल्यास कल्पना नाही बुवा!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गडकऱ्यांनी संभाजी महाराजांवर कुठले तरी नाटक लिहिले त्यात संभाजी महाराजांची बदनामी होती म्हणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गडकऱ्यांच्या राजसंन्यास या शेवटच्या अपूर्ण नाटकात शिवाजीवर टिका करणारे जिवाजीपंत कलमदाने हे बोरूबहाद्दर पात्र आहे. त्या पात्राच्या तोंडी काही संवाद आहेत. ते इथे वाचता येतील.

- ओंकार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

करोनाला‌ अमिताभचा संसर्ग झाला, तर ती बातमी.
- अमिताभ आणि रंजनीकांत मध्ये फरक आहे की नाही??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमिताभ आणि रंजनीकांत मध्ये फरक आहे की नाही??

आहे ना!

म्हणूनच तर बातमी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमिताभ बच्चन उवाच

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुढील प्रतिसाद इथे द्यावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0