संवेदना
जयनीत
भूतदयेने तरुणाने वृद्धाकडे बघितले
मनात म्हटले वार्धक्य मनुष्यास किती असहाय्य बनवते
तितकीच अनुकंपा तरूणा बद्दल वृद्धाच्या डोळ्यात होती
तारुण्याच्या बेपर्वा वृत्तीची त्यास पूर्ण कल्पना होती
मनी म्हणाला तारुण्य बिचारे कुठल्या भ्रमात असते
क्षण भंगुर हे जीवन सारे एका क्षणात विसरते
(समाप्त)
Node read time
1 minute