Skip to main content

संकेतस्थळांवरील सर्व पाट्या मराठीत-मनसेचे नवीन आंदोलन

2 minutes

डोंबिवली - नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार, सर्व मराठी संकेतस्थळांवरील सर्व लेख, कविता, पाककृती, कौले यांच्या मथळ्यांचे तातडीने मराठीकरण करण्यात यावे, असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केला आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक नव्याजुन्या लेखातील प्रत्येक वाक्याचे तातडीने मराठीकरण करण्यात यावे, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मराठी संकेतस्थळांवर इंग्रजी शब्द, म्हणी, इत्यादिंच्या वाढत्या वापराबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इंग्रजीऐवजी शक्यतो मराठी शब्द वापरावा, मग तो मूळ भावनेपासून कितीही दूर जावो, ते न जमल्यास त्या शब्दाचे देवनागरीकरण करण्यात यावे, तेही न जमल्यास मनसेच्या कार्यालयात अर्ज करून सदर शब्द वापरण्याची लेखी परवानगी घ्यावी, तसेच मूळ शब्दच का वापरला याचे किमान २० ओळी स्पष्टीकरण लिहून धाग्यावर डकवावे असा आदेश त्यांनी दिला आहे.

पाककृती लिहिताना चिकन, मटन, ग्रेव्ही असे शब्द वापरू नये, तसेच पदार्थांचे प्रमाण टीस्पून, मिली असे न लिहीता शेर, रत्तल, तोळा, मासा असेच लिहावे. 'कॅरॅमलाईज्ड चिकन' या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पाकक्रुतीकडे निर्देश करून ते म्हणाले, याऐवजी 'गूळकोंबडी' असे नाव जास्त शोभले नसते का? बर्गर, पिझ्झा या ऐवजी विलायती वडापाव, भरली भाकर असे म्हणण्यात यावे. एखाद्या घटकाचे मराठीत नाव उपलब्ध नसेल, तर तो घटक गाळण्यात यावा. म्हणजे तो पाककृतीतून गाळावा, गाळून वापरू नये. मायक्रोवेव्ह अवनला मराठी प्रतिशब्द निर्माण होईपर्यंत मायक्रोवेव्हमध्ये बनणारी कोणतीही पाककृती देण्यात येऊ नये, असे त्यांनी सांगितले.

माऊसक्लिकऐवजी उंदिरटिचकी, सायबरकॅफे ऐवजी जालटपरी असे शब्द रूढ करण्यात यावेत. लिंक, आपलं दुवे देताना http अशासारख्या ईंग्रजी अक्षरांचा वापर करू नये. त्याऐवजी हततपः असे लिहिण्यात यावे. मग वाचणार्‍याची ततप झाली तरी हरकत नाही. (इतकेच नाही तर मराठी संकेतस्थळाचे कोडींग देखील मराठीतच झाले पाहिजे, असे म्हणताना त्यांना एका मनसैनिकाने मागे ओढले)

दरम्यान, या फतव्यानंतर रंगार्‍यांची चंगळ झाली असल्याचे रंगारीपुरा या भागात गेल्यावर दिसून आले. शब्दाला तीन पैसे, लेखाला सहा रुपये अशा दरात मराठीकरण करून देण्याचे बोर्ड शब्दरंगार्‍यानी दुकानादुकानासमोर लावले आहेत. आपापल्या लेखाकवितापाककृतीची बाडे घेऊन त्यांच्या दुकानांसमोर सायबर आयडींच्या रांगा लागलेल्या दिसल्या.

या सर्व गोष्टींचे पालन होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी सर्व स्थळांवर '४२०_प्रक्षुब्ध_दधिचि' या आयडीचे नवनिर्माण करण्यात आले आहे. सदासर्वत्र आंतरजालावर फिरून हा आयडी चुकार धाग्यांना जाळून दुग्ध, आपलं दग्ध करील, असे त्यांनी जाहीर केले.

Node read time
2 minutes

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/11/2011 - 00:45

पाय कुठे आहेत हो तुमचे? ओढायचे नाहीत, धरायचे आहेत.

शुद्धलेखनाबद्दल मनसेचे काय धोरण आहे?

प्रियाली Wed, 09/11/2011 - 00:50

सूक्ष्मलहरभट्टीमध्ये तापवून केल्या जाणार्‍या पाककृतींपासून मराठी जनमानसाला वंचित ठेवण्याची ही क्लृप्ती पचनी पडली नाही.

बाकी, लेख मस्तच.

खवचट खान Wed, 09/11/2011 - 00:56

In reply to by प्रियाली

प्रतिशब्द उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद.

'सूक्ष्मलहरभट्टीमध्ये झटपट कविता' ही पाककृती लवकरच पोस्ट करीन, चुकलो टपालीन म्हणतो.

आडकित्ता Wed, 09/11/2011 - 01:27

In reply to by प्रियाली

क्लॄप्तीचा च्या क्लॄप्ती चा क्लॄ. तो पहिला नाही. दूसरा.
प्रकाश पडला का?
'धप्'कन आवाज आला का?

प्रियाली Wed, 09/11/2011 - 01:31

In reply to by आडकित्ता

जरा चष्मा लावून बघा. मी दुसर्‍यांदा क्लॄ दुसराच लिहिला आहे. आणि दूसरा नाही दुसरा. :-)

गवि Wed, 09/11/2011 - 09:49

In reply to by Nile

विकेटच काढली की डागदरांची.

यात दोन इंग्रजी शब्द...?

विकेट घेण्याला बळी घेणे म्हणतात मराठीत... अगागा.. पळा..

Nile Wed, 09/11/2011 - 22:56

In reply to by गवि

यात दोन इंग्रजी शब्द...?
विकेट घेण्याला बळी घेणे म्हणतात मराठीत

क्रिकेट हा आमचा धर्म आहे. क्रिकेटचा उगम पाश्चात्य आहे वगैरे भडकाऊ विचारांना गविंनी आळा घालावा अथवा जनक्षोभास सज्ज व्हावे. गविंसारख्या उच्चभ्रू (म्हणजे मुंबैसाईडच्या) लोकांनी पिढ्यान पिढ्या क्रिकेटला उच्च वर्गातच सामावून ठेवण्याचे प्रयत्न केले आणि खालच्या वर्गाला (म्हणजे आम्ही खेड्यापाड्याचे) क्रिकेटमध्ये वर येण्याची संधी येऊ दिली नाही. मात्र इथून पूढे आम्ही असे होऊ देणार नाही हे निक्षून सांगतो!

आघाडीचा फलंदाज,
ढोणी ब्रिगेड.

आडकित्ता Wed, 09/11/2011 - 14:14

In reply to by प्रियाली

अन तो दूसरा आहे ह्याचा धपकन आवाज यावा, म्हणून दूSSSSसरा लिहिलाय :p
अन मला फार कुतुहल आहे, की हा क्लॄप्ती शब्द उच्चारतात तरी कसा? ;) कुणी रेकॉर्ड करून पोस्टेल काय?

............सा… Wed, 09/11/2011 - 23:01

In reply to by आडकित्ता

जीभेला घड्या पडल्याशिवाय तो उच्चारता येणार नाही. नंतर जीभ सरळ करायला परत डॉक्टरांकडेच जावे लागेल :)

धनंजय Sat, 12/11/2011 - 04:12

In reply to by आडकित्ता

क्‍ऌप्ती मधील ऌ र्‍हस्व आहे ना? (म्हणजे मराठी शब्दकोशातही तसाच दिलेला आहे, आणि संस्कृतातील* साधुरूपही तसेच आहे.)
"क्‍ॡप्ती" असे दीर्घ लिहिलेले मी यापूर्वी अधिकृत ठिकाणी बघितलेले नाही.
त्यामुळे दीर्घ लिहिण्याबद्दलची सूचना विनोदीच असावी. पण विनोद समजला नाही.

*(पाणिनीय) संस्कृतात दीर्घ "ॡ" ध्वनी असलेला कुठलाही साधुशब्द नाही. संस्कृतातला ऌ हा ध्वनीच प्रमाण मराठी उच्चारांत उपलब्ध नाही. "क्‍ऌप्ती"चा मराठीतील प्रमाण उच्चार बहुधा "क्लुप्ती" असा असावा.
(मी असा उच्चार घरगुती वापराच्या सवयीने करतो. माझ्या कुटुंबातील उच्चार बहुतेक प्रमाण उच्चारांच्या जवळचे आहेत.)

- - -

अवांतर : क्‍ऌप्ती असे लिहिणे मराठी संस्केतस्थळांच्या एडिटरांवरती जमत नाही. गमभन मध्ये "ऌ"साठी टंकन कसे करावे? ऌ म्हणजे लृ (ल्+ऋ) नव्हे. तरी मी आळसाने "ल्+ऋ" lRu = लृ असेच टंकतो. म्हणजे "क्लृप्ती" असे. प्रियाली यांनीदेखील प्रथम "क्लृप्ती" असे टंकले आहे, आणि धप्पकन विनोदात आडकित्ता यांनीदेखील क्+ल्+ॠ = क्लॄ असेच टंकलेले दिसते आहे.

खवचट खान Wed, 09/11/2011 - 00:51

बहुतेक मनसैनिकांची शैक्षणिक पात्रता पाहता, शुद्धलेखनाच्या मुद्द्यावरून बोंब लागण्याचीच शक्यता अधिक असल्याने, सध्या हा मुद्दा धसास न लावण्याचे ठरले आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/11/2011 - 00:57

In reply to by खवचट खान

बहुसंख्य मनसैनिक करतात ते शुद्धलेखन असा काही विचार असण्याची आतल्या गोटातली बातमी तुम्हाला आहे का?

खवचट खान Wed, 09/11/2011 - 01:07

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बहुसंख्य मनसैनिक लेखन करू शकतात, असे मी कुठेही म्हटलेले नाही. तेव्हा अडचणीत आणणारे प्रश्न विचारण्याचे बंद करावे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/11/2011 - 01:54

In reply to by खवचट खान

मी लेखन करतात असं म्हटलेलं नाही याची नोंद कृपया ख्ख्ख्ख खान यांनी नोंद घ्यावी! ;-)

(खुस्पटप्रेमी) अदिती

अप्पा जोगळेकर Wed, 09/11/2011 - 09:02

In reply to by खवचट खान

बहुतेक मनसैनिकांची शैक्षणिक पात्रता पाहता, शुद्धलेखनाच्या मुद्द्यावरून बोंब लागण्याचीच शक्यता अधिक असल्याने
सदर वाक्यामुळे बहुसंख्य मनासैनिकांचा आणि पर्यायाने मराठी जनतेचा अपमान झाला आहे. तरी तुम्ही तत्काळ माफी मागावी नाहीतर मग साहेबांना सांगितलं म्हणून तक्रार करु नका.

राजेश घासकडवी Wed, 09/11/2011 - 09:17

In reply to by अप्पा जोगळेकर

सदर वाक्यामुळे बहुसंख्य मनासैनिकांचा ...

नासैनिकांचा ?

तुम्ही कोणाचा मुद्दा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात?

Nile Wed, 09/11/2011 - 00:57

बोंबला तिच्यायला! (हे अस्सल मराठी आहे) म्हणजे आता आम्हाला मराठी संकेतस्थळांवर डु. खाती काढावी लागणार का? ;-)

आमच्या नावाचे प्रायश्चित्त म्हणून मराठीला काही शब्द अनुवादीत करून बहाल करण्याचे आम्ही ठरवले आहे!

http अशासारख्या ईंग्रजी अक्षरांचा वापर करू नये

इथे ततपप वापरता येईल! ;-)

मायक्रोवेव्ह अवनला मराठी प्रतिशब्द निर्माण होईपर्यंत

अतिसूक्ष्मलहरीबंब! कसा वाटतोय?

_ या चिन्हाला अंडरस्कोअर च्या ऐवजी खालीमार असे संबोधावे.

/ आणि \ यांना पुढची आणि मागची काडी असे संबोधावे.

@ ला 'बिळात नागोबा' चिन्ह. तूर्तास इतकेच.

नंतर योग्य ती भर घातली जाईल.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/11/2011 - 00:59

In reply to by Nile

मेले, मेले, मेले!

बरं मग | या पायपाला नळी म्हणणार का? आल्ट, कंट्रोल, डिलीट, शिफ्ट, एंटर याला काय म्हणणार?

राजेश घासकडवी Wed, 09/11/2011 - 03:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आल्ट, कंट्रोल, डिलीट, शिफ्ट, एंटर याला काय म्हणणार?

अनुक्रमे बद्ल, पकड, वरकर, आत्शीर असे शब्द वापरता येतील.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/11/2011 - 01:00

In reply to by ............सा…

नाही, अधोरेखित म्हणजे हे असं. इथे इंग्रजी शब्द वापरायचा नाही म्हणून सोदाहरण स्पष्ट केलं आहे.

Nile Wed, 09/11/2011 - 01:01

In reply to by ............सा…

आम्ही चिन्हाबद्दल बोलत होतो शब्दार्थाबद्दल नव्हे. समृद्ध मराठीत एकाच शब्दाचे दोन अर्थ होता कामा नये. अधोरेखित म्हणजे अधोरेखीत. खालीमार म्हणजे _, खाली मार म्हणजे... असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/11/2011 - 01:04

In reply to by ............सा…

ओ खख्ख्ख खान, मिष्टीक हा शब्द शुद्ध बेळगावी लोण्यासारखा शुद्ध मराठी आहे, तो चालेल ना?

Nile Wed, 09/11/2011 - 01:05

In reply to by ............सा…

इथे एका खाली एक झाडासारखे प्रतिसाद दिल्यानंतर तिसरा प्रतिसाद झाड यंत्रणे प्रमाणे न उमटता सपाट होतो आहे. माहितीतळातल्या गिचमिडात बिघाड झाला आहे काय?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/11/2011 - 01:06

In reply to by Nile

असेच मलाही दिसते आहे, त्याबद्दल 'व्यवस्थापन' क्षेत्रात जाऊन काही बदल करून पहाते आहे. तोपर्यंत प्रतिसाद दिसतात हेच गोड मानून घेणे.

अनामिक Wed, 09/11/2011 - 01:08

In reply to by Nile

स्वतःचे जालीय नावच इंग्रजी लिपीमधे लिहणार्‍या सदस्याचे स्पष्टीकरण ग्राह्य धरण्यात येऊ नये असे मत व्यक्त करू इच्छितो.

Nile Wed, 09/11/2011 - 01:15

In reply to by अनामिक

जन्माला गुजरात्याच्या पोटी आला पण मर्‍हाटी म्हणून वाढला तर त्याला आपण मराठी म्हणतोच ना? तसंच हे आमचं! मला आपलं म्हणा! ;-)

ऋषिकेश Thu, 10/11/2011 - 10:02

In reply to by Nile

मला आपलं म्हणा

हे काय नवीन?
तुला Nile म्हणायचं का 'आपलं' म्हणायचे ते एकदा नक्की काय ते सांग :प

अनामिक Wed, 09/11/2011 - 03:32

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मगं, आम्हाला नाव नसलं म्हणून काय झालं, ज्यांना आहे त्यांनी तरी ते मर्‍हाटीतच लिहावं, नाही का?

रोचना Wed, 09/11/2011 - 12:01

In reply to by Nile

नाइल (निळे?) यांना अधिकृत भाषांतरकार नेमलेच पाहिजे. खालीमार आणि बिळात नागोबा वाचून हहपुवा.....

अजून बरेच शब्द तुमची वाट पाहत आहेत! हे पहा:

http://translate.wordpress.com/projects/wpcom/mr/default
(इथे खरोखर शब्दांची गरज आहे, तरी....)

Nile Wed, 09/11/2011 - 23:25

In reply to by रोचना

वर्डप्रेसवर माझी भाषांतरं करायला गेलो तर तिथेही बॅन करतील मला, तसंही आता फार थोड्या जागा उरल्यात जिथे मी बॅन नाहीए! ;-)

नाइल, निळे, निळ्या काहीही चालेल. :-)

आडकित्ता Wed, 09/11/2011 - 01:16

येक्दा पानट परी असं म्हटलो तवा पानट मास्तरांनी कानाखाली जाळ काढ्लेला. ग#%$#च्या, पानटपरी म्हन की नीट आसं म्हटले व्हते!

आडकित्ता Wed, 09/11/2011 - 23:03

In reply to by नितिन थत्ते

आजकाल आडकित्ता अशी आय्डी घेऊन जर याहू वर मराठी चॅटरूम मधे गेलात. तर मराठी पोरा बाळांचे 'पीएम' येतात, तुम्हाला मुलगी समजून. ही आजच्या आमच्या मराठीची दशा. तो शब्द कन्नडोद्भव आहे की अपभ्रंशातून आलाय, काय फरक पडतो?
सुपारी कातरण्यासाठी आडकित्ता वापरतात हे आजच्या गु(टखे) खाणार्‍या पोट्ट्यांना समजवून कोण सांगेल?
वरतून 'नेट'वर 'नट्स' भरपूर असतात. अन आडकित्त्याचं विंग्रजी भाषांतर नट्क्रॅकर असं होतं. म्हणून ती 'सिग्नेचर' माझी. सिग्नेचरचं एक भाषांतर स्वाक्षरी हे असलं, तरी ते चपखल नाही. अनेक अर्थछटा आहेत. ७ वर्षांपूर्वी केलेल्या ऑपरेशनच्या जखमेचा व्रण पाहून मी ओळखू शकतो की हे मी केलंय की नाही. ती सिग्नेचर आहे. स्वाक्षरी इतकं मर्यादित नाही.
राहिला प्रश्न भाषा शुद्धीचा.
म्हंजे इंग्रजी/मराठी खिचडीचा.
माझ्या मते भाषा प्रवाही असावी. मराठीत प्रचलित इंग्रजी शब्दांना ओढून ताणून मराठी आणू नये, या मताचा मी आहे..

(सिग्नेचर (कोळून) पिणारा)
आडकित्ता

राजेश घासकडवी Thu, 10/11/2011 - 04:29

In reply to by आडकित्ता

७ वर्षांपूर्वी केलेल्या ऑपरेशनच्या जखमेचा व्रण पाहून मी ओळखू शकतो की हे मी केलंय की नाही.

तुम्ही काय एक टाका उलट - एक टाका सुलट अशी काहीतरी डिझाईन स्टाईल वापरता का?

Nile Thu, 10/11/2011 - 04:34

In reply to by राजेश घासकडवी

७ वर्षांपूर्वी केलेल्या ऑपरेशनच्या जखमेचा व्रण पाहून मी ओळखू शकतो की हे मी केलंय की नाही.

सातसात वर्षे खुणा टिकवणार्‍या सर्जनकडे जायचं म्हणजे वांदाच आहे! ;-)

खवचट खान Wed, 09/11/2011 - 02:08

In reply to by आडकित्ता

पानट मास्तर खरोखरच परी असते तर जाळ निघण्याऐवजी एक गोडगोड, अंमळ दीर्घ गालगुच्चा घेतला असता का??

आडकित्ता Wed, 09/11/2011 - 22:37

In reply to by खवचट खान

अहो ते स्वतः 'मास्तर' होते ना? पानटांची परी तशी अंमळ ओढून ताणून परि बनवावी लागली असती.. म्हणजे पंख लावले तरी वजनामुळे धप्कन खाली पडली असती. पण म्हणून तिला पानटपरी? त्यामुळे जाळ वॉज आवश्यकच!

अनामिक Wed, 09/11/2011 - 01:32

मायक्रोवेव्ह म्हणजे अतिसुक्ष्मलहरी नाही काही, सरळ शुद्ध मराठीत मायक्रोवेव्ह म्हणजे माझ्या-काव़ळ्याची-लाट!
आपल्याला तर ते उंदीरटिचकी फार्फार आवडलं!

ऋषिकेश Wed, 09/11/2011 - 09:37

ठ्ठो!
=)) लय भारी रे खखाना!
ह ह पु वा

परिकथेतील राजकुमार Wed, 09/11/2011 - 12:26

लिंक, आपलं दुवे देताना http अशासारख्या ईंग्रजी अक्षरांचा वापर करू नये. त्याऐवजी हततपः असे लिहिण्यात यावे.

हे वाचून अगदी ततपप झाले आमचे ;)

लेखन एकदम आवडेश.

बहुतेक मनसैनिकांची शैक्षणिक पात्रता पाहता, शुद्धलेखनाच्या मुद्द्यावरून बोंब लागण्याचीच शक्यता अधिक असल्याने, सध्या हा मुद्दा धसास न लावण्याचे ठरले आहे.

मी मनसैनिक नाही, तरी देखील वरचे वाक्य खटकले. ह्या विषयी आपल्याकडे काही विदा असल्यास तो जाणून घ्यायला आवडेल.

खवचट खान Wed, 09/11/2011 - 19:23

In reply to by परिकथेतील राजकुमार

आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. हा लेख 'त्या' मनसैनिकांविषयी नैच्चे कै, इथल्याच सैनिकांविषयी!

Nile Thu, 10/11/2011 - 12:13

In reply to by आडकित्ता

पुढे इकडे आहे हो, डावीकडे! तिकडं कूठं चाल्लां मागं! ह्या झंटलमन लोकांल्ला काय कळन तर शप्पत!

आडकित्ता Fri, 11/11/2011 - 23:22

In reply to by Nile

माघारीनै. घरी चाल्लंय त्ये सैनिकसायेब. यास्टेरिक्ष अन ओबेलिक्षने बुक्लून काढ्लंया त्या रोमन सैनिकांस ;)

मोहनराव Mon, 14/11/2011 - 17:35

मजा आली धागा व प्रतिसाद वाचुन!!

अवांतर- (नवीन भर मराठी शब्द - टेनीस- हरितपटलावर घे टकाट्क दे टकाट्क)