मिठीत कळी उमलली
पाषाणभेद
मिठीत कळी उमलली
राया तुम्ही प्रेमाची फुलबाग केली
तुमच्या मिठीत कळी उमलली
तुमच्या मिठीत कळी उमलली
वाट कितीक पाहीली थकलं डोळं
आज उशीरा का येनं केलं?
रुजूवात कराया मोहोर उठवा गाली
तुमच्या मिठीत कळी उमलली
सजवून माझी काया नखरा केला
जवळ घेता तुम्ही गोड गुन्हा झाला
नजरेचा तिर मारता अंगी वीज चमकली
तुमच्या मिठीत कळी उमलली
कमरपट्टा उगा मला का रुतू लागला?
शालू अवजड झाला आज का अंगाला?
चोळी ऐन्याची नको तिथं उसवली
तुमच्या मिठीत कळी उमलली
- पाषाणभेद
१६/११/२०११